Dharmyogi - 3 in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | धर्मयोगी - भाग 3

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

धर्मयोगी - भाग 3

धर्मयोगी भाग तीन

आबेद आज थोडा वयस्क झाला होता. तो विवाहयोग्य झाला होता. त्याचे आईवडील तिथं जाताच मरण पावले होते. परीवार तसा वाचला नव्हताच.
आबेद वयानं वाढला होता. तसं पाहिल्यास त्याचं विवाहयोग्य वय झालं होतं. परंतु त्याला कोणतीच मुलगी आवडत नव्हती. सारखं वाटत होतं की शर्मिला भेटावी व आपल्याला तिच्याशी विवाह करता यावा. त्यातच त्याला आठवत होती तिची जखम. तिचं हाताची नस कापणं. शिवाय आपणच तिचा विश्वासघात करुन तिला धोका दिल्याचंही जाणवत होतं.
आबेदला विचार येत होता. विचार येत होता तिला भेटण्याचा. परंतु भेटावं कसं. कारण त्याचेजवळ पैसा नव्हता. त्याचं कारण होतं, हाताशी काम नसणं. तसं त्याला त्याचा भुतकाळ आठवत होता. तो भुतकाळ की ज्या भुतकाळात पाकिस्तान निर्माण होत होता आणि आबेदला आपण मुस्लीम असल्यानं आपल्यासाठी पाकिस्तान एक चांगला देश ठरेल असं वाटत होतं. शिवाय धर्मासाठीही त्यानं ते पाऊल उचललं होतं. परंतु आता असं वाटायला लागलं होतं की आपला तो विचार रास्त नव्हता. कारण त्याचे पाकिस्तानमध्ये हालहाल होत होते. ज्याचं कारण होतं तो मुस्लीम असला तरी त्याची बिरादरी. त्याची बिरादरी अहमदी असणं.
आबेद अहमदी परिवारातील होता. तो मुस्लीम नक्कीच होता. परंतु अहमदी बिरादरीतील असल्यानं त्यांच्या बिरादरीला मुस्लीम धर्मातील उच्च जातीत स्थान नव्हतेच. त्यातच त्याच्या बिरादरीला पाकिस्तानमध्ये वागणूक अतिशय तुच्छ स्वरुपाची मिळायची. तो मुस्लीम समुदाय आबेदला मुस्लीमच मानत नव्हता.
अहमदी समाज ही मुस्लिमातील एक बिरादरी. ते एक धार्मिक आंदोलन होतं. त्या आंदोलनाची सुरुवात गुलाम अहमदच्या जीवनापासून व त्याच्या शिक्षणापासून झाली असे म्हटले जाते. मिर्झा गुलाम अहमदचा काळ सन १८३५ ते १९०८ हा होय. अहमदी समुदाय हे गुलाम अहमदला मोहम्मद पैंगबरानंतरचाही दूत मानतात. जसे मोहम्मद पैगंबर अल्लाचे दूत तसेच मिर्झा गुलाम अहमद देखील अल्लाचे दूतच.
अहमदी समुदायाला मुस्लीम लोकं काफिर मानतात. मुस्लीम मानत नाहीत. मात्र अहमदी समुदाय स्वतःला मुस्लीम मानतात. परंतु समस्त मुस्लीम समुदाय त्यांना मुस्लीम समजत नाही, त्याचं कारण आहे. त्यांच्या परंपरा, रितीरिवाज व विचार. ते विचार मोहम्मद पैगंबराला दूत मानतात. त्याबरोबर इतर सर्व थोरांनाही दूतच मानतात. मात्र मुस्लीम समुदाय केवळ मोहम्मद पैगंबरांनाच अल्लाचा दूत मानतात. ते इतरांना दूत मानत नाहीत. हाच फरक आहे अहमदी समुदाय आणि तमाम मुस्लीम समुदायात. मुस्लीमातील बाकी सर्व समुदाय मोहम्मद पैगंबराला शेवटचा पैगंबर मानतात. परंतु हा अहमदी समुदाय तसं मानायला तयार नसतो. तो असे मानतो की मोहम्मद पैगंबरानंतरही या पृथ्वीतलावर अनेक पैगंबर झाले. त्यातच मुस्लीम म्हटलं की दाढी, टोपी, नमाज, कुराण मानणे, अल्लाचा जाप करणे, रहनसहन या सर्व गोष्टी येतात. मात्र यापैकी बऱ्याच गोष्टी अहमदी समुदाय पाळत असले तरी त्यापैकी ज्या गोष्टी ते पाळतात. त्यात बराच फरक आहे. शिवाय तो फरक बारीक निरीक्षण केल्यास निदर्शनास येतो. जसं हिंदू समुदायात एक इश्वर व अनेक इश्वर मानणारे असतात. तसंच मुस्लिमांमधील असलेल्या एकच दूत मोहम्मद पैगंबर नावाच्या एकेश्वरवादाला हा समाज मानत नसल्यानं सबंधीत मुस्लीम समाजच त्यांना मुस्लीम म्हणून स्विकारत नाही. त्या समुदायांच्या मतानुसार मोहम्मद पैगंबर एकच होवू शकत नाही. तो नेहमीच अवतार घेतो असंही हा समुदाय मानतो. त्यातच हा समुदाय असेही म्हणतो की पैगंबरी परंपरा ही थांबलेली नाही. ती कालानुरूप जन्म घेत असते. निवास करीत असते व परीवर्तनही करीत असते. परंतु कट्टर मुस्लीम असणारे लोकं हे सर्व मानत नाहीत.
अहमदी समुदायाच्या या सर्व गैर मुस्लीम वागणुकीमुळे जरी अहमदी समुदाय स्वतःला मुस्लीम समजत असला तरी इतर मुस्लीम समुदाय त्यांना मानाचं स्थान देत नाहीत.
अहमदी समुदयाबाबत सविस्तर सांगायचं झाल्यास गुरुदासपूर येथील कादियान नामक कस्ब्यात २३ मार्च १८८९ मध्ये एक आंदोलन झालं होतं. ज्यात एका अहमदी मुस्लीम व्यक्तीनं मसीहा पुन्हा येईल अशी घोषणा केली. त्यानंतर मिर्झा गुलाम अहमदनं त्याबाबत आंदोलन सुरु केलं. त्यानंतर त्याच मिर्झा गुलाम अहमदनं स्वतःला सन १८९१ मध्ये मसीहा घोषीत केलं. परंतु हे जरी खरं असलं तरी या समुदायाच्या प्रथा, परंपरा, रहनसहन यामध्ये बराच फरक असल्यानं की काय, सन १९७४ मध्ये पाकिस्तान सरकारनं त्यांना गैरमुस्लीम करार दिला व त्याची नोंद पाकिस्तानच्या संविधानात घेतली.
आबेद पाकिस्तानात राहात होता. परंतु तो अहमदी असल्यानं ज्याप्रमाणे त्याला मानसन्मान मिळत नव्हता. त्याला कामधंदेही मिळत नव्हते पाकिस्तानात. ज्यामुळं तो गरीब झाला होता. ज्यातून एक लहानशी झोपडी बांधल्या गेली होती.
तो पाकिस्तानात असतांना भारताविषयीच्या गोष्टी त्याचेपर्यंत जात होत्या. ज्या गोष्टीमध्ये येथील तमाम मुस्लिमांच्या अधिवासाबद्दल त्याला माहीती मिळत असे. भारतात अधिवास करीत असलेला तो मुस्लीम समुदाय आज विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर गेला होता. त्यांनी कितीतरी मोठमोठी घरे बांधली होती. शिवाय देशात त्यातील काही मुस्लीम मंडळी अधिकारक्षेत्रात मोठ्या हुद्यावर होती. काही तर आमदार, खासदार असून राजकारणात सक्रिय सहभागी होती. शिवाय त्यांना सर्वच क्षेत्रात प्राधान्य देण्यात आलं होतं.
आबेदच्या कानावर जेव्हा या वार्ता यायच्या. तेव्हा त्याला भारताबद्दल प्रेम निर्माण होत होतं व वाटत होतं की आपणही भारतात जावं व भारतातच अधिवास करावा. तोही कायमचाच. तसा तो विचार करीत होता.
विचार करता करता त्याला आठवलं की आपल्याला भारतात जर जायचं असेल तर त्याचा व्हिसा बनवावा लागेल. त्याशिवाय आपल्याला भारतात प्रवेश मिळणार नाही.
विचारांचा अवकाश. लागलीच आबेदनं पासपोर्ट बनवायला सुरुवात केली. कारण त्याला ताबडतोब भारतात यायचे होते. परंतु कसे येणार. व्हिसा बनेल तेव्हा ना.
तो व्हिसा. त्या व्हिस्यासाठी त्याला फारच धावपकड करावी लागली. शिवाय तेवढं करुनही पैसे लागतच होते आणि आबेदजवळ पैसे नव्हतेच. त्यातच कागदपत्र तयार करतांना कारण विचारल्या जात होतं. कारण काय द्यायचं? ह्याही प्रश्नांचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं.
ती व्हिसासाठी होत असलेली धावपळ. ती परवडणारी नव्हती. त्यातच अधिकृतरित्या लागणारी कागदपत्रं. तिही त्याचेजवळ नव्हतीच. शिवाय त्या कागदपत्रासाठी लागणारा वेळ आणि पैसा तेवढाच खर्ची पडत होता. परंतु व्हिसा बनत होता. दरवेळेस काही ना काही कारण सांगून त्याला परत पाठवलं जात असे.
व्हिसा बनत नव्हता. मेहनत केली तरी. तसंच त्या प्रक्रियेला पैसेही लागणार होते. शिवाय अधिकृतरित्या भारतात गेल्यावर त्याला परतावंच लागणार होतं व्हिसा संपल्यावर. परंतु त्याला भारतात आल्यावर परतायचं नव्हतंच. त्यामुळंच की काय, त्यानं आता ठरवलं, आपण पैसा असा अधिकृत व्हिसा बनविण्यासाठी खर्च करु नये. तर आपण त्या पैशानं अनधिकृतरित्या भारतात जावं. जेणेकरुन त्या पैशातून भारतात जाता येईल आणि परत जायलाही कोणी काही म्हणणार नाही.
आबेदच्या मनात भारतात परतण्याचा निर्माण झालेला विचार. त्यातच अनधिकृतपणानं भारतात येण्याचा विचार त्याला काही स्वस्थ बसू देत नव्हता. भारताची झालेली प्रगती आणि विकास त्याला आता अगदी जवळून पाहायचा होता. त्यातच त्या प्रेमिकेला भेटायचं होतं. जिनं त्याचेसाठी आपल्या हाताची नस कापली होती.
आबेदच्या मनात भारतात परतण्याची निर्माण झालेली आसक्ती. त्यातच त्याला आता राहावलं जात नव्हतं. केव्हा केव्हा भारतात जातो आणि केव्हा केव्हा नाही असं त्याला होवून जात होतं. त्यातच त्यानं एके दिवशी बार्डरशी संबंधीत असलेल्या एका दलालाशी संपर्क साधला. त्याला आपली इच्छा सांगीतली. त्यातच त्यानं आपलं प्रेमही सांगीतलं. सांगीतलं की त्याची प्रेमिका भारतात असून तिनं त्याचेसाठी एकदा हाताची नस कापली होती. परंतु आपण धर्मासाठी व आपण मुस्लीम असल्यानं पाकिस्तानात आलो. परंतु आता एकच इच्छा आहे की तिला एकदा तरी भेटावं. मग पाकिस्तानात यावं. त्यानंतर कायम स्वरुपानं पाकिस्तानात राहावं.
आबेदची इच्छा. त्या इच्छेविरुद्ध दलालांनी दया दाखवली. तसं ते त्यांचं कामच होतं व ते काम ते पैशासाठी नेहमीच करीत असत. आजपर्यंत त्या दलालांनी कित्येक आतंकवाद्यांना भारतात सोडले होते. तेही पैसे घेवून. ज्यातून काही आतंकवादी आजही भारतात मोकाट फिरत होते तर काही तुरुंगात होते.
दलालांनी आबेदकडून पैसे घेतले व त्यांनी त्याला भारतात सोडण्याची जबाबदारी घेतली. लागलीच त्यांनी त्याला भारतात सोडले व सांगीतलं की येथून जबाबदारी आपली. आपण जर या देशात पोलिसांच्या हाती लागले तर आपल्याला तुरुंगातही टाकलं जाईल कायम स्वरुपानं. तेव्हा आपण या भारतात सावधगिरीनं पाऊल टाकावं.
आबेद भारतात आला होता. तो जंगलातून एकटाच वाट काढत चालला होता. तो रात्रंदिवस वाट चालू लागला होता.
आबेद जेथून निघाला, ते भयंकर मोठं जंगल होतं. ज्या जंगलात वाघ, सिंहाच्या डरकाळी नेहमीच ऐकायला येत होत्या. भारतात येतांना ना त्याच्याजवळ पुरेसं अन्न होतं. ना पाणी. त्यातच पुरेसा पैसाही नव्हता की एखाद्या हॉटेलात काही घेवून खावू शकेल. जो काही पैसा होता, तो पैसा त्यानं संपुर्णतः दलालांना देवून टाकला होता. शिवाय रस्ता जंगलाचाच होता व त्या रस्त्यावर दूरदूरपर्यंत कोणतंच हॉटेल दिसत नव्हतं.
ते भयाण जंगल. त्या जंगलातून वाट काढत असतांना त्याला आतापर्यंत कित्येक साप दिसले होते. काही अजस्र होते तर काही लहान लहान. मात्र त्याची भीती नाहीशी झाली होती. अशातच आता त्याच्यासमोर एक वाघ आला होता.
तो वाघ आबेदच्या पुढ्यात होता आणि आबेद समोर. तसा तो वाघ त्याच्यावर गुर्रावत होता आणि आबेद मौन बाळगून चुपचाप एका जागेवर उभा होता. तो वाघ डरकाळी फोडत होता आणि आबेदकडे पाहात होता. त्याच डरकाळीबरोबर तो वाघ आपला एक पाय आपटत होता आणि शेपूटही आपटत होता. परंतु तरीही आबेदनं कोणतीच हालचाल आपल्या शरीराची केली नाही.
काही वेळ असाच लपंडावात गेला. वाघ आबेदकडे पाहात होता एकटक आणि आबेदही वाघाकडे एकटकच पाहात होता. दोघांच्याही नजरा एकमेकांशी भिडल्या होत्या. तसं पाहिल्यास आबेदचीही घाबरगुंडी उडाली होती वाघ पाहून. परंतु आता आपला जीव जाणारच. जरी थांबलो तरी आणि पळालो तरीही. असा विचार करुन तो थांबला होता व टकमक त्या वाघाच्या नजरेला नजर भिडवून तो पाहात होता. त्याचेजागी दुसरा जर कोणी व्यक्ती असता तर तो पळूनच गेला असता.
थोड्याच वेळाचा अवकाश. वाघानं त्याचा नाद सोडला व तो माघारी फिरुन निघून गेला. मात्र वाघ निघून जाताच वाचलो रे बाबा म्हणत आबेदनं सुटकेचा श्वास सोडला होता.
वाघ निघून जाताच पुन्हा आबेद रस्ता चालू लागला होता. त्याला वाटच दिसत नव्हती. अशातच काही दिवस तो चालत होता. त्याला भूकही लागत होती. परंतु त्या भयाण जंगलात खायला त्याचेजवळ काहीच नसल्यानं त्याला काही दिवस झाडाची पानं खावूनच काढावे लागले व पाण्याची तहान भागवतांना डबकंच शोधावं लागलं. तसा त्याच्या मनात विचार आला. हाच का तो भारत. ज्याची कल्पना आपण केली होती. केवळ टेकड्या आणि जंगलच जंगल. माणसांचा पत्ता नाही. परंतु हाच का तो भारत? आपण असं म्हणूच नये. कारण आपणही याच भारताचे रहिवाशी आहोत आणि रहिवाशी होणारही आहोत. शिवाय आताच या भारतातील वाघांनी परीचय दिलाय की ते शत्रूलाही अगदी सहजपणे माफ करुन टाकतात आणि तिकडं पाकिस्तानात लबाड लांडगेही माणसाला खावून फस्त करतात. हाच फरक पाकिस्तान आणि भारतात. म्हणूनच भारत सुजलाम सुफलाम आहे अन् पाकिस्तान खायला मौताज आहे. हेच त्या वाघानं दाखवलंय. या भारतात हिरवाई आहे. जी माझ्याजवळ अन्न नसून मला जगवत आहे. मी आता झाडाचीच पानं खावून जगत आहे. शिवाय पाण्याचीही काही कमी नाही. पाणीही मला मुबलक मिळत आहे. नाहीतर आमचा पाकिस्तान. तिथं तर संपुर्ण प्रदेशात वाळूच वाळू आणि विस्तीर्ण टेकड्या. पशुंनाही तिथं चारा नाही. माणसाचं सोडा. साधी माणूसकीही नाही तिथं. माणसाला माणूस समजत नाही. स्रियांना तर तिथं पायातील चप्पलच समजतात. सतत बुरख्यात आणि शिक्षणाचा सुवास त्यांच्या आयुष्यात नसतो. त्यांना तो गंधही मिळत नाही. काही तर शिकलेल्या असूनही बुरख्यातीलच जगणं पसंत करतात. शिवाय लोकसंख्या वाढवीत असतात. विकासाला कितीतरी दूर ठेवतात त्या स्रिया. येथील महिलाही खुश. तिला तर इथं लक्ष्मीच समजतात.
आबेदची खंत. आबेद विचार करीत चालला होता. तोच त्याला काहीतरी आवाज आला. त्यातच त्यानं लपून पाहिलं. लपून पाहिलं की काही सैनिक तिथं उभे असून त्यांना आपण चुकवू शकत नाही. कितीही लपलो तरी. त्यातच शंका घेवून ते मला पकडतील.
आबेद विचारच करीत होता. तोच त्याला आठवलं. दलालानं म्हटलं होतं. इथून भारत लागतोय. तेव्हा तू आपलं संरक्षण स्वतःच करायचं. तू जर त्या देशात पोलिसांच्या हाती लागलाच तर तुला तुरुंगातही टाकलं जाईल कायम स्वरुपानं. तेव्हा त्या भारतात तू सावधगिरीनं पाऊल टाकावं.
आबेद आतापर्यंत सावधगिरीनंच पाऊल टाकत होता. परंतु तो तरी किती सावध असणार. शिवाय त्यानं विचार केलाच की आपण कितीही लपून बसलो तरी आपण पोलिसांना सापडणारच. अन् पळण्याचा प्रयत्न केलाच तर ते आपल्याला गोळ्या घालून ठार करणार. यापेक्षा आत्मसमर्पण करायला हवं. असा विचार करीत तो त्या लपलेल्या जाग्यावरुन निघाला. तोच त्या एका सैनिकाचं लक्ष त्याचेवर गेलं. तो म्हणाला,
"आहे तिथंच थांब. हात वर कर. नाहीतर गोळ्या घालीन."
ते त्या सैनिकाचे शब्द. ते शब्द त्याच्या स्मृतीपटलाला चिरुन गेले. परंतु तो चालतच राहिला. त्यानं ते शब्द ऐकले होते. परंतु ते न ऐकल्याचा त्यानं बहाना केला होता. आता मरण तर आलंच आहे. जर नशिबात मरण असेल तर ते कोणीच रोखू शकत नाही. असे समजून चालत होता तो. त्यातच दुसरा एक सैनिक पुन्हा म्हणाला,
"सुनाई नही देता क्या? गोळी से उडा दुँगा।"
आबेदनं तेही बोलणं ऐकलं नाही. ऐकलं परंतु ऐकल्याचा प्रतिसाद दिला नाही. तोच तिसरा सैनिक म्हणाला,
"उडा दो सालों को, कहॉं कहॉं से आते है। तकलीफ देने।"
ते त्याचं बोलणं. तोच एक सैनिक म्हणाला,
"नाही. ही माणुसकी नाही. त्याच्याजवळ काहीच दिसत नाही. तो गुंगा दिसतोय. आपण शहानिशा करुया."
"परंतु कसे करणार? तो जर शत्रू निघालाच तर आपल्यावर हमला करणार नाही काय? एक दोघांना विनाकारण मारुन टाकेन."
"असं कसं मारणार. मग आपण सैनिक कसले की त्याच्या मारण्यानं मरु आणि जर नशिबात त्याच्या हातानं मरणं असेलच तर आपण कितीही लपून बसलो तरी मरणारच. आपण जावूच त्याच्याकडे."
सैनिकांचं ते आपापसातील बोलणं. तसा विचार करुन संबंधीत सैनिक त्याच्याकडं गेले. तसं आबेदनं घाबरण्याचं सोंग केलं. त्यानंतर त्यानं त्या सैनिकांना पाहताच त्यांनी त्याला विचारलं,
"कुठून आलाय?"
आबेद हात जोडूनच होता. त्यानं उत्तर दिलं नाही. त्यानंतर त्या सैनिकांनी त्याच्या शरीराची तपासणी केली. काहीच आढळलं नाही. तसं त्याला त्या सैनिकांनी एक वेडा समजून सोडून दिलं. परंतु त्याच सैनिकातील एकजण म्हणाला,
"आपण याला सोडू नये. आपण आपल्या मुखियाला काय उत्तर देणार. जर विचारलं तर....... याला घेवून जावं मुखियाकडे. तेच याचा काय तो फैसला करतील."
त्या सैनिकांचं ते बोलणं. ते बोलणं पाहून सर्व सैनिकांनी त्याला पकडलं व आपल्या मुखियाकडे नेलं. मुखियानंही त्याची कडक तपासणी केली आणि त्याला पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर न्यायालयात. न्यायालयानंही त्याला तुरुंगाचा रस्ता दाखवला. परंतु त्यानं तो गुंगाच असल्याचं नाटक केल्यानं व त्याच्याजवळ काहीच सापडलं नसल्यानं त्याच्या बाबतीतील संपुर्ण रेकॉर्ड तुरुंगधिकाऱ्यानं न्यायालयासमक्ष सादर केला व त्याची संपुर्ण तपासणी झाल्यानंतर व शहानिशा झाल्यानंतर त्याला बा इज्जत सोडून देण्यात आले.
आबेद आता तुरुंगातून बाहेर आला होता. त्याला सुटायला जास्त वेळ लागला नाही. तो बाहेर येताच त्याला पैशाचा प्रश्न पडला. तसं पाहिल्यास दोनचार तुरुंगातून कमविलेले पैसे त्याचेजवळ होते. परंतु तेवढ्या पैशानं कोकणपर्यंत जाणं शक्य नव्हतं. कोकणाचा रस्ता फार लांब होता. गाड्या होत्या. परंतु गाड्यालाही भाडं लागणार होतं. तसा त्यानं विचार केला. आपण गाठीला पैसे कमवायचे. असा विचार करीत त्यानं काहीतरी करावं या उद्देशानं खानावळीत नोकरी धरली. आता त्या खानावळीत त्याला जेवणही भरपेट मिळत होतं. शिवाय खर्चाला काही पैसेही. मात्र राहायला छत मिळालं नव्हतं. त्यातच राहायची सोय म्हणून त्यानं उड्डाण पुलाखालची जागा पकडली. त्यातच तो कधीकधी फुटपाथवर झोपत असे तर कधी बस्टॉपवरही झोपायचा.
दिवसामागून दिवस जात होते. तशी तशी त्याला शर्मिलाची आठवण येवू लागली होती. कधीकधी पावसाळा यायचा. मुसळधार पाऊस कोसळायचा. मग आठवण यायची कोकणातील त्यांच्या त्या तरुणपणातील. त्या बारमाही नद्या पावसाळ्यात तुडूंब फुगून गेलेल्या असायच्या. त्यातच त्या सागरास मिळायच्या व सागरही फुगून जायचा. अशावेळेस सागरात जायची मनाई राहायची. परंतु ते दोघंही सागरात जात असत. त्याच्या किनार्‍यावर बसत असत. गप्पागोष्टीही करीत असत. समुद्राच्या किनाऱ्यावरील वाळूत नावंही लिहीत असत आपलं. तसं तरुणपण आठवताच अलगद हळूच बालपण आठवायचं. आठवायची ती शाळेला झालेली सुट्टी. अशावेळेस शाळेला सुट्टी झालेली. रस्त्यावर पाणी गोळा झालेलं आणि त्याच पाण्यातून शर्मिला आणि त्याचा धावण्याचा प्रवास. दोघंही त्या पावसात एकमेकांचा हात पकडून धावत धावत घरी जात असत. तसं शर्मिलाचं घर त्याच्या घराच्या शेजारीच होतं.
आबेदला तरुणपण जेव्हा आठवायचं. तेव्हा जीव कासावीस व्हायचा. तिला केव्हा भेटतो आणि केव्हा नाही असं होवून जायचं. तसा तो जवळ गोळा झालेले पैसे मोजायचा. परंतु ते पैसे पुरेसे नसायचे. मग कोकणात येण्यावर विरजण पडायचं. त्यातच शर्मिला आता असेल का? तिचा विवाह कदाचीत झालेला असेल, असंही त्याला वाटायचं.
आज तब्बल त्या खानावळीत एक वर्ष झाला होता. त्यातच त्या खानावळीत असतांना त्याचं जेवण भागलं होतं. कशाचीही कमी झाली नव्हती. गाठीला चार पैसे गोळा झाले होते. ती खानावळ सोडाविशी वाटत नव्हती त्याला. परंतु प्रेम. ते अमर प्रेम होतं. लागलीच त्यानं मालकाला म्हटलं,
"मला काही दिवस सुटी हवी आहे. मी माझ्या गावी कोकणात जावून येतो."
मालकानं त्याचं ऐकलं. मालक तसा दयाळू होता. त्यानं त्याला पैसे दिले. काही पैसे त्याचा स्वभाव पाहून त्यानं पुन्हा परत यावं म्हणून अडकवून ठेवले व म्हटलं,
"लवकर येण्याचा प्रयत्न कर बर."
आबेदनं मालकाच्या हातून पैसे घेतले व मानेनच होकार देत तो निघाला. वाटेत त्याच्या अनंत विचार होते.
**********************************************************

दरमजल प्रवास करुन आबेद विचारत विचारत कोकणात आला होता. त्याला आता त्याचं गावंही स्पष्टपणे आठवत नव्हतं. मात्र कोकणात येताच साऱ्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. तो प्रत्यक्ष आपल्या गावी आला होता. त्याला तो गावचा समुद्र दिसायला लागला होता.
आबेद गावी आला आणि बसमधून उतरला. तसं त्यानं त्या गावची माती आपल्या मस्तकाला लावली. तसं त्याला रडू कोसळलं. जणू ती आई. त्या आईला सोडून तो पाकिस्तानात गेला होता. त्यामुळंच रडू येणं साहजीकच होतं. त्यानंतर त्याला दिसला तो समुद्र. तो समुद्र दिसताच तो कापलेला हात आठवायला लागला होता. शर्मिलानं त्याच्या प्रेमासाठी आपल्या हाताची नस कापली होती. तसंच त्या वाळूवर आपलं आणि शर्मिलाचं नाव कोरणंही आठवत होतं. त्यातच ते बालपण आठवत होतं. शर्मिलाबरोबर पती पत्नी म्हणून खेळल्या जाणारा खेळही त्याला आठवू लागला होता. त्यातच आठवू लागलं होतं त्याचं ते घर.
आज त्या समुद्राची दशा पालटली होती. तो जुना त्याच्या काळातील समुद्र राहिला नव्हता. त्याचं रुपडं पुर्णतः पालटून गेलं होतं. त्या समुद्रात आता बीच तयार झाले होते आणि कित्येक पर्यटक मंडळी आज त्या समुद्रावर येवू लागली होती. ज्या पर्यटकांना गावची मंडळी खानावळ उघडून जेवन पुरवून दोन पैसे कमवीत होती.
आबेद जसा गावात गेला. तसं त्याचं घर आठवायला लागलं. घर आठवताच तो आपलं घर न्याहाळायला गेला. परंतु तिथं घर नव्हतं. ती जागा ओसाड पडली होती. भिंती गहाळ झाल्या होत्या. मात्र जागा अजुनही शाबूत होती.
गावाचं परीवर्तन झालं होतं. कालची मुरमाड जागा जावून आज त्याच गावात सिमेंटचे रस्ते बनले होते. शिवाय गावात मोठमोठ्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या होत्या.
सडका रुंद झाल्या होत्या. इमारती सिमेंटच्या होत्या. गावात वीजही पोहोचली होती. आबेदला आठवत होती बालपणातील परिस्थिती. गावात गावकऱ्यांचं झोपडंच असायचं. त्या झोपड्यात छतावर नारळाच्या झावळ्या लावलेल्या असायच्या. आजुबाजूच्या भिंतीही नारळाच्याच झावळ्याच्या असायच्या. त्या झावळ्यावर मुरमाड मातीची परत ओली करुन लावलेली असायची. परंतु आता त्याच भिंतीनं जागा बदलवली होती आणि आता त्या भिंती सिमेंटच्या झाल्या होत्या. शिवाय गावातील मध्यभागी असलेलं वडाचं झाड आता नष्ट झालं होतं. ती पारही नष्ट झाली होती. त्या ठिकाणी आता शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा बसवल्या गेला होता. त्यामुळं पुर्वी ज्या पारावर वडाच्या झाडाखाली बसून पंचायत भरवली जायची व न्यायनिवाडा केला जायचा. तो न्यायनिवाडा आणि पंचायत बंद झाली होती. आज गावातील प्रत्येक घरात खानावळीचे कमरे बनवले गेले होते. शिवाय ज्या इमारती उभ्या राहिल्या होत्या. त्या इमारतीत पर्यटक मंडळी निवासानं राहात होती.
आबेदला आठवत होतं ते वडाचं झाड. ते झाड गावाच्या मधोमध होतं. शिवाय त्या वडाखाली पारावर केवळ न्यायनिवाडाच होत नसे तर त्या झाडावर काही पक्षांची घरटी होती. ज्या घरट्यात वेगवेगळे पक्षी येवून निवास करीत असत. आज मात्र ते दिसत नव्हतं.
काल गावात शेतीत झाडं होती. हापूस आंबा, काजू, सुपारी. रोजच गावातील हा माल खाचरावर मोठ्या शहरात नेल्या जात होता. तो माल कमी असायचा. परंतु आता त्या मालात वाढ झाली होती व आता तो माल दळणवळणाच्या साधनानं बाहेर शहरात बाजारात जात होता.
आबेदनं गावात प्रवेश करताच तो आपल्या घराच्या निशाणीवर पोहोचला. तो न्याहाळतच होता आपलं घर. तोच त्याच्यावर इमरानचं लक्ष पडलं. त्यानं त्याला ओळखलं व त्याला आश्चर्य वाटलं. कदाचीत हा आबेद तर नसावा. परंतु आबेद येईलच कसा? तो तर पाकिस्तानात गेला आहे. तेथील रहिवाशी बनला आहे तो. परंतु होवू शकते तो आबेदच असावा. विचारुन शहानिशा केलेली बरी.
इमरानचं आश्चर्य. त्यातच तो आपली शंका काढण्यासाठी आबेदजवळ आला. तोच आबेदनं त्याला ओळखलं. इमरान आता थोडा लठ्ठं झाला होता तर आबेद थोडासा बारीक सडपातळच होता. चेहर्‍यावर थोडासा फरक जाणवत होता. परंतु चेहरा पुर्णतः बदलला नव्हताच.
आबेदनं त्याला ओळखलं. तोच इमरान बोलायच्या आत आबेदच म्हणाला,
"तू इमरान आहेस ना."
"होय."
"कसा आहेस?"
"ठीक आहे. मजेत आहे."
"भारत तुमच्यासाठी कसा आहे?"
"ठीक आणि ठीकच म्हणावं लागेल. कारण ज्याची खावी माती. त्याला चांगलंच म्हणावं लागेल ना?"
"म्हणजे?"
"अरे, इथं आम्ही आमच्या मनाचे राजे आहोत. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे व स्वातंत्र्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेतोय. इथं आम्हाला विशेष असं आरक्षणही आहे. तसंच सर्वच समाजाला आमचा भारत देश सन्मानानं वागवत असतो. अतिथींना तर अगदी देवासारखं पुजतात इथं. शिवाय हा अमूक धर्माचा आणि तो अमूक धर्माचा असा धर्मभेद नाही इथं. तसंच कोणत्याही शासकीय कार्यालयात जा. आमची कामं पटापट होतात. आम्ही मुस्लीम असलो तरी आज येथील हिंदू आम्हाला मुस्लीम समजत नाही. भाईचारा आहे इथं. इथं संकटसमयीही मुस्लीम हिंदूंना व हिंदू मुस्लिमांना मदत करतात. एकमेक एकमेकांच्या समारंभात जातात. मोठ्या उत्साहानं एकमेकांचे सण साजरे करतात. आम्ही त्यांच्या गणपती उत्सवाला जातो, तसेच इतरही सणात आणि तेही आमच्या रमजानला आवर्जून हिरीरीनं हजेरी लावतात. ते आम्हाला प्रसाद देतात. तो प्रसाद आम्ही आवडीनं ग्रहण करतो आणि आम्ही त्यांना प्रसाद देतो, तो प्रसाद ते आवडीनं ग्रहण करतात. आम्हाला आज इथं राहण्याचं कधीच दुःख जाणवलं नाही. उलट आनंदच वाटला."
"छान आहे येथील वातावरण. नाही तर आमच्याकडे?"
"काय आमच्याकडे. तिकडं अशी परिस्थिती नाही का?"
"नाही."
"आणि तू आबेद आहेस ना?"
"होय, मी आबेदच."
"परंतु तू पाकिस्तानात गेला होता ना?"
"होय."
"मग परत कसा आलाय?"
"आठवण. आठवण आलीय गावची अन् तुमचीही."
"हो का?"
"आणि तू कसा आहेस? काही चिंता आहे का? बराच बारीक झालाय तू? खात पीत नाही का रे? अन् मगाशी तू म्हणाला की आमच्याकडं अशी परिस्थिती नाही. याचा अर्थ काय रे?"
इमरान बोलून गेला खरा. परंतु तो आपली आपबीती कशी सांगणार. पाकिस्तानात झालेली गळचेपी. आठवणीसाठी आणि शर्मिलाच्या भेटीसाठी आसुसलेला तो. त्यातच व्हिसा बनविण्यासाठी मारलेले चक्कर. त्यात झालेली धावपळ. भारतात आल्यावर आठ दिवस झाडपाला खावून काढलेले. ते तुरुंगातील वातावरण. त्यात कापलेला कारावास. सारं काही विलक्षण होतं. शिवाय एक वर्ष जो खानावळीत काढला, त्यात झोपण्याची सोय नसल्यानं राहायला मिळालेलं फुटपाथ. कधी उड्डाणपूल तर कधी बस्टॉप. त्यात पुरेशी न झालेली झोप. तेही विलक्षणच होतं. मग तो बारीक नाही होणार तर काय? परंतु ते चित्रविचित्र असल्यानं सांगायला लाज वाटत होती. त्यातच वेळ मारुन नेत तो म्हणाला,
"अगदी तसंच समज. खायला मिळत नसेलच या तुझ्या मित्राला."
"मला सांग, वहिनी स्वयंपाक बनवून चारत नाही का रे? की लग्नच नाही केलं तू?"
"अरे लग्न केलंच नाही मी. मग वहिणी कुठून येणार? बरं एक विचारु का?"
"शर्मिला कशी आहे रे?"
"का रे, का विचारतोस शर्मिलाबद्दल? कदाचीत तुझं लपडं तर नव्हतं तिच्यासोबत. तशी गावात एक अफवा पसरलीच होती की कोणीतरी तिला धोका दिल्यानं तिनं हाताची नस कापली होती म्हणून. कदाचीत तो तूच तर नाही ना?"
"नाही रे. मी कशाला असेल आणि मी पळून गेलो नाही रे. माझ्या अब्बूंनी नेलं मला पाकिस्तानात. माझा सर्व परीवार पाकिस्तानात गेला. मग मी तरी कसा राहू इथं. शिवाय मला तरी त्या वयात काय समजत होतं म्हणून सांगू. चल म्हणलं अब्बानं. मग जावंच लागलं. परंतु शर्मिलाचं लांच्छन माझ्यावर लावू नकोस?"
"अरे, मी गंमत केलीय. तसं गिसं काही नाही. अरे तिच्या हाताची नस कापली म्हणे एका हिंदू जथ्यानं. त्याचा मुखिया म्हणत होता म्हणे की अशी एकटी तिकटी फिरत नको जावूस. वातावरण खराब आहे. तशी त्यावेळची परिस्थिती चित्रविचित्र अशीच होती ना. तिनं घाबरुन घरातून पडू नये बाहेर. म्हणूनच कापली असेल मुखियानं नस. असे सर्वजण म्हणत होते. ज्यातून तिचा हात कापल्या गेला. ती तशीच सांगत होती सर्वांना."
"आता ती कुठे आहे? तिचा विवाह झाला का?"
"विवाहही झाला शर्मिलाचा आणि ती सुखी आहे आपल्या संसारात."
"हो का? कुठं दिली तिला?"
"शेजारच्याच गावात आहे."
"मग जावं लागेल भेटायला."
"कशाला? कदाचीत तू प्रेम करीत होतास की काय तिच्यासोबत?"
तो इमरानचा शब्द. तो शब्द ऐकताच तो चूप बसला. तसा इमरानच म्हणाला,
"काय, खरं आहे का हे?"
"होय, माझं प्रेमच होतं तिच्यावर. विवाह करण्याचीही इच्छा होतीच माझी. परंतु काय करु? माझ्या अब्बाचं ऐकावं लागलं मला. माझ्या अब्बानंच नेलं मला. मला त्या वयात कळत नसल्यानं हे सारं घडलं. परंतु मी ती चूक सुधारण्यासाठीच आलो होतो. माहीत आहे, तू मगाशी म्हटलं ते अगदी खरं आहे. तिनं माझ्याच रागावरुन नस कापली होती हाताची. म्हणत होती की तू पाकिस्तानात जावू नकोस. परंतु मी तिचं ते ऐकलं नाही. ते न ऐकल्यानंतर तिनं आपल्याच हाताची माझ्यासाठी नस कापली होती. तरीही मला जावंच लागलं. माझ्या अब्बूसाठी आणि आपल्या त्या धर्मासाठी. ज्याला आपण महान समजतो."
"हो काय? ठीक आहे. परंतु हे मला सांगीतलं तर सांगीतलं. इतरांना सांगू नकोस की तुझ्यामुळं तिनं आपल्या हाताची नस कापली होती म्हणून. आता सर्वांचाच माहीत आहे की ती नस हिंदू जत्थ्यानं कापली म्हणून. तेही तिला घाबरविण्यासाठी. आता एक लक्षात ठेव. आता तू तिला विसर. तिनं विवाह केलाय. तिचा पतीही चांगला आहे. तिच्यावर प्रेम करतोय तो निरतिशय. शिवाय हा भारत आहे आणि त्यातच ती हिंदू आहे. आपली मुसलमान नाही की ज्या धर्मात अनेक पत्नी करण्याची सोय आहे. विरोध नाही. त्यांच्या धर्मात एकच पती केला जातो. पत्नीही एकच पती मानते. त्याच्यासाठी जीव ओवाळून टाकते. हवं तर तू इथून जावू शकतोस."
"नाही. मला तिच्याशी एकदा तरी भेटायचं आहे. बोलायचं आहे. एक शेवटचं बोलायचं आहे. मग मी तिच्या जीवनात कधी डोकावणार नाही. कायमचा निघून जाईल तिच्या जीवनातून. बराच लांब. एवढा लांब की पुन्हा परत कधीच येणार नाही. बोल, तू माझी भेट घालून देशील? प्लीज. एका मित्रत्वाखातीर."
इमरान ते सर्व ऐकत होता. जी एक कठीण बाब होती. परंतु आबेद एका मित्रत्वाखातीर म्हणत होता. शिवाय तो एकच आणि शेवटची भेट घेवू पाहात होता. त्यानंतर तो परत जाणार होता. तसा तो विचार करीत होता. आबेद शेवटची तर भेट म्हणतोय. त्यानंतर तो जाणार आहे म्हणतोय. बराच लांब जाणार आहे म्हणतोय. काय हरकत आहे एक भेट करुन द्यायला. ती म्हणेल तर घडवून आणू भेट. बिचारा परेशानच आहे तिच्या विना.
इमरानचा तो विचार. तसा तो म्हणाला,
"ठीक आहे, मी तुझी एक भेट घडवून आणील शर्मिलाशी. आता तर झालं. परंतु एक वचन तुला द्यावं लागेल."
"कोणतं?"
"तिला भेटल्यावर तुला निघून जावं लागेल इथून. पुन्हा कधीच परत न येण्यासाठी. ठरलं का?"
"होय ठरलं." आबेद म्हणाला. त्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. तसा इमरान म्हणाला,
"आणि तू मगाशी म्हणाला होता की आमच्याकडे भारतासारखी परिस्थिती नाही. मग कशी आहे परिस्थिती?"
"अरे ते तर विचारुच नको. आमच्याकडे पुरेशा तुमच्या भारतात आहेत तशा सुविधा नाहीत. सरकारी कार्यालये आहेत. परंतु तेही नावाचेच. तिथं साध्या साध्या कागदाला जास्तीत जास्त विलंब लागतो. शिवाय कोणतंही काम कोणत्याही कार्यालयात लवकर होत नाहीत. साधा व्हिसा बनवायचा असला तरी वेळ लागतो. अन् एक सत्य सांगायची बाब म्हणजे आमच्या अहमदी जातीला तर ते मुसलमानच समजत नाहीत. किती अत्याचार करतात ते आमच्यावर. ते मी तर सांगूच नये तुला. आमच्या पाकिस्तानात वाळवंट आहे. पुरेसे उद्योगधंदे नाहीत. पुरेसे कामधंदेही नाहीत. बेरोजगारी भरपूर आहे. त्यातच उपासमारी भरपूर. शिक्षण आहे, परंतु लोकं जास्त शिकत नाहीत. महिलांना तर जास्त शिकण्याची संधीच नाही. तुमच्याकडं महिलांना हिंदू धर्मातील लक्ष्मीचं अवतार तरी मानतात. अन् आमच्याकडं पायातील चप्पल. तशीच वागणूक मिळत असते आमच्याकडे महिलांना. शिवाय ते बुरख्यातीलच जीवन आणि मुलं पैदा करण्याची मशीन. खाणारी तोंड जास्त, त्यामानानं रोजगार नाहीच. मुलांना अल्लाची देणच मानतात. पैदाच करा. त्यावर नियंत्रणच नाही. कुटूंब नियोजन म्हणजे अल्लाच्या कामात अडथळा. असंच मानतात तिकडं. शिवाय सडका नाहीत बरोबर. इथं तर सिमेंटचे रस्ते आहेत. महामार्गही सिमेंटचे आणि गावागावातूनही आता सिमेंटचेच रस्ते दिसायला लागले आहेत. एकंदरीत सांगायचं झाल्यास तुमचा भारत बदललेला आहे बराच आणि आमचा पाकिस्तान अजुनही बदलाच्या कोसो दूर आहे. बरं झालं राजा, तू पाकिस्तानात नाही आला. तू सुखी आहेस इकडे. तिकडे तर सारेच मुसलमान दुःखी आहेत. हिंदूंना तर बोलायची उजागीरीच नाही. ते गुमान असतात बिचारे."
ते बोलतच होते. तेवढ्यात इमरानची पत्नी तिथं हजर झाली होती. ती त्याला शोधायला आली होती. तिनं पाहिलं की आपला पती कोण्या एका व्यक्तीसोबत बोलत आहे. ते पाहून तिनं विचारलं,
"कोणाशी बोलताय? कोण आहेत हे?"
"हा माझा मित्र आबेद. हा याच गावचा. सध्या पाकिस्तानात राहतोय. भेटायला आला होता तो आपल्याला."
ती इमरानची पत्नी होती. तिचं नाव रुबिना होतं. रुबिनानं ते ऐकलं. तसा तिनं सलाम केला व ती आपल्या पतीला म्हणाली,
"यांच्याशी इथंच बोलत बसाल की घराकडे आणाल. तसंही त्यांचं इथं कोणीच नसणार. त्यामुळं ते आपले पाहूणेच ना. त्यांना म्हणा, घराकडे चला म्हणून." रुबिनानं म्हटलेले शब्द. ते शब्द ऐकताच इमरान आबेदला म्हणाला,
"चल, आपण जावूया आपल्या घरी व निवांत गोष्टी करुया."
आबेदला इमराननं तसं म्हणताच तो इमरानसोबत त्याच्या घरी जायला तयार झाला. थोड्याच वेळात आबेद इमरानच्या घरी दाखल झाला. त्यानंतर त्यांच्या गोष्टी सुरु झाल्या होत्या व रुबिना स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकघरात निघून गेली होती.

**********************************************************

शर्मिलाचा विवाह झाला होता शेजारच्याच गावी. तिचा पती फारच चांगला होता. कधीकधी ती काही कामानिमित्त आपल्या गावी येत असे व आईवडीलांची भेट घेवून सासरी रवाना होत असे. आजही तिचे मायबाप जीवंत होते. तसं पाहिल्यास ते आता म्हातारे झाले होते.
शर्मिलाला मुलंबाळं नव्हती. मुलाबाळासाठी ती तडपत होती. तिनं त्यासाठी बरंच औषधपाणी घेतलं होतं. परंतु तिला अद्यापही मुलंबाळं झाली नव्हती. तेवढं एक दुःख तिला होती. बाकी ती आपल्या संसारात खुश होती.
शर्मिला जेव्हा गावात यायची. तेव्हा ती संबंध गावकऱ्यांचीच भेट घ्यायची. तसं गाव लहानच होतं त्यावेळेस. आज थोडंसं वाढलं होतं. गावात नवीन लोकं राहायला आले होते. रोजगार संबंधानं. पर्यटकांची समुद्रभेटीसाठी रेलचेल असल्यानं व त्यांचं आगतसत्कार करतांना पुरेसे पैसे मिळत असल्यानं तसंच मासे विपुल प्रमाणात समुद्रात सापडत असल्यानं लोकांच्या रोजगाराला इथं काहीच कमी नव्हतं. म्हणूनच लोकं वाढले होते. परंतु तरीही ती जुन्या लोकांना ओळखत होती व जुन्यांची भेट घेत होती. त्यांच्याशी बोलत होती.
शर्मिला गावात येताच ती इमरानशीही बोलत असे आणि तोही तिच्या गावात गेल्यास तिच्याशी बोलत असे. तिच्या गावात गेल्यावर तिची आवर्जून भेट घेत असे. तसं पाहिल्यास तिचा पतीही त्याला चांगला ओळखत होता. कारण ते दोघंही एकाच वर्गात शिकले होते.
इमरानचा बकरे कापायचा व्यवसाय होता. तो बकरे खरेदी करण्यासाठी गावोगाव फिरायचा. त्यातच तो शर्मिलाच्याही गावाला जात होता. तिची भेट घेवून परत येत होता.
आज सकाळपासूनच इमरान बेचैन होता. केव्हा केव्हा शर्मिलाची भेट घेतो आणि केव्हा नाही असं त्याला होवून गेलं होतं. तसंच आबेदलाही वाटत होतं. त्यातच रुबिनानं सकाळी सकाळी नाश्ता बनवला व तो आबेदला घेवून शर्मिलाच्या गावाकड चालता झाला.
काही वेळ गेला व शर्मिलाचं गाव आलं. तसं काही अंतरावर आबेदला ठेवून इमरान शर्मिलाच्या घरी गेला. त्यातच तिचा पती सकाळीच शेतावर गेला होता. तसं इमरानला पाहताच ती म्हणाली,
"अरे इमरान, इकडे कुठं आलाय?"
"आलोय तुझ्याकडंच एक काम घेवून."
"असं कोणतं काम काढलंय तू माझ्यासाठी?"
"आहे एक काम."
"कोणतं?"
तिनं विचारलेला प्रश्न. त्यातच तिचा पती घरी नसलेला पाहून तो म्हणाला,
"आबेद आलाय तुला भेटायला. तुझी भेट घेवू इच्छित आहे. जरा आणू का भेटीला?"
"कोण आबेद?"
"तो आपल्या गावचा. जो पाकिस्तानात गेला होता."
इमराननं आबेद व पाकिस्तानचं नाव घेताच शर्मिलाच्या सर्व गोष्टी लक्षात आल्यात. ती हाताची जखम व तो कापलेला हात. त्यातच त्यानं केलेला विश्वासघात. सारंच तिच्या लक्षात आलं होतं. त्यातच तिला पश्चातापही तेवढाच वाटत होता. तशी ती मौन होती. ते पाहून संधी साधून इमरान पुन्हा म्हणाला,
"काय झालं शर्मिला. घोडं कुठं अडलंय?"
"अरे इमरान. नाव नको काढूस त्या नालायकाचं."
"काय झालं शर्मिला. अशी एकदम रागावलीस का?"
"अरे त्यानं तर मला धोका दिलाय."
"धोका? काय केलंय त्यानं."
धोका शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडताच इमराननं तो टिपला. तसं त्याच शब्दावर ट्रेस करीत तो पुन्हा म्हणाला,
"काय केलं. मला तरी सांगशील. मी कोणाला सांगणार नाही. कदाचीत हात कापण्याची तर घटना नाही?"
"तुला कसं माहीत?"
"मला सगळंच प्रकरण माहीत आहे. त्यानं तुला भेटायला येईल असं जे आश्वासन दिलं होतं तेही माहीत आहे. परंतु एक त्याच्या सफाईत सांगू."
"सांग. अन् तू तरी काय सांगणार. तू तेच सांगणार, जे त्यानं तुला सांगीतलं असेल."
"ऐकशील तर खरं."
"सांग तर."
"अगं, तुझं आणि त्याचं वय त्यावेळेस निर्णय घेण्याचं नव्हतंच. शिवाय ज्या दिवशी त्यानं तुला आश्वासन दिलं होतं. त्याच रात्री त्याच्या अब्बूनं त्याला जबरदस्तीनं पाकिस्तानात नेलं. आता विचार कर की त्याच्यावर काय बेतलं असेल ते क्षण. बिचारा तुझ्या प्रेमात वेडापिसा तरी झाला असेल. त्याला तुझी आठवण होती. म्हणूनच तो तुला भेटायला इथंपर्यंत तरी आला. अन् तू त्याला नकार देतेस. अगं त्याला पश्चाताप आहे आजही. हवं तर तू त्याला तुझ्या पतीसमोर भेट. आपल्या पतीला त्याची ओळख करुन दे. म्हण की हा आमचा बालपणीचा मित्र. भेटायला आला आम्हाला. हा आता पाकिस्तानात राहतोय."
इमरान बोलत होता व शर्मिला ऐकत होती. तशी ती म्हणाली,
"परंतु इमरान, माझा आता विवाह झालाय. काही विपरीत घडलं तर....."
"नाही घडणार. मी आहे. तो फक्त तुला एकदाच भेटणार. त्यानंतर तो निघून जाणार. कायमचाच निघून जाणार पाकिस्तानात. पुन्हा कधीही तो या भारतात परतणार नाही."
"अन् यांना कोण सांभाळणार?"
"मीच सांभाळणार. तू त्यांचीही काळजी करु नकोस. तू फक्त बोलत बस त्याच्याशी तेही थोडक्यात. मी त्याला सांगतोय तसंच." तो म्हणाला.
तिनं तसा होकार दिला. त्यानंतर इमरान आबेदला आणण्यासाठी रवाना झाला होता. थोड्या वेळातच तो आबेदला घेवून परत आला. तोच तिचा पतीही शेतावरुन परत आला होता. त्यानंतर तिनं आपली जखम न्याहाळली. बरेच दिवस झाले होते तिला त्या जखमेचा विसर पडला होता. आता ती न्याहाळत होती. परंतु आता ती जखम अस्पष्ट झाली होती व ती दिसत नव्हती. तसा तिला त्या जखमेचा इतिहास आठवत होता. बहुतेक ती मिटल्यासारखीच झाली होती. तशी ती जखम न्याहाळतच होती. तोच तिचा पती घरी आला. त्यानं आपल्या घरी इमरानला आलेलं पाहिलं. तसा तो म्हणाला,
"अस्लाम वालेकूम भाईसाहाब इमरानजी."
"वाले कू सलाम भाईजान."
"कसे काय आलात?"
"आलो होतो बकरे घ्यायला."
"आणि हा कोण?"
"हा माझा आणि तुमच्या पत्नीचाही मित्र आबेद आहे. जो आता पाकिस्तानात राहतो. आम्हाला भेटायला आलाय. मी म्हटलं याला की आपल्याबरोबर शिकलेली शर्मिलाही बाजूच्याच गावात राहते. चल भेटायला. त्यावर यानं होकार दिला व आणलंय भेटायला. आता सांगा, चूक झाली असंन तं माफी असावी."
"अरे, भाईजान. त्यात माफी कसली. हा थोडं ना आमच्या घरी राहणार आहे कायमचा. अरे मित्र ना आपण. मग ते भेटणारच ना. त्यात काय?"
शर्मिलाचा पती शंकेखोर नव्हता. तसे समस्त भारतातील लोकंच स्वभावानं चांगले होते. कारण त्यांच्यावर सुसंस्कार होते भारती आईचे. जिच्या कुशीत ते लहानाचे मोठे होत होते. त्यानं त्याला भेटायची परवानगी दिली. तसा शर्मिलानं चहा बनवला व ते गोष्टी सांगत बसले. त्यातच शर्मिलाला आबेद म्हणाला,
"कशी काय आहेस शर्मिला?"
"ठीक आहे." ती म्हणाली व ती स्वयंपाकघरात चालली गेली. ती त्याचेशी किंचीतही बोललीच नाही. मात्र आबेद काय समजायचं ते समजला. त्यानंतर तो काहीच बोलला नाही.
शर्मिलानं चहापाणी केला व त्या चहापाण्यानंतर शर्मिला जी स्वयंपाकघरात गेली, ती बाहेर आलीच नाही. परंतु तिला भेटण्यातून समाधान पावत आबेद निघाला. त्यातच ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडं पाहात होती. परंतु आता तो कधीही परत येणार नव्हता.
तिचं खरंच प्रेम होतं त्याचेवर. परंतु आता तिनं आपला विवाह केल्यामुळं आता ती बंधनात होती. आता ना ती त्याची आरास करु शकत होती. ना ती त्याच्याशी प्रेमाच्या दोन गोष्टी बोलू शकत होती.
आबेद इमरानच्या घरी आला होता. तसा त्यानं इमरानच्या आग्रहाखातर तीन चार दिवस त्याच्या घरचा पाहूणचार घेतला. त्यानंतर तो बाहेर पडला. सोबतच त्यानं गाव सोडलं होतं.
आबेदनं गाव सोडलं होतं. परंतु ते गाव जरी त्यानं सोडलं असलं तरी आताही त्याला गावआठवत होतं. त्यातच आठवत होतं बालपण आणि आठवत होती ती. अन् तिनं त्याचेसाठी कापलेल्या हाताची नसही.
आबेद विचार करीत होता. पाकिस्तानात जायचं की हिंदुस्थानात राहायचं. परंतु पाकिस्तानात जाणार तरी कसं? कोण असं आपल्या हक्काचं आहे? कोणासाठी जायचं? ना मुलं ना बाळं, ना पत्नी ना एखादी प्रेमिका, ना आई ना वडील, ना भाऊ ना बहिण. जाणार तरी कोणासाठी आणि जायचंच असेल तर व्हिसा कसा काढणार? कोण देणार? ना आपल्याकडे कागदपत्रं. शिवाय तो व्हिसा काढण्यासाठी पुन्हा धावपळ करावी लागणार. त्यापेक्षा आपण इथंच भारतात राहायचं. उड्डाण पुलाखाली झोपायचं. वाटल्यास काम करायचं. परंतु आपल्याला काम तरी कोण देणार?
त्याचा तो विचार. काम तरी कोण देणार, तद्वतच त्याला आठवला त्याचा मालक. ज्या मालकाच्या खानावळीत तो काम करीत होता. त्यातच त्याला तो मालक आठवताच तो कामासाठी त्या शहरात रवाना झाला आणि मालकाला भेटला. परंतु मालकानं त्याला चक्कं सांगीतलं. चक्कं सांगीतलं की त्याच्या जागेवर त्यानं एका व्यक्तीला ठेवलेलं असून आता दुसऱ्याला ठेवायची आवश्यकता नाही. का ठेवलं असं विचारताच मालकानं त्याच्या प्रेमाची सफाई दिली. म्हणत होता की प्रेम आंधळं असतं व प्रेमासाठी जो व्यक्ती पाकिस्तानातून इथं येवू शकते. तोच व्यक्ती आपल्या प्रेमिकेची भेट घेण्यासाठी गेल्यावर आणि खरंच प्रेमिका भेटल्यावर परत येईल का? अशीच शंका त्याला वाटल्यानं त्यानं आबेदच्या जाग्यावर एका व्यक्तीला कामाला ठेवलं होतं.
आबेदला त्या मालकाच्या खानावळीत काम मिळालं नाही. त्यानंतर त्यानं बऱ्याच ठिकाणी काम शोधलं. परंतु सगळे त्याला ओळख म्हणून काही पुरावा मागू लागले होते. जो पुरावा वा त्या पुराव्याचे एखादे कागदपत्रं त्याचेजवळ नव्हते. त्यामुळंच की काय, आबेदला काम मिळालं नाही. परंतु त्याच्या पोटात भुकेची झोंब होती. त्यामुळं तेही भागवणं आवश्यक होतं. त्यामुळंच की काय, त्यानं ती भूक भागविण्यासाठी भिक्षेचा मार्ग अवलंबिला.
आबेद आता भारतातच त्या नव्या शहरात राहू लागला होता. भूक भागविण्यासाठी तो भीक मागू लागला होता. शिवाय आपल्या खिशात एक पाकीट वागवू लागला होता. ज्या पाकिटात एक दैनंदिनी होती. ज्यात तो आपली जीवनगाथा लिहू लागला होता. ज्यात त्या गावाचं वर्णन होतं. शिवाय पत्ताही.
आबेद विचार करीत होता आपल्या प्रेमाबद्दलचा. परंतु ते प्रेम त्याला मिळालं नव्हतं. जशी भारत पाकिस्तान फाळणी झाली होती. तशीच फाळणी त्यांच्या प्रेमाचीही झाली होती. परंतु आजही त्याच्या मनात तिचं प्रेम शिल्लक होतं. ज्या प्रेमासाठी तो पाकिस्तानातून भारतात आला होता. ते सर्व त्या दैनंदिनीत उतरवून ठेवले होते त्यानं. आपण आपल्या प्रेमासाठी काय काय हालअपेष्टा भोगल्या याचं वर्णन त्या दैनंदिनीत होतं.
आबेद लिहित असलेली दैनंदिनी आज पुर्ण झाली होती. तरीही तिची आठवण गेली नव्हती मनातून. ती आठवण त्याच्या मनात श्रावणासारखी फुलत होती आणि जेव्हा आठवण यायची. तेव्हा आजही त्याचा जीव कासावीसच होत होता.
आबेद दररोज विचार करीत होता तिचा. ती सुखात असली तरी. कधीकधी त्याला वाटायचं की ती भेटावी. आपल्याचजवळ राहावी. परंतु ते आता शक्य नव्हतं. असाच विचार करता करता एक दिवस त्याच्या मनावर परिणाम झाला व तो वेडा झाला. परंतु ती दैनंदिनी त्यानं आपल्या डोळ्यासमोरुन ओझल होवू दिली नाही. तो वेडा झाला असला तरी ती दैनंदिनी तो आताही सांभाळून ठेवत असे.
आबेदनं प्रेमासाठी केलेला संघर्ष वाखाणण्याजोगाच होता. त्याचं देशप्रेम व धर्मप्रेम वाखाणण्याजोगच होतं. ज्यासाठी तो भारत सोडून पाकिस्तानात गेला होता. परंतु देशप्रेमापेक्षाही तरुण तरुणीचं प्रेम व ती शर्मिलाची ओढ ही अतिशय महत्वाची गोष्ट होती. हे विसरुन चालत नाही.
**********************************************************

आबेद वेडा झाला होता. परंतु तो वेडा झाला असला तरी त्यालाही पोट होतंच. त्या पोटासाठी तो भीक मागत होता. त्या भीकेतून तो आपलं पोट भागवत होता. त्याला हिशोब येत असूनही आता वेडा झाल्यामुळं हिशोबही समजत नव्हता. ना त्याला रहदारीचा रस्ता समजायचा ना रस्त्यावरील रहदारी. कधीकधी तो एकटाच बरळायचा. सारखं शर्मिलाचं नाव घेत राहायचा. कधी गालातल्या गालात हसायचा. त्याला ऊन पाऊसही समजायचं नाही. कधी तो भरल्या पावसात पावसाची खंत न बाळगता भिजायचा. तर कधी तप्त उन्हातही अनवाणी पायांनी हिंडायचा. कधी त्याच्या अंगावर कपडे नसायचे. ते कपडे त्याच्या हातात असायचे. तर कधी ते अंगात. त्याचे कपडे विटलेलेच असायचे. तसा तो वेडा असल्यानं आपल्याच जगात खुश असायचा. त्यातच त्याच्याजवळ कोणीही जायचं नाही.
आबेद वेडा झाला असल्यानं तो आज अगदी जगावेगळा बनला होता. परंतु तो वेडा असला तरी एक गोष्ट आवर्जून त्यानं सांभाळून ठेवली होती. ती गोष्ट म्हणजे त्यानं लिहिलेली दैनंदिनी. तो पावसात भिजायचा. परंतु त्यानं लिहिलेली दैनंदिनी त्यानं पावसाच्या पाण्यानं भिजू दिली नाही. ती त्यानं अगदी सांभाळून ठेवली होती. कधी सवड मिळालीच तर तो स्वतः ती दैनंदिनी काढत असे. त्या दैनंदिनीकडं एकटक पाहात असे व पाहून झालं की तो एकटाच हुंदके देत जोरानं रडत असे. ते रडणं पाहून आजुबाजूचेही लोकं त्याच्याकडे कुतूहलानं पाहात असत. त्यानंतर ते लोकं पाहू लागले की तो आपलं रडणं बंद करीत असे. त्यानंतर तो ती दैनंदिनी गुंडाळून व्यवस्थीत ठेवत असे. तिला पाणी लागू नये अशी. जणू ती दैनंदिनी म्हणजे केवळ दैनंदिनी नव्हती तर ती दैनंदिनी म्हणजे त्याची प्रेमिका शर्मिला होती. ती दैनंदिनी त्याच्यासाठी जीव की प्राण होती.
शर्मिलाची ती आठवण. ती आठवण करीत करीत तो जगत होता, तो वेडा झाला असला तरी. त्या वेडेपणाच तो काय करतोय हेही समजेनासं झालं होतं. अशातच तो काळा दिवस उजळला.
आज तो काळा दिवस होता. त्या दिवशी भर दुपारची वेळ होती. आबेद भरदुपारीच उन्हातान्हात रस्त्याच्या मधातूनच चालला होता. त्याच्या अंगावर पुरेसे कपडे नव्हते. अशातच एक वाहन भरधाव वेगाने आलं. त्या वाहनाला तो दिसलाच नाही. त्यातच त्याचा अपघात झाला. ज्यात तो मरण पावला होता.

************************************************

आबेद मरण पावला होता. त्याच्या अंगावरही पुरेसे कपडे नव्हते. मात्र अपघात तो अपघातच. सुरुवातीला तो कोण आहे? याची शहानिशा न करता पोलिसांनी त्याला वेडा ठरवत त्याचं प्रेत टाकून दिलं होतं. परंतु जेव्हा ते गाठोडं तपासलं गेलं, तेव्हा त्यात तीच दैनंदिनी आढळली.
ती तीच दैनंदिनी होती त्यानं लिहिलेली. ज्यात शर्मिलाचं नाव व इमरानच्या घराचा पत्ता होता. कदाचीत त्यानं तो होशात असतांना ही दैनंदिनी शर्मिलाकडे जावी याचा जणू संकल्प घेतला असेल असे वाटत होते. शिवाय ती दैनंदिनी इमरानच तिला नेवून देवू शकतो असंही त्याला वाटलं असेल. म्हणूनच त्या दैनंदिनीवर इमरानच्या घराचा पत्ता होता.
पोलिसांनी ती दैनंदिनी उघडली. ज्यात इमरानचा पत्ता होता. ज्यात शर्मिलाचं नाव होतं. त्यानंतर तशी माहीती मिळताच पोलिसांनी शर्मिला व इमरानशी संपर्क साधला. त्यानंतर इमरान व शर्मिलाला मृतदेहाची ओळख करायला बोलावलं.
इमरान व शर्मिला पोलीसस्टेशनला आले होते. त्यांनी मृतदेहाला ओळखलं. तशी खात्री झाल्यावर त्यांनी मृतदेह कोणाचा आहे हे पोलिसांना सांगीतलं. त्यानंतर त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न उद्भवला. त्यातच इमराननं धर्मभाऊ म्हणून त्या मृतदेहाचा स्विकार केला. त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पार पडली व शेवटी पुर्ण प्रक्रिया पार पडताच पोलिसांनी इमरानच्या ताब्यात त्यानं लिहिलेली दैनंदिनी दिली.
इमराननं ती दैनंदिनी ताब्यात घेतली. सोबतच तो मृतदेहही ताब्यात घेतला. त्यानंतर तो मृतदेह त्या दोघांनी मिळून गावाला आला.
मृतदेह गावाला आणला होता. तो गावच्या मातीत योग्य संस्कार करुन दफनही झाला होता. तसा आबेदचा एक आणि तोही शेवटचा अध्याय संपला होता. इमरान घरीही आला होता. शिवाय विसरुन गेला होता तो आबेदला. अन् त्या दैनंदिनीलाही तो विसरला होता. त्यातच ती दैनंदिनी धूळखात एका कोपर्‍यात पडली होती. अशातच एक दिवस एक उंदीर त्यावरुन चालला. बहुतेक तो उंदीर मांजराच्या धाकानं आपला जीव वाचविण्यासाठी पळत होता. त्यातच तो उंदीर पळत असतांना अचानक ती दैनंदिनी खाली पडली. तसं इमरानचं लक्ष त्या दैनंदिनीवर गेलं.
दैनंदिनी उंदरानं पाडली होती. तसं इमरानचं लक्ष त्या दैनंदिनीवर जाताच त्यानं ती दैनंदिनी उचलली. क्षणातच त्याला आठवली ती दैनंदिनी. हीच ती दैनंदिनी त्याला पोलिसांनी दिली होती. हीच ती दैनंदिनी आबेदच्या गाठोड्यात सापडली होती. इमरानला सारंच आठवू लागलं होतं.
इमरानला सापडलेली ती दैनंदिनी. तसं पाहिल्यास आबेद मरायला भरपूर दिवस झाले होते. तो त्याला विसरुनही गेला होता. परंतु ती दैनंदिनी सापडताच त्याला आबेद आठवायला लागला होता. तसं त्यानं दैनंदिनीचं पहिलं पान उघडलं. ज्यात लिहिलं होतं की ही दैनंदिनी मी शर्मिलासाठी लिहित असून तिनं ती वाचावी एवढीच अपेक्षा आहे.
इमराननं ती दैनंदिनी पुर्णतः वाचून काढली. ज्यात त्याच्या प्रेमाची इतिश्री लिहिली होती. शेवटी लिहिलं होतं की ही दैनंदिनी तिचीच अमानत आहे. ती तिला द्यावी. त्याखाली त्याची स्वाक्षरी होती व पत्ता इमरानचा टाकला होता.
इमराननं ती दैनंदिनी वाचली. त्यानंतर त्यानं ती दैनंदिनी शर्मिलाकडं पोहचवली व तिला सांगीतलं की ही दैनंदिनी आबेदची असून तुझ्यावर लिहिलेली आहे. त्यात लिहिलं आहे की शर्मिलानं ती दैनंदिनी एकदा तरी वाचावी. ही तिचीच अमानत आहे.
शर्मिलानं ती दैनंदिनी आपल्या ताब्यात घेतली. तसा इमरान माघारी फिरला. त्यानंतर ती त्याच दैनंदिनीचं एकेक पान वाचू लागली होती. ज्यात तिच्या प्रेमाचा सारीपाट वर्णन केल्या गेला होता. तसं वाचता वाचता तिच्या डोळ्यातून अश्रुधारा टपकू लागल्या होत्या.
आज ती दैनंदिनी तिच्या हाती आली होती. तिनं वाचायला सुरुवातच केली होती. तसे आठ दिवस झाले होते. आज ती वाचून पुर्ण झाली होती. तोच तिला अगदी मळमळायला लागलं होतं. त्यातच तिला ओकारी व्हायला लागली. शिवाय ओकाऱ्यात वाढ झाली होती. कसंतरी वाटू लागलं होतं. ओकाऱ्या थांबत नव्हत्या. शेवटी तिला वाटलं, वाटलं की आपण डॉक्टरकडे जायला हवं.
शर्मिलाचा डॉक्टरकडे जाण्याचा बेत. त्यातच ती डॉक्टरकडे गेली. ओकाऱ्याची तपासणी केली. ज्यातून निष्पन्न झालं की तिला होणाऱ्या ओकाऱ्या या साध्यासुध्या नाहीत. त्या ओकाऱ्या नवनिर्मीतीच्या आहेत. तिच्या घरी नवीन पाहुण्याचं आगमण होणार आहे.
नवीन पाहुण्याचं आगमण. डॉक्टर तसं बोलताच ती आनंदी झाली होती. तिच्या घरी बाळ जन्माला येणार होतं. ती गरोदर राहिली होती.
शर्मिला विचार करीत होती. विचार करीत होती की आतापर्यंत आपण बरेच प्रयत्न केलेत गरोदर राहण्यासाठी. औषधपाणीही घेतली. परंतु तरीही हा नवनिर्मीतीचा क्षण माझ्या आयुष्यात कधीच उजळला नाही. अन् ही दैनंदिनी? ही दैनंदिनी वाचताच ओकाऱ्या व्हायला लागल्या. डॉक्टरांनी तपासल्यावर त्या ओकाऱ्या नवनिर्मीतीच्या आहेत असं सांगीतलं. हा काय चमत्कार आहे? दैनंदिनी वाचल्यावर हा चमत्कार? तिचा त्यावर विश्वासच बसत नव्हता.
शर्मिलाच्या विवाहाला बरेच वर्ष झाले होते. अजुनही तिच्या घरी पाहुणा हालला नव्हता. तिनं बरेच नवशं केले होते. देवाला साकडे घातले होते. डॉक्टरच्या तपासण्याही केल्या होत्या. परंतु योग जुळून आला नव्हता. परंतु नुकतीच तिनं ती दैनंदिनी वाचताच तो दिव्य चमत्कार झाला होता. ज्यातून ती गरोदर राहिली होती.
शर्मिलाला अतिशय आनंद झाला होता. आता ती आठवत होती ती दैनंदिनी. ज्यात शेवटी शेवटी लिहिलं होतं की मला तू भेटावी ही माझी अंतिम इच्छा आहे.
ती विचार करीत होती की कदाचीत मी त्याला मागील जन्मी नाही मिळाली एक प्रेमिका म्हणून. ती त्याची इच्छा अधूरीच राहिली असेल. कदाचीत मी त्याला भेटावं अशी त्याची इच्छा असेल. म्हणूनच ती दैनंदिनी माझ्यापर्यंत आली असेल आबेद बनून आणि तोच आबेद आज माझ्या पोटात. कदाचीत त्याची इच्छा असेल की निदान प्रेमिका बनून नाही तर तिचा बाळ बनून तरी तिच्याजवळ राहावं. हीच त्याची अंतिम इच्छा असेल.
शर्मिला गरोदर राहिली होती ती दैनंदिनी वाचून. त्यानंतर नऊ महिने पुर्ण होताच तिनं एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. जो आबेद सारखाच दिसत होता. आता ती खुश होती. आज तिनं ती दैनंदिनी सांभाळून ठेवली होती. स्वतःच्या लेकरागत. ती दररोज त्या दैनंदिनीला आपल्या डोळ्याशी लावत असे. त्या दैनंदिनीवर नतमस्तक होत असे. नव्हे तर ती दैनंदिनी तिला जीव की प्राण वाटत होती.
आजही तिला आबेद आठवत होता आणि आजही तिला आबेदच्या आठवणी आठवत होत्या. आज आबेद जगात नव्हता. फाळणीनं त्याला तिच्यापासून हिरावून घेतलं होतं. परंतु आजही आबेद तिच्यासाठी जीवंत होता एक दैनंदिनी बनून. तसाच तिचा मुलगा म्हणून तिच्या पोटी जन्म घेवूनही.
शर्मिला गरोदर होती. तशी ती रोजच ती दैनंदिनी पुन्हा पुन्हा वाचत असे. त्यातच तिच्या आठवणी ताज्या होत होत्या. परंतु आज त्या आठवणी ताज्या करुन आज काही उपयोग नव्हता.
काही दिवस गेले होते. शर्मिलानं एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. त्यातच तिनं त्याचं नाव आबेदच ठेवलं होतं.
आबेद त्याचं नाव. ते नाव मुस्लीम वाटत होतं. परंतु ते नाव तिला आवडत होतं. कारण त्या नावात तिचं प्रेम लपलं होतं.
आजही तिला आबेदची आठवण यायची. तेव्हा जीव कासावीस व्हायचा. परंतु तिच्या पुढ्यात तिचा मुलगा दिसताच तिची येणारी आठवण विरुन जायची. त्यातच त्याला कवेत घेतल्यावर जणू आबेदच आपल्याला आलिंगण देत आहे असंच वाटायचं.
शर्मिलाला आज आबेदची आठवण आली होती. तिला त्याला भेटावेसे वाटत होते. परंतु ती भेटणार तरी कशी? त्यातच तिला आठवलं की गावाकडं त्याला दफन केलं होतं. त्याच ठिकाणी त्याची कबरही बनवली असेल. तसं आठवताच ती काहीतरी बहाणा करुन गावाला आली. ज्यावेळेस नुकताच पावसाळा सुरु झाला होता.
शर्मिला गावाला आली होती. शिवाय पावसाळाही सुरु झाला होता. परंतु आता रस्ते चांगले बनलेले असल्यानं गावात चिखल वा पाणी गोळा होत नव्हतं. त्यातच तिला आठवलेला आबेद. त्याच्या समाधीची भेट घेण्यासाठी ती आतूर झाली होती. त्यातच तिला आठवत नव्हती त्याची समाधी. ती समाधी कुठे आहे कुठे नाही. याचा तिला थांगपत्ता नव्हता. ते पाहून तिचा जीव कासावीस होत होता. त्यातच तिला आठवला इमरान. कदाचीत इमरानला त्याची समाधी माहीत असेल, असंच वाटायला लागलं होतं. त्यानंतर लागलीच ती इमरानच्या घरी गेली. म्हणाली,
"इमरानभैया, मला आबेदची आठवण येत आहे. त्याची भेट घ्यावीशी वाटत आहे. परंतु मला माहीत आहे की आता इमरान जीवंत नाही. परंतु त्याची स्मृती आजही जीवंत आहे. तेव्हा मला त्याची समाधी दाखव. माझं मस्तक त्याच्या समाधीवर टेकविण्याची माझी इच्छा आहे."
इमराननं ते सगळं ऐकलं. तसा इमरान तिला त्याच्या समाधीजवळ न्यायला तयार झाला. लागलीच तिनं काही गुलाबाचीही फुलं घेतली व तिही त्या समाधीजवळ नतमस्तक होण्यासाठी जावू लागली. थोड्याच वेळात ती समाधी आली व समाधी पाहताक्षणी तिला भाष झाला. तो भाष आबेदचाच होता. कदाचीत आबेदच तिथं आपल्या आजुबाजूला अस्तित्वात आहे, असं तिला वाटायला लागलं होतं. तशी ती आणखी जवळ गेली समाधीच्या. त्यानंतर तिनं समाधीला आलिंगन दिलं आणि मस्तक टेकवलं. त्याचवेळेस तिला जाणवलं की आबेद तिथं आलेला आहे. तिला तो भेटलेला आहे व तो म्हणत आहे की तो आजही मरण पावलेला नसून त्यानं जन्मच घेतलेला आहे. तिचं ते बाळ म्हणजेच त्याचा पुनर्जन्मच आहे.
ती समाधीजवळ गेली होती आबेदच्या. ज्याला ती मंडळी कबर वा मकबरा म्हणत. त्यानंतर तिनं आपले मस्तक त्या कबरीवर टेकवले. तोच तिला विचार आला. विचार आला की जर मी याच आबेद सोबत विवाह केला असता तर आज तो मरणागती गेला नसता. जे घडलं त्याला जबाबदार मीच आहे. कारण त्याची जी दैनंदिनी होती. ती दैनंदिनी तिनं वाचली होती. त्यात त्याचा जीवनवृत्तांत लिहिलेला होता. ज्यातून त्यानं आपली भुमिका मांडण्याचा प्रयत्न केला होता.
तिनं विवाहही केला असता त्याचेशी. परंतु तिच्या विवाहाच्या आड तिचे संस्कार येत होते. ते संस्कार की ज्यानं तिच्या मनात विवाह करण्याविषयी नकार भरला होता. ती मुळ भारतीय होती. ज्यांच्यात संस्कार कुटकूट भरले होते. तिनं प्रेम केलं होतं आबेदवर. खरं प्रेम. परंतु तिचं दुसरं प्रेम आपल्या मातृभुमीवरही होतं. त्या मातीवर होतं, ज्या मातीत तिनं जन्म घेतला होता. जी भारताची मातीत होती. ती भारतीय माती तिला पाकिस्तानात जायची परवानगी देत नव्हती. त्यातच तिच्या भारताचाही स्वातंत्र्यप्राप्तीचा इतिहास होता.
ती आबेदच्या कबरेवर नतमस्तक तर झाली होती. परंतु तिला आता एक खंत वाटत होती. ती खंत होती, आबेदसोबत बोलण्याची. आबेद जेव्हा तिला भेटायला आला होता, तेव्हा आबेदसोबत न बोलण्याची. ज्यावेळेस आबेद तिला भेटायला आला होता तिच्या घरी. त्यावेळेस त्याच्याशी बोलण्याची इच्छा असूनही तिला त्याचेशी मनमोकळेपणानं बोलता आलं नाही. कारण तिचा पती. तो घरी असल्यानं ती बोलू शकली नाही. हेच ते भारतीय संस्कार होते. त्यामुळंच आज तिला वाटत होतं की कदाचीत याचाच धसका घेवून आबेदच्या मनावर परिणाम झाला असेल. ज्यात तो मरणागती गेला. तसं पोलीस स्टेशनला तिला बोलावणं आलं होतं, तेव्हा तिला पोलिसांनी माहिती दिली होती की आबेद त्यांना एका भिकाऱ्याच्या अवस्थेत सापडला. ज्याचे कपडेही त्याच्या अंगावर नसून ते कपडे त्या दैनंदिनीला गुंडाळून होते. ही भिकारी अवस्था आपल्यामुळंच झाली, याला कारणीभूत आपणच. असं तिला वाटायला लागलं होतं.
शर्मिलाला त्याच्याशी न बोलण्याचं शल्य जाणवत होतं. परंतु तिला वाटत होतं की आपण त्याचेशी विवाह केला असता तर...... कदाचीत तो भारतातच राहिला असता का? त्याचं उत्तर तिच्याजवळच होतं. जो व्यक्ती खरं प्रेम टाकून आपल्या अब्बुसोबत पाकिस्तानात जावं शकते. तो खरंच भारतात राहिला नसता. आलाही नसता आणि मला सदोदीत त्यानं बुरख्यातच ठेवलं असतं.
भारत....... कोणी भारताविषयी आत्मीयता बाळगत नाहीत व त्याला दोष देत जयजयकार करायलाही मागे पुढे पाहतात. शिवाय आता काहीजण म्हणायला लागलेय की भारतात आमची घुसमट होतेय. परंतु कशी घुममट होते, तेच कळत नाही.
भारत महान देश आहे. तो महान आजचा नाही. तो पुर्वीपासूनच महान आहे. हे या देशातील जन्मास आलेल्या थोर पुरुषांवरुन लक्षात येतं. या देशाचा इतिहास मोठा रक्तरंजीत आहे. तसाच तो समृद्धही आहे. तो समजणं गरजेचं आहे.
भारताला पुर्वी सोन्याची चिडीया म्हणायचे. त्याचं कारण होतं भारताचं समृद्धपण. भारतात एवढा हिरवेगारपणा होता आणि जंगलं होती की त्या जंगलात वन्य पदार्थ भरपूर मिळायचे. त्यातच भारतात हिऱ्याची सुद्धा खाण होती. ज्यात कोहिनूर हिऱ्याचा समावेश आहे. तसंच कितीतरी प्रमाणात सोने व चांदी भारतात अस्तित्वात होते.
भारतात सोन्या चांदीचा व हिऱ्याचा खजिना होता. अन्नधान्य वा विपूल प्रमाणात खनिज पदार्थ होते. त्यातच या मातीत अशा अशा वस्तू पीकत होत्या की ज्या वस्तू इतर देशात पीकत नव्हत्या. देशाच्या कोणत्याही भागात गेल्यास सर्वत्र भरभराटच दिसायची.
देशात सोनं विपूल प्रमाणात दिसल्यामुळं विदेशी लोकं भारतात येत व भारताला लुटून निघून जात. हे सिंकदरच्या स्वारीवरुन दिसून येते. सिकंदरही भारत समृद्ध आहे हे ऐकून भारताला जिंकण्यासाठी भारतात आला होता. परंतु या मातीत जशी खनिज संपत्ती, हिरे, पाचू, सोने व चांदी दडलेली होती. तशीच दडलेली होती माणसं. ती माणसं थोर होती. संस्कारी होती. त्याच माणसांच्या विरतेच्या साहाय्यानं विदेशी आक्रमणकर्त्यांना भारतातून वेळोवेळी पळ काढावा लागला होता.
भारतावर विदेशी आक्रमणं झाली. त्यातच त्या आक्रमणात कमीतकमी दोनशे वेळा विदेशी शासकांनी भारतावर आक्रमण करुन भारताला लुटलं. ज्यात पर्शियन राजा अचमेनिड याचा समावेश होतो. त्यानंतर सायरस द ग्रेट, डॅनियल द ग्रेट, झेरक्स यांनी अनेक वेळा भारतावर आक्रमणं केली. हे सर्व शासक ईराणमधील हखमनी वंशाचे राजे होते. तो काळ पाचशे पन्नास इस पुर्वचा मानला जातो. त्यानंतर भारतातील आंबी राजाला हाताशी घेवून व करार करुन पुरु राजाला हारविण्यासाठी आणि भारताला लुटण्यासाठी सिंकदरही इस पूर्व तिनशे एकसष्टमध्ये भारतावर चालून आला होता. मात्र पुरुनं आपल्या विरतेचा परिचय देत अलेक्झांडर उर्फ सिकंदरला असे प्रत्युत्तर दिले की त्याची जगजेत्तेपणाची आस संपुष्टात आली व तो परत गेला आणि परत जातांना वाटेतच तो मरण पावला. आपल्या देशापर्यंतही गेला नाही. त्यानंतर मोहम्मद बिन कासीमनं भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. या स्वाऱ्यादरम्यान त्यानं सिंधचं राजपालपद सांभाळलं. त्यानंच राजा दाहिरची हत्या केली होती. तो काळ सन सातशे बारा ते सातशे पंधराचा होय. मोहम्मद बिन कासीम हा पहिला मुस्लीम विदेशी आक्रमणकारी होता. त्यानंतर गझनीचा मेहमूद याने भारतावर सतरा वेळा स्वाऱ्या केल्या. या स्वाऱ्यादरम्यान त्यानं अनेक मंदिरं लुटली. गावंची गावं लुटली. कित्येक महिलांचे मंगळसूत्र लुटले व भारताला कंगाल बनविण्याचा प्रयत्न केला. परंतु भारत कंगाल बनला नाही. हा काळ सन नवशे अठ्ठ्यानव ते एकहजार तीसचा धरले जातो. त्यानंतर मोहम्मद घोरीनं भारतावर सन अकराशे पंच्याहत्तर मध्ये आक्रमण केले. त्यानं बरेचवेळा भारतावर आक्रमण केले. ज्याला पृथ्वीराज चौव्हाननं त्याच्याच शहरात जावून त्याला ठार केलं. तेही त्याचाच बंदी असतांना. त्यानंतर तैमूर लंग याने भारतावर आक्रमण केले. तो काळ तेराशे अडतीसचा होय. त्याने तुघलक वंशाची राजसत्ता भारतावर स्थापन केली. त्यानंतर भारतात येणारा विदेशी आक्रमणकर्ता बाबर होय. त्यानं तर पुर्ण स्वरुपातच भारताला मुस्लीममय बनवलं होतं. बाकीचे आक्रमणकारी भारतात स्थिरावले नाही. ते भारताला लुटलूट लुटून निघून गेले. परंतु बाबर व बाबरनंतर आलेल्या तमाम शासकांनी भारतालाच आपला देश समजत इथंच वसाहती स्थापन केल्या व ते इथंच राहू लागले. त्याचं कारण होतं भारताची सोन्याची चिडीयाच असणे. बाबरानंतर भारताला पुन्हा एकदा सोन्याची चिडीया समजत इंग्रजांनी भारतावर आक्रमण करुन भारताला गुलाम बनविले.
भारत सोने की चिडीयाच होता. त्याचं कारण येथील सोनं नव्हतं की जे लुटलूट लुटून नेला आलं होतं. काही साम्राज्यांनी येथील सोना व संपत्ती लुटून नेली. ते त्यालाच सोन्याची चिडीया मानत होते. परंतु मुस्लीम शासक बाबर याने येथील जमीनीला सोन्याची चिडीया समजून घेतलं. ती शेतजमीन त्यांना लुटून नेता येत नव्हती. म्हणूनच ते इथं स्थिरावले. कारण या जमीनीत तत्सम प्रकारचे मसाले पीकत होते. ज्याचा वापर स्वयंपाकात केल्या जात असे. शिवाय ते तत्सम पदार्थ टाकल्यानं भाजीला वेगळीच चवही येत असे. तसेच कित्येक प्रकारच्या औषध्या या जमीनीत उपलब्ध होत्या. हे मसाल्याचे पदार्थ व ह्या औषध्या जगात कुठेच उपलब्ध नसल्यानं भारतावर विदेशी आक्रमणं झालीत. नव्हे तर विदेशी आक्रमणकर्त्याना या देशात स्थिरावायला भाग पाडलं. हेच दिसलं पुढे इंग्रज, डच, पोर्तुगीज व फ्रेंचांना. तेही या देशावर आक्रमण करण्यासाठी आले होते. परंतु त्यांचं इंग्रजांपुढं काहीच चाललं नाही. त्यातच फ्रेंचांचं युद्ध झालं व फ्रेचांना माघार घेवून परत जावं लागलं. त्यातच बाकीच्या शत्रुंनीही इंग्रजांपुढे शरणागती पत्करली.
इंग्रजांनी भारतात राहून भारतातीलच लोकांना गुलाम केलं, राबवलं व त्याच्या हातानं निर्माण झालेला माल आपल्या देशात नेला. त्यावर प्रक्रिया करुन तोच माल आपल्या देशात आणला आणि आपल्याला घ्यायला भाग पाडलं. उदाहरणार्थ लांब धाग्याचा कापूस. त्या कापसाला आपल्या देशात नेलं व प्रक्रिया करुन त्याचं कापड बनवून ते आपल्याला विकलं. त्यानंतर जेव्हा ते भारताला सोडून गेले. तेव्हा त्या भारतातील जमीनीत सोनं पीकत होतं. त्या देशातील त्या जमीनीत सोनं पिकू नये म्हणून कित्येक जमीनीत मीठ टाकलं नसेल कशावरुन? कारण येथील उपजाऊ जमीन त्यांना लुटून नेता येवू शकत नव्हती.
हे सगळं घडलं. कारण आपण मुर्ख होतो. आपण बुवाबाजीत अडकलो होतो पुर्वीपासून. आपण माणसांना माणूस समजत नव्हतो पुर्वीपासून. आपण पुर्वीपासूनच आपल्याच भारतात राहणाऱ्या आपल्याच भाऊबंदांना आपले शत्रू समजत राहिलो आणि त्यांच्याविरुद्ध इस्तेमाल करण्यासाठी विदेशी लोकांना बोलावलं. जसे अलेक्झांडरला भारतात आक्रमण करायला आंबीनं बोलावलं नव्हे तर त्यानं सिकंदरला मदतच केली. मोहम्मद बिन कासीमला ज्ञानबुद्ध व बुद्धभुषणनं बोलावलं. त्यानं अलोर किल्ल्याचा राज मोहम्मद बिन कासीमला सांगीतला. कारण त्याला राजा बनायचं होतं. परंतु त्याची अपेक्षा पुर्ण झाली नाही. मोहम्मद घोरीला राजा जयचंदनं बोलावलं. त्यालाही राजा बनायचं होतं. परंतु अपेक्षाभंग झाला. इंग्रजही भारतात आले. त्यांना व्यापारी सवलती त्यावेळच्या जहांगीर बादशाहानं दिल्या होत्या. व्यापार करण्यासाठी. पुढं त्यांनी पाय रोवले. परंतु व्यापार करण्याच्या इंग्रजांना सवलती देणे म्हणजेच एकप्रकारे इंग्रजांना मदतच करणे होते. ज्यातून भारत इंग्रजांचा गुलाम बनला होता.
इंग्रजांनी भारतात सुधारणा केल्या. त्यासाठी त्यांनी कायदेही केले. येथील सतीप्रथा बंद केली. जी प्रथा महिलांना तिच्या पतीच्या निधनानंतर त्याच्या शरणावर जीवंत जाळत होती. त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा अधिकार मिळवून दिला. बालविवाह प्रथा थांबवली. समाज सुधरवला. मात्र भारताला सोन्याची चिडीया ठेवलं नाही. जेवढं भारताला लुटून नेता येईल. तेवढं लुटून नेलं. शिवाय येथील जमीनीतून ते सोन्याचं उत्पन्न घेण्यासाठी असं असं रसायन फवारलं की ज्या ठिकाणी सोनं पीकत होतं, त्या शेकडो हेक्टर जमीनी बंजर झाल्या. ज्यावेळेस भारत स्वतंत्र्य झाला होता. त्यावेळेस भारतातील कित्येक हेक्टर जमीनीवर वाळूचेच साम्राज्य पसरले होते. जिथं पुर्वीच्या काळात हरियाली असेल. परंतु त्यावरही मात करीत भारत स्वतंत्र्य झाल्यावर येथील राजकीय नेत्यांनी आपल्या अपार कष्टानं तसंच तनमनधनानं पुन्हा एकदा वैभवशाली दिवस प्राप्त करुन दिलेत. यात त्यांनी केलेली अपार मेहनत मोलाची आहे. शिवाय या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे क्रांतिकारक लढले व अल्पावधीतच फासावर गेले वा हुतात्मे झाले. त्यांचे हुतात्मपण वाखाणण्याजोगंच आहे. अवघ्या आठ वर्षाचा नंदूरबारचा शिरीष, घनश्यामदास, रणछोडदास, अवघ्या तेवीस वर्षाचा भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव. या व्यतिरिक्त लाला लजपतरायसारखे अनेक वीर पुरुष. या सर्वांच्या रक्तानं पावन झालेली ही भारतभुमी. याच भुमीवर काल बाजीप्रभूचं रक्त सांडले, विदेशी राज्यकर्त्यांचा प्रतिकार करतांना आणि याच भुमीवर जालियनवाला बागेत शेकडो वीर जनरल डायर नावाच्या विदेशी माणसांच्या गोळ्यांचे शिकार बनलेत. याच भुमीत राणी लक्ष्मीबाईला वीरमरण आलं, अन् याच भुमीत ताराबाईनं स्वराज्य टिकवलं तरी तिला मृत्यूपर्यंत सन्मान मिळालं नाही. त्याचं कारण होतं, आपण वागणं. आपण आपल्याच माणसांशी माणसासारखं वागत नाही. तर त्यांना आपण आपलेच शत्रू समजत वागतो. व्यवहारही करतो.
विशेष सांगायचं झाल्यास आपण आपल्या माणसांशी वागतांना आपली भुमिका बदलवावी. सौहार्दपुर्ण वागावं. त्यांना शत्रू समजू नये आणि त्यांना शत्रू समजत विदेशी लोकांना आपल्याच देशात शिरण्याची परवानगी देवू नये. कारण कोणताच विदेशी व्यक्ती आपल्याला चतकोर पोळीची मदत करेल. परंतु त्याचबरोबर तो पाऊण कोर पोळी हस्तगत करण्याचा प्रयत्न करेल यात शंका नाही. तेव्हा वेळीच सावधान व्हावं. तसंच हेही लक्षात घ्यावं की भारत सोने की चिडीया होती. त्याला सोन्याचीच चिडीया बनवायचे आहे. त्यादृष्टीनंच पावलं टाकायची आहेत. त्याशिवाय भारत पुन्हा एकदा सोन्याची चिडीया बनणार नाही व भारताचे निघून गेलेले गतवैभव भारताला पुन्हा प्राप्त होणार नाही. हे तेवढंच खरं.
भारताचा इतिहास हा बुरख्यातील नव्हताच. बुरखा पद्धती मुस्लिमांनी आणली. त्याचं कारण होतं त्यांचा अधिवास. मुस्लीम समुदाय हे वाळवंटात राहात होते. तिथं कडक ऊन्हं पडायचं. त्यातच उन्हाचा दाह चेहऱ्याला होवू नये व काळे कापड उष्णतेचा सामना करु शकतो असा विचार करुन त्या लोकांनी काळे कपडे वापरण्याची सुरुवात केली होती.
शर्मिलाचा तो विचार. ती गेलीही असती पाकिस्तानात. परंतु तिला बुरखा पसंत नव्हताच. तिला आबेद आवडत होता. परंतु त्याचं पाकिस्तानात जाणं आवडलं नाही. म्हणूनच ती हाताची नस कापली गेली. आज त्या नस कापण्याचा तिला पश्चाताप नव्हता. पश्चाताप होता आबेदच्या मरणाचा. तशी ती त्या कबरेवर नतमस्तक होताच स्वगत बोलली,
"आबेद, मी तुझ्याशी विवाह केलाच असता रे. जर तू पाकिस्तानात गेला नसतास तर."
तिचा तो विचार. तो विचार रास्तच होता. कारण तिचा देश महान होता व त्या देशातील लोकांमध्ये महान असे संस्कार होते. ते कोणाही एकावर प्रेम करीत होते आणि निभवीत असत शेवटपर्यंत. त्यामुळंच तिचा तो विचार. तोच त्या कबरेतून आवाज आला. जणू ती कबर बोलत होती. म्हणत होती,
"बरं झालं तू माझ्याशी विवाह केला नाहीस तर........ मी मानतो की तुझं माझ्यावर प्रेम होतं. प्रेम निरतिशयच होतं. परंतु ते प्रेम होतं. तो विवाह नव्हता. अगं आमच्याकडं विवाह हा करार असतो. तो अजुनही बदललेला नाही. ज्यात कबूल कबूल तीनवेळा म्हटलं की विवाह आणि तलाक तलाक तीन वेळा म्हटलं की तलाक. मग जी पत्नी वा प्रेमिका आपल्यावर निरतिशय प्रेम करते. ते नातं कितीही पवित्र वा कितीही चांगलं असलं तरी ते नातं एका सेकंदात खल्लास. आम्ही आमचे मायबाप, आमचे पुर्वज यांच्या मनानं व मतानं वागणारी माणसं. शिवाय सगळं त्यांच्या मनानंच व्हायला हवं. नाही झालं तर जेहाद. मग त्याचा परिणाम काहीही होवो, आम्ही विचारच करीत नाही. माहीत आहे, आम्ही पाकिस्तान तर मागीतला. परंतु त्याची हालत कशी आहे. अगं तुमचा भारत तरी बरा. परंतु आमचा पाकिस्तान यापेक्षा वेगळाच आहे. तिथं नीट रस्ते नाहीत. गरीबी आहे. खाणारी तोंड जास्त आहेत. प्रत्येक घरी शिक्षण नाहीच. कारण मुलं जास्त असतात. त्यांना पोषता पोषता नाकी नव येतो. परंतु समाजाची ती एक प्रथा आहे. लेकरं पैदा होवू देणं हा आमचा एक रिवाज आहे. आम्ही लेकरं पैदा होण्याला अल्लाची देणच समजतो. कुटूंब नियोजनाला आम्ही अल्लाच्या कामात टांग अडवणं समजतो. शिवाय केवळ अंधश्रद्धाच आहेत आमच्याकडं. बऱ्याच अंधश्रद्धा, ज्या भारतातही आहेत. माहीत आहे, तू जर माझ्याशी विवाह केला असता, तर तुझ्या स्वयं व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपीच झाली असती, नव्हे तर हत्याच. मग मी भारतात जरी राहलो असती तरी. अगं माझी इच्छा नसतांनाही तुला मी बुरख्यातच ठेवलं असतं. कारण परंपरा मोडता येत नाही. आता सांग की तुला बुरखा पसंत राहिला असता का? अन् मला जरी त्याचा विरोध असता तरी मी ती प्रथा बदलवू शकलो नसतो. शिवाय या भारतातही मी असतो तुझ्याबरोबर तर आज तुला मी मुलं पैदा करण्याची मशीन समजत कितीतरी मुलं जन्मास घातली असती, अल्लाच्या कामात अडथळा नको म्हणून. म्हणूनच सांगतोय की बरं झालं, तू माझ्याशी विवाह केला नाही म्हणून. अगं तू जर आमची एखादी प्रथा मोडली असती ना, तर त्याचं चित्रही वेगळंच राहिलं असतं. ते चित्र असतं तुझी हत्या. या हातानं मला नाईलाजानं तुझी हत्या करावी लागली असती आणि ज्या खड्ड्यात आज मी कबर बनून आहे ना. आज मी जीवंत असतो आणि तू त्याच खड्ड्यात आज पडली असती. निपचीत, काहीही गुन्हा नसतांना. म्हणूनच बरंच झालं समज की तू माझ्याशी विवाह केला नाहीस व मी भारतात राहिलो नाही. हे सगळं अल्लानंच घडवून आणलं. अल्लानंच मला पाकिस्तानात पाठवलं. जर मी पाकिस्तानात गेलो नसतो तर कदाचीत आपण विवाह करुन मोकळे झालो असतो व इमरानसारखं आयुष्य आपल्यालाही जगावं लागलं असतं."
कबरेतील आबेदचं बोलणं झालं होतं. तो काय बोलला ते आता शर्मिलाला नीट समजलं होतं. परंतु शेवटचं तिला काही समजलं नव्हतं. ती त्यावर विचार करीत होती. त्या कबरेतील आबेद बोलला होता इमरानसारखं आयुष्य आपल्याला जगावं लागलं असतं. त्यावर ती विचार करीत होती. विचार करीत होती की ती कबर इमरानसारखं आयुष्य जगावं लागलं असतं, अशी का म्हणाली. इमरान तर आज बराच सुखी आहे.
कबरेतील आबेदचं ते वाक्य. ते इमरानसारखं आयुष्य? त्या बोलण्याचा अर्थ काय? तिच्या मनातील तो विचार. त्यावर ती बराच विचार करीत होती. परंतु तिला काही उत्तर सापडत नव्हतं. त्यातच ती ते उत्तर शोधत होती. ते उत्तर शोधता शोधता तिची नजर तिथंच उभ्या असलेल्या इमरानकडे पडली. तशी ती म्हणाली,
"इमरान ही कबर बोलते का रे?"
इमरान तिथंच उभा होता. त्याला काहीच ऐकायला आलं नाही. तसा तो बोलला,
"नाही तर."
"तुला काहीच ऐकायला आलं नाही का रे?"
"नाही तर."
"इमरान ही कबर बोलते. म्हणत होती की इमरानसारखं आयुष्य तुलाही जगावं लागलं असतं. याचा अर्थ काय रे? जरा तुला तरी सांगता येईल काय?"
इमराननं ते ऐकलं. तसा तो म्हणाला,
"ती समाधी आहे. ती समाधी काहीही बरळणारच. तो आपला भाष असतो. त्यावर विश्वास ठेवायचा नसतो. चल घराकडं."
असं म्हणत तिला इमराननं उठवलं. सायंकाळ झाली होती. तसे ते दोघंही ताबडतोब घरी आले होते. मात्र आताही शर्मिलाच्या मनात तो प्रश्न सारखा घोळतच होता.
**********************************************************

किमान एक वर्ष झाला होता. शर्मिला आपल्या गावात होती. तसा एक प्रश्न तिच्या मनात घोळतच होता. तो प्रश्न होता इमरानच्या जीवनातील. आबेद कबरीतून म्हणाला होता की इमरानसारखं आयुष्य आपल्यालाही जगावं लागलं असतं. त्याच प्रश्नाच्या गुंताळ्यात तिनं एक वर्ष काढला होता. परंतु अजुनही तिला त्या प्रश्नाचं उत्तर सापडलं नव्हतं. तशी ती त्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी परेशान होती. कधीकधी इमरान बकऱ्या घेण्यासाठी यायचा. ती त्याला विचारायची. परंतु तो त्याला वेळ नाही, असं सांगून टाळायचा.
आज त्या गोष्टीला एक वर्ष झालं होतं. त्या प्रश्नाचं उत्तर तिला काही सापडलं नव्हतं. त्यातच तो पावसाळा सुरु झाला होता.
शर्मिला तशी दर पावसाळ्यात गावाला एकदा तरी येत असे. याही पावसाळ्यात ती गावाला आली होती. त्यातच तिला तो वर्षभर सतावणारा प्रश्न आजही सतावू लागला होता. तशी ती ताबडतोब इमरानच्या घरी गेली. म्हणाली,
"इमरान, तुला आठवतंय का ती एक गोष्ट?"
शर्मिलाचं ते बोलणं. ते ऐकून इमरान म्हणाला,
"कोणती गोष्ट?"
"तुला आठवतंय, मागील वर्षी आपण आबेदच्या कबरीजवळ गेलो होतो. त्यावेळेस मी म्हटलं होतं की कबर बोलते काय? त्यावर तू म्हटलं होतं की कबर बोलत नाही. तुला काहीतरी भाषच होतोय. माहीत आहे त्यावेळेस मी तुला एक प्रश्न विचारला होता. ज्याचं उत्तर तू टाळलं होतं."
"कोणता प्रश्न?"
"मी म्हटलं होतं की कबर बोलते व या आबेदच्या कबरेनं मला एक प्रश्न केलाय. तो म्हणजे मी जर आबेदशी विवाह केला असता तर माझी आणि त्याची अवस्था ही तुझ्यासारखी होईल. ते मला काही नीट समजलेलं नाही. नक्कीच त्याला काय म्हणायचं होतं?"
इमराननं तो प्रश्न ऐकला. सुरुवातीला त्यानं आढेवेढे घेतले व नंतर तो म्हणाला,
"कदाचीत त्याला हे म्हणायचे असेल की आम्हाला आमचं स्वतःचं मत नसतं. कोणतेही निर्णय घेतांना ते काजीलाच विचारुन घ्यावे लागतात. तुमच्या धर्मात तुम्हाला कोणतेही निर्णय घेतांना पंडीतांना विचारलं पाहिजे, असा दृष्टीकोन नसतो. शिवाय आम्ही विवाह करतांना फक्त दूध पाळतो. याचाच अर्थ सख्ख्या बहिणीशी विवाह करीत नाही. इतर सर्वांशी विवाह करायला आम्हाला मोकळीक आहे. तुमच्या धर्मात तुम्ही धर्माला तेवढं स्थान देत नाही. आम्ही धर्माला फार मोल देतो. धर्मासाठी कटतो देखील आणि काटतो देखील. जर तू आबेदशी विवाह केला असता. तर तूही मुस्लीम झाली असती आणि तूही धर्म धर्म करीत ज्यानं मुस्लीम धर्माला दोष दिला असता. मग तो कितीही चांगला का असेना, आपला सगळा संबंधी का असेना. त्याचीही हत्या केली असती. हेच त्याला म्हणायचं असेल. जे तुमच्या धर्मात घडत नाही. म्हणूनच तुमच्या धर्माला कोणीही काहीही म्हणून जातात. तसं आमच्या धर्माला म्हणत नाहीत. आमच्यासाठी आमचा धर्म महत्वाचा आहे. हाच फरक आहे तुमच्या आणि आमच्या धर्मात. आमच्या धर्मातील प्रत्येक मुसलमान हा काटेकोरपणानं धर्म पाळतो. धर्माच्या नियमांचे काटेकोर पणानं पालन करतो आणि जो काटेकोर पालन करीत नाही, त्याची आमचा धर्म हत्याच करुन टाकतो. म्हणूनच आमच्या धर्मात काफिरांना किंचीतही स्थान नाही. पाकिस्तानात तर काफिरांना मुसलमानच समजत नाही. तसंच पाकिस्तानचं संविधान सांगतं. तसंच ह्या सर्व गोष्टी मी आजपर्यंत करीत आलेलो आहे. महत्वाचं म्हणजे माझ्यासाठीही धर्म महत्वाचा आहे. मिहीधर्मासाठीच जगतो. हेच आबेदला सांगायचं असेल कदाचीत."
शर्मिलाला आता कळलं होतं, आबेद कबरीतून काय बोलला होता ते. तिला आता आपल्या धर्माचा अभिमान वाटायला लागला होता व तिला आपल्या प्रेमाची चीड यायला लागली होती. आता तिला पश्चाताप वाटू लागला होता की आपण एका मुस्लीम व्यक्तीवर प्रेम करायला नको होतं. हं, प्रेमच करायचं होतं तर ते आपल्याच बिरादरीतील एखाद्या हिंदूच व्यक्तीशी करायला हवं होतं.
तिला आता धर्माचा सन्मान माहीत झाला होता. जेव्हा इमराननं तिचे डोळे उघडले होते. आता ती खुश होती आपल्या पतीसोबत. त्यातच ती आपलं उर्वरीत आयुष्य काढू लागली होती. आता तिला राग येत असे, जर ती ऐकत असे, एखादी मुलगी अमूक अमूक मुस्लीम मुलाशी पळून गेलेली आहे. वाटत असे की ती मिळाल्यास तिला ती करकर कापून टाकेल. कारण तिच्या मनात आपल्या धर्माबाबत प्रेम तर दुसऱ्या परकीय धर्माबद्दल तेवढाच तिटकारा निर्माण झाला होता.
शर्मिलानं वाचली होती ती पुस्तक. ज्यात आबेदला झालेल्या वेदना लिहिल्या होत्या. आबेद पाकिस्तानात का गेला? त्याचं वर्णन सुद्धा लिहीलं होतं. त्यातच त्या गावात असतांना ते पावसात भिजणं. शिवाय नवरदेव नवरीचा खेळ. त्यातच त्या समुद्रात जावून विहरणं. वाळूत नाव लिहिणं. सारंच लिहिलं होतं. आता तिला आठवत होतं त्याचं नाव लिहिणं आणि तेही आठवत होतं, हाताची नस कापणं.
आजपर्यंत त्या हाताच्या नस कापण्याचा उलगडा तिला झाला नव्हता. परंतु आता तिला समजून येत होतं की ती नस विधात्यानंच तिला कापायला लावली असेल, असंच तिला आज वाटत होतं. आबेद त्याच दिवशीपासून तिच्या जीवनातून कितीतरी दूर जाणार होता. याचा संकेत विधात्यानं तिला दिला होता. कारण जी नस कापली गेली होती. ती नस तिच्या हातावर कोरलेल्या आबेद नावाला दुभंगून कापली गेली होती. ते आबेद नाव दुभंगून गेलं होतं व त्या आबेद नावाला दुभंगून टाकून त्या कटलेल्या नसंनंच आबेद या नावाचा नव्हे तर आबेदचाच भारत पाकिस्तान बनविल्याचं दाखवलं होतं. कदाचीत तो आबेद आजपासून तुझा नाही. याचा संकेत त्या नसंनं दिला होता.
ते नाव तिनं व त्यानं हातावर का गोंदवलं? त्याचंही एक कारण होतं. त्याचं कारण होतं त्या नावाचं मिटणं. त्यांनी बरेचदा पाहिलं होतं की ते नाव वाळूवर लिहिल्यावर जेव्हा समुद्राची लाट येत असे. त्यात ते नाव मिटल्या जात असे. ते पाहून त्यानं आपल्या शरीरावरच शर्मिला नाव गोंदवून टाकलं होतं. अन् तिनंही आबेद नाव आपल्या हातावर गोंदवलं होतं.
आज तिला अचानक आठवलं होतं की हे सारं विधात्यानंच घडवून आणलं होतं. त्या विधात्यालाच जणू तिच्या प्रेमाचा स्विकार नव्हता. म्हणूनच की काय, विधात्यानंच तिला नस कापायला लावली होती. तिच्या प्रेमाचा भारत पाकिस्तान बनू नये यासाठी. कदाचीत तिचं प्रेम जर यशस्वी झालं असतं तर आज चित्र निराळं असतं. आज ती त्याचेसोबत भारतात नाही तर पाकिस्तानात राहिली असती, तेही बुरख्यात. ते बुरख्यातीलच जीवन तिला कापावं लागलं असतं शेवटपर्यंत. शिवाय ना तिला स्वतंत्र्य राहता आलं असतं भारतात जशी वागत होती ती तशी. ना तिला मुलांच्या पैदा करण्यावर कात्री लावता आली असती. शिवाय तिचं शोषणच झालं असतं अखेरपर्यंत.

******************************************************************************समाप्त ************