Kamini Traval - 15 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | कामीनी ट्रॅव्हल - भाग १५

Featured Books
Categories
Share

कामीनी ट्रॅव्हल - भाग १५

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १५

मागील भागात आपण बघीतले की प्राची हर्षवर्धनला आपल्या बरोबर टूरवर न्यायचं ठरवते. हर्षवर्धन जाईल का बघू या भागात.

" आई यावेळी मी साउथच्या टूरवर हर्षवर्धनला बरोबर घेऊन जावं असा विचार करतेय."

प्राची कामीनी बाईंना म्हणाली. नुकतंच रात्रीची जेवणं आटोपली होती आणि कामीनी बाईं बाहेर अंगणात शतपावली करत असताना प्राची अंगणात येऊन त्यांना म्हणाली.

" प्राची विचार तुझा चांगला आहे.हर्षवर्धनला कधीतरी टूरवर जायची सवय करावी लागणार पण एकदम एवढ्या लांब न्यायचं का?"

" काय हरकत आहे? अर्धा प्रवास ट्रेनने होणार आहे. माझ्याबरोबर शशांक पण येणार आहे.आपला टूरलिडर निखील आहेच. टूरलिडर असला तरी प्रत्यक्ष टूर कसा असतो? तिथे टूरलिडरला काय काम करावं लागतं हे हर्षवर्धनला कळायला हवं.आत्ता या टूरचं प्लॅनींग करण्यापूर्वी मी आणि राजन आपल्या कंपनीतला प्लॅनिंग विभागाचा आम्ही दोघांनी तिथे जाऊन सर्व्हे केला. कोणती ठिकाणं आपण प्रवाश्यांना दाखवू शकतो? तिथलं वैशिष्ट्य काय आहे? तिथे राहण्याची सोय कशी आहे? हे सगळं बघण्यासाठी पण हर्षवर्धनला पुढल्या वेळी न्यायचं ठरवते आहे. त्यापूर्वी हा पूर्ण प्लॅनींग केलेला टूर त्याने अभ्यासला पाहिजे असं मला वाटतं."

" प्राची तू ज्या पद्धतीने विचार करतेय तो योग्य आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं की जवळच्या पल्ल्याच्या टूरवर आधी घेऊन जा. इतके दिवस बाहेर राहण्याची, तिथल्या गोष्टींशी जुळवून घेण्याची त्याला सवय नाही.काहीतरी घोळ होऊ नये म्हणून म्हणतेय. तू ज्या कोणत्या जवळच्या पल्ल्याच्या टूरवर हर्षवर्धनला पाठवशील तिथे तुला मात्र जावं लागेल."

कामीनी बाईंच्या बोलण्यात काळजी दिसली तशी प्राची म्हणाली,

"आई तुम्ही काळजी करू नका.मी हर्षवर्धन बरोबर जाईन. त्याला एकदम एकटं आणि तेही पहिल्या वेळी पाठवणार नाही."

कामीनी बाईंनी प्राचीच्या खांद्यावर थोपटत म्हटलं,

"मला त्याची कल्पना आहे.आई म्हणून काळजी वाटली ती बोलून दाखवली."

"आई मला तुमची काळजी कळतेय. मला पण हर्षवर्धनची काळजी वाटते. त्याच्यावर हळूहळू जबाबदारी टाकायला सुरुवात केली तरच तो कणखर बनेल. त्याचं मन कोणत्या तरी चांगल्या कामात गुंतवलं नाही तर तो पुन्हा ड्रग्जकडे वळू शकतो तसा तो वळला तर! याची मला भीती वाटते.ते मला होऊ द्यायचं नाही."

" हं.खरय तू म्हणतेस ते. हर्षवर्धनच्या मनाची तयारी करून मगच त्याला बरोबर न्यावं लागेल. एकदम नेलं तर तो बावरेल,गोंधळेल."

" हो आई.मला कल्पना आहे त्याची.आजच मी हर्षवर्धनशी बोलते. झोपायला चालतात नं?"

" हो. येतेमी तू जा.मी दारं बंद करून जाईन झोपायला."
" ठीक आहे."

प्राची आता गेली.कामीनी फे-या मारताना हर्षवर्धन टूरवर जायला तयार होईल की नाही याच विचारात गुंतल्या.

***
प्राची आपल्या रूममध्ये आली तेव्हा हर्षवर्धन आढ्याकडे बघत विचारात गुंतला आहे असं प्राचीला दिसलं. हर्षवर्धनशी काय आणि कसं बोलायचं यावर प्राची विचार करत होती.

" हर्षवर्धन…ऐकतोस का?" प्राची बोलून क्षणभर थांबली.

"काय?" हर्षवर्धनने विचारलं.

" मला असं वाटतंय की तू हळूहळू टूरवर जायला हवं."

" मी?" हर्षवर्धन क्षणभर गडबडला." मला जमणार नाही."

" हर्षवर्धन एकदम नाही म्हणू नकोस. मी काय म्हणतेय ते तर एक."

प्राचीला हर्षवर्धनचा नकारात्मक सूर ऐकून क्षणभर राग आला पण लगेच तिने स्वतःला सावरलं.

" हर्षवर्धन सुरवातीला तुला सगळं कठीण वाटेल पण एवढं काही ते कठीण नाही. तू सतत जावं असं मला एवढ्यासाठी वाटतंय की या व्यवसायातील खाचाखोचा तुला कळतील.सध्या आपला व्यवसाय नवीन आहे. तेव्हाच तुला सगळी सवय करावी लागेल."

" ऑफीसमधील दुसरे कोणी आहेत त्यांना पाठवलं नं "

" हर्षवर्धन टूरलिडर जाणारच आहे पण तू मालक आहेस कामीनी ट्रॅव्हल्सचा. तुला सगळ्या गोष्टी माहिती असायला हव्या.त्यासाठी तुला चल म्हणतेय.टूर लिडर त्यांचं काम करणार आहे. तुला ते काम करायचं नाही. परंतु टूर लिडर व्यवस्थीत आणि चोख काम करतोय की नाही, प्रवाशांना योग्य पद्धतीने ‌वागवतोय का नाही प्रवाशांच्या काही तक्रारी तर नाहीत हे सगळं तुला बसल्या जागी तेव्हाच समजेल जेव्हा टूरलिडर म्हणून काम करणा-याला तुझा धाक राहील. त्यासाठी त्या प्रवासात काय अडचणी येऊ शकतात याची शक्यता तू जेव्हा त्या ठिकाणी जाशील तेव्हा तुला कळेल.

टूर प्रमाणे टूर ज्या ठिकाणी न्यायचा आहे त्याचा सर्व्हे आधी करावा लागतो तोसुद्धा तुला करावा लागेल तेव्हा या व्यवसायाची गणीतं तुला कळतील. नाहीतर ऑफीसमध्ये काम करणारे सहज तुला बनवतील.कळवं का मी काय म्हणतेय?"

प्राची जे बोलत होती त्यातील अर्ध हर्षवर्धनच्या डोक्यावरून गेलं. तो गोंधळून प्राचीकडे बघू लागला. त्याची गोंधळलेली नजर बघून प्राचीने मनातच कपाळावर हात मारला. तिला कळेना याला कसं सांगावं?

बराच वेळाने हर्षवर्धन म्हणाला,

" प्राची तू रागावली? तू रागाउ नकोस.मी जाईन टूरवर."
हे बोलताना हर्षवर्धन हाताची अस्वस्थ चाळवाचाळव करू लागला.हे बघताच प्राचीला मनातून हर्षवर्धनची दया आली.

" हर्षवर्धन मी कशाला रागाउ तुझ्यावर.तुला खरं सांगू?"

" हं" हर्षवर्धने हुंकार दिला.

"खरच सांगतेय. तू असाच रिकामा राहिलास तर तुझ्याही नकळत तू पुन्हा ड्रग्जच्या आहारी गेलास तर माझा आणि आईंचा पराभव होईल. तुला ड्रग्जच्या जीवघेण्या विळख्यातून सही सलामत बाहेर काढताना मला आणि आईंना खूप समस्यांना तोंड द्यावं लागलं आहे. त्या समस्यांची तुला कल्पना येणार नाही इतक्या जटील होत्या. म्हणून तुला लवकरात लवकर आपल्या व्यवसायात लक्ष दे म्हणतेय.

सुरवातीला तुला कठीण जाईल पण तुझा मेंदू जर कामात गुंतलेला राहिला तर त्या ड्रग्जची तुला आठवण येणार नाही. आपला संसार चांगला व्हावा असं तुला वाटत असेल तर मी सांगतेय ते ऐक. ऐकशील नं?"

प्राची आपला प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य हर्षवर्धनच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होती. तिच्या शेवटच्या वाक्याने हर्षवर्धनच्या मनात चलबिचल झाली आणि त्याने प्राचीला कबूल केलं की तो टूरवर जायला तयार आहे.

प्राचीने हसत त्याच्या हातावर थोपटत म्हटलं,

"शाब्बास.आता मला काळजी नाही.मी आणि आई तुझ्या बरोबर आहोत.आता साउथच्या टूरचं सगळं प्लॅनींग झालं आहे. तिथे गेल्यावर काय काय समजून घ्यायचं ते तुला सांगीन. चल आता फार रात्र झाली झोपूया."

दोघंही हसत झोपायला गेले.दोघांच्या हसण्यासा मागचं कारण वेगळं होतं. प्राची आपल्यावर रागावली नाही याचा आनंद होऊन हर्षवर्धन हसला तर आपण हर्षवर्धनला छान पद्धतीने समजावून सांगू शकलो या आनंदाने प्राचीच्या चेहे-यावर हसू आलं.

***
दुस-या दिवशीची सकाळ प्राचीसाठी प्रसन्न मुद्रेने उगवली. कारण काल तिने खूप मोठा टास्क यशस्वीपणे पूर्ण केला होता. हर्षवर्धनला टूरसाठी तयार करणं हा प्राचीच्या दृष्टीने मोठा टास्क होता.

कालच रात्री तिने राधाला या बद्दल मेसेज करून कळवलं होतं.

सकाळी उठल्यावर प्राचीनता हुरूप वाढविणारा राधाचा मेसेज आला.

" काॅंग्र्याट्स प्राची.खूप मोठा टास्क सक्सेसफुली पूर्ण केलास. आता हर्षवर्धन हळूहळू छान तयार होईल.बेस्ट ऑफ लक."

राधा ने मेसेज बरोबर छानशी स्माईली आणि गिफ्ट म्हणून चाॅकलेटची इमेज पाठवलेली पाहून प्राचीला हसू आलं.

प्राची उत्साहाने खोलीबाहेर आली.हर्षवर्धन अजून गाडीतच लोळत होता. प्राचीला मात्र लवकर ऑफीसला जायचं होतं. साउथ टूरच्या प्लॅनींगवरून पुन्हा एकदा नजर फिरवावी लागणार होती.

***

प्राचीचा प्रसन्न चेहरा बघून कामीनी बाई आनंदल्या. पूजा करताना श्लोक म्हणता म्हणता कामीनी बाईंनी हाताच्या इशा-यानेच काय झालं म्हणून विचारलं.

"आई हर्षवर्धनला काल समजवण्यात यश आलं तो टूरवर यायला तयार झाला आहे. एक मोठ्ठा टास्क आपण पूर्ण केला आहे."

देवाला नमस्कार करून प्रसाद प्राचीला देत कामीनी बाईं म्हणाल्या,

" खरंय ग हर्षवर्धनला टूरसाठी तयार करणं म्हणजे मोठा टास्कच होता.आता तयार झाला ही परमेश्वराची कृपा. प्राची तुझी मेहनत,कष्ट आता दिसू लागले."

" हो आई. बरं मी जरा लवकर ऑफीसला चालले आहे कारण साउथच्या टूरवर फायनल टच द्यायचा आहे. हर्षवर्धन अजून साखरझोपेत आहे.मी निघते."

" अगं नाश्ता करुन जा.पोहे केलेत." कामीनी बाईं म्हणाल्या.

" आई पोहे खाण्यात वेळ झाला तर ट्रॅफीक लागेल.मी पोहे डब्यात घेउन जाते."

" ठीक आहे."

कामीनीबाई देवघरातील सगळं सामान व्यवस्थित ठेवत असताना प्राची नाश्त्याचा डबा घेऊन घराबाहेर पडली. आज एक वेगळाच आत्मविश्वास प्राचीच्या चेहे-यावर दिसत होता. आता हर्षवर्धनला हळूहळू आपण पूर्वीसारखा करू शकू याचा तो आत्मविश्वास होता.

_________________________________
क्रमशः पुढे काय होईल बघू.
लेखिका.. मीनाक्षी वैद्य.