Ek Saitaani Ratra in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | एक सैतानी रात्र - भाग 23

The Author
Featured Books
Categories
Share

एक सैतानी रात्र - भाग 23


भाग 23



काहीवेळा पुर्वी :
"टींग,टोँग,टिंग,टोँग" बेल वाजण्याचा आवाज होत-होता . तोच आवाज गोडमारेच्या कानांवरही पडत होता. आजुबाजुला सहज नजर फिरवली तर पांढरट शबनम आपल्या सफेद साडीत फिरताना दिसत होती. भीतीने अंगाला बोचरी थंडी जाणवायला सुरवात झाली होती. पुढच्या पांढरट धुक्यात न जाणे काय हिडीस दडून बसल असेल? त्याच्या भुकेची गणना किती असेल? रक्तमांसासाठी हरवटलेल ते,त्याच्या उपस्थीपोटी बाहेर थांबण धोक्याच होत! ते जे काही धुक्याच्या वळयांत वावरत होत. ते आपल्याल एकट पाहून कधी केव्हा कस चाल करुन बाहेर येइल, सांगता येत नव्हत.
" दरवाजा उघडा माने सायेब ,दरवाज उघडा !" गोडमारेचा काफरा आवाज त्या अभद्र शांततेत गिळला जात होता. रातकीड्यांची किरकिर त्या आवाजापेक्षा मोठ्याने वाजत होती.गोडमारेचा आत्मा नरड्याजवळ आला होता! कोठून कसा घात होईल? काही सांगता येत नव्हत. विचारांच्या गर्तेला मुभा उरली नव्हती. त्या आनंत भयप्रद पोकळीत वेडेवाकड्या तुच्छ अमानविय ध्यानासारखे विचार डोक्यात पिंगा घालत होते. गोडमारेची विस्फारलेली नजर चौहीदिशेना वेड्यासारखी फिरत होती. बेलवरचा हात दाबला जात होता.
" टिंग,टोँग,टिंग,टोँग " आवाज घुमत होत. गोडमारेच्या मागे वीस पावलांवर तो गोल लाकडी टेबल होता आणि त्या टेबलापुढे खुर्चीत भालचंद्र मान खाली करुन झोपला होता. त्याच्या बाजुलाच साडे पाच फुट उंच, बलाढ्य देहाचा शैडो उर्फ गोडमारेचा मृत्यु येऊन ठेपला होता.
मागच्या धोक्यापासुन गोडमारे आलिप्त,अनभिज्ञ होता मागे काय उभ आहे ह्याची त्याला जराशीही भनक लागली नव्हती? . आपुले मरण
मागे येउन ठेपल आहे! आपली वेळ आली आहे! हे समजायला एकक्षणच काफी होता! होय एकक्षण! गोडमारेचा बेलवर ठेवलेला हात जागेवरच गारठला, त्याच्या मेंदूतल्या विघ्नलहरींची तार छेडली गेली-धोक्याची घंटा ठण-ठण वाजू लागली. मानवी देहातल्या विशीष्ट नसांनी उत्तेजितपणा धारण केला-गोडमारेच्या मनात विचार आला-मागे कोणीतरी उभ आहे? हा विचार येताच त्याचा वाकलेला मनका ताठरला , शरीर कस बर्फासारख राठ झाल, पुर्णत देहांत , रक्तभिसरण वेगाने होऊ लागल! घश्याला कोरड पडली. डोळे विस्फारले इतके की बाहेर यावेत. त्याच्या उजव्या कानाच्या पाकळीमागे उभा शैडो दिसत होता . त्याच्या हातांची हालचाल होतांना दिसत होती -त्याने पाठीवरचा धनुष्य काढून,त्यात टोकदार पातिचा बाण लवचिक दोरीला अडकवला होता. गोडमारेने तिरकसपणे मागे पाहायला सुरुवात केली! प्रथम त्याच उजव्या डोळ्यांतला बुभळ हलकेच मागे सरकत सरकत मागे जाऊ लागला-ती कृती करतांना त्याच्या ओठांसहित पुर्णत देह थरथरत होत.मागे उभ जे काही आहे त्याच्या हातून आता सुटका होणे हा विचारच मनाला टोचत होता. जे शक्य नाही त्यावर विचार करुन काय फायदा? शैडोने एका हाताने धनुष्य दुस -या हाताने बाण धरला होता! त्याचा एक डोळा बंद व दुसरा डोळा जांभळसर विखारी बुभळ,आणी त्यात पिवळसर ठिपका गोडमारेवर निशाणा धरुन बसला होता. गोडमारे जस मागे पाहील तस घात निश्चिंत, हेच शैडोच्या मनात होत.
गोडमारेच्या कानांवर मोठमोठ्याने श्वास घेतल्याचा आवाज येत होता.गोडमारेने भीतिपोटी एक आवंढा गिळला, त्याचे पाऊल एका रेषेत मागे वळु लागले. आणि एकदाचा तो गर्रकन मागे वळला, मागे वळताच समोर जे दिसल! त्याचे डोळेच विस्फारले, पोटात खड्डा आला.
व हळुच त्याच्या तोंडून सुटकेचा श्वास बाहेर पडला. कारण समोर धुक्या व्यतिरीक्त कोणिही नव्हत. तसा गोडमारेने पुन्हा दरवाज्याच्या दिशेने पाहिल ! पुढे पाहताच त्याच्या पुर्णत देहाला एक झटका बसला- तोंडातून एक हलकासा वेदनादायी उसासा बाहेर पडला. सुई-काटा टोचल्यासारखी सनकधारी वेदना त्याच्या चेह-यावर दिसुन येत होती-तसे त्याच हात हळकेच गळ्याभोवती गेला, काहीतरी होत तिथे विषारी डंखासारख काहीतरी निळसर टोचल होत.
" स्स आह्हऽऽऽ" गोडमारेने तो डंख उपटुन काढत डोळ्यांसमोर धरला -त्याच निरीक्षण करु लागला. करवंदाच्या झाडाला असलेल्या काट्यासारखा टोकदार तपकीरी डंख होता तो-पन त्या डंखाच्या पुढच्या टोकदार भागाला काहीतरी निळसर लागल होत-जणु पुढची टोक विशिष्ट प्रकारच्या बेशुद्धीकरणाच्या द्रवात बुडवली बुडवली होती !
" हे तर बेशुद्धीचऽऽऽ" गोडमारे पुढे बोलणार तोच त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली! डोक जड होऊ लागल, पुर्णत शरीर नियंत्रणा बाहेर जाऊ लागल, गुढघ्यांच्या वाट्या वाकल्या. व हलकेच तो मागे पडला-मागे शैडो उभा होता -त्याने त्याला तसंच पकडून हळके हळकेमागे ओढत नेहायला सुरुवात केली, धुक्यात नाहीसा झाला.
आणि तेवढ्यातच तो काचेचा दरवाजा उघडला गेला-दरवाज्यातून रिव्हॉलव्हर हातात धरलेले मानेसाहेब बाहेर आले होते.
कोणीच नाही! पन बेल तर वाजली होती ना ? की भास झाला होता? नाही नाही! भास नक्कीच नव्हता ! बेलचा आवाज तर सर्वांना ऐकला होता ? म्हंणजे नक्कीच बाहेर कोणीतरी असाव! " माने साहेबांनी हातात रिव्हॉलव्हर धरलेली , तर्जनी ट्रिगरवर ठेवली होती. समोरुन जर घातक अस काही अंगावर आलच , ते कोणीही असो ट्रिगर खेचला जाणार होता. मानेसाहेबांचे काळे बुट घातलेले पाऊल पुढे पडत होते तसे त्या स्मशान शांततेत मानेंच्या बुटांचा टॉक-टॉक मंद जीवघेणा आवाज आजुबाजुला घुमत होता.

×××××××××××××

" पियुष?" सुर्यांशने पियुषच्या खोलीत दरवाज्यात उभ राहूनच आवाज दिला. त्याच्या बाजुलाच सना उभी होती.
"सुर्यांश कुठे गेला असेल हा ?" सनाने सुर्यांशकडे पाहील. त्याच्याही चेह-यावर नकळत प्रश्णार्थक-काळजीपूर्वक भाव उमटले होते.
त्याने एकवेळ जागेवरुनच उजव्या दिशेला पाहिल. काचेच्या खिडकीचे पडदे बाजुला सारले होते - बाहेरच दृष्य दिसत होत,आकाशातला चंद्र,खालचा हाड गोठवणारा धुका.
" खिडकी तर बंद आहे! मग तो ही इथेच कुठेतरी असेल ! " सुर्यांशने सनाकडे पाहिल.
" तू ईथे बघ! मी वॉशरुम मध्ये पाहतो !" सनाने मान हलवली. सुर्यांश डाव्या बाजुला गेला. तर सना तिथेच पलंगाबाजुला असलेल्या कपाटाची दार खोलून आत पियुष आहे का ते पाहू लागली. पन कपाटात कपड्यां व्यतिरिक्त काही नव्हत. सुर्यांशने वॉशरुमच दरवाजा खोल्ला,एक कटाक्ष आत टाकला-कोणिही नव्हत. तस दरवाजा बंद करुन तो माघारी वळला.
" मिळाला पियुष?" सना .
" नाही !"
" मग कुठे गेला असेल हा?" सुर्यांश त्रासिक चेह-याने आजुबाजुला पाहत होता-तेवढ्यात त्याची नजर पलंगावर गेली.
" सना !"
" हं काय?"
" तू पलंगाखाली पाहिलंस?"
" नाही !" सना म्हंणाली. तसा सुर्यांश पलंगापाशी पोहचला,गुढघे वाकवून,एक हात पलंगावर ठेऊन ,कंबरही वाकवली ! तस पलंगाखाली चादर अंगावर घेऊन झोपलेला पियुष त्याला दिसला, त्याला पाहून सुर्यांशच्या चेह-यावर एक हास्य झळकल.
" आहे !" सना.
" हो इथे पलंगाखाली आहे!" सुर्यांशच्या वाक्यावर सना फ़क्त हसली .
सुर्यांशने हलकेच चादरीवर थोपटल व पियुषला आवाज देत जाग करु लागला.
" पियुष.! पियुष! अरे उठ ! इथे पलंगाखाली का झोपला आहेस ?"
सुर्यांशच्या वाक्यावर पियुषने हलकेच डोक्यावरची चादर खाली घेतली.
व काफ-या भयग्रस्त आवाजात म्हणाला.
" तो....तो... खाली भुत आहे ! माझ्याकडे पाहून हसलाय तो , त्याने मला पाहीलंन तो मला घेऊन जाईल !" पियुषच्या बोलण्याचा अर्थ सुर्यांशला लागत नव्हता." पियु..! हे बघ कोणिही नाही आहे बाहेर! तू घाबरु नकोस बर! मी आहे ना इथे !" सुर्यांश पियुषचा मोठा भाऊ होता. जेव्हा कधी लहानगा पियुष घाबरायचा तेव्हा सुर्यांश त्याला असंच समजुन घेत असे! आजही त्याने तेच केल होत. पन आजची भीती काही औरच होती. ज्या भीतीने पियुष थेट पलंगाखाली लपला होता.
सुर्यांशच्या वाक्याने पियुषला धीर आला, सुर्यांशच्या साहाय्याने पियुषला पलंगाखालून वर आणल गेल. गादीवर पियुष बसला होता. त्याच्या बजुलाच सना मायेने त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत होती.पुढे सुर्यांश उभा होता.
" काय झाल पियु? तू अस्ं पलंगाखाली का लपला होतास? " सुर्यांशच्या वाक्यावर पियुषने एकक्षण त्या काचेच्या खिडकीत पाहिल व बोलू लागला.
" मी इथे माझ्या खोलीत पलंगावर झोपले होतो, की अचानक मला मोठा ओरडण्याचा आवाज आला तसं मी जाग झालो !"अस म्हणतच पियुषने सर्वकाही जसच्या तस खिडकीतून पाहीलेल ते ध्यान ,जनाच झाडाला बांधलेल प्रेत सर्वकाही त्या दोघांनाही सांगितल. त्याच्या प्रत्येक वर्णनासरशी दोघेही त्या खिडकीकडे पाहत होते. त्या खिडकीकडे पाहतांना आता ह्याक्षणाला त्या दोघांनाही भीती वाटत होती. जो पर्यंत भीती अजाण असते, पुढील मुद्दाच घ्या , रोज आपण आपल्या घरात सामान्यत: पणे न घाबरता राहत असतो , घरात अनभिज्ञपणे वावरत असतो ! पण अचानकच एकेदिवशी त्याच घरात एक हिंस्त्र-घातकी अस सर्पाच प्रवेश होत, घरात एकेठिकाणी त्याच वास्तव्य,आपण पाहीलेल असत. कोण्यातरी अंधा-या फटीत ,किंवा बैडखाली त्याने बस्तान मांडलेल असत! तेव्हा त्याचक्षणाला त्या घरात आपल्याला त्या भागाची-जागेची भीती वाटू लागले- सततच एका भय दडपणाखाली आपण वावरत आहोत ही जाणिव होत असते. तसंच काहीस सुर्यांश -सना ह्या दोघांनाही झाल होत.
" त त त्या खिडकीतून पाहिलंस तू?" सनाने काफ-या आवाजात पियुषला विचारल. तस त्या चिमुकल्याने फ़क्त होकारार्थी मान हळवली.
" वेट ! मी पाहतो !" सुर्यांशने सनाकडे पाहील. मग दबक्या पावलांनीच तो खिडकीजवळ जाऊ लागला.
" सुर्यांश नको जाऊस ना तिकडे!" सना काळजीच्या सुरात म्हंणाला. पन सुर्यांशने ऐकल नाही.
" शुश्श्शऽऽ" सुर्यांशने तोंडावर तर्जनी ठेवली. पाच सहा पावलांत त्याने ती काचेची खिडकी गाठली. खिडकीतून एक कटाक्ष खाली टाकला.
बाहेर धुक हिंडत होत. जमिनीपासुन पाच फुटांपर्यंत धुक्याच्या भिंती उभारल्या होत्या. आजुबाजुला जणु कापूस पिंजला होता अस भासत होत. सुर्यांशची नजर त्या चिकूच्या झाडावर स्थिरावली होती! धुक्याने त्या झाडाला असकाही मीठीत घेतल होत की फ़क्त त्या चिकूच्या झाडाचं वरच भागच दिसत होत-
" सुर्यांश काहीही आहे का तिथे!" सनाने पियुषच्या खांद्यांवर हात ठेवत विचारल. सुर्यांशने एकक्षण मागे वळुन पाहिल! गंभीर चेह-यानेच त्याने नकारार्थी मान हलवली व म्हंणाला.
" नाही , काही दिसत नाहीये ! खूपच धुक आहे झाडाभोवती!"
सुर्यांशने अस म्हंणत! पुन्हा एकदा खिडकीच्या दिशेने मान वळवली. आणि त्याचवेळेस,खिडकीवर दोन पांढरेफट्ट प्रेताड वाढलेल्या काळसर नखांचे हात,त्या खिडकीवर "ठोक" आवाज करत आदळले.
त्या अचानक घडलेल्या भयक्रियेने सुर्यांश भीतीने मागे उडाला,
" सुर्यांश !" सनाचा आवाज.
" दादाऽऽ" पियुषचा आवाज .
सना दोघेही ओरडत सुर्यांशजवळ धावले. तेवढयात खोलीतली लाईटली गेली...

क्रमश :