Odh Premachi - 1 in Marathi Love Stories by Madhumita Lone books and stories PDF | ओढ प्रेमाची.... - 1

Featured Books
  • ભાગવત રહસ્ય - 149

    ભાગવત રહસ્ય-૧૪૯   કર્મની નિંદા ભાગવતમાં નથી. પણ સકામ કર્મની...

  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

Categories
Share

ओढ प्रेमाची.... - 1

कॉलेजचा पहिला दिवस. मायाला all ready फारच उशीर झाला. गाडी जितक्या speed ने पळवता येईल, तेवढ्या speed ने ती कॉलेजच्या पार्किंग जवळ आली, तशी तिने गाडी पटकन पार्किंग मध्ये घातली आणि.....
समोरचं उभी असलेली बुलेटला धडकली. हे पहाताच वॉचमन काका तिथं आले. ते त्यांच्याकडे पहाताच म्हणाली,
Soory काका , मला खूप उशीर होत आहे.
अगं पोरी मला sorry म्हणून काय उपयोग, जायची गाडी आहे ....
काकांचं वाक्य मध्येच थांबून माया म्हणाली,
काका त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ. मी पाहून घेईल, जाऊ मी आता , मला खूप उशीर झाला आहे माझं पहिलं लेक्चर मिस होईल.
असं म्हणून माया गाडी पार्क करून कॉलेज bulding मध्ये गेली.
कसं बसं classroom शोधला. Thank God अजुन प्रोफेसर आल्या नाहीत, मनातल्या मनात म्हणाली आणि आत गेली. मुली मुलं अशी वेगवगळी बसलेली अशी typical कॉलेजची typical classroom असं म्हणून माया इकडे तिकडे पाहत एका बेंच जवळ आली . तिथे एक मुलगी all ready बसली होती.मयाने तिला विचारलं
Can I seat here?
तिने मायाला पाहून मानेनेच होकार दिला.
मी माया, nice to meet you mehnat मायाने हात समोर केला.
Nice to meet you, मी प्राची. तू नवीन आहेस का इथे. तुला कधी पाहिलं नाही.
हो, मी इथे नवीन आहे. माया म्हणाली आणि तू.
याचं कॉलेज मधून माझी बारावी झाली आहे. आणि हा माझा group समोर बसलेल्या २-३ मुलींकडे हात दाखवून म्हणाली.
तसं मायाने सगळ्यांना हात दाखवून hii म्हणाली.
Hii, मी ऋचा, ही सांवी आणि शीतल.
दोघींनी तिला स्मितहास्य करून hii केलं. माया पण त्यांचा कडे पाहून हसली. नविन group मध्ये कसा दिवस गेला , समजलंच नाही. कॉलेज संपल्यावर सगळ्या पार्किंग मध्ये आल्या. ऋचा आणि सावी मायाच्या एरिया जवळ राहत होत्या. प्रचीचं घर रस्त्यात लागतं होतं. पण शीतल मात्र यांच्या opposite direction ला राहतं होती. ती आधीच निघाली. बाकी सगळ्या पार्किंग मध्ये आल्या.
माया आणि ऋचा ने गाडी काढली. ऋचाच्या गाडी मागे सांवी आणि मायाच्या मागे प्राची बसली. दोन्ही गाड्या बाहेर जाणार तेवढ्यात समोर पाहून माया थांबली.
एक उंच, bodybuilder टाईप मुलगा वॉचमन काका सोबत भांडत होता. त्यानं त्या काकांना मारण्यासाठी हाथ उचला असता काकांनी समोर बोट केलं. जिथे माया आणि तिच्या मैत्रिणी होत्या. त्याला बघून माया घाबरली. ती सकाळचं प्रकरण अगदी विसरलेली होती. काकाच्या बोटाच्या दिशेने बघत इकडेच येत होता. तो जवळ आल्यावर माया थोडी घाबरतच म्हणाली,
Sorry, actually ते मे खूप घाईत होते आणि....ते, so sorry.....
ऋचा, सावी प्राची मायाकडे बघताच राहिल्या. त्याने माया कडे बघितले आणि मानेनेच जाण्याचा इशारा केला. तशी माया आपल्या मित्रीनी सोबत तिथून निघाली. सर्वजण त्यालाच बघत होते, जो मुलगा आपल्या बुलेट साठी मुलीना भाव पण देत नव्हता तो आज त्या मुलीला जाऊ देईल असं कोणाला वाटलं पण नव्हत.
प्राचीच्या घरापाशी थांबून त्या बोलू लागल्या.
माया तू त्याला ओळखतेस का? ऋचा म्हणाली.
नाही , पण असं का विचारलं ? कोण होता तो? किती हँडसम आहे.
तो senior ahe आपला, last year मध्ये आहे , राकेश नाव आहे त्याचं, प्राची हासतच म्हणाली.
आणि तितकाच danger आणि फ्ल्टर. त्याला फक्त त्याची बुलेट सगळ्यात प्रिय आहे. मुलींना फक्त फिरवायला आवडत, सांवी थोडी रागातच म्हणाली.
पण त्याने तुला कसं सोडलं, हेचं कळतं नाही, ऋचा जरा संशयाने म्हणाली.
जाऊ दे ना, बहुतेक त्याला कळलं असेल मी नविन आहे इथे.माया हसत म्हणाली.
तिथून सगळे आपापल्या घरी गेल्या.
*********
तिकडे गॅरेज मध्ये आपल्या बुलेटची मरमत राकेश आपल्याच विचारात मग्न असतो.
राकेश, राकेश . अरे किती आवाज देतो आहे तुला. कुठल्या विचारात आहेस, मनोज म्हणाला.
काही नाही .ते आपलं असच, राकेश मनोज कडे बघत म्हणाला.
तू त्या मुलीला कसं काय जाऊ दिलास. तेच मला कळत नाही. तू या गाडी साठी किती मुलींचा त्याग केलास आणि आज , मनोज थोडा चिंता करतं म्हणाला.
अरे ती नविन दिसत होती. किती निरागसपणे मला तिने sorry म्हंटले. तिला बघितलंस का कशी होती ती. कुर्ताया मध्ये ,थोडे मध्यम केस कुरळे, मोठे जुमके आणि ते निरागस हसणं. बसं फिदा झालो एका सेकंदात तिच्यावर,राकेश मंद हसत म्हणाला.
म्हणजे आता नवा मासा सापडला तर जाळ्यात, मनोज थोडा मिश्किल हसत म्हणाला.
नाही रे ,ती त्या मुलीनं मध्ये मोडत नाही. तुला नाही कळणार जाऊदे. चल बुलेट पण तयार झाली. घरी जाऊयात असा म्हणत राकेश ने बुलेट चालू केली.