Ek Saitaani Ratra - 40 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | एक सैतानी रात्र - भाग 40

The Author
Featured Books
Categories
Share

एक सैतानी रात्र - भाग 40

भाग ४०


रक्तपात 6 ....

टीप : सदर कथा हिंसक आहे ! कथेत पात्रांच्या हत्येच वर्णन अगदी तंतोतंत वर्तवल आहे ! ह्दयचा त्रास असणारे , किंवा गरोदर स्त्रियांनी कृपया ही कथा वाचु नये ! कथेत आवश्यकता असल्याने अंधश्रद्धेच वापर केल गेल आहे - पण लेखकाच समाज्यात
अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही !
आपला प्रिय लेखक मित्र अंधश्रद्धेला मुळीच खतपाणी घालत नाही !

सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्व काही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी

फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!


सदर कथेचे सर्व हक्क लेखकाकडे अगदी सुखरुप आहेत - कथा कॉपी पास्ट करुन आपल्या नावे
खपवून घेणा-या चोरांवर दया दाखवली जाणार नाही !
त्यांवए ऑनलाईन कारवाई केली जाईल.
कथा सुरु



त्या सर्व फोर्स मेंबर्सच्या डोळ्यांसमोर
आपल्या सिनीयरचा (इं:थलाईवा ) आणी हेड कोंन्सटेबल रामू दोघांचाही म्हढ जमिनीवर पडला होता.

अंधारातून न जाणे कोठून कसे बाण येत होते , देहावर वार करत होते. ..

काहीच समजून येत नव्हत !


ज्या दिशेने बाण येत होते त्या दिशेला बैटरी टॉर्चचा प्रकाश फिरवला, की जागा रिकामी दिसायची!

पण निट निरखूण पाहिल , तर लागलीच दिसून येईल , की अंधारात टॉर्चचा प्रकाश त्या ध्यानाच्या दिशेने पोहचन्या अगोदर ते झाडाच्या फांदीवरून , अमानवीय वेगाने जागा बदलत होत..

त्याची हालचाल इतकी वेगवान होती, की डोळ्याची पापणी मिटुन पुन्हा उघडायला , ते ध्यान एका झाडावरून माकडासारख मोठाल्या उड्या घेत दुस-या झाडावर पोहचत होत.

पण किती ऊशीर त्या हैवानाचा हा खेळ चालणार होता?

शेवटी फोर्स मेंबर्स मध्ये असलेल्या एका कोंन्सटेबलच्या हातातल्या टॉर्चचा प्रकाश त्या हैवानाच्या देहावर पडलाच...

त्या कोंन्सटेबलची ते भयान रूप पाहूण
डोळ्यांचा आकार मोठा झाला, तोंड़ वासल गेल,
फोर्स मेंबर पासून तीस मीटर अंतरावर एक वीस फुट उंच चिंचेच झाड दिसत होत ,

त्या झाडाच्या पंधराफुट उंचीवर ,एका जाड़जुड
फांदीवर तो धिप्पाड देहाचा , नग्न मानवभक्षक दोन पायांवर माकडासारखा बसला होता !

टॉर्चचा पिवळ्या रंगाचा गोलसर चंबुधारी प्रकाश त्याच्या पुर्णत देहावर पडला होता -

त्याचे डोक्यावरचे केस चेह-यावर आले होते..
आणी त्याच केसांमधून त्याचे ते निळसर कचकड्याचे , त्यात एक कालसर चिर असे सर्पधारी डोळे एका आसुरी चमकेने लकाकले...

त्याचा जबडा वासला आतील पिशाच्ची दात दिसले .

" भू...भू....भूत..! स...स.....सैतान..सैतान....."
त्या कोंन्सटेबलची पाचावर धारण बसली.

मनातल्या भीतिने त्या हैवानाला एका भुताच
रुप दिल.

तसंही ते हैवान सैतानच होत !
त्याचे गूण, वागन, एकंदरीत सर्व भाव हैवानियचे होते..- अघोरी , कृल्पती, वाईट सर्वगुणसंपन्न होते.

एका सैतानाची औलादच होती ती!
त्यांना प्रेम ,दया, काळजी,जिव्हाळा,किव,आपुलकी, ह्या सर्व भावना माहिती नव्हत्या..!

फक्त एक भावना माहीती होती,
बळी घेणे, दुख :पीडा देऊन सावजाला मारणे आणी त्यातून मिळणारा तो आसुरी आनंद , आसुरी वासना..

एकंदरीत सर्व फोर्स मेंबर्सच्या नजरा त्या झाडावर खिळल्या होत्या.

ते सहाफुट उंच नग्न देहाच हैवान , त्याचे ते चेह-यावर काळशार केस, ते आसुरी लकाकीने चमकणारे बुभळ...

त्या ध्यानाच सर्वच्या सर्व आकार - उकारच विद्रूप- अभद्र होत.

कोणी लहान मुलाने त्या हैवानाला पाहिल तर ते रडल्या शिवाय राहिल नसत , ते बुवा बुवा म्हंणतात हेच का ? ह्या प्रश्नाच उत्तर त्या लहानग्या मुलाला नक्कीच मिळाल असतं!

एकूण दहा फोर्स मेंबर्स ऊरले होते.
दोघांचा एकाने काटा काढला होता..- त्यांची प्रेत तशीच सताड उघड्या डोळ्यांनी जमिनिवर पडून अखंड( निद्रेत) झोपली होती.

ते कधीच उठणार नव्हते !

त्या कोंन्सटेबलच्या हातातल्या टॉर्चचा, प्रकाश त्या हैवानाच्या देहावर पडला होता -

जो तो ते भयाण रुप आपल्या स्मृती पटळावर कोरून घेत होता..-

काय माहीत जर ह्या यमांकडून वाचलो तर कायमस्वरूपी भीति म्हंणून वापरता येईल , हा त्या मागचा उद्देश्य असाव!

त्या हैवानाच्या देहावर स्थिरावलेला तो पिवळसर प्रकाश चरचरला... बैटरी (टॉर्च) पाच सेकंदांसाठी चरचरली...

त्या बिचा-या कोंन्सटेबलने भीत- भितच
टॉर्चला दोन- चार फटके बसवले...!

तेव्हा कुठे जाऊन ती पुन्हा सुरू झाली-

सर्वाँनी पुन्हा एकदा त्या चिंचेच्या झाडावर
त्याच फांदीवर पाहिल....

पन ती फांदी ? ती फांदी मात्र आता रिकामी
होती.
.
" पळा....पळा..... लवकर...! तो सैतान यायच्या अगोदर ..पळा.... जिव वाचवा पळा..!"
फोर्स मेंबर्स मध्ये असलेले सब इंन्सपेक्टर
(एस: आई ) दिव्यजित रणदिवे ओरडले.


Xxxxxxxxx

एका खैराच्या झाडाची जाडजूड फांदी दिसत होती !
तोच त्या फांदीवर मानवी हाताच्या पाच बोटांचा पंज्या पडला , कोणितरी त्या झाडावर चढत असाव.

कारण तोच झटकन एक मानवी चेहरा पुढे आला!

" हुश्श्श्!" तोंडातून सुटकेचा श्वास सोडत सुर्यांश त्या फांदीवर आला होता.

काहीवेळा अगोदर ह्याच फांदीवर मृत ईगल42
स्नाईपर उभा होता, ना ?

सुर्यांश आता ईगलच्याच जागेवर उभा होता !

त्याने जागेवरूनच एक कटाक्ष समोर टाकला , समोर
दूर दूर पर्यंत मोठ मोठाल्या झाडांच्या अवाढव्य काळ्या राकट आकृत्या उभ्या होत्या.

मध्येच एक हिरवट छटेची विळक्षण
विज कडाडायची आण ते झोपलेले जंगल डोळे उघडायचं- ती हिरवी झाडे, छाती ईतकी वाढलेली झुडपे गडद हिरवट रंगाने चमकून उठायची..

त्या जंगलातल्या झाडांकडे पाहता असं वाटायच
की कोण्या चेटकीणीच्या प्रदेशात आलो आहोत..


कारण चेटकीणीच जंगल असत ना ?
मोठ मोठाली वाकड्या तिक्ड्या शेंड्यांची झाडे, आणी विषारी सापासारखी लोंबणा-या वडाच्या पारंब्या.
अजून बरंच काही.

असो कथा वाचुयात..!
सुर्यांशने समोर पाहिल तर गुढ अंधाराचा पडदा त्याला जमिनीवरच काहीच पाहू देत नव्हता..
सामान्य नजर त्या कृत्रीम कालोखी अंधाराला भेदू शकत नव्हती..

पन त्याच अंधारातून
ईगलची 8xनाईटस्कॉप जोडलेली,
ए:डब्लु:एम फांदीवर तशीच पडून होती.
तिच सुर्यांशने हाती घेतली.


ईगलची साडे तीन फुट उंचीची ती ए:डब्लु: एम खास होती-

ईगलने त्या स्नाईपर बंदुकीत काही - काही विळक्षण बदल केले होते. - त्यासहितच तो बंदूकीची डागडूजी ही करायचा..

बंदुकीला 8X नाईट स्कॉप होत.
थर्मल कैम्रा सिस्टीम सुद्धा कार्यरत होती.

जे मिट्ट अंधारात सुद्धा आपल्या शत्रुच पत्ता लावून देण्यासाठी मदत करायचं .

बंदुकीचा वेग फार होता , एका गोळीतच जंगलात सिंह सुद्धा मरण पावेळ अशी बंदुकीत ताकद होती !

सुर्यांश बंदूकीला न्याहाळत होता..
त्याच्या मित्राकडून त्याने ह्या बंदुकीबद्दल फार काही ऐकल होत.

" ह्या बंदुकीला असलेल्या नाईट स्कॉपने मी अंधारात पाहू शकतो ! म्हंणजे त्या ईगलला रेंचो किंवा शैडो ज्या कोनी मारल आहे.
त्यांना मी अंधारात ही पाहू शकतो ? आणी लपुन त्यांना मारू ही शकतो."
सुर्यांश स्वत:शीच म्हंणाला.

त्याने ए:ड़ब्लू : एम : हातात सरळ धरली ,
बंदुकीच वजन सहा - सात किलो होत - शुटींग रेंज 100 होती! .... सर्वात ताकदवर रेंज !
काही वेळा अगोदर ह्याच बंदुकी मार्ग ईगलने शैडोला गहि-या निद्रेत पाठवल होत.

सुर्यांशने नाईट स्कॉपमध्ये पाहिल, काहिवेळा अगोदर नजरेला दिसणारा काळोख आता नाहीसा झाला होता - डोळ्यांना सर्व काही झाडे, झुडपे - हिरवट प्रकाशित रंगाने दिसत होते!

" हे काय आहे ..!'

सुर्यांशच्या नजरेस एक तुटलेला हवनकूंड दिसला , त्या हवनकूंडातून सफेद धूर मंद गतीने बाहेर येत होत -

हवनकूंडाच्या अवतीभवती ठेवलेल्या विचीत्र
काळ्या जादू टोणासाठी वापरल्या जाणा -या वस्तू ठेवल्या होत्या..

त्याही त्याच्या नजरेस पडत होत्या -
ते मानवी देह विरहीत शीर सुद्धा त्याला दिसल होत.

त्याने तो नाईट स्कॉप हळू हळू आजू- बाजुला
फिरवायला सुरुवात केली.

आणी डोळ्यांना भयंकर आत्मा चळचल काफावी अस , दृष्य नजरेस दिसू लागले ...

हवनकूंडाच्या अवतीभवती जमिनीवर एकूण चार मृत देह पडले होते.

तिथेच रक्तापात घडला होता.

अंगावरून ते दृष्य पाहतांना मानेवरून कोणीतरी गार गार सुरा फिरवल्यासारखी क्षणो क्षणी जाणिव होत होती.

" अरे देवा, ईथे तर प्रेतच प्रेत पडले आहेत ! आणी हे काय ? हे तर रेंचो शैडो! हे सुद्धा मेले आहेत ? माय गॉड ही तर आनंदाची गोष्ट आहे ! "
सुर्यांश स्वत:शीच बोलत होता.!

त्याच्या चेह-यावर जरासा आनंद पसरला होता !
पन तो आंनद किती वेळ राहणार होता ?

एक धिप्पाड सहा फुट, दैत्यासारखी आकृती तिथे मृतांचा सडा पडलेल्या त्या रक्तपाती जागेवर आली..

सुर्यांशच्या चेह-यावरच हसू ओसरल...नाईट स्कॉपने तो ते सर्व पाहत होता...-

ती आकृती पुर्णत नग्न होती, खांद्यावर बाणाचा भाता होता - हाती धनुष्य बाण होत.

ती आकृती तिथे चालत आली -
परंतू चालण्याची पद्धत फार विळक्षण होती-

एका माकडासारख दोन्ही हात खाली सोडुन ते ध्यान उड्या मारत मारत तिथे पोहचल होत.

त्याच्या पायाखाली काळ्या झग्यातला
रेंचो उर्फ रघुभट्ट पालथा पडला होता.

" म...म.....म्ह...!"
विचीत्र घोग-या आवाजात ते ध्यान रेंचोला साद घालत होत.

त्याच्या आवाजाने ती रघुभट्ट जागा होनार होता का ?
नाही म्हंणजे पहा ना !

त्याच्या आवाजाने खाली जमिनीवर पडलेल्या रघुभट्टच्या देहाची हालचाल झाली !

त्या काळशार मैक्सीतल्या काटकूळ्या आकृतीला एक झटका बसला - !


काळ्याभोर गढुळ आकाशात हिरवट रंगाची विज कडाडली -

त्या मैक्सीतून बाहेर आलेल्या पांढरट कंकाळ रूपी हाडावर पडली-

ते हात त्या हिरव्या उजेडात -हाडांसहित
वळवळलतांना दिसत होत!

तो धिप्पाड आकार दोन पायांवर खाली बसला
त्याने रघुभट्टला अलगद सरल केल!

त्या त्रिकोणी टोपीत काळभोर अंधार होत..
त्याच अंधारात दोन लालसर मण्यांसारखे डोळे चकाकले !

त्या डोळ्यांचा लालसर चकाकता गहिरा प्रकाश त्या हैवानाच्या डोळ्यांतही पडला.. तसे त्याचे डोळेही चकाकले ..!

तो संमोहिंत झाला...! ..



क्रमश :
नेक्स्ट
एपिसोड

" तुझं नाव राका. आनी. तुझ्या त्या बाकी तीन भावंडांच नाव चामा,सामा,सुका..! "
रघुभट्ट त्या धिप्पाड देहाच्या हैवानाला म्हणजेच राकाला म्हंनाला.