Lagnachi Gosht - 3 in Marathi Anything by Pralhad K Dudhal books and stories PDF | लग्नाची गोष्ट - भाग 3

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

लग्नाची गोष्ट - भाग 3

लग्नाची गोष्ट भाग ३

मी नोकरीत हळूहळू रुळत होतो.माझ्यावर असलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलण्याचा यथाशक्ती प्रयत्न करत होतो,पण तुटपुंज्या पगारात फार काही करू शकत नव्हतो.

पुण्यातल्या भावाच्या घरी राहून मी फार काही करू शकेल असे आता वाटतं नव्हते.आता मी पंचविशी पार केली होती.एवढ्यात लग्न करावे की नको या बाबतीत द्विधा मनस्थिती होती. कधीकाळी लग्न करायचे झाले तर नोकरी करणारी पत्नी शोधायची हे मात्र मनाशी ठरवून ठेवले होते.

अर्थात माझी कौटुंबिक पार्श्वभूमी व माझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्या लक्षात घेता मला लग्नासाठी अशी मुलगी मिळणे दुरापास्त होते.

मी नोकरीला लागल्यावर स्वतःच्या आणि कुटुंबासाठी काही गोष्टी ठरवल्या होत्या,पण ठरवल्याप्रमाणे एकही गोष्ट घडत नव्हती त्यामुळे त्या काळात मी थोडाफार निराशावादी झालो होतो.एका वैचारीक चक्रव्युव्हात मी सापडलो होतो.मनाजोगते काहीच घडत नव्हते...

दिवस असेच जात असताना एक गोष्ट घडली...एक दिवस आमच्या साहेबांनी अचानक मला त्यांच्या केबीनमधे बोलावले. तोपर्यंत वरच्या साहेबांकडे जाण्याचा माझा कधी संबंध आलेला नव्हता, त्यामुळे आपलेकामकरताना नक्की काय चुकले याचाविचार करत थोडा बिचकतच साहेबांच्या केबीनमधे मी प्रवेश केला.

मी बघितले की माझ्या आधी तेथे दोन वयस्कर गृहस्थ बसले होते.

साहेबांनी त्यांची माझ्याशीओळख करून दिली.

नमस्कार वगैरे झाले.मी दोघांनाही ओळखत नव्हतो!

झाले होते असे की, आता मी लग्न करणार असेल असे गृहीत धरून आमच्या साहेबांनी त्यातल्या एका गृहस्थाची मुलगी लग्नासाठी मला सुचवली.

साहेबांचे म्हणणे होते की मी त्या मुलीला पाहायचे आणि पसंती कळवायची! मला साहेबांनी दिलेला हा जणू आदेशच होता!

खरं तर तोपर्यंत मी माझ्या लग्नाचा बिल्कूल विचार केलेला नव्हता.त्याची माझी स्वत:ची अशी काही कारणेही होती.नुकतीच मी पंचविशी पार केलेले होती.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून माझा इथपर्यंतचा प्रवास झालेला होता.माझे वडील मी आठवीत असतानाच वारले होते आणि माझ्या आईने मोठ्या कष्टाने मला वाढवले होते.घरची थोडी शेती होती, ती सावकाराकडे गहाण पडलेली होती,ती सोडवायची होती.गावात एका खोपटात रहात होतो तेथे एखादी खोली बांधायची होती.भावांना मदत करायची होती .मी पुण्यात झोपडपट्टीत दहा बाय बाराच्या खोलीत भावाच्या आसऱ्याला रहात होतो.एक सायकल आणि दोनचार कपडयाचे गाठोडे, हीच काय ती माझी स्वत:ची मालमत्ता होती! अशा परिस्थितीत मी लग्न करण्याचा विचार करणे अशक्यच होते, पण साहेबांनी आणलेले ते स्थळ तर बघावे लागणार होते! त्याना नाही कसे म्हणणार,नाही का?

तर...., नंतरच्या रविवारी एका जवळच्या मित्राला सोबत घेवून मी मुकूंदनगर भागात माझ्या आयुष्यातल्या पहिल्या माझ्या इच्छेने मुलगी बघण्याच्या कार्यक्रमाला गेलो.

मुलगी पाहिली, ती मला शोभेल अशीहोती. राज्य सरकारी महामंडळात ती नोकरीला होती.त्यांचे घर म्हणजे सुंदर सरकारी क्वार्टर होती.

घरात फ्रीज,टीव्ही सारख्या सर्व सुखसुविधा होत्या.एकंदरीत ते उच्च मध्यमवर्गीय कुटूंब होते.त्यांच्यासमोर मी सर्वच आघाड्यांवर अगदीच किरकोळ होतो.पोहे चहा घेतला, जुजबी प्रश्नोत्तरे झाली आणि तेथून बाहेर पडलो.मला मुलगी पसंत जरी असली तरी आपल्यासारख्या फाटक्या माणसाला ही माणसे आपली मुलगी कशाला देतील ?

मला तरी ते सर्व अशक्य कोटीतले वाटत होते! मी ते सर्व विसरून गप्प बसणे पसंत केले.

आठ दहा दिवसातच आमच्या साहेबांनी परत केबीनमधे बोलावले.त्या मुलीचे वडील आणि आमच्या साहेबांचे मित्र असलेले ते दोघेजण पुन्हा माझ्याकडे आले होते. मी मुलगी बघून आलो पण त्यांना काहीच सांगितले नाही म्हणून साहेब माझ्यावर रागावले.मी शांतपणे ऐकून घेतले.

मी साहेबांना व त्या दोघांना माझी सगळी परिस्थिती, माझ्यावर असलेल्या प्रचंड जबाबदाऱ्या, माझा तुटपुंजा पगार व मला पुढच्या आयुष्यात कसा खडतर प्रवास करावा लागणार आहे वगैरे अडचणी समजावून सांगितल्या.माझे बोलणे त्यानी अगदी शांतपणे ऐकून घेतले आणि मला सांगितले की "आम्ही तुमची सर्व माहिती आधीच काढली आहे. तुमचे स्थळ आम्हाला पसंत आहे! तुम्हाला जर मुलगी पसंत असेल तर फार विचार करू नका, ती तुम्हाला आयुष्यभर साथ देईल.आज तुमच्याकडे काहीही नसले तरी तुम्ही कर्तुत्वाने मोठे होणार हे नक्की आहे!तुम्हा दोघांच्या पगारात तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाल!"

माझा चांगला स्वभाव,माझा निर्व्यसनीपणा व काहीतरी करण्याची जिद्द व मुख्य म्हणजे माझ्याकडे असलेली सरकारी नोकरी या गोष्टी त्या लोकांसाठी महत्वाच्या होत्या! तरीही त्या मुलीशी माझ्या खऱ्या परिस्थितीबद्दल बोलणे मला आवश्यक वाटत होते म्हणून मी त्यांच्या परवानगीने पुन्हा त्यांच्या घरी गेलो व मुलीशीही बोललो.

तिनेही मला संपूर्ण साथ देण्याची तयारी दाखवली.तिचे म्हणणे होते की, आपण दोघे एकत्र येवून सगळे प्रश्न सोडवू!”

नंतर मात्र मी थोडा गंभीरपणे विचार केला कदाचित नियतीने ही मला देवू केलेली संधी असू शकते.लवकरच दोन्हीकडील वडीलधाऱ्या लोकांच्या सल्ल्याने व आशीर्वादाने माझे लग्न ठरले!

- प्रल्हाद दुधाळ (9423012020)