Thrill of black night in Marathi Thriller by Balkrishna Rane books and stories PDF | थरार काळरात्रिचा

Featured Books
Categories
Share

थरार काळरात्रिचा

खेळ काळरात्रीचा भाग१

हिरव्यागार झाडीतून वळणे घेत-घेत एस. टी. धामणगावात शिरली. लाल-पिवळ्या मातीचा धुरळा वावटळीसारखा उठला. त्या पाठोपाठ दहा-बारा कोंबड्या गलका करीत उडल्या व दगडी कुंपणावर जाऊन बसल्या. रस्त्यावर खेळणारी शेंबडी 'पोर झपाझप बाजूला झाली. माना वर करुन खिडकीत कुणी ओळखीचा दिसतो का ते पाहू लागली. |

मास्तर गावात पक्का रस्ता नाही का? मी सहजपणे कंडक्टरला विचारले.
" होता की. पण आता रस्त्याचा धुरळा झालाय."
कंडक्टर त्रयस्थपणे म्हणाला.
" बर. प्राथमिक शाळा आली की मला सांगा. "

" सांगायच काय? अगदी शेवटचा स्टॉप आहे तो. "
मी पुन्हा खिडकीबाहेर पाहू लागलो. गाव छोटासा होता. अस्ताव्यस्त दाणे फेकल्यासारखी घर इकडे-तिकडे दिसत होती. काही घर दगडी, 'काही मातीची दिसत होती. एखाद-दुसरा बंगलाही मध्येमध्ये दिसत होता. शेतात गडी-माणस काम करत होती. मला मात्र केव्हा एकदा माझ्या मित्राला भेटतो अस झाल होत. काल रात्री माझ्या मित्राने मला फोन करुन सांगितल की धामणगावात एका पडक्या वाड्यात काही जुनी कागदपत्रे सापडलीत म्हणून. जी मराठी व कन्नड भाषेत होती तर काही ठिकाणी सांकेतिक आकृत्या 'काढल्या होत्या. माझी इतिहास संशोधनाची आवड, दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद. त्याला माहित होता. वनस्पतीशास्त्र शिकवणारा माझा हा प्रोफेसर मित्र विद्यार्थ्यांना घेवून दुर्मिळ वनस्पतींचे नमुने गोळा करायला धामणगावात आला होता. ती सारी मंडळी गावातल्या प्राथमिक शाळेत उतरली होती. काल गावाबाहेर भटकंती करताना त्याला रानझुडपांमध्ये 'पडक्या वाड्याचे अवशेष दिसले. तिथे शोध घेता-घेता एका पडक्या भिंतीखाली छोट्या सागवाणी लाकडाच्या पेटीत ते कागद सापडले होते. त्याने फोन केल्यापासून मी अस्वस्थ व उत्तेजित झालो होतो. मला ते कागद व तो वाडा बघण्याची घाई झाली होती. त्या वाड्यात आणखी काही दुर्मिळ गोष्टी सापडतील अस मला वाटत होत. त्यामुळे सकाळची पहिली एस. टी. पकडून मी धामणगाव गाठले होते.
"साहेब, शाळा आली, बर का." कंडक्टरच्या आवाजान मी भानावर आलो.
माझी बॅग उचलून मी खाली उतरलो. गाडी वळून निघूनही गेली. उडलेला धुरळा बसल्यावर मी अवतीभोवती पाहिल. समोरच्या प्राथमिक शाळेची छोटखानी पण छान सजवलेली इमारत दिसली. पण तिथे सामसूम होती. शाळेला सध्या सुट्टी होती. पण माझा मित्र किंवा त्याचे विद्यार्थी यापैकी तिथ कुणीच नव्हते. बहुधा ते वनस्पतींचे नमुने गोळा करायला गेले असावेत. नेमक काय कराव ते न समजल्याने मी तसाच अवघडल्या सारखा उभा राहिलो. तेवढ्यात समोरच्या खोपटातून एक रुंद चेहऱ्याचा बुटकासा सावळा वर्णाचा प्रौढ बाहेर आला.
"प्रोफेसर सायबान्सी शोधताय न्हव? "त्याने मला प्रश्‍न केला.
"होय! कुठ गेलेत ते?
" त्या वरच्या माळावर.. देशपांड्यांच्या पडक्यावाड्या जवळ, त्यांना मी म्हनल होत पोरास्नी घेवून जाऊ नका तिथ म्हणून. "
मी त्याच्या रुंद चेहऱ्याकडे प्रश्‍नार्थक नजरेने पाहिल.
" बर साहेब, चहा घेणारेय का? "
त्याने विचारल.
"चहा! पण कुठ? "
खर म्हणजे मला चहाची खूपच गरज होती. सावंतवाडीवरुन माझा प्रवास सकाळी साडे पाचला सुरु झाला होता. आत्ता सकाळचे अकरा वाजले होते. य़ा दरम्यान मी काहीच खाल्ल नव्हत.
" आपली चहाची टपरी हाय की चला. सरांनी तुम्हाला 'काय लागेल ते द्यायला सांगितलय."
तो वळून चालायला लागला, जणू त्याला खात्री होती की मी त्याच्या माग येणारच.मी गुपचूप त्याच्या माग गेलो. त्याच्या चहाच्या टपरीबाहेर एक ' भटका' कुत्रा सुस्तावला होता. नवख्या माणसचा वास येताच तो झपकन उठला. कान टवकारत तो अंदाज घेवू लागला. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत त्या अंथाऱ्या खोपटात शिरलो. आत दोन-चार बाकडी, दोन जुनाट टेबल मांडली होती. तीन इसम आत दिसत होते. एक जण भिंतीला टेकून शून्यात डोळ लावून विडी ओढत होता. इतर दोघेजण चहाचे घुटके घेत गप्पा हाणत बसले होते. मी एका बाकड्यावर बसलो.
"साहेब, चहा घ्या."
त्या हॉटेलवाल्या इसमाने माझ्या समोर सहा बिस्किटाचा पुढा ठेवला. तो गरम चहा घेताना मला थोड बर वाटल. "का, हो! तुम्ही मघाशी अस का म्हणालात की; त्या
पडक्या वाड्याकडे मुलांना नेऊ नका म्हणून!"
मी त्या पडक्या वाड्याय नाव घेताच गप्पा मारणारे दोघे व तो विडीवाला दचकले. सरसावून बसत ते माझ्याकडे बघू लागले.
" अहो.. लई वंगाळ जागा हाय ती. बऱ्याच लोकांन्सी तिथ बाधा झालीय."
"म्हणजे नेमके काय घडल होत तिथ?"
मी त्याला या विचारल. नंतरच्या दहा-पंधरा मिनिटात त्याने मला त्या देशपांड्याच्या पडक्या वाड्याचा इतिहास जो त्याने त्याच्या वडिलांकडून ऐकला होता तो सांगितला. त्याच्या म्हणण्यानुसार त्या वाड्यात सुमारे ऐशी वर्षापूर्वी एका रात्री संपूर्ण देशपांडे कुटुंबाचे व त्यांच्या 'नोकर-चाकरांचे कुणीतरी शिरकाण केल होत. वाडा जमिनदोस्त केला गेला होता. आक्रोश व किंचाळ्यांनी ती रात्र भरुन गेली होती. पण कुणा गावकऱ्यांनी तिथे जाण्याच धाडस केल नव्हतं. सकाळी ज्यावेळी सारे गावकरी तिथे गोळा झाले त्यावेळी तिथे स्मशानवत शांतता होती. रक्ताचे ओघळ साचलेले होते. पण एकही मृतदेह तिथे नव्हता. त्या दिवसापासून तिथे कुणीही जात नव्हता.
त्या जागी रानटी झाड-झुडप उगवली होती. रानटी कुत्री व कोल्ह्यांचा वावर तिथे सुर झाला होता. त्या जागेबदल अनेक वावड्या उठल्या. नव्या पिढीला यातली कोणतीही माहिती नव्हती. तरीही तिथे कुणीही जात नव्हता. सारा कहाणी ऐकून मी सुन्न झालो. पण त्या रात्री नेमक काय घडलं असेल ते शोधण्याचा मी निश्‍चय केला. मी पंढरीबरोबर (हॉटेलवाला) शाळेत गेलो. माझा मित्र त्याच्याजवळ चावी देऊन गेला होता. त्याने मला वर्गखोली उघडून दिली. नळ व टॉयलेट दाखवला. मी फ्रेश झालो. बाहेर येऊन मित्राला फोन 'लावला. त्याने मला ते मिळालेले कागद कुठे ठेवले ते सांगितले. मी उत्सुकतेने पुन्हा खोलीत गेलो. खुंटीवरच्या पिशवीत ठेवलेले ते कागद काढले. खिडकीजवळच्या खुर्चित बसलो. ते कागद वाचायला सुरुवात केली. त्या कागदावर देशपांडे घराण्याची माहिती सुरुवातीच्या पानावर होती. चंद्रभान देशपांडे त्या काळातल्या कर्तबगार माणसाने हे लिखाण केल होते. एक-एक पान उलटता उलटता मला धामणगावचे देशपांडे व अचलपूरखे दाभाडे यांच्या पारंपारिक वैराची माहिती लिहिलेली दिसली.चंद्रभान यांची कर्तबगारी, त्यांना मिळणारा मान, त्यांचे वर्चस्व यामुळे रायभान दाभाडे हे त्यांचा द्वेष करत होते. त्यांच्या विरोधात कारवाया करत होते. ह्या रायभान दाभाडेचे दरोडे घालणार्या,वाटमार्या करणाऱ्या रामोश्यांशी संधान होत. ह्या रामोश्यांना हाताशी धरुन तो देशपांड्यांना त्रास देत होता. त्या काळात इंग्रजाविरुद्ध देशभर उठाव सुरु झाला होता. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होणारे लोक देशपांड्याच्या वाड्यावर बैठका घ्यायचे. चळवळींचे नियोजन करायचे. चंद्रभान आपल्या परीने त्यांना मदत करायचे. दाभाडेंना आयती संधी चालून आली. त्यांनी इंग्रजाकडे तक्रार केली.इंग्रजांनी चंद्रभान देशपांडेच्या वाड्यावर धडक भरली. पण चौकशीला आलेल्या अधिकाऱ्याला त्यांचा बाणेदारपणा, प्रामाणीकपणा बघून त्यांच्या निर्दोषपणाची खात्री पटली व ते आल्यापावली निघून गेले. पण त्यामुळे देशपांडे व दाभाडे यांच्यातील वाद विकोपाला गेला. हा रायभान दाभाडे कधीतरी आपला घात करीत अस त्यात लिहिलं होत.
त्यात पुढे त्यांच्या कुलदेवतेच्या सुवर्णमुर्तीबद्दल व मुकूटावर बसविलेल्या गुलाबी माणिकाबद्दल लिहिले. ही मूर्ती व ते माणिक ,देशपांडे घराण्याचा मान असून कुणा शत्रूच्या हाती पडू नये अस म्हटल होत. धोक्याची जाणीव झाल्याने दोन्ही वस्तू सुरक्षित "ठिकाणी ठेवल्या' अस त्यात लिहिलं होत व पुढे काही आकृत्या काढल्या होत्या. मुर्ती नेमकी कुठ ठेवलीय ते सांकेतिक चिन्हाने दाखवले होते. त्या लिखाणावर शेवटची तारीख होती. २० डिसेंबर १९३० साली. त्या दिवशीच्या लिखाणात त्यांनी लिहिलं होत की आज त्यांना कसल्यातरी अशुभाची चाहूल लागलीय. काहीतरी अघटीत घडेल अस सारख वाटतय, वाड्याची सुरक्षा व कुटुंबाची सुरक्षा यांची तजवीज करावी लागेल. सर्वात महत्वाच म्हणजे त्यांची सून गोजीरा ही सात महिन्यांची गर्भवती आहे. तिला कुठेतरी सुरक्षित रिकामी हलवावे लागेल; ते ही कुणाला न कळता. आजच हे कराव लागेल. तिच्या पोटी वंशाचा दिवा जन्म घेणार होता.
इथे लिखाण संपले होते बहुधा त्याच दिवशी हे कागद घाईंगबडीत दडवून ठेवले होते. याचा अर्थ २० डिसेंबर १९३० ला वाड्यावर हल्ला झाला होता. हे सार वाचल्यावर मला त्या पडक्या वाड्याच्या ठिकाणी जाण्याची अनामिक ओढ लागली. मी डोळे मिटून क्षणभर शांत बसलो. अनेक आवाज... गडबड व दरवाजा ढकलल्याचा आवाज आल्याने मी दचकून जागा झालो. माझा मित्र त त्याचे विद्यार्थी खोलीत दाखल झाले.
"सिकंदर, मला वाटतं तू सार वाचल असशील. माझा मित्र म्हणाला. "
"होय, मला आत्ताच तिथ जायचय. "
आत्ता? थोड खाऊन घे. आम्हींट आजच जाणार, आज २० डिसेंबर आहे. नाताळाची सुट्टी पड्णार आ़हे."
२० डिसेंवर ही तारीख ऐकून मी दचकलो. का कुणास ठावूक मला अस वाटल ल की आज माझ्या इथ येण्यात काहीतरी योगायोग आहे.
"ठिक आहे. मी पंढरीला घेवून त्या जागेवर जाईन, " "सिकंदर! जरा जपून त्या जागेबद्दल इथ बरेच प्रवाद आहेत. तू ' ऐकणार नाहीस. पण मलाही तिथे विचित्र वाटत होत." माझा मित्र म्हणाला.
खरतर माझ नाव श्रीधर आहे. पण माझी इतिहासाबद्दलची आवड, व निराश न होता प्रयत्न करत राहायची माझी सवय यामुळे मला माझे मित्र सिकंदर म्हणायचे. येवड्यात पंढरी सर्वांना जेवणासाठी बोलवायला आला. मी त्याला माझ्यासोबत त्या ' ठिकाणी येण्यासंदर्भात विचारले. तो पहिल्यांदा तयार होईना. ' पण नंतर ती जागा दाखवण्याच्या अटीवर तयार झाला. मला पडका खाडा दाखवून तो परत फिरणार होतो. मलाही माझ्या सोबत कुणीही नको होता. संशोधन करताना कुणी सोबत असला की अडचणी निर्माण होतात असा माझा अनुभव होता. सर्वाचे जेवण आटोपल्यावर मी मित्राचा निरोप घेतला. तो पर्यंत दुपारचे तीन वाजले होते. माझा मित्र व त्याचे विद्यार्थी चारच्या एस. टी. जे प्रथप आजरा व त्यानंतर कोल्हापूर गाठणार होते. मी, पंढरी व तो हॉटेलमध्ये विडी ओढणारा (त्याला पंढरीने सोबत घेतल होत.) असे वाड्याच्या रोखाने निघालो. वाटेत पंढरी व त्या विडीवाल्याने वाड्याबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकवल्या. दहा-बारा मिनिटे चालल्यावर हळूहळू थोडी चढण सुरु झाली. सगळीकडे झाडी वाढली होती. बोरीची काटेरी झुडप सर्वत्र दिसत होती. काही वेळाने आम्ही वाड्याच्या जागी पोहोचलो. छोट्याशा टेकडीवर वाड्याची जागा होती. कधीकाळo दिमाखात मिरवणाऱ्या देशपांडेच्या वाड्याचे भग्न अवशेष दिसत होते.
" तो, बघा पडका वाडा. आम्ही आता जातो. तुम्ही संध्याकाळी गावात येणार की कस?"
पंढरीने वाड्याच्या दिशेने बघत विचारले.

भाग2
"बघूया मी निश्चित सांगत नाही.रातच्याला हिथ थांबू शकत नाही." विडीवला विनवणीच्या सुरत म्हणाला.
" हे बघा मी रात्री तिथे राहणार नाही.पण मी आलो नाही तर काळजी करू नका."
दोघेही मागे फिरले. पण जाता जाता त्यांनी दोन ते तीन वेळा मागे फिरून पाहिलं.
मी समोर पाहिलं दाट झुडपांमध्ये चिर्यांचे खांब मधेमधे दिसत होते. वाड्याचा मुख दरवाजा पूर्वेकडे होता. मी वाट काढत दरवाज्याजवळ पोहोचलो.दरवाज्यावरची लाकडी छावणी तिरकी होऊन लटकत होती.दोन्ही बाजूच्या भिंती सुमारे चार ते पाच फूट उंची पर्यंत शिल्लक होत्या .दरवाज्याच्या दोन्ही बाजूला कोरलेल्या चिन्हानी माझं लक्ष वेधून घेतलं.एक सुंदर मोरपीस व त्यामध्ये एक मोठा शंख अस ते चिन्ह होते.या पूर्वी मी अस चिन्ह कुठेही पाहिलं नव्हत. मी त्याचा फोटो घेतला.मी दरवाज्यातून आत पाय ठेवला, अगदी त्याच क्षणी माझ्या आगावर काटा उभा राहिला काहीतरी अदृश्य व गार अस माझ्या आंगाला स्पर्श करून गेलं अस वाटल.अनामिक भयाची लहर गात्रा गत्रातून फिरत गेल्या सारखी वाटली.मी ती भावना कशी बशी मनातून झटकली.मी पुढे सरकलो.एवढ्यात सर सर आवाज करीत एक पिवळा साप समोरच दिवाणखान्यात शिरला.खर तर मला असल्या दृश्यांची सवय होती.
तरीही मी क्षणभर अस्वस्थ झालो. पुढच्या अर्ध्या तासात मी सारा वाडा नजरेखाली घातला.
मी पुन्हा कागदाची गुंडाळी बाहेर काडली . पुन्हा साऱ्या कृत्या नजरेखाली घातल्या. साडे सतरा सेकंड बहुदा ती सुवर्णमूर्ती उत्तरे कडच्या भिंती जवळ वापरतात. मी पुन्हा मी पुन्हा वळसा घालून उत्तरेला आलो.त्या भिंतीची आतली व बाहेरची बाजू इंचन - इंच - तपासली.पण मला तीठेकाहीही सापडलं नाही.मी थोडा निराश झालो.पडल्या खिडकीजवळ उभा राहून मी बाहेर पाहत होतो .अवड्यात समोरच्या झाडीतून एक पांढरा ससा बाहेर पडला व एकडे तिकडे कानोसा घेत धूम
पळाला. मला त्या झुडपाजवळ एक चौकोनी काळा दगडजामिनित घुसलेला दिसला . मला ते थोड विचित्र वाटलं.वाड्याचा सगळं बांधकाम जांभ्या दगडाचे होते.मग हा घडविलेला काळा दगड तिथे काय करत होता.क्षणात माझ्या लक्षात आल की हीच खिडकी आकृतीत दाखवली होती.मी त्वरेने तिथे पोहचलो. तो दगड जमिनीत व्यवस्थित बसवलेला होता.माझ्याजवळ खोर किंवा कुदळ नव्हत.मी एक टोकदार लाकूड शोधून हळूहळू तो दगड मोकळा केला.मोठ्या प्रयासाने मी तो दगड बाजूला केला.
आत लक्ष जाताच मी दचकलो.सुमारे दोन फूट रुंद व तेवढाच खोल भूयारावजा खड्डा तिथे मला दिसला.त्यात साधारण पाऊण फूट उंच श्री देवी भवानीची मूर्ती होती.बाजूला एका संगमरवरात कोरलेले ते दरवाज्यावर दिसलेले चिन्ह होते.मी त्या दोन्ही वस्तू अलगद उचलल्या.त्या वस्तूंना स्पर्श करताच माझ्या मनात आनंदाच्या लहरी पसरू लागल्या.मानावेत असलेला ताण नाहीसा झाला.मी बारकाईने मूर्तीचे निरीक्षण करू लागलो.ती मूर्ती साधारण एकोणिसाव्या शतकातील असावी.कर्नाटकी कलाकुसर त्यावर दिसत होती.ती मूर्ती पूर्णपणे सोन्याची नव्हती तर त्यावर सोन्याचा मुलामा दिला असावा.पण मूर्तीच्या डोक्यावर असलेला मुकुट मात्र सोन्याचा दिसत होता .माझे लक्ष वेधून घेतले ते मुकुटावर बसविलेल्या गुलाबी खड्याने.तो खडा विलक्षण मोहक होता.मी टक लाऊन त्याकडे खाही वेळ पाहत राहिलो.त्या गुलाबी खाद्यात अस काही तरी होत जे मन व नझर खिळवून ठेवत होते.
मी संगम्रवराच्या त्या चीन्हाच निरीक्षण सुरू केलं. शिल्पकाराने कल्पकतेने मोरपीस व शंख चितारला होता.मी ते चिन्ह उलट केलं.त्या बाजूला काहीतरी कोरून लिहिलेलं दिसलं. ते कुणीतरी घाईघाईत व अगदी शेवटच्या क्षणी लिहिण्यासारखं दिसत होत.मी ते निरखून बघितले.त्यावर शिवापूर अस लिहिलेलं दिसलं.मी सारे दुवे जुळवणाचा प्रायत्न
करू लागलो.कदाचित२० डिसेंबर १९३० च्या कालरात्री कुणीतरी ती मूर्ती व कुलाच चिन्ह इथे लपवून त्वरीत शिवापूरला गेला असावा.मी ती मूर्ती व चिन्ह माझ्या बॅगेत ठेवले. मी तिथून माघारी फिरलो.सूर्यास्त झाला होता.अंधरायला सुरुवात झाली होती.थोडी थंडी वाटत होती.मला शिवापूर बद्दल माहिती हवी होती.एवढ्यात मला काही गुराखी दिसले.मी त्यातल्या एकाला विचारले.
" अहो, इथून शिवापुरल जायला वाट आहे."
काही क्षण त्यांनी माझ्याकडे कुतूहलाने पाहिले.
त्यातला एक म्हणाला....
" हाय की राव.या अंगान सरळ गेलात की जंगलातून पायवाट जाते. पर रातच्याला तिथं कुणी जात न्हाय."
" का?"
तो गप्पच राहिला.
" शिवापुरला जायला किती वेळ लागतो?"
" दोन तास लागत्याल...ताण संपलं की माळ सुरू होईल.तो पर केल की शिवापूर येत.
" बर."
मी त्याने दाखविलेल्या मार्गानं चालू लागलो .
मला खात्री होती की ते सारे गुराखी ...हा माणूस वेळा आहे या भावनेतून बघत असावेत. मी चालण्याचा वेग वाढवला. मला असं वाटलं की कुणीतरी मला शिवापूरला ओढून नेत होते.

रातकिड्यांचा किरकिरण ....मध्येच जंगली कोल्ह्यांची कोल्हेकुई....सरपटणाऱ्या प्राण्यांचे फुत्कार ऐकू येत होते.त्यात हाडे गोठविणारी थंडी.माझे दांत कराकरा वाजत होते. पण मला कश्याचेही भान नव्हते.या साऱ्या वातावरणापासून अलिप्त असा मी आपोआप वाट चालत होतो. साधारण दीड तास ती वाट संपली.बॅटरीचा प्रकाश झोतात....समोर दूरपर्यंत गवताळ माळ पसरलेला दिसत होता.मी थबकलो होती तिथेच एक मोठे पिंपळाचे झाड होते.तिथे चार पांच दगड दिसले.जागाही साफ होती.मी खूप दमलेला होतो.मी तिथेच बसलो.बॅटरी बंद केली.पुरा परिसर काळोखात बुडून गेला.मी सुध्दा त्या काळोखाचा

एक भाग बनून गेलो.त्या पूर्ण परिसरात मी एकटाच माणूस होतो.त्या एकटेपणाची जाणीव झाल्याने माझ्या आंगावर काटा उभा राहिला.मोबाईलची बॅटरी ऑन करावी म्हणून मी मोबाईल खिशातून बाहेर काढत होतो. एवढ्यात रानातून काही आवाज कानावर पडले.मी दचकलो.त्याच ठिकाणी दगडासारखे स्थिर राहिलो.मला कळेना या अश्या भयाण रात्री तिथे कोण येत असावा. मोबाईल तसाच हातात ठेवून मी गप्प उभा राहिलो.
कुणीतरी भरून टाकल्या सारखा मी निश्चल होतो. असा किती वेळ गेला कुणास ठाऊक.आवाज जवळ जवळ येऊ लागले. कदाचित काही माणसं धावत येत होती.
" सुखाजी...चंदन पाय उचला...वैरी मागावर येण्यापूर्वी
आपल्याला शिवापूर गाठायच आहे."
कुणाचातरी करारी आवाज आला. त्या पाठोपाठ मशालीचा उजेड दिसला.त्या उजेडात दोन माणसं पालखी
घेऊन पळत येताना दिसली.त्यांच्या सोबत एक उंच दणकट माणूस झपाझप धावत होता.
ही सारी मंडळी मी ज्या पिंपळाच्या झाडाखाली बसलो होते तिथे आली.ती सरी मंडळी घामाने भिजली होती. अचानक रानातून आरोळ्यांचा आवाज व मशालींचा उजेड दिसू लागला.
" धनी, रामोशी आले वाटत."
पालखी वाहणारा एकजण म्हणाला.
तो भितीने थरथरतहोता.
"मग! काय झाल? घ्या हत्यार ह्वा तयार."
तो राजबिंडा इसम म्हणाला. पण त्या दोघांनी पालखी तिथेच ठेवली व वाट मिळेल तिथे सैरावैरा पळत सुटले. मला काही कळेना की मी ऄवडा त्यांच्या जवळ होतो मग त्यांना माझ अस्तित्व का जाणवत नव्हत. मी बोलण्याचा प्रयत्न करत होतो पण माझ्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. त्या पालखीतून एक पोरसवदा सुंदर तरूणी बाहेर आली. साघारणपणे ती सतरा ते अठरा वर्षांची असावी.
"मुली ती कट्यार तुझ्याजवळ ठेव.
अखेरचा उपाय म्हणून त्याचा वापर कर. इथून थोड पुढे डाव्या हाताला शिवापुरला जायची वाट आहे. जा... जा... लवकर. लक्षात ठेव तुझ्या पोटी देशपांड्याचा वंशज वाढतो आहे."
ते शब्द ऐकूण मी प्रचंड दचकलो. धामणगावच्या देशपाड्यांचा आणि यांचा काय संबंध? या माणसांचा पेहराव ऐशी ते नव्वद वर्षी पूर्वीचा वाटत होता. माझ्या घश्याला कोरड पडली. मी बसल्या-बसल्या थरथरत होतो. "प्...पण मांमजी..! "
ती तरुणी अडखळत म्हणाली.
"जा... मुली...लवकर जा.. या चंद्रभान देशपांड्यांच्या शरीरात प्राण असे पर्यंत कुणीही तुझ्यापर्यंत पोहचणार नाही. याची खात्री बाळग "
ते शब्द म्हणजे प्रचंड वज्राघातच होता. चंद्रभान देशपांडे म्हणजे तेच घायमणगावचे जागीरदार. म्हणजे मी ऐंशी वर्षापूर्वी घडलेला व कुणालाही माहित नसलेला २० डिसेबर १९३० सालच्या रात्रीचा प्रसंग पाहत होतो. ती तरुण स्त्री जवळपास माझ्या अंगाला घासूनच गेली. एक थंडगार शिरशिरी माझ्या अंगावर उठली. या ठिकाणी आज माझ असण हा निव्वळ योगायोग नव्हता. त्यामागे नियतीची काही योजना होती हे नक्की. काही क्षणानंतर तिथे दहाबारा रामोशी लखलखत्या कुऱ्हाडी घेवून तिथे आले.
"देशपांड्या!या काळू रामोश्याच्या हातून तू कसा सुटणारत्? अरे घामणगावाचा तुझा वाडा माणसांसहीत जमिनदोस्त करुन आलोय. सुनेला घेवून...निसटलास...पण तुझ़़ा वंशच मी नाहीसा करणार. कुठ लपवलीस त्या पोटुशीला? "
बलदंड शरीराचा व भरदार मिश्यांचा काळू रामोशी खदाखदा हसत म्हणाला. पुढचा काही काळ देशपांड्याची तलवार व रामोश्यांच्या कुऱ्हाडी यांचा खणखणाट... आरोळ्या व किंचाळ्यांचे आवाज तिथे गर्जत होते. खरय ते अन्य कुणाला ऐकू येत होते की फक्त मलाच?
देशपांड्याच युद्ध कौशल्य वादातीत होते. पण त्या आडदंड अश्या दहा-बारा रामोश्यांपुढे किती काळ ते टिकणार होते. अखेर रक्तबंबाळ झालेले देशपाडे खाली कोसळले. काळू रामोशी त्यांच्या छातीवर पाय ठेवत निर्दयीपणे म्हणाला-
" देशपांड्या-संपलास रे...संपलास!"
खाली बसत त्याने देशपांड्याच्या गळ्यातली सोन्याची माळ खेचली. पण त्याच क्षणी मरणासन्न देशपांड्यानी सारी ताकद एकवटून कमरेचा खंजीर काढून काळूच्या छाताडात खुपसला. खंजीराच वितभर
लांबीच लखलखत पात रामोश्याच्या छातीत घुसल, एक दिर्घ किंकाळी फोडत काळू देशपांडेच्या अंगावर कोसळला. हे बघून उरलेले रामोशी पळून गेले. मला आठवत माझ्याही तोंडून एक दिर्घ किंकाळी बाहेर पडली व मी तिथेच पडलो.

भल्या पहाटे मला जाग आली, तेव्हा मी दंवाने पूर्ण भिजलो होतो. डोक प्रचंड ठणकत होत. माझ्या डोळ्यासमोरुन कालचा प्रसंग तरळत गेला. मला पुन्हा दरदरुन घाम फुटला. मी डोळे फाडून आजू बाजूला पाहिल. तिथ काहीही नव्हत. दिसणारही नव्हत. ही घटना २० डिसेंबर २०१० सालातली होती. मी देशपांड्याच्या वंशजाला शोधून काढलं. शिवापुरला त्यांच जुन घर होत पण सध्या ते मुंबईला राहत होते. सैन्यातून कर्नल पदावरुन निवृत्त झालेल्या सोमकांत देशपांडेच्या रुमवर मी ज्यावेळी गेलो. तेव्हा तेथे एक प्रौढ स्त्रीचा फोटो बघूनच लक्षात आल की ती गोजीरा देशपांडे होती. जीला मी त्या काळरात्री आभासी रुपात बघितल होत. सोमकांतासमोर ज्यावेळी मी भवानीची मूर्ती ब संगमवरी चिन्ह व ते कागद ठेवले, तेव्हा ते थक्क झाले. भावूक होऊन रडू लागले. पण त्यांनी त्या वस्तू स्विकारायला नकार दिला. त्यांनी त्या वस्तू माझ्या वस्तू संग्रहालयाला भेट म्हणून दिल्या. आजही ह्या मूल्यवान वस्तू माझ्या संग्रही आहेत. त्यांच्याकडे पाहताना मला तो २० डिसेंबर रात्रीचा थरार आठवतो.

श्री बाळकृष्ण सखाराम राणे