पोलिसांनी आपली भुमिका बदलवावी?
पोलिसांची नोकरी लागत असली तर चक्कं आजच्या काळात सामान्य माणसांचा असा समज आहे की आता पावलं. आता हा व्यक्ती बराच श्रीमंत बनणार. त्याच्या घरी भरपूर पैसा येणार. तसंच घरी कार व बंगलाही उभा राहणार आणि तसं घडतंच. चक्कं पोलिसांच्या नोकरीवर लागला रे लागला की चक्कं पाच वर्षातच काही पोलीसवाल्यांच्या घरी कार उभी राहते आणि त्याचं घरंही आलिशान पद्धतीनं बांधलं जातं. याबाबत विशेष विचार करायचा झाल्यास हा पैसा कोठून येतो, यावर प्रश्नचिन्हं उभं राहात असतं.
हा पैसा येतो अवैध वसूलीतून. काही पोलीसवाले सांगत असतात की काय करु साहेब, हे आम्ही आमच्या मर्जीनं करीत नाहीत तर साहेबांच्याच मर्जीनं करतो. साहेबांनाही आमच्या वसूलीतून पैसे हवे असतात. ते म्हणतात की तुम्ही कितीही कमवा. मला एवढी एवढी रक्कम हवी आहे. म्हणूनच आम्ही गाड्या अडवतो व जबरन का असेना, दंड वसूल करतो. मग तो दंड कोणत्याही पद्धतीनं का असेना. आम्हाला त्याचं काही घेणं देणं नसतंच.
वाहतुकीचे नियम हे वाहतूक करतांना पाळणे अनिवार्य आहे. जे पाळत नाहीत, त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि ती होणे अगत्याचे आहे.
वाहतूक करण्याच्या दृष्टीकोनातून व ती वाहतूक सहज सुलभ व्हावी. त्यातून अपघात होवू नये म्हणून बरेचजण वाहतूक नियम पाळतात. काही मात्र वाहतूक नियम पाळत नाहीत.
वाहतूक नियम पाळणाऱ्यात काही तरुण मुलांचा समावेश असतो. ती मुलं विशेषतः मुली गाड्या एवढ्या भरधाव वेगाने चालवतात की अचानक पुढील गाडी समोर आली की त्यांची गाडी कंन्ट्रोल होत नाही व अपघात घडतो. यात कमी वयाचेही तरुण तरुणी असतातच. तसंच वाहतूक नियम न पाळणाऱ्यात काही ऑटोचालकांचा समावेश होतो. ते ऑटोचालक मंडळी कुणालाही कट मारत व धक्का देत आपला ऑटो चालवत असतात व काही म्हटल्यास अश्लील शिवीगाळ करीत मुजोरी करीत असतात. कधीकधी तर पोलीस प्रशासनही त्यांना काहीच म्हणत नाहीत वा कारवाई नसल्याचे चित्र दिसते. असा विचार येतो त्यावेळेस की वाहतूक नियमात हे ऑटोचालक चुकले तरी त्यांच्यावर कारवाई का होत नाही. अशा विचीत्र पद्धतीनं ऑटोचालक वागत असतात. तसेच ते प्रवाशांना आपल्या ऑटोत बसवतांना रहदारीचा जो रस्ता असेल, त्या रस्त्याच्या मधोमध आपला ऑटो थांबवून त्या रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्यांच्या वाहतुकीची कोंडी करीत असतात. मात्र पोलीसही अशा ऑटोचालकांना का सोडून देतात? त्यांच्यावर कारवाई का करीत नाहीत? असाही कधीकधी विचार येत असतो.
वाहतूक नियम असतात. हेल्मेट न घालणे, त्याची प्रत न सांभाळणे, तो अमूक अमूक कंपनीचाच असणे, जास्त माल भरणे, चोरीचा माल असणे, जास्त प्रवासी वाहतूक करणे, सीट बेल्ट न लावणे, गाड्यांचा वेग जास्त असणे, एकपदरी रस्ता असणे, सिग्नल तोडणे, विविध कागदपत्रे नसणे, मुजोरी करणे व पोलिसांचा अपमान करणे इत्यादी प्रकारचे बरेच नियम असतात. ज्यातून कोणताही वाहनचालक अगदी सहजच सापडू शकतो.
वाहतूक नियम हे सर्वांनी पाळायलाच हवेत. परंतु कोणीकोणीच नियम पाळतात आणि जे नियम पाळतात. पोलीस त्यांनाच अडवतात. शिवाय पोलीसही अशा नियम पाळणाऱ्यांची अशी चौकशी करतात आणि शेवटी मुजोरी केली असा शेरा जाणूनबुजून नोंदवत नियम पाळणाऱ्यावर कारवाई करीतच असतात. अशी कारवाई जे नियम पाळत नाहीत. त्यांच्यावर करीत नाहीत. कारण ते देण म्हणून नेमकी काही रक्कम पोचती करीत असतात असं त्यांचं म्हणणं असतं. मात्र हे बरेचदा घडतं व बरेच व्यक्ती हे घडणं अनुभवत असतात. परंतु त्याबाबत काहीही बोलत नाहीत. मात्र हे सगळं पाहणाऱ्या व अनुभवणाऱ्या लोकांमध्ये पोलिसांबाबत चीड निर्माण होते व त्याची परियंती ही पोलिसांना मारहाण करण्यात होते. अशा बर्याच घटना वर्तमानपत्रातून छापून येत असतात. ज्यात सत्य वेगळंच असतं.
काही पोलीस हे केवळ लुटण्याचा धंदाच करण्याचे काम करीत असतात की काय? तसेच चित्र दिसत असते कधीकधी. कारण ते अगदी लपून बसतात आणि वाहतूक नियम चुकविणाऱ्या सावजाचा वेध घेत असतात. मग जसं सावज आलं रे आलं की ताबडतोब रस्त्यावर उभे होतात व गाड्या अडवतात. अशातच ते लायसन्स वैगेरे दस्तावेज मागून जर यापैकी एखादं दस्तावेज नसेल तर लांबची रक्कम सांगतात. अर्थात ती रक्कम फुगवून सांगतात. त्यावर रक्कम देणारा रक्कमधारक, त्याला त्यातील रक्कमेचे कायदे माहीत नसल्यानं व तो गरीब असल्यानं तो गयावया करतो. मग ती पोलीस मंडळी सौदेबाजी करीत त्या रकमेची उलटफेर करतात व रक्कम थोडी लहान करतात. मग सौदा पक्का होतो व जी रक्कम असा वाहनचालक पोलिसांना देतो. त्या रकमेची नोंद होत नाही. ती त्या पोलिसांच्या घशात जाते. मात्र काही पोलिसवाले नक्कीच इमानदार असतात व ते इमानदारीनं वागतही असतात. मात्र अशाबाबतीत कधी विचारणा केलीच तर ते पोलीस तोतया पोलीस असतील. अशी बतावणी करुन मोकळं होण्याची पद्धती आहे. महत्वपुर्ण बाब ही की आज पोलीस खातं हे अतिशय उत्तम आणि न्यायाची परिपुर्ती करणारं खातं आहे. त्याकडे सध्यातरी लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा फारच चांगला आहे. त्या खात्याकडे सामान्य, गरीब जनता न्यायीक दृष्टिकोनातून पाहात असते. मात्र ते खातं आज काही पोलीसांच्या विचित्र वागण्यानं बदनाम होत आहे. ज्यात काही तोतया पोलिसांचाही समावेश होतो. तसं पाहिल्यास पोलीस खात्यात बरेचसे लोक इमानदार असून ते इमानदारीनंच वागत असतात. परंतु हे जरी खरं असलं तरी काही पोलिसांच्या गैर इमानदारीनं वागण्यातून जो दाग पोलिसांच्या वर्दीवर लागतो. ती गंभीर बाब असते व विचार करणारी बाब असते.
महत्वाचं सांगायचं झाल्यास जे पोलीस खातं आधीपासूनच इमानदार आहे व सध्याच्या परिस्थितीत त्यांना भरपूर वेतन आहे. एवढं वेतन आहे की ज्यानं त्यांचं घर व्यवस्थीत चालतं. असं असतांना जास्तीचा पैसा कमविण्याचा पोलिसांना हव्यास का असावा? खरंच तो पैसा वा ती संपत्ती आपण मरण पावल्यानंतर स्वतःच्या सोबत नेतो काय? याचं उत्तर नाही असंच येतं. शिवाय आपण कुणाच्या भावना दुखवून कमविलेला पैसा आपल्या घरी गंभीर स्वरुपाचं संकट आणत असतात. ज्यातून एखादा गंभीर आजार आपल्या परीजनांना होत असतो. याचा विचार पोलीस खात्यांनी करावा. जेणेकरुन सामान्य माणसातही पोलिसांची प्रतिमा ही सहानुभूतीची होईल यात शंका नाही. हे तेवढंच खरं.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०