भाग 21
" च्यामारी सायबांनी पार्टीला बोलवुन चांगलंच कामाला लावलं आपल्याला!" गोडमारे - आत्माराम सावंत दोघेही गार्डनमध्ये उभे होते.
समोर धुक्याच्या वळयांनी भयाण रुप धारण केल होत.हळु हळू आलेली थंडी मग आलेल बाष्प .
आता ह्याक्षणाला प पांढरट धुक्याच्या वळयांनी पुर्णत बंगल्याला गोल वेढा घातला होता, धुक्यात उभ राहून आजूबाजूला पाहता फ़क्त दहा पावलांवरच साफ दिसत होत बस्स! त्या दहा पावला पल्याड काहीही उभ असल तरी दिसण शक्य नव्हते.
" ह-या तु फ़क्त पार्टीत गचलायला आला होता ना मल्या ? माहिती आहे मला ! हळकट कुठचा " आत्माराम सावंत हरचंद गोडमारेंकडे पाहत बोलला. हे दोघेही लहानपणा पासूनचे लंगोटी यार, म्हंणुनच असे शब्द बोलन साहजिकच होत. आत्माराम यांच्या वाक्यावर हरचंद नेहमीप्रमाणे फ़क्त दात विचकत कसतरीच हसला.
" अर्रर लाज वाटु दे रे मेल्या ! काय निर्लज्जावाणी हसतुस !" आत्मारामने असं म्हंणतच खिशात हात घातला,व खिशातून एक गुलाबी रंगाच्या बिडीच पाकिट बाहेर काढल,
" मला पन !" हरचंद पटकन म्हंणाला. जस एक लहान मुलगा चौकलेट करीता हट्ट करती.
" पायजीच का ? " आत्मारामने प्रश्न विचारला होता पन उत्तर न देता गोडमारेंनी हातातूनच तो पाकिट हवरटल्यासारख घेतल. व एक बिडी तोंडात ठेऊन , दोन खिशात टाकल्या. आत्मारने फ़क्त नाही अशी मान डोलावली. " येड !" आत्माराम मनात उद्दारला. त्याने वरच्या खिशातुन
माचिस बाहेर काढली. ती खोलून आतून एक कांड़ा बाहेर काढला.
फस्स आवाज करत तो ओढुन तपकीरी, निळ्सर रंगाने पेटलेला कांड़ा
ओठात पकडून ठेवलेल्या बिडीला स्पर्शून ती शिलगावली.
" घे .!" त्याने माचिस द्यायला हात डाव्या बाजूला केला,पन माचिस गोडमारेनी काही घेतली नाही. तस आत्मारामने बाजुला पाहिल.
आता तिथे कोणीच नव्हत.
" अरे कुठ गेल हा?" आत्मारामने अस म्हंणतच जागेवरच एक गिरकी घेतली, नी त्याचक्षणाला मागुन धुक्याला बाजुला सारत दोन जाडसर काळे कुट्ट राक्षसी फुगीर बळदंड बाहूचे हात वेगाने आले , त्या हाताच्या बोटांवर काळसर धारधार पौलादासारखी नख होती, त्या दोन्ही हातांनी अलगद एका खेळण्यासारख आत्मारामला उचलून मागे धुक्यात खेचून घेतल,
पेंटची चैन लावत गोडमारे जागेवर आला, तसे त्याला समोर कोणीच दिसल नाही.
"आर तिच्या आईला असं कुठ असतं व्हय! बिडी दिली आण माचिस घेऊन गेला! " गोडमारे ने चौहीदिशेने नजर फिरवली पन धुक्याच्या वळयांनी भरलेल्या त्या खूनी जळस्यात त्याच्या व्यतिरिक्त कोणिही नव्हत. आणि जे होत ते दिसणार नव्हत !
" ह्याट्ट! " म्हंणत गोडमारेने नकळत स्व्त:शीच मान हलवली. की तेवढ्यात त्याच्या कानांवर कसलातरी कट,कट जस मनक्याचा हाड मोडाव तस आवाज आला. त्या आवाजाने गोडमारे जरासा सावध झाला, त्याचा हात लागलीच कमरेच्या दिशेने गेला, पन खाली कमरेत असलेल्या तपकीरी पाकिटात वॉकी टॉकी नव्हता.
" आर कुठ गेला वाकी टाकी!" गोडमारेने कमरेभोवती पाहील , त्याच्या कमरेला विलखा घातलेल्या तपकिरी पट्टयाला जोडून एक पाकिट दिसत होत-जिथे वॉकी टॉकी अडकवला होता.
" आईला पडल तर नाय ना?" गोडमारेने पुन्हा स्व्त:लाच प्रश्ण केला.
" आहाऽऽऽऽ" त्या पांढरट धुक्यांच्या वलयांतुन कोठूनतरी हलक्या स्वरात वेदनेने विव्हळणारा आवाज गोड़मारेच्या कानावर आला, तस त्याची पाऊले त्या धुक्यात जायला निघाली. जिथे मृत्युची टांगती तलवार दबा धरुन बसली होती, आणि हरचंद मंतरल्यासारखा स्व्त:चा मृत्युचा चाखायला स्व्त:हून निघाला होता.
××××××××××××××××
" काहीही बोल रावत पन गोडमारे एक नंबरचा भित्रा आहे? "
बळवंतरावांच्या बंगल्याच्या मुख्यद्वारापुढेच चौकोनी आकाराच ,काळ्या -चंदेरी मिश्रित फरशी बसवलेल अंगण होत , त्या अंगणात एक गोल सफेद टेबल त्यावर एक हिरवी काचेची बाटली ज्यात रेड वाईन होती, बाजुलाच दोन वाईन भरलेले ग्लास दिसत होते आणि टेबलाखाली असलेल्या दोन खुर्च्या दिसत होत्या, त्यातल्याच एका खुर्चीवर सब इन्स्पेक्टर भालचंद्र रावत आणि दुस-या खुर्चीवर सब इन्स्पेक्टर विजय इनामदार बसले होते.
आजुबाजुला सहज नजर फिरवली तर फ़क्त पांढरट धुक दिसत होत. दोघांनाही थंडी वाजत होती म्हंणूनच उब मिळावी ह्याकरीता त्यांनी एक रेड वाईन प्यायला घेतली होती.
" माहीतीये रे पन त्याच तरी काय चुकल !" रावतने दारुच ग्लास तोंड़ाला लावत एक घोट घेतला. विजय फ़क्त मान हलवत ऐकत होता. घोट घेऊन झालं तसे रावत पुढे बोलू लागले.
" पन बघ न इथे झालंय वेगळच! त्या भें×××त येड्यांनी अक्ख्या पार्टीची वाट लावली, सगळा मूड खराब केला. मन तर असं करतय " रावतने दोन बोट जोडून हवेत सरळ धरली. त्याच्या तोंड़ातुन बोलतावेळेस पांढरट वाफ बाहेर पडत होती.
" की एक एकाला गोळी घालावी!"
" हा ,हा घालून टाक तशीपन ऑर्डर भेटली आहे आपल्याला!" विजय इनामदार जरासा हसला व त्याने दारुच ग्लास उंचलून तोंडाला लावल.
××××××××××××××××××
जनार्दन उर्फ जना म्हंणजे शरीरयष्टीने अगदी काडी पैलवान होता पन ह्या काडी पैलवानाची ती साडेपाच फुट उंची कोणि पाहिली की समोरचा गुन्हेगार प्रथम घाबरत नसायचा , पन एकदा का जनार्दनचा हात पड़ला की मग मात्र समोरचाथोडासा हबकला जायचा , आणि ह्या काडीदेहात न जाणे असा कोणता एनटीडॉट भिनभिनत होता की जना नेहमी आघाडीवर असायचा, अद्यापही होता. त्या धुक्याच्या वलयात जना एकटा उभा होता, त्याच्या जोडीला कोणिही नव्हत ! नेहमीप्रमाणे आजही तो आघाडीवरच राहिला होता-आपण कुणालाच घाबरत नाही, आपण शुरवीर आहोत!बहादूर आहोत. भ्याड नाही आहोत आपण! त्याचा आघाडीवरचा गर्विष्टपणा ह्यावेळेस सुद्धा पुढे आला जात म्हंणुनच तर त्याला मिळालेला जोडीदार त्याने स्व्त:हानेच हातून गमावला होता -आणि आता ह्याक्षणाला, जनार्दन ताठमानेने त्या धुक्यात उभ राहून आजुबाजुला कडक पहारा देत होता. जनार्दन पासुन
वीसपावलांवर एक सुकलेल चिकूच झाड होत, त्या झाड़ाची साल्टी पांढरट पडली होती, वरच्या फांद्या वेड्या-वाकड्या जखीणीच्या नखांसारखे हवेत पसरल्या होत्या. आणि त्याच चिकुच्या एका फांदीवर रेंचो एका नागिणीसारखा चिकटून बसला होता, त्याच बारीकस ढब्बू पातळसर ,कुपोषित देह, ज्यातून छातीचा पिंजरा,बरगड्या,मनका साफ साफ दिसुन येत होत, शरीराची कातडी एका प्रेतासारखी राखटली गेली होती, पांढरफट्ट थोबाड आणि गोलसर डोक्यावरचे वाढलेले काळे केस पाठिवर चिकटले होते, बारीकश्या डोळ्यांतली,ती निळसर कचकड्याची बुभळे जनाच्या देहाची चव चाखत होते, त्याच्या ओठांवरुन फिरणारी ती लांबलचक काळसर जीभ जशी बाहेर यायची, तस त्याच्या आतल्या
कोरलेल्या निशाचारांसारख्या दातांची रेखाटणी दिसत होती.
××××××××××
" याच्या आईला ह्याच्या , बिडी दिली आण माचिस घेऊन गेल! " गोडमारे अजुनही ती बिडी तोंड़ात ठेऊन होता , आणि आत्मारामचा शोध घेत होता.
" ए आत्म्या? ए आत्म्याऽऽऽ????"
×××××××××××
" भालचंद तुला कसला आवाज आला का रे ! " सब इन्सपेक्टर विजयने तोंड़ाजवळ नेहलेला वाईनचा ग्लास मध्येच थांबवत भालचंद्रला विचारल.
" आवाज? नाही रे ? " भालचंद्रने ने अस म्हंणतच पुर्णत वाईनचा ग्लास तोंड़ात रिकामा केला. मग तोंड वाकड तिकड करत तो स्व्त:शीच हसला, आतापर्यंत त्याने सात-आठ पैग बिना पाण्यानेच घेतल्या होत्या म्हंणूनच नशेने त्याच्या मेंदूवर हक्क गाजवायला सुरुवात केली होती, ह
" अरे अस वाटल ! गोडमारे सावंतच नाव घेऊन ओरडला " विजय
" अरे विज्या, तुझा गलास खाली ठेव पाहू आधी.. तूला ना चढले वाटत!" भालचंद्रचा एकनी एक शब्द तोंड़ातुन जडपणे बाहेर पडत होता-कारण नशा खुद्द त्याला चढली होती आणि तोच विजयला प्रवचन देत होता.
" मला नशा चढलीये! " विजय एकदम भानावर होता. त्याने भालचंद्रला आपल्या हाताची दोन बोट दाखवली.
" हे किती रे ?" भालचंद्रने एक दोन वेळा डोळे मिचकावले ,त्याच्या नशे ने धूत्त झालेल्या डोळ्यांत ते दोन बोटे, व समोर बसलेला विजय सुद्धा डबल-डबल दिसत होते.
" अरे विजय..! तु मला सांगितल नाहीस, की तुला जुळा भौ सुद्धा आहे आणि तु त्याला इथ घेऊन पन आलायेस ! नमस्कार मी भालचंद रावत सब इन्सपेक्टर फॉर्म कालपाड़ा पोलिस स्टेशन " भालचंद्रने विजयच्या डाव्या बाजुला पाहत आपला एक हात हैंन्ड शैकसाठी वाढवला. जिथे विजयची एक फसवी आकृती भालचंद्रला दिसत होती,
" हा तिच्या आईला!" विजय ने कपाळावर हात मारुन घेतला,
" अरे विजय तुझ्या भावाला खुप चढलीये रे, बघ ना ! मी म्हंटल हात मिळव तर त्याने कपाळावर हात मारल." भालचंद्रची बडबड सुरु झाली होती आणि विजय मात्र आपल्या सर्वांकडे (कैमेरा एंगलकडे) पाहत होता व तो म्हंणाला.
" दारु खुप वाईट गोष्ट आहे! म्हंणुन ती कमीच प्या, नाहीतर तुम्हाला पन तुमच्या मित्राचा जुळा भाऊ दिसेल!"
(😁)
××××××××××××
" ए जग्याह्याऽऽऽऽऽऽऽ!" जनार्दन उर्फ जनाच्या कानांवर एक खसखसता आवाज आला. धुक्याच्या वलयांसमवेत तो आवाजही जणु तरंगत होता, त्या आवाजालाही एक भयाची किनार जोडली होती.
तो आवाज जनाने जस ऐकला , त्याच्या मानेवरचे केस ताठरले गेले.
कारण जनार्दनला सर्व मांणस जरी जना म्हंणून हाक मारत असले तरी एक जण असा होता-जो त्याला जग्या म्हंणुन हाक मारायचा.
" रेऽऽरेंचो!" जनाच्या तोंडून हळकासा पुटपुटता आवाज बाहेर पडला! डोळ्यांची बुभळे जराशी मोठी झाली जात पटकन त्याचा हात कमरेवर लावलेल्या वॉकी टॉकीवर गेला.
××××××××××××
आकाशात चंद्राचा ☪ अर्धा तुकड़ा उजळत होता.त्याचा चंदेरी प्रकाश खाली काळपाड़ा गावावर पडला होता. बळवंतरावांच्या बंगल्या मागे जिथे गार्डन होत,तिथे धुक्याच्या वलयांनी हा-हा म्हंणता बस्तान मांडल होत. गार्डनमधल्या गवताची लांबी जेमतेम पाच इंचाची होती,आणि त्यावर बाष्प साचलेल दिसत होत . करड्या हिरव्या रंगाच ते गवत जणु विष फासलेल्या विषारी काट्यांसारखे दिसत होते. की तेवढ्यात त्याच गवतावर एक काळ्या बुटाच पाऊल पडल , आणि चालत आलेला तो व्यक्ती पुढे निघुन गेला.
" ए आत्म्याऽऽऽऽ! आत्म्याऽऽऽऽऽ" गोडमारेच्या आवाजात आता भीती जाणवायला लागली होती, जस एका रोग्याला प्रथम सर्दी व्हावी,मग ताप यावा आणि शेवटला खोकला, तसंच काहीस गोडमारेच झाल होत,
ह्या पांढरट धुक्याची मखमखली चादर आता खाली खाली सरकायला सुरुवात झाली होती,आणि तीच क्रुर रुप, एक-एक जीवघेण मायाजाळ खेळायला तिने सुरुवात केली होती, सावज स्व्त:हून शिका-याच्या पिंज-याच्या दिशेने निघाला होता, आणि ह्याची जराशीही भनक ह्या पाचही सावजांना लागली नव्हती.
××××××××××××
विजय इनामदार खाडकन आपल्या खूर्चीवरुन उठला, त्याने पुन्हा एकदा गोडमारेचा आवाज ऐकला होता. त्याच्या मानवी मनातल्या चेतातंतुनी धोक्याची पुर्वसूचना त्याला केव्हाच दिली होती, पन तरीसुद्धा मन विश्वास ठेवत नव्हत ! किती अजीबा आहे नाही?. विजय इनामदार उभा होता त्याच्या समोरच भालचंद्र रावत , खुर्चीत पेंगत बसला होता, पुर्णत वाईनची बाटली पोटात जिरवुन नशेने त्याला आपल्या समवेत निद्राशय्येत नेहल होत.
" ए गोडमारे गप्प ना !" भालचंद हळकेच पुटपुटला , त्याचा तो आवाज
विजयच्या कानांनी बरोबर हेरला . जो ऐकून त्याच्या डोळ्यांच्या कड़ा जराश्या विस्फारल्या.
" म्हंणजे मला भास होत नाहीयेत ! इथे नक्कीच काहीतरी घडतय!"
विजय इनामदारने भालचंदला जाग करण्याच प्रयत्न केल, पन नशा पूरती मेंदत शिरली होती,
" हा तर उठणार नाही! मलाच काहीतरी कराव लागेल. " अस म्हंणत विजयने कमरेमागे हात नेहला , व मागून सर्व्हिस रिव्हॉलव्हर काढली,
एकवेळ मेगजीन चेक केली , सात गोळ्या जशास तश्या होत्या.
" भालचंद, भालचंद ! " विजयने पुन्हा भालचंदचे खांदे हळवले. तस त्याने हळकेच किलकिले करत डोळे उघडले.
" हे बघ इथेच थांब . मी आलोच! ओके ?"
" ओऽऽऽऽकें!" भालचंद नशेतच उद्दारला .तसा विजय लागलीच निघुन गेला, तसा तो जाताच इकडे भालचंदने पुन्हा डोळे बंद करुन मान खाली टाकली.
×××××××××××
" आत" गोडमारे पुन्हा मोठ्याने हाक देणार होता तोच त्याच्या कानांवर थंडहवेमार्फत वेगाने एक आवाज आला , ज्या आवाजाने ते पुढील शब्द तोंडातच राहीले.अस म्हंणतात थंडीच्या महिन्यात गारवा आवाजाला दुर नेहतो ,जस एक लाट प्रेताला. गोडमारे नीट लक्ष देऊन तो आवाज टिपण्याचा प्रयत्न करु लागला. हाड मोडल्याचा कट,कट, आणि हाड चावुन खालल्याचा कच,कच, तर कधी जिभल्या चाटल्याचा स्ल्प,स्ल्प आवाज होता तो ! पुढुनच धुक्यातुन कोठूनतरी येत होता. पन ठाव समजून येत नव्हत.गोडमारे हळूच चार पावले चालत पुढे आला, पुढे येताच त्याच काळ बुट घातलेल पाऊल कशावर तरी पडल , तस त्याने खाली पाहील, हिरव्यागार गवतावर काळ्या रंगाच वॉकी टॉकी मशीन पडल होत.गोडमारेने तो उचलून हाती घेतला.
" हा आत्मारामचा तर नसल ? म्हंजी तो इथच कुठ तरी असला पाहिजे .?" गोडमारेने स्व्त:लाच प्रश्ण केला , व पुढे पाहिल. समोर झाडझुडप होती आणि त्यापुढे तीस पावलांवर एक उतार होत , जे उतरल की जंगलाची हद सुरु होत होती,जिथे काहीवेळापुर्वी काशीनाथच्या प्रेताचा फडशा पाडला गेला होता. आणि पुढील धोक्यापासुन अजाण असलेला गोडमारे ही तिकडेच निघाला होता.
स्व्त:हून मृत्युच्या मुखात अडकायला .
×××××××××××××××××
" ए जग्या...ह्या " जनार्दनच्या कानांवर पुन्हा तो आवाज आला त्या आवाजाने त्याच्या कमरेच्या दिशेने गेलेला हात जागीच गारठला.
" म्ह,म्ह,म्ही,म्ही,हिह्ही! खव,खव,खव!" विचित्र भयाण हास्य पुढील धुक्याच्या वळयांतुन आल.नेहमी आघाडीवर राहणा-या जनाच्या काळजाचा ठाव आता भीतीने घ्यायला सुरुवात केली, त्याचा आघाडीपणा त्याच्याच जिवाववर बेतला होता. समोर च्या धुक्यात न जाणे काय घातक उपद्रव फिरत असणार ? आणि ते कोठून कस घात करेल ,कल्पना अतर्कनीय होती.
विचारचक्रांची मती जणु ह्याक्षणाला बंद पडली होती, जस नदीतल्या वरच्या भागावर स्वच्छ पाणी असत,तोच स्वच्छ पाणि म्हंणजेच ,विश्वास,,निडरपणा, हिम्मत, होती. पन जस भयाचा वादळ आसमनांत धडकत , वारा ,विजा कोसळण, आणि शेवटला आंतिम क्षणाला येतो तो पुर , ज्या पुराने तो स्वच्छ सूजळ पाणि खाली दडलेल्या ,बुडाला लपलेल्या मातीला वर आणतो , आणि मग सर्वपाणी अशुद्ध होत तसंच अगदी तसंच जनार्दन समवेत घडत होत , त्याच्या मनाच्या संदीकोप-यात बुडाच्या खोल तळाशी लपलेली भीती आता वर-वर यायला सुरुवात झाली होती.
" ए झग्याऽऽऽऽह्या! ह्यांव,ह्यांव,ह्यांव,ह्यांव,ह्यांव...हीहिहिही! मी येऊ का रे ? याव,याव,याव !" खर्जातला किन्नरी आवाज, जनाच्या काळजाला पिन टोचाव तस टोचला.
" क..क..कोण आहे? " जना एकदमच ओरडला , पन त्या आवाजातली भीती कशी लपेल?जनार्दनच्या पावलांनी नकळत पुढे पड़ायला सुरुवात केली. जनाच्या नाकातून श्वासावाटे बाष्प सफेद वाफ बाहेर पडत होती.
दहा -पंधरा पावल चालून तो त्या चिकूच्या झाड़ाजवळ आला.
तेव्हा त्याला आठवल, वॉकी-टॉकीवरुन ही माहीती साहेबांना कळवायला हवी.त्याने कमरेला असलेल्या पट्टयातुन वॉकी-टॉकी बाहेर काढल.
××××××××××××××××
समोर असलेल्या उतारावरुन गोडमारे हळकेच उतरला होता- त्याने जंगलात प्रवेश मिळवल होत! आजुबाजुला कुठेही वस्ती दिसत नव्हती फक्त झाडांची सेना तिथे उभी होती, पन ती झाडही त्या दोन हरामखोरांची चेले होते, त्या प्रत्येक झाड़ाने स्व्त:मागे एक गुढ लपवून ठेवलं होतं.
गोडमारेने एका झाड़ाच्या खोडाला हात लावुन हळकेच लपून पुढे पाहील. तसे त्याचे डोळे विस्फारले त्याने ओरडण्यासाठी तोंड उघडल एक मोठी किंकाळी त्याच्या तोंडून निघणार
" आम्म,आम्म्म !" गोडमारेच तोंड कोणीतरी दाबुन धरल .
" शुश्शऽऽऽऽऽ! गोडमारे गप्प बैस्स! मी आहे विजय ओरडलास तर दोघेही मरु !" विजय झाड़ाच्या खोडामागुन डोक थोडस बाहेर काढून पुढे पाहत होता, त्याच्या चेह-यावर तांबडसर प्रकाश पडला जात पुढील दृष्य दिसत होत. समोर एक दगड -धोंडे रचुन शेकोटी पेटवली होती, आणि त्या शेकोटीच्य आगीवर जशी तंदुरी एका स्टीलच्या सलईवर गोल गोल फिरवत भाजावी तसंच एका मोठ रॉड दिसत होत,आणी त्या रॉडवर तंदुरीसारख आत्मारामच प्रेत गोल गोल भाजत ठेवल होत,( त्या प्रेताच्या तोंड़ात रॉड घुसवुन तोच रॉड त्याच्या गुxxxन बाहेर काढला होता. डोक्यावरचे केस हातानेच उपटून काढले होते, शरीरावरचे कपडे काढून पुर्णत नग्ण होत ते प्रेत , आणि पुर्णत अंगावर तेल,मसाला-हळद लिंबु चोळून ठेवल होत , आणि त्याच प्रेताचा तो मांस भाजल्याचा,खमंग अभद्र वास आजुबाजुला पसरला होता. जो ह्या दोघांनाही असहनीय झाला होता.
" काय आहे हे साहेब ? "
" सैतान आहेत साले रां×××चे ! मांणसानाच खातायेत! मी तर फ़क्त ऐकून होतो पन आज तर पाहिल सुद्धा !" सब इन्स्पेक्टर विजय खेकसत म्हंटले.
" मला तर बघवत नाही बघा साहेब हे ! मी जातो."
" शुश्श्श्स , गप गोडमारे! हा इथे एकटच दिसतोय म्हंणजे , दुसरा बेडूक सुद्धा इथेच कुठेतरी असेल? आणि तु एकटा आहेस हे समजुन तो तुला , अलगद संपवेल !"
" म आता ? "
" गपचूप माझ्या बरोबर रहा ! माझ्याकडे बंदूक आहे, ह्याच काटा काढुन निघुयात आपण!" विजयने अस म्हंणतच कमरेमागुन आपली रिव्हॉलव्हर बाहेर काढली. आणि कच,कच आवाज करत रिव्हॉलव्हर रिलोड केली.
क्रमश