Who is best? in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | श्रेष्ठ कोण?

Featured Books
  • ડાન્સિંગ ઓન ધ ગ્રેવ - 2

    સ્વામી શ્રદ્ધાનંદની ખલીલી પરિવારમાં અવર જવરના સમયે ઇરાનની રા...

  • horror story

    હવે હું તમને એક નાની ભયાવહ વાર્તા સાંપડું છું:એક ગામમાં, રાત...

  • ઢીંગલી

    શિખા ને ઉનાળાનું વેકેશન પડ્યું હતું, તે હવે ચોથા ધોરણમાં આવવ...

  • હમસફર - 18

    વીર : ( શોકડ થઈ ને પીયુ ને જોવે છે) ઓય... શું મુસીબત છે ( એ...

  • ફરે તે ફરફરે - 12

    ફરે તે ફરફરે - ૧૨   એકતો ત્રણ ચાર હજાર ફુટ ઉપર ગાડી ગોળ...

Categories
Share

श्रेष्ठ कोण?

श्रेष्ठ कोण?

अलिकडील काळात मी मोठा मी मोठाच असं म्हटलं जातं. जणू मोठेपणाची स्पर्धाच लागलेली आहे. अशाच मोठेपणाच्या स्पर्धेत काही पैशांचे पेशेवर प्रतिनीधी. त्याची सभा भरलेली होती. त्या सभेत ते आपापली माहिती सांगत होते. त्या सभेत ठरणार होतं की मोठं कोण? त्या सभेत डॉक्टर, इंजिनीअर, संस्थाचाल, एक लहानसा विद्यार्थी, न्यायाधीश, वकील, शिक्षक, कामगार व शेतकरी असे बरेच जण होते. सगळ्यांनी आपआपली माहिती सांगीतली व मोठेपणाचं वर्णन केलं.
सर्वात प्रथम क्रमांक शेतकऱ्याचा आला. त्याचा चेहरा बसला होता. हाडांना मांस चिकटलेलं होतं. बोलतांना त्राण लागत होता. तरीही तो बोलत होता. त्यानं आपलं धोतर सवारलं व बिचारा बोलला,
"मी शेतकरी. मी मोठाच आहे. मी जर पीक पेरुन धान्य उगवलंच नाही तर कोणताच व्यक्ती मोठा ठरणार नाही."
त्या शेतकऱ्याचही बरोबरच होतं. कारण तो जर नसेल तर शेती कोण पिकवणार अन् शेतीचं धान्यच नसणार तर लोकं जगणार कसे? काय खाणार? वैगेरे प्रश्न होते.
शेतकऱ्याचं बोलणं होताच कामगाराचा क्रमांक लागला. तो म्हणाला,
"अरे सर्वात मोठा मी. कारण मी जर कामच केलं नाही तर तुम्हा सर्वांना खायला प्यायला कोण देईल. विचार करा की धान्य केवळ पिकवून चालत नाही. ते पीठगिरणीपर्यंत न्यावं लागतं. ते तिथून घरी आणावं लागतं. तेव्हाच ते पोटात जातं. त्यामुळंच मी मोठा आहे."
कामगारानं आपली बाजू मांडली. तसा त्यानंतर डॉक्टर उभा झाला व म्हणाला,
"अरे, मीच सर्वात मोठा. कारण मीच तुमचं प्राणही वाचवतो. मीच मृत्यूवरही कधीकधी मात करतो. मृत्यूही कधीकधी मला घाबरुन पळतो. मग सांगा आणि विचार करा की कोण मोठा. मीच मोठा आहे."
डॉक्टरांचं संपत नाही. तोच इंजिनीअर उठून उभा झाला. तो म्हणाला,
सर्वात मोठा मीच. कारण मी नवेनवे तंत्र शोधतो. मी जर तंत्र शोधलेच नाही तर डॉक्टरलाही ऑपरेशन करता येणं शक्य होणार नाही. मी जर तंत्र शोधलेच नाही तर न्यायाधीशानंही दिलेल्या नार्को टेस्टच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा आदेश फोल ठरेल. मी जर नसेल तर ना गृहिणी बरोबर स्वयंपाक करु शकेल. ना शेतकरी शेतीत धान्य पिकवून शकेल. यावरुन मीच मोठा आहे."
इंजिनीअर तसं बोलून खाली बसला. तसा एक विद्यार्थी उभा झाला. म्हणाला,
"मी काही स्वतःला मोठा समजत नाही. परंतु एक सांगेन की मला शिकविणारा शिक्षक मोठा. असे तुम्हाला मोठे म्हणणारे पुरावे आणा. की जे तुम्हाला मोठे म्हणतील. अहो, शिक्षक शिकवतात. म्हणूनच आपल्याला डॉक्टर, इंजिनिअर वकील, न्यायाधीश सारंच काही होता येतं. ते जर नसतील तर ना कोणी डॉक्टर बनू शकेल. ना कोणी इंजिनीअर ना कोणी शेतकरी ना कोणी न्यायाधीश? आता ठरवा कोण मोठा ते?"
त्या एका विद्यार्थ्यानं बाजू मांडताच एकच कल्लोळ माजला व सर्वांनी त्याची पुष्टी करीत स्विकारलं की शिक्षकच मोठा की जो इतरांना साक्षर करतो. शिकवतो. त्यानं जर आपल्याला शिकवलं नसतं तर कदाचीत आपण कोणीच आपल्या पदापर्यंत पोहोचलो नसतो.
सर्वांचा तो निर्णय तोच तिथे उपस्थित असलेला संस्थाचालक म्हणाला,
"शिक्षक कसला मोठा? अहो तो तर माझ्यासमोर गुलामी करतोय. मी खाली बस म्हटलं तर खाली बसतोय. उठ म्हटलं तर उठतोय आणि हं, मी जर त्याची नियुक्तीच शिकविण्यासाठी केली नाही तर तो कसा काय शिकवू शकेल विद्यार्थ्यांना? अन् मग माझ्या शाळेतून कोण डॉक्टर, इंजिनिअर, न्यायाधीश, शेतकरी, कामगार घडू शकेल. यावरुन मीच मोठा की नाही?"
संस्थाचालक बोलून गेला. तोच न्यायाधीश महोदय, आतापर्यंत चूप होते. ते कसे काय मागे राहतील. त्यांनाही जोर आला व ते म्हणाले,
"मी मोठा आणि तेवढाच श्रेष्ठ आहे. कारण मी न्यायदान करतो. मी चाहे तर फासावरही लटकवू शकतो. याचाच अर्थ असा की मी मृत्यूचाही निर्णय करु शकत असल्यानं मी यमापेक्षाही मोठा ठरतो."
ती सभा व त्या सभेत न्यायाधीश महोदयानं आपली बाजू मांडताच सारे हसले. कारण होतं की ते स्वतःला यमापेक्षाही मोठे समजत होते. तसं पाहिल्यास आरोपींचा मृत्यू त्यांच्याच हातात होता व ते कोणालाही मृत्यू देवू शकत होते. जणू यमाचंच काम करीत होते ते. ते यमापेक्षाही मोठेच होते. कारण अलिकडील काळात लोकं आजारपणाच्या काळात औषधपाणी करुन यमालाही कधीकधी दूर पळायला लावतात. परंतु त्या न्यायाधीश महोदयाची वाणी म्हणजे काळ्या दगडावरची रेघच होती.
न्यायाधीश महोदयांचं बोलणं होताच वकील महाराज उभे झाले. ते म्हणाले,
"हे न्यायाधीश महोदय कसे काय मोठे? आम्ही जर आरोपींची बाजूच मांडली नाही तर हे कसले न्यायदान करु शकतील. त्यामुळं आम्हीच मोठे. आम्हाला कोणीही लहान ठरवू शकणार नाही."
ती मोठेपणाची बाब.सर्वांनी आपआपलं मत मांडलं होतं आणि आता शेवटी क्रमांक शिक्षकांचा होता. तसे शिक्षक महोदय उठले व आपल्या अधिकारवाणीनं बोलू लागले.
"हे बघा, यात जगात कोणीच लहान आणि कोणीच मोठा नाही. प्रत्येकच जण मोठा व प्रत्येकच जण लहान आहे. तसं पाहिल्यास आईच्या गर्भातून कोणताच व्यक्ती जन्म घेतांना बारा महिने राहात नाही. प्रत्येकच व्यक्ती आईच्या गर्भात फक्त नऊच महिने असतात आणि आपण स्वतःला मी मोठा समजणे हा आपला अहंकार असतो आणि जिथं अहंकार येतो. तिथं सारं संपतं. संपतं आपलं मोठेपण आणि तेवढंच संपतं आपलं लहानपणही. मग उरतो भोपळा. ज्याला आम्ही शुन्य हे नाव दिलं. त्यामुळं प्रत्येकच आपआपल्या जबाबदारीनुसार मोठा आहे. तुम्ही मोठे आहात तुमच्यातील चांगल्या गुणानं. जर तुमच्यातील तेच चांगले गुण जावून तुमच्यात वाईट गुण शिरलेच तर समजा तुम्ही संपलेच. म्हणूनच कोणी कोणाला लहान समजू नये व कोणी कोणाला महान समजू नये म्हणजे झालं. प्रत्येकच मोठा असतो जर त्यानं एकमेकांना हिन न समजता मिळून, व सोबत राहून तसेच एकमेकांना मदत करुन कार्य केलं तर....... त्यानं आपलीच नाही तर आपल्या देशाची प्रगती करु शकतो. तसेच आपण आपल्या देशाला महान करु शकतो. आपण महान होवून चालत नाही. ज्याचा देश महान, त्या देशातील सर्वच लोकं महान. आता ठरवा कोण महान आणि मोठा आहे ते?"
शिक्षकानं बाजू मांडली. ती बाजू सर्वांना पटली व सर्वांना आपली भुमिका चुकली असल्याचं कळलं. त्यांना आपल्या स्वतःला श्रेष्ठ समजण्याचे श्रेय घेण्याबद्दल पश्चाताप झाला व सर्वांनी ठरवलं की आजपासून सर्वांनी मिळून व सोबत राहून तसेच एकमेकांना मदत करुन कार्य करावं. एकमेकांवर दोषारोपण न करता.
त्या दिवसापासून ते सर्वजण स्वतःला महान व मोठे न समजत एकमेकांना सोबत घेवून मिळूनमिसळून कार्य करु लागले. वाटल्यास कधीकाळी एकमेकांची मदतही घेवू लागले. तसेच ते एकमेकांना मदतही करु लागले. कारण त्यांना स्वतःला नाही तर आपल्या देशाला महान बनवायचं होतं.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०