Bavra Mann - 18 in Marathi Love Stories by Vaishu mokase books and stories PDF | बावरा मन - 18 - जयपूर

Featured Books
Categories
Share

बावरा मन - 18 - जयपूर

दुसऱ्या दिवशी रिद्धी , विराज आणि धरा जेनीच्या लग्नासाठी गोव्याला गेले.....

रिद्धीने वंशला तिच्या look चे फोटो send केले होते....


धराने पहिल्यांदा ख्रिश्चन वेडिंग पाहिली होती..... त्यामुळे तिला खूप भारी वाटलं होत....

वेडिंग आणि रेसिप्शन अटेंड करून तिघे दुसऱ्या दिवशी मुंबईला परत आले....

............................

.....................................

...............................................

गोव्या वरून आल्यापासून रिद्धी फुल्ल बिझी झाली होती.... फॅशन वीक जवळ येत असल्याने कामाचा लोड वाढला होता....

रुचीकाला त्रास होत असल्याने सगळ्यांनी विराजला तिच्या जवळ राहायला सांगितल होत.... पण घरी राहून तो रिद्धीला जमेल तशी मदत करत होता.... बऱ्यापैकी मिटिंग ह्या कॉन्फरेन्सने केल्या जातं होत्या.....

दिवसरात्र रिद्धीच्या डिझाइनच कामं सुरु असल्याने अकॅडेमीला देखील हवा तसा वेळ देता येत नव्हता.....

रिद्धीचा दिवस केव्हा सुरु व्हायचा आणि रात्र कधी संपायची हे दिला देखील कळत नव्हतं.... रात्री कितीतरी उशीरा ती घरी यायची.....

या सगळ्यांत रिद्धी वंशला वेळ देऊ शकत नव्हती..... दोन दिवसांनंतर दोघांच बोलणं होत होत...

पण वंशने तिला समजून घेतलं होत.... धरामुळे त्याला तिच्या कामाबद्दल कळत होत.... त्याला देखील जयपूर जाण्याअगोदर सर्व सेट करुन जायच होत.....

.................

..........................

.....................................

बघता बघता फॅशन वीक आला...... रिद्धी डिझाइनर बरोबर शो स्टॉपर होती..... या वेळेस धरा तिच्या लाईफमध्ये स्वतःला डिझाइनर म्हणून present करणार होती....

फॅशन वीक साठी वंशने खास रिद्धीसाठी वेळ काढून आला होता.... त्याबरोबर इंडस्ट्री मधले बरेच डिझाइनर , मीडिया , सेलेब्रिटीज आले होते.....

फॅशन वीकची लाईव्ह फुटेज RN industry आणि रिद्धीच्या social media हॅन्डेलवर दिसणार होत.....

त्यामुळे जयपूर मध्ये सगळे जण एकत्र शो बघत होते.... मेवाडला देखील अंतराने लॅपटॉप TV ला join केला होता....

सगळे गेस्ट जमल्या नंतर शो सुरु झाला..... मॉडेलच्या एन्ट्री होऊ लागल्याबरोबर फ्लॅशचा झगमगाट पसरला..... त्याबरोबर टाळ्यांचा कडकडाट होत होता.....

शेवटी रिद्धीची एन्ट्री झाली..... सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.... कॅमेराचे फ्लॅश तिच्यावर पडत होते.....

वंश तर तिला बघुन सर्व विसरून.... वेगळ्याच दुनियेत पोहचला होता....


रिद्धीचा रॅम्प वॉक झाल्यानंतर ती परत गेली.... आणि तिने पुन्हा धरा सोबत तिचा हात धरून वॉक केला.... त्यांच्या मागे बाकीचे मॉडेल्स होते.....

धराने रिद्धीचे शो पहिल्यामुळे तिला रॅम्प वॉकच एवढं काही वाटल नाही.....

दोघींचा वॉक संपला तशा टाळ्यांचा आवाज सर्वत्र घुमला....

रिद्धी आणि धराच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता..... त्यांना बघून वंश देखील खुश झाला होता.....

.......................

.................................

..........................................




रिद्धी ऑफीस मधून घरी आली तेव्हा सगळे हॉल मध्ये बसले होते.....

" काय झालं.... वहिनी इथे का बसली आहे...." रिद्धी सोफ्यावर बॅग ठेवत बोलते....

" वंशच्या आजी साहेबांचा कॉल आला होता.... त्यांच्या पंडितांनी एंगेजमेन्ट मुहूर्त कढला आहे.... " यशवंत

" म्हणजे मी जयपुर जायच आहे...." रिद्धी

" हो बाळा....." मंजिरी

" मला वाटलं होत वहिनी अजुन एक दोन आठवडे मि आहे तर.... " रिद्धी

" रिधु तुझ लग्न झालं म्हणजे तुझं या घरासोबतच नातं संपणार असं नाही.... तुझा लग्नाआधी जितका अधिकार आहे तितकाच लग्नानंतर देखील असणार आहे... तु इथे हक्काने कधीही येऊ शकतेस.... अगदी मध्यरात्री देखील...🙂🙂🙂" यशवंत

" ठीक आहे बाबा..... मी तयारी करायला घेते....🙂🙂" रिद्धी

...........................

.........................................

..................................................

रिद्धी जयपुर जाण्याच्या तयारीला लागली होती.... वंश देखील रिद्धी आणि धरा सोबतच जाणार होता....

रिद्धीने धरा आणि अर्पिताला विचारून सर्व पॅकिंग केली होती..... धरा तिला माहित असलेल्या सर्व गोष्टी सांगत होती....

बघता बघता जाण्याचा दिवस आला..... रिद्धी रेडी होऊन खाली आली.... तोपर्यंत धरा आणि वंश आले होते....



" काही टेन्शन घेऊ नकोस... सर्व नीट होईल.... सर्व रीतीरिवाज व्यवस्थित शिकून घे...." मंजिरी

" हो आई.... तु नको टेन्शन घेऊन मी घेईल सर्व सांभाळून... तु वहिनीची काळजी घे.... दादु तु सुद्धा जास्त वेळ ऑफिस मध्ये नको थांबूस... मला जमेल तस मी तिथून कामं हॅन्डेल करेल...." रिद्धी

" रिधु तु तिकडे जाते आहेस ना तर तिकडे लक्ष दे... इथे विराजसोबत मी आहे...." यशवंत

" निघायचं.... " वंश

" हो... चला निघा तुम्ही..." यशवंत

रिद्धी सर्वांना भेटून निघते.... पण तिला जाताना बघून सगळ्यांना वाईट वाटत होत.... तिघेजण एअरपोर्टला निघतात.....

" फक्त आठ दिवसांसाठी गेली आहे... जेव्हा लग्न होऊन जाइल तेव्हा कसं होईल..." मंजिरी डोळे पुसत बोलतात...

" जगाची रितच आहे ती... जिला तळ हाताच्या फोडी सारख जपतो तिचा हात शेवटी दुसऱ्याच्या हातात द्यावाच लागतो...." यशवंत

....................

...................................

...............................................

एक तासाचा प्रवास करून तिघांनी जयपुरला पाऊल ठेवलं.....

पॅलेस वरून त्यांच्यासाठी गाड्या आल्या होत्या....

" वहिनी आपल्याला दुसऱ्या गाडीत जायच आहे.... भाई दुसऱ्या गाडीत जातील...." धरा बोलून रिद्धी सोबत गाडीत बसते....

वंश जाऊन त्याच्या गाडीत बसतो..... त्यांच्या गाडीच्या मागे गार्डसच्या कार होत्या.... गाड्यांचा ताफा पॅलेस कडे धाव घेतो......

आज रिद्धी पहिल्यांदा पॅलेसवर येणार म्हणून राजमाता सर्व जातीने बघ होत्या.... अगदी पद्धतशीर रित्या त्यांना रिद्धीचा घरात प्रवेश करून घ्यायचा होता.... पंडितजीनी सर्व तयारी केली होती.....

पॅलेस रोशनाईने सजला होता.... जागोजागी फुलांच्या माळा सोडल्या गेल्या होत्या.... गेट पासून दरवाज्या पर्यंत फुलांच्या पायघड्या पडल्या होत्या....

गार्डसच्या कार पॅलेस मध्ये एंटर आल्या तसा आत राजमातांना निरोप पोहचला.....

एक एक करून सर्व गाड्या आत आल्या.... रिद्धी गेटच्या आता आल्यापासून सर्व निरखून बघत होती.... घरच्या सगळ्यांनी सांगितल्या प्रमाणे पॅलेस खूप मोठा होता.....

धराच्या आवाजाने ती भानावर आली.... सेवकाने गाडीचा दरवाजा उघडला होता....

रिद्धी साडीचा पदर सांभाळत खाली उतरली.... समोर असलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांच्या पायघड्या बघून तिला खरच प्रिन्सेस वाला फीलिंग येत होत.... तिने एक नजर सर्वत्र फिरवली....

" वहीनी साहेब आत चला.... आपण अजून आठ दिवस आहोत इथे नंतर आरामात पॅलेस बघू...." धरा तिच्या शेजारी येऊन थांबली....

" हो चल... sorry चला...." रिद्धी लक्षात येऊन बोलते....

" धरा मला जमेल ना तुमच्यासारख राहायला...." रिद्धी चालत असताना हळुच तिच्या कानाजवळ बोलते....

" आधी तर मला नाही आम्हांला..... आणि तुम्हांला सगळं छान जमेल.... don't worry.... " धरा तिला समजावत पुढे चालत असते....

पॅलेसची कमान पार करून थोडं चालत दोघी मुख्य दरवाजात येतात.... तिथे राजमाता आणि अर्पिता थांबले होते.... बाजूला पंडीतजी आरतीच ताट घेऊन उभे होते....

" धाकट्या राणीसाहेब इथे येऊन थांबा...." पंडीतजी तिला दरवाज्याच्या मध्यभागी थांबायला सांगतात....

रिद्धीला राणीसाहेब ऐकून दडपण आलं.... रिद्धी जाऊन मध्यभागी उभी राहीली....

पंडितजींनी विधी करून तिला घरात पाऊल टाकायला सांगितल्यावर तिने वंश सोबत घरात प्रवेश केला....

प्रवेश केल्याबरोबर रिद्धीचे डोळे बाहेर यायचे बाकी राहिले होते..... सर्व पॅलेस बघून तिला आता दडपण आलं होत....

सगळेजण जाऊन सोफ्यावर बसले..... रिद्धीला बसू कि नको समजत नव्हतं....

" रिद्धी अजिबात कशाच दडपण घेऊ नका...." राजमाता

" हं... हो आजी साहेब....." रिद्धी

" बर तुम्ही सगळे प्रवासात दमला असाल... जाऊन आराम करा.... दिनकरजी रिद्धींना त्यांचा कक्ष दाखवायला सांगा...." अर्पिता

" हो थोरल्या राणीसा..... या राणीसा....." दिनकर बोलून रिद्धीला घेऊन जातो...... रिद्धी वंश कडे नजर टाकते.... तो डोळ्यांनी तिला जा म्हणून सांगतो.....

त्यानंतर सगळे खोलीत निघून गेले.....

रिद्धीला वंशच्या फ्लोअरवर रूम दिली होती..... पण रिद्धीला हे माहीत नव्हतं.....

दिनकरजी रिद्धीला तिच्या कक्षात घेऊन आले... तिथे आधीच रिद्धीसाठी असलेला स्टाफ उभा होता....

" राणीसा हि आपली रूम आहे.... बेडरूम , स्टडीरूम , ड्रेसिंग रूम आणि हा हॉल....." दिनकरजी तिला सर्व सांगितल.... रिद्धिने सगळीकडे नजर टाकली.....

" दिनकरजी यांना सर्व समजावून सांगा..... थोड्यावेळाने डायनिंग रूममध्ये भेटू....." अर्पिता बोलून निघून गेल्या....

" राणीसा हि शामल आणि सरला तुमच्यासोबत असतील.... तुम्हांला काही हवं असेल तर तुम्ही यांना सांगा..." दिनकर

" उद्या पासून मिस इरा आणि मिलिंदजी तुम्हांला जॉईन करतील.... ते तुम्हांला सर्व गाइड करतील...." दिनकर

रिद्धी त्यांना स्मित देते......🙂🙂 रिद्धीला मान देऊन दिनकर निघून गेले....

" राणीसा तुमचा कबर्ड सेट करायचा आहे..." शामल

" हो.... " रिद्धीने तिची बॅग ओपन करून दिली.... शामलने किचनमध्ये कॉल करून रिद्धीसाठी खायला मागवल होत..... शामल आणि सरलाने तिचे सामान सेट करून दिलं....

डोअर नॉक केल्यावर सरलाने डोअर ओपन केलं.... किचन स्टाफ रिद्धीसाठी कॉफी आणि सँडविच देऊन गेला....

रिद्धीने तिची ज्वेलरी आणि पर्स लॉकर मध्ये ठेवून लॉक केल....

रिद्धी कॉफ़ी घेऊन गॅलरी मध्ये जाऊन बाहेरचा व्ह्यु बघत थांबली....

बाहेर सर्वत्र हिरवळ होती..... पॅलेस भोंवती उंच झाड होते.... गार्डेन मध्ये सगळ्या प्रकारचे फुलझाड होते...
गार्डेनच्या मध्यभागी करंज्याचा कलरफुल फवारा सुरु होता.... सर्वत्र लाइटिंग पडल्या होत्या....

तेव्हा पॅलेसचा मेन गेट ओपन झालं आणि गाड्यांचा ताफा आत आला.... गार्डने लगेच कारचा डोअर ओपन केला.... तेव्हा तिला मनीष आलेले दिसले......

मनीषना बघुन तिला यशवंतजी आठवण आली.... तिच्या डोळ्यासमोर प्रसंग तरळून गेले.... आठवणीने तिच्या डोळ्यांत पाणी जमा झालं.... स्वतःला सावरत पुन्हा आत गेली....

शामल आणि सरलाने सगळी रूम छानशी सेट करून दिली होती.... खालुन जेवणासाठी कॉल आला तेव्हा ती खाली गेली....

" या बसा... " राजमाता

रिद्धी जाऊन वंश शेजारी बसणार होती पण नंतर विचार करून ती धरा शेजारी जाऊन बसली.... हे बघून राजमातांच्या चेहऱ्यावर हसू आलं....

जेवणाच्या टेबलवर सगळे शांत होते.... रिद्धी कसे तरी थोडं खाते.... वंश अगदी सरळ नाही पण नजरेच्या कोपऱ्यातून तिला पाहत होता....

जेवणानंतर राजमाता रिद्धीला त्यांच्या कक्षात बोलावतात... म्हणून रिद्धी त्यांच्या कक्षात जाते.... राजमाता हॉल मध्ये पुस्तकं वाचत असतात...

रिद्धी डोअर नॉक करते....

" या आत.... बसा... " राजमाता पुस्तकं बाजूला ठेवतात... रिद्धीला बसायला सांगतात... रिद्धी त्यांच्या समोरच्या सोफ्यावर बसते....

" कस वाटला पॅलेस.... आवडला ना.... तुम्ही अजून नवीन आहात थोडा वेळ लागेल जुळवुन घ्यायला..." राजमाता

" हो... छान आहे...." रिद्धी

" आम्हांला कल्पना आले तुम्हांला हे सर्व बघून दडपण आलं असेल.... पण अजिबात कोणत्याही बाबतीत दडपण घेऊ नका.... तुम्हांला इरा आणि मिलिंदजी सर्व रीती शिकवतील... नीट शिकून घ्या...." राजमाता

" हो आजीसाहेब.... " रिद्धी

" जाऊन झोपा आता... good night..." अर्पिता

" Good Night.... " रिद्धी मान देऊन बाहेर पडते....

....................

.........................

...................................

"काय झालं झोप येत नाही का....." मंजिरी यशवंतला शोधात गॅलरी मध्ये आल्या....

" तु पण तर जागी आहेस...." यशवंत

" आठ दिवसांसाठी गेली आहे तर घर खायला उठलं आहे.... लग्न करून जाईल तेव्हा कसं होईल....🥺🥺" मंजिरी

" तिच्या शिवाय घर खायला उठत आहे.... रोज ऑफिस मधून आली कि विराजला सर्व डिटेल देत असते.... घर अगदी गजबजलेल असत... पण आज सगळं सूनसान् वाटतय...." यशवंत

" रुची लग्न करून आल्या पासून रिद्धिने तिला कधीच एकटं सोडलं नाही... आणि आज ती गेली तर किती रडत होती...." मंजिरी

" तु आणि रुचीका रडुन मोकळ्या होतात... पण आम्हांला नाही जमत.... विराज पण आज शांत झाला आहे...." यशवंत


.....................

............................

...........................................

" विराज....." रुचिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला... तिच्या स्पर्शाने भानावर येत त्याने पटकन डोळे पुसले...

" तु झोपली होतीस ना...." विराज तिच्याकडे वळाला...

" तहान लागली होती....." रुची

" तु बस... मि पाणी देतो..." विराज तिला बेडवर बसवतो...

" मि पिलं पाणी.... तुम्ही इथे बसा...." रुचि त्याला शेजारी बसवते...

" रिद्धीची आठवण येते आहे ना...." रुचि

" हम्म्म्म.... तशी ती नेहमी जातं असते पण या वेळेस नाही जमत आहे....." विराज

" तिला कॉल करूया...." रुचि

" ती झोपली असेल.... " विराज

" बघूया करून.... जागी असेल तर उचलेल... नाही उचलला तर उद्या करू...." रुची

रुचि रिद्धीला फोन करते.... दुसऱ्या मिनिटाला रिद्धी कॉल रिसिव्ह करते...

" hello वहिनी..." रिद्धी

" अजून झोपली नाही...." रुची

" आम्हांला वाटलं तिकडे पॅलेस मध्ये मस्त गाढ झोपली असशील...." विराज

" तुला माहित् आहे ना दादू... मला नवीन जागी झोप नाही येत....." रिद्धी

" कशी आहेस तु...." विराज

" मि बरी आहे दादू...." रिद्धी

" बरी म्हणजे मजेत नाही आहे.... एवढ्या मोठ्या पॅलेसची राणी आहेस तु.... तुला तर मजेत असायला हवं...." विराज

" पण तुम्ही सर्व नाहीत ना..... खुप आठवण येतेय तुमची....🥺🥺🥺" रिद्धी

" फक्त आठ दिवस ना बच्चा.... मग तर तु पुन्हा येणार आहेस ना...." विराज

" मी आता लवकर जाणार नाही तिथून..." रिद्धी

" रिद्धी अग लग्नानंतर तर जावच लागेल ना...." रुची

" मी वंशला सांगणार आहे मला अजून वर्षभर लग्न नाही करायच...." रिद्धी

"ठीक आहे.... तु परत आल्यानंतर बघू .... आणि हे आठ दिवस असे निघून जातील... नंतर मस्त फॅमिली ट्रिप प्लॅन करू...." विराज

" दादू मला जमेल ना रे इथे.... इथे सगळं खूप पद्धतशीर आहे.... इथे तर मेडसचे ड्रेस कोडं पण आहेत...." रिद्धी

" हे बघ बच्चा... तु आतापर्यंत कितीतरी अशक्य वाटणाऱ्या गोष्ट शक्य केल्या आहेत..... तर हे सुद्धा तुझ्या साठी challange आहे..... आणि तु ते नक्की पूर्ण करणार....." विराज्

" आणि रिधु वंशच्या घरचे सर्वजण किती छान स्वाभावाचे आहेत.... आणि मुख्य म्हणजे वंश तुझ्यासोबत आहेत... त्यामुळे टेन्शन नको घेऊस...." रुचिका

" हो वहिनी.... वंश आहेत म्हणून मला थोडं रिलॅक्स वाटत आहे..." रिद्धी

" चल आता झोप तु.... रात्र खूप झाली आहे..... " विराज

" Good night दादू वहिनी..... " रिद्धी

" good night bachha... " विराज

......................

................................

.............................................

सकाळी रिद्धीच्या डोळ्यावर सूर्याची किरण आले तेव्हा तिला जाग आली.....

शामल रूमचे पडदे सरकवत होती.... सरला फ्लॉवर पॉट मध्ये फ्रेश फुल ठेवत होती.....

रिद्धी पटकन जाऊन फ्रेश झाली.... तोपर्यंत शामलने किचनमधुन ब्रेकफास्ट मागवला होता.....

" राणीसा तुम्ही अंघोळ करून घ्या..... मग आपण खाली जाऊ...." शामल

रिद्धी पटकन रेडी झाली आणि दोघींसोबत खाली निघाली....

" तुम्ही इथे केव्हा पासून आहात...." रिद्धी

" 2 वर्ष झाल आले आहे...." शामल

" मी ६ महिने अगोदर आले आहे....." सरला

" मग यांचा कक्ष माहित असेल ना...." रिद्धी

" यांचा... " शामल

" वंश...." रिद्धी

" कुंवर सा.... " शामल

" हो...." रिद्धी

" त्यांचा कक्ष याचा फ्लोअरवर आहे.... पण तिकडे फक्त दिनकरजी आणि मॅक्स यांना जाण्याची परवाणगी आहे... कधी जर वाटल तर धीरज जातात... बाकी कोणाला जाण्याची कोणाला परवाणगी नाही आहे....." शामल

" धीरज....?" रिद्धीने न कळून विचारलं

" धीरज म्हणजे दिनकरजी नंतर ते कुंवरसा सोबत असतात...." सरला

" ठीक आहे...." रिद्धी

आल्यापासून तिचा आणि वंशचा जास्त संबंध आला नव्हता.... त्यामुळे त्यांच बोलण झालं नव्हतं . रात्री पण तो बराच वेळ मनिष जवळ ऑफिस बद्दल बोलत होता...... आणि आता पण अजून त्याला न बघितल्याने शेवटी तिने शामलला विचारल.....

" दिनकरजी कुठे आहेत...." रिद्धी

" ते आता खाली भेटतील ....." शामल

रिद्धी विचार करत चालली होती..... समोरून धीरज आले....

" गुड मॉर्निंग राणीसा....." त्यांनी तिला मान दिला.... तिने काल घरातल्या सगळ्यांना पाहिलं असल्याने तिने ते स्विकारल....

" आपल्याला पूजा घरात बोलावल आहे..... सगळे थांबले आहेत...." धीरज

" हो येते... ते म्हणजे... हे सुद्धा आहेत का...? " रिद्धी

" कोण...?" धीरज

" तुमचे कुंवरसा....पण आहेत का..." रिद्धी

" हो... पूजा झाल्यावर ते ऑफिसला जाणार आहेत...." धीरज

रिद्धीने होकारार्थी मान हलवली आणि त्यांच्या मागे पूजा घरात आली.....

रिद्धी अल्यानंतर तिने सगळ्यांना नमस्कार केला..... पंडितजीने आरती आणि पुजा केली....

त्यानंतर पंडितजींनी तिला काही रूढी परंपरा सांगितल्या.... अर्पिता देखील तिला काही रीती सांगत होत्या.....

ब्रेकफास्ट टेबलवर इरा आणि मिलिंदजी आले.... मिलिंद तिला घराण्या बद्दल माहिती सांगत होते.... घराण्याचा इतिहास , आधीच्या पिढ्या , त्यांचे पराक्रम , पुरोहितांचे नातलग यांचे फोटो दाखवत होते.....

इथे होणाऱ्या सण उत्सवांची माहिती , social activity , राणीचे पद , त्यांचे अधिकार , राणीच्या जबाबदाऱ्या यांची माहिती देत होते.....

शेवटी त्यांनी पॅलेस बद्दल माहिती सांगितली.... रिद्धी लक्ष देऊन सर्व ऐकत होती....

" तुम्हांला पॅलेसची सर्व माहिती आहे...." रिद्धी

" हो....." मिलिंद

" कुंवरसांचा कक्ष कुठे आहे....." रिद्धी

" माफ करा राणीसा... पण तिथे जाण्याची कोणाला परवाणगी नाही...." मिलिंद

" का बर..." रिद्धी

" कुंवरसांना त्यांच्या कक्षात कोणी आलेलं आवडत नाही.... आणि आपण देखील हे लक्षात ठेवा... आपल्या निजी गोष्टी कोणालाही सांगु नका.... समोरची व्यक्तीची खात्री करून घ्या.... पटकन कोणावरही विश्वास ठेवू नका..." मिलिंद

नंतर इराने रिद्धीला बरेच नियम समजावून सांगितले , कोणासोबत कसं बोलायच , किती बोलायच , कशा पध्दतीने बोलायच हे समजावून सांगितल....

इराने सांगितलेले प्रोटोकॉल ऐकून रिद्धीला चक्कर यायची यायची बाकी होती....

संध्याकाळी संजना पॅलेसला आल्या..... राजमातांना भेटून अर्पितांसोबत त्या रिद्धीकडे निघाल्या......

दिवस संपत आला तशी रिद्धी कंटाळायला लागली..... तेव्हा धरा तिच्या रूममध्ये आली....

" काय झाल वहिनी साहेब.... अशा का बसल्या आहेत...." धरा

" असं रिकाम बसायची सवय नाही ना म्हणून कंटाळा येतोय...." रिद्धी

" एक कामं करूया.... आपण डान्स करूया...." धरा

" नाही नको..." रिद्धी

" तुम्हांला त्यामुळे छान वाटेल.... मी गाणं लावते...." धरा

धराने गाणं निवडून स्पिकर जॉईन केला.... रिद्धीने ओढणी बांधली......

रंगी पर उड़ आवे
खुशियों संग लावे
हरखाये हाइयो हाय हाय

रंगी पर उड़ आवे
खुशियों संग लावे
हरखाये हाइयो हाय हाय

आशा नई किरणों बिखराए
उमंगें वि छलकाए
मन हल्वेठी गुनगुनाए
हाय हाय हाय हाय …

हे शुभारंभ हो शुभारंभ
मंगल बेला आई
सपनों की डेहरी पे
दिल की बाजी रे शेहनाई
शेहनाई शेहनाई

हे शुभारंभ हो शुभारंभ
मंगल बेला आई
सपनों की डेहरी पे
दिल की बाजी रे शेहनाई
शेहनाई शेहनाई

ख़्वाबों रचीलों साज़ सजिलों
शुभ घड़ी छे आवई
आजा आजा तमतमाता
शामना ओझे लावे
ओह लावी
हो हो हो लावी

रंगी पर उड़ आवी
खुशियों संग लावी
हरखाये हाइयो हाय हाय
रंगी पर उड़ आवी
खुशियों संग लावी
हरखाए हाइयो हाय हाय हाय

हाँ मज़ा है ज़िन्दगी
नशा है ज़िन्दगी
धीरे-धीरे चढ़ेगी हो
दुआ दे ज़िन्दगी
, बता दे ज़िन्दगी
बात अपनी बनेगी हो

ख़्वाबों के बीज
कच्ची ज़मीन पे हमको बोना है
आशा के मोती साँसों की माला
हमें पिरोना है
अपना बोझ मिल के
साथी हमको धोना है
शेहनाई, शेहनाई, शेहनाई

हे रंग लो म्हाराना आए थाई थाई
हे शुभारंभ हो शुभारंभ
मंगल बेला आई
सपनों की डेहरी पे
दिल की बाजी रे शेहनाई
रास रचीलो साज सजिलो
शुभ घड़ी छे आवी
आजा आजा तमतमाता शामना
ओझे लावी
ओ लावई


रिद्धी मागे वळली तर समोर संजना आणि अर्पिता उभ्या होत्या..... शामल आणि सरला खाली मान करून उभ्या होत्या.....

" काय करत होत्या तुम्ही रिद्धी..." संजना

" डान्स करत होतो...." रिद्धी

" तुम्ही डान्स करा आम्हांला काही अडचण नाही... पण इथे पाहुण्यांची रेलचेल असते.... तुम्ही तुमच्या अकॅडेमी मध्ये नाही तर पुरोहितांच्या पॅलेस मध्ये आहात.... जे कि प्रतिष्ठीत घराणे आहे...." संजना

" आम्ही तुमच्या कुटुंबियांना मागेच बोललो होतो.... मोठ्या घराण्यात राहणं म्हणजे विनोद नाही.... त्यांचे काही प्रोटोकॉल असतात ते पाळावे लागतात.... " संजना

संजनाच बोलणं रिद्धीच्या मनाला लागलं होत.... तिचा चेहरा उतरला होता....

" ताईसाहेब हळुहळु कळेल त्यांना... तुम्ही मुंबईमध्ये राहतात तस इथे नाही राहता येत.... उद्या काही मंडळी तुम्हांला भेटायला येणार आहेत.... त्यामुळे तुम्हांला कोणी असं बघु नये इतकच.... ठीक आहे..." अर्पिता

" हो आई साहेब..." रिद्धी

अर्पिता आणि संजना निघून गेल्या..... पण रिद्धीला आता राहवलं नाही आणि तिचे डोळे वाहु लागले....

" I'm sorry वहिनी साहेब..... माझ्यामुळे तुम्हांला ऐकाव लागलं...." धरा

" नाही तुम्ही का sorry बोलताय..... आम्हांला पण लक्षात यायला हवं होत...." रिद्धी

" तुम्ही रडण थांबवा बर आता... थोड्या वेळात राम्या येईल तुमचा ड्रेस घेऊन...." धरा बोलून निघून गेली.....

रिद्धी गॅलरी मध्ये जाऊन बसली..... तिला तिच्या घरच्या सर्वांची आणि ग्रुपची आठवण येऊ लागली..... तिथेच तिचा डोळा लागला......

दिनकरजींचा जेवणासाठी कॉल आला तेव्हा शामलने झोपली असल्याच सांगितल.... म्हणून अर्पितांनी जेवण कक्षात देण्यासाठी सांगितल.....

वंश रिद्धीच्या कक्षात आला तेव्हा शामल रूमचे पडदे बंद करत होती.... वंशला बघुन तिने अभिवादन केलं.....

" राणीसा कुठे आहेत..." वंश

" त्या गॅलरी मध्ये बसल्या होत्या आणि तिथेच झोपून गेल्या..... " शामल

" आम्ही बघतो.... तुम्ही जाऊन त्यांच्या जेवणाच बघा....." वंश

शामल मान देऊन निघून गेली.... जाताना तीने डोअर लावून घेतला.....

वंश बेडरूमच्या गॅलरीमध्ये गेला.....रिद्धी तिथल्या सोफ्यावर पाय कुशीत घेऊन झोपली होती.... वातावरणात गारवा जाणवत होता.... हवेने केस उडत चेहऱ्यावर येत होते.....

वंश तिच्याजवळ असलेल्या टेबलवर जाऊन बसला...... तिचे चेहऱ्यावर आलेले केस त्याने बाजूला केले...... त्याच्या थंड बोटांच्या स्पर्शाने रिध्दीने अंग चोरून घेतल.....

" I know princess...... तुला इथे रहायला जमत नाही आहे..... पन फक्त काही दिवस.... " वंश तिच्या कपाळावर ओठ टेकवतो...... त्याच्या झालेल्या स्पर्शाने रिध्दीला जाग येते.....

" तुम्ही केव्हा आले...." रिद्धी उठून बसली...

" आत जाऊया.... इथे थंड हवा आहे.... आजारी पडाल.... " वंश तिचे केस सेट करत बोलतो... तेव्ह रिद्धीला ती जयपुर मध्ये असल्याच जाणवत....

" oh no..... मी अशी झोपून कशी राहिले...... सगळे काय विचार करतील.....😟😟" रिद्धी टेन्शन मध्ये येते.....

" स्श्श्श्श......🤫🤫 शांत हो आधी....." वंश तिच्या ओठांवर बोट ठेवतो.... रिद्धी शांत होते

" कोणीही काहीही बोलणार नाही आहे..... आई साहेबांनी तुमच जेवण रूम मध्ये पाठवायला सांगितल आहे.... जेवण आल्यावर जेवण करून घ्या...." वंश

" हम्म्म्म.... तुम्ही जेवलात...." रिद्धी

" आमच जेवण झालं आहे..... " वंश

डोअर नॉक झाला..... वंश हॉल मध्ये येऊन बसला....

" या आत....." वंश

सरला आणि शामल रिद्धी साठी जेवण घेऊन आल्या.... दोघींनी प्लेट लावून निघून गेल्या.... तोपर्यंत रिद्धी फ्रेश होऊन आली.... वंशने तिला हात धरून जवळ बसवलं आणि स्वतः तिला भरवू लागला..... रिद्धी त्याच्या कडे बघत जेवण करत होती.....

कितीतरी दिवसांनंतर ती त्याला एवढं जवळून बघत होती......

" आम्ही इथेच आहोत जेवण होत नाही तोपर्यंत त्यामुळे आम्हांला नंतर बघत बसा...." वंश घास तयार करत गालात हसत बोलतो...

" असाल ही.... पण तुम्हांला प्रोटोकॉल्स पाळावे लागतात.... तुम्ही लगेंच जाल.... त्यानंतर कधी अस बघता येईल...." रिद्धी त्याच्याकडे बघत बोलत असते..... वंश तिला घास भरवतो......

" मला माहीत आहे..... आपल्या सध्या हवा तसा वेळ नाही मिळाला आहे..... आणी इथे आल्यापासुन तर आपण एकमेकांना बघू देखील शकत नाही आहे..... पण आम्ही प्रयत्न करू तुम्हांला कुठे बाहेर घेऊन जाऊ ......." वंश तिच्या कडे बघून बोलतो.....

गप्पा करत रिद्धीच जेवण होत...... वंश जाऊन हॅन्ड वॉश करून येतो..... शामल आणी सरला प्लेट्स घेऊन जातात......

रिद्धी हॉल मध्ये असलेल्या गॅलरी मध्ये जाऊन थांबते...... बाहेर थंड हवा असल्याने तिचे केस उडत होते आणी ती तिच्या नाजूक बोटांनी त्यांना सावरात होती......

वंशने मागून तिला मिठी मारत तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवली..... त्याच्या अशा अचानक मिठीने रिद्धी थोडी बावरली.....

" अहो काय करताय..... कोणी बघितलं तर.... तुमचे प्रोटोकॉल्स विसरले का....." रिद्धी त्याची मिठी सोडवत बोलते..... पण वंशची पकड एकदम मजबूत असते.....

" कोणीही नाही बघणार..... त्यामुळे प्रोटोकॉल्स मोडल्याच कोणाला कळणारही नाही...." वंश डोळे बंद करून बोलतो.....

" अहो पण....." वंश तिला गर्रकन स्वतःकडे वळवून तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो..... त्याच्या अशा जवळ असण्याने तिचे शब्द घशातच अडकतात......

" काय बोलल्या तुम्ही....." वंश तिचे चेहऱ्यावर आलेले केस त्याच्या लांबासडक बोटांनी मागे करतो..... केस मागे करताना त्याच्या झालेल्या स्पर्शाने रिद्धीच्या अंगावर शहारा येतो....

" मी....मी कु...कुठे ... काय बोलले...." रिद्धी अडखळत कशी तरी बोलते.....

" तुम्ही काही तरी बोलल्या....." वंश तिची खाली झुकलेली नजर वर करून बोलतो....

रिद्धी साठी त्याचा स्पर्श नवीन नव्हता..... तरी तिच्या अंगावर रोमांच उभे राहत होते.... कदाचित ती नवीन जागेची जादू होती....

" अहो कोणी बघेल..... " रिद्धी त्याच्या कडे बघत बोलते....

" परत बोला...." वंश

" अहो कोणी बघितलं.... तर काय म्हणेल....." रिद्धी थोडी दूर होऊ पाहते.... पण वंश तिला जवळ ओढून तिच्या भोंवती असलेल्या पकड घट्ट करतो..... त्याच्या अजून जवळ ओढल्याने रिद्धीचे हात त्याच्या खांद्यावर जातात.....

दोघांच्या चेहऱ्यात फक्त काहीस अंतर बाकी होत..... एकमेकांना श्वास स्पर्शून जात होते.....

वंशने पूढे होत तिच्या कपाळावर ओठ टेकवले... त्याच्या ओठांच्या स्पर्शाने रिद्धीने डोळे बंद करून घेतले..... तिच्या हृदयाची वाढलेली धडधड त्यां देखील जाणवत होती.... वंशने तिच्या मानेत हात घालून अंगठा तिच्या गालावर फिरवत होता....

रिद्धीने हळूच डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं त्याचे डोळे तिची परवानगी मागत होते.... रिद्धीने टाचा उचकवत त्याच्या ओठांवर स्मुच करून त्याला मिठी मारली.....

वंशने तिच्या मानेवर ओठ टेकावून तिला किस करायला सुरुवात केली..... त्याच्या स्पर्शाने रिद्धीची त्याच्याभोवती असलेली पकड घट्ट झाली..... वंशने तिला बाजूला करत तिच्या कपाळ , डोळे आणी गालावर किस केल... त्यानंतर त्याच लक्ष तिच्या धरधरणाऱ्या ओठांनी वेधून घेतलं....

क्षणाचाही विलंबकरता त्याने तिच्या ओठांना आपलस केल..... रिद्धी त्याला साथ देत होती.... काही वेळाने वंश रिद्धीला मोकळ करून तिला मिठीत मारतो....

दोन दिवसांनंतर ती त्याची मिठी अनुभवत असते....... थोड्या वेळ तिच्या सोबत वेल घालवून वंश तिथून निघून जातो......

रिद्धीला देखील विचारात कधी तरी झोप लागते .......



क्रमशः

आज चा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा...... बरेच महिन्या नंतर पोस्ट करते आहे तर आशा आहे आधी ज्या प्रमाणे कथेला प्रेम दिल तस इथून पुढे देखील द्याल.....

🫰🏻🫰🏻