Nikita raje Chitnis - 2 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | निकिता राजे चिटणीस - भाग २

Featured Books
Categories
Share

निकिता राजे चिटणीस - भाग २

निकिता राजे  चिटणीस

पात्र  रचना

 

1.       अविनाश ͬचटणीस                         चंदन इंजीनीǐरंग चे मालक

2.       नीतीन चीटणीस           अविनाश चिटणीसांचा मुलगा

3.       निकीता चटणीस           नितीन ची बायको

4.       शशीकला ͬचटणीस          नीतीन ची आई

5.       रघुनाथ (मामा) राजे        निकीताचे मामा

6.       पार्वती ( मामी )राजे       निकीता ची मामी

7.       मुकुंद देशपांडे             अविनाश चिटणीसांचे मित्र

8.       अनंत दामले             मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  

 

 

भाग  २

भाग 1 वरून पुढे  वाचा ..........

अनंत दामले

“जर सूज वाढली आणि आतमध्ये pus झाला तर मग अपेंडिक्स फुटण्याची शक्यता वाढते. आणि मग या परिस्थितीत जीवन मरणाचा संघर्ष सुरू होतो. मघाशी नितीन म्हणाला त्या प्रमाणे, औषधे देऊन इन्फेक्शन कमी नक्कीच करता येईल. आणि हे सर्व आताही करूच पण हे सर्व सुरवातीच्या स्टेज ला ठीक असत प्रादुर्भाव वाढल्यावर ऑपरेशन करून अपेंडिक्स काढून टाकणे हेच श्रेयस्कर असत. आता असह्य वेदना होताहेत म्हणजे आपल्या पेशंट ची स्टेज, ही पुढे गेलेली आहे असा आमचा अंदाज आहे म्हणून ऑपरेशन जरूरी आहे असा आम्हाला वाटतंय.”

डॉक्टर थांबले, सर्वांवरून नजर फिरवून समजतंय का हे बघितलं, आणि पुढे सांगायला सुरवात केली. “आणि ही लॅपरोस्कोपीक सर्जरी असते. अर्ध्या  इन्चाचा एक आणि पाव इन्चाचे दोन असे तीन छिद्र असतात त्यामधून कॅमेरा आणि instruments घालून अर्ध्या तासात ऑपरेशन आटोपतं. अर्थात ओपन केल्यावर जर काही कॉमप्लीकेशन  आढळले तर पूर्ण ओपन करून ऑपरेशन करावं  लागतं. आणि हा निर्णय तेंव्हाच ताबडतोब, करावा लागतो. पेशंटच्या नातेवाईकांशी चर्चा  करायला वेळ नसतो. आता हे कन्फर्म करण्यासाठी सी टी स्कॅन किंवा अल्ट्रासाऊंड अशा tests कराव्या लागतात. आपल्याकडे सी टी स्कॅन ची सोय नाही पण सोनोग्राफी होईल. त्यासाठी डॉक्टर भारद्वाज येताहेत. त्यांना आणायला केंव्हाच गाडी पाठवली आहे. ते आता येतच असतील.”

तेव्हडयात नर्स आलीच. “सर,  डॉक्टर भारद्वाज आले आहेत.”

“आलेत, गुड लगेच पेशंट ला सोनोग्राफी ला घ्या.” – डॉक्टर.     

“सर, त्यांनी काम सुरू केलंय.” – नर्स  

“ओके” – डॉक्टर.

“डॉक्टर जर सोनोग्राफीत काही निघाल नाही तर ऑपरेशन टाळता येईल ?” नितीनने विचारले.

“अस बघा आता ज्या कंडिशन मध्ये पेशंट आहे त्यावरून प्रॉब्लेम अपेंडिक्स चा आहे का गॉल ब्लॅडर चा की आंतडयाचा, हे सोनोग्राफी मध्ये क्लियर होईल. तेंव्हा जरा धिराने घ्या. मी तुम्हाला घाबरवत नाहीये. पण तुम्हाला वस्तुस्थिती माहिती पाहिजे. आणि आता तुम्ही हॉस्पिटल मध्ये आला आहात तेंव्हा काळजी करण्याच काहीच कारण नाही. आम्ही आहोत. चिंता करू नका”– डॉक्टर.

डॉक्टर पुनः आत गेले आणि आम्ही हॉल मध्ये. चेहऱ्यावरचे काळजीचे ढग जास्तीच काळवंडलेले. नितीन हादरला होता. त्याला धीर देणं आवश्यक होत. मी मुकुंदरावांकडे नजर टाकली त्यांनाही असंच वाटत असाव. त्यांनी नितीनच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्याच्या जवळ बसले. “नितीन, बाळा नको करूस एवढी चिंता, आपले डॉक्टर हे फार अनुभव संपन्न  आहेत. पंचक्रोशीमध्ये  त्यांच्या तोंडीचा दूसरा डॉक्टर नाहीये. पूर्णपणे पारदर्शक व्यवहार आहे म्हणूनच पूर्ण डीटेल मध्ये मघाशी समजाऊन सांगितले. तुलाही कळलं की आपण नेमक्या कुठल्या परिस्थितीत आहोत. तेंव्हा डॉक्टर काय म्हणाले त्यावर विचार कर आणि थोडा रीलॅक्स हो. कॉफी घेणार ? या हॉस्पिटल मध्ये कॉफी मशीन आहे. घेणार ? थोड फ्रेश वाटेल.”

मी कॉफीच आणायला गेलो होतो पटकन नितीनच्या हातात मग ठेवला. आमची कॉफी पिऊन झाली होती. नितीनच्या हातात कप तसाच होता कुठे तरी शून्यात नजर. मी आणि मुकुंदराव एकमेकांकडे बघत होतो. काय करांव, काही तरी करून त्याला मनोधैर्य वाढवणं आवश्यक होत. “अरे नितीन तुझी कॉफी बघ थंड झाली. दुसरी आणू का ?” – मुकुंदराव म्हणाले.  

एक नाही अन दोन नाही.

मुकुंदराव मुकाट्याने उठले आणि कॉफी घेऊन आले. “घे कॉफी घे. आणि एक लक्षात घे की अपेंडिक्सच ऑपरेशन म्हणजे खूप सिरियस अस काही नसत. जर ते आतल्या आत फुटलं, तर मग त्या परिस्थितीत ते क्रिटिकल झालं असत, पण निकिताची केस तशी नाहीये. डॉक्टर मघाशी म्हणाले ना, की परिस्थिती हाता बाहेर गेलेली नाहीये म्हणून. शांत हो आणि कॉफी घे म्हणजे बर वाटेल. घे घे नाही तर पुन्हा थंड होईल.”

कॉफी घेतल्यावर जरा तरतरी आली. त्याचा चेहराही  जरा उजळला. आम्हालाही  बरंच वाटल.

“अरे आई बाबांना फोन केलास का, तिच्या मामांना कळवलस का?” मुकुंदरावांनी विचारल

“बापरे हे तर मी विसरलोच होतो, my god!  आत्ता लावतो फोन.” नितीन म्हणाला, आणि उठलाच.

“हे बघ जरा शांतपणे आणि डॉक्टर जे काही बोलले ते नीट सविस्तर सांग. त्यांनाही पूर्ण कल्पना दे.” – मी म्हणालो.  

“हो.” – नितीन.  

“मुकुंदराव आई वडिलांच्या ऐवजी मामांना  का ?”

“अहो तिला आई वडील नाहीयेत मामांनीच तिला वाढवलय.” - मुकुंदराव

“ओह, सॉरी. मी विचारायला नको होतं.”

 

नितीन चिटणीस

 

मुकुंद काका म्हणाले, आणि लक्षात आल, चुकलच जरा. पण गेले तासभर जी गडबड चालली होती, त्यामुळे डोक कामच करेनास झाल होतं. किती वाजले .. पहाटेचे चार, म्हणजे आई बाबा गाढ  झोपेत असतील. काकांनाच विचारतो.

“काका चार वाजले आहेत. आत्ता करू फोन ?

“अरे लगेच कर ही वेळ रात्र किंवा दिवस पाहायची नाहीये.” अनंत राव म्हणाले.

“एकदम बरोबर अनंतराव.” मुकुंदरावांनी दुजोरा दिला.

“Ok”

“हॅलो” मामांनी फोन उचलला.

“हॅलो मामा मी नितीन बोलतोय”

“कोण नितीन ? आणि एवढ्या रात्री काय आहे ?” – मामा.

“अहो मी नितीन चिटणीस, ओळखल का ?”

“अरे बापरे नितीन ! एवढ्या रात्री ? काय झालं ? सगळं ठीक आहे ना ?” एवढ्या रात्री नितीनचा म्हणजे जावयाचा फोन आल्यामुळे जरा हादरले होते.

“काहीच ठीक नाहिये मामा. निकिताला अपेंडिक्स चा अटॅक आला आहे आणि तिला अॅडमिट केलंय.”

“बापरे,” मग आता? कुठे पुण्यालाच न?” मामांनी विचारलं.

“नाही. आम्ही इथे मुकुंद काकांकडे आलो होतो त्यांच्याचकडे त्रास व्हायला लागला आणि इमर्जनसी म्हणून इथल्याच राजवाडे हॉस्पिटल मध्ये अॅडमिट केलंय. तिला सोनोग्राफी करायला नेलय. नंतर ऑपरेशन करतील आणि अपेंडिक्स काढून टाकणार आहेत.” मी मामांना सविस्तर सांगितलं.

“अरे देवा महिना झाला लग्नाला जेमतेम आणि हे काय. विठ्ठला तूच आहेस रे

बाबा. तूच पोरीला सांभाळून घे.” मामांनी देवाला हात जोडले.

“मामा काळजी नका करू मी आहे, मुकुंदकाका आहेत आणि शेजारचे दामले काका पण आहेत. त्यांच्याच गाडीतून निकिताला हॉस्पिटलला आणल.”

“चला ते दोघ आहेत हे बर आहे. तू खंबीर रहा. आम्ही तिकडे कसं यायच ते बघतो.” मामा आता निघायच्या तयारीत.

“नको मामा तुम्ही सध्या इतकी धावपळ करू नका. औरंगाबाद खूप दूर आहे. शिवाय पावसा पाण्याचे दिवस आहेत. त्रास होईल तुम्हाला खूप. मी सांगतो नंतर. बर आता ठेऊ ? बाबांना पण फोन करायचाय. ठेवतो.”

“हॅलो” अविनाश चिटणीसांनी फोन उचलला.

“हॅलो बाबा मी नितीन बोलतोय.”

“काय रे काय झालं ? इतक्या रात्रीचा फोन केलास.?” - अविनाश चिटणीस  

“निकिताला अॅडमिट केलंय”

“का काय झालंय ?” – अविनाश.

“तिला अपेंडिक्स चा प्रॉब्लेम झालाय, पोटात असह्य कळा येताएत.”

“मग आता ?” – अविनाश.

“डॉक्टर म्हणतात अपेंडिक्स काढून टाकाव लागेल. तिच्याकडे बघवत नाही हो. इतक्या वेदना होत आहेत की जीवाचा थरकाप होतो.”

....

....

“बाबा आहात ना ? फोन कटला वाटत, पावसामुळे फोन च काही खरं दिसत नाही.”

“अरे बाबा मी लाइन वरच आहे. तू बोल. टेस्टस केल्यात का ?” – अविनाश.

“हो. सोनोग्राफी करताहेत, अजून रीपोर्ट यायचाय. आता मधे थोडा वेळ मिळाला म्हणून लगेच तुम्हाला कळवतोय.”

क्रमश: .............

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.