Ekapeksha in Marathi Comedy stories by Gajendra Kudmate books and stories PDF | एकापेक्षा - अंतिम भाग

Featured Books
Categories
Share

एकापेक्षा - अंतिम भाग

दुसऱ्या दिवशी शाळेत आल्याबरोबर त्या दोन मुलांना प्रिन्सिपल सरांचा ऑफिस मध्ये बोलावण्यात आले. तेथे ते सर अधीच उपस्थित होते आणि त्यांचा बरोबर काही आणखी शिक्षक आणि शिक्षिका आलेल्या होत्या. तर ती दोन मूल प्रीन्सिपल सरांचा ऑफिस मध्ये आल्या आल्या त्या सरांनी त्या दोघांचा वर बॉम्ब फोडण्याचा आरोप लावला आणि त्या दोघांना शाळेतुन काढून टाकण्यास प्रिन्सिपल सरांना संगीतले. मग त्या मुलांनी त्यांचा वर केलेले आरोप सरळपणे नाकारले आणि मग दोघांनी संगीतले की त्या दिवशी आम्ही शाळेत हजर नव्हतो. त्यांनी असे सांगीतल्यावर त्या सरांनी तुरंत त्या मुलांचा वर्ग शिक्षिकेला त्या दिवसाचे हजेरी पुस्तक आणायला संगीतले. ते हजेरी पुस्तक बघीतल्यावर असे सगळ्यांचा निदर्शनास आले की ते दोघे खरच त्या दिवशी शाळेत गैरहजर होते. आता त्या सरांचा पायाची आग मस्तकात गेलीली होती आणि ते
पिसाळलेल्या कुत्र्याचा प्रमाणे वर्तन करू लागले होते. त्यानंतर त्यांनी विचारले ते दोघे शाळेत नाही आले तर कुठे गेलेले होते. यावर मात्र त्या दोघांनी आपेक्ष घेतला आणि ते सांगण्यास नकार दिला. यावेळी मात्र प्रिन्सिपल सरांनी मध्यस्थता केली आणि त्या मुलांना ते कुठ गेले होते याची
साक्ष आणण्यास सांगीतले कारण की सगळ्यांचा संशय त्यांचावर होता मग त्या मुलांचा आई वडिलांना शाळेत बोलावण्यात आले आणी त्यांनी येऊन ते कुठ गेले होते आणि कशाकरीता गेले होते याचे साक्ष त्यानी पिंसिपल सरांना दिले. ते साक्ष एकदम खरे असल्यामुळे अता ती मूल
निर्दोष स्थापीत झालेली होती. मग तो बॉम्ब फोड़ला कुणी या विचाराने विचलीत आणि हैराण होवून ते सर आता पीसाळलेले होते. एकतर शाळेतील सगळ्या मुली अणि शिक्षिका यांचा समोर त्यांची अशी फजीती झालेली होती आणि शिवाय त्या गलिच्छ अशा मुत्रीघराची घाण स्वतःचा तोंडावर घ्यावी लागली होती. म्हणून ते आता शाळेत तोंड लपवून रहायचे त्यांचे ते शेफारने कायमचे बंद झालेले होते. त्या प्रसंगामुळे काही होत किंवा नाहीं होत एक गोष्ट मात्र चांगली झालेली होती. ती म्हणजे शाळेतील वातावरण एकदम शद्ध झालेले होते आणि त्या सरांना आणि त्यांचा पदचीन्हावर चालणाऱ्या आणखी काही शिक्षक यांना एक धड़ा शिकायला मीळाला होता.

तर मित्रांनो, माझ्या शालेय जीवनातील काही निवड़क प्रसंगामधील एक आणखी प्रसंग मी तुमचासोबत शेयर केला. याच सारखा एक आणखी प्रसंग मीं तुम्हाला सांगतो आणि मग तुमची रजा घेतो. अशाच प्रकारचे आणखी प्रसंग आठवून तुमचा पुढे उपस्थित होण्यासाठी. तर हा प्रसंग त्याच वेळेसचा होता म्हणजे आम्ही दहाव्या वर्गात असतांनाचा, तर तेव्हा असे झालेले होते की आम्हाला चित्रकला शिकवण्यासाठी एक शिक्षिका होत्या, त्यांचे नाव मला आठवत नाही. परन्तु त्यांचा तो राग आणि त्यांनी दिलेली शिक्षा ही मी काय माझ्यासारखे सगळे विद्यार्थी कधीच
विसरणार नाही. त्या म्हणायला शिक्षिका होत्या परन्तु त्या एखाद्या रागीट शिक्षकाचा प्रमाणे मारझोड करायचा. त्यांचा चित्रकलेचा तास असला तर त्यांना सगळे साहित्य हे व्यवस्थित पाहिजे होते. कुणी जरी पेन्सिल किवा खोडरबर सुद्धा विसरला तर त्या मुलगी असोत की मुलगा असोत. त्यांचा हातात जे काही असेल ते त्या विद्यार्थ्याला मारायचा. शिवाय हातात जर काही नसेल तर चक्क त्या विद्यार्थ्याचे डोके हे टेबलावर मारायचा. म्हणून आम्ही सगळे त्यांना आणि त्यांचा तासाला बसण्यासाठी घाबरायचो. तर त्यावेळेस दोन दिवसांनी त्या शिक्षिकेचा चित्रकलेचा तास होता आणि आम्हाला तो तास करायचा नव्हता. कारण की आम्हाला शंभर टक्के विश्वास होता की आम्हाला शिक्षा होणार आहे आणि आम्ही त्यांनी सांगीतले चित्र हे जसे पाहिजे तसे रंगवले नव्हते. आम्हाला एक गोष्ट माहित झालेली होती की त्या शिक्षिका गर्भवती होत्या आणि काही दिवसांनी त्या बाळाला जन्म देण्यासाठी सुट्या घेऊन जाणार आहेत. म्हणून आम्ही ते चित्र काही काढले नव्हते आणि अचानक आम्हाला कळले होते की त्या शिक्षिका सुट्ट्यांवर जाण्याचा आधी शेवटचा तास घेणार आहेत.
तर तो दिवस उगवला आणि आम्ही शाळेत हजर झालो. वर्गात आल्याबरोबर आम्हाला वर्गात घाण वास येऊ लागला होता जसे वर्गात एखादा उंदीर मेलेला असावा म्हणून आम्ही वर्गाचा बाहेर उभे राहिलो. तेवढ्यात त्या शिक्षिका तेथे आल्या आणि आम्हाला म्हणाल्या, " हे काय
चालले आहे तुम्ही बाहेर काय करत आहात, चला आत व्हा लवकर आणि मी दिलेला होमवर्क मला दाखवा." त्यांचा तो आवाज आणि त्यांचे ते रुप बघून आमच्यातील कुणाचेच धाडस झाले नाही त्यांना नाही म्हणायचे आणि आम्ही गुपचुप वर्गाचा आत शिरलो. आम्ही आपापल्या जागेवर जाऊन बसलो मग त्या शिक्षिका सुद्धा आल्या आणि त्या सुद्धा त्यांचा स्थानावर स्थानापन्न झाल्या. इकडे त्या घाण वासाने आमचे जीव कासावीस
होत होते आणि तीकडे त्या शिक्षिका वर्गात येऊन आमचा डोक्यावर तांडव करणार होत्या. तर त्या शिक्षिका यांनी म्हटले, " आपापल्या चित्रकलेचे बुक टेबलवर काढून ठेवा मी तपासण्यासाठी येते." आता मात्र आमची चांगलीच फजीती झालेली होती कारण की आम्ही तसले काही चित्र
काढलेच नव्हते तर रंगवणार कुठून, त्या शिक्षीका समोरचा बेंचवरुन तपासत तपासत आमचा बेंचचा आधीचा बेंच जवळ आलेल्या होत्या. तेवढयात दोन चार जणांना फटके आणि काय काय मिळाले होते. तर तेवढ्यात चमत्कार झाला आणि त्या शिक्षिका या ताबडतोब दाराकडे
धावत सुटल्या आणि थेट वर्गाचा बाहेर नीघून गेल्या. आम्ही आधी घाबरलो, मग आश्चर्यचकीत झालो आणि शेवटी आनंदित झालो. कारण की आम्हाला कळले होते की आमचा शिक्षिकेची प्रकुती अचानक बीघडल्यामुळे त्या त्यांचा घरी नीघून गेल्या. आम्ही सगळे त्या निश्चीत अशा शीक्षेपासून बचावलो होतो. तर हा चमत्कार झाला कसा हे तुम्हाला सविस्तर सांगतो.
तर आम्हा सगळ्यांचा नीर्णय झाला की चित्रकलेचा तो तास होऊ द्यायचा नाहीं आणि तो तास बंक करायचा, परन्तु तेथे अळथडा असा होता की आम्ही त्या तासाला गैरहजर राहू शकत नव्हतो. कारण की तसे केले तर आमचा आई बाबांना शाळेत बोलावून आम्हाला शिक्षा करायचा, म्हणून आमचा सोबतचा काही नगित्तर विद्यार्थ्यांनी एक युक्ति केली होती. त्यांनी दोन दिवसांचा आधीच वर्गात चार पाच लिंबू आणले होते. ते लिंबू त्यांनी अर्धे कापले आणि त्यांचा आत पेनाची शाई ओतली होती. शाई आणि लिंबू यात रासायनीक क्रिया झाली आणि दोन दिवसात ते लिंबू सडू लागले होते आणि त्यातून घाण दुर्गन्ध येऊ लागली जसे उंदीर वगैरे मरण पावला आहे. त्या उग्र वासाने त्या शिक्षिकेला उलट्या सरु झालेल्या होत्या म्हणून त्या वर्ग अर्ध्यात सोडून घरी गेल्या आणि नंतर त्या बाळ जन्मल्या नंतर सुद्धा शाळेत आल्या नाही कारण की त्यांनी नौकरी सोड़ली होती, ती आमचामुळे नव्हे तर त्यांचा पतीची दुसऱ्या शहरात बदली झाली म्हणून. तर याप्रकारे माझ्या शालेय जीवनातील हा घाबरवून टाकणारा प्रसंग तुमचा सोबत शेयर केला. आता तुमचा नीरोप घेतो पुन्हा तुमची भेट घेण्यासाठी.
धन्यवाद