His Quees - 1 in Marathi Fiction Stories by kanchan kamthe books and stories PDF | His Quees - 1

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

His Quees - 1

(ही एक काल्पनिक कथा असून त्याचा कोणाशीही काही संबंध नाही. तसे आढळून असल्यास तो निव्वळ योगा योग समजावा.)
"अजून किती वेळ मी वाट बघायची तिची?" त्याने विचारले.
"अजून एक वर्ष थांब ती लवकरच परत येईन" हे शब्द कानावर पडताच त्याने दरवाजा आपटला आणि रूम मधून निघून बाहेर गेला.

After 1 year (Anika)
सकाळी गजर वाजला मी आळस देत डोळे उघडले. माझी आज काहीच करायची इच्छा नव्हती. माझी रात्रभर झोप झाली नव्हती मला फक्त एकच स्वप्न पडायचं की मी कोणाची तरी वाट बघत बसले आहे. तो तिथे मला भेटायला येतो, आणि हाक मारतो पाठी वळून त्याचा चेहरा बघायला जाणार इतक्यात जाग येते. हे सतत घडतं होत गेल्या काही महिन्यांपासून मला कळतच नव्हतं की अस का होतंय.
मी अनिका दास , मी एका अनाथ आश्रमात राहते तिथेच मी लहानाची मोठी झाली त्यांनतर मी माझे शिक्षण पूर्ण केले आणि मी आता "Roy group & co" साठी as PA म्हणून जॉब करते. माझे बॉस राजवीर रॉय स्वभावाला खूप छान आहे, मी त्यांना लहापणापासून पासून ओळखते. जेव्हा मी लहान होते दोन वर्षांची तेव्हा त्यांनीच मला या आश्रमात दिनु काकांकडे माझ पालन पोषण करण्यासाठी दिलं होत.
ते आश्रमात donation, charity इव्हेंटसाठी यायचे. मी जेव्हा थोडी मोठी झाले तेव्हा मला दिनु काकांनी सांगितलं की मी दोन वर्षांची होते तेव्हा मला राजवीर रॉय यांनी आश्रमात सोडलं. पण मी जेव्हा जेव्हा मझ्या आई वडीलान बद्दल विचारायचे तेव्हा ते बोलणे टाळायचे. मी तेव्हा लहान होते त्यामुळे मला काहीच समजत नव्हतं पण मी १६ वर्षांची झाले तेव्हा कळलं की दिनु काकांना यातल काहीच माहीत नाही. मग मी माझ्या कुटुंबा बद्दल शोध घेण्याचा विचार केला.

(Past )

माझी जिवलग मैत्रीण राधा म्हणाली की ते तुला काहीच सांगणार नाहीत. मग मझ्या डोक्यात आयडिया आली. मी म्हणाले," राधा इथे सगळ्या मुलांचे रेकॉर्डस असतील ना रेकॉर्ड रूम मध्ये?"." हा असतील, पण तुझ्या मनात विचार तरी काय चाललेत, तू मला काही करायला सांगू नकोस कारण मी तस काही करणार नाही आहे. तुझ्या अजब गजब आयडियाज मूळे मी अडकली जाते आणि मला ओरडा खावा लागतो. मागे काय तर लायब्ररी मध्ये पुस्तक वाचायला जायचं होत तर तू मला mall मध्ये फिरायला घेऊन गेलीस तिथे सगळं महाग होत घेतलं तर काही नाही पण कपडे try भरपूर केलेस, तिकडची sales women रागणे बघत होती. ते जाऊ दे घरी येताना पण मला फिरवत फिरवत जंगलाच्या बाजून घेऊन आली एकतर तिथे कोण नसतं. मी किती घाबरलेले तुला माहित आहे का? तुझ्या ideas तूझ्या कडेच ठेव मी काही करणार नाही" राधा रागाने ओरडली. "अरे ठीक आहे बाबा, नको करू तू काही आता काय करायचं ते मीच करते" असा म्हणत मी निघाले तिथून. मला पण थोडा राग आलेला माझी बेस्ट फ्रेंड माझ्याशी अस वागते. बेस्ट फ्रेंड असतात कशाला एकमेकांच्या गुन्हात सहभागी व्हायला आणि असा कोणता serious crime करणार होती फक्त स्वतःच्या आई वडिलांची माहिती काढायची होती मला. माझा मूड खराब झाला. मला जाणून घ्यायचं होते की ते कशे होते. आणि असा काय झालं की मला ते सोडून निघून गेले. मला कोणीच मदत करायला तयार नव्हतं. मग मी रात्री सगळे झोपल्यावर राधाला एक वाजताच्या दरम्यान उठवलं. " राधा उठ मला तुझी मदत हवी आहे." " आता काय? एक वाजलेत घड्याळात" ती वैतागून म्हणाली. "अरे मला information बघायची आहे तू चल मला मदत कर" मी म्हणाले. तिने आधी खूप नकार दिले पण नंतर ती तयार झाली. आम्ही हळूच दरवाजा उघडला आणि आश्रमाच्या दुसऱ्या मजल्यावर गेलो. तिथे रेकॉर्डस रूम चा दर्वाज्या उघडला आणि हळूच battery ने रेकॉर्डस बघायला लागलो. तिथे year नुसार रेकॉर्डस ठेवलेले. " तू उजवी कडे बघ, मी डावी कडे बघते" राधा म्हणाली . मी डावी कडच्या बाजूला रेकॉर्डस बघताच होते. मला माझी फाईल सुद्धा मिळाली. मी राधाला हाक मारली मी फाईल उघडणार तितक्यात कसला तरी आवाज आला. आम्ही दोघेही घाबरलो आणि आमच्या आजू बाजूला बघायला लागलो. " राधा कोणही नाही आहे इथे आपल्या शिवाय उगाच घाबरु नकोस. "नाही अग तिथे कोणतरी होत मी एका मुलाला बघितलं." " अरे तिथे कोनही नाही आहे. चल तू आपण फाईल घेऊन जाऊया" मी म्हणाले. "अगं पण फाईल माझ्याकडे नाही आहे मी याच table वर ठेवलेली." बघते तर काय table वर फाईल नव्हती. "तू नक्की इथेच ठेवलेली का? "मी विचारलं तिला. "अग आवाज आला तेव्हा मी घाबरून फाईल इथेच ठेवलेली" ती बोलली. " मग गेली कुठे?"मी विचारल. तितक्यात माझी नजर खाली गेली तिथे ती फाईल पडलेली. मी उचलली आणि बघितली तर पहिल्या पानावर माझी basic information लिहिलेली. मग मी पान पालटलं तर काहीच नव्हत, राधा पण चकित झाली, आम्हाला दोघींनाही कळत नव्हतं की बाकीची पांन गेली कुठे, नक्की इतकीच माहिती आहे का, मझ्या बद्दल. मी कसं शोधू त्यांना काहीच कळतं नव्हतं. तेवढ्यात राधाने फाईल खेचून घेतली, आणि पानं पलटून परत परत बघू लागली. " अनीका फाईल व्यवस्थित बघ, इथे पान होती कोणी तरी मुद्दाम फाईलची पान फाडली आहेत." मी पण बघून शॉक झाले, अस कोणी का करेल मी कोणाचा काय वाकडं केलंय? माझ्यापासून गोष्टी का लपावल्या जात आहेत? नक्की काय झालेल माझ्या बाबतीत? मी Mr. राजवीर रॉय यांना कशी भेटले? असे सगळे विचार माझ्या मनात घोळू लागले. माझा पडलेला चेहरा पाहून राधा म्हणाली की धीर सोडू नकोस देवावर विश्वास ठेव लवकरच सत्य काय आहे ते कळेल. चल इथून, कोणाला कळलं तर गोंधळ होईन. मी आणि राधा तिथून निघालो तिथून निघताना कोणी तरी तिथे असल्याचा मला भास झाला. तेवढ्यात राधा बोलली" चल इथून मला झोपायच" तिथून आम्ही दोघीही निघालो....
(Past end)
To be continued..
( ही माझी पहिलीच वेळ आहे कथा लिहिण्याची जर कथा आवडली असेल तर please comment मध्ये मला कळवा)