भाग 32
जंगलातल्या खडकाळ मातीच्या रसत्यावरून
वनविभाग ऑफिसर शशिकांत नेमाडे साहेबांची
चार चाकी जिप वेगाने धावत निघाली होती.
जीपच्या हेडलाईटचा पिवळा प्रकाश समोर पडला होता.
त्या पिवळ्या प्रकाशात समोरचा तपकीरी रंगाचा रस्ता , आजुबाजूची मोठ मोठाली हिरवी झाडे,
कमरेइतकी वाढलेली झुडपे नजरेस पडत होती.
ड्राईव्ह सीटवर नेमाडे साहेब बसले होते..
बाजुच्या सीटवर पोलिस ऑफिसर माने साहेब बसलेले , आणी मागचे चार सीट रिकामे होते.
" माने साहेब हे शैडो- रेंचो नक्की काय करण्याच्या मागे असावेत?"
नेमाडे साहेब स्टेरिंग फिरवत बोलले.
जिपने डाव्या बाजुला वळण घेतल..
इंजिनचा घर्रघर्राट वाजवत रस्त्यावरून धावू लागली.
" नो आईडीया नेमाडे साहेब , हे प्रकरण जरा डोक्यावरून जात आहे ! म्हंणजे पाहा हे दोन्ही सायकॉ किलर - जादू- टोणा,तंत्र मंत्राच्या मागे लागले आहेत... जे आस्तितवातच नाही आहे "
माने साहेब म्हंणाले.
त्यांच्या त्या वाक्यावर नेमाडे साहेब जरासे गंभीर झाले होते.
" माफ करा माने साहेब ! पन मला हा जादू×टोणा काळी जादू , ह्यांवर थोडस विश्वास आहे."
---
नेमाडे साहेब समोर पाहत बोल्ले.
माने साहेबांनी त्यांच्याकडे कसतरीच पाहिल..
" व्हॉट?" माने साहेबांच आवाज.
" येस !' ह्यावेळेस नेमाडे साहेबांनी माने साहेबांकडे पाहिल व पुढे बोलू लागले.
" एकदा मी माझ्या कामानिमीत्ताने आफिकेला गेलो होतो- तिथे एक वूडू नामक काळी विद्याचा प्रकार पाहिला होता. "
" कोणता?" माने साहेबांनी नेमाडेंकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिल..
" मी ज्या कामासाठी आफ्रीकेला गेलो होती..तिथे माझा एक ओळखीचा सहकारी होता..त्याच्या घरात त्याची एक नव्वद वर्षाची म्हातारी आई होती. , जी अंथरूणाला खिळली होती..! उद्याच सुद्धा दिवस पाहिल की नाही असं वाटत होत! मी त्या म्हातारीची अव्स्था पाहिली होती.
काहिही नव्हत अंगावर , हाड मांसाला चिटकल होत.. डोळे सफेद झाले होते. पाहणारा म्हंणेल ही की म्हातारा एक दोन दिवसात मरेल..मी सुद्धा तस्ंच विचार केल होत. पन दुस-या दिवशी मी जेव्हा त्या सहका -याच्या घरी गेलो.."
नेमाडे साहेब बोलायचे जरासे थांबले.
त्यांच्या चेह-यावर जरासे गंभीर, नवळ,आश्चर्यकारक भाव पसरले होते.
आणी तेवढ्याच उत्सुकतेने माने साहेब त्यांच बोलण ऐकत होते.
" पुढे... ! पुढे काय झाल?'
माने साहेब म्हंणाले.
नेमाडे साहेब बोलू लागले.
" दुस-या दिवशी मी त्या सहका-याच्या घरी गेलो..
तर मला ती अंथरूणाला खिळलेली म्हातारी स्वत:च्या पायांवर चालताना दिसली..! तिच्या चेह-यावर कसलीच वेदना नव्हती - उलट एक तेज दिसत होत. मी हा भलताच प्रकार पाहून आश्चर्यचकित झालो होतो..शेवटी..मी दुस-या दिवशी माझ्या सहकारी मित्राला ह्याबद्दल विचारल..त्यावर तो म्हंणाला. "
नेमाडे साहेबांनी गियर शिफ्ट केल.
" माझी आई अंथरूणाला खिळली होती. आणी तिच आयुष्य संपत आल होत..ती त्याच रात्री मरणार होती..पन मला माझ्या आईला इतक्या मला सोडून जाऊ द्यायच नाही. म्हंणूनच मी आमच्या वूडू मांत्रीकाची भेटकी घेतली..आणी तीच आयुष्य एक महिना जास्त वाढवण्यासाठी एक काळ्या पिसांच्या कोंबड्याच बळी दिल..! आता माझी आई अजुन एक महिना जिवंत राहिल..! तिच आयुष्य वाढवण्यासाठी दर एक महिन्याने एक कोंबडा व्हूंपू निगेरीयन मृत्यु वाढवणा-हा देवाला मला द्याव लागेल. जेणेकरून तीच आयुष्य वाढत राहिल..! "
नेमाडे साहेबांच बोलून झाल होत -
" खरच अस असत? "माने साहेब म्हंणाले.
" हे पूर्णत जगच एक रहस्य आहे माने साहेब, आणी आपण पाहिलेली ती हिरवट विज - हे खुपच विलक्षण- निसर्गा विरुद्ध आहे !"
नेमाडे साहेबांनी होकारार्थी मान हलवली.
त्यांच्या बोलण्यात माने साहेबांना कोठेतरी सत्यता जाणवत होती.
जिप जागेवर थांबली .
ब्रेक मारल्याच्या आवाजाने माने साहेबांचे विचारक्र तूटले.
" इतक्यात पोहचलो?" माने साहेब पुटपुटले..
" होय माने साहेब लोकेशन मार्कर पहा.."
गाडीच्या रेडीओजवळ एक चौकोनी स्क्रीन होती- ज्या स्क्रीनवर दहा - बारा लाल रंगाच्या लोकेशन हळुहळू पुढे पुढे जातांना दिसत होत्या.
" दोन किलोमीटरच अंतर आहे..!"
माने साहेब म्हंणाले.
" होय.! पन जिप आत नाही शकत, रस्ता नाहीये .!"
" मग एक काम करूयात नेमाडे साहेब.. हा लोकेशन मार्कर सोबत घेऊयात ! आणी चालतच आत जाऊयात - आपल्या फोर्सपर्य्ंत पोहचलो की पुढच पूढे पाहू! काय?"
" नाईस आईडीया..!"
नेमाडे साहेबांनी चौकोनी स्क्रीनवरचा डेटा - दुस-या मशीन मध्ये घेतला..- आणी दोघेही जिप रस्त्यावरच ठेवून जंगलात घुसले.
xxxxxxxxxx
स्नाईपर ईगलने स्कोपवरून नजर काढुन घेतली.
सत्तर मीटर अंतरावर शैडोच प्रेत हवनकूंडासमोर पडल होत.
ईगलने आपला एक हात कमरेजवळ नेहला..
कमरेला वॉकी- टॉकी मशीन लावली नव्हती.
एका पावाएवढी ती काळ्या रंगाची मशीन होती .
तीच मशीन ईगलने तोंडाजवळ आणली..
" इंन्सपेक्टर , ईगल बोलतोय! दोन एनेमी मधला एक मरण पावळा आहे !"
" काय ? मरण पावला म्हंणजे?"
" म्हंणजे आई शुट हिम..! वन एनेमी किल झालंय !" ईगल म्हंणाला.
" लोकेशन काय आहे मिस्टर ईगल? कोठे आहात तुम्ही ? मी फोर्स घेऊन पोहचतो ,लगेचंच.."
" ओके..!" ईगल एवढच म्हंणाला.
त्याने काळ्या पेंटच्या खिशातून एक छोठस मिनी कंम्प्युटर बाहेर काढल.
" तुमच्याकडे लोकेशन केचर,किंवा जी.पी.एस आहे ?" काहीवेळाने ईगल म्हंणाला.
" येस येस ईगल, आमच्या सर्वाँच्या कपड्यांवर जी.पी.एस आहेत..कोनीही चुकायला नकोय म्हंणून."
" ओके ईंन्स्पेक्टर , मी तुमच लोकेशन सिस्टम हैक करतोय - आणी तुमची लोकेशन पाहून तुम्हाला रस्ता सांगतो ! ओके..?"
" ओके...नो प्रोब्लेम ..गो अहेड.."
" ओके.." ईगल एवढच म्हणाला. त्याने त्या छोठ्याश्या मिनी कंम्पयुटरवर बटन दाबायला सुरुवात केली.
त्या छोठ्याश्या स्क्रीनवर हिरव्या रंगाचे हैकिंग लेंग्वेज कॉड़ वेगाने खालून वर जाऊ लागले..-
अर्धा सेक्ंद ते कॉड़ वर खाली होत होते..
मग स्क्रीनवर लोकेशन कैच अस इंग्रजीत नाव आल..-
" सिस्टीम हैकेड -"
कंम्पयुटर मधुन यांत्रीक पुरुषी आवाज आला .
स्क्रीनवर लाल रंगाच्या बारा लोकेशन दिसू लागल्या..- आणी प्रत्येक लोकेशनवर ऑफिसरचा चेहरा ,नाव, दिसत होत..एकंदरीत सर्व डेटा दिसत होता.
आणी सर्व लोकेशन ईगलच्या डाव्या बाजुने सत्तर मीटर दूर होत्या , ...!
" इंन्सपेक्टर !" ईगल पटकन म्हंणाला.
" येस " ईंन्सपेक्टर वाटच पाहत असावा तो ही पटकन म्हंणाला.
" तुम्ही सर्व माझ्यापासून सत्तर मीटर अंतर दूर आहात..! एक काम करा , उजव्या बाजुला वळा..आणी सरळ धावत या..- जस्ट..फास्ट.. !"
ईगलच्या वाक्यावर ईंन्स्पेक्टरने होकार दर्शवला.
त्याने आपल्या टीमला ईगलने सांगितलेल्या दिशेने आणायला सुरुवात केली.
xxxxxxxxxx
माने साहेब- नेमाडे साहेब दोघेही लोकेशक कैचरमार्फत आपल्या टिमकदे जायला निघाला होते.
" माने साहेब फक्त चाळीस मीटर अंतर आहे..
म्हंणजे आपण आपल्या टीमजवळ पोहचलो आहोत.."
नेमाडे साहेबांनी स्क्रीनवर पाहिल..
सर्व लोकेशन्सची दिशा बदल्ली होती - सरळ जाणारे लोकेशन्स उजव्या दिशेल जातांना दिसत होते .
" माने साहेब ! मला वाटत टीमला काहीतरी सुगावा लागला आहे."
" म्हंणजे ?" माने साहेब न समजून म्हंणाले.
" म्हंणजे हे पाहा ना, सर्व लोकेशन्सनी एकदाच दिशा बदल्लीये..- आणी एकसाथ उजव्या दिशेला जायला निघालीयेत.." नेमाडे साहेब बोल्ले.
" होय, म्हंणजे त्यांना नक्कीच त्या दोघांचा पत्ता लागला असावा ! आपल्याला लवकरात लवकर पोहचायला हव !" माने साहेब म्हंणाले.
xxxxxxzz
ईगलने मिनी कंम्पयुटरच्या स्क्रीनवर पाहिल.
अंतर फक्त वीस मीटर दाखवत होत.
ह्याचा अर्थ फोर्स जवळच होती.
ईगलने झाडावरूनच एक कटाक्ष खाली टाकल..
अंधारात दहा बारा खाकी वर्दीतले पोलिस- हवालदार दिसले , सर्वाँच्या हातात यू.एम.पी 45 बंदूक होती.
" ईंन्स्पेक्टर !"
" येस !"
" तुम्ही पोहचला आहात लोकेशनवर , एकदा वर पहा, मी झाडावर उभा राहिलो आहे." ईगलच्या
वाक्यावर एक ईंन्स्पेक्टरने मान वर करत पाहिल..
वीस मीटर अंतरावर एक खैराच झाड दिसत होत. ..त्यावर ईगल ए.डब्लु.एम घेऊन उभा होता..
त्याने हाताची बंद मुठ वर केली..
व दिसल्याचा ईशारा केला..- ईंन्स्पेक्टरने ही तीच कृती केली.
" ईंन्सपेक्टर "
" येस ईगल!"
" मला ईथे फक्त एकच जण दिसतो आहे , तो ही मृत- आणि त्याचा दुसरा साथीदार मात्र दिसत नाहीये.."
" ओके ! पन लोकेशन काय आहे ईगल?"
" ह्या झाडापासून पुढे सत्तर मीटर अंतरावर लोकेशन आहे !" ईगलने कळवल.
" औके आम्ही पोहचत आहोत!.."
" नो वेट..!" ईगल पटकन म्हंणाला.
" काय झाल ?"
" तुम्ही बारा जण आहात बरोबर !"
" होय ईगल."
" ओके मग एक काम करा! तीन तीन जनांच ग्रुप बनवा आणी लोकेशनला गोल ..चारही बाजुंनी पसरून घेरा घाला. "
" बट ईथे अंधारात लोकेशन कशी दिसेल ईगल?"
" ईंन्स्पेक्ट लोकेशन आपोआप दिसून येईल.., कारण लोकेशनवर पेटलेला हवनकूंडा, मांणसाच्या, कवट्या , जादू x टोणा करणा-या मांणसांची विधी पडलीये.."
" व्हॉट .." ईंन्सपेक्टरच्या तोंडून आश्चर्यकारक उद्दार बाहेर पडला.
" येस , तुम्ही लोकेशनला लॉक करा - बाकी काही धोका असेल तर स्नाईपर आहेच."
ईगलच्या वाक्यावर ईंन्सपेक्टरने होकारार्थी मान हळवली आणि होकार दर्शवला.
ईंन्सपेक्टरने आपल्या साथीदाराना थोडक्यात
समजेल अस प्लान सांगितल.. आणी लागलीच
सर्वाँची हालचाल सुरु झाली.
बारा जणांचे चार असे गट पडले..
आणी चारही गटांमध्ये तीन तीन लोक सामील होते..
व ही चारही गट चार दिशेना पसरले..
त्यातले तीन हवालदार चालत सुर्यांश
जवळून चालत गेले.
त्यांच्या हातातल्या बंदूकी , चेह-यावर पसरलेले गंभीर भाव - ह्या कठीण परिस्थीतीच गांभीर्य दाखवून देत होते.
झाडांवरची सुखलेली पाने खाली पडली होती.. त्यांचा आफा सुखलेला पाळापाचोला होऊन जमिनीवर पडला होता.
त्याच पाळ्या पाचोळ्यांवरून ते तिघे हवालदार आले तसे सुर्यांशवर एक कटाक्ष टाकुन पुढे निघुन गेले
होते.
जरा पुढे जाताचा अंधाराने त्या तिघांची आकृती गिळून टाकली.
ईथे नक्कीच काहीतरी भयंकर घडणार आहे ! हे सुर्यांशला कळून चुकल होत.
वातावरणात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
××××××××××××××
" माने साहेब!" नेमाडे साहेब जागेवर थांबले.
" काय झाल ?" माने साहेबांनी नेमाडे साहेबांना विचारल.
" हे काय होत आहे , पहा जरा!"
माने साहेब नेमाडे साहेबांजवळ आले.
नेमाडे साहेबांच्या हातात एक चौकोनी स्क्रीन होती त्यावर लाल रंगाचे लोकेशन्स दिसत होते..
:" हे सर्व लोकेशन्स काही वेळा अगोदर एकत्र होते - ह्याचा अर्थ फोर्स एकत्र होती. आणी आता सर्व लोकेशन्स वेग वेगळ्या झाल्या आहेत- म्हंणजे गट पडल्यासारखे , हे पहा.."
नेमाडे साहेबांनी स्क्रीनकडे तर्जनी दाखवली..
ह्या लाल रंगाच्या लोकेशन्सचे एकून चार ग्रुप तैतार झाले आहेत - आणि चारही ग्रुप मध्ये तीन मेंबर्स आहेत..! आणी मला अस वाटतत फोर्स मेंबर्सनी गोल घेरा घालायला घेतला आहे !"
: " मला वाटत , आपल्या फोर्सला त्यांची लोकेशन समजलीये नेमाडे साहेब - ! आणी हा नक्कीच त्यांचा काहीतरी नवा प्लान असावा.."
माने साहेब तर्क लावत म्हंणाले.
" माने साहेब , राग येणार नसेल तर एक बोलू !"
" हो बोलाना, राग का येईल बर !"
" मला हा प्लान तुमच्या फोर्सचा वाटत नाही,
कारण तुमची फोर्स प्रथम चुकीच्या दिशेने जात होती..आणी मग अचानक फोर्सला , मार्ग समजल..आणी त्यांनी दिशा बदल्ली..आणि आता
तुम्ही सांगितलेला प्लान आणि हा प्लान हा खुपच वेगळा आहे..! ह्यावरून एकच कळत , की तुमच्या फोर्सला कोणीतरी मार्ग ही दाखवल आणि प्लान ही सांगितला.. !" नेमाडे साहेबांची बुद्धी खरच चतूर होती ! नाही का ?
" होय खर आहे तुमच ,आणि तो फोर्सला दिशा व प्लान सांगणारा माणुस - ईगलच असावा ! बरोबर?"
माने साहेबांचा हा तर्क अगदी बरोबर निशाण्यावर बसला होता.
" होय अगदी बरोबर!"
नेमाडे साहेब बोल्ले..
क्रमश ..
लवकरच कथा संपुष्टात येईल..