Odh - Premkatha - Last Part in Marathi Love Stories by Nikhil Deore books and stories PDF | ओढ - प्रेमकथा - (शेवट भाग)

Featured Books
Categories
Share

ओढ - प्रेमकथा - (शेवट भाग)

मध्य वरून पुढे

विचारांच दोलन सारख मागे पुढे झुलत होत.. त्यातला एक विचार अती उच्च तर दुसरा फारच शूद्र वाटत होता. नकूलसाठी यापुढचा मार्ग फार काही सोयीस्कर नव्हता. तसं पाहिल तर स्थिती एवढीही गुंतागुंतीची, क्लिष्ट नव्हती. सर्व हिशोब तर व्यवस्थित मांडून होता. दिग्दर्शक या क्षेत्रावरच नकूलने जीवापाड प्रेम केल होत. अगदी बेंबीच्या देठापासून झोपता उठता एकच स्वप्न त्याने पाहिलं होत यशस्वी लेखक, दिग्दर्शक व्हायच. मग आज त्याला त्याची पाऊले का जड वाटत होती? मनाच्या कुठल्यातरी अज्ञात कोपऱ्यात तीच हलकस नाव कोरून होत का? मनाच्या शांत नीलवर्णी सरोवरात तीचही लहकस प्रतिबिंब उमटून होत का? बरेच प्रश्न त्याच्या मनावर तरंगत होते आणी त्या सर्वांच उत्तर एकच होत ' ठाऊक नाही'.

'ही ओढ मला अधिकच खेचत जाईल.. मी स्वतःला वेळीच सावरायला हवं. स्पष्टपणे समोर पाहायला हवं..या ओढीमध्ये लगेच वाहवत जाण माझ्यासाठी जराही योग्य नाही. पुढे संपूर्ण कॅरियर उभं आहे' नकूल स्वतःलाच समाजावत होता. खरंतर ह्या सर्व गोष्टी त्याला समजत होत्या पण जीवनाचा परमार्थ उमजत नव्हता.. जीवनाची दिशा दिसत नव्हती.

रात्रीचे अकरा वाजले. त्याने किचन मध्ये जाऊन गॅसवर कॉफी ठेवली. यावेळी त्याने कॉफीत जरा जास्तच साखर घातली. काही वेळात त्याने ती कॉफी कपात ओतून घेतली. विचारांचे पर्णे अजूनही फडफडत हलत होती.
" जर या कॉफीतून साखर कायमचीच काढून टाकली तर काय होईल?" प्रश्नाच्या फेसाळत्या लाटेत त्याच्या विचारांचा किल्ला आत शिरत चालला होता. वास्तविक हा प्रश्न त्याच्यासाठी फार आवश्यक होता. किमान काही आत्म आंतरीक उत्तरे त्यात लपून होती.
" कदाचित कॉफी फार कडू लागेल किंवा कॉफी बेचव होईल. आणखी स्पष्टीकरण देऊन सांगायचे झाल्यास कॉफी पिण्याची अजिबातच ईच्छा होणार नाही". या उत्तराने तो जरासा चमकला.
समोरच सर्वकाही स्वच्छ झाल होत. त्याने डायरेक्टर प्रभास यांना फोन केला
" हॅलो सर मी उद्या शेवटच्या शॉर्टला येऊ शकणार नाही. सो प्लीज सर तुम्ही स्वतः तो शॉर्ट करून घ्याल का?" नकूलचा स्वर छेडलेल्या तारा जश्या शांत होऊ लागतात तसा झाला.
" काय? वेड लागलंय का तूला? या सर्व कथेच जे हृदय आहे तो म्हणजे हा शेवटचा शॉर्ट आणी इतक्या महत्वाच्या शॉर्टला तू येत नाही म्हणतोस.. काय पागल झालायस का तू? कॅरिअरची काही पर्वा बिरवा आहे की नाही.. की कॅरिअर सुरु व्हायच्या आधीच बॅक टू पावेलियन जायचं आहे? " डायरेक्टर प्रभास यांचा क्रोध परकोटीला पोहचला होता.
" पण सर माझं उद्या तिला भेटणं फार उर्जेन्ट आहे.. नाहीतर"
" नाहीतर काय?" डायरेक्टर प्रभास यांचा क्रोध कमालीचा उसळत होता.
" नाहीतर सर काही गोष्टी कायमच्या हातून निसटून जाईल..हा पैसा, हे नाव मी पून्हा कधीतरी मिळवेलच पण काही गोष्टीसाठी वेळेची सीमा नियोजित असते म्हणून मला उद्या ते पुर्ण करण अनिवार्य आहे " नकुलच्या शब्दातली तळमळ दिसून येत होते. त्याचे आर्जवी शब्द त्यातली ओढ दर्शवीत होते.
" ठीक आहे नकूल जशी तुझी इच्छा पण तो शॉर्ट जर व्यवस्थित पुर्ण झाला नाही तर त्याला सर्वस्वी जबाबदार तू असशील ".
" हो सर " फोन ठेवत नकूल म्हणाला.

आता ईथे व्यवस्थित पाहायला गेल्यास नकूलला मनातून वाईट वाटायला हवं होत पण तसं काहीही झाल नाही उलट तो फार आनंदी दिसत होता.

सकाळचा अलार्म कितीतरी वेळ खणाणला आणी शांतही झाला. घड्याळात पाहिले असल्यास नऊ वाजले होते असं दिसत होत. रात्री बऱ्याच वेळ जागरण केल्यामुळे नकूलला पहाटे लवकर जाग येईल याची शक्यता फार धूसर होती.
" अरे बापरे! नऊ वाजले " घड्याळात पाहून केस हलवत नकूल स्वतःशीच म्हणाला. त्याने पटापट सर्व आवरायला घेतलं. अंघोळ वैगेरे करून तयार झाला. पांढर शर्ट आणी निळा पॅन्ट परिधान करूत आरश्यासमोर कॉम्बिनेशन जमलं की नाही याची तो परत परत खातरजमा करीत होता. तो स्वतः assistant डायरेक्टर होता.. आतापर्यंत तरी त्याने कधी स्वतःला असं निरखून पाहिलं नव्हतं. आज एवढं काय विशेष होत? कितीही मोठ शूट असलं किंवा कितीही भव्य पार्टी असली तरीही तो स्वतःच्या पेहराव्यावर फार काही लक्ष देत नसे.
वेष असावा बावळा परी अंगी असाव्या नाना कला या उक्ती जणू त्याच्यासाठीच लिहल्या आहेत की काय असं वाटायचं. सर्वकाही परफेक्ट आहे याची संपूर्ण शहानिशा झाल्यावर त्याने माईल्ड परफुयम कपडयावर मारला .. त्या सुगंधाने त्याचा उत्सुकतेला उधान आल होत.

साधारणतः अकरा वाजता तो अमृताच्या घरी जायला निघाला. वाटेत फुलाच्या दुकानातून लाल, पिवळ्या गुलाबाच्या फुलांचा गुच्छा घेतला. मध्येच हार्ट शेप स्टिकर लावून Get Well Soon मोठ्या अक्षरात लिहलं.. मेकअप आर्टिस्टने सांगितलेल्या पत्ताकडे त्याची कार धावू लागली होती. पोटात असंख्य फुलपाखरे थव्याने लयबद्ध रेषेत उडून गुदगुल्या व्हावी अशी त्याची अवस्था होती. तीच घर खूपच आतल्या गल्लीत होत.

कार तिच्या घराच्या काही अंतरावर थांबली. बाहेर कडाक्याच ऊन पडलं होत तरीही त्याला थंडी जाणवत होती. ईथुन कार आत शिरू शकत नव्हती म्हणून तो तसाच पायदळ चालत निघाला. पावलागणिक अंगावर अबोली, केतकी पुष्पाचा सडा पडतोय की काय असा भास व्हायचा. मनातून जरासा घाबरलाही होता. तो शेवटी तिच्या घराजवळ पोहचला. घराच्या बाजूला भलमोठ गुलमोहराच झाड होत. त्याबाजूलाच चहाची टपरी होती..तिथे जुन्या काळातला रेडिओ सुरु होता.. रेडिओवर ' ही कशान धुंदी आली.. काही समज ना काही उमज ना ' हे गीत त्याच्या मनाला अलवार स्पर्शून जात होत. त्याने बाहेर शूज काढताच अमृताची आई बाहेर आली.
" नमस्कार.. मी assistant डायरेक्टर नकूल" हात जोडत नकुलने अमृताच्या आईला अभिवंदन केलं.
" नमस्कार नमस्कार... हो अमृताने सांगितलंय तुमच्याबद्दल" तिची आई जराशी गोंधळूनच गेली होती.
" या ना घरात.. ते काय आहे.. आज आम्ही हे शहर सोडून जातोय ना म्हणून जरा आवरा आवर केलीय त्यामुळे जरा जास्तच पसारा वाढलाय".
" अमृता कुठाय?" नकुलने सरळ मुद्द्यालाच हात घातला.
" ती तिच्या खोलीत झोपून आहे.. तिला बर नव्हत काही दिवस.. आता ताप कमी झालाय पण अशक्तपणा अजून गेला नाही".
" हो ते कळलं मला म्हणूनच तर भेटायला आलोय ना इथे तिला". नकूलला तिला कधी पाहतो आणी कधी नाही असं झालं होत.
" तुम्ही जा तिच्या खोलीत मी तुमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते ".
" हो चालेल " नकूलनेही चहा नाश्त्यासाठी नकार दिला नाही कारण तेवढाच त्यांना एकांतात बोलायला वेळ मिळणार होता.

नकूल हळूच तिच्या खोलीत जरा दबकत दबकतच शिरला.. बाजूला खिडकीला लागून तीचा कॉट होता. डोळे बंद करून ती शांतपणे निजून होती. चेहऱ्यावरच तेज जरा ओसरल होत. केस रुक्ष दिसत होते.
" अमृता " नकूलने हलकेच आवाज दिला. तशी ती हळुवार डोळे उघडत उठली. आधी समोरच सर्वकाही अंधुक दिसत होत मग आकाश स्वच्छ व्हावं तसं सर्वकाही स्वच्छ झाल.
" सर सर तुम्ही ईथे " रुक्ष केस व्यवस्थित करत ती म्हणाली. तिची धांदलीमूळे नकुलला आतून हसू येत होत तरीही बनावट शांतता दाखवत तो म्हणाला
" डिस्टर्ब तर नाही केलं ना? "
" नाही नाही सर.. मुळीच नाही" ती कशीतरी कॉटवरच बसून होती.
" आता कशी आहे तब्येत? " तिच्या डोळ्यात पाहत नकूलने विचारले.
" बरी आहे " मृदू आवाजात ती म्हणाली. खरंतर नकूलला या रूपात ती पहिल्यांदाच पाहत होती. नकूल म्हणजे मुलखाचा अबोल आणी माणूसघाणेपणाचा उच्च बिंदू असं तिला वाटायचं.
" अरे हो..हे द्यायचं तर राहूनच गेलं.. गेट वेल सून अमृता" नकूल हसत होता अगदी खळखळून.
" थांबा सर मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते.. तुम्हाला आवडते ना" ती उठून जायला पाहत होती.
" नको नको तू आराम कर But strange तूला कसं ठाऊक मला कॉफी आवडते म्हणून " नकूलच्या कपाळावर आठ्या जमल्या होत्या.
" अहो सर मला काय सर्वांनाच ठाऊक आहे तसं तर शूटिंगच्या सेटवरच्या प्रत्येकालाच ठाऊक आहे की तुम्हाला कॉफी किती प्रिय आहे ती".
" अच्छा " त्याच्या चेहरा पून्हा स्थीर झाला.
" पण सर तुम्ही ईथे कसे काय.. आज तर तुमचा शेवटचा शॉर्ट आहे ना आणी तो किती महत्वाचा आहे हे मला ठाऊक आहे.. तो शॉर्ट सोडून सोडून तुम्ही ईथे आलात.. कश्यासाठी? हा शेवटचा सीन म्हणजे या कथेचा जीव की प्राण आहे आणी तुम्ही तिथे हजर नाही.. का असं? मी शेवटची कथा तुमच्या ब्लॉग पोस्ट वर वाचली आहे. तुम्ही जेव्हापासून लेखक होता तेव्हापासून फॉलो करतेय मी तुम्हाला. जवळपास सर्वच कथा अधाश्यासारख्या वाचल्या आहे तुमच्या आणी आता 'मनवा' ही जी कथा लिहताय ते ही वाचतच आहे. फक्त सेटवर कधी बोलणं नाही झालं कारण मला जसे अपेक्षित होता तसे तुम्ही अजिबातच नाही.. कथेत एवढे सुंदर संवाद लिहता पण खऱ्या आयुष्यात तुम्ही कुणाशीच बोलत नाही म्हणून मी ही कधी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. बर हे सर्व जाऊ द्या तुम्ही तो शेवटचा सिन सोडून ईथे काय करताय? " एवढ्या वेळपर्यंत बोलणारी अमृता लगेच शांत झाली.
" माझा नंबर आहे ना तुझ्याकडे? " नकूलने तीच काहीच ऐकल नाही.
" नाही " ती मान खाली घालत म्हणाली.
" ओके माझा नंबर सेव्ह करून घे "
" ठीक आहे " अमृताने नकूलचा नंबर सेव्ह करून घेतला.
" सर पण तुम्ही अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही... तुम्ही ईथे काय करताय ते ही तुमच्या करियराचा एवढा महत्वाचा सिन सोडून? " तिने पून्हा विषयाला हात घातला.
" तूला काय वाटतं मी का आलो असेल इथे.. फक्त तुझ्यासाठी.. माझ्या कॅरियरचा सर्वात महत्वाचा सिन सोडून फक्त तुझ्यासाठी आलोय मी इथे..तूला पाहायला" नकूल तिच्या हाताला स्पर्श करीत हळूवार म्हणाला.
" म्हणजे सर..... "
" शह्ह सर नाही नकूल म्हणायचं " तो तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होता... ती लाजून जास्वनंदासारखी लाललाल झाली होती.
" जे काही दूरवर आहे त्याची ओढ कायम मनाला असते... ते कितीही दूर असो त्यांची ओढ कधीही कमी होत नाही.. मन त्यांनाच शोधत असतं .. त्यांच्यातच आपल जग असतं.. काही गोष्टी शब्दांनी नाही तर मनाने ओळखायला हव्या" एवढं स्पष्ट स्वरात बोलून तो परत जाऊ लागला... हेच डायलॉग होते जे त्याने स्क्रिप्ट मधून खोडून टाकले होते. पण खऱ्या आयुष्यात ते संवाद कामी आले होते. त्या भावना नकूलला उमगल्या होत्या..त्याने तिच्या खोलीचा दरवाजा मागे सोडला आणी पून्हा वळून पाहिलं ती ही त्यालाच पाहत होती. दोघांचीही नजरभेट झाली.. खट्याळ हास्य त्यात लपून होत. एवढ्यात टपरीच्या रेडिओवर सुरु असलेलं गीत त्यांच्या कानावर पडत होत.
❤️❤️ ओठातले शब्दाविना कळले तूला कळले मला
❤️❤️

समाप्त
🙏 आपल्याला ही कथा कशी वाटली हे अभिप्रायाने, स्टिकर देऊन कळवा... भेटू पून्हा नव्या कथेत 😊🙏🙏