Nikita raje Chitnis - 11 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | निकिता राजे चिटणीस - भाग ११

Featured Books
  • हीर... - 28

    जब किसी का इंतज़ार बड़ी बेसब्री से किया जाता है ना तब.. अचान...

  • नाम मे क्या रखा है

    मैं, सविता वर्मा, अब तक अपनी जिंदगी के साठ सावन देख चुकी थी।...

  • साथिया - 95

    "आओ मेरे साथ हम बैठकर बात करते है।" अबीर ने माही से कहा और स...

  • You Are My Choice - 20

    श्रेया का घरजय किचन प्लेटफार्म पे बैठ के सेब खा रहा था। "श्र...

  • मोमल : डायरी की गहराई - 10

    शाम की लालिमा ख़त्म हो कर अब अंधेरा छाने लगा था। परिंदे चहचह...

Categories
Share

निकिता राजे चिटणीस - भाग ११

निकिता राजे चिटणीस

पात्र रचना

1.       अविनाश ͬचटणीस                         चंदन इंजीनीǐरंग चे मालक

2.       नीतीन चीटणीस           अविनाश चिटणीसांचा मुलगा

3.       निकीता चटणीस           नितीन ची बायको

4.       शशीकला ͬचटणीस          नीतीन ची आई

5.       रघुनाथ (मामा) राजे        निकीताचे मामा

6.       पार्वती ( मामी )राजे       निकीता ची मामी

7.       मुकुंद देशपांडे             अविनाश चिटणीसांचे मित्र

8.       अनंत दामले             मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  

9.   चित्रा पालकर             निकीताची कॉलेज ची मैत्रीण

10.    विशाखा नाडकर्णी          निकीताची कॉलेज ची मैत्रीण

11.  दिनेश कळसकर           निकिता चा कॉलेज चा मित्र

12.  वसंत कुलकर्णी            निकिता चा कॉलेज चा मित्र

13.    कार्तिक साने             निकिता चा कॉलेज चा मित्र  

14.  रघुवीर                  अविनाशचा ड्रायव्हर

15.    पंडित                   नितीन चा ड्रायव्हर

16.    वाटवे मॅडम              चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager

17.    अंजिकर सर              चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer

18.    साखळकर सर            चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

19.    पांडे सर                 चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

20.    बबन                   चपराशी

भाग   ११

भाग १० वरून पुढे  वाचा.

वाटवे  मॅडम

“काही नाही सर, असच इकडच तिकडच म्हणजे कुटुंबात कोण कोण असत, मूलं किती, आई वडील जवळ असतात का, मूलं कोणत्या शाळेत आणि वर्गात आहेत, असेच प्रश्न, बायको किती शिकली आहे, मुलांना शिकवू शकते का, नोकरी करते का वगैरे.” बबन बोलत होता.

“बस इतकंच? आणखी काही नाही ?” - अंजिकर.

“आई वडिलांच्या औषध पाण्यासाठी काय व्यवस्था केली आहे, आकस्मिक खर्चासाठीकाय तरतूद आहे, मुलांच्या शाळा सुरू होण्याच्या वेळी पैशांच गणित कसं बसवता, भांडणं किती होतात वगैरे वगैरे.” - बबन  

“आणि त्या प्रश्नावली च काय?” - अंजिकर

“हेच प्रश्न होते त्यात साहेब.” - अंजिकर.

“अरे वा, चालू द्या. जा तू.” बबन गेल्यावर अंजिकर माझ्याकडे बघत होते, काय मॅडम ?

“वर वर बघितल तर हे सर्व harmless दिसतंय, पण ही एवढी माहिती ही मुलगी का गोळा करतेय हे कळल पाहिजे.”

“बोलावू का तिला म्हणजे हा विषय आज संपवूनच घरी जाऊ उगाच डोक्याला भुंगा नको” - अंजिकर.

“चालेल पण अगोदर थोडा विचार करू.” थोडा वेळ तसाच गेला. शेवटी अंजिकरांना म्हंटलं बोलवा.

“May I come in?” - निकिता राजे.

राजे आत आली  आणि  बाजूला उभी राहिली. “मला बोलावलं मॅडम?”

“का ग तुला तर सरांनी बोलावल आणि इथे अंजिकर सर बसले आहेत त्यांना नाही विचारलस. मला का ?”

“सरांच्या तुम्ही वरिष्ठ आहात आणि वरिष्ठ हजर असतांना त्यांनाच अॅड्रेस करायची पद्धत आहे म्हणून.” - राजे म्हणाली.

“बरं सरळच विषयाला हात घालतेय. तू जे प्रश्नावली अभियान सुरू केल आहेस त्याच्याबद्दल आम्हाला जरा जाणून घ्यायच आहे. तेंव्हा आता तू सविस्तर बोल आम्ही ऐकतोय. इंस्टीट्यूट ने यावेळेस काही अभ्यासक्रम बदलला का ? कारण आम्हाला त्याची कल्पना दिली गेली नाही. आम्हाला त्यांच्याशी बोलाव लागेल. कारण ट्रेनी मुलांनी काय काय करायच यांचा चार्ट आमच्या जवळ असतो. त्यात हे बसत नाही.” मी जवळ जवळ वरच्या पट्टीतच बोलले.

“नाही इंस्टीट्यूट नी आखून दिलेल्या कार्यक्रमात हे नाहीये. हा माझ्या personal initiative चा भाग आहे. थोड सविस्तर बोलाव लागेल. थोडा वेळ लागेल तुम्ही ऐकून घ्याल का ? प्लीज मला या कारणांसाठी वापस पाठवू नका.” - राजे काकुळतीने म्हणाली.

“ते तू काय सांगतेस त्यावर अवलंबून असेल. तू बोल आम्ही ऐकायलाच बसलो आहोत. तू पण बसू शकतेस.”

“नको उभीच ठीक आहे. बसून नको.” – राजे.

“ओके तुला हव तसं.”

“मॅडम, सर, मी विज्ञानाची पदवीधर आहे. केमिस्ट्रि हा माझ्या आवडता विषय. आता मी जे काही बोलणार आहे त्याचा आणि माझ्या या शिक्षणाचा काही संबंध नाहीये. इंस्टीट्यूट च्या क्लास मध्ये आम्हाला मानसशास्त्राचे पण काही धडे असतात. त्यामध्ये मला इंट्रेस्ट निर्माण झाला. मग मी थोडा यावर रिसर्च केला आणि एक निष्कर्ष काढला. सांगू ?” राजे विचारत होती. मी म्हंटलं “हं सांग पण पाल्हाळ न लावता सांग.”

“हो. अगदी सारांश रूपात सांगते. आपल्या कंपनी ची उद्दिष्ट काय आहेत ? कंपनी ची उत्तरोत्तर सर्वंकष प्रगती बरोबर ?

बरोबर

आता ही प्रगती साधण्यासाठी काय आवश्यक आहे ? कंपनीच्या प्रॉफिट चा म्हणजेच नफ्याचा आलेख सतत चढता असणे बरोबर ?” - राजे.

“हॅ, यात तू काय विशेष सांगितलं हे समजण्यासाठी तुला रिसर्च करावा लागला असेल तर कठीण आहे. हे तर सर्वश्रुतच आहे.” - अंजिकर.

“पुढे ऐका न. कंपनी चा नफा हा कर्मचाऱ्यांवर, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतो. High performance is directly related to gain in profit. आता कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता सतत वाढीव स्तरावर राखणे हे दर वर्षी वाढीव नफा मिळण्यासाठी आवश्यक आहे. आता ताळेबंदात दिसणारा वाढीव नफा हा काही अंशी inflation मुळे किंवा महागाई मुळे जो price escalation फॉर्म्युला असतो त्यामुळे पण असू शकतो. पण तो फसवा असतो. कारण खर्च सुद्धा त्याच प्रमाणात वाढालेले असतात. कार्यक्षमता जर वाढली तर खर्चाला पण आपोआप लगाम घातल्या जाईल. आता, प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. तशीच ती कार्यक्षमतेला पण आहे. प्रत्येक जण ह्या मर्यादेला पोचला की कार्यक्षमतेची उतरण सुरू होते.

आता दुसरी बाजू बघू, जशी मानवी क्षमतेला मर्यादा असते तशीच ती यंत्रांनाही असते. जुनाट यंत्रांवर पूर्ण क्षमतेनी काम करून सुद्धा अपेक्षित आउटपुट मिळत नाही.

आता तिसरी बाजू काळा बरोबर जर कार्यपद्धती बदलल्या नाही तर कामा मध्ये तोच तो पणा म्हणजे monotony येते. त्यामुळे सुद्धा आउटपुट वर परिणाम होतो.

ह्या सर्व गोष्टींचा  प्रॉफिट वर negative परिणाम होतो. result काय  तर you see decline in profit. आणि प्रॉफिट कमी असेल तर त्याचा बऱ्याच गोष्टींवर डायरेक्ट परिणाम होतो. आधी कुजबूज आणि नंतर कुरबुर, ही सर्व स्तरांवर सुरू होते. आणि हे मॅनेजमेंट वर एका आव्हानाच्या स्वरुपात येऊन कोसळतं. आणि मग बाकीच्या सर्व गोष्टींची प्राथमिकता बाजूला ठेऊन यांचा सामना करावा लागतो आणि त्यांच्यावर विजय मिळवावाच लागतो. याला पर्याय नाही.” राजेनी लांब लचक स्पष्टीकरण दिलं.

“तुला नक्की काय म्हणायचं आहे ते आमच्या अजून लक्षात येत नाहीये. जरा तुझा मुद्दा अजून स्पष्ट कर.”

“ठीक आहे.”  असं म्हणून  राजेनी  पुढे  सुरवात केली.

“मुद्दा न. २ जुनाट यंत्रांचा काया पालट किंवा नवीन मशीनरी आणणे.

मुद्दा न. ३ कार्य पद्धती बदलणे.

ह्या दोन्ही गोष्टी professional consultant ला बोलावून काय तो निर्णय मॅनेजमेंट घेऊ शकते त्यामुळे मी त्यांच्या तपशिलात शिरत नाही. माझा जो रिसर्च चालू आहे तो कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची गुणवत्ता आणि क्षमता  maximum ला कशी पोचेल याच्यासाठी.” - राजे.

“म्हणजे तुला असं म्हणायच आहे का, की आपले कर्मचारी त्यांच्या क्षमतेनुसार पूर्ण आउटपुट देत नाहीत. अस असेल तर हा गंभीर आरोप आहे आणि त्याचा तुला पुराव्यासह  जबाब द्यावा लागेल.” 

“नाही नाही मला अस मुळीच म्हणायच नाहीये.” राजे म्हणाली, “मी माझा मुद्दा

अजून स्पष्ट करते. कोणाचीही क्षमता ही त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर अवलंबून असते. मानसिक स्थिति ही त्यांच्या घरी कौटुंबिक वातावरण कसं आहे त्यांच्यावर अवलंबून असेल. मी नेमक्या ह्याच वातावरणाचा शोध घेते आहे. त्याच्यासाठी त्यांची पूर्ण माहिती गोळा करणं चालू आहे. ही माहिती नीट संकलित करून वर्गवारी करायची. मग आपल्याला कळेल की माणूस कोण कोणत्या कारणांनी मन:शांति गमावतो ते. कसं आहे न मॅडम कुटुंब ही माणसाची वैयक्तिक तशीच सामाजिक गरज आहे. सुखी आनंदी परिवार माणसाला समाधान देतो. त्याकरता पैश्यांची गरज लागते म्हणून माणूस नोकरी किंवा व्यवसाय करतो. जर काही कारणांमुळे त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर असमाधानी कुटुंबात राहून माणूस मॅक्सिमम आउटपुट देऊच शकणार नाही. त्या त्या कारणांचा शोध घेऊन त्यावरचं  सोल्यूशन काढता आलं तर माणूस कामावर येतांना आनंदात येईल. आणि या परिस्थितीत तो मॅक्सिमम आउटपुट देऊ शकेल. आपल्याला हेच साधायच आहे.” राजे थोड थांबली, काय प्रतिक्रिया आहेत ते पाहाण्यासाठी, मग पुढे म्हणाली.

“हे सगळ ऑफिस मध्ये काम करणाऱ्यांना फारसं लागू होत नाही. म्हणजे तुम्ही कोणाला सांगितल की आज संध्याकाळ पर्यन्त हे काम पूर्ण पूर्ण झालंच पाहिजे.  आणि ते काम दुसऱ्या दिवशी झालं तर फारसा फरक पडणार नाही. तुम्ही त्याला चार शब्द सूनवाल, तो ऐकून घेईल. टाटा बाय बाय. पण जर हा फॅक्टरी वर्कर असेल तर काम वेळेतच व्हावं लागेल नाही तर त्याच्या पुढची कामं थांबतील आणि त्याचा delivery date वर परिणाम होऊ शकतो. जर ती एक्सपोर्ट ऑर्डर असेल तर शिपमेंट ची तारीख चुकून चालतच नाही. त्यामुळे त्याला चार शब्द सुनावून सुद्धा त्याचा उपयोग नसतो. त्यामुळे मला अस वाटत की फॅक्टरी मध्ये काम करणारे जर चिंतामुक्त स्थितीत कामावर आले तर ते पूर्ण क्षमतेनी आउटपूट देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील. मला अस वाटत की कामावर येतांना, A person should be free from home worries. मी तुम्हाला प्रश्नावली आणि आतापर्यन्त जे काम केलंय ते दाखवते. मी जाऊन papers घेऊन येते.” राजेनी आपला मुद्दा स्पष्ट केला आणि ती पेपर्स आणायला गेली.

We were speechless. “अंजिकर काय म्हणताय ?”

“मी म्हंटलं होत ना मॅडम की ही मुलगी म्हणजे चमत्कार आहे. हिच्यात मला तरी काही खोट दिसत नाही. शोधून सुद्धा कुठे बोट ठेवता येत नाहीये.” - अंजिकर.

“खरंय, येऊ द्या तिला प्रश्नावली घेऊन. बघू.”

आल्यावर तिने प्रश्नावली दाखवली आणि जी काय माहिती गोळा केली होती ती आणि त्यावरचे तिचे रिमार्क्स सर्व तपशीलवार सांगितलं. आम्ही फक्त माना डोलवत होतो. सर्व पसारा नीट गोळा करून फोल्डर मध्ये ठेवल्यावर आमच्या समोर प्रश्नार्थक मुद्रा उभी राहिली.

“चांगलं काम करते आहेस. चालू ठेव.”

“मॅडम मला फॅक्टरी मध्ये जाव लागेल.” - राजे म्हणाली.

“जरूर जा पहिल्या दिवशी अंजिकर कोणाला तरी बरोबर देतील. तू सांग केंव्हा पासून सुरवात करणार आहेस ते.”

“Thank you” - राजे.

ती गेल्यावर मी अंजिकरांना म्हंटलं की “वरवर पहिलं तर सर्व ठीकच दिसतंय तिच्या चेहऱ्यावर कुठे बेरकीपणाची एखादी तरी छटा दिसते का पाहत होते पण पोरगी निरागस वाटली. म्हणजे माझा संशय आता जवळजवळ फिटला  आहे, पण आपण कंपनी चे सीनियर लोक आहोत त्यामुळे इतक्या चटकन हे हातावेगळं करायची इच्छा होत नाहीये. सर्व झाल्यावर तिच्याकडून सगळं बाड ताब्यात घ्या. मग आपण रोज तासभर संध्याकाळी बसून त्यावर अभ्यास करून आपले निष्कर्ष काढू आणि मगच सरांकडे जाऊ. तुम्हाला काय वाटत ?”

“ठीकच आहे मॅडम. ती काय काय रिमार्क्स देते आणि काय निष्कर्ष काढते ते पण बघाव लागेल. काय काय करांव लागेल त्याच्या काय सूचना देतेय, ते पण बघाव लागेल.” - अंजिकर म्हणाले.

“बरोबरच आहे. तुमचं तिच्याकडे बारीक लक्ष असू द्या. म्हणजे आजची मीटिंग झाल्यावर तिनी आपल्याला गृहीत धरायला नको. चला बराच उशीर झाला आहे. निघूया.”

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com  

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.