Man is the devil and man is God in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | माणूसच भूत आणि माणूसच देव

Featured Books
Categories
Share

माणूसच भूत आणि माणूसच देव

माणूसच देव आणि माणूसच भूत?
*काल एक बस रवाना झाली ज्यात एक ताजातवाना बकरा सजवून होता. विचारणा केली, तेव्हा कळलं कि बकरा कुठेतरी नवसाला कापायला नेत आहेत. त्याचं कारण होतं नवश कबूल करणं. वाच्यता होती की अमूक अमूक व्यक्तीला भुतबाधा झाली होती व भुतानं छळलं होतं. त्यावेळेस त्या देवाला नवश केला व तो व्यक्ती बरा झाला. म्हणूनच तो बकरा बळी देवून नवश फेडण्याचा तो उपाय. ज्यात बकऱ्याचा दोष नव्हताच. देवाला नवश म्हणून कोंबडा, बकरा कापणं वा भुतं असतात म्हणणं आणि मानणं, देवं असतात असं मानणं आणि म्हणणं. खरंच जो देव असा बकरा, कोंबडा वा एखादा जीव बळी म्हणून घेत असेल, तर तो देव कसला? याबाबत प्रश्नचिन्हं कोणाच्याही मनात सहजरित्या उभं राहील. परंतु आताचा शिकलेला समाज त्याकडेही अंधश्रद्धा म्हणून पाहून हो ला हो मिळवत असतो व त्याकडं दुर्लक्ष करतो. यावरुन दुसरं प्रश्नचिन्हं लोकांच्या उच्च शिकण्यावरही लागतं. लोकं उच्च शिक्षीत असूनही भूत मानत असतात नवश मानत असतात. शिवाय विवाह करतांना देवपुजा म्हणून बकऱ्याची व कोंबडीची बळी देत असतात. डायका पाडत असतात आणि नव्या अंधश्रद्धेला जन्म देत असतात. अशा लोकांना मांजर, कुत्रा आडवा गेला की अपशकुन होतो आणि तेवढाच अपशकुन घुबड दिसल्यावर.*
भुतं असतात की नसतात हा एक संभ्रमाचाच प्रश्न आहे. काही लोकं म्हणतात की भुतं नसतात तर काही लोकं म्हणतात की भुतं असतात. परंतु भुतं असतात, असं म्हणणाऱ्यांना विचारलं की तुम्ही भुतं प्रत्यक्षात पाहिली आहेत का? तर त्याचं उत्तर नाही असंच येतं. तोच संदर्भ देवांनाही लागू होतो. काही लोकं म्हणतात की देव असतो तर काही लोकं म्हणतात की देव नसतो. मग सृष्टीचं संचलन कसं चालतं? सृष्टी जर आहे तर देवं असायलाच हवी आणि देवं जर आहेत तर भुतंही असायलाच हवी. तसं पाहिल्यास भुतं संकल्पना ही जास्त प्रमाणात आजही गावागावात अस्तित्वात आहे. जरी लोकं आज शिकत असले तरी आणि जरी लोकांनी भुतं पाहिली नसली तरी. अपवाद काही लोकं भुतं पाहिल्याची पुष्टी करतात. मात्र आम्हालाही दाखवून द्या असं म्हटल्यास ते प्रत्यक्ष प्रमाण देत नाहीत वा दाखवून शकत नाहीत. यावरुन भुतं अस्तित्वात आहेत या मतावर संभ्रम निर्माण होत असतो.
देव प्रत्यक्षात अस्तित्वात आहे किंवा नाही हे काही माहीत नाही. परंतु लोकं पाषाणरुपी दगडाच्या मुर्तीलाच देव मानतात. त्यांनाच सर्वस्व समजून त्यांनाच नवश बोलतात आणि नवश म्हणून कोंबरु, बकरु वा एखादा प्राणी कबूल करतात. कोणी गुप्त धन मिळावं म्हणून नरबळीही कबूल करतात. हे पाप असतं तरीही काही लोकं यात पापपुण्य पाहात नाहीत. परंतु प्रत्यक्षात ती पाषाणरुपी मुर्ती नवश म्हणून तो प्राणी बळी म्हणून देण्याचं कबूल केल्यावर ती खाते का? एखादा अंश तरी? त्याचं उत्तर नाही असंच येईल. मग नवश देणं वा कोंबरु बकरा वा एखादा प्राणी नवश म्हणून बळी देणं या भ्रामक कल्पना आहेत. तरी माणूस त्या पाषाण मुर्तीच्या आहारी जातो. त्याचं कारण म्हणजे आजपर्यंतच्या चालत आलेल्या प्रथा. आपण शिकलो, समजदार झालो. तरीही आपल्या नवश, व्रतवैकल्ये व पुजा पाठ समजलेली नाही. आज पुजेच्या नावावर आपण पाषाणरुपी देवासमोर सर्व प्रकारचं जिनस चढवतो. छप्पन तऱ्हेच्या पदार्थाचे भोग चढवतो. ते श्वानाला वा गाईला टाकतो की जे,त्यांचं अन्न नाही व ज्यातून त्यांचं पोट खरिब होवू शकतं. परंतु ते अन्न एखाद्या गरीब, भिकारी व्यक्तींना देत नाही. नवसाच्या नावावर कोंबडे, बकरे वा एखादा प्राणी कापून नातेवाईकांसाठी गावभोजन करणारी मंडळी, त्या पंक्तीत एखादा अतीव भूक लागलेला भिकारी बसला तर त्याला जेवन देण्याऐवजी चक्कं उठवून हाकलून लावतात. खरंच अशानं तो पाषाणरुपी देव तरी पावेल काय? महत्वाचं म्हणजे भुत आणि देव जरी नसला आणि आत्मा परमात्मा जरी कोणी पाहिला नसला तरी त्या भुकेल्या माणसांना हाकलून देवून त्यांच्या आत्म्यातून जी शापवाणी निघते, त्याचा शाप फार मोठ्या स्वरुपात लागतो हे नाकारता येत नाही.
विशेष बाब ही की पाषाणातील देव हा कधीच कोंबडा बकरा मागत नाही व कोंबडा बकरा त्याला नवश म्हणून बळी देवू नये. आपण त्या पाषाणाला पुजतो, ती आपली श्रद्धा आहे. तो पाषाणातील देव आपलं कधीही बरं वाईट करीत नाहीत. करतं बरवाईट. ते आपले कर्म. आपले जर चांगले कर्म असेल तर आपलं चांगलंच होतं आणि वाईट कर्म असेल तर त्याची परियंती वाईटच होईल.
पाषाणाला देव समजण्याचं कारण असते आपली श्रद्धा. आपल्याला तसं करतांना फार बरं वाटतं. त्यासाठी आपण लाखो रुपयेही खर्च करतो. शिवाय त्या पाषाणी मुर्तीसमोर करमतंही आपल्याला. जर तिथं नवश म्हणून कोंबडा बकरा चढवीत नसतील तर. कारण त्या ठिकाणी स्वच्छता असते व घाणेरडेपणा नसतोच आणि ज्या ठिकाणी कोंबडा बकरा बळी म्हणून चढवतात. त्या ठिकाणी किळस वाटते. माणसाला करमत नाही. महामारीची लागण लागण्याचा संभव असतो. कारण तिथं कोंबडा, बकरा बळी म्हणून दिल्यानंतर जे,रक्त प्रवाहीत होतं. त्या रक्तावर असंख्य घाणीवर बसणाऱ्या माशा घोंगावत असतात. जंतू संसर्ग वाढवीत असतात आणि त्या पिसांवरही माशा आणि जंतू बसत असतात. असे जंतू बसत असतात की जे मांसाचे तुकडे शिजविल्यावरही आपल्याभोवती मांसाचे असे वलय तयार करुन जीवंत राहून पोटात जातात. ज्यातून आपल्याला फार मोठ्या विपरीत प्रमाणावर हानी होत असते. ते जंतू मांस खाल्ल्यानंतर आपल्या पोटाला हानी करीत असतात.
महत्वपुर्ण गोष्ट हीवकी मांस खावूच नये आणि मांस खातांना पाषाणरुपी दगडाला नवश देवून त्या देवाला बदनाम करु नये देव आहे की नाही हे काही स्पष्ट सांगता येत नसलं तरी देव काही भाव घेत नाही आणि तो भाव म्हणून कोणत्याच प्राण्यांचा बळी मागत नाही.
देव हा दगडात वा मंदीरात नाही. तो असतो प्रत्यक्ष जीवांत. जो जीव सजीव आहे. ज्यात झाडं झुडपंही येतात आणि सर्व डोळ्याला न दिसणारे सजीवही. आपण त्यांची हत्या केली तर असा जीव अप्रसन्न होतो आपल्यावर. त्याची शापवाणी लागते व आपले अहित होते व आपलं अहित झालंच तर आपल्याला वाटते की आपल्याला भुतबाधा झाली. मग आपण नवश वैगेरे सारं बोलतो त्या दगडाच्या देवासमोर आणि कावळा फांदीवर बसल्यागत आपण अशा मानसीक आजारारातून बरे होतो. त्याचं कारण असतं आपलं नवश कबूल केल्यानं झालेलं आत्मीक समाधान. असं समाधान आपण नवश कबूल केलं नाही तरी होत असतं परंतु ते कोणीच लक्षात घेत नाही आणि देवाला नवश कबूल करुन व तो देवून बदनाम करीत असतो आपण.
भुतांच्याही संकल्पना अशाच असाव्यात. भुतंही पृथ्वीवर नसावीतच. त्याचं कारण म्हणजे जर भुतं प्रत्यक्षात असतीच तर ज्या निरपराध प्राण्यांचा आपण अन्न म्हणून बळी घेतो वा नवश म्हणून देवाला बळी देतो. ते निरपराध प्राणी भुतं बनली असती व त्यांनी आपल्याला छळलं असतं. परंतु तसं होत नाही. जो जास्त प्रमाणात मांस सेवन करतो. त्याचं शरीर आजच्या काळात सुदृढ असतं. यावरुन भूत नसतंच सृष्टीत याची कल्पना येते. तसाच देवही नसतोच कारण देव जर असता तर अशा निरपराध प्राण्यांचे बळी घेणाऱ्यांना कडक शिक्षा देत आला असता. आज आपण पाहतो की जो जास्त प्रमाणात अपराध करतो, तोच नेता बनतो आणि एकदा का नेता बनलो तर आपली चांदीच चांदी होत असते.
महत्वाचं सांगायचं झाल्यास देव असो का नसो, भूत असो का नसो, आपण त्याचा विचार करु नये. त्यांना त्यांच्या जागी ठेवावं आणि आपण आपलं कर्म चांगलं करावं. हिंसा करु नये. मग ती साधी मुंगी का असेना, तरच आपल्याला त्याचं फळ चांगलं मिळत जाईल. जेणेकरुन आपल्याला आपल्या जीवनात सुख भोगता येईल. शिवाय भुत आहे असं जरी कोणी म्हटलं त्यावर विश्वास ठेवू नये. कारण ते भुत त्यांनी स्वतः पाहिलेलं नसतं. ते फक्त दुसरा घाबरायला हवा. म्हणूनच बोलत असतात कारण बरेचसे आपले आजार हे आपल्या घाबरण्यातून होत असतात व जे भूत आहे असं सांगतात वा भीती दाखवतात. त्यांना तसेच मानसीक रोगी बनवायचे असतात. जेणेकरुन आपण त्यांच्याकडे जावून त्यांचं पोट भरु शकू. तीच मंडळी अमूक अमूक देवाला कोंबडा, बकरा बळी म्हणून द्या असे म्हणून आपल्या हातून पाप घडवून आणत असतात आणि आपल्याच हातातून निरपराध प्राण्यांचा बळी घेत असतात.
विशेष म्हणजे आज आपण शिकलेलो आहोत. उच्च शिक्षण आपण घेतलेले आहे. आपल्या देव दानव यांच्या संकल्पना समजतातच. देव आहे वा नाही. भुतं आहेत किंवा नाही. ते आपल्याला चांगलं समजतं. मग आपल्याला आजच्या काळात बुवाबाजी का समजत नाहीत? आजही आपण पाषाणाला पुजतो. त्याचेवर लाखो रुपये खर्च करतो, जरी आपण उच्च शिकलेले असलो तरी आणि आपण तांत्रीक, मांत्रीक व पुजारी यांच्यावर विश्वास ठेवून निरपराध प्राण्यांचा बळी देतो. आपल्याला कुत्रा आडवा गेल्यास अपशकुन होतो. मांजर आडवे गेल्यास अपशकुन होतो घुबड दिसल्यावर अपशकुन होतो. ह्या अशा व असल्या स्वरुपाच्या अंधश्रद्धाच जर आपल्या मनात वाढत असतील व वेध घेत असतील आपल्या मनाचा तर आपण जे उच्च शिक्षण घेतले आहे. त्याचा आपल्याला उपयोग काय? त्यापेक्षा आपण अडाणी असतो तर,बरे झाले असते असं म्हणायला काहीही हरकत नाही. विचार करावा की जर भुतं असती तर आपण ज्या प्राण्यांचं मांस खातो, त्या प्राण्यांनी भुतं बनून आपल्याला आधीच छळलं असतं. मग आपल्याला जगातल्या कोणत्याच देवानं वाचवलं नसतं हे तेवढंच खरं आणि देव जर असता तर कोंबड्या बकऱ्याचा बळी घेणाऱ्या व उच्च शिक्षण शिकून अंधश्रद्धा पाळणाऱ्या माणसाला कधीच पावला नसता हे तेवढंच खरं आहे यात शंका नाही. म्हणूनच शिकले आहात ना. मग डोळस बना. निरपराध प्राण्यांची हत्या करु नका. अंधश्रद्धा पाळू नका. देवाच्या नावावर होमहवनासाठी झाडंही तोडू नका. तिही एक हत्याच आहे. ज्याचा परिणाम आपण पाहातच आहो. सुर्य जणू आग ओकत आहे. हे असंच जर सुरु राहिलं त तो दिवस दूर नाही की आपण संपून जावू. मग तुम्ही कोणत्याही देवाला कितीही प्राणी बळी म्हणून दिले तरी कोणताच देव वाचविणार नाही. कारण माणूसच देव आहे आणि माणूसच भूत आहे आणि तोच माणूस बळी देवून देवाला बदनाम करीत आहे. हे आपण लक्षात घ्यायला हवे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०