Odh Premachi - 9 in Marathi Love Stories by Madhumita Lone books and stories PDF | ओढ प्रेमाची.... - 9

Featured Books
  • You Are My Choice - 41

    श्रेया अपने दोनो हाथों से आकाश का हाथ कसके पकड़कर सो रही थी।...

  • Podcast mein Comedy

    1.       Carryminati podcastकैरी     तो कैसे है आप लोग चलो श...

  • जिंदगी के रंग हजार - 16

    कोई न कोई ऐसा ही कारनामा करता रहता था।और अटक लड़ाई मोल लेना उ...

  • I Hate Love - 7

     जानवी की भी अब उठ कर वहां से जाने की हिम्मत नहीं हो रही थी,...

  • मोमल : डायरी की गहराई - 48

    पिछले भाग में हम ने देखा कि लूना के कातिल पिता का किसी ने बह...

Categories
Share

ओढ प्रेमाची.... - 9

माया आणि रकेशच्या मैत्रीला आता भरपूर दिवस झाली . वेळेनुसार त्यांची मैत्री चांगलीच फुलत चाली होती. दोघे एकमेकांना समजून घेत होती. माया ने हे सगळं आपल्या ग्रुप पासून लपवून ठेवलं असल्यामुळं त्यांच्या या मैत्रीला नवीनच रंग येत होता. लपून लपून भेटणे, long drive ला जाणे. असच बरच काही चालू होत त्यांच्या या मैत्री मध्ये. आता दोघे एकमेकांना आवडू लागले होते,पण सांगू शकत नव्हते.

राकेशने ठरवलं होतं पुढच्या आठवड्यात मायाच्या वाढिवसानिमित्त तिला आपल्या मनातील सर्व सांगून तिला प्रपोज करणार. त्याने याची तयारी सुद्धा करून ठेवली होती.

माया पण इकडे तिच्या वाढदिवसासाठी उत्सुक होती. ती त्यादिवशी आपल्या मैत्रीणीना रकेशबदल सांगणार हे ठरवलं होतं.

**********************
वाढदिवसा दिवशी माया कॉलेज कॅन्टीन मध्ये जाते, तिथे तिच्या सगळे फ्रेंड्स तिची वाट पाहत होते. माया येताच अनिकेत बर्थडे बॉम फोडतो, त्यामुळे माया थोडी डचकते.
आणि सगळे एका सुरात बर्थडे सॉंग माया साठी गाऊ लागले, ऋचा आणि प्राची ने माया समोर केक आणला आणि तिला कापायला लावला. माया खूप खुश होती. पण तिची नजर कोणाला तरी शोधत होती, ती राकेश जवळ पास आहे का पाहत होती, तो तिथे नव्हता.

आज का नाही दिसत आहे हा इथे, तो विसरला असेल का आज काय आहे ते, माया मनातल्या मनात म्हणत इकडे तिकडे बघत होती.

माया कोणाला शोधतेस, केक काप लवकर, मायाला थोड हलवून गौरांग म्हणाला.

त्याचा आवाजाने माया भानावर आली आणि तिने मानेनेच नकार अर्थी मान हलवली आणि केक कापला.

सगळे माया पार्टी दे असं म्हणून तिच्या मागे ओरडू लागले. तेवढ्यात मायाचा मोबाईल वाजला, माया कॉल उचलून बोलण्यासाठी थोडी लांब गेली, थोड्या वेळ बोलली आणि मोबाईल बॅगेत ठेऊन परत ग्रुप मध्ये आली आणि सगळ्यां म्हणाली , ठीक आहे, मी पार्टी देते पण इथे नाही बाहेर कुठे तरी घेऊन चलते. हे ऐकून सगळे खुश झाले.

माया त्या सगळ्यांना घेऊन कॅफेमध्ये आली जिथे राकेश आणि मायाची मैत्री झाली होती.

मायाने कॅफेच दार उघडत आत गेली आणि तिच्यावर पुष्वृष्टी झाली, सोबत मधुर संगीत होत. आणि समोर मध्यभागी एका टेबलावर एक सुंदर असा केक होता. मायाच्या फ्रेंडसला काय स्वतः माया ला सुद्धा विश्वास बसत नव्हता तिच्या डोळ्यांवर इतकं सुंदर होत ते सगळं काही.


तेवढ्यात मायाच्या समोर राकेश आला आणि गुडघ्यावर बसून तो मायाला म्हणाला,
माया मी तुझ्या वर मना पासून प्रेम करतो, आता पर्यंत आपली मैत्री माझ्या साठी खूप महत्वाची होती, आहे आणि अशीच राहील, पण तुझ्याबद्दलचं माझ प्रेम हे आपल्या मैत्री पेक्षा ही खूप चांगल संभाळेन, आता तुझ्या मनात काय आहे ते तू बेफिकीर सांगू शकते, तुला कोणताही दबाव नाही, तू माझं प्रपोजल एक्सेप्ट करशील???? एवढं म्हणून त्याने खिशातून रिंग काढून तिच्या समोर धरली.

मायाला काय करावं, काय बोलावं सुचतच नव्हत. मागून सगळे जण हो म्हण, हो म्हण असे ओरडत होते

माया मोठा श्वास घेऊन , थोडीशी लाजत इकडे तिकडे बघत राकेशच्या नजरेत नजर घालून त्याचा समोर आपला हात पुढे करून त्याला आपला होकार कळवते. तसे सगळे जण टाळ्या वाजवून चिअर अप करू लागले.

राकेशने माया च्या हातात रिंग घातली आणि तिला केक जवळ नेऊन तिच्या सोबत केक कापला. आणि तिला भरवला. माया चे सगळे फ्रेंड्स खूप खुश होते पण तितकेच आश्चर्यचकित होते. मायाने त्याच्याकडे बघून ओळखून घेतलं होतं ती त्यांना सगळं सांगणार तेवढ्यात राकेश म्हणाला,
तू ह्यांना सगळं सांगितलस तर, बर झालं आता कोणाला काही लपव्याची गरज नाही.

नाही , सांगितलं होतं अजून सांगणार च होते, त्यामुळं तुझा फोन आल्या वर मी ह्या सगळ्यां इथे घेऊन आले, पण मीच अजून शॉक मधून बाहेर नाही आले तर त्यांना काय सांगणार.
असं म्हणून माया आपल्या ग्रूपच्या दिशेने जाते,
सॉरी, यार तुम्हा सगळ्यांना सांगणार होते आज मी आमच्या मैत्रीच पण ....

अरे यात सॉरी म्हण्यला काय झालं. आम्ही सगळे तुझ्यासाठी खूप खुश आहोत, तू नेहमी अशीच हसत रहा, येवढं म्हणून सगळे मायाला मिठी मारतात.