Apradhbodh - 9 in Marathi Love Stories by Gajendra Kudmate books and stories PDF | अपराधबोध - 9

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

अपराधबोध - 9

तेव्हा सारांश अधिकच गंभीर होऊन बोलला," होय, मी खरे बोलतोय, मी ठरवले आहे की मी एकांकी आयुष्य जगणार आहे:" तेव्हा मात्र श्वेता असहज होऊन बोलली, " का बर रे वेड्या इतका सुंदर आहेस, छान नौकरी आहे आणि अमाप पैसे आहेत. तुला तर एकापेक्षा एक छान मुली मीळ्तील जीवन संगीनी म्हणून तरीही तू असा वेड्यासारखा वीचार का बर करतोय" तेव्हा सारांश म्हणाला, " ही माझी वयक्तिक बाब आणि निर्णय आहे, मी त्यावर अटळ आहे." मग श्वेता बोलली, " अरे स्वतःचा नाही तर तुझ्या आई बाबांचा विचार तर कर. तुझ्या अशा नीर्णयामुळे त्यांना किती वाईट वाटेल त्रास होईल. त्यांना तुझा पासून किती आशा आणि अपेक्षा असतील, त्यांनी तुझ्यासाठी किती स्वप्र पाहिले असतील त्या स्वप्नांचे काय होईल याचा कधी काही विचार केला आहेस काय तू" आता मात्र श्वेता हक्काने त्याचावर ओरडू लागली होती. सारांश मात्र एकदम शांत बसला होता आणि त्याचा अशा शांत बसण्याणे श्वेता मात्र वीचलीत आणि हवालदिल होऊ लागली होती.

श्वेता पुढे त्याला म्हणाली, " अरे सारांश तू असे का बर करतो आहेस आणि वागतो आहेस, अरे वेड्या तुझ्याकडे हवे तेवढ़ा पैसा आहे नाव आहे तर तु जे म्हणशील ते तुला सहज मीळून जाईल तरी तू असा का बर बोलत आहेस. " तेव्हा सारंश म्हणाला, "पैशांचा पलीकडे ही काही गोष्टी असतात ज्या पैशांनी खरेदी शकत नाही मी आणि माझ्यासारखे अनेको लोक. " मग श्वेता बोलली, " ठीक आहे तर सांग मला कोणती वस्तु आहे जी पैशांनी खरेदी करु शकत नाही अथवा मीळत नाही." तेव्हा सारंश बोलला, " खर प्रेम आणि त्याची सुखद अनुभू्ती, जे मला आजवर मीळाले नाही आणि मी आजवर त्याचा प्रतीक्षेत आहे." आता मात्र श्वेता अधिकच वीचलीत होऊन बोलली, " खर प्रेम, सांग मला तू कूठल्या मु्लीवर प्रेम करतो काय, काय तीचा आणि तीचा परीवाराला काही आपत्ती आहे काय, तस काही असेल तर मला सांग मी तीला परस्पर भेटून तुमच्यातील अळथडा दूर करते. परन्तु तू असा काही वेड्यासारखा नीर्णय घेऊ नकोस." तेव्हा सारांश उत्तरला, " हो मी एका मुलीवर खर प्रेम केले आहे ते ही माझ्या बालपणापासून, मी तीचा बरोबर खेळलो, वावरलो आणि माझ्या आयुष्यातील तो स्वर्णिम काळ मी तीचा बरोबर घालवला. परन्तु ती मुलगी माझ्या नीर्मळ प्रेमाला नकार देत आहे. म्हणून मी नीर्णय घेतला आहे की मी सुद्धा आजन्म एकांकी आयुष्य जगणार आहे. मी जर कुणाला आपली जीवन संगीनी बनवणार तर फ़क्त आणि फक्त तीलाच बनवणार अथवा मी एकांकी जीवन जगणार."

आता मात्र श्वेताला जाणवले की सारांश तीचाबद्धल बोलतो आहे. मग श्वेता बोलली, " तर तू माझ्याबद्दल बोलतो आहेस. " सारांश उत्तरला, "होय मी तुझ्याबद्दलच बोलतोय आणि मी तुला वीचारलेल्या प्रश्नाचा उत्तराची आजवर प्रतीक्षा करतो आहे नीरंतर. तू तर माझ्या प्रश्नाचे उत्तर
दिल्यावीणा एका वळणावर सोडून दुसऱ्या शहरात नीघून गेलीस आणि मी आजवर त्याच वळणावर बसून तुझ्या येण्याची प्रतीक्षा करतो आहे." आता मात्र श्वेताचा राग शांत झालेला होता आणि ती हसल्यागत बोलू लागली, " सारांश अरे हे शक्य नाही आहे रे. माझ्या मनाने आता या भावनांना तीलांजली दिलेली आहे. माझे आयुष्य आता फक्त आणि फक्त एक उजड़लेल उद्यान आहे जेथे नवीन अंकुर कधीच फुलवू शकत नाही. त्याचबरोबर माझे वय ही आता ३० चा पार होऊन गेले आहे आणि आपल्या वयातील अंतर हा सुद्धा जास्त आहे. आपला मेळ होऊ शकत नाही रे." मग सारांशने श्वेताचा हात त्याचा हातात घेतला आणि तीचा हातावर त्याने ओठांनी एक चुंबन दिले. त्या क्षणी चमत्कार घडलेला होता सारांशचा
ओठांचा त्या चुंबनाने श्वेताचा सर्वांगावर शहारा आला होता आणि ती क्षण भरासाठी उत्तेजित आणि व्याकुळ होऊन गेली होती. मग सारांश पुढे बोलला," श्वेता अग अजुन किती खोट बोलशील किंवा स्वतःला आणखी किती मूर्ख बनवशील, तू जो काही तर्क दिला आहेस त्या तर्क आणि कारण याचे एकमेव उत्तर तू स्वतःच आता काही न बोलता दिलेले आहेस."

सारांशचा त्या बोलण्याने श्वेता स्तब्ध होऊन बघू लागली. सारांश पुढे म्हणाला, " अग तू म्हणतेस तूझे वय ३० वर्षांचा वर झालेले आहे. तुझे आयुष्य आता फक्त आणि फक्त एक उजड़लेल उद्यान आहे जेथे नवीन अंकुर कधीच फुलवू शकत नाही. तू तर हे सर्रास असत्य बोलत
आहेस, अग तुझा रंग तोच, तुझा गंध तोच, तुझा अंग अंग तोच, तुझ्यातील भावना तीच, तुझ्यातील वेदना आणि संवेदना तीच तरीही तू नकार देते आहेस. तू म्हणतेस तू ३० वर्षांचा वर झालेली आहेस म्हणून तुझ्या मनातील भाव हे मरुन गेले आहेत, तर मग माझ्या एका सहज अशा चुंबनाने
तुज्या सर्वांगावर शहारे उभे राहिले आहेत, शिवाय तू माझ्या सहवासाकरीता व्याकुळ झालीस त्याचे काय, अग खर तर तू भीत्री आहेस, तुझ्यात साहस नाही आहे आपले प्रेम स्वीकारण्याचे. आज तू तुझे संपूर्ण कर्तव्य पार पाडून चुकली आहेस. तुला तुझ्या भावंडांसाठी जे काही करायचे
होते ते तू केलेस आणि आता तू त्यातून मोकळी झालेली आहेस तरीही तू हे मानायला तयार नाही आहेस की तुझे स्वतःचे सुद्धा एक आयुष्य आहे. आता बरे आहे म्हणून ठीक आहे परन्तु पुढ़े तुझ्या उतरत्या वयात तुला एका साथीची आवश्यकता असेल तेव्हा तुझे भावंड तुझ्या प्रमाणे त्याग करतील काय, तेव्हा तुला त्या क्षणी कुणाची तरी उणीव भासेल आणि तुला आज केलेल्या चुकीचे तुला तेव्हा प्रायश्चित करण्याची वेळ सुद्धा
मीळणार नाही." सारांश बोलत होता आणि श्वेता ही अधिकच हताश होऊन तेथेच बसून त्याचे बोलणे ऐकत बसली. तेवढ्यात त्याने ऑर्डर केलेले जेवण वेटरने आणून दिले.

श्वेताचा मनाची अवस्था आता फारच व्याकूळ आणि हताशलेली झाली होती म्हणून ती म्हणाली, "मला भूख नाही आहे आणि माझे काही खायचे मन होत नाही आहे." तेव्हा सारांश तीला म्हणाला, "अग श्वेता अशी काय करतेस, अग माझा राग तू या जेवणावर का बर काढते आहेस." तेव्हा श्वेता बोलली, "नाही रे मला राग या जेवणावर नाही आला आहे." तेव्हा मध्येच सारांश बोलला, "मग नक्कीच माझ्यावर आलेला आहे ना." मग श्वेता म्हणाली, " नाही रे बाबा तुझ्यावर तर मी राग कधीच करु शकत नाही. परन्तु तू माझी अवस्था काही समजुन घेतच नाही आहेस." हे बोलतांना मात्र श्वेताचा डोळ्यांत ती हताशा आणखीनच उभरून आलेली होती.

शेष पुढील भागात........