Mystery Of Kalasgiri - 3 in Marathi Horror Stories by Sanket Gawande books and stories PDF | कालासगिरीची रहस्यकथा - 3

Featured Books
Categories
Share

कालासगिरीची रहस्यकथा - 3

अध्याय 12

 

सायलीच्या खोलीत तणाव जाणवत होता. प्रत्येक मुलगा-मुलगी आपल्या विचारांमध्ये हरवले होते, त्या जुन्या घरात काय घडले होते ते पचवण्याचा प्रयत्न करत होते.

मीराला असं वाटत होतं की तीते त्यानी जे काही बगीतल त्याहूंनि काही दूसर काहीतरी जास्त आहे.

 

"सायली," मीरा शांतता मोडत म्हणाली,

"त्या घराबद्दल तुला आणखी काही माहिती आहे का? काहीही?"

 

सायली हळूच डोकं हलवली. "खरं सांगायचं तर नाही. मी फक्त इतर लोकांसारख्या गोष्टी ऐकल्या आहेत. पण माझ्या आजीने त्या घरात राहणाऱ्या कुटुंबाबद्दल काहीतरी सांगितलं होतं. ती गोष्ट पूर्ण करण्याआधीच ती थांबायची तीनी कदिच पूर्ण काही सागीतल नाही."

 

हे ऐकून मीराची कुतूहल अधिकच वाढली. "कदाचित आपण तुझ्या आजीशी बोलायला हवं," ती सुचवली.

 

सायली थोडी घाबरली. "ती खूप नाराज होते जेव्हा आपण त्या घराचा उल्लेख करतो. पण आपण प्रयत्न करू."

 

मीरा म्हणाली, "पण त्याआधी आपल्याला नीलू आणि निलेशला इथे बोलवावं लागेल, मला निलेशकडून काहीतरी जाणून घ्यायचं आहे."

 

संध्याकाळ शांततेत बदलली होती जसे वैद्यकीय शिबिरातील सर्वजण सरपंचांच्या वाड्यात परतले. सूर्यास्त होत होता, आणि त्याच्या सोनेरी किरणांनी गावाला आच्छादित केले होते. वाड्याची ओसरी गजबजलेली होती. डॉ. संकते, डॉ. यश, आणि इतर डॉक्टर व परिचारिका, सरपंच महेश आणि श्यामसह, एकत्र बसून प्रसिद्ध संध्याकाळी चहाची  वाट बघत होते.  निलीमा, अन्वी, आणि अपूर्वा सर्वांना चहा देण्यासाठी तयारी करत होत्या.

 

मीरा, सुप्रिया, जयेश, आणि सायली शांतपणे ओसरीकडे आले आणि एका कोपऱ्यात बसले. त्यांनी ठरवले होते की जुन्या घराबद्दलच्या आजच्या घटनेचा उल्लेख कुठेही करायचा नाही. श्याम, जो मुलांना त्यांच्या परतल्यापासून निरीक्षण करत होता, त्यांच्या असामान्य शांततेची नोंद घेत होता.

 

जेव्हा अन्वी, अपूर्वा, आणि निलीमा सर्वांना चहा देत होते, सरपंच महेश डॉक्टरांना विचारले, "गावात काही गंभीर आरोग्य समस्या आहेत का?"

 

डॉ. यश म्हणाले, "आत्तापर्यंत, आम्हाला कोणतेही गंभीर प्रकरण आढळलेले नाहीत. जास्तीत जास्त समस्या मधुमेह, उच्च रक्तदाब, आणि सामान्य कमजोरी यासंबंधित आहेत. पहिला दिवस असल्यामुळे, कमी लोक शिबिरात आले होते. आम्हाला त्यांच्या घरांना भेट देऊन त्यांना तपासणीसाठी यायला प्रोत्साहित करायला हवं. आम्ही एक टीम तयार करून घरोघरी जाऊन सर्वांना वैद्यकीय लक्ष देण्याची योजना आखत आहोत."

 

श्याम मुलांकडे पाहत राहिला, त्यांची अस्वस्थ शांतता लक्षात घेऊन. तो उठला, त्यांच्याकडे गेला, आणि बसला. "हाय, बच्चा पार्टी! गावातला तुमचा पहिला दिवस कसा होता?" तो आनंदाने विचारला. "सायली, तू त्यांना गाव दाखवले का?"

 

सायली थोडी घाबरली, पण मग उत्तर दिलं, "हो, श्याम काका. आम्ही गावात फिरलो, माझ्या मैत्रिणी नीलूच्या घरी गेलो, आणि मग शेतात गेलो. आम्ही आंबे खाल्ले आणि खूप मजा केली."

मीरा म्हणाली, "हो, आम्ही खूप मजा केली!"

श्याम त्यांचे उत्तर विचित्र वाटले आणि पुढे विचारले, "शेताशिवाय अजून कुठे गेला होता? मी शेतातच होतो, सरपंच महेशांसाठी पाण्याची मोटर तपासत, पण मी तुम्हाला तिथे पाहिले नाही."

 

सायलीचा चेहरा फिकट झाला, आणि मीराला धक्का बसला. झाकण्याचा प्रयत्न करत, मीरा म्हणाली, "नाही, आम्ही फक्त शेताजवळच भटकत होतो आणि नंतर परतलो. कदाचित म्हणूनच तुम्ही आम्हाला पाहिले नसेल."

 

श्याम त्यांना पाहत म्हणाला, "मला असं वाटलं की मी काही मुलांना जंगलाच्या दिशेने, त्या जुन्या घराजवळून येताना पाहिलं. ते तुम्हीच नव्हता ना?"

 

सायली आणि मीरा भीलेत. श्याम कदाचित तिच्या वडिलांना सांगेल या भीतीने, मीरा पटकन म्हणाली, "नाही, आम्ही सरळ घरी आलोत काका ."

 

श्याम, सत्य जाणून असून पुढे बोलण्याचा विचार ताड़ला . तो म्हणाला, "ठीक आहे, कदाचित मी कोणीतरी वेगळं पाहिलं. पण लक्षात ठेवा, तुम्ही तिथे जाऊ नका. ते सुरक्षित नाही."

 

तो उठला आणि सरपंचाजवळ बसून दुसऱ्या दिवसाच्या योजनांवर चर्चा करू लागला. त्याने मुलांवर लक्ष ठेवायचं ठरवलं, कारण शहरातील मुलं सहसा गावाच्या गोस्टिन वर विश्वास ठेवत नाहीत आणि अडचणीत येऊ शकतात.

रात्र पडली, महिलांनी जेवण तयार करण्याची तयारी सुरू केली, आणि मुलांनी स्वयंपाकघरात मदत केली. दिवसाच्या भागडोडी ने सगळे थकलेले होते, आणि नेहमीपेक्षा लवकर झोपी गेले.

 

 

======================पुढील भागात============================