Nikita raje Chitnis - 10 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | निकिता राजे चिटणीस - भाग १०

Featured Books
Categories
Share

निकिता राजे चिटणीस - भाग १०

निकिता राजे चिटणीस

पात्र  रचना

 

1.       अविनाश ͬचटणीस                         चंदन इंजीनीǐरंग चे मालक

2.       नीतीन चीटणीस           अविनाश चिटणीसांचा मुलगा

3.       निकीता चटणीस           नितीन ची बायको

4.       शशीकला ͬचटणीस          नीतीन ची आई

5.       रघुनाथ (मामा) राजे        निकीताचे मामा

6.       पार्वती ( मामी )राजे       निकीता ची मामी

7.       मुकुंद देशपांडे             अविनाश चिटणीसांचे मित्र

8.       अनंत दामले             मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  

9.   चित्रा पालकर             निकीताची कॉलेज ची मैत्रीण

10.    विशाखा नाडकर्णी          निकीताची कॉलेज ची मैत्रीण

11.  दिनेश कळसकर           निकिता चा कॉलेज चा मित्र

12.  वसंत कुलकर्णी            निकिता चा कॉलेज चा मित्र

13.    कार्तिक साने             निकिता चा कॉलेज चा मित्र  

 

भाग 10

भाग 9 वरून  पुढे वाचा .............

वाटवे  मॅडम

आज पासून ६ ट्रेनी येणार. ४ मुलं आणि २ मुली. त्यांच्या विभागांची वाटणी करावी लागणार आहे. साधारण पणे सुमारच असतात हे लोक. तसा गाळच असतो. पण क्वचित हुशार पण असतात. परिस्थितीमुळे त्यांना वाव मिळालेला नसतो. अश्या दोन जणांना आम्ही नोकरीत पण घेतल आहे. आणि ते उत्तम काम पण करताहेत आजपर्यंत तरी कुठल्याही तक्रारीला वाव नाहीये. पण बाकी सगळा आनंदच असतो. आमचंच काम वाढतं त्याच्यामुळे, आणि ज्यांच्या हाताखाली हे काम करतात ते वैतागतात. अश्या लोकांना संधि द्यायची अशी पॉलिसी असल्यामुळे कोणाला बोलता येत नाही. साधी कुरबुर सुद्धा खपवून घेतल्या जात नाही. ह्या बाबतीत मोठे सर म्हणजे अविनाश सर फार कडक आहेत. एक दृष्टीने समाजसेवा म्हणून चांगलंच आहे. पण ज्यांचं काम आहे ते रेंगाळतं मग जास्तीचा वेळ थांबून काम निपटांव लागतं त्यातून मग चिडचिड होते. आणि हे सगळं माझ्याच अखत्यारीत असल्यामुळे मलाच सगळी भांडण सोडवावी लागतात. समजूत काढावी लागते. त्याच्यातच थकायला होत. मग माझी पण चिडचिड सुरू होते. एरवी शांत असणारी आई चिडली की मुलं विचारतात की ट्रेनी आले आहेत ? आणि उत्तराची वाट न पाहता सर्व कामे बिनबोभाट आटोपतात. मीच मग स्वत:ला समजावते. असो. जे आहे ते अस आहे.

दोघा मुलींना अंजिकर सरांकडे धाडलं दोघा मुलांना पांडे सरांकडे जनरल अॅडमिनिसट्रेशन ला आणि दोघांना सांखळकरांकडे फॅक्टरी मध्ये, विभागणी संपली.ही नेहमीचीच प्रथा होती. मुली फक्त अंजिकर आणि पांडे सरांकडे आणि मूल फॅक्टरी ला. पद्धत अशी होती की ट्रेनी लोकांना कामे वाटून द्यायची ती त्यांनी पूर्ण करायची. weekly रीपोर्ट बनवायचे आणि त्या त्या सरांकडे सबमिट करायचे. त्यानंतर सांखळकर, पांडे आणि अंजिकर ते तपासायचे आणि आपली नोटिंग करून माझ्याकडे पाठवायचे. त्यावर चर्चा करून काय कमतरता आहे,त्यावर उपाय योजना करायची. तीन महिन्यांनंतर सर्व रिपोर्टस एकत्र करून, त्यावरून निष्कर्ष काढून तो इंस्टीट्यूटला पाठवून द्यायचा. त्याप्रमाणे इंस्टीट्यूट त्यांना प्रमाण पत्र द्यायची. कोणी खूप चांगला performance दिला असेल, तर कंपनी वेगळं प्रमाणपत्र पण द्यायची. बऱ्याच मुली मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्याचं कानावर पण आलं  होत.

आठवडा सांपला. दुपारी चार वाजता मी आणि अंजिकर conference room  मध्ये बसलो. त्या अगोदर अंजिकर , पांडे आणि सांखळकर यांची मीटिंग होऊन गेली होती.

“अंजिकर मला एक विचारायच होत, की मी पाहते आहे, ही मुलगी काय नाव तीच ? हं राजे, तर गेल्या दोन तीन दिवसांपासून फार इकडे तिकडे फिरतांना दिसते आहे. काम फारसं करतांना दिसत नाहीये. पण तुमचा रीपोर्ट सांगतो आहे की तिचं काम चोख आहे आणि वेळेच्या आधी होत आहे हे कस काय ?”

“अहो तेच तर सांगायचा प्रयत्न करतोय.” अंजिकर म्हणाले.

“म्हणजे?”

“ही मुलगी म्हणजे चमत्कार आहे. सौन्दर्य आणि बुद्धिमत्ता यांचा संगम एकाच ठिकाणी आज तागायत कधी पाहिला नव्हता. नुसत एवढंच नाही तर कामात बिजली आहे बिजली. अहो तीनच दिवसात तिनं सगळ आत्मसात केलं. स्वत:चं  काम पूर्ण करून, ते ही जेमतेम २ तासात, ही पोरगी दुसऱ्यांना मदत करायला धावते. जेणेकरून त्यांचा सुद्धा रीपोर्ट चांगला जाईल.” - अंजिकर.

“काय सांगताय काय? तुम्हाला चांगलंच impress केलेल दिसतंय ह्या पोरीने.”

“खरं तर तिला तुम्हीच ट्रेनिंग द्यावं अस मला वाटतंय. अहो काय spark आहे तिच्यात ते तुम्हाला पण कळून येईल.” अंजिकर मुद्दा सोडायला तयार नव्हते.

“अंजिकर, आठ दिवसात कोणाबद्दल मत बनवण बरोबर नाही. इतक प्रभावाखाली येऊ नका.”

“मॅडम अॅडमिनिसट्रेशन मधली लोक आपण, इतक्या चटकन कोणाच्या प्रभावाखाली येऊ का” अंजिकर म्हणाले.

“तेच म्हणतेय मी. बर ते सोडा, त्याबद्दल आपण नंतर बोलू. मला अजून एक विचारायच होत ते अस की ती बाकीच्या ट्रेनीज बरोबर बोलते, त्यांना मदत करतेय हे सर्व ठीक आहे. पण ती आपल्या स्टाफ बरोबर पण बोलते आणि कुठला तरी फॉर्म भरतेय, हे तुमच्याही  लक्षात आलंच असेल. हा काय प्रकार आहे ? मला तर वेगळाच संशय येतोय. मला जरा काळजीच वाटतेय.” मी माझी शंका बोलून दाखवली.

“अं, मला समजलं नाही तुमच्या काळजीच कारण. आणि संशय म्हणजे कसला मॅडम ? अस काही आहे का की जे तुमच्या नजरेस आलंय आणि कुठेतरी खुपतेय, पण नेमक काय ते कळत नाहीये, पण हे नॉर्मल नाहीये अस जाणवतय.” आता अंजिकर सुद्धा काळजीच्या स्वरात बोलले.

“यस तसंच काहीतरी. म्हणजे मला अस सांगा की -

एक :  एखादी मुलगी, एवढ्या कमी वेळात आपल्या कामात जवळ जवळ पारंगत

झालेली, अख्या आयुष्यात तुम्ही पाहिली आहे का ? दुसऱ्यांनी कोणी सांगितल असतं तर तुम्ही विश्वास ठेवला असता का ?”

दोन : “सुंदर मुलींच वर्णन, गजगामिनी अस केल्या जाते. पण हिच्या हालचाली फार चपळाईच्या आहेत. इतर सुंदर मुली बरोबरच्या मुला मुलींना कामाला लाऊन आपल काम काढून घेतात. ही तर मदतीला धावते आहे. हे कस काय ?”

तीन : “सुंदर मुलींना आपल्या सौंदर्याचा गर्व असतो. एक प्रकारची ऐट त्यांच्या प्रत्येक हालचालीतून इतरांना जाणवते. ही तर ह्या बाबतीत अत्यंत बेफिकीर दिसतेय, आणि लाघवी तर इतकी आहे की मदर तेरेसाच अवतरल्यात की काय अस वाटाव.”

“ह्या सगळ्या गोष्टींचा भुंगा डोक्यात फिरतो आहे म्हणून मी अस म्हणाले की मला काळजी वाटते आहे. हे काहीतरी वेगळंच प्रकरण असल्याचा संशय येतो आहे. आपल्याला सतर्क राहायला हव अस मला वाटत.”  मी, मला नेमकं काय म्हणायचं आहे ते अंजिकर सरांना सांगितलं.

“मॅडम तुम्हाला अस म्हणायचं आहे का की कोणीतरी तिला हेरलं, भरपूर आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढल, आणि मग तिला full training दिल. मग ती सर्व दृष्टीने get set and go स्थितीला पोचल्यावर, आणखीही बरच काही शिकवून मग institute मध्ये प्रवेश घेतला आणि institute ला पण मॅनेज करून आपल्याकडे पाठवलं ?” - अंजिकर.

“अंजिकर मला अगदी हेच म्हणायच होत. आता पुढे बोला.”

“प्रकरण प्रथम दर्शनी तरी सिरियस दिसतंय. आपण हे मोठ्या सरांच्या कानावर घालायचं  का” - अंजिकर.

“नको आपण प्रथम स्टाफ शी बोलू. त्यांना कुठली प्रश्नावली दिली ते बघू. मग ठरवू . पण तो पर्यन्त आपल्याला जागरूक राहायला हवं. कुठली माहिती ती गोळा करतेय ते बघण जरुरीच आहे.”

“ठीक आहे.” - अंजिकर.

तेवढ्यात बबन, आमचा शिपाई चहा घेऊन आला. अंजिकरांनी त्याला थांबवल म्हणाले “मॅडम ह्याच्याशी पण ती बराच वेळ बोलत होती. ह्याच्यापासूनच सुरवात करूया का ?” मी मानेनेच होकार दिला. अंजिकर सुरू झाले.

“बबन मला सांग गेली किती तरी वर्ष आपल्याकडे ट्रेनी मुलं येतायत, पण त्यांनी स्टाफ शी कधी जवळीक केलेली पाहिलीस का?” - अंजिकर.

“नाही साहेब, जरा दबूनच असतात ही मुलं.” - बबन  

“बरोबर मग याच वेळेस काय झालं की तुम्हा लोकांशी गप्पा मारताहेत?” - अंजिकर म्हणाले. “हे बघ घाबरू नकोस, आमचं त्यावर काहीच म्हणणं नाहीये, पण जे इतक्या वर्षात घडलं नाही ते होतंय म्हंटल्यांवर कुतुहल वाटतंय एवढंच. काय बोलता रे एवढं ?”

“काही नाही सर, असच इकडच तिकडच म्हणजे कुटुंबात कोण कोण असत, मूलं किती, आई वडील जवळ असतात का, मूलं कोणत्या शाळेत आणि वर्गात आहेत, असेच प्रश्न, बायको किती शिकली आहे, मुलांना शिकवू शकते का, नोकरी करते का वगैरे.” बबन बोलत होता.

“बस इतकंच? आणखी काही नाही ?” - अंजिकर.

“आई वडिलांच्या औषध पाण्यासाठी काय व्यवस्था केली आहे, आकस्मिक खर्चासाठीकाय तरतूद आहे, मुलांच्या शाळा सुरू होण्याच्या वेळी पैशांच गणित कसं बसवता, भांडणं किती होतात वगैरे वगैरे.” - बबन  

“आणि त्या प्रश्नावली च काय?” - अंजिकर

“हेच प्रश्न होते त्यात साहेब.” - अंजिकर.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com  

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.