A wonderful feeling of love... in Marathi Love Stories by Stella books and stories PDF | प्रेमाची भन्नाट लागण...

The Author
Featured Books
Categories
Share

प्रेमाची भन्नाट लागण...

" अगं ये रताळे...!! म्हंटल ना तुला... मला नाही करायचे तुझ्यासोबत लग्न.. कळत नाही का तुला एकदा सांगितलेलं... ", तो भयंकर संतापून म्हणाला....



" अरे पण का..!!! ", ती काय मागे हटायला तयार नव्हती...


तसं त्याने स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला...



" वय काय आहे गं तुझं...???", त्याने चिडूनच विचारलं...



" पूर्ण सतरा... ", ती लाजूनच म्हणाली....



" पाहिलंस...!! माझ्यापेक्षा तब्बल पाच वर्षांनी लहान आहेस...! काही वाटत नाही का तुला..?? आणि एवढ्या लहान वयात तुला कशाला लग्न करायचं आहे...!!", त्याने चिडूनच विचारलं..



" प्रेम आहे ना माझं तुझ्यावर... मग लग्न नको का करायला...????", ती तोंड पाडून म्हणाली...



तसं त्याला काय करू नी काय नाही समजत नव्हतं...


" हे बघ पौर्णिमा...ssss हे वय तुझं अगदी कोवळे आहे... या वयात अभ्यास करायचा असतो... लव मॅटर नाही...!", तो तिला समजावत म्हणाला...



" पण निनाद... अभ्यास पण करतेच ना मी... एव्हरेज आहे मी कॉलेजमध्ये... अजून काय पाहिजे...???", ती तोंड बारीक करून म्हणाली...



टिनेज मध्ये असलेली ती... नवीनच निनादच्या प्रेमात पडली होती... जो त्यांच्या सोसायटी मध्ये राहत होता...


सध्या बावीस तेवीस वर्षांचा तरुण होता तो...


आणि आपल्या ध्येयाच्या मागे वेडा झाला होता... ते म्हणजे अंगावर पोलिसाची वर्दी ...!!!


आज सकाळीच तिने त्याला रस्त्यात अडवले होते.. जो लायब्ररी मध्ये अभ्यासाठी जायला निघाला होता...


तिला पाहताच त्याने मनातच डोकं आपटून घेतलं...


गेल्या तीन महिन्यापासून हेच चालू होते...


ती रोज त्याला हेच सांगत होती.. की तिचं त्याच्यावर प्रेम आहे...


आधी तिचं वय पाहता त्याने तिला नीट समजावून सांगितलं.. की हे फक्त आकर्षण आहे... जे हे वयात होणे साहजिकच आहे...


आणि त्यालाही माहीत होते... की हे आकर्षनच आहे....


म्हणून तिला न दुखावता त्याने तिला समजावण्याचे प्रयत्न केले.... पण ती ऐकेल तर शप्पथ...!!


अगदी धीट होती ती...



अकरावीला होती ती... आणि पुढच्या वर्षी बारावीला असणार होती... म्हणजेच महत्त्वाचे वर्ष... असे वर्ष ज्यावर तिचं करियर अवलंबून होतं....



पण ती काहीच ऐकत नाही... समजून घेत नाही म्हंटल्यावर त्या प्रचंड राग आला होता तिचा भर म्हणजे तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता... त्यात तिच्यामुळे अडथळा येत होता.. ज्याचा वेगळाच राग येत होता त्याला...



त्याने तिच्याकडे नीट निरखून पाहिलं..



अंगाने थोडीशी चबी... गव्हाळ रंग... केसांचा बांधलेला मेसी बन... चेहऱ्यावर मेकअपचा लवलेश नाही... अंगावर फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस... थोडुशी गबाळ...


नवीनच तारुण्यात उतरलेली ती पोर... आणि नवीनच प्रेमात पडलेल्या प्रेमाची धुंदी... तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती....



" तुला काय मला जेल मध्ये घालवायचे आहे का..??", त्याने गंभीर होऊन हाताची घडी घालून तिच्यावर नजर कडकपणे रोखून विचारलं...



तसं तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं..




" मी का तुला जेल मध्ये पाठवणार...???", तिने न समजून विचारलं....



" तूच म्हणालीस ना... तुला माझ्याशी लग्न करायचं आहे म्हणून... तुझं वय फक्त सतरा.. आणि तुझ्याशी लग्न करायचं म्हणजे मला जेल मधेयच जावं लागेल ना..!!", तो शांतपणे म्हणाला...



तेव्हा जाऊन तिची ट्यूब पेटली...



" मग आता लग्न नको... मी अठरा वर्षांची झाले की करू ना लग्न... ", ती उपाय देत... स्वतःवर खुश होत म्हणाली...


तसं तो एकटक तिच्याकडे पाहू लागला... जराही चेहऱ्यावरचे हावभाव न बदलता...


ती मात्र अल्लड वयाची .... त्याची ती एकटक नजर पाहून लाजून.. गालात हसून खाली मान घालून राहिली...



तसं तिची रिऍकशन पाहून त्याला खुदकन हसू आले त्याही परिस्थितीत... पण त्याने आवरलं स्वतःला...


" श्या..!! कसं असतं हे नाजूक कोवळ वय... नवीनच आकर्षणाची झालेली सुरवात... हिच्यामुळे मलाही आता टिनेज वाली फिलिंग येतेय... ", तो तिच्यावर हसून मनातच म्हणाला...


त्याने तिला निरखून पाहिलं तर ती आताही लाजून मान खाली घालून.. आपल्या हातांच्या बोटांशी चाळा करत होती... पायांची बोटेही जमिनीवर रेंगाळत होती...



" हिच्या या आकर्षणाला आताच थांबवायला हवे... नाहीतर पुढे जाऊन तिलाच त्रास होईल... कारण माझ्यातरी मनात तिच्यासाठी काहीच नाही...! ", तो मनातच म्हणाला...



" हे बघ पौर्णिमा... मी आधीच तुला काही जास्त म्हणालो नाही... कारण वयाने लहान आहेस... आणि अल्लड वयात आहेस... म्हणून खडेबोल मला तुला ऐकवायचे नव्हते... पण आता तु मला भाग पाडले आहेस... ", तो काहीसा जरबेने म्हणाला...


तसं त्याची ती टोन ऐकून ती चकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली....



" एक लक्षात ठेव पौर्णिमा..! माझं तुझ्यावर प्रेम नाहीये.. किंवा हे म्हण मला तु जराही पसंत नाहीस... की मी तुझ्यावर प्रेम करेन... नाही आवडत मला तु... आणि तुझा हा बालिशपणा तर मला जास्तच आवडत नाही...! ", तो रागात म्हणाला... तसं ती अगदी स्तब्ध झाली...



तीन महिन्यात त्याने कधीच तिच्यावर एवढा आवाज वाढवला नव्हता... जेवढा तो आज वाढवत होता...


त्याचा एक एक शब्द आता तिच्या काळजाला लागू लागला...



त्याच्या त्या तेवढ्याश्या शब्दांनी सुद्धा तिच्या डोळ्यांत पाणी जमा झाले...



" पण.. ", तरीही तिने बोलण्याचा प्रयत्न केला...



पण..




" Shut up..!!!!!!! ", तो रागात ओरडला तिच्यावर... तशी ती दचकून ... घाबरून दोन पावले मागे सरकली...



" कळत नाही का तुला एकदा सांगितलेलं...??!! नाही आवडत तु मला... आणि जी मुलगी मला आवडतच नाही... तिच्याशी मी लग्न का करेन..??

आणि काय गं .... तु इकडे तुझ्या मावशीकडे आली आहेस ना शिकण्यासाठी...???

मग शिकायचं सोडून हे कसले प्रकार चालू करून ठेवले आहेस तु...??


आणि तुला वाटतं मी अश्या मुलीशी लग्न करेन...??


अगं मूर्ख मुलगी...! इकडे मावशीकडे आली आहेस म्हणजे सध्या तु त्यांची जबाबदारी आहेस ना...?? तुला काही झाले तरी प्रश्न त्यांच्यावर उठतील... आमच्या मुलीला काय झाले म्हणून...!!



आणि तु काही प्रकार केलेस ना वाडे वाकडे... तरीही प्रश्न तुझ्या मावशीवर उचलले जाणार आहेत... याची जराही काळजी नाही तुला..??


फक्त तुझ्या मावशीवर नाही.. तर तुझ्या पूर्ण कुटूंबावर प्रश्न केले जातील... त्यांच्या संस्कारावर केले जातील... की पाहा.. तुमच्या मुलीने कसले उद्योग करून ठेवलेत...


मुले काहीही करुदेत... तरीही प्रश्न आईवडिलांच्या संस्कारावर केला जातो... एवढं माहीत नाही का तुला...???


आणि अश्या मुलीशी मी लग्न करू...?? जिला आपल्या आईवडिलांच्या इज्जतीची पर्वा नाही...?? त्यांच्या अस्मितेची पर्वा नाही...??


जिला याची पर्वा नाही... की आपल्या आईवडिलांना कसं वाटेल जेव्हा त्यांना हे समजेल की त्यांची मुलगी... शिकायचं सोडून मुलांच्या पाठी लागली आहे...


त्यांना गेल्या कित्येक महिन्यापासून नुसती आय लव्ह यू म्हणत सुटली आहे...!!



तुला खरंच वाटतं मी तुझ्याशी लग्न करेन... जिला आपल्या वडिलांची इज्जत सांभाळता येत नाही..??


अगं हे वय असतं अभ्यास करून आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करण्याचं... नको त्या वळणावर अडकून राहण्याचं नाही...!


तुला अभ्यास करण्याची... शिकण्याची मुभा दिली आहे... स्वातंत्र दिले आहे... तर तु त्याचा दुरुपयोग करते आहेस... बाकीच्या मुलींना बघ... !! त्यांना तर साधं घराबाहेर पडायची सुट नसते...!!


मग का म्हणून तुला भेटलेल्या संधीची माती करायची आहे...??


काय काय स्वप्न पाहून तुझ्या आईवडिलांनी तुला इथं पाठवलं असेल... आमची मुलगी शिकून मोठी होईल... हे होईल ते होईल...आमची छाती गर्वाने भरेल... पण आता त्यांना कोण सांगेल.. की त्यांची मुलगी त्यांच नाव मोठं करण्याच्या प्रयत्नात नाही... तर त्यांचं नाव मातीत मिसळवण्याच्या प्रयत्नतात आहे...!!



अगं वाईट वाटतंय मला तुझ्या आईवडिलांसाठी... की त्यांना किती त्रास होईल हे समजल्यावर... की त्यांची मुलगी त्यांच्याच विश्वासघात करत आहे... !!


आणि अश्या विश्वासघात करणाऱ्या मुलीला मी माझी बायको करेन...???


श्या..!! शक्यच नाही..!!!


मी स्वतः कधी असं काही केलं नाही... मुलगा म्हणून समाजाने सुट दिली असली तरीही... कारण हे करणे किती चुकीचे आहे.. हे समजतं मला...


आणि बहीणही आहे मला... जिला मी नेहमी सांगतो... की नीट अभ्यास कर आणि स्वतःच नाव कमाव... चुकीच्या आकर्षणाला भुलू नकोस...!


आणि तुला काय गरज आहे गं ... एवढ्याश्या वयात साथीदाराची...???


आईवडील आहेत ना तुझ्याकडे...?? मावशी आहे ना...?? कुटुंब आहे ना..???


मग कोणा इतराची गरज का आहे तुला आता सध्याला...??


हे बघ... तुझ्यासाठी कोणी बनलं असेल ना... तर ती व्यक्ती तुला नक्की भेटेल... खात्री आहे माझी... ती व्यक्ती स्वतःहून तुझ्या आयुष्यात येईल... तु कशाला शोधायला जातेस त्याला...???


तु तुझं करियर कर ना... त्यावर लक्ष दे...कारण सध्याच्या काळात सगळ्यात जास्त तेच महत्त्वाचं आहे...


उद्या जाऊन तुझ्यावर बोट नको उठायला की तु काय केलंस आयुष्यात ...?? किंवा तु काय कमावलेस म्हणून..!!


भेटेल तुला तुझी व्यक्ति... तोवर धीर धर जरा... कशाला उगीच घाई करायची... आणि आपल्याच आयुष्याचं वाटोळं करून घ्यायचं...??? ", तो धडाधड बोलत होता... तेही रागातच... अगदी प्रचंड रागात...!!!



ती मात्र मान खाली घालून अश्रू गाळत उभी होती... खूपच लागत होतं तिच्या मनाला... त्याच्या प्रत्येक शब्द तिच्या काळजावर वार करत होता...


ती तशीच मान खाली घालून मूकपणे रडत होती...


त्यालाही बरं वाटत नव्हतं तिच्यावर ओरडायला... पण त्यालाही हे करणे भाग होते... आणि त्याला गरज वाटली की अशी समज तिला द्यायलाच पाहिजे... कारण आज त्याच्यावर भाळते आहे ती.. उद्या जाऊन जर चुकीच्या मुलाच्या मार्गी लागली तर तिच्या आयुष्याचं काय...???



ती काही न बोलता फक्त रडत होती... तिला असं पाहून त्याने सुस्कारा सोडला...



" आय हॉप तुला समजलं असेल मला काय बोलायचं आहे... सो माझा नाद सोड... आणि स्वतःच्या शिक्षणावर लक्ष दे... आणि पुन्हा माझ्या मागावर येऊ नको.... हात जोडून सांगतोय...! कारण माझं करियर घडवण्यात व्यस्त आहे... मला त्यात अडथळा चालणार नाही... ", तो थंडपणे म्हणाला...



आणि तिथून निघून गेला...



जाताना त्याने तिच्याकडे एक नजरही टाकली नव्हती....



वाईट तर त्यालाही वाटत होते थोडं.. की तो बरंच काही बोलून गेला होता तिला... पण आता तिला सॉरी बोललो तर तिच्या हॉप्स त्याच्याप्रती वाढतील असं वाटत होतं त्याला... म्हणून तो शांतच राहिला... आणि तिथून निघून गेला...




त्या दिवशीपासून पौर्णिमा त्याच्या समोर कधीच आली नाही....


मग त्यानेही कधी तिचा विषय काढला नाही...



°°°°°°°°°°°°°°


सात वर्षांनंतर....



निनादने त्याचं पोलीस व्हायचं स्वप्न पूर्ण केलं होतं.. आता कित्येक वर्ष झाली होती त्याला पोलीस होऊन...


आज एका ठिकाणी बंदोबस्तावर होता तो...



गाड्यांची चेकिंग चालू होती....



अश्यातच एका बाईक वाल्याला थांबवले...


निनादने त्या बाईक वाल्याकडून त्याचे लायसन्स मागितले.. त्यावर तो बाईकवाला आपलं वोलेट पाहू लागला.....


त्याच्या मागे एक मुलगी बसली होती...


पण तिचा चेहरा दिसत नव्हता... आणि निनादने त्या मुलीकडे पाहायचीही तसदी घेतली नाही... त्या मुलीचेही निनादकडे लक्ष नव्हते....




" अगं पौर्णिमा...ssss ", तो बाईकवाला बोलला... तसं निनादच्या कपाळावर आठ्या पसरल्या...


हे नाव त्याला काहीसे ओळखीचे वाटले.... पण पटकन त्याला क्लिक झाले नाही...



" हा अभय....ssss ", मागे बसलेली पौर्णिमा... काहीशी झुकून म्हणाली.....


पण इतक्यात तिचं लक्ष समोर पोलिसाच्या वर्दीत असलेल्या निनाद वर गेलं... आणि ती स्तब्ध झाली...


तेवढ्यात निनादनेही तिला पाहिले..



आणि तिला पाहून तोही चकित झाला... कारण त्याला सात वर्षांर्वीचा तो प्रसंग आठवला....


आणि तोही स्तब्ध झाला तिला पाहून...



" अगं पौर्णिमा...ssss मी काहीतरी विचारतोय तुला.. लक्ष कुठे आहे तुझं...???", अभय तिला भानावर आणत म्हणाला... तसं ती अगदी भानावर आली...



" ह.. सॉरी.. काय म्हणालास...???", तिने काळजीपूर्वक विचारले अभयला...


" अगं माझं वोलेट मी तुझ्याकडे दिलं होतं ना सकाळी...??? बघ बरं तुझ्या पर्स मध्ये... ", अभय शांतपणे तिला आठवण करून देत म्हणाला...



" हो आहे माझ्याकडे... देते एक मिनिट.. ", तिने पटकन आपल्या पर्स मधून त्याचे वोलेट काढून दिले....



इकडे निनाद मात्र शांतपणे तिला पाहत होता... सात वर्षांपूर्वीचा अल्लडपणा आता कुठेच दिसत नव्हता....


तिच्या चेहऱ्यावर शांत भाव पाहून तिच्या maturity चा अंदाज येत होता तिला... तिने आपल्याला पाहिले... आणि तिने आपल्याला ओळखले.. हेही त्याच्या लक्षात आले...



अभयने लगेच आपले लायसन्स काढून निनादला दाखवले...



तसं निनादने लायसन्स पाहून परत त्याला दिले... या सगळ्यात निनादने चोरटा कटाक्ष पौर्णिमावर टाकला... पण ती तर मान खाली घालून बसली होती....



निनादने त्यांना सोडले... तसं अभयने गाडी पुढे घेतली...


पण तरीही जातानाही तिने त्याच्याकडे मान वर करून पाहिले नाही...


तो मात्र तिला जाताना पाहत होता....



तिला पाहून तो मनातच हसला..



" कधी काळी प्रेमाचा जप घालणारी... आज ढुंकूनही पाहत नाहीये ... ", तो स्वतःशीच मस्करी करत म्हणाला..



त्याला पुन्हा सात वर्षांपूर्वीचा तो प्रसंग आठवला... आणि तो गालातच हसला...



" काही प्रसंग गोड असतात... "


तो मनातच म्हणाला...




इकडे पौर्णिमा गाडीवर गपचूप बसली होती... आणि तिच्या ओठांवर अलगद हसू होतं... जणू काहीतरी मौल्यवान तिने पाहिलं...


आज तिच्या मनात प्रेम होतं की नाही निनादबद्दल माहीत नाही... पण आदर मात्र प्रचंड होता...



काहीवेळाने ते दोघे त्यांच्या मावशीकडे आले...



मावशीने मात्र आल्या आल्या पौर्णिमाला छातीशी कवटाळले....


" आली आमची डॉक्टरीन बाई...ssss ", मावशी तिच्या गालावर ओठ टेकवत मस्करीच्या सुरात.. प्रेमाने म्हणाल्या... तसं पौर्णिमा खुदकन हसली...



या त्याच मावशी होत्या... ज्यांच्याकडे पौर्णिमा अकरावीला आली होती राहायला...



" अगं मावशी म्हंटल मी पण आहे...विसरलीस का...???", अभय गाल फुगवून म्हणाला...



" अरे ये ये... तुला कशी विसरणार...?? बरं तुझी आई कुठे आहे...?? अजून कशी नाही आली...??", मावशी त्याला जवळ घेत म्हणाल्या...



" ए मावशी... ssss आता तुला तुझ्या बहिणी नीट माहीत आहेत ना... त्या अगदी शॉपिंग करण्यात बिझी आहेत... त्या येतील एक दोन दिवसात... तोवर मी आणि पौर्णिमा आहोतच की... काय गं... ", अभय पौर्णिमाला म्हणाला... तसं पौर्णिमाने हसून मान डोलावली...




" अरे ए.. आपल्याच मावशीच्या मुलीला नावाने हाक मारतात का..?? आणि तेही तेव्हा.. जेव्हा ती तुझ्यापेक्षा मोठी आहे... जरा म्हणून मान नाही... ", मावशी त्याला डोळे बारीक करून म्हणाल्या...



" ए मावशी.. ती फक्त दोन आठवड्यांनी मोठी आहे माझ्यापेक्षा... मग कशाला दीदी सांगायचं..?? ", अभय म्हणाला... तसं मावशीने त्याचे कान पिळले...



ते मात्र सगळे हसून आत गेले...


आत जाताच एक मुलगी येऊन पौर्णिमाला बिलगली.... तसं पौर्णिमानेही तिला हसून जवळ घेत मिठी मारली...



" अभिनंदन सोनाक्षी ताई... ssss फायनली लग्न करते आहेस... ", पौर्णिमा हसून सोनाक्षीला म्हणाली... तिच्या मावशीची मुलगी म्हणजेच तिची मावस बहीण...



" थँक्स बच्चा... ", सोनाक्षी हसून तिचे आभार मानत म्हणाली....



" congratulations taai...ssss ", अभय पण तिला जवळ घेत म्हणाला...



" थँक्स ब्रो... ", सोनाक्षीने त्याला हसून म्हंटले...



त्यानंतर सोनाक्षी आणि पौर्णिमा दोघीही सोनाक्षीच्या रूम मध्ये येतात...



" काय मग...?? काय चालू आहे..?? सगळं ठीक ना...???", सोनाक्षी पौर्णिमाला बेडवर बसवत म्हणाली....



" सगळं मस्त चालू आहे... ", पौर्णिमा गोड हसून म्हणाली....



" मग हॉस्पिटल काय म्हणतंय...???", सोनाक्षी तिच्या बाजूला बसून म्हणाली....



" जॉब चांगला चालू आहे हॉस्पिटल मध्ये... कधी कधी कॅम्प असतात... मग रवानगी तिकडे असते कधी कधी... पण छान वाटतं... निदान कोणाचीतरी थोडीफार मदत करू शकते.. असं वाटतं... ", पौर्णिमा गोड हसून सॉफ्टली म्हणाली....



तशी सोनाक्षी तिला एकटक पाहू लागली...



" काय झालं ताई..ssss अशी का पाहतेस..???", पौर्णिमाने किंचित हसून विचारलं...



" काही नाही.. हेच पाहते आहे की.. माझी छोटू बहीण जी कधीकाळी एवढी गबाळ असायची... बालिशपणे वागायची... ती आता बरीच समजूतदार झाली आहे...

तुला आता पाहून असं वाटतं की आता आताच काल परवाची तर गोष्ट आहे.... मनात जे येईल तसं वागायचीस... मग मागे पुढे काय होईल कसं होईल याचा अजिबात विचार करायची नाहीस...

आणि आज बघ...!


आज असं वाटतंय की मी खरंच एका खुप समजूतदार मुलीशी बोलते आहे...


तुझा तो बारवीचा काळ अजूनही आठवतो मला... याच रूम मध्ये बसून रात्रीचे दिवस केलेस तु अभ्यास करून..

कधी अभ्यासात जास्त रुची नसणारी तु... अचानकपणे एवढा अभ्यास करू लागलीस... तेही एवढ्या सिरीयसपणे की सांगायलाच नको...

तेव्हा म्हणालीस होती तु मला.. की ताई मी डॉक्टर होऊनच राहीन... आणि बस्स...!!!

शेवटी झालीसच डॉक्टर ...


आणि तुझ्या या अचिव्हमेंट्साठी मावशी मावशा माझी तारीफ करतात... म्हणतात की माझ्यामुळे तिला मोटिवेशन मिळालं... आणि तु नीट अभ्यास केलास... खरंतर मी काहीच केलं नव्हतं एवढं..", सोनाक्षी कौतुकाने म्हणाली... आणि शेवटचं वाक्य काहीसं हसून म्हणाली...




त्यावर पौर्णिमा किंचित हसली...



तिला सात वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला...



ज्यादिवशी निनादने तिची कान उघडणी केली होती... त्या दिवशी खुप रडली ती... तिच्या त्या कोवळ्या मनाला त्याच्या त्या गोष्टी खूप जखमी करून गेल्या होत्या...


पण तिनेही लवकरच समजून घेतले... की ती ज्या वळणावर जायला निघाली होती... ती वाट चुकीची होती...


कालांतराने तिला ही गोष्ट उमगली.. आणि मनोमन निनादचे आभार मानले.. की वेळीच त्याने तिची कान उघडणी केली... नाहीतर आपल्या आयुष्याचं वाटोळं तर तिने करून घेतलं असतंच... पण आपल्या आईवडिलांच्या संस्कारालाही काळिमा लावून घेतली असती...


म्हणून त्या दिवशी पासून तिने ठरवले... की आता असे वागायचे नाही... असा कोणताच निर्णय घ्यायचा नाही... जेणेकरून आपल्या आईवडिलांना त्रास होईल...



" बरोबर बोलतात माझे आई वडील... तुझ्यामूळेच तर मला मोटिवेशन मिळालं... तु किती स्टडी करायचीस कॉलेजला असताना.. तुला पाहून मग मलाही इंस्पिरेशन मिळायचं... आणि मग मीही अभ्यास करायची... ", पौर्णिमा म्हणाली... पण तिने खरं सांगायचं टाळलं... कारण ही गोष्ट तिने कोणालाच सांगितली नव्हती... कारण तिला भिती होती की तिला जज करतील या गोष्टीवरून...



म्हणून तिने शांतच राहणे पसंत केले....



दोघी भराभर बोलत होत्या...



एकीकडे रात्रीच्या वेळी निनाद घरी पोहोचला होता.... पण डोक्यात मात्र पौर्णिमाचेच विचार चालू होते...


तो कपडे बदलून आपल्या रूमच्या गॅलेरी मध्ये बसला होता....



आताही डोळ्यांसमोर पौर्णिमाचा चेहरा आला...



" वेडी मुलगी... त्या दिवशीपासून कधी दिसलीच नाही मला... आय हॉप पुन्हा तिने असं काही केलं नसावं... ", तो मनातच बडबडला...




तेवढ्यात त्याची आई त्याला हाक मारते...




" हा आई... बोल काय झालं...???", तो खाली हॉल मध्ये बसलेल्या त्याच्या आईवडिलांकडे येतो...



" दोन दिवसांनी कुलकर्णीच्या मुलीचे लग्न आहे... सो सुट्टी काढून घे एकदिवस... कारण कामावरून तु काही लवकर येत नाहीस... शब्द देऊनही... म्हणून सुट्टी घेऊन ठेव.. ", आई त्याला बजावून म्हणाली...



" आपल्या सोसायटी मध्ये राहायच्या त्या का...???", निनाद त्यांच्या बाजूला बसत म्हणाला...



आता बरीच वर्ष झाली होती... त्यांनी ती सोसायटी सोडली होती... आणि दुसरीकडे शिफ्ट झाले होते... स्वतःचे घर बांधले होते...


ही पौर्णिमाचीच मावशी... त्यांनीही सोसायटी सोडून दुसरीकडे घर बांधले होते...



" हो .. त्यांची एकुलती एक मुलगी सोनाक्षी.. तिचं लग्न आहे... त्या आल्या होत्या आपल्याला पत्रिका द्यायला... सो आपल्याला जायचंच आहे... आवर्जून उपस्थित राहायला सांगितले आहे त्यांनी... ", आई म्हणाली... तसं निनादने मान डोलावली....




" हो जाऊया... टाकेल मी एकदिवसाची सुट्टी...", निनाद म्हणाला...



" निनाद... जरा जास्तच सुट्टी घे... आपल्याला एका ठिकाणी जायचे आहे.. ", बाबा म्हणाले...



तसं निनादने त्यांच्याकडे न समजून पाहिले...



" तुझ्या आत्याकडे जायचे आहे... तिची तब्येत बरी नाहीये... आपल्याला विचारत होती... तर म्हणालो तिला की एक दिवस येतो म्हणून... ", बाबा म्हणाले... तसं निनादने मान डोलावली...



" ओके... मी एका आठवड्याची सुट्टी घेतो... त्यात कुलकर्णी मावशीकडील लग्नही उरकवून घेऊ... आणि आत्यालाही भेटून येऊ... ", निनाद म्हणाला...




" बरं... उद्या पूजा पण येणार आहे... विसरू नकोस... ", आई म्हणाली तसं निनाद हसला...



" ती विसरू देईल तर ना... सकाळपासून मेसेज करून त्रास देतेय... की मला स्टेशनला घ्यायला ये... ", निनाद हसून म्हणाला... तसं आईबाबा पण हसले...


पूजा म्हणेजच निनादची लहान बहीण... जी त्याच्याहून सात वर्षांनी लहान होती...



" आता आपण पण पूजाच्या लग्नाचं पाहायला हवं... ", आईने विषय काढला... तसं ते दोघेही तिच्या सोबत चर्चा करू लागले...




...



दोन दिवसांनी ...



आज सोनाक्षीचे लग्न होते... घरात बरीच वर्दळ चालू झाली होती पाहुण्यांची....



सगळेजण बिझी होते... काहीच वेळात वरात येणार होती.... आणि लग्नाला सुरवात होणार होती...


म्हणून सगळे धावपळीतच होते...


पौर्णिमा पण कामातच होती... पाहुण्यांना पाहत होती... सोनाक्षीचे इतर विधी चालू होत्या...


शेवटी संध्याकाळी वरात आली... तसं दणक्यात लग्न पार पडलं... पण अजून पाठवणीला वेळ होती... त्याआधी सगळे जेवायला बसले होते...



पौर्णिमा घरात आली... आणि ती सोनाक्षीच्या रूम मध्ये जाणार इतक्यात तिची मावशी तिला हाक मारते...


" अगं पौर्णिमा ssss ", मावशी...




" हा मावशी...???", पौर्णिमा त्यांच्या जवळ येत विचारते...



" तु काही कामात आहेस का आता...???", मावशीने विचारलं...



" नाही कामात असं नाही... पण सोना ताईच्या रूम मध्ये छोटी नेहा झोपली आहे .. तिला जेवण घालून आणते... मिनू ताई जरा बाहेर कामात आहेत... ", पौर्णिमा म्हणाली...



" अरे मग... या पाहुण्यांना पण जेवायला घेऊन जा... मी येतेच लगेच.. तुझ्या मावश्यांना भेटून...", मावशी हॉल मध्ये बसलेल्या एका कुटुंबाकडे दाखवत म्हणाली... तसं त्या कुटुंबातील एका सदस्याला पाहून पौर्णिमा अगदीच चकित झाली...


कारण ती फॅमिली निनादची होती... निनाद... त्याचे आईवडील... आणि त्याची बहीण.. अश्या चार जणांचा परिवार होता...



निनाद तिच्याकडेच पाहत होता... पण तिने पटकन सावरलं स्वतःला... पण आतून खूपच नर्व्हस झाली होती ती..



पण तसं चेहऱ्यावर दाखवू न देण्याचा तिने प्रयत्न केला...



" ही आमची पौर्णिमा ssss माझ्या बहिणीची मुलगी... डॉक्टर आहे ही... ", मावशी अगदी हौशेने तिची ओळख करून देत म्हणाल्या....



तसं ती डॉक्टर आहे ऐकून निनाद चकित झाला...




तिला अवघडून आलं होतं... पण तरीही तिने हात जोडून त्यांना नमस्कार केला... तसं निनाद गालात किंचित हसला...



तिने मात्र त्याला गालात हसताना पाहिलं... तसं तिची घाबरगुंडीच उडली...



" बाळा ह्यांना जेवायला घेऊन जा.... ", मावशी म्हणाली...



" हो आलेच... एकदा नेहाला घेऊन येते... ", पौर्णिमा म्हणाली... तसं मावशीने मान डोलावली....



पौर्णिमा आत जाऊन काहीच वेळेत एका चार पाच वर्षाच्या मुलीला आपल्या हातावर उचलून घेऊन आली...


आणि मग निनादच्या फॅमिलीला घेऊन जेवणाच्या मंडपात आली...



सगळे जेवायला बसले...



पौर्णिमा नेहाला घेऊन बाजूला बसायला जाणार होती... पण निनादच्या आईने तिला त्यांच्या सोबतच जेवायचा हट्ट केला... तसं ती नाईलाजाने बसली....



निनाद तिलाच पाहत होता...


रेड रंगाच्या साडी मध्ये ती खूपच सुंदर दिसत होती... केसांची छान हेयरस्टाईल करून गजरा माळला होता... कानात झूमके... अंगावर दागिने... हातात बांगड्या.. हलका शोभेल असा मेकअप.. खूपच सुंदर दिसत होती ती...



" मावशी...ssss मला झोप लागली आहे... ", छोटी नेहा जी तिच्या मांडीवर बसली होती... ती आळस देत पौर्णिमाला बिलगून म्हणाली....



" आधी जेवून घे बाळा.. मग झोप हा.. ", पौर्णिमा प्रेमाने तिचे केस बाजूला करत तिचा चेहरा कुरवाळत म्हणाली...


आणि तिला भरवू लागली...



निनाद जेवताना तिलाच पाहत होता...



आणि पूजा त्याची बहीण त्याला पाहत होती...



" तु डॉक्टर आहेस दी...??? ", पूजाने पौर्णिमाला विचारलं...



" अ... हो... ", पौर्णिमा किंचित हसून म्हणाली...



" कुठे...?? इथेच का..???", पूजाचा दुसरा प्रश्न...



" नाही कोल्हापूरला.. मी मूळ तिथलीच... जॉबला तिथेच... सध्या ताईचं लग्न होतं म्हणून सुट्टी घेऊन आली आहे... ", पौर्णिमा म्हणाली... तसं पूजाने मान डोलावली...



" दी तुमचं लग्न झालंय का...??", पूजा ने डायरेक्ट प्रश्न केला...



तसं ती अगदी चकित झाली... पण तिच्यात अजिबात हिम्मत झाली नाही निनादकडे पाहण्याची...



" पूजा...ssss ", तिची आई दटावनीच्या सुरात म्हणाली.... तसं पूजा जीभ काढून शांत झाली... तसं पौर्णिमा गालात हसली....




" पौर्णिमा ssss अगं सोना ताई बोलावतेय तुला... ", अभय तिथे आला...



" हो.. जाते... नेहाला झोपवशील का तेवढं...?? जेवण झालंय तिचं...", पौर्णिमा जागेवर उठत नेहाला घेत म्हणाली...



" ओके... जा तु.. मी झोपवतो तिला... ", अभय म्हणाला... आणि नेहाला घेण्यासाठी हात पुढे केला...



" नाय... मी मावशी सोबत जाणार... ", नेहा पौर्णिमाला बिलगत म्हणाली... अगदी रडवेला चेहरा केला होता तिने... कधीही रडून देईल.. असंच वाटत होतं ...



" बरं... बरं .. जा मावशी सोबत... ", अभयने लगेच आपले हात मागे घेतले... कारण तिने रडायला सुरवात केली असती तर शांत व्हायचं नाव घेतलं नसतं तिने...



पौर्णिमा पण हात धुवून आली... आणि तिला घेतले...



" तुम्ही जेवा... आम्ही आलोच... ", पौर्णिमा निनादच्या फॅमिलीला पाहून सभ्यपणे म्हणाली...



तसं त्यांनी पण हसून होकार दिला...



पौर्णिमाने मात्र निनादकडे पाहिलेच नाही...


....


त्या दिवसानंतर त्या दोघांची कधी भेट झाली नाही... दोघेही आपल्या कामात व्यस्त झाले होते...



चार महिन्याहून अधिक काळ लोटला होता...



पौर्णिमा आपल्या कामात गर्क होती...



" पौर्णिमा ssss उद्या सकाळी कॅम्प वर जायचंय आपल्याला लक्षात आहे ना...?? आठवडाभर तिकडेच राहायचे आहे... ", तिची मैत्रीण आणि कलिग श्रेया म्हणाली....



तसं पौर्णिमाने होकार दिला...



" शीट यार... अश्या कॅम्पच्या वेळी आपले राहायचे खुप वांधे होतात... ", श्रेया हताश होऊन म्हणाली...



" इट्स ओके गं... मागच्यावेळी पेक्षा... यावेळी आपली राहायची सोय चांगल्या ठिकाणी केली आहे... सो जास्त टेन्शनची गोष्ट नाहीये... ", पौर्णिमा...



" हा हेही आहे... नाहीतर पाहिलं होतंस ना.. मागच्यावेळी जिथे थांबलो होतो... तिथे पाण्याची किती कमतरता होती... ", श्रेया म्हणाली... तसं ते दिवस आठवून पौर्णिमाने किंचित हसून मान डोलावली ...



" बरं पौर्णिमा ssss तुला पाहायला येणार होते ना गं....??? काय झालं त्यांचं...???", श्रेयाने उत्सुकतेने विचारलं...



" काही नाही गं... कालच पाहून गेलेत... घरचे त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहेत... त्यांचा होकार आला तर कदाचित माझेही आईबाबा होकार देतील... कारण त्यांना तो मुलगा चांगला वाटला आहे... ", पौर्णिमा म्हणाली...



" अगं लव्ह मॅरेज करायचं ना.. ", श्रेया तिला खांदा मारत म्हणाली..



" नाही नको... अरेंज मॅरेजच ठीक आहे.. ", पौर्णिमा किंचित हसून म्हणाली....



सध्या तरी तिच्या मनात आता निनादसाठी आदराशिवाय काही नव्हते... कारण आयुष्यातली सगळ्यात मोठी शिकवण त्याने दिली होती....


म्हणून मान होता तिच्या मनात त्याच्यासाठी...



तिचे ते आकर्षणच होते त्याच्याप्रती... म्हणून तर काहीच वेळेत ते प्रेमाचे भूत उतरले...



पण आता तिला त्याच्यासमोर जाण्याची लाज येते होती... कारण पास्ट मध्ये जे काही तिने केलं होतं ते चुकीचं होतं... आणि तीला राहून राहून आपल्या कृतीची लाज वाटत होती...



आणि लग्नाचा विषय तिच्या घरी निघाला होता... तिचाही काही विरोध नव्हता... म्हणून आलेलं स्थळ त्यांनी पाहून घेतलं होतं.. आणि कांद्या पोह्याचा कार्यक्रम उरकवून घेतला होता..



दुसऱ्या दिवशी पौर्णिमा त्यांच्या हॉस्पिटलच्या स्टाफ सोबत कॅम्पसाठी निघून गेली...


भला मोठा कॅम्प होता... मोठे मोठे डॉक्टर्स येणार होते... म्हणून सुरक्षिततेसाठी पोलिसांचाही बंदोबस्त होता...



नेमका त्याच बंदोबस्तात निनाद पण होता...



आणि तोही आठवडाभर तिथे असणार होता....




निनादला तिथे पाहून तिची तर अजूनच फाटली... जे नको व्हायला असं तिला मनापासून वाटत होतं... नेमकी तिच गोष्ट घडत होती...



ती त्याच्या पासून नेहमी पळ काढण्याच्या प्रयत्नात होती...



ती मन लावून अगदी डेडिकेशन देऊन आपलं काम करत होती... हे निनादच्या नजरेतून सुटलं नव्हतं...


त्याला बोलायचं होतं तिच्यासोबत....



पूर्ण सहा दिवस ते एकमेकांशी बोलले नव्हते... पण या सहा दिवसात तिचं अगदी शांतपणे पेशन्टसना सांभाळणं .. त्यांच्याशी तेवढ्याच संयमाने वागणं... त्याच्या मनाला स्पर्शून गेलं होतं...



ती अल्लड मुलगी नव्हती आता... एक समजूतदार स्त्री मध्ये तिचं रूपांतर झालं होतं.. हे कुठेतरी त्याचं मन त्याला बजावून सांगत होतं...



दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे तिथून जाणार होते... म्हणून रात्री बराच वेळ ते गप्पा मारत होते...



रात्र बरीच झाली... तसे सगळे आपल्या आपल्या रूमकडे जाऊ लागले...



पौर्णिमा पण आपल्या रूम कडे जाणार इतक्यात निनाद तिच्यासमोर अचानक येतो... तशी ती दचकते...



" डॉक्टर पौर्णिमा ssss थोडं बोलायचं आहे तुमच्याशी... दहा मिनिटे मिळतील का..???", तो अगदी अदबीने म्हणाला.




तसं तिला नकार देता आला नाही...



आपल्या मैत्रिणींना पुढे पाठवून ती त्याच्यासोबत थांबली... दोघेही एका ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवून बसले....


दोघेही काहीवेळ शांतच होते..



" फार इग्नोर करायला लागल्या आहात डॉक्टर साहिबा ssss ", तो म्हणाला...



तसं तिने किंचित बावरून त्याच्याकडे पाहिलं...



" मी.. मी कुठे इग्नोर केलं...???", ती गोंधळून घाबरून म्हणाली....



तसं तिचं बावरलेलं रूप पाहून तो खळखळून हसला....



तशी ती embarrassed होऊन मान खाली घालून राहिली... आपण त्याला टाळतोय हे त्याला समजले म्हणून तिला जास्तच अवघडून आलं....



" रिलॅक्स पौर्णिमा....ssss मी काय खाणार नाहीये तुला... ", तो अगदी शांतपणे म्हणाला... तसं तिने मान डोलावली....



पण ती काही बोलली नाही...



" छान वाटलं तुला पुन्हा पाहून... ", तो स्मित करून शांतपणे म्हणाला...



तसं तिने चकित होऊन पाहिलं त्याच्याकडे.....



" खरं बोलतोय.... छान वाटलं तुला पुन्हा भेटून... आणि या एवढ्या मोठ्या पदावर पाहून तर अजूनच छान वाटतंय... ", तो म्हणाला...



तसं ती गालात हसली...




" थँक यु... ", ती म्हणाली... तसं तो पण गालात हसला....



पुन्हा दोघे एकदा शांत झाले...



" थँक यू.... ", पौर्णिमा......


" सॉरी ...", निनाद...



दोघेही एकाच वेळी म्हणाले.... तसं दोघेही चकित झाले.....



" सॉरी का...???", तिने गोंधळून विचारलं...




" त्या दिवशी तुला बरंच काही बाही बोललो ना... म्हणून... खरंतर तेव्हाच तुला सॉरी बोलणार होतो... एवढंही मी बोलायला नको होतं... पण म्हंटल तुझ्या हॉप्स वाढतील.. म्हणून शांत बसलो... ", तो मनापासून म्हणाला...



तसं ती किंचित हसली....


" थँक यू... खरंतर आज मी डॉक्टर आहे... ते तुमच्यामुळेच.... ", ती स्माईल करत म्हणाली...



तसं त्याने गोंधळून तिच्याकडे पाहिले....



" जर त्या दिवशी तुम्ही माझी कान उघडणी केली नसती तर कदाचित मी माझ्याच प्रवाहात वाहत गेली असती... म्हणून थँक यू...

खरंतर ते क्षण आठवलं की खुप embarrassing फिल होतं... काय वेडेपणा करून ठेवला म्हणून कसतरीच वाटतं... तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही...

खरंतर प्रोपोझ करणार नव्हती मी.. आणि तसला वेडेपणा पण करणार नव्हती... पण त्यावेळी माझी संगत पण ठीक नव्हती....भरकटलेल्या मुलींसोबत राहत होती....

तुमच्याबद्दल तेव्हा सांगितले त्यांना... आणि त्यांनी अजूनच प्रोत्साहित केले मला.. की तुमच्या मागे लागावं... म्हणून...


आधीतर नकारच दिला मी... पण शेवटी त्यांनी मनात भरवलं... आणि मीही माझी बुद्धी न वापरता त्यांच्या बोलण्यात आली... आणि तुम्हाला त्रास दिला...


आणि खरंच या गोष्टीचं दुःख होतं... की मी वाईट संगतीला लागले होते.. तेव्हा जर तुम्ही मला तसे बोलले नसते तर कदाचित मी आज जशी घडले आहे... तशी कधी घडलेच नसते...



ते तर तुम्ही होतात म्हणून मी वाचले... जर तुमच्या जागी कोणी इतर असतं तर...??


हा प्रश्न आज जरी पडतो ना... तरीही मनाला भीती वाटते...


जर चुकीची व्यक्ती असती तुमच्या जागी... ज्याच्या मनात कपट असता तर कदाचित त्या दिवशी सगळं काही उध्वस्त झालं असतं...


तेव्हापासून तुमच्यासाठीचा आदर वाढला... वाटत होतं की कधी भेटलात तर आभार मानेन तुमचे... पण मग असंही वाटायचं की नको भेटायला तुम्ही मला... कारण ते क्षण आठवून मलाच माझ्या कृतीची लाज वाटत होती... मग तुम्हाला कसं फेस करायचं हा प्रश्न पडत होता...


म्हणून तुम्ही भेटलात म्हणून तुमच्याशी बोलायची हिम्मत नव्हती... मग सोपा मार्ग म्हणून इग्नोर करत होते... ", ती म्हणाली...



तसं त्याला हसू आलं....



आणि तिलाही...



त्याला छान वाटलं की तिने वेळीच स्वतःला सांभाळले.... अश्या संगतीतून ती बाहेर पडली...



" मग काय लग्न वैगेरे ...??? की अजूनही मीच पसंत आहे...???", तो मस्करीच्या सुरात म्हणाला...



तसं ती खुदकन हसली...


" एक स्थळ आहे... जिथून होकार आलाय... पण आता भेटल्यावर सांगता येईल... की पुढची बोलणी फिक्स होईल की नाही.. ", ती हसून म्हणाली...



पण तिचं कुठेतरी इतर ठिकाणी जुळतंय म्हणून त्याला वेगळंच वाटलं... पण त्याला समजलं नाही...



" ओह... म्हणजे बरीच पुढे गेली आहेस... ", तो हसून म्हणाला...



तसं तिने गालात हसून मान डोलावली.....



" मग तुमचं काही फिक्स झालं की नाही अजून..?? ", तिने विचारलं...




" तुझा श्राप लागला ना मला... म्हणून अजूनही सिंगलच आहे.. ", तो तिला मस्करीच्या सुरात चिडवत म्हणाला...


" ह...!! मी कधी तुम्हाला श्राप दिला...???", ती अगदी गोंधळून म्हणाली... तसं तिचे एक्सप्रेशन पाहून त्याला भयानक हसू आलं...



" दिला होतास ना... तु एवढी आय लव्ह यू म्हणायचीस मला.. नंतर मी ओरडलो तुला... मग तु शिव्या तर घातल्याच असशील ना.. की हा निनाद ना सिंगलच राहिला पाहिजे... नाही..???", तो हसून तिला चिडवत म्हणाला...




" हा... व्हेरी फनी... ", ती नकारात मान हलवत हसून म्हणाली...



तसं तोही हसू लागला...




" खरंच सिंगल आहात तुम्ही...??? ", तिने अविश्वासाने विचारलं....



" का...?? करणार लग्न माझ्याशी...???", तो मस्करीत हसून म्हणाला...



तसं तिने नाही मध्ये मान डोलावली....



" तुमचं भूत कधीच उतरलंय माझ्यावरून... 🤭 ते फक्त टिनेज मधलं attraction होतं... जे लवकरच गळून पडलं... ", ती हसून म्हणाली...



तसं तोही हसला....



" सिंगलच आहे अजूनही... मुली पाहणं चालू आहे... पण जेवढ्या पहिल्या तेवढ्यांनी रिजेक्ट केले मला... ", तो किंचित हसून म्हणाला...



" हा...?? तुम्हाला रिजेक्ट केले..???? कसं शक्य आहे...???", तिने चकित होऊन विचारलं..


कारण निनाद दिसायलाही छान होता... आणि सेटलही होता... स्वभाव पण छान होता... मग कोणी त्याला कसं काय रिजेक्ट केलं म्हणून तिला विश्वास बसत नव्हता....



तसं तिच्या वाक्यावर तो हसला....




" का मला कोणी नाही रिजेक्ट करू शकत का...??? तु पण तर आताच रिजेक्ट केलेस मला.... ", तो पुन्हा मस्करी करत म्हणाला...



" निनाद... मस्करी पुरे.. सांगा ना... तुम्हाला कोणी का रिजेक्ट केले...??", ती अगदी गाल फुगवून किंचित हट्टाने म्हणाली...



तसं त्यावेळी अगदी वेगळंच काहीतरी झालं त्याच्या मनात...



पण तो विचार त्याने पटकन झटकला....




" अगं माझ्या नोकरीमुळे मला बऱ्याच जणींनी रिजेक्ट केले मला.. ", तो किंचित हसून म्हणाला... तसं तिने पण मान डोलावली....




" भेटेल भेटेल तुम्हाला तुमची मिसेस.. काळजी नका करू... ", ती हसून त्याला धीर देत म्हणाली...



" हॉप सो... पण आधी पूजा माझ्या बहिणीचं लग्न करून देण्याचा विचार आहे... ", तो म्हणाला...



" हो का.. जुळेल तिचं पण लवकरच.. ", ती म्हणाली ....



त्यानंतर मात्र बराचवेळ दोघे बोलत होते...



" मग डॉक्टर मॅडम तुमचा नंबर मिळेल का आम्हाला...???", तो म्हणाला... तसं तिने बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहिलं...



" नंबर कशाला हवाय तुम्हाला...???", तिने अगदी गंभीर चेहरा करून विचारलं... तसं त्याला हसूच आलं...




" आता माझं लग्न नाहीच झालं समज... तर तुला माझ्याशी लग्न करावं लागेल ना... त्यासाठी तु कुठे आहेस.. कुठे नाही याची माहिती नको का असायला....??? त्यासाठी नंबर मागतोय... ", तो म्हणाला... तसं तिने ओ करत तोंडावर हात ठेवला.. आणि त्याच्याकडे चकित होऊन पाहू लागली...




त्याला मात्र फार गंमत वाटली तिची...




" हे बघा...ssss इन्स्पेक्टर साहेब... माझं लग्न अल्मोस्ट जुळत आलंय... आणि तुमच्या नादात मला माझं लग्न तोडायचं नाहीये... म्हणून मी नाही देणार नंबर... ", ती डोळे बारीक करूनच म्हणाली... तसं त्याला जास्तच हसू आलं...



" रिलॅक्स... मजाक करतोय... सहजच नंबर मागतोय गं... डॉक्टर आहेस.. कधी गरज पडलीच तर तुझी मदत घ्यायला बरं... आणि माझाही नंबर घे... कधी कुठे गरज पडलीच तर माझ्या प्रोफेशनची... सांगता येत नाही ना.. ", तो किंचित हसून म्हणाला...



" अस्संय का... मग ठीक आहे... घ्या नंबर... ", ती म्हणाली...



आणि त्यांनी नंबर एक्सचेंज केले...



" आता चला जाऊया... बराच उशीर झालाय...", ती घड्याळात पाहत म्हणाली... अगदी रात्रीचे अकरा वाजत आले होते...



" हो.. बोलण्या बोलण्यात लक्षातच आले नाही वेळेचं.... ", तो उठत म्हणाला...



" हम्म... ", पौर्णिमा...




" बरं अजून एक विचारायचं होतं... ", ती म्हणाली... तसं त्याने तिच्याकडे पाहिले...


" तुम्ही माझी जुनी गोष्ट कोणाला सांगितली तर नाही ना...?? मी तरी नाही सांगितलं कोणाला... कारण खूप इम्बरिसिंग आहे ही गोष्ट... आणि जुनी असली तरीही आजही मला भीती वाटते की माझ्या मम्माला माहित पडेल तरी कशी चोपून काढेल मला... ", ती तोंड बारीक करून म्हणाली... तसं निनाद खळखळून हसला तिचा मम्माच्या भीतीने बारीक झालेला चेहरा पाहून...



" रिलॅक्स... नाही सांगितलंय मी कोणाला... फक्त माझ्या बहिणीला सोडून...", तो म्हणाला.. तसं तिने टेन्शन मध्ये त्याच्याकडे पाहिले....




" आय हॉप मी कधीच तुमच्या बहिणीच्या समोर येऊ नये... नाहीतर तुमची बहीण काय विचार करेल माझ्या बद्दल...?? की ही तिच मुलगी आहे.. जी माझ्या दादाच्या मागे वेड्यासारखी आय लव्ह यू म्हणत सुटली होती.. तेही तीन महिने... आई शप्पथ... कसलं ऑड वाटेल मला... ", ती आपल्याच टेन्शन मध्ये.... नख कुरतडत म्हणाली..


आणि त्याला मात्र भयंकर हसू आलं तिच्यावर...



" असं काही होणार नाही... नको टेन्शन घेऊ.. ", तो म्हणाला... तसं तिने मान डोलावली...




" बरं.. बाय माझी ओल्ड लवर... गुड नाईट... ", तो तिला चिडवत हसत म्हणाला...




" इवववववववव ssss बाय.. आणि हे असं बोलू नका.. विचित्र वाटतं... गुड नाईट.... ", ती तोंड वाकडं करत म्हणाली...
आणि धावतच तिथून निघून गेली....




तो मात्र हसतच तिला पाठून पाहत होता...




दुसऱ्या दिवशी दोघेही निघून गेले आपल्या आपल्या वाटेने...



त्या भेटीनंतर दोघेही पुन्हा भेटले नाही ...



फोन नंबर असूनही त्यांनी कधी एकमेकांना फोन केला नाही...



तीन महिने असेच निघून गेले...



" पौर्णिमा ssss बाळा लवकर तयार हो ना.. पाहुणे येतीलच आता पाहायला... ", पौर्णिमाची आई तिच्या रूम मध्ये येत तिला घाई करत म्हणाली....




" अगं मम्मा... थकली आहे मी आता हे कांद्या पोह्याचा कार्यक्रम करून आणि साडी नेसून... काय ते फिक्स करा लवकर... कंटाळा आलंय मला आता या पाहण्याच्या कार्यक्रमाचा... ", ती साडी नेसत म्हणाली...




" अगं बाळा आता तुझं जोपर्यंत लग्न जुळत नाही तोवर असंच होणार गं... ", तिची आई हसून तिच्या निऱ्या नीट करत म्हणाली....




" मागच्या वेळी स्थळ आले होते... त्यांनी होकार तर दिला... पण मम्मा त्यांना जॉब न करणारी मुलगी पाहिजे होती... म्हणून मी नकार दिला... ", पौर्णिमा...



" हो गं बाळा... आणि आम्हीही नकारच दिला असता त्या स्थळाला ... कारण आम्ही तुला डॉक्टर होण्यासाठी घेतलेली तुझी मेहनत पहिली होती.. मग तुझ्या मेहनतीला कसं काय वाया घालवू शकतो... पण यावेळी हे स्थळ तुझी मावशी घेऊन येणार आहे... आणि सोबत तुझी सोनाक्षी ताई पण असणार आहे... सो बघू...

मला तर मुलगा बरा वाटलाय... तु पण बघून घे... तुला आवडला तर पुढची बोलणी करू... ", आई म्हणाली... तसं पौर्णिमाने मान डोलावली..




थोड्याच वेळात पौर्णिमा हातात चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली.... बरीच पाहुणे मंडळी जमली होती...



तिने आबोली रंगाची साडी नेसली होती.. आणि साधी सागरवेणी केली होती केसांची... जास्त मेकअप नव्हता केला... पण खूप सुंदर दिसत होती ती...



तिने चहाचा ट्रे मुलाच्या समोर नेला.. पण त्या मुलाला पाहताच तिचे डोळेच बाहेर यायचे राहिले...


कारण समोर निनाद होता... आणि तो पण अगदी शॉक होऊन तिच्याकडे पाहत होता .....


त्याची बहीण मात्र त्या दोघांना पाहून ओठ दाबून हसली....


शेवटी पौर्णिमाच्या आईचा आवाज कानी पडला... तसं पौर्णिमा भानावर आली.... आणि तोही... त्यानेही पटकन चहाचा कप घेतला...




त्यानंतर मोठी माणसे त्यांच्या नात्याबद्दल बोलत होते..... त्या दोघांना मात्र एकांतात बोलण्यासाठी पाठवले... तसं पौर्णिमा निनादला घेऊन त्यांच्या घराच्या टेरेस वर घेऊन गेली...




" तुम्ही इथे कसे काय...???", तिने आल्या आल्या प्रश्न केला...




" आय स्वेअर मला माहित नव्हतं या स्थळा बद्दल... माझी आई म्हणाली चल मुलगी पाहायला जायचं आहे... तर मी आलो... मला नाही माहित होतं की तुला पाहायला येत आहोत म्हणून.. कुलकर्णी मावशी घेऊन आल्या आम्हाला इथे... वाटलं नव्हतं तु असशील... ", तो लगेच म्हणाला..



" ओह... मला पण माहित नव्हतं... मम्मा म्हणाली काल.... की उद्या घे म्हणून...पाहुणे येणार आहेत... सो मी पण जास्त काही विचारलं नाही... आणि सुट्टी घेऊन थांबले घरी.. ", ती पण म्हणाली...



थोड्यावेळ दोघेही शांतच...




" आता काय करायचं...????", दोघांनी एकाच वेळी एकच प्रश्न केला...




तसं ते क्षणभर चकित झाले... नंतर स्वतःवरच हसले...




दोघेही थोड्यावेळ विचार करत होते...



" तुझी काही हरकत नसेल तर करायचं का आपण लग्न...?? ", तो अचानक म्हणाला... तसं तिने चकित होऊन त्याच्याकडे पाहिलं....



" तुम्हाला करायचंय माझ्याशी लग्न...??", तिने गोंधळून विचारलं....



" खरं सांगू तर तुला रिजेक्ट करण्यासारखं काही आहे नाही...सात वर्षांपूर्वी लहान होतीस.. अल्लड होतीस... ना ते वय होतं ... आणि आता मला तरी नकार देण्यासारखं काही वाटत नाही... पण तुला नकार द्यायचा असेल तर तु मोकळी आहेस... ", तो शांतपणे म्हणाला....




" वेल कारण तर माझ्याकडेही नाहीये तुम्हाला नकार देण्यासाठी... पण आता घरचे काय निर्णय घेतायेत त्याच्यावर डिपेंड आहे... ", ती पण म्हणाली... तसं त्याने मान डोलावली...




पण आतून कुठे ना कुठे त्यांनाही लग्न करायचं होतं एकमेकांशी...



दोघेही थोड्यावेळ बोलत होते एकमेकांशी....





तीन महिन्यानंतर.....




दोघेही सत्यनारायणाच्या पूजेला सोबत बसले होते.... एकमेकांचे हात हातात घेऊन प्रसन्नपणे पूजा पार पाडत होते.... आणि एकमेकांच्या साथीने आनंदाने त्यांच्या आयुष्याची सुरुवात करत होते...


दोन्ही घरून होकार आला... आणि तीन महिन्यात त्यांचे लग्नही झाले... दोघेही अगदी मनाने तयार होते एकमेकांना आपल्या आयुष्यात आणण्यासाठी..




आणि आज दोघेही एकत्र होते... आयुष्यभरासाठी...






समाप्त....




शॉर्ट स्टोरी होती... नक्की सांगा कशी वाटली हो कथा... तुमचा अभिप्राय जाणून घ्यायला खूप म्हणजे खुप आवडेल मला...