सीजन 2. भाग 8
एकूण कथा मालिकेचा भाग 19
कोण आहे रेंचो x शैडो 2!
" बाबा ! " सुर्यांशच्या वाक्यावर दरवाज्यात उभे , बळवंतराव, त्यांच्या मागे उभे मानेसाहेब दोघेही चालत आत आले. बैडवर सनाही उठून बसली होती, तिच्याबाजुलाच अमृताबाई बसल्या होत्या, ज्या आता उभ्या राहिल्या. त्यांच्या उजव्या बाजुला सुजाताबाई आणि त्यांच्या जवळच सुर्यांश उभा होता. बैडपासुन पुढे एक दोन झापांच लाकडी चौकलेटी साडे पाच फुट उंच कपाट होत.कपाटा बाजुलाच आरश्याच टेबल होत-समोर बैठी लाकडी खुर्ची होती. दरवाज्याच्या बाजुलाच जिथे माने साहेब उभे होते,तिथे एक उभट तीन फुट टेबल होता-ज्यावर एक काचेची फुलदाणी होती. खोलीत भिंतींवर चारही दिशेंना एक एक गोल एलईडी दिवा जळताना दिसत होता.ज्याचा पांढरसर प्रकाश पुर्णत खोली उजळून टाकत होता.
" कोण आहे हा शैडो X रेंचो?" सुर्यांश पुन्हा उद्दारला. त्याच्या वाक्यावर बळवंतरावांनी एक मोठा श्वास घेत तोच सोडत बोलायला सुरुवात केली.
" सुर्यांश माझ्या वडिलांनी दोन लग्न केले होते. प्रथम पत्नी लता बळवंतें ज्यांना, एकाच बाळंतपणात दोन मुल झाली होती. एक रमाकांत उर्फ रेंचो दुसरा शैलेंद्र उर्फ शैडो, ह्या दोन मुलांना जन्म देऊन लताबाईंची प्राणज्योत मालवली , म्हंणुनच माझ्या वडीलांनी दुसर लग्न केल.दुस-या पत्नीच नाव होत , सूनंदाबाई .
माझ्या वडीलांकडून सुनंदाबाईंना लग्नाच्या दोन वर्षांनंतर दिवस गेले,त्यांनी एका मुलाला जन्म दिला, तो म्हंणजेच मी.कृष्णा बळवंते. वर्षांवर वर्ष सरत गेले, माझ्या आईने रेंचोX शैडो ही सवतीची मुल असुनही त्यांना सक्ख्या आईसारखी माया लावली होती. कधीही आम्हा तिन्ही भावंडांना तिने चुलत हा शब्द लागू होऊ दिला नव्हता.मला आठवतंय " बळवंतराव जरासे काहीक्षण थांबले होते. तेवढ्यात त्यांचे डोळे कसे विस्फारले गेलेले, तोंड़ाचा कस आ-वासला होता. जणु त्या आठवणींना उकरता उकरता मनावर तिचे भयाण पडसाद उमटत होते.
एके बाजुला राग उफालून येत होता तर एके बाजुला भय.
" मला आठवतय मी पंधरा वर्षाचा होतो, नुकतंच आठवीत गेलो होतो.
र्तेव्हा रेंचो आणि शैडो दहावीत होते. माझ्यापेक्षा जरा जास्तच हुशार होते ते. त्यादिवशी दहावीच्या मुलांची शाळा लवकरच सुटली होती. मग आमचीही शाळा दोन तासांनी सोडली गेली.शाळेतुन घरी यायला जेमतेम अर्ध्यातासाच जंगल लागत होत. डावी उजवीकडे घनदाट हिरवीझाडे उभी होती., आणि मधोमधुन काळा डांबरी रस्ता.
त्या रस्त्यावरुन त्या दिवशी दुपारी साडेतीनच्या सुमारास मी एकटाच घरी निघालो होतो. मी एकटाच होतो ह्याच अर्थ मला भीती वगेरे वाटावी असं काहीच नव्हत, कारण वाट ओळखीची होती. दर दहा मिनिटांणी
एक ना एक गाडी जाताना दिसत असायची. पन आज न जणे का एक ही गाडी जातांना दिसत नव्हती.आकाशात काळे ढग भरून आले होते, पावसाळा नुकताच सुरु व्हायला आला होता.साडे तीनच्या सुमारासच चांगली संध्याकाळ भासत होती, वातावरणात चांगलच गारवा भरायला लागला होता.मी जोरजोरात पावले टाकत जात होतो, की इतक्यात एका पुरूषाची किंकाळी माझ्या कानांवर ऐकू आली.
" आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" कोणितरी मदतीच्या उद्देशाने ओरडल होत-पन लागलीच त्याच तोंड बंद कराव तस तो आवाज थांबला होता.आवाज ऐकून माझी पावले जागेवर थांबली, मी काहीक्षण थांबुन आवाजाचा कानोसा घेऊ लागलो. पन पुन्हा तो आवाज-आवाज काही केल्या मला ऐकु आला.मला वाटलं माझे कान वाजले असावे." अमृताबाई-सुजाताबाई बैडवर उठून बसलेली सना,सुर्यांश सर्वजन श्वास रोखून सर्वकाही ऐकत होते.खोलीत शांतता पसरली होती-फ़क्त बळवंत रावांचा आवाज ऐकू येत होता.
" मी पुन्हा परतीचा प्रवास सुरु केला, पाच पावले उचलली की पुन्हा एकदा आवाज आला" " वाचवाऽऽऽऽऽ" बळवंतरावांनी विस्फारलेली नजर सर्वांवर टाकली, तसा तिथे उपस्थीत सर्वांच्या अंगावर सर्रकन ठणकाधारी काटा उभा राहीला .
" हा आवाज एका स्त्रीचा होता,मला खात्री पटली की कोणितरी आहे ज्याला मदतीची गरज आहे! आवाजाचा कानोसा घेऊन मी उजव्या दिशेला जंगलात घुसलो, तब्बल वीस मिनीटे चालून मी जंगलाच्या खुप आत आलो होतो, आजुबाजुला पाहिलं तर खालची तपकीरी माती, आणि मोठ मोठाली झाडे दिसत होती , दुर दुर पर्यंत पसरलेली झाडे. शेवटी अजुन काहिवेळ चालुन झाल्यावरच मला समोर काहीतरी दिसलं. झाडावरच घर,एक ट्री हाऊस! चार पाच जाड झाडांच मिळण झालेल्या त्या झाड़ावर लाकडांना खिळे मारुन एक मोठ असं ट्री-हाऊस दिसत होत. झाड़ावर जेमतेम बारा फुटांवर होत ते ट्री हाऊस. त्या ट्री-हाऊसला काहिश्या हिरव्या वेलींनी झाकल होत, ज्याने दुरुन कोणालाही ते दिसण अशक्य होत.
" मादरXXX, रांXX साली!" एक गलिच्छ शब्दांच उच्चार माझ्या कानांवर ऐकू आला. पन त्या शब्दांना जो सुर होता-तो आवाज होता?तो आवाज मला ओळखीचा वाटला.
" शैडो ?" हो तो आवाज शैडोचा होता. काहिदिवसांपासुन जेमतेम दोन आठवडे झाले असावे. आई बाबांना सांगत होती की रेंचो आणि शैडो दोघेही शाळेतुन लेट येतात.मी ते बोलण चोरुन ऐकल होत आणि मला त्याच उत्तर ही सापडल होत-रेंचो आणि शैडो दोघेही ह्या ट्री हाऊस वर येत अशणार, पन त्या ट्री हाऊसमध्ये आहे तरी काय?आणि ही दोघ तिथे एवढ उशिर करतात तरी काय? आणि त्या दोघांनी ही गोष्ट माझ्या पासून लपवून का ठेवली होती ? माझ्या मनात घालमेल सुरु झाली ! शेवटी माझ्या बाळमनातली उत्सुकता ताणली गेली होती, मला ते ट्री हाऊस पाहायचं होत. आत झोका असेल का? नवनवीन खेळणी असतील का? हे दोघे मला खूश करण्यासाठी काही बनवत तर नसतील ना? तसंही माझ बर्थडे काही दिवसांवरच तर आहे ! पन मी तेवढे दिवस थांबणार नव्हतो. माझ खांद्यावरच चौरस आकाराच दफ्तर काढून मी जमिनिवर ठेवल, आणि ट्री-हाऊसवर जायला निघालो , वर जाण्यासाठी वाकड्या तिकड्या झाड़ाच्या शेंड्या होत्या.त्यांवरशी चालत -चालत मी ट्री-हाऊसवर पोहचलो.तस माझ्या कानांवर एका स्त्रीचा विव्हळणारा आवाज ऐकू आला.
" आहा..आई गऽऽऽऽऽ" मी ट्री हाऊसवर पोहचलो होतो, ट्री हाऊस आत जाण्यासाठी मधोमध एक दरवाजा होता , . झाड़ाच्या काठ्यांपासुनच बनवलेला तो बंद दिसत होता. दोन्ही बाजुला दोन खिडक्या होत्या. त्याही लाकडांनी बंद केल्या होत्या. पन मी उभा असलेल्या खिडकीला एक छोठस होल पडल होत. त्या होलातुन मी आत काही दिसत का हे पाहण्यासाठी मी एक डोळा बंद करुन दुसरा त्या होलावर ठेवला.आणि आतल काही दिसत का ते पाहू लागलो.आणि मला जे दिसल." वर्तमानकाळात : बळवंतरावांनी हळूच एक आवंढा गिळला आणि पुढे बोलु लागले.
"सर्वप्रथम माझ्या नजरेस त्या ट्री हाऊसमध्ये लावलेला तो शुभ्र पांढरसर रंगाचा दिवा दिसला , मग आजुबाजुच दृष्य दिसल, तिथे एकून तीन टेबल होते. एकावर एक पेटलेला स्टो ठेवलेला दिसत होता ,त्यावर एक गोलसर चपटा तवा ठेवला होता, स्टो बाजुलाच एक धार धार पातिचा सुरा दिसत होता.
मी माझी नजर दुस-या दृष्यावर वळवली. दोन पाठमो-या आकृत्या दिसत होत्या , दोघांच्या अंगावर माझ्यासारखेच कपडे होते. एक सफेद हाफ शर्ट, पायांत फुल निळी शिवलेली पेंट, आणि त्यांच्या कमरेभोवती काहीतरी गुंड़ाळलेल होत. किचनमध्ये काम करतावेळेस शेफ घालतात तसा कपड़ा होता तो.त्या दोघांच्या आकृत्यांवरुन मी त्यांना ओळखल होत-ते दोघे रेंचो आणि शैडो होते. रेंचो शरीराने जरासा काटकुळा आणि लहान होता, त्याच्या हालचाली ,वागण बोलन, एका मुलीसारख्या होत्या, पन आवाज मात्र पुरूषी होता. तर शैडो अगदी जाडजुड, उंच शरीर शरीरयष्टी जो कोणी त्याला पाहिल तो जागीज गार व्हायचा, शैडोचा आवाज भारदस्त होता-तस तो कमीच बोलायचा. मी आत जाणार होतो ते दोघे काय करत आहेत हे मला पाहायचं होत.त्या दोघांनी माझ्यापासुन ही जागा का लपवून ठेवली होती ह्याच जाब मला त्यांना विचारायच्ं होत. तशी मी माझी पावल तिथून हळवणार होतो की तेवढ्यात ,
" खट्ट " असा आवाज झाला. काहीतरी खांडल्यासारख .मी हा आवाज ऐकला होता! आई बरोबर दर वेळेस चिकनच्या दुकानात गेल्यावर
जेव्हा तो मुसलमान काका कोंबडीचे पिस करत त्या मांसावर घाव घालयचा तेव्हा असंच आवाज यायचा.म्हंणजे हे दोघे इथे चिकण तर कापत नाहीत ना? मी जागीच थांबलो ! तसा शैडोची भारभक्कम देहाची हालचाल झाली , आणि जस तो बाजुला झाला मला दिसल,"
बळवंतरावांच्या छातीवर फुगवटा येऊ लागला, कपाळावर घामाचे द्रव बिंदू जमा झाले, ओठ सुखले होते. बळवंतरावांच शारिरीक तोळ ढासळल ते जमिनीवर पडणार होते, तोच योग्यवेळी सुर्यांशने त्यांना आधार देत बैडवर बसवल, ग्लासातुन पाणि पाजल, ग्लास बाजुला ठेऊन दिला सर्वजन ते पुढे काय बोलणार ते ऐकण्यासाठी उत्सुक झाले होते.
" शैडो जस बाजुला झाला तसे मला त्या टेबलावर !" बळवंतरावांच्या डोळ्यांतुन नकळत अश्रु बाहेर आले , माने साहेबांनी त्यांच्या खांद्यांवर हात ठेवुन त्यांना धीर दिला.
" त्या टेबलावर एका बिनधड़ाच्या स्त्रीच प्रेत झोपत्या अव्स्थेत पहुड़लेल होत. नुकतच तिच्या छाटलेल्या मुंडीखालच्या गळ्यातुन जाडसर रक्त बाहेर पडुन पुर्णत टेबल लाल रक्ताने माखला होता. त्या प्रेतावरची ती चौकलेटी साडी, गळ्यातलं मंगळसूत्र, हातातल्या बांगड्या, सर्वकाही माझ्या ओळखीच होत ना ! ज्या हातांनी मला लहानपणी घास भरवले, ज्या हातांनी मायेन थोपटल , त्या हातांना मी कस विसरेल .
" आईऽऽऽ!" पंधरा वर्षाच्या कृष्णाच्या तोंडून रडवेला सुर बाहेर पडला.
" अरे हरामखोरांनो , सैतानी औलाद साले ! " माझ्यासाठी हा दुसरा धक्का होता. आलेला आवाज हा बाबांचा होता.
" दया माया नाही का तुम्हाला हरामखोर ! स्व्त:च्या मातेला मारल तूम्ही चांड़ाळानो!" रेंचो टेबलापासुन बाजुला झाला तस मला दिसल की दुस-या टेबलावर बाबांच्या हातापायांना बांधुन त्यांना झोपवुन ठेवल आहे."
" कोणती आई?कुठली आई ? आमची आई तर लहापनीच मेली ना !
ही रांXX आमची आई नव्हती!" रेंचो त्याच्या किन्नरी बायल्या स्वरात बाबांवर खेकसला.
" अरे पोरांनो , असं का बोलताय तूम्ही ! अरे तुम्हाला हे पाप करुन मिळत तरी काय ! हा?"
" काय मिळत पाहायचं तुला!" रेंचोने शैडोकडे पाहिल, त्याची साडे पाच फुट पाठमोरी आकृती त्या पेटत्या स्टोव्हवर ठेवलेल्या तव्यावर काहीतरी भाजत, काहीतरी पोळवत होती, त्याचा खमंग असा वास सुटला होता.
माझ्या नाकांवर तो वास येत होता. मला भुक लागली होती, आज आईने डबा दिला नव्हता.
" ए शैडो अरे आण ना रे! भुक लागली आहे मला !" रेंचो त्या किन्नरी स्वरात अगदी प्रेमाने उच्चारला.तसा शैडोने तो स्टोव्हवर ठेवलेला तो चप्टा तवा उचलला, आणि तोच घेऊन बाबांच्या टेबलाजवळ आला.तस त्या तवयात काय होत ते दिसल , त्या गोलसर चपट्या तव्यावर माझ्या आईच भाजलेल शिर होत , जो शैडो इतकवेळ भाजत होता, चेह-यावरची गोरीपान त्वचा काळसर चट्टे पडले जात काळसर झाली होती, डोळ्यांतल्या खोबण्यांतळे बुभळ रिकामे होते, केस छाटुन मुंडण केल होत, आणि टाळूवर एक होल पाडुन त्यातुन मेंदू बाहेर काढला होता, ज्या मानवी मेंदूला शैडो इतकवेळ पोळवत,त्यावर मसाले घालत होता ज्याचा खमंग वास सुटला होता, तो ह्या असल्या पदार्थाचा. हे बर झाल की आज आईने डब्बा दिला नव्हता, नाहीतर मला उलटी झाली असती .
" व्या ,व्याऽऽऽऽ!" आतुन आवाज आला बाबांना वांती झाली होती,
डोळ्यांतुन अश्रु गाळत होते ते , स्व्त:च्याच नशीबाला दोष देत होते ते.
" चो,चो,चो! अहो बाबा , तूम्ही आमचा पाठलाग करत आलात , हेच चुकल तुमच !" रेंचो बोलत होता.
" बाबा म्हंणु नका मला सैतानांनो ! चांड़ाळाची औलाद आहात तूम्ही!
तो देव सुद्धा तुम्हाला ,तुमच्या ह्या कृत्याला कधीच माफ करणार नाही.थू,थू..!" बाबा त्या दोघांच्या तोंड़ावर थुंकले .ज्याचा राग मनात धरुन रेंचोने बाबांच्या दोन्ही हातांच्या पंज्यांची बोट मोडुन उपटून काढली. आणि त्यांचही डोक धड़ा वेगळ केल. माझ्या पायाखालची जमीन सरकली होती, छातीत धडधड वाढत होती. मी कसतरी त्या ट्री हाऊसवरुन खाली आलो, आणि काट्या कूट्यातुन पळत थेट, पोलिस स्टेशन गाठल, कारण आई-बाबांशिवाय माझ कोणि आता उरल असेल तर ते म्हंणजे माझ्या आईचे वडिल विश्वनाथ मोरे म्हंणजेच माझे आजोबा, जे काळपाड़ा पोलिस स्टेशन मधले सिनीयर इंन्स्पेक्टर होते.
मी माझ्या आजोबांना सर्वकाही जसच्या तसं सांगितलं आणि मग लागलीच त्यांनी एक्शन घेतली, अवघ्या दिड तासात
रेंचो X शैडो ला पकडल गेल. वीस वर्षाच्या तरुन मुलांनी , खेळ मस्ती करण्याच्या वयात असं काही पराक्रम केल होतं , की पोलिस सुद्धा ते हत्याकांड पाहून मुळाच्या देठापासुन हादरले होते. त्या दोघांनाही वय कमी असल्यामुळे सरकारने बालसुधारगृहात ठेवल होत- का तर ह्या दोघांच्यात बदल व्हावा , पन झाल वेगळच तिथे सुद्धा ह्या दोघांनी एके रात्री चार मुलांच निघृण खून केल, त्यांच्या प्रेतांवरच्या पोट-या फाडुन,हाता पायांवरच मांस काढून कच्च खावुन टाकल होत, ह्या दोघांनी. शेवटी ह्या दोघांना मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती केल गेल, तिथे त्यांना शॉक दिल्या गेल्या, डॉक्टरांना वाटल की शॉक दिल्याने ह्या दोघांतही फरक जाणवेळ,पन ही आशा सफशेल चुकीची होती. उलट शॉकचा ह्या दोघांवर पॉजिटीव्ह परिणाम होण्या ऐवजी-भयाण परिणाम झाला. शॉक दिल्या गेलेल्या दिवसानंतर ह्या दोघांची पर्सन्लीटी बदलली,
रात्री -अपरात्रीच्या समारास ह्या दोघांच्या खोलीतुन विचित्र हसण्याचे आवाज यायचे, लहाण मुलासारखे हे दोघे रड़ायचे,तर कधी एका सैतानासारखे हसत -रड़ायचे- आणि मोठ मोठ्याने ओरडून एकच वाक्य म्हंनायचे." बळवंतरावांनी एक कटाक्ष सर्वांवर टाकला अमृताबाई-सुजाताबाई सुर्यांश-सना सर्वांच्याचेह-यावर भीती चिकटली होती.
" काय, काय म्हंणायचे ते?" सनाचा थरथरता आवाज,पन त्या आवाजात उत्सुकता होती. बळवंतरावांनी हळकेच एक आवंढा गिळला व म्हंणाले.
" सुड...बळवंते ..सुड!" बळवंतरावांच्या मुखातुन निघालेल्या वाक्याने
सुर्यांशच्य चेह-यावर ब्लैक स्क्रीन येत एक विज कड़ाडली धड़ाड धम्म, एक मोठा धक्का बसला त्याला हे ऐकून !
" पन बाबा , तूम्ही तर काहीच केल नाहीत ना ! मग " सुर्यांश पुढे बोलणार तोच मध्ये बळवंतराव उच्चारले.
" हो बेटा .मी काहीच केल नव्हत, पन त्या दोघांच्या नजरेत मात्र गुन्हा केला होता !"
" म्हंणजे !" सुर्यांश न समजुन म्हंटला.
"म्हंणजेच मी त्या दोघांच सत्य जगा समोर आणल होत ना ! त्या दिवशी जंगलात त्या ट्री हाऊसखाली मी माझी बैग ठेवली होती, त्या बैगमुळेच त्यांना हे कळल होत-की मीच पोलिसांना त्या दोघांची माहीती दिली असणार!"
" ओह !" सुर्यांश हलकेच पुटपुटला.
" पन त्यांना काय हव आहे! ते तुमच्या मागे का लागले आहेत!"
सनाने बळवंतरावांकडे पाहिल. तस बळवंतरावांनी एक मोठा श्वास घेऊन हळकेच सोडत उद्दारले.
" त्यांचा सुड त्यांना पुर्ण करायचं! जो की माझा जिव घेऊन तो पुर्ण होणार आहे !"
" काय !" सुर्यांशचा स्वर जरासा उंचावला होता. अस म्हंणतच तो तीन पावल चालत त्याच्या वडीलांजवल आला. व धारधार नजरेने त्याच्या वडिलांकडे पाहत बोलला.
" नाही बाबा .जो पर्यंत मी आहे, तो पर्यंत कोणिही तुमच्या केसालाही
धक्का लावु शकत नाही. " सुर्यांशच्या त्या वाक्यात आत्मविश्वास भरला होता! ते नुस्त वाक्य ऐकुनच बळवंतरावांची छाती गर्वाने फुगून वर आली, डोळ्यांत अश्रु जमा झाले , बळवंतरावांनी आपल्या दोन्ही हातांनी सुर्यांशचे खांदे पकडले व माने साहेबांकडे पाहत म्हंणाले.
" पाहिलस माने, माझा मुलगा आहे हा !" तस मानेसाहेबांनी फ़क्त मंद स्मित केल.
×××××××××××××
हरचंद व आत्माराम दोघेही बंगल्याच्या मागच्या बाजूची राखण करत होते. तर इन्स्पेक्टर भालचंद्र रावत आणि विजय इनामदार बंगल्याच्या मुख्यादारापाशी दोन खुर्च्यांत बसले होते. तर जनार्दन उर्फ जना एकटाच बंगल्याची मागच्या डाव्या बाजुला उभा होता. त्याच्या समोरच एक सुकलेल लाकडी पांढरट साल्टीच चिकुच झाड होता. आणि त्या चिकूवर एक ध्यान बसल होत.
क्रमश :
.