My Cold Hearted Boss - 9 in Marathi Love Stories by saavi books and stories PDF | My Cold Hearted Boss - 9

The Author
Featured Books
Categories
Share

My Cold Hearted Boss - 9

" सॉरी मिस्टर पाटील.. माझा होणारा नवरा घरी येणार आहे.. सो मला लवकर घरी जायचे आहे.. ", ती म्हणाली... तसं सुहासचा चेहरा पाहण्यासारखा झाला...

आदित्यला तर त्याचा चेहरा पाहूनच हसायला आलं.. पण तो शांत राहिला...


नंतर मात्र सुहास काही बोलण्याआधीच वेदांशीने सगळ्यांचा निरोप घेतला...



आदित्य आणि वेदांशी सरळ त्यांच्या कंपनीत आले...




•••____________________________•••



आदित्य रात्रीचा टिफिन घेऊन आला होता वेदांशीसाठी...


तो आला नेहमीप्रमाणे.. त्याने दरवाज्याची बेल वाजवली.. दरवाजा उघडण्यात आला.. तो पटकन काही बोलणार त्या आधीच त्याने समोर पाहिलं.. आणि तो काहीसा न कळून त्या व्यक्तीकडे पाहतो...


" अरे सौरभ... आदित्य आला का..??", आतून वेदांशीचा आवाज आला... ती स्वतः बाहेर आली नव्हती..


" ब्लू शर्ट... थोडा उंच.. हलकीशी दाढी मिशी.. हलकासा गव्हाळ.. कपाळावर रुळणारे केस.. नाक लांब धारदार.. ", सौरभ आदित्याचे निरीक्षण करत जोरात म्हणाला... तसं आतून वेदांशीचा हसण्याचा आवाज आला...


" हो... आदित्याचं आहे तो... ", वेदांशी म्हणाली...


" hey handsome come inside..", सौरभ म्हणाला.. तसं आदित्य जरा गोंधळूनच आत येतो...


" आदित्य ये... ", वेदांशी म्हणाली... जी लिविंग हॉल मध्ये सोफ्यावर बसली होती... आजही तीने कार्टून वाला नाईट ड्रेस घातला होता.. क्युट तर दिसतच होती...


" सौरभ.. हा आदित्य.. माझा पी.ए. आणि आदित्य हा सौरभ माझा होणारा नवरा.. हा लंडनला राहतो.. ", वेदांशी म्हणाली... तसं आदित्यची ट्यूब पेटली...


" हॅलो सर.. ", आदित्य ने पटकन त्याला ग्रीट केलं... तसं सौरभ गालात हसला...


" फॉर्मॅलिटीची गरज नाही आदित्य.. तुला भेटून आनंद झाला.. ", सौरभ म्हणाला.. तसं आदित्यने पण त्याला हसून दाखवले..


" माझ्या वेदाची काळजी घे जेव्हा मी इकडे नसेन.. ", सौरभ आदित्यकडे पाहत म्हणाला.. तसं आदित्यने गोंधळून होकार दिला...


" बॉस तुमचं जेवण.. प्लेट तयार करू का..??", आदित्यने वेदांशीकडे पाहत विचारलं...


तशी ती काही बोलणार त्याआधीच सौरभ पुढे झाला..


" आण तो टिफिन.. मी प्लेट तयार करतो... तु बस इकडे.. ", सौरभ म्हणाला.. तसं आदित्य पटकन म्हणाला..

" नाही इट्स ओके सर.. मी प्लेट तयार करतो तुम्हा दोघांसाठी... तुम्ही बसा .. ", आदित्य जरा बिचकत म्हणाला..


वेदांशी सोफ्याला डोकं टेकवून त्या दोघांकडे पाहत होती...


" अरे आण आदित्य.. तु बस इकडे वेदा सोबत... मी करतो प्लेट तयार.. आणि मी काही डिश बनवल्या आहेत.. त्या पण टेस्ट करून जा.. ", सौरभ म्हणाला..


" आदित्य दे त्याच्याकडे टिफिन... ", शेवटी वेदांशी ऑर्डर देत म्हणाली... तसं आदित्य ने टिफिन सौरभच्या हातात दिला...

तसा सौरभ किचन मध्ये निघून गेला... मग आदित्य नाईलाजाने तिथेच बसला... तो जरा अवघडला गेला होता.. नाही म्हंटल तरी सौरभचा औरा काहीतरी वेगळाच जानवत होता त्याला.. अगदी भारदस्त..


तो दिसायलाही अगदी भारदस्त होता... उंच धिप्पाड शरीर.... चेहऱ्यावर किंचित मंद हसू आणि जेन्टलनेस जानवत होता... अगदी mature व्यक्ती कशी असते.. शांत संयमीत तसा काहीसा वाटत होता सौरभ त्याला...



वेदांशी आदित्यचे निरीक्षण करत होती... त्याच्या चेहऱ्यावरून हे नक्कीच कळले की तो अवघडला गेला आहे...


" आदित्य.. ", वेदांशीने हाक मारली...


" हा..??", त्याने पटकन भानावर येत उत्तर दिलं...



" रिलॅक्स.. ! माझा होणारा नवरा काय तुला खाणार नाही आहे.. एवढा अवघडला आहेस..??", वेदांशीने किंचित हसून म्हंटल...



" असं काही बॉस.. बस ते मी पहिल्यांदाच भेटतोय ना सरांना.. आणि त्यांची पर्सनॅलिटी पण जरा जबरदस्त आहे.. म्हणून आपोआपच दडपण आल्यासारखं झालं.. ", तो खरं सांगत म्हणाला..


तशी ती मंद हसली....



" असाच आहे तो लहान पणापासून.. ! तो दिसायला गंभीर आहे.. पण मनापासून खूप खुप चांगला आहे.. ", वेदांशी कौतुकाने किचन मध्ये असलेल्या सौरभ कडे पाहत म्हणाली...



डोळ्यांत आपुलकीची भावना दिसत होती तिच्या सौरभला पाहून..!


आणि ही गोष्ट आदित्यच्या नजरेतून सुटली नव्हती...


" तुम्ही खूप प्रेम करता त्यांच्यावर..???", अचानक आदित्यने विचारलं...



" हो.. खूप..!! एवढं की त्याच्यासाठी जीव द्यायला लागला ना.. तरीही मी एकाही सेकंदाचा विचार करणार नाही..!", ती सौरभकडे पाहत म्हणाली...


डोळ्यांत बऱ्याच भावना दाटून आल्या होत्या तिच्या... ज्याचा अंदाज आदित्यला लागला नाही...


थोड्याच वेळात सौरभ तिथे आला...


" चला जेवणाची वेळ झाली आहे... आपण जेवण करून घेऊ.. ", सौरभ त्या दोघांना म्हणाला...


" नाही सर.. आई घरी वाट पाहत असेल माझी जेवणासाठी... मी जातो.. ", म्हणत आदित्य उठला..


" अरे पण मी तिघांसाठी प्लेट तयार केली आहे.. थोडं खा.. आणि मग थोडं आईसोबत जेव.. पण इकडून असा उपाशी जाऊ नकोस.. ", सौरभ म्हणाला.. अगदी जेंटल पणे.. की आदित्यला नकार देताच नाही आला..


त्याने त्याच्या बॉस कडे पाहिले...


" थांब आदित्य... सौरभ पण छान जेवण बनवतो.. तु टेस्ट करून बघ.. आवडेल तुलाही.. आणि जाताना मी तुला टिफिन देते .. आईसाठी पण घेऊन जा.. ", ती म्हणाली... तसं मग त्यानेही होकार दिला...



" चलो.. ", सौरभ म्हणाला..आणि वेदांशी कडे गेला.. आणि तिला सांभाळून दोन्ही हातावर उचलून घेतले.. तसं आदित्यने चकित होऊन त्या दोघांकडे पाहिले...


" संध्याकाळी पडली ती.. पायाला लागलं.. आणि आता तुझ्या बॉसला चालता येत नाहीये.. सुज आलीये पायाला... ", सौरभ आदित्या च्या चेहऱ्यावर निर्माण झालेले प्रश्न समजून घेत उत्तर देतो..


" काय..! बॉस तुम्ही ठीक आहात आता...?? काही औषध लागेल का..?? की डॉक्टर कडे जायचं..??", आदित्यने पटकन काळजीने विचारलं...


तसं त्याची काळजी पाहून सौरभच्या चेहऱ्यावर समाधान पसरले.....


" अरे नाही आदित्य.. हलकी सुज आहे.. एवढं काही नाही.. औषध पण लावलं आहे.... पण याला खूप जास्त मोठं वाटत आहे हे.. ", वेदांशी म्हणाली... खरंतर तिला अवघडून आलं होतं की सौरभने तिला असं आदित्य समोर उचलून घेतलं होतं... पण सौरभ काय ऐकणार नाही आपलं तिला माहित होतं.. म्हणून मग तीही जास्त काही बोलली नाही...


तसं आदित्यने हुंकार भरला..



सौरभ तिला घेऊन पुढे निघाला.... आदित्य मागून त्या दोघांना पाहत होता..


" किती गोड दिसतात सोबत.. आणि दोघेही एवढे शांत आहेत.. एकेमेकांबद्दल आपुलकी सहज दिसते त्यांच्या डोळ्यांत.. त्यांचं प्रेम असंच टिकून राहो.. ", आदित्य गालात हसत त्या दोघांना पाहून मनात म्हणतो....



तो ही डायनिंग टेबल जवळ येतो... सौरभने तिला चेयर वर नीट बसवले होते..


ते दोघेही बसले...


आदित्यचं लक्ष टेबल वर गेलं तसं तो अगदी शॉक झाला.. कारण टेबल वर बऱ्याच डिशेस ठेवल्या होत्या बनवून... पास्ता ... नूडल्स.. अजून बरंच काही...


" सर... हे सगळं तुम्ही बनवलं..??", आदित्यने शॉक होऊन सौरभला विचारलं...


" हो.. ", सौरभ हसून म्हणाला...


" तुम्हाला एवढा चांगला स्वयंपाक येतो..???", आदित्य ने आश्चर्याने विचारलं...


" हो.. मी शेफ आहे.. माझं रेस्टोरंट आहे लंडन मध्ये.. ", सौरभ माहिती देत म्हणाला...


" मला वाटलं की बॉस बिझनेस मध्ये आहेत म्हंटल्यावर तुम्ही पण बिझनेस मध्ये असणार.. ", आदित्यने त्याची शंका मांडली...


" माझी फॅमिली बिझनेस करते... पण मला कूकिंग मध्ये शॉक होता.. त्यातच करियर करायचे होते.. मग आता मी तेच करतोय..", सौरभ म्हणाला.. पण काहीशी उदासिनता तरळली त्याच्या डोळ्यात..!


" टेस्ट करून सांग कसं झालं आहे... ", सौरभ म्हणाला.. तसं आदित्यने खाऊन घास घेतला.. आणि त्याचे डोळे समाधानाने मिटले गेले....


" खूप चविष्ट आहे हे.. !!!", आदित्य म्हणाला.. तसं सौरभने थँक यु म्हंटले...


वेदांशी पण शांत जेवण करत होती... सौरभ तिला खूप जपत होता... त्याच्या कृतीतून हे सगळं दिसत होतं..



सौरभ आदित्य पहिल्यांदा भेटत होते.. पण तरीही सौरभने आदित्यला खूप छान ट्रीट केले.. म्हणून काहीच वेळात त्या दोघांतला अवघडलेपणा नाहीसा झाला.. दोघेही छान गप्पा मारू लागले...



आदित्य जेवून घरी निघाला.. सौरभने त्याला डब्बा दिला.. ज्यात त्याने बनवलेल्या डिश होत्या...


आदित्य निघून गेला.. तसं सौरभ आणि वेदांशी दोघेही पुन्हा एकदा लिविंग हॉल मध्ये बसले..



" वेदा... ", सौरभने हाक मारली...


" हा..??",


" तु ठीक आहेस ना..?? म्हणजे .. ", सौरभ थोडा कचरत म्हणाला...


" मला काय होणार आहे सौरभ.. ?? मी अगदी ठीक आहे.. ", वेदांशी म्हणाली.. पण तिचे दुखी भाव दिसलेच त्याला...


" नको काळजी करुस.. सगळं काही ठीक होईल.. ", सौरभ तिला धीर देत म्हणाला..


" कसं सगळं ठीक होईल सौरभ..??!! कसं..?? मिस्टर भोसले..!!! त्यांनी कधी मला मुलगी म्हणून पाहिले नाही.. कधी मुलगी म्हणून जवळ घेतले नाही..!! आणि आज..!! आज त्यांचा अचानक फोन येतो मला... आणि म्हणतात की वेदांशी.. तुला भेटायचे आहे.. बोलायचे आहे काहीतरी..!!", वेदांशी चे डोळे पाणावले होते.. मन अगदी भरून आलं होतं..!


ती तशीच सौरभच्या मिठीत शिरली... त्यानेही तिला जवळ ओढले...


" ज्या व्यक्तीने कधी उभ्या आयुष्यात मला जवळ घेतले नाही...! ती व्यक्ती आज कितीतरी वर्षांनी स्वतःहून भेटायला इंटरेस्ट दाखवतो आहे..! काहीतरी स्वार्थच असेल यात.. अजून काय..!! नाहीतर त्या व्यक्तीच्या तर ध्यान्यातपण नसेल की त्याला एक मुलगी आहे..!! मी काही कोणाच्या पाया पडणार नाही आहे माझ्यावर प्रेम करा म्हणून..!! मी माझं सत्य स्वीकारलं आहे... त्यांना नकोय ना मी मुलगी म्हणून..! मग मलाही नकोत ते ..!! ", वेदांशी रडत म्हणाली.....


ती अगदी मनसोक्त रडत होती सौरभच्या मिठीत..!! अगदी हक्काची जागा होती ती तिच्यासाठी..!!


सौरभ पण तिला रडू देत होता..! तोही खूप महिन्यातून एकदा येत होता तिला भेटायला... ! आणि एकदा आला तो की ती अशीच हळवी व्हायची त्याच्या मिठीत..



बऱ्याच वेळाने तो तिला शांत करतो....


" वेदा... बस कर.. नको रडूस जास्त..! आणि मिस्टर भोसलेच्या मनात नक्कीच काहीतरी असेल.. म्हणून त्यांना तुला भेटायचे आहे.. जाऊन ये.. बघ काय बोलत आहेत ते.. ", सौरभ तिला समजावत बोलला..


" हो..! जाणार तर आहे मी..! कळू दे ना मला पण.. की काय आहे त्यांच्या मनात..! काय शिजतंय त्यांच्या डोक्यात मला पण पाहायचे आहे.. ", वेदांशी रागाने म्हणाली...


वर्षानुवर्षे जे मनात खदखदत होतं तिच्या... ती आग बाहेर पडू पाहत होती.... अगदी राग साचला होता तिच्या मनात आपल्या वडिलांबद्दल..!!


" वेदा शांत हो..! ", सौरभ तिला शांत करत म्हणाला... कारण तिच्या डोळ्यात अंगार पाहून तोही जरा अस्वस्थ झाला होता..!


" कशी शांत होऊ सौरभ..?? कशी..??? मला जो काही त्रास झाला आहे त्या भोसले फॅमिलीमुळे...!! तो काय मी सहज विसरून जाऊ..??? नाही..!!! कधीच नाही..! ही आग जी माझ्या मनात आहे... ती कधीच शांत होणार नाही..!!
त्यांना काय वाटतं..!! मी दोन वर्षे बाहेर एकटी काय राहिली.. यांची मनमानी अशीच चालू राहील..! अजिबात नाही..!! त्यांनी अजून या वेदांशीला ओळखले नाही आहे..! ", वेदांशी रागात म्हणाली.... आणि सौरभ तिला पाहतच राहिला...

" वेदा..!! भीती वाटते गं कधी कधी तुझ्या या अवताराची..! तुला अजून माहित नाही आहे... सत्य काय आहे..?? तुझ्या घरच्यांनी फसवले आहे तुला..! खूप जास्त फसवले आहे... आणि या सगळ्यात तुझी आपलीच माणसे आहेत..! तुला शांत तरी कसं करावं गं..? ज्या माणसांवर तु विश्वास ठेवते आहेस... ती माणसे एवढी चांगली नाहीच आहेत... जेवढा तु विचार करतेस... आणि खासकरून तुझा काका..!!! तोच तर आहे.. सगळ्याचं मूळ कारण..! पण तुला कसं सांगू मी..?? मीही मजबूर आहे.. नाही सांगू शकत..!
सगळं षडयंत्र आहे... केवळ षडयंत्र..!!
एक असं षडयंत्र.. जिथे मीही फसलो आहे.. नाही काढू शकत तुलाही.. आणि स्वतःलाही..! पण जर कोणी काढू शकतं... तर ती केवळ तु आहेस..!! केवळ तु..!! ", सौरभ वेदांशीला रागात पाहून मनातच म्हणाला...!


वेदांशी पेटून उठली होती...!

अगदी तपता ज्वाला..!!






क्रमश :


कथा आवडल्यास कमेंट करा.. 🙏