Ajun hi Barsat aahe.... - 1 in Marathi Love Stories by Dhanashree Pisal books and stories PDF | अजून ही बरसात आहे ..... - भाग 1

Featured Books
  • You Are My Choice - 40

    आकाश श्रेया के बेड के पास एक डेस्क पे बैठा। "यू शुड रेस्ट। ह...

  • True Love

    Hello everyone this is a short story so, please give me rati...

  • मुक्त - भाग 3

    --------मुक्त -----(3)        खुशक हवा का चलना शुरू था... आज...

  • Krick और Nakchadi - 1

    ये एक ऐसी प्रेम कहानी है जो साथ, समर्पण और त्याग की मसाल काय...

  • आई कैन सी यू - 51

    कहानी में अब तक हम ने देखा के रोवन लूसी को अस्पताल ले गया था...

Categories
Share

अजून ही बरसात आहे ..... - भाग 1

राधा .....एक पंचवीस वर्षाची तरुणी ......हो ....तरुणीचं........कारण तिची स्वप्ने ही अजून तरूनच होती ...... नेहमी हसतमुख असणारी ....ओठांवर हसू ....आणी डोळ्यात एक अनोखी चमक ......सडपातळ बांधा ....गोरा रंग ,आणी गुबरे गुबरे गाल ......तिच्या सौन्द्र्यात ते गुबरे गुबरे गाल ...विशेष महत्वाचे होते ......
अशी ही आपली गोड राधा ......हिच्या बद्दल सांगायचं झ्हाल तर ....हि गेली चार वर्स्ष झ्हाली मुंबईत राहते .....ती पूर्वी तिच्या गावी राहत होती .....तिच शिक्स्षन् ही गावी च झ्हाल होत .....ती एकवीस झ्हाल्यावर तिच लग्न मुंबईतील
निलेश शी लावण्यात आल .........निलेश शी लग्न झ्हाल्यावर ती मुंबईत आली .....ती खूप खुश होती .....तीने मुंबई बद्दल खूप ऐकलं होत ......तिला मुंबई बद्दल खूप कुतूहलं ही होत ..मुंबईला गेल्यावर हे करायचं .....ते करायचं .....तिच लग्ना आधी सगळं ठरल होत ......
निलेश ही चांगला होता .......तो ही राधा ला पाहताच तिच्या सौन्दऱ्यावर भाळाला होता ....आणी त्याने लग्नाला होकार दिला होता ..... निलेश मुंबईत एका चांगल्या कंपनीत चांगल्या पोस्ट वर होता .....त्याला पगार ही चांगला होता ......मुंबईत त्याच्या वडिलांनी घेतलेलं अस घर होत ....त्यात त्याची आई वडील ,भाऊ वाहिनी त्याची दोन मुले... निलेश आणी आता राधा आणी त्यांची सहा महिन्याची मुलगी राहत होते .....

निलेश ची वाहिनी थोडी खडूस होती .....राधाच लग्न होताच ....तीने बेडरूम वर्ती कब्जा केला होता ....त्यामुळे लग्न झ्हाल्या पासून राधा निलेश स्वयंपांक घरातच झोपत असे ..... निलेश ची वाहिनी नोकरी करत असल्यामुळे ....राधाच तिच्या मुलांना सांभाळत असे ....घरातल्याचं ही सगळं तिच करत असे .....हे सगळं करून ती संध्याकाळी दोन तास गाण्याच्या मुलांची शिकवणी घेत असे ..... तिला गाण्याची फार आवड होती ....तिचा आवाज ही फार गोड होता .....पण तिच्या ह्या कलेच न निलेश ला कौतुक होत ....न त्याच्या घरच्यांना ......ते सतत तिला त्या बद्दल बोलत असे .....राधा ला हे सगळं आवडत नसे ....तरीही ती त्या बद्दल कधीच काहीही बोलली नाही ....

त्या घरात राधा जीव ....जर कोण असेल ? तर ती तिची गोडुली .... तिची बाहुली......तिच्या बाहुलीत ...तिचे गुण होते ....तिच रडणं ही सुरात् होत ........

निलेश च मात्र आता राधा कडे फारस लक्ष नव्हतं .... मुलगी झ्हाल्यापासून मात्र तो तिच्यावरति सारखा राग राग करत असे .....घरातल्या कामामुळे आणी तिच्या लहानश्या मुलीमुळे तिला आता स्वतःकडे फारस लक्ष देता येत नव्हते ....निलेशला मात्र त्या गोष्टी खटक्याच्या ...........पण तरीही राधा ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून हसत मुखाने सगळ्यांचं सगळं करायची .........

एक दिवशी ....ती गायनांची शिकवणी घेण्यासाठी जाताना ....तिला दिसले की तिच्या समोरचे जोशी काकां आणी काकू त्याच राहात घर विकून अमेरिकेला त्यांच्या मुलाकडे कायमचे राहायला जाणार होते...... ......मुबंईत तिच्या कुटुंबानंतर जर तिला जवळच कोण वाटत असेल ....तर जोशी काका आणी काकू .........त्यांना ही तितकंचीच जवळची होती .....ते दोघे ही तिला त्यांची मुलगीच समजत ....ते दोघे जाणार ह्या कल्पनेने तिचे डोळे भरून आले होते .....तीने जोशी काकूंना घट्ट मिठी मारली ..... जोशी काकूंना ही आता अश्रू अनावर झ्हाले होते .....
राधा ....तुझ्यासारखी मुलगी आणी सून लाभायला. भाग्य लागत ..... तु खूप गोड मुलगी आहे ....काळजी करू नको ....अहमी अमेरिकेलां गेलो तरी ...तुझी नेहमी आठवण काढू .......तुझ्या गाण्याची ,तुझ्या गोड हसण्याची ......
काकू च बोलण ऐकून राधा गालात पुन्हा गोड हसली ......

आणी हो .....आह्मी इथून गेलो ...तरी माझया भाचा इथे राहायला येणार आहे ....तर थोडस लक्ष दे .....त्याचं ही लग्न झ्हालय तुझ्यासारखं ....आणी एक मुलगा ही आहे त्याला .........


हो .....काकू .....मी नक्की त्यांना मदत करेन .....तुम्ही काही काळजी करू नका .......

एवढं बोलून राधा ही शिकवणी ला निघाली ....पाहिलाच तिला उशीर झ्हाला होता ....