Badfaily - 3 in Marathi Short Stories by Nisha Gaikwad books and stories PDF | बदफैली - भाग 3

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

बदफैली - भाग 3

 

भाग - ३

"खर सांगायचं  तर मला पैशांची नितांत गरज आहे, काही महिन्यापूर्वी आम्ही एक घर घेतलं, आमच्या बजेटच्या बाहेरच होत खरतर पण,  ते घर मला इतकं आवडलं , मला नाही म्हणताच आलं नाही,  त्या मालकाला देखील घर विकायचं होत त्याने आमच्याकडील रक्कम घेतली आणि उरलेली रक्कम  सहा महिन्यांच्या मुदतीवर ठेऊन  आम्हाला हे घर दिल. मुदत संपायला  आता फक्त एक महिना राहिलाय,  आम्हाला त्याचे उरलेले पैसे परत करायचेत, त्या माणसाला एक महिन्यानंतर कायमच दुबई शिफ्ट व्हायचंय म्हणून त्याला खूप घाई आहे पैशांची.."

"असं आहे तर म्हणून तुम्ही इतक्या टेन्शनमध्ये आहात होय, तुमच्या घरमालकाचं नाव सांगाल जरा." सोहम ने सहज विचारव अस विचारलं

"राजाराम सरपोतदार "

"काय ?, राजाराम सरपोतदार " सोहमच्या चेहऱ्यावरचे भाव भराभर बदलेले अपर्णाने पहिले.

" सोहम , तुम्ही ओळखता का त्यांना" अपर्णाने शेवटी न राहवून त्याला विचारल.

"मिसेस काळे, तुम्ही इथे गाडीत बसा, मी आलोच" अस म्हणत सोहम तिला गाडीत एकट सोडून कुठेतरी निघून गेला .

अपर्णाला काही कळेना " असा काय हा, कुठे गेला अचानक" पण तिच्या मनाच्या आत कुठेतरी तिला जाणवत होत , कदाचित तो तिच्याच कामासाठी गेलाय , तिच्याकडे वाट बघण्याखेरीज काही पर्याय न्हवता.

तब्बल दहा मिनिटाने सोहम आला , त्याच्या चेहऱ्यावर कमालीच समाधान आणि मिश्कील हसू होत.गाडीत बसतच तो तिला "अभिनंदन मिसेस काळे" अस म्हणाला.

अपर्णा त्याच्याकडे काहीच न कळल्याचे भाव आणीत नुसती पाहत राहिली,

"मॅडम , मला आता ट्रीट हवी तुमच्याकडून  झालं तुमचं काम तो परत नाही तुम्हाला त्रास देणार"

"क्काय ? खरं बोलताय तुम्ही, पण अस झाल काय " अपर्णा अजूनही गोंधळलेलीच होती.

"पाहाच आता" इतकच  बोलून त्याने गाडी सुरु केली.

वाटेत तिने बऱ्याच त्याला राजाराम प्रकरणाविषयी विचारून पाहिलं, पण हो काहीच बोलत न्हवता , मधेच तिने गप्प रहाव म्हणून त्याने गाडीत त्याच लूप असलेले " किसका.... रस्ता देखे .. ये दिल ये सोदाई" गाण सुरु केल, ते देखील मोठ्या आवाजात अपर्णा समजून गेली , आणि मग खिडकीच्या बाहेर पाहत राहिलीं वेळ उन्ह उतरणीला लागली होती, हलकी संध्याकाळ संबध रस्ताभर पसरली होती , तिला शांत शांत वाटत होत.

 

घरी आल्यावर तिने अंघोळ करून देवा पुढे निरांजन लावलं , आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली ,

दारात अशोक उभा होता , तिला पाहताच त्याने  तिला घट्ट मिठी मारली ,

 "अप्पू..अग आपलं टेन्शन संपल, .आपले घर मालक त्यांचे उरलेले पैसे नका देऊ म्हतायेत.."

"का...म्हणजे असं कस पैसे नकोत म्हणतायेत." निदान अशोक कडून तरी  काहीतरी कळेल अशी तिला आशा वाटली.

"अग काय माहित त्यांनी मला मघाशी फोन केला, मला म्हणाले कि मला उद्याच निघायचंय दुबईला .तुम्ही माझे उरलेले पैसे नाही दिलेत तरी चालतील, मी पुन्हा नाही तुम्हाला फोन करणार, माझी माफी पण मागितली आणि फोन कट केला, मी पुन्हा तीन - चार वेळा त्यांना कॉल केला , अग पण ते उचलतच न्हवते,  नंतर म्हंटल नको म्हणतायेतना पैसे, त्यात माझा फोन पण घेत नाहीयेत, मग जाऊदे आपलं टेन्शनच गेल..”

अपर्णाच लक्षच न्हवत ती तर हरवली होती कुठेतरी.

"अपर्णा .अग लक्ष्य कुठय तुझं, आपलं टेन्शन गेल, पैसे नको म्हणतायेत मालक."

"अरे... मला खरतर विश्वासच बसत नाहीये..." काहीतरी बोलायचं म्हणून ती बोलली,

काय बोलला असेल सोहम मालकाला काही कळतच नाही आणि आपण इतके मूर्ख त्याचा नंबर पण मागितला नाही, आता ह्याला पुन्हा भेटायचं कसं त्याचे आभार कसे मानायचे

असेच दिवस जात होते, अपर्णा सोहमला नाही म्हंटलं तर विसरलीच होती, पण मधेच त्याने तिला एकदा तरी भेटावं असं मात्र मनोमन वाटत होत...

अशोकची कामाची वेळ मात्र अजूनही तशीच उशिराचीच होती... अपर्णाने त्याला खूपदा सांगून पाहिलं, तिला त्याची फार काळजी वाटे, जास्त श्रमामुळे त्याला प्रचंड थकवा येतोय, आणि त्याला अपर्णाकडे लक्ष द्यायला जराही वेळ मिळत नसे आणि आपल्याला नवरा वेळ देत नाही आपल्याकडे लक्ष देत नाही, आपलं तो काहीच ऐकत नाही म्हणून अपर्णा सतत अशोकवर नाराज राहायची...

"अशोक आज नकोना जाऊस कामाला, मी पण आज सुट्टी करते.. बऱ्याच दिवसात कुठे गेलो नाही, संबंध दिवस बाहेर फिरुया, चौपाटीवर जाऊ, मस्त एखादा सिनेमा बघू, बाहेरच जेऊ, करना रे सुट्टी..प्लिज, अशोक माझ्यासाठी एक दिवस "

"वेडी झालीस का ...सुट्टी म्हणजे एक पूर्ण दिवसाचा पगार कापणार अजिबात नाही हा... मला कामाला जावंच लागेल आपण ह्या संडेला नक्की जाऊ" अशोक तिच्याकडे न पाहताच कामाला जायची तयारी करत म्हणाला.

"राहूदे ... तू गेल्या महिन्यात देखील हेच म्हणाला होतास, ओव्हरटाईम मिळतो म्हणून तू संडे देखील सोडत नाहीस, अशोक तुला वाटत नाही का जरा विश्रांती घ्यावी"

"विश्रांती घेतो मी तिकडेच कामावर थोडी मध्ये मध्ये "

"त्याने काय होत, कितीसा आराम मिळतो  आणि मुळात तुला माझं ऐकावंस., माझ्या सोबत रहावस नाही का वाटत"

"हे बघ.तू आता जास्त विचार करू नकोस आपण, ह्या येत्या संडेला नक्की आउटिंगला जाऊ"

"ठीकेय आणि आपण जर नाहीना गेलो तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही"

"अशी वेळच येणार नाही."अशोक इतकं म्हणून लगोलग घरातून बाहेर पडला ...

अपर्णाला खरंतर अशोकचा खूप राग आला होता....पण तिचा नाईलाज होता. तिला कामाला जायची इच्छा देखील होत न्हवती, ती अशीच बराच वेळ विचार करत बसली एकटे पणाला कंटाळलेली, . खूप रडावसं वाटत होत पण इतक्या शुल्लक गोष्टीसाठी रडायचं हे देखील तिला पटत न्हवत , अशोकच आपल्यालावर नक्की प्रेम आहे ना, आहे तर मग तो आपल्या पासून इतका लांब कसा राहू शकतो, माझ्या सारखंच त्याला नाही वाटत एकमेकांच्या सहवासात रहावस, लग्नानंतर अवघ्या तीन-चार महिन्यात हा बदल.. आधी वाटलं थोडी परिस्तिथी सुधारली कि आहोतच एकमेकांसाठी पण आता सर्व असून देखील हा पैशासाठी इतकी मरमर का करतोय, स्वतःही थकतोय आणि माझी देखील फरफट करतोय, .ह्या संडेला देखील स्वतःच प्रॉमिस पाळतोय कि नाही कुणास ठाऊक...नाईलाजाने उठली.. थोडी फ्रेश झाली... तिला खूप कंटाळा आला होता, ती सहज बालकनीत आली आणि  उभं राहून रस्त्यावर इकडेतिकडे पाहू लागली, समोर दुकानाच्या कोपऱ्यावर कुणीतरी एकटक आपल्याचकडे पाहतंय हे तिला जाणवल, तीच लक्ष जाताच त्या इसमाने तिच्याकडे बघून हात हलवला अपर्णा थोडी घाबरली.. पण मग तो इसम तिला स्पष्ट दिसेल असा उभा राहिला,  "अरे...हा तर सोहम."

क्रमशः