Odh Premachi - 11 in Marathi Love Stories by Madhumita Lone books and stories PDF | ओढ प्रेमाची.... - 11

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

ओढ प्रेमाची.... - 11

राकेश ने सांगितल्या प्रमाणे मायाने घरी प्रोजेक्ट आणि परीक्षे मुळे ती गावाला येऊ शकतं नाही असं सांगितलं.
आई बाबा दोघी गावाला रवाना झाल्यावर मायाने राकेशला फोन लावला.
राकेश आई बाबा आताच निघालेत इथून.मी पण लगेच निघते तू ये मला pick up करायला.
माया फोन ठेऊन लगेच घरा बाहेर पडते, गाडी घरीच ठेऊन पायी निघते
.
थोड्या दूर गेल्यावर एक कार तिच्या जवळ थांबते , ती थबकते आणि बघते तर त्या मध्ये राकेश असतो. राकेश गाडीच दार तिच्या साठी उघडतो आणि तिला आत येण्यास सांगतो. तशी ती पटकन आत येऊन बसते आणि कोणी आपल्याला बघितलं नाही याची खात्री करते.राकेश मायाला मिठीत घेऊन तिला म्हणतो,
उगाच काळजी नको करू कोणी नाही बघितलं आपल्याला , चल एक छान smile दे मगच आपण निघूयात.

माया त्याच्या मिठीतुन बाहेर येऊन त्याला smile देऊन त्याचा हात हातात घेऊन म्हणते ,
चल कुठे जायचं आहे आपण?
हात सोडलास तर गाडी चालवीन ना, असं म्हणताच मायाने हात सोडला आणि तोंडावर चे भाव बदले, आणि थोडी रुसून बसली.

मस्करी करत होतो, इतका राग आलाय या नाकावर ,असे म्हणताच माया आणि राकेश जोर जोरात हसू लागले.

काही वेळाने राकेश आपली गाडी एका मोठ्या आलिशान बंगल्या जवळ थांबवली. मायाने कुतूहलाने विचारले,
हा एवढा मोठा बंगला कोणाचा आणि आपण इथे का आलोय?

हे आमचा फार्म हाऊस, द वीकेंडला मी इथे येत असतो.

आपण तुझ्या फॉर्म हाऊसवर काय करतो इथे कोणीतरी आपल्याला बघेल ना?

डोन्ट वरी इथे कोणी येत नाही आणि इथले सगळे माझ्या ओळखीचे कामगारांना मी सुट्टी दिली आहे.

तरीपण एवढी मोठी रिस्क आहे ना मला नाही बर वाटत

माया तू घाबरू नकोस काहीच होणार नाही कोणाला काहीच कळणार नाहीये इथे फक्त आपण दोघे आहोत तू आणि मी.

तरीपण,
माया काही बोलणार इतक्यातच राकेश मायेचा हात धरून दिला बंगल्याच्या आत नेतो.

इथे शांत बैस आणि कशाचीच काळजी करू नको हे सगळे अरेंजमेंट करून ठेवलेली आहे आपण आज दिवसभर इथेच राहणार आहोत.

माया क्षणभर त्याच्याकडे बघते, आणि शांत बसते खरंतर तिच्या मनात मोठे युद्ध चालू होते की आता पुढे काय होईल तिथे एक मन म्हणत होत एवढ्या मोठ्या घरात कोणीच नाही तू आणि फक्त राकेश, देवना करो काही अघटी घडलं तर. आणि एक मन म्हणत होतं एक राकेशचा तिच्यावर खूप विश्वास आहे तो असा काही करणार नाही ज्याने तिला त्रास होईल.
राकेश काही वेळाने तिच्यासाठी जेवण आणतो. दोघेही ते जेवतात आणि आणि मन मोकळेपणाने गप्पा मारतात.
थोड्यावेळाने राकेश तिचा हात धरतो आणि तिला जवळ करून मिठीत घेतो.

मायालाही त्याचा स्पर्श आता हवाहवासा होऊ लागला होता तिला कळत होते की योग्य नाही तरीही तिला वाटत होते त्याच्याजवळ जावे त्याच्या सोबत राहावे.

नकळत त्यांच्यातील जवळीक अजून वाढत गेली, आणि त्यांचे शारीरिक संबंध घडत गेले.

काही वेळानंतर माया थोडी घाबरली होती. मायला या अवस्थेत पाहून राकेश तिची समजूत काढू लागला तिला सांगू लागला की हे सगळं त्याच्या कडून नकळत घडले आहे त्याला हे सगळं करण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता किंवा त्याला हे हवं होतं हेही तितकं खरं नाही.

माया त्याच्या मिठीत जाते आणि त्याला म्हणते माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पण आपले हे नातं बाहेर कोणाला कळलं तर मला त्याची भीती वाटते.

माया मी हे कोणाला कळू देणार नाही हे मी तुला वचन देतो की हे जे काही घडलंय ते आज पहिल्यांदा आणि शेवटचाच घडले च्यानंतर असं काहीही होणार नाही याचं मी तुला वचन देतो.

त्यानंतर दोघेही परत मायाच्या घरी जातात .