Mala Spes Habi Parv 2- 23 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व २ भाग २३

Featured Books
Categories
Share

मला स्पेस हवी पर्व २ भाग २३

मला स्पेस हवी पर्व २ भाग २३

मागील भागात आपण बघीतलं की नेहा आता रमणला रोखठोक ऊत्तर द्यायचं ठरवते. आता पुढे बघू


रमणला आपण एवढं समजावून सांगितलं आहे खरं पण त्याच्या वागणूकीत काही फरक पडेल का? याविषयी छकू जरा संभ्रमात असते.

छकू विचार करत असते आणि आपलं काम करत असते तेव्हाच रमण येऊन तिला म्हणाला ,

“ छकू माझी चूक मला कळली आहे.‌मला क्षमा करशील? तेवढी संधी देशील?”

“ रमण क्षमा मागणारा कधीच लहान नसतो. तुला तुझी चूक कळली आहे हे ऐकून मला आनंद झाला.”

छकूने अलगद त्याचे हात हातात घेतले.तसा रमण गहिवरला आणि त्याने छकूला घट्ट मिठी मारली. यावरून छकूच्या लक्षात आलं की रमणला खरच त्याची चूक कळली आहे.

छकू रमणच्या पाठीवर हळूहळू थोपटत होती. इथे शब्दांचा आधार घ्यायची दोघांनाही गरज पडली नाही. रमणच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहत होत्या आणि छकूचे हात रमणच्या पाठीवरून हळुवार पणे फिरत होते.

यावेळी शब्दांचे बुडबुडे काहींच काम करू शकले नसते. स्पर्शआणि अश्रू त्यांची भूमिका चोख बजावत होते.

जरा वेळाने रमणचे हुंदके थांबले तसं छकूने त्याची मिठी हळूच सोडवली आणि त्याचा हात धरून खुर्ची वर बसवलं शेजारी छकूही बसली.

“ रमण जे झालं ते विसरून जा. तुझ्या अशा वागण्यामुळे नेहाला मात्र त्रास झालाय हे तुझ्या लक्षात आलंय का?”

“हो. मी असा कसा वहावत गेलो मलाच कळलं नाही.”

“ रमण तू दिसायला मुळात देखणा आहेस. बायकांना अशा देखण्या पुरूषाशी मैत्री करायला आवडतं. तू मैत्री करावीस म्हणून त्या तू न मागता तुला सगळं काही द्यायच्या. त्यांनाही नैतिकतेशी काही देणं घेणं नसायचं म्हणून मीही तुमच्या मैत्रीकडे फार लक्ष दिलं नाही किंवा त्यावरून आकांड तांडव केलं नाही. पण जेव्हा नेहाला भेटले तेव्हा मलाच खूप लाजीरवाणं झालं.”

“ का? “

रमणने आपले डोळे पुसत विचारलं.

“ रमण नेहा तुझ्या इतर मैत्रिणींसारखी नाही हे माझ्या लक्षात आलं. तिचा चेहरा किती शांत आहे.तिच्या बोलण्यात एक ठहेराव आहे. मी रमणची बायको आहे हे सांगितल्यावर तिची काही वेगळी धडपड मला दिसली नाही. तुझ्या इतर मैत्रीणींपैकी ती एक पद्मा म्हणून आहे नं?”

“ ती कुठे भेटली तुला?”

रमणच्या चेहऱ्यावर भिती उमटली.

“ घाबरू नकोस. मी आणि पज्ञ्मा अचानक भेटलो एका कार्यक्रमात. जवळच बसलो होतो.कार्यक्रमाबद्दल बोलत असताना मी जेव्हा माझं नाव सांगीतलं तेव्हा ती दचकली. मी तिला माझं पूर्ण नाव मुद्दाम सांगीतलं कारण तुम्हा दोघांना मी छान हातात हात घालून जाताना एकदा बघीतलं होतं.”

“ ती काय बोलली? तुझा अपमान तर नाही केला नं?”

रमणला छकूच्या अपमानापेक्षाही त्याने आणि पद्मा ने ज्या पुढच्या पायऱ्या ओलांडल्या होत्या त्याबद्दल छकूला पद्माकडून कळलं नाही नं ही काळजी होती.

छकू रमणच्या मनातील विचारांबद्दल अनभिज्ञ होती.

” नाही. तिने माझा अपमान नाही केला. पण तिच्या बोलण्या वागण्यातून तिचं रमण शहाबरोबर असलेलं अफेअर लपविण्याचा तिचा प्रयत्न चालू असल्याचं लक्षात येतं होतं. तू तिचा गैरफायदा घेतलास त्याबद्दल मला काही राग आला नाही कारण तीही तशीच आहे. तू सुद्धा वाहत्या गंगेत हात धुवून घेणारा आहेस ही गोष्ट तू नाकबूल करू शकणार नाही. हो नं?”

छकूच्या या प्रश्नावर रमणला तिच्या डोळ्याला डोळा भिडवणं कठीण झालं. मान खाली घालूनच रमणने हो म्हटलं. त्यावर छकू म्हणाली,

“ रमण मला नेहासाठी तुझा राग आला कारण नेहा सच्ची आहे. ती तुझ्या देखण्या रूपावर भाळली नाही. तिच्या आयुष्यात तू वादळ निर्माण केलं हे मला आवडलं नाही. “

“ छकू तू म्हणतेस मी फ्लर्ट आहे. खरच मला छान दिसणा-या बायका भेटल्या की मी स्वतःला आवरू शकत नाही. त्यात या सगळ्या मी न मागता सगळं काही मला द्यायला तयार असायच्या मग मी कशाला नाही म्हणू? मी म्हणून त्यांना माझ्या मूडप्रमाणे फियवायचो पण यांच्यात मी कधी गुंतलो नाही जितका नेहामध्ये गुंतलो.”

यावर छकू गालातल्या गालात हसली.तिच्या हसण्यामागचं कारण न कळल्याने रमण संभ्रमात पडला.

“ तू का हसलीस?”

“ रमण तू नेहामध्ये गुंतला नाहीस. इतर बायकांसारखी नेहा तुझ्या मागे लागली नाही.तुला स्वतःहून सर्वस्व अर्पण करायला तयार झाली नाही यामुळे तुझा अहंकार दुखावला आणि तू जबरदस्ती तिच्या मागे पडलास.”

“ छे: असं नाही.”

“ असंच आहे. इतर बायका माझ्या रूपावर भाळतात ही का भाळली नाही आणि आपल्या मागे का आली नाही हे तुझं दुःख होतं. स्वतःचं दुःख लपवत तू तिला आपल्या कह्यात आणण्यासाठी हे सगळं केलंस आणि स्वतः आजारी पडला. कुठेतरी काहीतरी चुकतंय,नेहा माझ्या तावडीत का येत नाही याचा शोध तू घेत राहीलास. हे करताना तुझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष झालं.”

“ असं नाही.मी खरच प्रेम करायला लागलो.”

“ रमण आतातरी सत्य स्विकार. अहंकारापोटी स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करून घेऊ नकोस. कळतंय का तुला?”

“ हो.”

रमण खूप निराश नजरेने छकूकडे बघत म्हणाला.

“ मला तिच्याशी बोलायला आवडतं. “

“ तू जर तुझी आवड मनातच ठेवली असती, तिला रिस्पेक्ट दिला असतास तर ती नेहमी तुझ्याशी खूप छान बोलली असती हे मी जितक्या वेळ तिच्या बरोबर होते तेवढ्यावरून मला तिच्या बद्दल हा अंदाज आला त्यावरून तुला सांगतेय.”

“ आता मी काय करू?”

“ नेहाला विसर. ही एक विचित्र फेज तुझ्या आयुष्यात आली होती हे कबूल कर आणि पुढे जा. तुझ्या बरोबर मी इतकी वर्ष संसार केला आणि तू नेहासाठी स्वतःचं अस्तित्व विसरून वेड्या सारखं वागतोय हे बघितल्यावर रमण मला खूप वाईट वाटलं. माझ्या प्रेमाचा तू अपमान केला आहे असं वाटलं. आता जागा झाला आहेस तर वेळेवर मागे परत आपल्या संसारात परत ये. यापेक्षा मी जास्त काही बोलणार नाही.”

छकू एवढं बोलून निघून गेली. छकू आणि रमणचं संभाषण आपल्या खोलीच्या दाराआड उभ्या असलेल्या दिशाने ऐकला आणि तिला आपल्या आईचा अभिमान वाटला.

‘किती छान पद्धतीने आईने बाबांची चूक दाखवून दिली. नुसती चूक दाखवली नाही तर त्यावर उपाय पण सांगीतला. आई किती ग्रेट आहे. आपल्या नव-याच्या आयुष्यात दुसरी कोणी स्त्री आहे हे कळल्यानंतर एखादी बाई चिडली असती आपल्या नव-यावर. आई एकदम कूल होती बाबांशी बोलताना. बाबा तुम्ही आईनं सांगीतलं आहे तसं वागा हो. तुमच्या प्रेमावर फक्त एकट्या आईचाच बायको म्हणून अधिकार आहे.’


दिशा बराच वेळ दाराशी उभी होती. अचानक रमण उठला आणि आत गेला. आता खोलीबाहेर यावं असा दिशा मनाशी विचार करत असतानाच तिला रमण तयार होऊन खोलीबाहेर आलेला दिसला.
‘ आता अचानक कुठे चाललेत बाबा?’
दिशाला प्रश्न पडला.
रमण पायात चप्पल घालून घराबाहेर पडला.

रमणला अचानक घराबाहेर जाताना बघून दिशाला प्रश्न पडला.रमण रागाने तर घराबाहेर नाही गेला. रमण रागाऊन गेला असेल तर आपल्या जीवनाचं बरं वाईट तर नाही करणार? ही भीती दिशाला वाटली. ती लगेच छकूकडे गेली.

“आई बाबा इतक्या घाईने बाहेर कुठे गेले?”

काम करता करता छकूने विचारलं

“कुठे गेले? मला कसं माहित असणार? तुला माहिती आहे नं की तुझे बाबा बाहेर जाताना कधी सांगून जात नाहीत.”

“आई बाकी वेळेस मला काही वाटलं नसतं पण आत्ता मी तुमचं दोघांचं बोलणं चोरून ऐकलं साॅरी. बाबा लगेच बाहेर गेले म्हणून भीती वाटते आहे.”

दिशाने एका दमात सांगीतलं. दिशांचा कावरा बावरा चेहरा बघून छकुने हातातील काम बाजूला ठेवून दिशाला जवळ घेऊन म्हणाली,

“ घाबरू नकोस तुला जसं वाटत तसं बाबा काहीही करणार नाही. तू टेन्शन घेऊ नको.”

“ आई खरच नं?”

“ हो.”
छकूने दिशाला शांत केलं.
__________________________________
कुठे गेला असेल रमण एवढ्या घाईने?