Ek Saitaani Ratra - 44 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | एक सैतानी रात्र - भाग 44

The Author
Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

एक सैतानी रात्र - भाग 44

भाग 44





माने साहेन त्या काळ्याशार मैक्सीतल्या आकाराभोवतीच उभे होते.

तो आकार त्यांच्या मनात गुढ जिज्ञासा निर्माण करत होता - बाकी सर्व तीन मृतक त्यांच्या परिचयाचे होते..

परंतू हा तिसरा मृत देह नक्की होता तरी कोणाचा ? हा प्रश्ण त्यांना राहून राहून सतावत होता.

तेवढ्यात ईं: थलाईवांचा आवाज आला.
त्यांच्या कपालातून बाणाची पात आरपार झाली होती-

कपाळात बाणाची पात जशीच्या तशी अडकलेली दिसत होती.

माने साहेब व नेमाडे साहेब दोघेही थलाईवांपाशी

"थलाईवा ! थलाईवा ! आर यू ओके?"
माने साहेब काळजीच्या स्वरात उच्चारले.

" नो....नो...माने , आई एम नॉट ओके ..! असं समजा की ही आपली शेवटची भेट आहे.!"
ईं थलाईवा चेह-यावर शून्य भाव ठेवत उच्चारले..
त्यांचा आवाज अगदी खोल गेलेल्या मधला होता.
डोळ्यांत प्राण नव्हते.

"माने ! आता माझ्याकडे जास्त वेळ नाही, दवा- पाणी सर्वकाही व्यर्थ आहे - म्हंणूनच मी काय सांगतो ते निट लक्ष देऊन ऐका ..!"

मानेसाहेब- नेमाडे साहेब दोघांनी होकारार्थी
मान हलवली.

तस ईं:थलाईवांनी ईगलशी झालेल्या बोलण्यापासून ,ते त्याच्या मृत्युची कल्पना देणा-या सुर्यांशपर्यंत व त्यांच्यावर झालेल्या भ्याड हल्लयापर्यंतची सर्व घटना थोडक्यात त्या दोघांसमोर मांडली.

" म्हंणजे हा काल्या मैक्सीतला रेंचो आहे - आणी हा शैडो? पण हे दोघे तर मेले ? मग तुमच्यावर हल्ला कोणी केला? " नेमाडे साहेब. बोलले.


" ह्याट..!" माने साहेब जरासे संतापले.
" हे हरामखोर काय कमी होते , जे आता ह्यांनी त्यांची फौज पन तैयार केली..! च्यायला..नुस्त्या उठाठेवी! नक्की ह्या साल्यांना करायचं तरी काय आहे ? नक्की ईरादा काय आहे ह्यांच? काहीच समजत नाहीये मला !" एवढ बोलू माने साहेब जरा शांत बसले.

कारण ते पूर्णत चक्रावले होते, ह्या दोघांच अंत झाल तिथेच ह्या पर्वाच अंत व्हायला हव होत , हे त्यांना वाटत होत , पन नाही ह्या दोन हैवानांनी आपली पुर्ण फौजच उभी केली होती.

मग काहीवेळाने अचानक नेमाडे साहेबांचा आवाज आला.

" संस्था !"

" संस्था?" माने साहेबांनी न समजुन त्यांच्याकडे पाहिल.

" होय संस्था माने साहेब ! मला वाटत , ह्या दोघांच काहीतरी मोठ प्लानिंग होत - म्हंणजे पहा?
एक आतंकवादी संस्थेच उद्देश्य काय असत ?"

" जगाला त्रास देण, बोंब स्फोट मार्फत सामान्य लोकांच मृत्यु घडवूण आणन ! आणी जगात आपली सत्ता स्थापित करण..!" माने .

" येस अगदी बरोबर ओळखलत माने साहेब, मला वाटत आतंकवाद्यांसारखीच ह्या दोन जणांनी सुद्धा आपली एक संस्था तैयार केलीये - त्या संस्थेत किती जण असतील? किती नाही? ते मला ठावूक नाही , पन ह्या संस्थेच उद्देश्य हेच आहे , की सामान्य मानवाच मृत्यु घडवून आणायचं ,आणी ह्या जगावर आपल राज्य प्रस्थापित करायचं !"
नेमाडे साहेब एका स्वरात बोलले.

त्यांच्या काही काही तर्कांचा मेल सत्याशी थोडफार जुळत होत ! फक्त थोडफार !

" आहह माने ..! " थलाईवांच कण्हण्याचा आवाज व हाक आली.

" येस येस..थलाईवा बोला..!"

" नेमाडे साहेब बरोबर बोलतायेत ,त्या दोघांनी नक्कीच आपली एक फौज बनवली आहे - आणी आणखी एक ! हे प्रकरण काहीस विचीत्र, आणी आपल्या बुद्धीपासून अपरीचित आहे!"


" होय , खर आहे तुमच ! आम्हाला ह्याची कल्पना आहे !" नेमाडे होकारार्थी उद्दारले.

मृतोक्ष्वरी विद्येचे काही काही दृष्य त्यांनी पाहिले होते..त्यावरून त्या अभद्र घटनांवर विश्वास ठेवण सोप्प जात होत.

" ईथलाईवा ! मला वाटत , तुम्हाला उपचाराची खरच गरज आहे ! हे पहा तुम्ही ठिक ठाक वाचु शकता , माझ एक ऐकाल? मी ईथे कुठेतरी सुर्यांश दिसतो का ते पाहतो , पण नेमाडे साहेब तुम्हाला इस्पितळात घेऊन जातील.!"

माने साहेबांनी नेमाडे साहेबांकडे पाहिल.
त्यांच्या चेह-यावर कोणतेच भाव नव्हते.
जणु ते ख-या अर्थाने जाईला तैयारच नव्हते .कारण त्यांना माने साहेबांना सुद्धा बरोबर घ्यायचं होत.

' ओ ,हो, ओ, हो..!"
इं:थलाईवांना ठसका बसला, ते खोकले- खोकताच
तोंडातुन रक्ताची उबळ बाहेर पडली... जमिन लाल रक्ताने रंगवून गेली.

" माने साहेब..!" दमा झालेल्या रुग्णासारखे थलाईवा बोलू लागले.

" माझी ही शेवटची घटका आहे, आता इस्पितळात घेऊन जाण्या ईतका वेळ माझ्याकडे नाही! माझ ऐका, मला ईथेच राहूद्या , तुम्ही आधी सुर्यांशला शोधा .आणि इथून लागलीच बाहेर पडा....!"

थलाईवांच बोलून झाल होत .
पण माने साहेब जागेवरच थांबले होते.
त्यांना काहीतरी बोलायचं होत , त्यांनी बोलायला तोंड सुद्धा उघडल होत - पन मध्येच झुडपांच्यात सळसल जाणवली..-

राक्षस चालावा तसा पावळांचा धप,धप आवाज येऊ लागला..! मध्येच कोणितरी आसुरी हास्य करत मोठ्याने हसत होत.

" ते आले...ते आले...! निघा, तुम्ही ईथून..निघा..! त्यांनी तुम्हाला पहायला नको जा, जा तूम्ही..जा..निघा ...निघा जा ..लवकर..!"
थलाईवांच्या तोंडून पुन्हा रक्ताची ऊबळ बाहेर पडली.

" माने साहेब चला, माने साहेब चला..!"
नेमाडे साहेबांनी मानेना ओढतच जरा दुर नेहल ..
समोर एक मोठा पाषाणी दगड होता - त्या दगडाच्या आडोश्याला दोघेही लपले होते.

तोच समोरून झाडझुडपांना बाजुला सारत
ते चारजण बाहेर आले.

xxxx xxxxxxxxx
" कमॉन, कमॉन -बॉयज..! जस्ट फ़ास्ट,जस्ट
फास्ट! वेगाने धावा..!" सब:इं:रनदिवे मोठ्याने ओरडले.

त्यांनी प्रथमच धावता धावता मागे वळून पाहिल..- आणी जस मागे वळून पाहिल..

प्रथम धावता धावताच त्यांचा वेग कमी झाला.
ते जागेवरच थांबले, मग आश्चर्यकारक नजरेने समोर पाहू लागले.. त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांना फक्त चार फोर्स मेंबर्स उभे दिसत होते.

" व्हॉट ...द फक.! बाकीचे कुठे गेले?"

" सर मला वाटत , त्या हैवानाने एक एक करत आपल्या फोर्स मेबर्सला मारल !"
एक फोर्स मेंबर आपल तर्क लावत म्हंटला.

" औह शट !" ईं: रणदिवेनी दोन्ही हातांच्या पंज्याचे डोक्यावरचे केस पकडले

" हे चांगल नाही झाल, हे चांगल नाही झाल..!
आता डी-पार्टमेंटला कस तोंड दाखवू मी , हेड तर माझ्या तोंडात शेण घालतील- अक्कल पाजलती प्रत्येकजण..! फकssss..!"
इं: रणदिवेंनी अस म्हंणतच बाजुच्या झाडावर लाथ मारली..

" आह्ह्ह्ह आई...आई...आई..!"
लाथ मारताच आवाज आला.

ईं:रणदिवे आणि फोर्स मेंबर डोळे फाडून आश्चर्यकारक नजरेने त्या झाडाकडे पाहत होते..

" झाड विव्हळल सर, तुम्ही लाथ मारली आणि झाड विव्हळल.! " ईं: रणदिवेंनी एक दोन सेकंद त्या झाडाकडे कसतरीच पाहिल आणि पून्हा त्या झाडाला लाथ मारली.

" आह..अह..आई..आई..आई..!"
पुन्हा मानवी आवाज आला..

इं:रणदिवे, फोर्स मेंबर आवाक होऊन पाहत होते.

तोच पुन्हा एक आवाज आला.

" कोण आहे रे ?"
अस म्हंणतच त्या झाडामागून , सुर्यांश पाठ चोळत
पुढे आला.

" तु... ? बळवंतेंचा मुलगा..का?"

" होय..होय..मीच!"
सुर्यांशच्या पाठीला काहीतरी टोचत होत.
तसा तो पाठमोरा वळला.

" माझ्या पाठीवर काही अटकल आहे का पहा!"?
ईं: रणदिवेंनी पाहिल..एक टोकदार काटा पाठणात घुसला होता.

तो ईं: रणदिवेंनी काढुन टाकला.

" आह्ह आता बर वाटतंय !"
सुर्यांश सुटकेच श्वास सोडत म्हंटला.

" सो मिस्टर सुर्यांश, तुम्हीच आमच्या थलाईवा सरांशी काहीवेळा अगोदर कॉन्टेक्ट केल होत का? "
रणदिवेंनी विचारल

" होय सर, मी त्यांना ईगल मृत झाला आहे अस कळवल!"

" अच्छा! पन तुमच्या चेह-याला हे काय लागल आहे..? रक्त आलय..बाहेर..?"

" अरे हो !" सुर्यांश काहीतरी लक्षात आल्यासारख पटकन बोलू लागला.

त्याने ईगल मृत झाल्यापासून ते तो झाडावर चढण्यापासून ते ए:ड़ब्लु: एम चालवण्याच प्रसंग
वगळून त्या जागी झाडावरून कोसळला अशी बनाव माहिती सांगितली.

" येस..येस..! तू ज्या नराधमाला हिट केलस! हा तोच नराधम आहे..! ह्यानेच आमच्या सरांवरही हमला केला आहे, आणी आमच्या बाकीच्या फोर्स मेंबर्सला ही मारलं आहे.."

" परंतू..सर, जर रेंचो आणि शैडो मृत झालेत आहेत, मग हा कोण असेल?" सुर्यांशने विचारल.

" मिस्टर सुर्यांश, मला वाटत रेंचो आणी शैडोचा
मित्र! किंवा साथीदार असू शकतो ! कारण तो मारणारा धनुष्य बाण ,शैडो प्रमाणेच उत्तम प्रकारे हाताळत आहे..!"

" मग आता ? आता काय करायचं? "
सुर्यांश म्हंटला.

रणदिवेंनी खाली पाहत आपले डोळे डावीकडून उजवीकडे फिरवले...आणि त्यांची नजर ए:डब्लु:एम वर गेली.

" तुम्ही म्हंणालात की तुम्ही सुद्धा स्नाईपर रायफल आणलीयेत! कुठे आहे ती ?"

" होय , ईथे झाडाबाजुलाच ठेवलीये..कम!"
सुर्यांश निघुन गेली.

रणदिवे सुद्धा जायला निघले - पन मध्येच ते थांबले.-मागे वळले.

" तुम्ही चौघे..? " रणदिवे पुन्हा काहीतरी विचार करू लागले...मग पटकन म्हंणाले.

" हे पहा, रेंचो आणि शैडो मेले आहेत - पन त्यांची फौज ते नक्की किती आहेत , हे आपल्याला ठावूक नाही आहे ! म्हंणूनच आपल्याला एक्सट्रा प्लानची गरज आहे , माझ ऐका तुम्ही चार जणांमधले दोन जण माझ्याबरोबर थांबा- आणी उर्वरित दोन जण जंगलातून बाहेर पडा, आणी ठाण्यात जा, तिथे जाऊन हेड ना , इथली गंभीर परिस्थिती सांगा..आणी तत्काल मिलेट्री फोर्स मेंबर्स पाठवायला लावा..ते ही हाई डेमेज रायफलज सहित..! ओके ? गो अहेड..!"


" येस..सर..!"
दोन कोंन्सटेबल्जनी त्या अवस्थेतही कडक सेल्यूट ठोकल. रणदिवेंनी दोघांच्याही खांद्यावर हात ठेवून होकारार्थी पणे मान हलवली..

" सर..!" सुर्यांश एक्सट्रा स्नाईपर रायफल घेऊन आला होता.

तो येताच , त्याला दोन फोर्स मेंबर्स पुढे पुढे जातांना दिसले होते.


क्रमश :