निदान विद्यार्थी विकासासाठी?
*संस्थाचालक शिक्षकांना त्रास देतो. त्याची वेतनवाढ बंद करतो. त्याचे वेतन बंद करतो. त्याचे निलंबन करतो. त्याला भत्ते देत नाही. वरीष्ठ श्रेण्या लागत नाहीत. भत्ते देतांना म्हणतो की तो शिक्षक शिकवीत नाही. परंतु तो सर्व प्रकार शाळेतील शिक्षकांना देण मागण्यासाठी असतो. असा शिक्षक शिकवतो की नाही हे पाहण्यासाठी त्या शिक्षकांच्या पात्रता परीक्षा असतात. ती पात्रता परीक्षा म्हणजे त्या विद्यार्थ्यांना त्याचं शिकविलेलं किती प्रमाणात समजलं ते तपासणे. तो काठीण्य पातळीवर गेला की नाही. हे पाहणे. त्याच्या वर्गातील पालकांच्या त्याच्या विरोधात तक्रारी आहेत का? ते पाहणे. त्याशिवाय तो शिक्षक अपात्र ठरत नाही व त्याला कोणीही अपात्र ठरवून शकत नाही. जर तो शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना शिकविण्यास पात्र असेल तर तो कोणत्याही कारवाईसाठी पात्र ठरत नाही तर कोणीही त्याला अपात्र ठरवून शकत नाही. त्यामुळंच त्याचं निलंबन करुन त्याचा विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अधिकार संस्थाचालक वा शासन या कोणालाही नसावा. हे घडावे कशासाठी? तर ते केवळाणि केवळविद्यार्थी भवितव्यासाठी. ते उज्ज्वल बनायला हवं म्हणजे झालं. ज्यातून विद्यार्थ्यांचाच नाही तर देशाचाही विकास होवू शकेल.*
आज संस्थाचालक मेहरबान तर गधाही पहलवान अशी शाळेशाळेची गत झालेली आहे. संस्थाचालकाची मर्जी झालीच तर जो शिक्षक शिकवीत नसेल, तोही शिकवीत असतो आणि चांगलंच शिकवीत असतो. कारण तो शिक्षक देण म्हणून आपल्या वेतनातील काही भाग संस्थाचालकाला देत असतो.
देण. खाजगी शाळेत देण या शब्दाला अनन्यसाधारण महत्व आहे. याच देण या शब्दाला खाजगी शाळेत यासाठी किंमत आहे की त्या आधारावर बढती, पुरस्कार, पेन्शन, वार्षीक वेतनवाढ, वरीष्ठ श्रेणी, निवडश्रेणी पगारी प्रमाणपत्र, गोपनीय अहवाल आणि इतर तत्सम गोष्टी अवलंबून असतात. जो देण देतो त्याला त्या सर्वच गोष्टी मिळतात व जो देण देत नाही. त्याला काहीच मिळत नाही. उलट त्रासच दिला जातो. अशा कर्मचाऱ्याला शाळेचा संस्थाचालक असा असा त्रास देतो की तो सहन होत नाही. जरी त्या शिक्षकांना वेतन जास्त असलं, तरी पैशानं सुख प्राप्त होत नाही. अतिशय वेदनादायक मानसिक त्रास होत असतो. तो शिक्षक शाळेत इमानीइतबारे शिकवीत असूनही त्याचेवर लांच्छन लावलं जातं की तो शिकवीत नाही. मुलांना नीट समजूनही समजत नाही असं म्हटलं जातं. त्यातच वर्गावर्गात जावून मुलांचे बयाण त्या शिक्षकांविरुद्ध तयार केले जातात आणि मुलं तसं बयाण द्यायला तयार होतात. कारण त्यांना भीती दाखवली जाते की त्यांचं आयुष्य उध्वस्त करणार. मग जिथं आयुष्य उध्वस्त करण्याचाच प्रश्न उद्भवतो. तिथं ते विद्यार्थी असो की कर्मचारी. सारेच आपले वक्तव्य बदलवीत असतात. जरी विद्यार्थ्यांचं वय कमी असलं वा शिक्षक समजदार असले तरी. न्यायालयात जेव्हा हा खटला जातो. तेव्हा बयाण हे विरोधात चालत असतात.
खाजगी शाळेत केवळ असला देण न देणारा शिक्षक केवळ शिकवीत नाही. हेच आरोप चालत नाहीत तर त्याहीपेक्षा कितीतरी गंभीर स्वरुपाचे आरोप लावले जातात शिक्षकांवर. तो शिक्षक शाळेतील तरुण मुलींवर डोळा ठेवतो. महिला शिक्षीकांवर डोळा ठेवतो. परीसरातील मुलींवर डोळा ठेवतो. दारु पितो. व्यसनाधीन आहे. विद्यार्थ्यांना घाणेरड्या शिव्या देतो. वैगेरे वैगेरे आरोपांच्या फैरी झडत असतात. अशाच प्रकारचे आरोप लावून कधी वेतन बंद केलं जातं तर कधी असे आरोप लावून त्या शिक्षकांना निलंबीत केलं जातं. शिवाय असे खोटे नाटे आरोप लावून निलंबीतही. अशा देण न देणाऱ्या शिक्षकांना निलंबीत केल्यानंतर त्या खटल्यावर चांगला महागडा वकील लावून त्याचेवर असलेले आरोपही सिद्ध करुन दाखवले जातात. शिवाय संस्थाचालकाजवळ एवढा पैसा असतो की तो न्यायालयीन प्रक्रियेचीही सगळी परिस्थिती व्यवस्थीत जुळवून आणतो. मग काय संस्थाचालक तो खटला जिंकतोच. कारण कर्मचारी तरी कुठंपर्यंत पुरणार संस्थाचालकाशी अस्तित्वाची लढाई लढत असतांना. कारण त्याचं तर वेतन बंदच असतं आणि संस्थाचालकाला इतर शिक्षकांकडून घाबरल्यानं देण म्हणून पैसा सुरुच असतो.
संस्थाचालकाचं शिक्षकांना त्रास देणं ही एक गंभीर बाब आहे. त्यांना विद्यार्थी घडो, वा न घडो या गोष्टीशी काहीच घेणंदेणं नाही. शिवाय अशी कितीतरी प्रकरणे शिक्षकांची आपल्यावर अन्याय झाल्याच्या विरोधात न्यायालयात उभी राहात असतात. कधी वेतनवाढ तर कधी वरीष्ठश्रेण्या तर कधी निलंबन. सारीच कामं खोट्या स्वरुपाची आणि खोटं बोलणारा संस्थाचालक. देणसाठी सारा खेळ. कधीकधी हा खेळ न्यायालयालाही माहीत असतो. जो जीवघेणा खेळ संस्थाचालक खेळत असतो.
संस्थाचालकाच्या कचाट्यातून दोन प्रकारचे शिक्षक सुटत असतात. एक म्हणजे देणगी देणारा आणि दुसरा म्हणजे जवळचा नात्यातील. नातेवाईकांवर तर जगच फिदा असतं. मग इथे तर संस्थाचालक. कधीकधी संस्थाचालक नातेवाईकांवरही कारवाई करीत असतो. त्याचं कारण असतं पैसा. त्याचं नातेवाईकांपेक्षा जास्त प्रेम पैशावर असतं. पैसाच हा संस्थाचालकाचा नातेवाईक असतो. जो त्या संस्थाचालकाला तसं वगनाट्य वटविण्यास बाध्य करतो.
संस्थाचालक शिक्षक तसेच शाळेतील कर्मचाऱ्यांवर आरोप लावतो. कधी वार्षीक वेतनवाढ थांबवतो तर कधी इतर स्वरुपाचे हक्कं. कधी खोटेनाटे आरोप लावून न्यायालयीन प्रक्रियेशी जुळवाजुळव करुन न्यायालयीन खटलेही जिंकतो. परंतु हे सगळं खरं असलं आणि संस्थाचालक खटले जिंकत असला, तसेच त्याला देण म्हणून बराच पैसा मिळत असला आणि त्याच्याजवळ बराच पैसा गोळा असला तरी तो सुखी असतो काय? ही विचार करण्यालायक बाब आहे. पैसा कमवायचाच असेल तर तो सरळ मार्गानं कमवावा. तो सरळ मार्गानं कमविलेला पैसा सुख तरी देत असतो. परंतु वाकड्या मार्गानं कमविलेला पैसा हा सुख देत नाही. तो पैसा ज्या संस्थाचालकानं असा शिक्षक कर्मचाऱ्यांना त्रास देवून कमविलेला असतो. त्यात खटले जिंकून जरी संस्थाचालकाला आनंद वाटत असला तरी पुढील काळात तोच पैसा त्याला हानीकारक ठरतो. कधी त्याला गंभीर स्वरुपाचे आजार होतात तर कधी त्याचा खुन होतो. कधी त्याच्या पत्नीला रोगराईनं घेरलेलं असतं. तर कधी तिला एखाद्या संकटानं घेरलेलं असतं. कधी त्याच्या मुलांवर संकट येतं. कधी ती व्यसनाधीन प्रवृत्तीची बनतात तर कधी गुन्हेगार तर कधी एखाद्या गंभीर आजाराची शिकार होतात.
पुर्वी म्हटलं जायचं की बापाची करणी नातवांना भरणी. परंतु काळ बदलला व या बदलत्या काळात नातवाचं भरणं वा हाल होणं कोणी बघत नाही. आता हाल होत असतात आपल्याच पोटच्या मुलांचे. आपण जर कोणाला त्रास दिलाच तर तो त्रास परत येवून कधी त्या त्रासातून आपले हाल होतात तर कधी आपल्याच डोळ्यादेखत आपल्या मुलांचे आणि जेव्हा आपल्या पापाचं भरणं आपल्या मुलांना येतं. तेव्हा आपल्यालाच फार फार त्रास होत असतो.
महत्वाचं सांगायचं झाल्यास आपण असे का करावं? कारण लोकांना विनाकारण त्रास द्यावा. मुठभर पैशासाठी. कितीही पैसा असला तरी मरणानंतर तो आपल्या सोबत येत नाही. मरणानंतर साऱ्या मालमत्ताही जागच्या जागीच राहतात. राहातं फक्त चांगलं कार्य आणि तेवढीच राहते आपली इतरांप्रती असलेली चांगली वागणूक. म्हणूनच आपण आपलं केवळ वर्तन सुधरावं आणि सुधरावं आपलं आचरण. कोणाकडून कोणत्याच स्वरुपात पैसा घेवू नये आणि तेवढाच कोणाला विनाकारण त्रास देवू नये. जर आपण कोणाला विनाकारण त्रास दिलाच, तर त्यावर विधाताही आपल्याला माफ करीत नाही. तो विधाता सगळं पाहात असतो आणि तो प्रत्येकवेळेस आपल्याला संधी देत असतो. आपल्याला सुधरण्याची. आपल्यात परीवर्तन होण्याची. जर आपल्यात, आपल्या स्वभावात किंचीतही परीवर्तन झालं नाही तर तोच ती संधी हिसकावून घेतो व अशी शिक्षा देतो की ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळंच म्हणतात ना की देवाच्या दरबारात न्याय आहे. अन्याय नाही. फक्त थोडा वेळ लागतो. तो जो न्याय करतो. तो न्याय सर्वांसाठीच असतो. मग तो राजा का असेना, प्रधान का असेना. तो एखादा अधिकारी का असेना वा एखादा भिकारीही का असेना. सर्वांना एकच न्याय. प्रत्येकाच्या कर्मानुसार शिक्षा. ज्यातून संस्थाचालकही सुटत नाही. म्हणूनच तो संस्थाचालक का असेना. त्यानंही आज आपले पवित्रे बदलवावे. कुणाचीही विनाकारण वेतनवाढ थांबवू नये तुटपुंज्या पैशासाठी. कुणालाही रडवू नये. त्याचा संसार व्यवस्थीत चालू द्यावा. जर तो संसार व्यवस्थीत चालत असेल व संस्थाचालक चालू देत असेल तर त्यांचा आशिर्वाद मिळतो. जरी त्यांनी स्वतः दिला नसेल तरीही. ज्या आशिर्वादातून शाळेची प्रगती होते. त्याचबरोबर संस्थाचालकाच्या सांसरीक बाबीही चांगल्या होतात. त्यांना कोणत्याच स्वरुपाचा त्रास राहात नाही. मग तो एखादा गंभीर आजार असो, सासंरीक बाबींचा आत्मघात असो किंवा मानसिकतेचा आघात असो. हे तेवढंच खर.
संस्थाचालकांनी अलिकडे जास्त शाळा निर्माण केलेल्या आहेत व त्या शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांची संख्या जास्त आहे. जर संस्थाचालकांनी आपलं वागणं सुधरवलं नाही व देण घेण्यासाठी ते शिक्षकांसोबत वागले तर निश्चीतच ती देण न देणाऱ्या वा ती देण न देण्याची इच्छा असणाऱ्या शिक्षकांची मानसिकता खराब होईल व ते वर्गाला बरोबर न्याय देवू शकणार नाहीत. ज्यातून विद्यार्थ्यांचा होणारा विकास खुंटेल. तेव्हा कमीतकमी विद्यार्थी हित लक्षात घेवून संस्थाचालकांनी आपल्या वागण्यावर नियंत्रण आणावं. संस्थाचालकांनी सुधरावं. केवळ विद्यार्थ्यांचं भवितव्य सुधारण्यासाठी. अन् जर संस्थाचालक सुधारत नसेल तर शासनानंही कंबर कसावी. ते कसणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी. शिवाय ज्या शाळेतील संस्थाचालक सुधारत नसेल तर शासनानं ज्या शाळेत वाद होत असतील, त्या शाळाच बंद कराव्यात व त्या शाळेतील शिक्षकांचं समायोजन दुसऱ्या शाळेत समायोजन करावं. तसंच न्यायालयानंही तीच भुमिका घ्यावी. न्यायालयात असे वाद वारंवार येत असल्यास त्यांनी संस्थाचालकाला तासावं नव्हे तर असे करणाऱ्या संस्थाचालकावर जबर दंड लावावा. शिवाय कैदेची शिक्षाही. जेणेकरुन संस्थाचालक व्यवस्थीत संस्था चालवतील. शिक्षकांना देण मागणार नाही. त्यातच त्या शाळेतील शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना अगदी निर्भीडपणे चांगलं शिकवू शकतील व विद्यार्थ्यांचा चांगला विकास करु शकतील यात शंका नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०