भाग ४१
सीजन २ : भाग 30 ( पकडलं...हिहिहिही..
टीप : सदर कथा हिंसक आहे ! कथेत पात्रांच्या हत्येच वर्णन अगदी तंतोतंत वर्तवल आहे ! ह्दयचा त्रास असणारे , किंवा गरोदर स्त्रियांनी कृपया ही कथा वाचु नये ! कथेत आवश्यकता असल्याने अंधश्रद्धेच वापर केल गेल आहे - पण लेखकाच समाज्यात
अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही !
आपला प्रिय लेखक मित्र अंधश्रद्धेला मुळीच खतपाणी घालत नाही !
सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्व काही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी
फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏
ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!
सदर कथेचे सर्व हक्क लेखकाकडे अगदी सुखरुप आहेत - कथा कॉपी पास्ट करुन आपल्या नावे
खपवून घेणा-या चोरांवर दया दाखवली जाणार नाही !
त्यांवए ऑनलाईन कारवाई केली जाईल.
कथा सुरु
दोन्ही गूढघे जमिनीवर टेकवून तो हैवान रघुभट्टकडे पाहत होता-
रघुभट्टची ती लालसर लेझरसारखी चमकणारी नजर , त्या हैवानाच्या डोळ्यांतही उमटलेली दिसत होती.
रघुभट्टने आपल्याकडे असलेल्या अमानवीय , अघोरी , शक्तिच्या उपयोगाने त्या हैवानाला संमोहिंत केल होत.
निर्जीव पुतळ्यासारख त्याच शरीर जमिनिवर बसल्या बसल्याच आकसल होत - कसलीच हालचाल होत नव्हती - चेह-यावर कसलेच हावभाव नव्हते.
ती लालसर नजर त्याच्या डोळ्यांतून, नसांमधुन- चेतातंतू, मग देहावर नियंत्रण ठेवणा-या मेंदूत घुसली होती-
त्या हैवानाच्या डोळ्यांची कसलीच हालचाल होत नव्हती.. ! चेह-यावर शुन्य - थंड भाव होते.
पण आत ? देहा आत? काहीतरी विलक्षण घडत होत !
सामान्य मानवी नजरेला ती घडणारी क्रिया दिसण अशक्य होत.
कारण ही क्रिया पुर्णत अमानवीय, अक्ल्प्नीय, अक्ल्नीय होती - काल्या अंधा-या , मायावी शक्तिमार्फत सुरु होती.
" माझ्या पुत्रा !"
त्या हैवानाच्या कानांवर एक गुंजणारा घोगरा भारदस्त आवाज पडला , त्या आवाजासहितच अंतराळातला एक विशिष्ट प्रकारचा ध्वनी ऐकू येत होता.
" मी तुला संमोहिंत केल आहे - माझ्या देहात जेवढी शक्ति शिल्लक आहे , त्या शक्तिने मी तुला मानवी भाषा बोलू व समजू शकण्याच वरदान देत आहे. रघुभट्टचा कंकाळ स्वरूपी हाडाचा हात त्या हैवानाच्या कपालावर स्पर्शला...- त्या हातातून काही अमानविय शक्ति लहरी बाहेर पडल्या....त्या हैवानाच्या देहात प्रवेश करू लागल्या..!
मी तुम्हा सर्वाँना जन्म दिला आहे.
मी तुमचा सर्वपिता आहे ! तुम्ही चारही जण माझ्या रक्ताचे वंशज आहात, तुम्ही चारही जण एकाच रक्तरेखेचे भावंड आहात , आज अमावास्याच्या ह्या शुभ क्षणि मी तुमचा उद्दार केला आहे. तुम्ही चारही जण सैतान,आहात सैतानाचे वंशज आहात. तुम्हाला जन्म देण्याच माझ उद्दीष्ट हेच आहे , की ह्या पृथ्वीवर
मानवी दुनियेत खूनाचा पाऊस पाडा, मांणस दिसल की आवडीने त्यांचा खून करा - त्यांच्या देहाशी विकृतपणे खेळा..! हाड, मांस, चोकून खा..!
ह्या मानवी जगाचा नायनाट करा, तिरस्कार करा.
मानव हे आपल भक्ष , आणी आपन त्यांचे भक्षक
आहोत असं समजा. माझ्या प्रिय पुत्रा तुझ नाव राका आहे ! आणि तुझ्या उर्वरीत तीन भावंडांच नाव चामा, सामा, सुका आहे - तुम्ही तिघेही कट्टर मानवभक्षक आहात, माझ्यावर ज्या ज्या नराधमांनी हमला केला आहे - त्यांचा मुडदा पाडा, जमिनीवर , जंगलातल्या झाडझुडपांना त्यांच्या रक्ताने भिजवा , त्यांच मांस कच्च खावून टाका , ...एक एकाच शिर धडावेगळ करून जंगलातल्या झाडांना त्यांच तोरण बांधा..
..जा... जा...बदला घ्या.. "
खैराच्या झाडावर सुर्यांश उभा होता..- ए:डब्लु:एमच्या नाईट स्कॉपमधुन तीन मिनिटे झाली तो त्या सैतानाला जमिनीवर बसलेल्या अवस्थेतच पाहत होता.
" काय करत आहे हा माणुस ? आणी असं विचीत्र पने अंगावर एक ही कपडा न घालता का उभा आहे ? हा सुद्धा त्या रेंचो आणि शैडो सारखा खूनी तर नसेल ना ? तसंही त्याच्याकडे धनुष्य आणि बाण आहे..! आणी ते दोघेही मांणसांना मारण्यासाठी बाणांचा सुद्धा वापर करत आहेत.!"
सुर्यांशच्या मनात प्रश्नांनी काहूर माजवल होत..
तोच त्याने मनाशी एक विचार पक्का केला .
" आईशप्पथ आता जे होइल ते होइल..!" तो स्वत:शीच म्हंणाला.
त्याने बंदूकीच बोल्ट वाकड तिकड फिरवल-
' चक .. चक..!" आवाज करत कालसर बोल्ट
खाली वर झाला..
ह्या झालेल्या क्रियेत रायफल मध्ये सुद्धा काही ठराविक क्रिया घडली-
मेग्जीन मध्ये असलेल्या चार गोळ्यांपैकी सर्वात वरची पावरफुल गोळी 338 लापूआ मेग्नम नळीत येऊन फिट बसली.
सुर्यांशने एक मोठा श्वास आत ओढला..
त्याने आजपर्यंत कधीही ए:डब्लु:एम नामक बंदूक
चालवली नव्हती, किंवा नाही त्या स्नीपरिंग बद्दल काही ज्ञान होत !
आणी मित्रहो अर्धज्ञान नेहमीचंच धोक्याच असत , ते कस ? तर पुढे जाऊन कळेलच.!
" जा राका जा ,रक्ताचा सडा पाड , माझ्या भावाच्या हत्येचा बळी घे..! जंगलात जे जे मानव आहेत त्या सर्वांच्या नरडीचा घोट घे...जा.."
रघुभट्टचे ते लालसर चकाकते लेझर सारखे डोळे
झपकण विझले..- त्या हैवानाच नाव राका होत..
त्याच्याही डोळ्यातला प्रकाश नाहीसा झाला..
संमोहण समाप्त झाल होत.
रघुभट्टने संमोहिंत शक्तिमार्फत राकाच्या
मेंदूत मानवी ज्ञान ओतल होत !
तो आता मानवासारख चालू शकत होता, बोलू शकत होता , एकंदरीत सर्व हालचाली , क्रिया आता एका आदीमानवासारख्या तरी घडणा-या नव्हत्या..उलट आता त्यांच्या हालचाली जरा वेगाने अमानवी होणा-या होत्या.
काहीवेळा अगोदर माकडासारखा उभा राहणारा तो हैवान राका - आता एकदम ताठ शरीरासहित उभा राहिला..
त्याची उंची सहा फुट होती..उंच धिप्पाड, बलदंड बाहूच दैत्यासारख देह होत.
एक डोळा बंद करून सुर्यांशने नाईट स्कॉपचा रेड डॉट राकाच्या डोक्यावर निशाण्यावर लावला होता..!
सुर्यांशने जीभ तोंडातून जराशी बाहेर काढली..
आणि ट्रिगरवर ठेवलेल्या तर्जनीवर हलकासा दाब दिला..-
ट्रिगर दाबताच बंदूकी आत एक विशिष्ट पद्धतीची क्रिया घड़ली -
फाईरींग पिन - बंदुकीच्या प्राईमर वर आदळली..आणी जशी प्राईमर वर आदळली..
गोळीत असलेली गण पावडर (सुरसुरी )
त्यात एक ठिंणगी पेटली- एक छोठ्याश्या ठिंणगीने
पुर्णत गणपावडरने पेट घेतला... आणी एक मोठा कानठळ्या बसवणारा आवाज झाला..
" ठणsssss !"
रायफलच्या नळीतून अमानवीय वेगाने गोळी बाहेर पडली.
राकाच्या कानांवर तो ठण आवाज पडला ,
त्याने गर्रकन गिरकी घेतली- ज्या कारणाने नेक चुकल गोळी डोक्यात शिरण्या ऐवजी- त्याच्या डाव्या खांद्यात घुसली...
" आह्ह्ह्ररहर..र्घ्ग्र्ह...र्घ्ह्गर्घ्ह्ह्ह..!":
राकाच्या तोंडून वेदनेने भयंकर चित्कार फुटला.
पुर्णत जंगल दणानुन उठल.
ईकडे गोळी बाहेर पडताच दोन क्रिया घडल्या होत्या .
रायफलचा फायरींग रेंज हाईस्पीड 100 होत ..!
सुर्यांशने बंदुक एवढीही गच्च पकडली नव्हती , ज्या कारणाने - रायफलमधुन गोळी बाहेर पडताच रायफल वेगाने मागच्या दिशेने झटका खात मागे आली-
तीचा दंड सुर्यांशच्या नाकावर बसला -
वार ईतका खोल होता -की नाकाच हाड फुटल , रक्ताची धार बाहेर आली जात रायफल सहित सुर्यांश फांदीवरून खाली कोसळला..
' धप्प ' आवाज करत जमिनीवर कोसळला..
त्याची शुद्धी हरपली.
गोळी ज्या दिशेने आली होती-
राकाने त्या दिशेने पाहिल...- पन सुर्यांशची किस्मत जोरावर होती - की राकाच्या नजरेला तो फांदीवर दिसण्या अगोदर तोळ जाऊन खाली पडला होता आणी त्या हैवान राकाला ती फांदी रिकामी दिसली होती.
त्याच्या खांद्याला गोळीमार्फत खोल जखम झाली होती- त्या जखमेतून हिरव्या रंगाच विषारी द्रव ,की रक्त? बाहेर येत होत. जे अंधारात चकाकत होत..
राका ईं:थलाईवांच्या प्रेताजवळ पोहचला -
त्याने त्या प्रेताच्या अंगावरची पेंट काढली -
स्वत:च्या पायांत घातली, मग डोक्यात अटकलेला बाण उपसून काढला, बाणाला लागलेल लालसर रक्त त्याने आपल्या काळसर जिभेने चाटून घेतल..
व जंगलात शिरला.
xxxx xxxxxxxxxx
दहा फोर्स मेंबर्स जिवंत राहीले होते.
जंगलात जी वाट भेटेल त्या वाटेने पळत सुटले होते.
पोलिस ईंन्सपेक्टर दिव्यजित रणदिवे
सर्वात पुढे होते..- आणी मागे त्यांची फोर्स होती.
धावतावेळेस अवतीभवती झाड-
छाती ईतकी वाढलेली झुडपे लागत होती ,
झाडांवरून तुटून पडलेल्या पानांचा जमिनीवर ढिग साचला होता....
त्यांचाच पाळा पाचोळा तैयार झाला होता.
आणी ह्याच पाळा पाचोळ्यावर ह्या सर्व फोर्स मेंबर्सची पावळे वेगाने पडत होती...- त्या वेगाने पडणा-या पावळांनी खालचा जमिनीवरचा पाळा पाचोळा चर्रचर्रत वाजत होता.
सर्वात पुढे ईं:रणदिवे , आणी त्यांच्या मागोमाग नऊ फोर्स मेंबर्स धावत निघाले होते.
सर्वात शेवटी एक फोर्स मेंबर्स धावतांना दिसत होता -
तोच अचानक एका काळ्या सावलीने विरुद्ध दिशेने येऊन वेगाने त्याच्या अंगावर उडी घेतली, अलगद त्याला झाडझुडपांत पाडल..-
ती सावली त्या मेंबरच्या छाताडावर बसली होती..
त्या सावलीने आपला हात वर नेहला,
त्या हातात गोळसर कलिंगडा एवढ़ा एक मोठ दगड होत...
तेच दगड त्या सावलीने त्या फोर्स मेंबर्सच्या नाकावर आपटल..
पहिल्या वारात - नाकाच हाड तुटल रक्त बाहेर आल..-
दगड असलेला हात ईतक्या वर थांबला नव्हता..
हात पुन्हा वर गेला , तिप्पट वेगाने खाली आला..
तो त्या फोर्स मेंबरचा काळ बनून!
दगडाचा आघात ईतका वेगवान होता - की चेह-याची कवटी फुटली, डोक्यातला लहान- मोठा गुलाबी मेंदू, लाल , निळ्या ,पिवल्या वेगवेगळ्या रंगाच्या नसा , रक्त मिश्रित होऊन बाहेर पडला.
आता फक्त नऊ फॉर्स मेंबर उरले होते..
क्रमश: