Odh Premachi - 10 in Marathi Love Stories by Madhumita Lone books and stories PDF | ओढ प्रेमाची.... - 10

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

ओढ प्रेमाची.... - 10

माया आणि राकेश च प्रेम छान फुलत चाल होत. त्यांच्या या नात्याला चांगलाच वळण लागलं होत, एक सरळ वेगवान वाट होती त्यांच्या या प्रेमाची गाडीची, अगदी नजर लागावी अशी त्यांची जोडी पूर्ण कॉलेज मध्ये प्रसिद्ध झाली होती. रकेशचे सगळे मित्र मायाला वहिनी म्हणू लागले होते. मायाला कोणी या नावाने आवाज दिला तर ती लाजून छान हसायची. मायाच्या सगळ्या मैत्रिनीना तिला असं हसताना पाहून खूप आनंद होत होता. पण म्हणतात ना चांगल्या रस्त्यात पण एखादा खड्डाअसतो. तसा त्यांच्या या वाटेत मनोज नावाचा खड्डा नेहमी त्यांचा सोबतच असायचा.

मनोज आणि राकेश अगदी लहानपणीचे मित्र होते. राकेश मनोजला सांगितल्या शिवाय काहीच करत नव्हता . राकेश मनोजला भाऊ मानत असे. पण या वेळेस राकेश ने मनोजला कोणती गोष्ट न सांगता मायासोबात रिलेशन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. राकेश सतत मायाच्या मागे मागे करत असल्यामुळे राकेशची कमी मनोजला सतवू लागली. या कारणांमुळं तो मायाला hate करत होता, त्याला ती कधीच आवडत नव्हती.किती वेळा त्याने राकेशला तिच्या विषयी भडकुन देत होता. पण राकेश मात्र त्याच बोलण हसण्यावारी घेत असे. या वेळी त्याने ठरवले होते, माया विरुद्ध ठोस पुरावे शोधून तिला राकेश च्या आयुष्यातून काढून टाकणार. त्या साठी तो तिचा सतत पाठलाग करत असे, तिच्यावर प्रत्येक वेळी नजर ठेवत असे.

माया च आपलं सिंपल रूटीन होत. सकाळी कॉलेज साठी बाहेर पडायची आणि दुपारी घरी यायची. कधी कुठे जाणं - येणं नाही. कॉलेज मध्ये च राकेश ल भेटायची आणि दिवस भर फोनवर बोलत असे. मनोजला यातून काहीच सापडलं नाही . पण एक ना एक दिवस तिच्या विषयी काही ना काही तरी पुरावे मिळतील या आशेवर तो तिच्या वर नजर ठेवत असे.

कॉलेज मध्ये काही दिवसांनी फायनल exam होते. आता सगळे त्याच्या तयारीत होते, सगळे पुस्तकं उघडून बसू लागली. राकेश आणि माया कॉलेज कॅम्पस मधील lawn वर बसून अभ्यास करत होती.इतक्यात माया राकेश च्या खांद्यावर डोकं ठेऊन त्याला विचारते,
राकेश तू माझ्या शिवाय राहू शकतोस???

राकेश तीच डोकं आपल्या मांडीवर ठेऊन तिला गोंजारत म्हणतो,
अजिबात नाही, पण असं अचानक का विचारलं?

उद्या, दोन दिवसांसाठी गावी जावं लागणार आहे, आईबाबांसोबत, माझी इच्छा तर नाही आहे पण जावं तर लागेलच.

एवढं च आहे ना , मला वाटलं कायमची सोडून जाणार आहेस , मला टेन्शन आलं आता परत एकदा दुसरी मुलगी शोधा , तिला पटवा तिच्यावर पैसे आणि वेळ वाया जाणार.

माया पटकन त्याच्या मंडीवरून डोके काढून त्याच्याकडे रागात बघत म्हणते,
काय म्हणालास तू,परत बोल.

राकेश तेथून पळ काढतो, आणि माया त्याच्या मागे धावू लागते. दोघे पूर्ण ग्राउंड वर वेड्या सारखे पळत असतात , कधी माया राकेश मागे तर कधी राकेश माया मागे. संपूर्ण कॉलेज या दोघांनीच बघत होतं. मायाला हे कळताच ती आहे तिथे थांबते, आणि राकेश तिचा हात धरुन तिला जवळ ओढतो, तशी ती त्याच्या मिठीत शिरते.लाजत हळूच म्हणते,
सोड ना,सगळे आपल्याला बघत आहेत.

बघू देत , आपण काय चुकीचं वागतो आहेत, प्रेम करतो आपण एकमेकांवर. माया तू तुझ्या आईबाबांना सांग.

काय??

अग ,हेच की तुझ माझ्यावर प्रेम आहे.

काही काय राकेश , असं म्हणून माया राकेश च्या मिठीतुन बाहेर निघते.

मस्करी करत होतो. तू त्यांना सांग ना तुझे practical चालू होत आहेत, आणि अशी exam पण जवळच आहे.आणि घरीच रहा आणि आपण मज्जा करू.

तू बोलतोय ते पटतय मला, पण आपण मजा काय करायची, असं म्हणून आपले दोन्ही हात त्याचा गळ्यात टाकून त्याची फिरखी घेऊ लागली.