Odh Premachi - 6 in Marathi Love Stories by Madhumita Lone books and stories PDF | ओढ प्रेमाची.... - 6

Featured Books
Categories
Share

ओढ प्रेमाची.... - 6

माया आज नेहमीप्रमाणे कॉलेज मध्ये तिच्या ग्रूपच्या आधी पोहचली होती म्हणुन ती त्यांची कॅन्टीन मध्ये वाट पाहत बसली असताना मागून एक आवाज येतो.

Hii, मी इथे बसू का ? थोडं बोलायचं होतं .

मायाने वळून पाहिल्यावर तिला ओळखीचा चेहरा दिसला, हा तोच होता ज्याच्या बुलेट ल माया पहिल्याच दिवशी धडकली होती , राकेश होता तो . माया थोडी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे एकटक बघत राहिली. त्याने लगेच तिच्यासमोर चुटकी वाजून पुन्हा तिला म्हणाला,
हॅलो, बसू का ?

माया तशी पटकन भानावर येऊन त्याला मानेनेच होकार दिला.

मी राकेश , मे last year ला आहे.

तुला कोण नाही ओळखत, पण पण तुला माझ्याशी काय बोलायचं.

ऍक्च्युली ते तू दोन दिवस आली नव्हतीस आणि त्याच्या आधी तू खूप रडत होतीस मला तुझी काळजी वाटली म्हणून तुला विचारावं असं वाटलं.

थँक्यू माझी काळजी वाटल्याबद्दल पण याच्याशी तुझा काय संबंध.

आर यू करेक्ट बट...

बट व्हॉट मिस्टर राकेश फ्लर्ट करू पाहताय , तुमची डाळ इथे नाही गळणार.

हॅलो मला पण नाही इंटरेस्ट तुझ्यासारख्या मुलींमध्ये बस तुझ्याशी थोडं कन्सल्ट करायचं होतं म्हणून तुझ्याशी बोलायला आलतो.

ओके देन बाय झालं तुमचं कन्सल्ट.

मायचा ग्रुप पण आता तिथे आला होता तसा लगेच राकेश तू निघाला.

माया हा इथे कसा ??? ऋचा न राहून विचारलं.

अगं तुम्हाला कन्सल्ट करायला आला होता. मी दोन दिवस कॉलेजला आली नाही परवा दिवशी रडत होते त्याबद्दल विचारायला होता बिचारा.

बिचाराआणि तो शक्यच नाही , सावी प्राचीला टाळी देत म्हणाली.

माया तू कशी आहेस आणि कशी झाली मग तुझी गावाकडची ट्रिप, शितल ने मायाला विचारलं.

ट्रिप नव्हती का ती आम्ही आजीला बघायला गेलो होतो आणि आजीला घेऊन आलो, चला लेक्चरला जाऊया.

आज मूड नाहीये , इथेच बसुयात का?? अनिकेत आणि गौरंग प्रणवला सुद्धा बोलूया किंवा बाहेर कुठे फिरायला.
प्राचीने सगळ्यांकडे बघितले.

नको बाहेर कुठे नको उशीर झाला तर आजी मला खूप ओरडेल . नाहीतर फाशी देईल.

काही काय माया असं थोडी असतं झाला थोडा उशीर तर कोणी लगेच फाशीला देईल का? ऋचा मायाला म्हणते.

हो माझी आजी देईल ती फार वेगळी तिला माझ्यावर राग या आणि तू कोणत्या ना कोणत्या प्रकारे तिला माझ्यावर काढायचं त्यामुळे माझी एकही चूक म्हणजे मला फाशी.

माया प्लीज असं काही म्हणू नकोस आणि तू अशी कोणती चुकी केली आहेस की तुला तुझी आजी इतकी मोठी शिक्षा देईल ते पण शिल्लक कारणावरून.

तेवढ्यात अनिकेत आणि गौरव सुद्धा कॅन्टीनमध्ये येतात.
प्रणव दिसत नाही? अनिकेत ऋचा ला विचारतो .

अरे तो त्यात लेक्चर अटेंड करतोय थोड्यावेळ जॉईन होईल, मै तू सांग ना तुझी आजी का रागवते तुला.

माया तुला पण कोणतरी ओरडतं हे अशक्य आहे तू किती समजूतदार आणि तरी तुला कोणतरी ओरडत, गौरंग शितल आणि माया या दोघींकडे बघतो.

मी जगले आणि माझा भाऊ माझा दादा एका एक्सीडेंट मध्ये गेला याचा दुःख माझ्या आजीला वाटतं तिला वाटतं मी गेले असते तर बरं कारण तो मुलगा होता म्हणजेच वंशाचा दिवा.

माया हे कधी घडलं तुला भाऊ होता तू कधी मला सांगितलं का नाहीस,

त्याला दहा वर्षे झाली तेव्हा मी आठ वर्षांची होते आम्ही सगळे एका ट्रिप लागेल होतो तिथे अचानक आमच्या एक गाडीचा एक्सीडेंट झाला आणि त्याच्यात माझा दादा गेला तेव्हा मला पण फार लागलं होतं पण देवाने द त्याच्यासोबत नेला आणि मला इथेच ठेवलं रोज मरण्यासाठी फक्त आजी नाही आई बाबा यांना पण वाटतं की माझ्या ऐवजी दादांनी जगायला हवं होतं. मला पण वाईट वाटतं माझ्या दादाच्या जाण्याचे कधी कधी वाटतं त्याचेच आहे की मीच केले असते खूप बरं झालं असतं.

सॉरी माया आम्ही हा विषय काढला आणि तू.... प्राची मायेच्या जवळ जाऊन तिला मिठीत घेते.

नाही यार याच्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही उलट माझं मन मोकळं झालं.

माया तू खरच ग्रेट आहेस इतकं सगळं तुझ्या आयुष्यात घडत पण तू कधीच तुझ्या चेहऱ्यावर दाखवलं नाहीस नेहमी हसत राहिलीस.

थँक्यू पण हे सगळं सुधीर काकांमुळे होतंय त्यांनी माझी ट्रीटमेंट चांगली केली. त्यांनी मला जगण्याचा आधार दिला.

सुधीर काका कोणी आहेत, मागून प्रणव विचारतो.

सुधीर काका सायकॉलॉजिस्ट आहेत. ते माझं कौन्सिलिंग करतात आणि मला त्यांच्यासारखंच एक सायकॉलॉजी बनायचं. यावर्षी स्कॉलरशिप मिळवन सायकॉलॉजिस्ट चा कोर्स करण्यासाठी दिल्लीला जाईल.

माया दिल्लीला जाणार आहेस आणि हे तु आम्हाला आत्ता सांगत आहेस. अनिकेत सगळ्यांचा वतीने बोलतो

अजून स्कॉलरशिप पण मिळाली नाही ना स्कॉलरशिप मिळाली तर मी तुम्हाला सांगणारच होते..

इतक्यात मायला फोन येतो.

बोला मॅडम कशी काय आठवण आली आज.
काय पुण्यात आली आहेस आणि तू आता मला सांगतेस
प्लीज मस्करी करू नकोस खरं सांग
ठीक आहे असे माझे ऑफ लेक्चर चालू आहेत मी तुला आत्ता भेटायला येऊ शकते
तू फ्री आहेस ना
ठीक आहे लगेच निघते आपल्या नेहमीच्या जागेवर भेटूया बाय.

Sorry, मला जावं लागेल माझी मैत्रीण शर्वरी दिल्लीहून काल परत आली मला तिला भेटायला जावं लागेल त्यामुळे मी निघते आता बाय.