भारत सोने की चिडीयाच?
भारत. कोणी भारताविषयी आत्मीयता बाळगत नाहीत व त्याला दोष देत जयजयकार करायलाही मागे पुढे पाहतात. शिवाय आता काहीजण म्हणायला लागलेय की भारतात आमची घुसमट होतेय. परंतु कशी घुममट होते, तेच कळत नाही.
भारत महान देश आहे. तो महान आजचा नाही. तो पुर्वीपासूनच महान आहे. हे या देशातील जन्मास आलेल्या थोर पुरुषांवरुन लक्षात येतं या देशाचा इतिहास मोठा रक्तरंजीत आहे. तसाच तो समृद्धही आहे. तो समजणं गरजेचं आहे.
भारताला पुर्वी सोन्याची चिडीया म्हणायचे. त्याचं कारण होतं भारताचं समृद्धपण. भारतात एवढा हिरवेगारपणा होता आणि जंगलं होती की त्या जंगलात वन्य पदार्थ भरपूर मिळायचे. त्यातच भारतात हिऱ्याची सुद्धा खाण होती. ज्यात कोहिनूर हिऱ्याचा समावेश आहे. तसंच कितीतरी प्रमाणात सोने व चांदी भारतात अस्तित्वात होते.
भारतात सोन्या चांदीचा व हिऱ्याचा खजिना होता. अन्नधान्य वा विपूल प्रमाणात खनिज पदार्थ होते. त्यातच या मातीत अशा अशा वस्तू पीकत होत्या की ज्या वस्तू इतर देशात पीकत नव्हत्या. देशाच्या कोणत्याही भागात गेल्यास सर्वत्र भरभराटच दिसायची.
देशात सोनं विपूल प्रमाणात दिसल्यामुळं विदेशी लोकं भारतात येत व भारताला लुटून निघून जात. हे सिंकदरच्या स्वारीवरुन दिसून येते. सिकंदरही भारत समृद्ध आहे हे ऐकून भारताला जिंकण्यासाठी भारतात आला होता. परंतु या मातीत जशी खनिज संपत्ती, हिरे, पाचू, सोने चांदी दडलेली होती. तशीच दडलेली होती माणसं. ती माणसं थोर होती. त्याच माणसांच्या विरतेच्या साहाय्यानं विदेशी आक्रमणकर्त्यांना भारतातून वेळोवेळी पळ काढावा लागला होता.
भारतावर विदेशी आक्रमणं झाली. त्यातच त्या आक्रमणात कमीतकमी दोनशे वेळा विदेशी शासकांनी भारतावर आक्रमण करुन भारताला लुटलं. ज्यात पर्शियन राजा अचमेनिड याचा समावेश होतो. त्यानंतर सायरस द ग्रेट, डॅनियल देखील ग्रेट, झेरक्स यांनी अनेक वेळा भारतावर आक्रमणं केली. हे सर्व शासक ईराणमधील हखमनी वंशाचे राजे होते. तो काळ पाचशे पन्नास इस पुर्वचा मानला जातो. त्यानंतर भारतातील आंबी राजाला हाताशी घेवून व करार करुन पुरु राजाला हारविण्यासाठी आणि भारताला लुटण्यासाठी सिंकदरही इस पूर्व तिनशे एकसस्ठमध्ये भारतावर चालून आला. मात्र पुरुनं आपल्या विरतेचा परिचय देत अलेक्झांडर उर्फ सिकंदरला असे प्रत्युत्तर दिले की त्याची जगजेत्तेपणाची आस संपुष्टात आली व तो परत गेला आणि परत जातांना वाटेतच तो मरण पावला. आपल्या देशापर्यंतही गेला नाही. त्यानंतर मोहम्मद बिन कासीमनं भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. या स्वाऱ्यादरम्यान त्यानं सिंधचं राजपालपद सांभाळलं. त्यानंच राजा दाहिरची हत्या केली होती. तो काळ सन सातशे बारा ते सातशे पंधराचा होय. मोहम्मद बिन कासीम हा पहिला मुस्लीम विदेशी आक्रमणकारी होता. त्यानंतर गझनीचा मेहमूद याने भारतावर सतरा वेळा स्वाऱ्या केल्या. या स्वाऱ्यादरम्यान त्यानं अनेक मंदिरं लुटली. गावंची गावं लुटली. कित्येक महिलांचे मंगळसूत्र लुटले व भारताला कंगाल बनविण्याचा प्रयत्न केला. परंतु भारत कंगाल बनला नाही. हा काय सन नवशे अठ्ठ्यानव ते एकवार तीसचा धरले जातो. त्यानंतर मोहम्मद घोरीनं भारतावर सन अकराशे पंच्याहत्तर मध्ये आक्रमण केलं. त्यानं बरेचवेळा भारतावर आक्रमण केले. ज्याला पृथ्वीराज चौव्हाननं त्याच्याच शहरात जावून त्याला ठार केलं. तेही त्याचाच बंदी असतांना. त्यानंतर तैमूर लंग याने भारतावर आक्रमण केलं. तो काय तेराशे अडतीसचा होय. त्याने तुघलक वंशाची राजसत्ता भारतावर स्थापन केली. त्यानंतर भारतात येणारा विदेशी आक्रमणकर्ता बाबर होय. त्यानं तर पुर्ण स्वरुपातच भारताला मुस्लीममय बनवलं होतं. बाकीचे आक्रमणकारी भारतात स्थिरावले नाही. ते भारताला लुटलूट लुटून निघून गेले. परंतु बाबर व बाबरनंतर आलेल्या तमाम शासकांनी भारतालाच आपला देश समजत इथंच वसाहती स्थापन केल्या व ते इथंच राहू लागले. त्याचं कारण होतं भारताची सोन्याची चिडीयाच असणे. बाबरानंतर भारताला पुन्हा एकदा सोन्याची चिडीया समजत इंग्रजांनी भारतावर आक्रमण करुन भारताला गुलाम बनविले.
भारत सोने की चिडीयाच होता. त्याचं कारण येथील सोनं नव्हतं की जे लुटलूट लुटून नेला आलं होतं. काही साम्राज्यांनी येथील सोना व संपत्ती लुटून नेली. ते त्यालाच सोन्याची चिडीया मानत होते परंतु मुस्लीम शासक बाबर याने येथील जमीनीला सोन्याची चिडीया समजून घेतलं. ती शेतजमीन त्यांना लुटून नेता येत नव्हती. म्हणूनच ते इथं स्थिरावले. कारण या जमीनीत तत्सम प्रकारचे मसाले पीकत होते. ज्याचा वापर स्वयंपाकात केल्या जात असे. शिवाय ते तत्सम पदार्थ टाकल्यानं भाजीला वेगळीच चवही येत असे. तसेच कित्येक प्रकारच्या औषध्या या जमीनीत उपलब्ध होत्या. हे मसाल्याचे पदार्थ व ह्या औषध्या जगात कुठेच उपलब्ध नसल्यानं भारतावर विदेशी आक्रमणं झालीत. नव्हे तर विदेशी आक्रमणकर्त्याना या देशात स्थिरावायला भाग पाडलं. हेच दिसलं पुढे इंग्रज, डच, पोर्तुगीज व फ्रेंचांना. तेही या देशावर आक्रमण करण्यासाठी आले होते. परंतु त्यांचं इंग्रजांपुढं काहीच चाललं नाही. त्यातच फ्रेंचांचं युद्ध झालं व फ्रेचांना माघार घेवून परत जावं लागलं. त्यातच बाकीच्या शत्रुंनीही इंग्रजांपुढे शरणागती पत्करली.
इंग्रजांनी भारतात राहून भारतातीलच लोकांना गुलाम केलं, राबवलं व त्याच्या हातानं निर्माण झालेला माल आपल्या देशात नेला. त्यावर प्रक्रिया करुन तोच माल आपल्या देशात आणला आणि आपल्याला घ्यायला भाग पाडलं. उदाहरणार्थ लांब धाग्याचा कापूस. त्या कापसाला आपल्या देशात नेलं व प्रक्रिया करुन त्याचं कापड बनवून ते आपल्याला विकलं. त्यानंतर जेव्हा ते भारताला सोडून गेले. तेव्हा त्या भारतातील जमीनीत सोनं पीकत होतं. त्या देशातील त्या जमीनीत सोनं पिकू नये म्हणून कित्येक जमीनीत मीठ टाकलं नसेल कशावरुन?
हे सगळं घडलं. कारण आपण मुर्ख होतो. आपण बुवाबाजीत अडकलो होतो पुर्वीपासून. आपण माणसांना माणूस समजत नव्हतो पुर्वीपासून. आपण पुर्वीपासूनच आपल्याच भारतात राहणाऱ्या आपल्याच भाऊबंदांना आपले शत्रू समजत राहिलो आणि त्यांच्याविरुद्ध इस्तेमाल करण्यासाठी विदेशी लोकांना बोलावलं. जसे अलेक्झांडरला भारतात आक्रमण करायला आंबीनं बोलावलं नव्हे तर त्यानं सिकंदरला मदतच केली. मोहम्मद बिन कासीमला ज्ञानपद व बुद्धभुषणनं बोलावलं. त्यानं अलोर किल्ल्याचा राज मोहम्मद बिन कासीमला सांगीतला. कारण त्याला राजा बनायचं होतं. परंतु त्याची अपेक्षा पुर्ण झाली नाही. मोहम्मद घोरीला राजा जयचंदनं बोलावलं त्यालाही राजा बनायचं होतं. परंतु अपेक्षाभंग झाला. इंग्रजही भारतात आले. त्यांना व्यापारी सवलती त्यावेळच्या जहांगीर बादशाहानं दिल्या होत्या. व्यापार करण्यासाठी. पुढं त्यांनी पाय रोवले. परंतु व्यापार करण्याच्या इंग्रजांना सवलती देणे म्हणजेच एकप्रकारे इंग्रजांना मदतच करणे होते. ज्यातून भारत गुलाम बनला.
इंग्रजांनी भारतात सुधारणा केल्या. त्यासाठी त्यांनी कायदेही केले. इथली सतीप्रथा बंद केली. जी प्रथा महिलांच्या तिच्या पतीच्या निधनानंतर त्याच्या शरणावर जीवंत जाळत होती. त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा अधिकार मिळवून दिला. बालविवाह प्रथा थांबवली. समाज सुधरवला. मात्र भारताला सोन्याची चिडीया ठेवलं नाही. जेवढं भारताला लुटून नेता येईल. तेवढं लुटून नेलं. शिवाय येथील जमीनीतून ते सोन्याचं उत्पन्न घेण्यासाठी असं असं केमीकल फवारलं की ज्या ठिकाणी सोनं पीकत होतं, त्या शेकडो हेक्टर जमीनी बंजर झाल्या. ज्यावेळेस भारत स्वतंत्र्य झाला होता. त्यावेळेस भारतातील कित्येक हेक्टर जमीनीवर वाळूचेच साम्राज्य पसरले होते. जिथं पुर्वीच्या काळात हरियाली असेल. परंतु त्यावरही मात करीत भारत स्वतंत्र्य झाल्यावर येथील राजकीय नेत्यांनी आपल्या अपार कष्टानं तसंच तनमनधनानं पुन्हा एकदा वैभवशाली दिवस प्राप्त करुन दिलेत. यात त्यांनी केलेली अपार मेहनत मोलाची आहे. शिवाय या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे क्रांतिकारक लढले व अल्पावधीतच फासावर गेले वा हुतात्मे झाले. त्यांचे हुतात्मपण वाखाणण्याजोगंच आहे. अवघ्या आठ वर्षात नंदूरबारचा शिरीष, घनश्यामदास, रणछोडदास, अवघ्या तेवीस वर्षाचा भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव. या व्यतिरिक्त लाला लजपतरायसारखे अनेक वीर पुरुष. या सर्वांच्या रक्तानं पावन झालेली ही भारतभुमी. याच भुमीवर काल बाजीप्रभूचं रक्त सांडले, विदेशी राज्यकर्त्यांचा प्रतिकार करतांना आणि याच भुमीवर जालियनवाला बागेत शेकडो वीर जनरल डायर नावाच्या विदेशी माणसांच्या गोळ्यांचे शिकार बनलेत. याच भुमीत राणी लक्ष्मीबाईला वीरमरण आलं अन् याच भुमीत ताराबाईनं स्वराज्य टिकवलं तरी तिला मृत्यूपर्यंत सन्मान मिळालं नाही. त्याचं कारण होतं, आपण वागणं. आपण आपल्याच माणसांशी माणसासारखं वागत नाही. तर त्यांना आपण आपलेच शत्रू समजत वागतो. व्यवहारही करतो.
विशेष सांगायचं झाल्यास आपण आपल्या माणसांशी वागतांना आपली भुमिका बदलवावी. सौहार्दपुर्ण वागावं. त्यांना शत्रू समजू नये आणि त्यांना शत्रू समजत विदेशी लोकांना आपल्याच देशात शिरण्याची परवानगी देवू नये. कारण कोणताच विदेशी व्यक्ती आपल्याला चतकोर पोळीची मदत करेल. परंतु त्याचबरोबर तो पाऊण कोर पोळी हस्तगत करण्याचा प्रयत्न करेल यात शंका नाही. तेव्हा वेळीच सावधान व्हावं. तसंच हेही लक्षात घ्यावं की भारत सोने की चिडीया होती. त्याला सोन्याचीच चिडीया बनवायचे आहे. त्यादृष्टीनंच पावलं टाकायची आहेत. त्याशिवाय भारत पुन्हा एकदा सोन्याची चिडीया बनणार नाही व भारताचे निघून गेलेले गतवैभव भारताला पुन्हा प्राप्त होणार नाही. हे तेवढंच खरं.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०