खूप दिवसांनी भेटल्यामुळे भावाबहिणींच्या चांगल्याच गप्पा रंगल्या.
मीरा यायची वेळ झाली तशी ती तिथून निघाली.
खाली आली तर गाडी होतीच.
पण ती गाडीत बसणार तेवढ्यात तिचा हात कोणीतरी मागून धरला.
मिष्टि तर दचकून मागे वळून बघते.
पण लगेच मागच्या व्यक्तीला पाहून जरा शांत होते.
"अहो तुम्ही इथे??" मिष्टी.
" अम....हो.....ते मी इथूनच जात होती तर तू दिसलीस म्हणून थांबलो." विराज
चल झूटा!! सकाळपासून तिला बघताच आल नाही म्हणून एवढा खटाटोप...पण सांगणार कस ना 😂
" घरीच निघाली आहेस ना??" विराज तिला विचारतो पण तिचा हात अजुनही त्याच्या हातातच असतो.
"हो मीरा येईल ना घरी आता." मिष्टी लगेच उत्तर देते.
" चल मी पण घरीच चाललो आहे.....एकत्र जाऊ." विराज लगेच आनंदी होत तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडतो.
" अहो पण तुम्हाला काम होत ना!" मिष्टी.
" काम??.....हो....हो काम ते मी करेन नंतर." विराज इकडे तिकडे बघत म्हणतो.
" बर." मिष्टी खिडकी बाहेर बघत म्हणाली.
नाही म्हणलं तरीही ऑफिस मध्ये झालेलं प्रकरण तिच्या मनातून जात नव्हत.....आणि राहून राहून वाटत होत की ह्यांनी जेवण केलं असेल की नाही?? ह्या विचारात स्वतः पण जेवण केलं नव्हते तिने हे ती पूर्णपणे विसरून गेली होती.
त्याला विचारायचं होत पण.....हा पण च खूप मोठा अडथळा होता.
तिच्या हातांच्या चुळबुळ करण्यावरून समजत होत की तिला काहीतरी बोलायचं आहे.
" तुला काही बोलायचं आहे का?? " शेवटी न राहून विराजनेच विचारलं.
" तुम्ही जेवलात का??" त्याच्याकडे बघत तिने विचारलं.
" हो." विराज ने उत्तर दिलं पण ती अस का विचारते आहे त्याला कळलंच नाही.
तिचे का माहिती नाही पण डोळे भरून आले आणि तिने शिताफीने ते लपवत तिची नजर परत बाहेर वळवली.
त्यानंतर त्यांचं काहीच बोलणं झाल नाही.
घरी आले तर तो स्टडी मध्ये आणि ही घरात बिझी झाली.
आता रूटीन सेट झाल होत.....एकमेकांची सवय झाली होती.
रात्री दमून मिष्टी त्यांच्या रूम मध्ये आली विराज अजूनही आला नव्हता.
तिच्या कपाळावर हलक्या आठ्याच पडल्या.
तिने एक नजर घड्याळाकडे पाहिलं तर मध्यरात्र व्हायला आली होती.
" इतक्यावेळ काम करत बसतात आणि मग डोक दुखत म्हणून झोपत नाहीत.....स्वतःची काळजीच नसते काही.....चांगला डबा करून नेला ह्यांच्यासाठी पण नाही काय माहिती काय खाल्ल असेल?? ह्या घरात फक्त मीराच माझं ऐकते......बाकी सगळे नुसती मनमानी करत असतात...."
"जाऊदे तुला काय एवढं पडलय.....तू तुझ आवर आणि झोप."
मिष्टी स्वतःशीच बडबड करत असते.....आवरून झाल्यावर ती बेडवर बसते तर तिची नजर विराज झोपतो त्या ठिकाणी गेली.
काळजी तर खूप होती पण....आलाच शेवटी हा पण!!
तिने हो नाही हो नाही करत विराजच्या स्टडी कडे प्रस्थान केलं.
खूप हिम्मत करून नॉक केलं......सगळ डिजिटल असल्यामुळे त्याने आतून उघडल.
" अहो." मिष्टी तो अजूनही काम करत आहे बघून म्हणाली.
" ह्मममम."
" रात्र व्हायला आली आहे झोपायच नाहीये का??"
त्याने एकदा तीच्याकडे पाहिलं......ती रागात किंवा रुसून बोलत आहे का हे तो फिगर आऊट करत होता पण तिच्या चेहऱ्यावर काळजी दिसली तेव्हा तो हलकेच हसला.
" चल." विराज फाईल बंद करत म्हणाला.
त्याने तिच्यासमोर हात धरला.... तिने त्याच्या हातात हात दिला आणि स्टडी रूम मधून ते त्यांच्या बेडरूम मध्ये आले.
दोघेही आपापली जागा पकडून बेड वर बसले.
" मिष्टी मला मिस करत होतीस का??" विराज तीच्याकडे बघत खट्याळपणे म्हणाला.
" काय??" मिष्टी डोळे मोठे करून म्हणाली.
त्याच हे अनपेक्षितपणे विचारलं तिच्या ध्यानीमनीच नव्हत......एक क्षण तर ती गोंधळली पण तो काय म्हणाला हे आठवताच तिच्या गालावर हलकी गुलाबी शेड आली.
" सांग ना मला मिस करत होतीस जी मला स्टडी मध्ये स्वतः घ्यायला आलीस." विराज तिथेच अडून होता.
" म....मला झोप आली आहे.....मी झोपते." मिष्टी काहितरी म्हणायचं म्हणून पटकन म्हणाली.
विराज ने तसा लगेच तिचा हात पकडला.
" अहं.....आधी मला उत्तर दे मगच झोप." विराज तीच्याकडे बघत खट्याळपणे मान हलवत म्हणाला.
" अहो....ते...ते तुमची झोप पूर्ण होत नाही ना म्हणून मी." तिला पुढे काय बोलावं कळेनाच.
पण त्याला कुठेतरी ती मिस करतच होती की..... जी भावना होती ती त्याच्याबद्दलची ओढ होती की प्रेम??
" मिष्टी ऐक ना...." विराज.
" काय हो??"
" उद्या माझ्याबरोबर येशील??" विराज एकटक तीच्याकडे पाहत म्हणाला.
" हो येईन की....पण मला आधी ऑफिस मधून परमिशन घ्यावी लागेल." मिष्टी बोलत बोलत त्याच्याकडे बघत होती तर ऑफिस च नाव ऐकून त्याचा चेहरा पडलेला पाहिलं होतं म्हणून तिने लगेच पुढे बोलायला सुरुवात केली.
" मी घेईल सुट्टी."
तिच्या ह्या छोट्या वाक्यावर पण त्याचा चेहरा खुलला.
"चालेल....उद्याचा दिवस फक्त आपला... गूड नाईट." विराज खुशितच बेडवर आडवा झाला.
ती ही झोपली आणि कालप्रमाणेच झोपेत एकमेकांच्या मिठीत आले.
.
..
....
.....
सकाळी विराजला जाग आली तर मिष्टी त्याच्या कुशीत शांतपणे त्याला बिलगून झोपली होती आणि झोपेतही तिच्या चेहऱ्यावर निरागस हसू होत.
तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवण्याचा मोह त्याला आवरला नाही.
" किती सॉफ्ट आहे स्किन." विराजच्या मनात विचार चमकून गेला.
आजचा दिवस त्या दोघांचा होता....आज तो त्याच्या मनातलं सगळ तिला सांगणार होता.
त्याच्या स्पर्शाने तिने चुळबुळ केली आणि परत चेहरा त्याच्या छातीवर रब करत परत झोपी गेली.
तिच्या अश्या करण्याने त्याच्या शरीरावर शहाराच आला.
जिमची वेळ झाली तसा तो हळूच उठला आणि तिला नीट झोपवून निघून गेला...
थोड्यावेळाने मिष्टी ला जाग आली नेहमी प्रमाणे तो तिच्या बाजूला न्हवता... आज ऑफिस ला जायचं न्हवतं म्हणून काहीच घाई न्हवती..
आज विराज सोबत बाहेर जायचं होत मनोमन ती खूपच खुश होती.... स्वतः होऊन तो आता प्रत्येक गोष्टी मध्ये पुढाकार घेतोय हे पाहून ती मनोमन सुखावत होती...
ती खुशीतच तीच आवरू लागली... तिने शॉर्ट कुर्ता आणि खाली जीन्स घातली.. मंगळसूत्र छोटंच होत जे तिच्या गळ्यावर उठून दिसत होत... आज केस मोकळे ठेवते असा तिने विचार केला.... डोळ्यात काजळ लावल हलकासा मेकअप करत ती तयार झाली.....
आज ती भलतीच खुश होती.... नकळत विराज साठी एक सॉफ्ट कॉर्नर तयार होत होता.. ती तयार होऊन आधी मीराच्या रूम मध्ये गेली... पण तिथे गेल्यावर समजलं विराज ने तिला ऑलरेडी तयार करून स्कूल साठी पाठवलेलं.... तिचा हिरमोड झाला...
मग ती तशीच खाली आली... विराज सुद्धा खालीच होता पण आज त्याच्यासोबत बाहेर जायचं हेच डोक्यात होत.. ती जरा जास्तच एक्सायटेड होती कि तिला त्याच्यासमोर जायलाच लाज वाटत होती.. खूप ब्लश करत होती ती....
विराज तिलाच बघत होता... खाली आल्या पासून ती इकडे तिकडेच फिरत होती पण त्याच्याकडे बघत न्हवती......
" मिष्टी......" विराज ने मोठ्याने तिला आवाज दिला ती लगेच जरा पळतच त्याच्या जवळ आली.. तरी सुद्धा मान खालीच होती....
कदाचित तो कधी आवाज देतोय याचीच वाट पाहत होती....!!
" निघायचं..?? 🙂 " विराज.....
" उम्म्म हं... हो " असं बोलत ती पटकन बाहेर गेली...... विराज जरा कॉन्फयुज्ड झाला...
" ही लाजतेय का..?? मी तर काही केलंच नाही.... " विराज सुद्धा तिच्या पाठोपाठ गेला....
आज ड्रायवर ही सोबत नव्हता.....आज दोघेच होते... कार मध्ये भयाण शांतता होती...
" तू अशीच गप्प गप्प राहणार आहेस का..?? काहीतरी बोल." विराज...
" अ... मी काय बोलू त... तुम्हीच बोला की... " मिष्टी गोंधळून बोलली... आधीच तिला खूप लाज वाटत होती माहित नाही का... इतके महिने तर होती त्याच्याच रूम मध्ये... 🥲 वरतून आपण 1-2 दिवस झाले त्याच्या मिठी मध्ये पण झोपलेलो.. कारण ती एका कॉर्नर वरून डायरेक्ट त्याच्या जागी येत होती... झोपेतून तिला कळून ही येत नव्हत पण जाणवलं मात्र होत...तरी ती दूर नाही व्हायची..... हे सगळं आठवून ती सकाळ पासून खूपच ब्लश करत होती.....
" तू जर अशीच लाजत आणि गप्प राहिलीस तर कस होईल माझं..?? " विराज हसतच म्हणाला...
मिष्टी ला पण थोडं हसूच आल...!!
....
.......
............
थोड्यावेळाने त्याची कार बीच जवळ थांबली....
" चौपाटी...?? " मिष्टी...
" yess... खूप दिवसांपासून असच मन करत होत बीच वर यायचं so.... आलो इथे घेऊन तुला... डोन्ट वरी पूर्ण दिवस इथेच नाही काढायचा आहे आपल्याला "... विराज
" पूर्ण दिवस इथेच थांबलो तरी आवडेल मला... " मिष्टी गोड हसत म्हणाली....
दोघ पण बीच वर आले.... जास्त गर्दी नव्हती तरी बरेचसे कपल होते.... दोघ पण एका झाडाच्या खाली जाऊन बसले....
मिष्टी जरा शॉक मध्येच होती.....!! ती त्यालाच बघत होती....
" काय असं काय बघतेस..?? " विराज...
" नाही ते म्हणजे मला ना तुमचं वागणं वेगळंच वाटत आहे.... "
" why??? "
" तुम्ही एक बिझनेस मॅन आहात आणि असं बीच वर आला आहात... आणि आपण असं खाली बसलोय.... म्हणजे तुम्हाला असं पॉश ठिकाणी वैगेरे राहायची सवय आहे. मग... " मिष्टी...
" बिझनेस मॅन असलो तरी माणूसच आहे ग मी..... कॉलेज लाईफ मध्ये फ्रेंड्स सोबत नेहमीच यायचो आणि मिरा पण कधी कधी हट्ट करते इथे यायचा... So जास्त काही वाटत नाही..... " विराज....
" अच्छा... " मिरा....
" मिष्टी... तुला कधी प्रश्न नाही का पडला? मी तुझ्याशी मिरा साठी लग्न केलय... पण तुझ्याशीच का...? " विराज...
" तो प्रश्न तर आता पण पडलाय... पण मी जास्त विचार नाही केला... कारण ते उत्तर मिळायला अजून वेळ नाही आली कदाचित.... " मिष्टी...
" आणि ती वेळ आता आली असेल तर.....??? " विराज
" चलो ये भी ठीक हे.... " 🤭
" मला ना तुला ना...बस सांगायचं आहे...लग्न आधी मी तुला इतकंच बोललो कि तू फक्त मिराची आई म्हणून राहायचं... पण मी तुला कधीच माझ्या वाइफ सारखं ट्रीट नाही केल....कारण लग्न मी फक्त मिरा साठीच केलेलं तुझ्याशी..... कारण तू मला ओके वाटलीस तिच्यासाठी.... जेव्हा ऑफिस मध्ये ती आलेली आणि तिला पडताना तू कस वाचवलं मी पाहिलं आणि तिथेच तुमचं बॉडिंग पाहून वाटल तुला कोणी आईच प्रेम देऊ शकेल तर ती व्यक्ती तूच...... मी कधी या गोष्टी मध्ये जास्त लक्ष नाही... दिल पण मिष्टी तू खरंच खूप भारी आहेस..... I mean तू माझ्या फॅमिली ला पण छान प्रकारे ट्रीट करतेस तू मला हे पण नाही विचारलस कि मिरा कोणाची मुलगी आहे..... इतकं काय तुझ्या जागी कोणी दुसरी मुलगी असती तर माझ्या पैश्यांवर मज्जा केली असती.... तू तर जॉब पण करतेस तुझा हजबंड बिझनेस मॅन असून......
विराज कंटिन्यू बोलत जातं होता.... मिष्टीच्या चेहऱ्यावर कधी दुःख तर कधी आनंद असे मिक्स फीलिंग्स होत्या.....
"मला नाही माहित आपलं रिलेशन कधी पुढे जाईल कि नाही...पण मला या सगळ्या साठी खरंच टाईम हवा आहे... होप so तू मला समजून घेशील...."
" हो.... तस मी सुद्धा अजून फीलिंग्स मध्ये कॉन्फयुज्ड आहेच.. मला सुद्धा तितकाच वेळ लागेल.... " मिष्टी... पटकन म्हणाली....
" hmm..... बाय द वे कसल्या फीलिंग्स???? " विराज न समजून म्हणाला.....
" अ... कसल्याच नाही.. " मिष्टी गोंधळून म्हणाली.....
" पण आपण फ्रेंड्स बनूचं शकतो ना??? मिष्टी......" विराज...
" हो नक्कीच..... " मिष्टी हॅप्पी होत म्हणाली.....
" अहो आपण सेल्फी काढायची??" मिष्टी समोर एक कपल फोटो घेताना दिसल तशी ती पटकन म्हणाली.
तो ही हो म्हणाला तस.....दोघ चालत चालत समुद्राजवळ गेले.... दोघांनी बरेच एकमेकांन सोबत सेल्फी काढल्या.... आणि थोड्यावेळाने निघाले तिथून......
तिथून दोघ हॉटेल मध्ये लंच करण्यासाठी गेले...आज तो बरंच तिच्याशी बोलत होता... मिष्टी पण आता त्याच्याशी ओपनली सगळं बोलत होती.....
पण हेच दुरून कोण तरी... त्यांच्यावर नजर ठेवून बसलं होत....
.....
...........
..........
एकदोन दिवसानंतर
.
.
सर आज तुमची XXX company चे CEO MR sagar patil यांच्या सोबत मिटिंग आहे.... कारण आपलं next प्रोजेक्ट त्यांच्याच कंपनी सोबत आहे.... विराज ची PA त्याला म्हणाली.......
" ओके.... "
क्रमशः....