ठरल्याप्रमाणे आम्ही त्या नदीकाठच्या वड्या जवळ दुपारी दोन वाजता भेटायला आलो. मी पहिला वडाच्या झाडाखाली बसून तिची वाट पाहत होतो , इतक्यात ती समोरून येताना दिसली, आणि तिने मला पाहताच क्षणी धावत येऊन मला घट्ट बिलगली व मी ही घट्ट पकडले आणि आम्ही दोघे एकरूप होऊन एकमेकाचे चुंबन घेतले. तिने माझ्या ओठाचे चुंबन रक्त येइपर्यंत घेतले.
मग ती बोलली आता खूप झाले आपण लग्न करायचं आहे मला तुझ्याशिवाय राहवत नाही रं.
हो आपण लवकरच लग्न करायचं आहे, माझे आई वडील येणार आहेत तुझ्या घरी मग होईल सर्व काही ठीक, असे बोलून मी तिला धीर देत म्हणालो कदाचित उद्याच येतील.
काहीवेळ आम्ही दोघे तसेच मिठीत घेऊन आवेगाने चुंबन घेत राहिलो आणि मग ती बोलली आता खूप उशीर झाला तरी मला निघायला हवं घरी तिकडे बाबा यायची वेळ झाली. चल निघते मी...
दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून माझे बाबा तिच्या घरी निघाले.
तिच्या घरी पोहचले, तसे त्यांनी पाहुणचार केला, आणि मग माझ्या बाबाने विषय काढला, ते नव्हं आपल्या पोरांच काय करायचं तुझी लेक आणि माझा ल्योक एकमेकावर जीवापाड प्रेम करत्यात आणि ते काही एकमेकापासन दूर राहू शकत नाहीत. तवा म्या काय म्हणतो की त्या दोघांचं लग्न करुन टाकू. काय म्हणणं आहे तुझ.
तसा तिचा बाबा संतापला,ते शक्य न्हाय.
माझ्या बाबा : आर पर जरा इचार कर कि, त्या दोघांनी काय तर जीवच बर वाईट करून घेतलं तर.
तिची आई म्हणाली, अहो ते काय म्हणतात त्याचा नीट विचार करा आणि मग निर्णय घ्या .
मग काय सर्वत्र एकच शांतता पसरली.....
काही काळ तरी कोणीच बोललं नाही, मग थोड्यावेळाने तिच्या बापाने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, ठीक आहे आहे मी तयार आहे या दोघांच्या लग्नाला, तू मुहूर्त बघ साखरपुड्याचा आणि लग्नाचा.
जसे माझे बाबा घरी आले तसेच लगेचच मी विचारलं की, काय झालं? बाबा म्हणाले हो बोलले ते तुझ्या लग्नाची आणि साखरपुड्याचे तारीख काढायला सांगितली आहे, ते शब्द ऐकल्यावर मला खूपच आनंद झाला . मी आनंदाने नाचू लागलो, बाबा समोर नाही बर का .. माझ्या खोलीत.
अहो ऐकलंत का ... माझ्या आईने हाक मारली. ते बघा तुमचा ल्योक खुळ्यागत नाचायला लागला हाय... हा.. हा... हा.. आईने हसत हसत सांगितलं, तसा म्या जरा बावरलो. आणि एकदम सगळेच हसू लागलो...
"अहो तारीख जवळचीच बघा भटजी कडे जाऊन" आई म्हणाली .
म्हं, ठीक आहे, आजच सांचाला जातो भटजिकडे आणि मुहूर्त बघून घेतो.
तिकडे ही असच वातावरण असेल, आणि ती हि खुप खुशअसेल असे वाटत होते. मी म्हटलं उद्या सकाळी तिला जाऊन भेटतो... नको तारीख ठरुदे मग ठरलेली तारीख सांगायला बाबांसोबत जातो.
संध्याकाळी बाबा गेले भटजी कडे. ....
मी वाट पाहत बसलो होतो, कधी बाबा येतील आणि कोणती तारीख सांगितली असेल असे विचार करत होतो, हे विचार करतं मी कधी झोपलो ते कळलंच नाही.
सकाळी उठल्यावर मी खोलीच्या बाहेर आलो आणि आईला विचारलं, बाबा कोठे आहेत, ती म्हणाली शेतात गेलेत.
आई तुला सांगितली का तारीख बाबांनी.
तसा आईचा स्वयंपाक खोलीतून आवाज आला, अरे नाही मला सांगितलं, आल्यानंतर सांगतील.
बाबा घरी आले , मी बसलो होतो वाट पाहत लगेच विचारलं बाबा काय तारीख काढली लग्नाची.
अरे मला हात पाय तरी धू दे . हात पाय धुतल्यानंतर सांगितलं जवळची तारीख काढली हाय येत्या महिन्यात २ तारीख.
२ तारीख ही तर १५ दिवसावर हाय अजून , ठीक हाय, मग आज गेले पाहिजे त्यांना सांगायला.
म्ह .. होय जायला हवं लगेचच आज निघू सायंकाळी पाच वाजेपर्यंत तू पण चल......
सायंकाळी पाच वाजता आम्ही दोघे निघलो तिच्या घरी तारीख सांगायला आणि पुढची बोलणी करण्यासाठी.
To be continued......