Let's plant at least one tree at every house in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | घरोघरी एक तरी झाड लावूया

Featured Books
Categories
Share

घरोघरी एक तरी झाड लावूया

घरोघरी एक तरी झाड लावूया

झाड........ सध्या महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात नाही तर संपूर्ण देशातच उष्णतामान वाढलं आहे. महाराष्ट्राचा विचार केल्या गेला तर महाराष्ट्रात यवतमाळ आणि चंद्रपूर हे जास्त तापमानाचे जिल्हे म्हणून प्रसिद्ध आहेत. दरवर्षीच त्या जिल्ह्यात भयंकर मोठ्या प्रमाणावर तापमान असतं. मात्र यावर्षी यवतमाळ ऐवजी व चंद्रपूर ऐवजी अकोला जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागला, तापमान वाढीत. त्याचं कारण काय असावं?
विदर्भाचं तापमान वाढत आहे. याला कारणीभूत असतात झाडं. मग विदर्भात झाडं नाहीत का आणि झाडं नाहीत तर जंगलाचे भाग कसे दिसतात? आज हाच भाग फिरायला निघालो तर झाडंच झाडं दिसतात शिवारात. मग तरीही आपली ओरड की विदर्भाच्या या मातीत झाडं नाहीत. ती आपली ओरड का असावी? त्याचं कारण आहे जरी आपल्याला शिवारात झाडं दिसत असली तरी त्या झाडांची संख्या कमी आहे कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या मानाने. विदर्भात आंबा, पिंपळ, वड, कडूनिंब यासारखी विशाल झाडं आहेत. जी झाडं जास्तीत जास्त पाणी धारण करण्याची क्षमता ठेवतात. अशोक झाडं कोकणात कमी प्रमाणात आहेत. अशा झाडांची मुलं पाणी मिळविण्यासाठी जमीनीत खोलवर गेलेली असतात. परंतु ती झाडं अख्खी इमारत पाडून टाकतात. म्हणूनच लोकं ती शिवारात लावतात व घरी लावत नाहीत. तसं पाहिल्यास विदर्भात नारळाची झाडं कमी आहेत. कारण त्याला पोषक वातावरण नाही. सुपारीची झाडं कमी आहेत. कारण त्यालाही पोषक वातावरण नाही. मात्र कोकणात ती झाडं घरोघरी आहेत शिवारात तर अतिशय जास्त संख्येनं आहेत. त्या भागात शिवारात कोणतं आणि गावालगत कोणतं हे ओळखूच येत नाहीत, एवढी झाडं आहेत. जर विदर्भात आणि कोकणात झाडांची मोजणी केली तर नक्कीच त्या भागात झाडं जास्त दिसतील. यावरुन कोकणात लोकसंख्या कमी आहे असा याचा अर्थ नाही. कोकणातही लोकसंख्या जास्त आहे.
कोकणाच्या प्रदेशात प्रवेश करताच उन्हाची जास्त तीव्रता दिसत नाही. कारण तिथं पाऊस जास्त पडतो. थंड व आल्हाददायक वातावरण आहे. त्याचं कारण आहे झाडं. झाड हे प्रत्येक घरी लावलेलं असतं. एका एका घरी नारळ, फणस व सुपारीची दोन दोन चार चार झाडं दिसतात. काही घरी जास्तही झाडं दिसतात. तशी झाडं विदर्भात घराघरात दिसत नाहीत.
विदर्भात पुर्वी एका एका गावात चौकाचौकात एक विशाल झाड असायचं. त्या झाडाला ओटा असायचा. त्या झाडावरील ओट्यावर लोकं सांजच्याला बसायचे. परंतु आता तो ओटा बऱ्याच गावात दिसत नाही. गावात झाडं राहायचं चौकाचौकात हे आताच्या पिढीला माहीतच नाही वा त्या विशाल झाडाला एक ओटाही असायचा. तेही आताच्या पिढीला माहीत नाही. कारण ते झाड आता तुटलेलं आहे. का तुटलेलं आहे वा का तोडलं? हे कळायला मार्गही नाही.
आज गावागावात दिसणारं एक चौकातील झाड दिसत नाही. मग एका घरी एक झाड तरी कसं दिसेल? इमारतीच्या भिंती तडकतात, म्हणून घराजवळ झाड लावलं जात नाही. शिवाराची जर गोष्ट केली तर शिवारातील शेतात पेरलेलं पीक होत नाही अर्थात पीकत नाही. म्हणूनच शेताच्या पारावर नैसर्गीकरित्या लागलेली झाडं तोडली जातात.
आज पाऊस पडत नाही. तापमान अतिशय वाढलेलं आहे. कारण झाडं नाहीत. लोकं झाडं लावावी असं म्हणतात. परंतु आपण स्वतः लावत नाहीत. फक्त सांगतात. एखादा व्यक्ती कदाचीत लावतोही. परंतु त्याचं जतन करीत नाही. शिवाय एखाद्यानं लावण्याचा प्रयत्न केला तर सारे लोकं हसतात. म्हणूनच लावणाराही व्यक्ती झाड लावत नाही. हं, तोडतांना मात्र विचार नसतो. झाड हमखास तोडलं जातं. त्यावेळेस विचारही केला जात नाही की एवढं विशाल झाड मी तोडलं. खरंच एवढं विशाल झाड तयार व्हायला किती वर्ष लागतील बरे.
आज घरात झाड नाही. शिवारात शेत बुडतं म्हणूनच झाड नाही आणि जंगलंही मानवी वसाहत वा शेती निर्माण करण्यासाठी तोडली जात आहेत. विदर्भात याचं प्रमाण जास्त आहे. म्हणूनच विदर्भात जास्त तापमान आहे. पाऊस पडत नाही. सतत कोरडा दुष्काळ पडत आहे. हे असंच जर सुरु राहिलं तर तो दिवस दूर नाही की पुर्ण गावाचे स्मशान होईल. तापमान एवढं वाढेल की लोकं उष्णतेनं वालती सहन न झाल्यानं तडकाफडकी मरतील. म्हणूनच यावर आजच उपाययोजना करणं आवश्यक आहे. ते म्हणजे झाडं लावणे. प्रत्येकांनी आपल्या दारासमोर आजच एकतरी झाड लावावं. त्याची सुरुवात नारळापासूनच करावी. विदर्भातही नारळ पिकवावा. नारळापासून सुरुवात यासाठी की नारळ हे शुभ कार्याचं सुचक आहे. शिवाय ते झाड उंच वाढतं व त्याला आगंतूक मुळं असल्यानं त्याचा घराच्या इमारतीला धोका नसतो. त्या झाडात पाणी जास्त साठविण्याची क्षमता आहे. तसंच दुसरं झाड वडाचं लावावं. ते गावाच्या मध्यभागी. ज्याला चौक म्हणता येईल. शिवाय पुर्वी गावात प्रवेश करताच दिसणारी व सिमेंट रस्ते बांधकामात तोडलेली चिंचांची झाडंही गावातील प्रवेशद्वाराजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावावीत. त्यानंतर प्रत्येकांनी आपल्या शेतात पारावर एकतरी आंब्याचं झाड लावावं आणि गावाच्या सभोवताल कडूनिंबांची झाडं असावीत. त्यातच पुर्वी स्मशानाच्या बाजूला असलेली आमराई आज जरी दिसत नसली तरी आजही स्मशानात आंब्याची झाडं आपण लावू शकतो. पुर्वी आंब्याच्या झाडांच्या पानाचा वापर स्मशानात होत असे म्हणून स्मशानात आमराई असे.
झाडं लावणं ही आपली गरज आहे आणि ती अति आवश्यक गरज आहे. अलिकडील काळात गावागावातील रस्ते हे सिमेंटचे बनलेले आहेत. त्यामुळंही तापमानवाढीत वाढ झाली आहे. कारण सिमेंट लवकर तापतं. म्हणूनच झाडं असल्यास त्या सिमेंट रस्त्यावर सावली पडेल व ते जास्त तापणार नाही. घरी झाड असेल तर आरोग्याला शुद्ध हवाही मिळेल तसाच घराघरात थंडावाही राहील. त्यानंतर जसा घरात थंडावा राहील एक झाड घरी लावल्यानं. तसाच थंडावा गावाच्या सभोवताल झाडं लावल्यानंतर, तसेच गावाच्या मध्यभागी व प्रवेशद्वारावर झाडं लावल्यानंतर राहील. यात शंका नाही. आपण वाढत्या तापमानाला रोक लावण्यासाठी एकतरी झाड लावावं व त्याची सुरुवात आपण आपल्याच घरापासून करावी. जेणेकरुन उद्याच्या आपल्याच पिढीला थंडाव्याचे सुख देता येईल. हे तेवढंच खरं. आज जर आपण एकतरी झाड लावलं तर त्याची फळं उद्या नक्कीच चाखायला मिळतील. नाहीतर तो दिवस दूर नाही की आपली पिढी या वाढत्या तापमानानं एक दिवस होळपळून निघेल आणि ती त्यावेळेस आपल्यालाच कोसेल. जी आपण आज चूक करीत आहोत. हेही तेवढंच खरं आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०