भाग ३७
काहिवेळा अगोदर :
रेंचो उर्फ रघुभट्ट हवनकूंडसमोर बसला होता.
चारही बाजुंनी फोर्स मेंबर्स पुढे पुढे येत होते.. - त्यांच्या पावळांनी झाडावरून खाली पडलेल्या पानांचा पाळा पाचोळा तुडवला जात वाजत होता.
' चरचर्र ' पाळापाचोळ तुडवण्याचा आवाज
रघुभट्टच्या कानांवर पडला जात होता..
त्याच्या सैतानी बुद्धीत भीति जमा झाली होती .
त्याच्या भीतिच कारण हे होत .
की मृतोक्ष्वरी उर्फ मृतो देवतेने त्याला नाराज होऊन तू अर्धमानव - अर्धआत्मा बनून जिवन जगशील, तूला जिवंत राहण्यासाठी मानवाच मांस भक्षण कराव लागेल , नाहीतर तुझी शक्ति- आणी देहाचा नायनाट होइल , असा श्राप दिला होता.
श्रापाने आपल काम करायला सुरुवातही केली होती-
रेंचो उर्फ रघुभट्टची अदृश्य आत्मा ,त्या आत्मेवर काळसर बंधनरूपी , काळी मैक्सी तैयार झाली होती.
आणी त्या कालसर कपड्याआत , त्याच विद्रूप
अर्ध आत्मा आणी अर्ध शरीर झाकल गेल होत.
रघुभट्टच्या देहाची रचना अशी होती, की त्याच ह्दय,मेंदू ,अर्ध अवयव बाहेर आलेले होते.
ज्या अवयवांवर गोळ्या बसताच तो मृत मुखी पडणार नव्हता - पन त्याची शक्ति मात्र काही अंशी कमी होणार होती.
आणि शक्ति वाढवण्यासाठी , व पुन्हा जिवित होण्यासाठी मानवी मांस ग्रहण करणे आवश्यक होत.
रेंचो आणी शैडो दोघांनीही केलेल्या विधीमध्ये
हवनकूंडाच्या उज्व्या बाजुला जमिनीवर त्या ज्या चार पिठाच्या बाहुल्या मांडल्या होत्या !
त्या बाहुल्या म्हंणजे कलियुगात मानवाच भक्षण करणा-यासाठी सैतानाने घेतलेल जन्म होता.
रेंचो उर्फ रघुभट्टला चारही बाजुंनी पोलिस फोर्स
मेंबर्सनी गोल घेराव घातला होता.
इं:थलाईवा रेंचो उर्फ रघुभट्टवर खेकसले ...
आणी त्यांनी आपल्या साथीदारांना शुट हिम ची ऑर्डर सोडली.
रघुभट्टच्या अंगावर चारही दिशेनी गोळ्यांचा पाऊस कोसळू लागला -
त्याच्या अर्ध मानवी , देहातल्या मांसात , गोळ्या लहान लहान होल पाडत आत घुसल्या ,
आतून काळसर विषारी रक्त बाहेर पडल..
अंगावर असलेला तो कालसर कपडा तो काळा रक्त आपल्यात शोषु लागला.
ह्दयात , मेंदूत गोळ्या घुसल्या होत्या..
ईतकं सर्व होऊन ही तो सैतान मरण पावला नव्हता..
जरा काहीवेळ, किंवा दिवस तो बेशुध्द राहणार होता.
पण बेशुद्ध होण्या अगोदर त्याने
आपल्या काल्या जादूई शक्तिने बाहुल्यांच्यात प्राण ओतला होता -
अचानक घडलेल्या ह्या क्रीयेने त्या बाहुल्यांना ओबडधोबड , भकास, अभद्र रूप मिळाल जात -
.... जस गोळ्यांच्या वारांनी हवनकूंड विझल होत..
त्या चारही बाहुल्या , हाता पायांवर रेंगाळत जात झाडझुडपांत गेल्या होत्या..
हिरव्या रंगाची ती छाती इतकी वाढलेली झाडे झुडपे - सळसलू लागली थरथरू लागली.
आकाशात धडाड आवाज करत पुन्हा ती विषारी रंगाची विज कडाडली.
उभा काळा आसमंत भेसूर हिरवट छटेने रंगून मातून गेला -
पुर्णत शांत जंगलात , गूढ भाव दडवून उभी असलेली झाडे हिरवट छटेने रंगून उठली.
थय थय करत हवा नाचू लागली..
रातकिड्यांची किरकिर थांबली होती.
ते कीटक बिचारे भ्यायले होते.
काहीतरी विळक्षण निसर्गाच्या
कृती पल्याड घडत होत,
अनैसर्गिक श्रेणीतून विकृतीचा जन्म घडला जात होता, जे हे निसर्ग पाहू शकत नव्हता..
त्याचाच हा संताप सुरू होता.
आणी अचानक ती फायरींग सुरु झाली
गोळ्यांच्या आवाजाने जंगल शहारून उठल
ही शांतता दणाणून उठली.
त्याच वेळेत त्या झाडझूड़पांमध्ये त्या
चार मानवभक्षकांचा जन्म झाला होता.
अमावास्याच्या रातीला सैतान जन्मला होता.
कीती अपशकुनी नशीब नाही ?
कडाडणा-या हिरवट विजांचा प्रकाश
उभा जंगल उजळून टाकत होता.
हिरवट उजेडात जमिनीवर , तर कधी झुडपांवर
चार सावल्या पडल्या जात , त्या धावत जातांना दिसत होत्या.
पुढच्या तीन काळ्या सावल्या - अगदी लुकड्या होत्या .
पन सर्वात मागची चौथी सावली मात्र
जेमतेम सहा फुट उंच धिप्पाड राक्षसी देहाची होती -
आकाशात विज कडाडायची थांबली- आणी पुन्हा काही वेळाने ते भेसुर विजेचा प्रकाश पडला...
आणी त्या प्रकाशात ते चार अभद्र मानवीभक्षकांचे देह दिसले.
अवती भवती छाती इतकी वाढलेली झुडपे होती...
.... बाजुलाच जरा अंतरावर वेगवेगळ्या प्रजातीची झाडे होती.
ते एकून चार जण होते..
तीन जणांच्या शरीरयष्टी एकसारख्याच होत्या.
उंची सूद्धा हुबेहुब पाच फुट उंच !
पुर्णत शरीराची कातडी काळीशार होती - डोक्याची वरची कवटी फुग्यासारखी मोठी फुगलेली ,
त्यावर तपकीरी दहा वीस केसांचे झुंड , बाकी ठिक ठिकाणी टक्कल होत .
खालचा चेह-याचा भाग V आकाराचा हिडिस विद्रूप होता.
नाक चेटकीणी सारख मोठ होत- लांबसडक होत.
जबड्यातले दात हिंस्त्र श्वापदासारखे
टोकदार होते. त्यांना सुईसारखी धार होती .
मांसात रूतले तर लचका तोडल्याशिवाय बाहेर येणार नव्हते.
..कान सशासारखे कोरले होते...- त्यातून ते लांब लांबचे ध्वनी, बारीक सारीक छोठेसे आवाज अलगद ऐकू शकत होते.
हाताचे बाहू बलदंड होते ,त्यांना टोकदार पौलादी नख होती.
डोळे रानटी मांजरीसारखे पिवळ्याजर्द त्यात एक चीर , जे अंधारात चकाकत होते.
चौथा आकार ह्या तिघांपेक्षा कितीतरी वेगळा आणी भयावह होता.
त्याची उंची सहा फुट राक्षसी होती होती .
शरीरयष्टी धिप्पाड फुगलेली होती -
अंगावरची कातडी कालसर पौलादी होती.
हाताचे बाहू फुगीर बलदंड होते....
स्नायुंवर टरारून फुगलेल्या नसा स्पष्ट दिसत होत्या.
डोक्याची कवटी चौकोनी खप्पड होती ,
डोक्यावर वाढलेले काळसर केस होते ..
दोन्ही खांद्यांवर लोंबत होते .
बारीकस कपाळ, आणी गर्द काळसर भुवयांखाली - ते
निळसर कचकड्याचे, त्यात एक काळसर चिर असे
विचीत्र डोळे - अंधारात चमकत होते.
ओठ काळसर जरासे लांब आणी मोठे होते..
नाक नप्ट होत....
एक कान लहान , तर दूसर सशासारख मोठ
होत.
त्या चारही आकृतींच्या अंगावर
वस्त्र नव्हते -
चारही जन वेड्याबिंद-या गबळ्या सारखे नग्न उभ होते.
एक गोरील्ला कस हात खाली करून उड्या मारत
चालत , तसे ते चौघे उड्या मारत चालत होते.
आणी आता जागेवर थांबले होते.
त्यांचा काहीतरी प्लान सुरु होता..
क्रमश :