Ek Saitaani Ratra - 35 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | एक सैतानी रात्र - भाग 35

The Author
Featured Books
Categories
Share

एक सैतानी रात्र - भाग 35



भाग ३५

वेळ

मध्यरात्री
4:55 am..


बळवंतेंच्या बंगल्या आत :


मध्यरात्र सुरु होती.

ह्या वेळेला , कालपाडा गावातली लहान मुल सोडली तर - कालपाडा शहरातली सर्व घरात्ली मोठी मांणस जागी होती.



त्या दोन सैतानांनी माजवलेला तांडव , किती भयाण, मन पिळवटुन टाकणारा होता.-

ह्याची जाणिव फक्त ज्यांच्या घरातले जे जे त्या सैतानांच्या हातून ,मारले गेले होते त्यांनाच ठावूक होत.


पोलिसांना अद्यापही त्या दोघांचा सुगावा लागला नव्हता ..
पोलिस जो पर्यंत त्या दोन हैवानांना पकडणार नव्हते , तो पर्यंत कालपाडा शहरी वासियांच्या जिव जिवात येणार नव्हता..


आपण झोपले आणी ते दोन्ही हैवान आले तर?

हा भयानक विचारच सर्वाँच्या मनाच पाणी पाणी करत होता!


मनावर उमटलेले भीतीचे पडसाद इतके ठळक होते, की डोळ्याला डोळा लागणही असंभव होत.


ती सैतान मोकाट सुटली होती.

जो दिसेल त्याला मारत होती.


रात्रीचा अंधार जणू त्यात त्या दोघांच्या आत

यम येऊन फीरत होता.


कोनी दिसला रे दिसला की मूडदा पडनारच.




कालपाडा गावातले सरपंच श्री(कै):बळवंते
म्हंणजे अगदी देवमाणूस हो!


कालपाडा वासियांच्या सुख:दुखात सामील होणारे,

गोर गरीबांना कठीन परिस्थितीत मदत करणारे..


असे हे बळवंते - आज काळाच्या पडद्याआड़ झाले होते.



ते स्वत:हाच नाही , तर त्यांच्या पत्नी- सुजाताबाई- सुद्धा त्या दोन नराधमांचा शिकार झाल्या होत्या .


शेवटला त्यांचा लहान मुलगा सुद्धा
म्रृत्यूच्या सीमेवर अटकला होता.



डॉक्टरांनी सांगितल होत - तो कोमामध्ये गेला आहे !

वाचण्याची शक्यता अगदी कमी आहे !

गोड साखर खाली जमिनीवर पडली की मुंग्या लागणारच ! नाही का ?


तसंच , शहरात कुठे काही हल्ला झाला, नामांकीत आसामी मेल , वारल, की हे कुत्र्याच शेपूट असणारे पत्रकार - न्यूजवाले शेपूट हळवत तिथे जाणार, न्यूज मिळवणार !


मग आप- आपल्या चैनल स्क्रीनवर दाखवणार .

कालपाडा न्यूज लाईव्हवर शहरात माजलेला हा
मौत का मंजर अशी हेडलाईन टाकुन एक बाई घसा फाडून मोठ मोठ्याने ओरडत तीच तीच न्यूज रिपीट करत सांगत होती.

काळ्या चौकोनी स्क्रीनवर ती हेडलाईन सुरु होती.


टी:व्हीचा आवाज थोडा कमी असावा - किंवा म्युट असावा , टी:व्हीतून आवाज येत नव्हता..


पण त्या न्यूज सांगणा-या बाईच्या चेह-यावरचर हावभाव असे होते..- की ती ओरडून बोलत आहे , हे अलगद कळून येत होत.


लाल रंगाच्या हेडलाईनवर मृतांची संख्या दाखवली जात होती-


आकडा वाढत चाल्ला होता..


त्या हैवानांनी मारलेल्या मांणसांना , पोलिसांनी दवाखाण्यात एडमिट केल होत..

त्यातलेच

काही बचावले होते तर - काहींच्या शरीरातील रक्तस्त्राव जास्त वाहून गेल्याने , त्यांनी जागिचजिव सोडला होता.

चालू असलेली टी:व्ही स्क्रीन झपकण बंद झाली.

त्या बंद झालेल्या काळ्या- स्क्रीनवर सनाची उभी आकृती दिसत होती.

" सना !" अमृताबाईंनी - म्हंणजेच तिच्या आईंनी टिव्ही बंद केली होती.

आणी त्यांनीच तिला आवाज दिला होता.

" हे बघ , बस्स झाल ते न्यूज चैनल पाहण- ये ईथे माझ्याजवळ सोफ्यावर बस पाहू..!"
अमृता बाई चिंतेच्या स्वरात बोलल्या.


गेल्या दिड तासांपासून सनाची घालमेल त्यांना दिसून येत नव्हती का?

सुर्यांश साठी तिचा जिव वर खाली होत होता हे त्यांना दिसत नव्हत का ?.
तिला त्याची किती चिंता लागून राहिली होती.
त्याच्या चिंतेपोटी तिने पाणी सुद्धा प्यायल नव्हत..
ईतक्ंच नाही, तर गेल्या दिड तासांपासून ती उभीच होती-

बाहेरुन जरासा कसला आवाज आला की ती दरवाज्याच्या दिशेने धावे - तिच्या मनाला वाटायचं की तीचे वडील सुर्यांशला घेऊन आले असावे..



पन बाहेर पाहता कोणीच दिसत नसायचं!
तेव्हा तिचा जो चेहरा पडायचा , तो चेहरा पाहून अमृताबाईंच्या डोळ्यांतून आसवे बाहेर येत होती.


आपल्या एकुलत्या एक लेकीची ही अशी अवस्था त्या मातेला पहावत नव्हती, बिल्कूलंच पहावत नव्हती.


मनात तर एक भयानक भितीदायक विचार सुद्धा येत होता !

जर सुर्यांशल जंगलात काही झालं! तर ?


आपली लेक त्याच्या प्रेमापोटी ठार वेडी होऊन जाईल , हे ही शक्य आहे की तिला वेड्याचा झटका सुद्धा येईल!

मग तिच आयुष्य बरबाद व्हाय्ला किती वेळ लागणार होता?

मानवाची कल्पना बुद्धी कधी कधी श्राप ठरते हा त्याचा एक नमुना ..-


कारन3हा विचार मनात येताच त्या मायेच काळीज धडधडत होत.

आणी त्यांना अशी परीस्थिती आपल्या लेकिव्र ओढावू द्यायची नव्हती.

" अंग पन सुर्यांश येईल ना ?" सना तशीच दरवाज्याकडे पाहत म्हंणाली.

" सना !" अमृतीबाई तिच्या जवळ चालत आल्या.
" सना , बाळा! मला माहीतीये की तूझ सुर्यांशवर खुप प्रेम आहे- पन तुझी ही अवस्था मला नाही बघवत गं , गेले दिड- दोन तास मी पाहतीये तू पाण्याला सुद्धा स्पर्श केल नाहीयेस , बाहेरून जरा कसलं आवाज आल की तू वेड्यासारखी धावत दरवाज्याच्या दिशेने जातीयेस "

अमृताबाईं जरा थांबून म्हंणाल्या.

" - सना हे बघ !"

अमृताबाईंनी आपल्या दोन्ही हातांनी सनाचा चेहरा ओंजळीत भरला.

" तुझा तुझ्या बाबांवर विश्वास आहे ना?"

अमृताबाईंच्या वाक्यावर सनाने फक्त होकारार्थी मान हलवली.

तिच्या डोळ्यांत आसवे जमा झाली होती.


" मग तू ये पाहू ईकडे.!"
अमृताबाईंनी - सनाला बाजुच्याच सोफ्यावर बसवल..!


आणी तिच्याबाजूला त्याही बसल्या.
सनाने आपल डोक तिच्या आईच्या खांद्यावर ठेवल.


" आई हे सगळ काय होऊन बसल ग?
काहीतासांअगोदर सर्व कस छान सुरळीत सुरु होत.
आणी अचानक न जाणे काय झाल , की कोणाची नजर लागली कोणास ठावूक? बघणा आता हे जे काही घडत आहे..ते मला एक स्वप्नासारखच वाटत आहे..- अस वाटत्ं ,मी छानशी झोपेत आहे..आणी अचानक दचकून जाग येईल आणि हे वाईट स्वप्नही तिथेच संपेल.!"

सनाच्या वाक्यावर अमृताबाईंच्या डोळ्यांतून टचकन अश्रुबाहेर पडले... हे वाक्य त्यांच्या अगदी मनाला लाग होत.

खरच नियतीचे खेळ किती सन सनाटी असतात,
कधी केव्हा कसे बदलतील कोणीच सांगू शकत नाही.
सना बोलत होती , तीचा चेहरा अगदी थंड होता..

अमृताबाईंनी झटकन डोळे पुसले..
व जरास मंदस्मित हास्य करत - तिला धीर देत म्हणाल्या.

" बाळा ,तू काळजी करू नकोस पाहू, हे बघ सर्व
ठिक होइल - फक्त देवावर विश्वास ठेव..! तो बघतोय , तोच नक्किच काहीतरी चमत्कार घडवेल..!"


अमृताबाई म्हंणाल्या.

तसंही सनाची समजुत काढण्या पल्याड ती हतबल माता काय करू शकत होती ?
क्रमश:
xxxxxxxxxx