mala spes habi parv 2 bhag 8 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व २ भाग ८

Featured Books
Categories
Share

मला स्पेस हवी पर्व २ भाग ८

मला स्पेस हवी पर्व २ भाग ८

मागील भागात आपण बघीतलं की रमण ला बरं नाही आता बघू पुढे काय होईल.


दिशाने डाॅक्टरांना फोन करून रमणची अवस्था सांगितली. डॉक्टर अर्ध्या तासाने घरी आले तोपर्यंत पलंगावर कसंबसं दिशा आणि छकुलीने रमणला उचलून ठेवलं होतं. रमणकडे बघून छकुला रडायला येत होतं. नेमकं काय झालं असेल रमणला तिला कळत नव्हतं. अर्ध्या तासाने डॉक्टर आले. त्यांनी रमणला तपासलं. ते म्हणाले

“रमणला कसला ताण आलाय?”

“ माहिती नाही.मला काहीच माहित नाही महिनाभर
झाला हे असेच विचित्र वागतात आहे.”
छकू म्हणाली.


“ तेच म्हणतोय महिन्याभरापूर्वी माझ्याकडे ते आले होते त्यापेक्षा फार तब्येत सुधारली नाहीये. नेमकं कसला ताण आहे? ऑफिसमध्ये काही गडबड आहे का?”

यावर छकु म्हणाली,

“ नाही तसं तर काही नाही. कारण ऑफिसमध्ये काही असतं तर ऑफिसमधून फोन आला असता. मला तसा फोन काही आला नाही किंवा रमणपण मला काही बोलला नाही.”

डॉक्टर म्हणाले,

“मी तुम्हाला औषध लिहून देतो. रमणला एक इंजेक्शन देतो. थोड्या वेळानी ते शुद्धीवर येतील. ते शुद्धीवर आल्यावर त्याला काही फार विचारू नका. त्यांना जेवणानंतर हे औषध द्या मग उद्या सकाळी बघू कसं वाटतंय”


“ठीक आहे. “

छकू म्हणाली. डॉक्टर निघून गेले. दिशांनी विचारलं ,

“आई काय झालं बाबांना नेमकं? महिना झाला बाबा असेच विचित्र वागतात आहे.”

“ आता उद्या ऑफिसमध्ये सकाळी फोन करून एक रमण येणार नाही म्हणून सांगितलं पाहिजे आणि ऑफिसमध्ये नेमकं काय चालू आहे हे विचारलं पाहिजे. यांची तब्येत अचानक अशी का बिघडली हे कुठून शोधून काढायचं मला काही कळत नाही.”

दिशा म्हणाली,

“ मला पण कळत नाही.”

असं म्हणून दिशा खोलीत निघून गेली. छकु किती तरी वेळ रमणकडे बघत तिथेच बसून राहिली. तिला आता खरोखर काळजी वाटायला लागली. काय झालं हे आपल्याला सांगत नाही. आहे.

रमणला का झालंय? डॉक्टर पण काही बोलत नाहीये. काय करावे बराच वेळ विचार करून छकु रमणच्या अंगावर नीट पांघरूण टाकून स्वयंपाक घरात गेली.

डॉक्टरांनी तो उठल्यावर सूप करून द्यायला सांगितलं हे लक्षात ठेवून ती सूप करायला स्वयंपाक घरात गेली.


जरा वेळाने छकु रमण कडे गेली. रमण अजूनही झोपलेलाच होता. छकुने त्याला हळूच हाक मारली तेव्हा झोपेतच रमण बडबडला,

“ नेहा तू आलीस ?”

ते ऐकून छकु चमकली. रमण पुन्हा गडबडला,

“ नेहा तू आलीस किती छान झालं. आता माझी तब्येत लवकर सुधारेल. तू अशी माझ्यावर रुसून जाऊ नकोस. मी खरंच तुझ्या प्रेमात पडलो आहे. प्लीज मला समजून घे.”

रमणचं हे बोलणं ऐकून छकुच्या पायाखालची जमीन सरकली. ती पुढे काहीच न बोलता बाहेर आली आणि सुन्नपणे सोफ्यावर बसून राहिली. तिला कळेना ही नेहा कोण आहे? रमण नेहाच्या प्रेमात कधी पडला? किती दिवसांपासून हे चालू आहे? मला कसं कळलं नाही?


रमण पुष्कळदा खुश दिसायचा पण छकूने फार खोलात जाऊन बघितलं नाही. पण आज तिच्या मनात आलं की जर या नेहामुळे रमण असा आजारी झाला आहे तर मला याच्या लक्ष घालायला हवं.

आपल्या ऑफिसमध्ये आहे का ही हे आधी उद्या ऑफिसमध्ये जाऊन बघितलं पाहिजे. छकुच्या डोक्यात बरेच विचार सुरू झाले तिच्या मनात हे पण आले मी कुठे कमी पडले की इतक्या वर्षांच्या संसारानंतर रमण एका मुलीच्या प्रेमात इतका वेडा झाला आहे की त्याची गत अशी झाली आहे. काय करावे ?छकुला कळेना पुन्हा कोणापाशी आपलं दुःख बोलावं हे तिला कळेना कसेबसे डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसून ती पुन्हा रमणच्या खोलीत गेली.


रमणला हळूच हलवून तिने जागं केलं. केसांमध्ये हळूच हात फिरवत म्हणाली,

“ रमण उठतोस का ?काय झालं? डॉक्टरांनी तुला सुप प्यायला सांगितलं आहे.”

रमणला कळलंही नाही की आपण जे बोललो ते छकुलीने सगळं ऐकलं आहे. तिला नेहा बद्दल कळलं आहे. हळूच डोळे उघडून रमणने छकुलीकडे बघितलं. छकु म्हणाली,

“ उठून बसतो का तुझ्यासाठी मी टोमॅटो सूप केलं आहे.”

यावर रमण म्हणाला,

‘ नको काही खावस वाटत नाही.”

छकु म्हणाली,

“ अरे खाल्लं नाहीस तर बरा कसा होणार ?महिना झाला तू अशाच थकलेल्या अवस्थेत ऑफिसमध्ये जातो आणि काम करतो. आज तुला मगाशी खूप त्रास झाला तू बेशुद्ध झाला होतास. तुला आठवतंय का?”


आपण बेशुद्ध झालो होतो हे कळल्यावर रमणला आश्चर्य वाटलं. तेव्हा छकुलीने हळूच त्याच्या डोक्याखाली हात देऊन एक हात पकडून हळूहळू उठून बसवलं. तेवढं बसल्यानेही रमण थकला पण सूप पिणं आवश्यक होतं म्हणून त्याच्या मागे बऱ्याच उषा ठेऊन त्याला भिंतीला टेकून बसवलं आणि म्हणाली,

“ मी पटकन सूप घेऊन येते. तू नीट बस. पलंगावरून उतरायचा प्रयत्न करू नको. थकवा आहे.”

यावर मानेने हो म्हणत रमणनेपुन्हा डोळे मिटले.छकु स्वयंपाक घरात गेली. तिने टोमॅटो सूप थोडसं गार करून बाऊलमध्ये आणलं आणि मनाशी ठरवलं की सध्या त्याची तब्येत ठीक नाही तेव्हा त्याची काळजी आपण घ्यायची तो मघाशी जे बोलला त्याच्यात काय सत्य आहे काय नाही याचा तपास रमणच्या नकळत केलं केला पाहिजे हे तिन्ही मनाशी ठरवला


रमणला एक एक चमचा सूप देताना ती कटाक्षाने वाईट विचार मनात येणार नाही याची काळजी घेत होती. म्हणून ती सारखी जप करत होती. कारण तिला माहिती होतं खाण्यापिण्याच्या वेळेला जर आपला राग मनात व्यक्त केला तर तो जेवणात उतरतो. पेशंटच्या अंगाला ते अन्न लागत नाही म्हणून जे काही विचार मनात आणायचे ते नंतर असं तिनं ठरवलं होतं.


सूप भरवताना सहजच ती इकडचं तिकडचं बोलत होती. तसं बोलण्यात तिला इंटरेस्ट नव्हता पण रमणची तब्येत बघून ती तसं वागत होती. रमण जिथे जमेल तिथे हं..हं असे हुंकार देत होता. जास्त बोलण्याची त्याची इच्छा नव्हती आणि त्याच्या ताकद पण नव्हती. सूप पिऊन झाल्यावर तिने विचारलं

“ रमण थोडा वेळ बसायचं आहे का की झोपतो आहे ? दमला असशील तर जेवताना उठून बस.


यावर त्यानी मानेनेच हो म्हणून सांगितलं.

“मला झोपायचं आहे “ असं अगदी हळू आवाजात छकुला सांगीतलं .

त्याला हळूच एका हाताला धरून मागच्या सगळ्या उषा तिने बाजूला काढल्या मग एका हाताला धरून त्याला हळूहळू खाली झोपवलं. त्याला जसं खाली झोपवलं तसं त्याच्या अंगावर पांघरून टाकून छकू सुपचं बाऊल घेऊन जाताना रमणला,

” टिव्ही लावू का “

असं विचारलं पण आज रमणला टीव्ही बघण्याची सुद्धा इच्छा नव्हती. छकुला मात्र खूपच ताण आला कारण त्याची तब्येत अशी कशामुळे झाली याचं खरं कारण तिला कळलं होतं त्यामुळे ती फार मनातल्या मनात कोसळली होती.

छकु स्वयंपाक घरात निघून गेली. दिशा खोलीतून बाहेर आली आणि तिने आईला विचारलं,

“ आई बाबा उठलेत का?”

छकुने मानेनेच हो म्हटलं आणि तिने पटकन दिशाकडे पाठ केली. आपल्या डोळ्यातील पाणी दिनाला दिसू नये असं तिला वाटलं.काहीतरी संशय आला म्हणून हळूच दिशाने आईकडे जवळ जाऊन बघितलं तर छकुच्या डोळ्यातून पाणी येत होतं तेव्हा दिशा म्हणाली,

“ आई डॉक्टर येऊन तपासून गेले आहेत. तू का एवढा ताण घेते आहेस?”


यावर काहीच न बोलता छकु नुसतीच डोळे पुसत बसली
“ बाबा उठले असतील तर मी बोलून येते.”

असं म्हणून दिशा बेडरूम मध्ये गेली. रमण डोळे मिटून झोपला होता. त्याला बघून दिशांनी विचारलं,

“बाबा तुम्ही जागे आहात का?”

तर रमणने डोळे उघडून दिशाकडे बघितलं आणि हसला. यावर दिशा म्हणाली,


“ बाबा आता आराम करा. तुम्ही मगाशी आम्हाला घाबरवून सोडलं होतं .”

यावर रमणने हातानेच काय झालं विचारलं. यावर दिशा म्हणाली

“बाबा तुम्ही बेशुद्ध पडला होता. तुम्हाला काहीच आठवत नाही का?”

तर रमण म्हणाला,
“ नाही मला काहीच आठवत नाही. मी तिथे बाल्कनीत बसलो होतो. मला छकु चहा आणून देणार होती. मग काय झालं मला कळलं नाही.”

“आई तुम्हाला चहा देणार होती का. मला माहितीच नाही. मला आईचा ओरडण्याचा आवाज आला आणि एकदम तुम्ही बेशुद्ध पडलेले दिसले. यावर रमण म्हणाला,

“ मला पण माहित नाही ग मी बेशुद्ध कधी पडलो?”
“ बाबा‌ आता तुम्ही फार विचार करू नका आणि जमलं तर उद्या ऑफिसला जाऊ नका. आपल्या ऑफिसमध्ये तुम्ही नसताना कोण काम सांभाळतो?”

यावर रमण म्हणाला,

“ सावंत सांभाळतो. अग पण त्याला किती दिवस सांगायचं? आत्ताच बरेच दिवस तो ऑफिस सांभाळत होता.”


यावर दिशा म्हणाली,
“बाबा सावंत आपल्याकडे नोकरी करतो ना? आपण तसा पगार देतो ना त्याला .मग त्यांनी हे काम केलं पाहिजे आणि आता तुम्ही आजारी आहात तेव्हा तर त्याने काम केलंच पाहिजे. तुम्ही आराम करा.”

असं म्हणून दिशा बाहेर निघून गेली. दिशाचं बोलणं ऐकल्यावर रमणला असं वाटलं की आपण इतकं कसं थकलो? काहीच करू शकत नाही.

दिशा आपल्या खोलीत गेल्यावर रमण पुन्हा डोळे मिटून बसला. तेवढ्यात त्याच्या कानावर पुन्हा हसण्याचा आवाज आला. आता कोण हसतय? हे बघण्या साठी त्यानी डोळे उघडले तर समोर कोणीच नव्हतं.तेवढ्यात त्याला आवाज आला,

“मी तुझा दुसरा आवाज बोलतोय.ओळखलं नाही ?”

यावर रमण चिडला .यावर दुसरं मन म्हणालं

“ तुला चिडायला काय झालं ?तुला माहिती आहे का तू आत्ता बेशुद्ध होतास.थोडा शुद्धीवर आल्यानंतर नेहा बद्दल बोललास. नेहाच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला आहेस हेही बोललास. छकूने सगळं ऐकलं आहे.”

“ काहीतरी बोलू नको मी नेहाचं नाव नाही घेतलं.”

यावर दुसरा मन म्हणालं,

“ अरे तुझ्या बायको समोर तू नेहा बरोबर सुरक्षित वाटतं असं बोललास. आता काय करशील?”

“ हे बघ तू मला सारखा त्रास द्यायला येतोस. बाकी तुला दुसरं काय येतं ?”

यावर दुसरा मन म्हणालं,
“ मला बरच काही करता येत. सध्या तुला मी नकोसा झालोय पण लवकर या प्रेमप्रकरणातून बाहेर ये.”

“मला आता झोपू दे. पुन्हा त्रास देऊ नको. “

हे रमणचं वाक्य तो जोराने बोलल्यामुळे त्याचवेळी खोलीत आलेल्या छकूच्या कानावर पडलं. ती निराश झाली. हे वाक्य त्याने आपल्या मनालाच म्हटलं आहे हे तिला कसं कळेल? तिला वाटलं नेहा विषयीच बोलतोय.

आता ही नेहा कोण आहे हे लवकरच शोधायला हवं हे मनात ठरवून दारातूनच मागे परतली.
_________________________________