Nishabd shravas in Marathi Love Stories by satish vishe books and stories PDF | निशब्द श्र्वास - 7

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

निशब्द श्र्वास - 7

वेड -
सकाळी उठल्यापासून का कुणास ठाऊक आज मला नेहमी पेक्षा वेगळं वाटत होत. आगदी विनाकारण कसतरी होत होतं.
'' मुझे नींद ना आये मुझे चैन ना आये '' असच काही झालं होत.
तस पण आज जरा माझी प्रकृती थोडी बिघडली होती. आंग थोड जड ताप जाणवत होता. कदाचित अस मला त्यामुळे वाटत असावं
पण असं केव्हा होत नाही काही नवीन भाव मनामधे चालत होता. कसली तरी जाणीव कसला तरी भास सारखा वाटत होता. आज ताई तर कामावर गेली होती मला बर नसल्यामुळे मी घरीच होते. पण सकाळी पासून बेड वर मी आगदी विनाकारण उठून बसली की पुन्हा झोपत.
काय चालय माझं मलाच समाजात नव्हतं, तेवढ्यात फोन ची रींग वाजली आणि मी बेड वराच उड्या मारू लागले. थोड थांबून माझं मला हसू आल, जणू आयुष्यात ज्या गोष्टीची ओढ होती ती गोष्ट मला भेटली याची ती अनुभूती होती. मन आगदी वाऱ्यावरती अखाद्य पक्ष्याप्रमाणे स्वैर संचार करू लागलं होत.

होऊनी पक्षी स्वैर वाऱ्यावरी !
नाचत स्वच्छंदी उनाड वाऱ्यापरी !!
असच काही. मन आगदी उनाड झालेलं.
हॅलो मयारा आहे का?
(मी स्तब्ध झाले होते, विचार नव्हता केला की मला आज कॉल येईल. माझ्या कडे तसा नंबर save होता. पण मी तास दाखवल नाही. )
मी - मी मायरा बोलते.
तू आज आली नाही.
मी - मला ताप आलंय.
हा मग काळजी घे.
मी त्यांचा आवाज ऐकून आगदी स्थिर झाले. जणू काही मला त्यांचाच फोनची वाट पहायचं होतं.
'' अधीर का मन माझे , तुझ्या शब्दानं साठी!
कधी ना झुरळे मन केव्हा कुणा साठी!

एवढंच ऐकायचं होत , मग call का केला, जाऊदे तेवढं तरी !
माझ्या साठी ते तर एक औषधतच होत. आगदी नवीन चेतना माझ्या मनात निर्माण झाली.मी मात्र डॉक्टर कडे न जाता मला बर वाटू लागलं होतं. आंगतला ताप तर निघाला मात्र त्याच्या त्या आवाजाची जादू मला माझ्या मनाला एक वेगळाच ताप चढवून गेला. मी पटापट जाऊन फ्रेश झाली जस मझ्या मध्ये एक नवा जोश आला होता. खरचं ना ! ओढ कशी असते.
'पहिला नाश पहिला खुमार ' अस गाणं गुणगुणत मी आज पूर्ण घर फिरू लागले. तसाच मोबाईल उचलून ताईला call केला. ताई आज मी खूप खूष आहे.
मायरा मला माहित आहे, तुला कोणी तरी call केला होता
करामत नाही वाटतं. अस ती चिडून मला बोलू लागली.
'' इदर भी उदर भी दोनो तरफ लगी ये आग '' . हे गाणं बोलून गेली.
खरच कोणाला सांगायचं की आग तो लगी है, मेरी जान.
आगदी फिल्मी दुनियेत जगत आहे असे वाटत.
तो दिवस तर मी आगदी हवेत होते , कधी एकदा मी कामावर जाते अस वाटत होत.
कसा तरी दिवस गेला मी मात्र ताईची वाट बघत होते. ताई आल्यावर मी तिला फक्त त्याच्या बद्दल विचारात राहिले. ताई सांग ना सर काय बोलले का , मला ओरडले असतील ना , माझं काम कोणी केलं का. असे खूप सारे प्रश्न मी तिला एका श्वासात बोलून टाकले. ताईला मात्र पाणी कुठे तरी मुरत अस वाटल असावं, ती माझ्या कडे बघून हसली आणि निघून गेली. जातांना मात्र मयारा तुला वेड लागले. अस बोलून निघून गेली. खरंच सांगू तुम्हाला खरंच वेड लागलं मला यार !
खरंच तो वेड लागण्या सारखाच आहे तो. मी कामावर असली की माझं पूर्ण लक्ष हे त्याच्या कडेच असत.

ना जुळले सुर कधीचे , ना शब्द जुळले !
ओठा वरती गाणे तुझे नाचत आले!!
सूर जुळले , शब्द ही जुळले !
काव्य मनी मी आज लिहिले!!
हळवे मन हे वेडे मन झाले!
तुझ्या प्रेमासाठी आसुसलेले!!