Sir comes and goes - 11 in Marathi Fiction Stories by Ketakee books and stories PDF | सर येते आणिक जाते - 11

The Author
Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

सर येते आणिक जाते - 11

 

 

 


आई पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ बद्दल जे बोलली ते अगदी खरे होते आणि आहे. आपण पहिल्यापासूनच त्या गोष्टीकडे, म्हणजेच पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळे ठेवण्याबद्दल कायम सतर्क राहिलो आहोत, कायम लक्ष दिले आले. पण खरंच त्या एका दिवसामुळे खूप अपराधी वाटत आहे. इमेज बनवायला आयुष्य कमी पडते. पण ती खराब व्हायला एक छोटासा क्षण देखील पुरेसा असतो. या गोष्टींची तोंडी जाहिरातबाजी होत असते आणि ती होऊन तिचा गावभर बोभाटा व्हायला आजकालच्या सोशल मिडीयाच्या काळात अजिबात देखील वेळ लागत नाही. 

 

त्यामुळे प्रथमा आता इथून पुढे जास्त सतर्क राहणार होती. आणि इथून पुढे असे कधीही घडणार नाही याची काळजी कटाक्षाने घेणार होती.

 


झोपतानाही प्रथमा आईच्या इतर बोलण्याचा देखील सखोल आणि सर्वांकष असा विचार करत बेडवर पडली होती. कदाचित आपल्या वागण्यातून आईला असे काही तरी निदर्शनास आले आहे जे कदाचित आपले आपल्यालाच कळत नाहीय. हे फक्त आईच्याच लक्षात आले आहे की इतरही लोकांच्या लक्षात आले आहे किंवा असावे...? फक्त मीच अनभिज्ञ आहे का माझ्या मनातील आणि वागणुकीतून डोकावणाऱ्या आचार विचारांपासून...!!

 


आईने प्रथमाला विचार करण्यासाठी एक योग्य दिशा दिली होती. आधी जी ती सैरभैर होऊन शेलमध्ये, कोषात गेली होती त्यातून काही प्रमाणात का होईना तिला वाट शोधण्यास, बाहेर पडण्यात आईची मदत होत होती. धूसर रस्त्यावरून चाचपडत, अंदाज घेत घेत अतिशय शिताफीने वाट शोधत चालावे आणि अचानक ढग बाजूला होऊन सूर्याची किरणे येऊन रस्ता स्पष्ट दिसू लागावा तसे काहीसे प्रथमाला या घडीला वाटत होते. आता फक्त आपल्या मनातील वादळाचे मूळ शोधून त्याला थोपवण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजना करणे इतकेच काय ते प्रथमाला करायचे होते.

इतकेच... !!

 

प्रथमाला आता बऱ्यापैकी बरे वाटत होते. मागच्या आठवड्याभराची मरगळ आणि धाकधूक बाजूला पडली होती. नव्या जोमाने, नव्या उत्साहाने ती आपल्या दैनंदिनी मध्ये व्यस्त झाली होती. ऑफिसचे अर्धवट राहिलेले सर्व काम तिने अधिक तास थांबून पूर्ण केले. त्यामुळे ऑफिसच्या क्वार्टरली मीटिंग मध्ये तिला तिच्या बॉसकडून ऍप्रेसिएशन सर्टिफिकेट देण्यात आले. आता ती प्रोफेशनल फ्रन्टवर नवीन ऑफिसमध्ये चांगली रुळली होती.

 

तिचे वैयक्तिक आयुष्य आणि त्यातील प्रश्न अजूनही बऱ्याच अंशी अनुत्तरित होते. त्यांची उत्तरे कधी आणि कशी मिळणार याबाबद्दल तिचे मन फार साशंक होते. संध्याकाळची वेळ तर खायला उठत असे. आईशी जेवढ्या मोकळेपणाने बोलणे शक्य होते तेवढे बोलून झाले होते. आता जे काही करायचे होते, जो काही मार्ग शोधायचा होता तो तिचा तिलाच शोधायचा होता.

 

शेवटी तिने देवासमोर हात जोडले आणि सारे काही त्याच्यावर सोपवून दिले. ज्या गोष्टी माणसाच्या आवाक्याबाहेरच्या असतात  त्यांच्यावर फार एनर्जी वाया घालवण्यात अर्थ नसतो. कदाचित देवच योग्यवेळी आपल्याला कौल देईल आणि मग कदाचित अस्वस्थपणाचे स्रोत कळून येतील. इंग्रजीमध्ये म्हणतात ना "थिंग्स विल फॉल इंटू प्लेस" तसे काहीतरी देव घडवून आणेल या विचारानिशी प्रथमाने टेबल लॅम्प बंद केला.

 

डोळे बंद केले. झोपण्याचा निष्फळ प्रयत्न करून झाला. पण झोप आणि तिचे समीकरण सध्या बिघडले होते. तिने सहज खिडकीवरचा पडदा बाजूला केला. बाहेर अजूनही बरीच वर्दळ होती. तिला काही लोक बाजूच्या सोसायटी मध्ये जाताना दिसले. त्यांचा अवतार बघून कोणीही सांगितले असते कि ते सर्वजण ट्रिप वरून आले होते. थोड्या वेळात परत तो रस्ता निर्जन दिसू लागला. रात्र हळूहळू आपल्या  कुशीत सारे अवकाश सामावून घेत होती.

 

थोड्या वेळात परत तो रस्ता निर्जन दिसू लागला. रात्र हळूहळू आपल्या कुशीत सारे अवकाश सामावून घेत होती. त्याच अवकाशात प्रथमा देखील स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न करत होती. झापड येत होती, पण डोळ्यांसमोर काहीतरी तिला दिसत होते जे तिला अस्वस्थ करत होते. डोंगर, ट्रेक आणि घोळक्याला संबोधणारी एक व्यक्ती...