माया दरवाजा उघडून घरात जाते, तिथे तिची आई घर आवारात असते.
आई तू आज गेली नाहीस का कामाला? माया सोफ्यावर बसत आईला विचारते .
अगं, आज आपल्याला गावी जायचं आहे ना, विसरली का?आणि हे काय तुझे डोळे का सुजलेत?मायाच्या आईने तिच्या जवळ येऊन तिला विचारलं .
काही नाही, थोडी तब्येत बरी नाही, माया bedroom च्या दिशेने नी निघाली.
हे काय तुझ नवीन, आता ऐन टायमाच्या वेळेस . तुझे बाबा आता ट्रीप cancel होऊ नाही देणार.
आई पहली गोष्ट एवढं पण काही झालं नाही मला,एक क्रॉसिंची गोळी घेतली की बर वाटेल मला आणि दुसरं आपण ट्रीपला नाही गावी आजीला बघायला जातो आहे, ते पण तुमचं काम आहे म्हणुन., माया जरा रागातच येऊन म्हणाली.
जा लवकर बाबा येच्या आत अवरून घे. बाबा lunch time पर्यंत येतील. संध्या काळी निघणार आहोत आपण बॅग पॅक करून ठेव. मायची मायाला जरा दम दाटून म्हणाली.
तशी माया रूम मध्ये जाऊन जोरात दार दार लावते . बेड वर पडून ती एकटक फॅनकडे बघत होती. कधी तिला झोप लागली कळलं पण नाही
थोड्यावळाने तिची आई तिला जेवयला उठवते.
माया उठ , बाबा आलेत तुझे ,चल जेवण करून घे.
हो, येते आई. माया dinning table वर बसली. तिथे allready बाबा येऊन बसले होते.
माया तुला बर वाटत नाही, तुझी आई म्हणाली होती, आता वाटतं का बरं, चपतीचा घास तोडत बाबा मायाला म्हणाले.
हम , बर वाटतं.आधी पेक्षा बरं वाटतं. ताट समोर घेऊन म्हणाली.
माया हे सगळं आम्ही तुझ्यासाठी करतोय तुझ्या आनंदासाठी, कधी समजून घेणार आहेस आम्हाला.
बाबा प्लीज आता तो विषय नको मी हळूहळू विसरायचा प्रयत्न करते.
अग डॉक्टरने सांगितले तसा मी सगळं करतोय तरी तू खुश दिसत नाहीयेस नेहमी उदास असतेस कधी बोलत नाहीस.
बाबा मी सांगितलं ना मी ठीक आहे. माया हातातील घास खाली ठेवत बोलली. आणि तसं तुम्ही डॉक्टर काकांशी माझी अपॉइंटमेंट फिक्स केली का मला पुढच्या आठवड्यात त्यांच्याकडे जायचंय.
पण तू तर आताच बोलली होतीस ना की तू बरी आहेस आता तुला जायची गरज आहे. माझी आई माझ्याकडे बघत बोलली.
आई डॉक्टर काका आता माझे पुढचे सेशन फ्री करणार आहेत. आणि मी त्यांच्याकडे उपचारासाठी नाही जाते मार्गदर्शनासाठी जात आहे त्यांनी फक्त एवढं सांगितलं होतं की बाबांकडून अपॉइंटमेंट घे.
माया तुझे डोक्यातून अजून ते सायकॉलजी चे भूत उतरलं नाहीये का ? अग आपण नाही करू शकतो कोर्स. त्या कोर्सची फी किती आहे माहितीये ना तुला आणि तेही तुला दिल्लीला जाऊन करायचे.
बाबा मी मी स्कॉलरशिप नी ऍडमिशन मिळूनच घेईल यावर्षी त्यासाठी मला डॉक्टर काकांची मदत हवी आहे . मी डबल मेहनत करेन आणि ऍडमिशन मिळवूनच राहील. माया ठाम निश्चयाने म्हणते.
बर ठीक आहे बघू यात आपण मी घेतो अपॉइंटमेंट एकदा तुला चान्स देऊनच बघूया बघू तू स्वतःला सिद्ध करू शकतेस की नाही. बाबा टेबल वरून उठत बाहेरच्या दिशेने जात म्हणतात.
माया मनातल्या मनात ठाम निश्चय करते की ह्या वर्षी ती स्कॉलरशिप मिळूनच राहणार.
माया बॅग भरली आहेस ना , गाडी आली वाटते बाहेर चला आवरून घे आपण निघणारच आहोत आता.
***********
मायाच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात तिच्या मनासारखं कधीच काही घडलं नाही तिने बारावीनंतर पुढील दोन-तीन महिने हे सगळे स्ट्रेस मध्ये काढले होते. बहुतेक ची दोन-तीन महिने घरी एकटीच असल्यामुळे तिला हा स्ट्रेस जाणवला असेल ती डिप्रेशन मध्ये गेलती या सगळ्यातून ती डॉक्टर काकांमुळेच बाहेर निघाली. ते सायकोलॉजिस्ट होते त्यांच्याकडे सारखे उपचाराला जाण्यामुळे तिच्यावर त्यांचा प्रभाव पडला आणि तिला आता त्यांच्यासारखंच एक मोठं सायकॉलॉजीज व्हायचं पण ते इतकं सोप्पं नाही. या कोर्सची फी फार होती आणि ती तिच्या आई-वडिलांना याविषयी कन्व्हिन्स करू शकली नाही . स्कॉलरशिप मिळवणे हाच एक पर्याय तिच्याजवळ होता यावर्षी तर ती संधी उठली पण पुढच्या वर्षी ती नक्की स्कॉलरशिप देऊन दिल्लीला सायकॉलॉजी फोर्स पूर्ण करणार हा तिचा निश्चय होता.