सुमित ने गुरुजींच्या कानात काहीतरी सांगितले. गुरुजींनी काही क्षण विचार करून सुमितला काहीतरी सांगितले. सुमित विचारात पडला पण त्याने घरमालकाकडून जो फोन नंबर घेतला होता तो लावला. पलीकडे बराच वेळ रिंग वाजू लागली पण कोणीच फोन उचलला नाही.
"गुरुजी कोणी फोन उचलत नाहिये " सुमित
"पुन्हा पुन्हा लावा. आता आपण थांबू शकत नाही. काही करून अनिल ला इथे आणणे आवश्यक आहे. " गुरुजी पोट तिडिकेने म्हणाले.
सुमित वारंवार फोन लावू लागला. इकडे जोसेफाईईन चे डोलणे सुरूच होते. सहाव्या प्रयत्नात पलीकडे कोणीतरी फोन उचलला. कोणीतरी झोपाळू आवाजात सुमितशी बोललं पण सुमित ने जे सांगितलं ते ऐकून पलीकडच्या माणसाची खाडकन झोप उडाली. सुमित ने त्याला निरोप दिला आणि फोन ठेवून दिला.
साधारण अर्ध्यातासाने एक व्हॅन सोसायटी मध्ये येऊन थांबली. त्यातून दोन वार्ड बॉयीज एका इसमाला घेऊन उतरले. त्या इसमाचे हात साखळ दांडाने बांधले होते, केसं पिंजारले आणि डोळे तांबारले होते. तोंडाने तो काहीतरी बडबडत येत होता. फ्लॅट मध्ये शिरल्यावर तोच अनिल असावा हे त्याच्या अविरभावामुळे सगळ्यांनी ओळखले.
इकडे जोसेफाईन स्वतःभोवती पिंगा घेत होती तेवढ्यात गुरुजी जरबेने म्हणाले, " वो देख! तेरा अनिल आ गया!"
गुरुजींचा आवाज ऐकून जोसेफाईन ने 360 degree मध्ये मान वळवली आणि अनिल कडे एकटक पाहू लागली. अनिलचे मात्र लक्ष नव्हते तो छताकडे बघत काहीतरी हातवारे करत बडबडत होता.
जोसेफाईनने अनिल कडे झेप घेतली पण भोवतालच्या अभिमंत्रित रिंगणामुळे ती पुन्हा आत फेकल्या गेली.
"मुझे अनिल चाहिये..." ती जोर्रात ओरडली.
गुरुजींनी थोडं पाणी घेतलं आणि पुन्हा काही क्षण डोळे मिटून काहीतरी म्हंटल आणि ते पाणी त्या रिंगणा भोवती शिंपडलं व म्हणाले " अब जा.. "
जोसेफाईन हळू हळू अनिल कडे चालत गेली आणि एका क्षणात काय झालं काय माहित पण जोसेफाईन गायब झाली आणि अनिल जोरजोरात उड्या मारू लागला. अनिल मध्ये अफाट शक्ती आली त्याने दोन्ही वॉर्ड बॉयज च्या हातांना झटका दिला आणि तो बाणासारखा बाल्कनीत गेला आणि दहाव्या मजल्यावरून त्याने उडी टाकली.
झालेल्या प्रकाराने गुरुजी, सुमित सुपर्णा, सगळेच हबकून गेले. अनिल च्या शरीरातील जोसेफाईन असे काही करेल ह्याचा कोणालाच अंदाज नव्हता. काही क्षण एकदम भीषण शांतता पसरली.
गुरुजी डोक्याला हात लावून म्हणाले, "उगीच मी तिला रिंगणा बाहेर जाऊ दिलं. "
"गुरुजी त्यात तुमची काही चूक नाही. अश्या अतींद्रिय शक्ती चा कुठलाही माणूस काय अंदाज लावू शकणार आहे?" सुमित म्हणाला.
सगळे खाली धावत गेले. सोसायटी तील वॉचमन अनिल पडला तिथे गोळा झाले. लगेच अनिल ला हॉस्पिटल मध्ये नेण्यात येणार पण त्याआधीच तो मृत झाला होता.
ज्या इस्पितळात तो होता त्यांना कळवण्यात आलं. त्यानंतर यथावकाश जे सोपस्कार आहे ते सगळे झाले.
झालेल्या अनपेक्षित घटने मुळे सुमित कडे सगळे सुन्न झाले होते. काही वेळाने सुमितच गुरुजींना म्हणाला,
" गुरुजी आता काय करायचं? "
गुरुजी काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते जरावेळ शांत बसले आणि तेवढ्यात घरात पुन्हा तोच उग्र घाणेरडा वास येऊ लागला. गुरुजी ताडकन उठले त्यांनी पुन्हा त्या पाटाभोवती अभिमंत्रित रिंगण तयार केलं आणि काय आश्चर्य!! रिंगणात आता एक नव्हे दोन धूसर आकृत्या दिसू लागल्या. ते पाहताच सगळ्यांचे डोळे विसफ़ारल्या गेले. आता रिंगणात जोसेफाईन च्या आत्म्यासोबत अनिल चा ही आत्मा आला होता.
गुरुजींनी पुन्हा त्यांना काय पाहिजे ते विचारलं. त्यांनी 'तन्मय ' चं नाव घेतलं. एव्हाना शेजारी पाजारी सुमितकडे जमले होते. त्यांच्याकडे तन्मय ची चौकशी केल्यावर तो समोरच्याच बिल्डिंग मध्ये राहायचा असे कळले पण त्याने सुद्धा सुसाईड केली असल्याचे कळले. ते ऐकून गुरुजींनी काही मिनिटं थोडी राख हातात धरून काही पुटपुटत म्हंटल आणि त्या रिंगणात ती राख फेकताच त्यात तिसरी आकृती निर्माण होऊ लागली. काही क्षणातच त्यात आणखी एक धूसर आकृती तयार झाली. आता रिंगणात जोसेफाईन, अनिल आणि तन्मय चे आत्मे थरथर कापत उभे राहिले.
गुरुजींनी त्या तिघांना पुन्हा काय पाहिजे विचारताच ते आम्हाला ह्यातून सुटका पाहिजे, ह्या पिशाच्च योनीतून मुक्ती पाहिजे म्हणत गयावया करू लागले.
त्यांचं बोलणं ऐकून गुरुजी काही वेळ डोळे मिटून ध्यान लावून बसले आणि लगेच झटका लागल्यासारखे त्यांनी डोळे उघडले.
"नाही ते कदापि शक्य नाही. तुम्हाला मुक्ती देणं माझ्या हातात नाही पण ह्या घराला आणि ह्या परिसराला मात्र मी तुमच्यापासून मुक्त करणार. " असं म्हणून गुरुजींनी त्यांच्या जवळच्या पिशवीतली एक बाटली काढली आणि त्याचं झाकण उघडलं. लगेच त्यांनी थोडी राख हातात घेतली आणि काहीतरी मंत्र पुतपुटून ती राख त्या तिन्ही पिशाच्यांच्या अंगावर टाकून दिली. ती राख टाकताच त्या तिन्ही पिशाचांची वाफ झाली व ती त्या उघड्या बाटली मध्ये गेली. गुरुजींनी लगेच त्या बाटलीला झाकण लावले आणि आपल्या पिशवीत ठेवून दिली. सगळे जण पुतळ्या प्रमाणे स्तब्ध झाले होते. कोणाच्याच तोंडून अवाक्षर ही निघत नव्हतं. गुरुजींचा चेहरा मात्र मोठ्ठ ओझं उतरल्यासारखा शांत झाला होता.
"चला! माझं काम झालं. आता हे घर आणि परिसर शुद्ध झाले आहे. तुम्ही खुशाल इथे राहू शकता. " गुरुजी सुमित सुपर्णा ला म्हणाले.
झालेल्या प्रकाराने आत्या आणि श्वेता ला जब्बर धक्का बसला होता. त्यांनाही गुरुजींनी धीर दिला व ते जायला वळले.
त्यानंतरची प्रत्येक रात्र, दिवस सुमित सुपर्णा अगदी नॉर्मल राहिले लवकरच त्यांनी तोच ए 1002 फ्लॅट विकतच घेतला आणि वास्तू पूजा ही केली तेव्हा सगळ्यांना त्यांनी बोलावलं अगदी गुरुजींना सुद्धा. त्यादिवशी सुमित ने त्यांना एक शंका विचारली
" गुरुजी ती बाटली तुम्ही कुठे टाकली? "
गुरुजींनी हसतच एक चित्र दाखवलं. ते पाहून सुमित म्हणाला, " हे... हे तर दक्षिण आफ्रिकेतील जंगल आहे!!"
"हो तिथेच एका झाडाच्या बुंध्याखाली गाडून टाकली."
"पण तुम्ही त्यासाठी एवढ्या लांब गेला होतात?" सुमित ने आश्चर्यने विचारले.
"नाही, नाही. माझा एक शिष्य तिथे राहतो. त्याला मी कुरिअर ने बाटली पाठवली. "
"मस्करी करताय न गुरुजी? कसं शक्य आहे? मध्येत कोणी बाटली उघडली असेल तर?" सुमित साशंक आवाजात म्हणाला.
"अरे! गावाबाहेरच्या स्मशानातील चिंचेच्या झाडाखाली स्वतःच्या हातानी गाडून आलोय. आता कोणत्याच जन्मात त्या बाटलीचे झाकण उघडू शकत नाही. तू निश्चिन्त राहा " असं म्हणून आशीर्वाद देऊन गुरुजींनी प्रस्थान केले.
समाप्त