S 2 ep 7
भाग 18
भाग 7
बळवंतरावांच्या बंगल्यात दुस-या मजल्यावर सुर्यांशच्या खोलीपुढेच एक खोली दिसत होती, ती म्हंणजे पियुषची.म्हंणजेच बळवंतेरावांच्या दुस-या मुलाची. आप्ल्या लहानग्या मित्रांसमवेत हेलॉवीन एन्जॉय करुन
लहानगा पियुष आपल्या खोलीतल्या बैडवर गाढ झोपला होता. त्याच्या बैडबाजुलाच एक टेबल तीन फुट टेबल होत त्यावर एक सातरंगी बल्ब, टिंग,टिंग, असा आवाज करत जळत होता,त्या बल्बचा सातरंगी लाल,हिरवा,पिवळा,गुलाबी,निळा,तपकीरी,आकाशी प्रकाश दर दोन सेकंदानी बदलला जात पुर्णत खोलीत भेसूरपणे त्या अभद्र आवाजासहीत पसरला होता. खोलीत भिंतीवर काही कागदी मार्वल सुपरहीरोजचे पोस्टर्स चिकटवलेले , स्पाईडरमैन,बैटमेन, आर्यमैन, ब्लैकपेंथर त्या सर्वांवर तो प्रकाश पडत होता , आणि त्या प्रकाशात ते निर्जीव बाहूले भयाण बिभत्स रुप धारण करत होते.
××××××××××
" सना आर यु ओके ना !" बळवंतराव आणि सुजाता बाईंच्या खोलीतल्या बैडवर सनाला झोपवल होत. तिच्या जवळ अमृताबाई बसल्या होत्या. आणि त्यांच्या बाजुलाच सुजाताबाई उभ्या होत्या.
" हो मी ठिक आहे !" सनाच्या वाक्यावर , खोलीतल्या उघड्या दरवाज्यातुन सुर्यांश आत आला. त्याला येताना पाहून सर्वांच्या नजरा त्याच्यावर स्थिरावल्या.
"सना तु ठिक आहेस !" सुर्यांशने आत येताच तिची विचारपुस केली, त्याच्या वाक्यावर सनाने मंद स्मित हास्य देत होकारार्थी मान हलवली. तसे त्याने सुजाताबाईंकडे म्हंणजेच आपल्या आईकडे पाहिल.
" आई पियुष !"
" तो त्याच्या खोलीत झोपलाय ! "
" बर ठिक आहे !" सुर्यांश उद्दारला.
" काय झाल सुर्या ? इतक अस्वस्थ का झाला आहेस ,सर्वकाही ठिक आहे ना!" सुर्यांशच्या चेह-यावर पसरलेले अस्वस्थ भाव त्याच्या मातेकडून दुर्लक्ष कसे होऊ शकणार होते? त्याला काहीतरी बोलायचं होत हे त्याच्या चेह-यावरुन स्पष्ट दिसत होत.
"सुर्यांश!" सुजाताबाई दोन पावल चालून पुढे आल्या, आपला एक हात वाढवून त्यांनी सुर्यांशच्या गालावर ठेवला.
" काय झाल काही बोलायचंय का?" सुर्यांशने फक्त होकारार्थी मान हळवली.व म्हंणाला.
" आई हा शैडो कोण आहे? ज्याच्या नुसत्या नावानेच बाबांचा धीर खचला !"
" हो ना ! " सनाने ही सुर्यांशच्या वाक्याला दुजोरा देत बोलायला सुरुवात केली.
" मी ही त्या शैडोच नाव ऐकता माझ्या बाबांबा इतक घाबरलेल पाहिल्यांदाच पाहिलंय! कोण आहे शैडो?" सनाच्या वाक्यावर सुर्यांशने सूजाताबाईंकडे पाहिल, त्यांच्या चेह-यावर जरासे गोंधळयुक्त भाव उमटले होते.सुजाताबाई स्व्त:च्याच तंद्रीत हरवल्या होत्या.
" आई.." सुर्यांशच्या आवाजाने सुजाताबाईंची तंद्री भंग झाली.
" अं! काय?" न समजुन त्या उच्चारल्या.
" कोण आहे हा शैडो?" सुर्यांशने पुन्हा तोच प्रश्न समोर ठेवला.
" शैडो!" सुजाताबाईंनी हळकेच एक आवंढा गिळला. त्यांच्या चेह-यावर भीतीयुक्त भाव पसरले होते-नक्की त्या काहीतरी लपवत होत्या .आणि ते सत्य सांगण्यास चाचरत होत्या! पन का? सुर्यांश एकटक आपल्या आईकडे म्हंणजेच सुजाताबाईंकडे पाहत होता की तेवढ्यात मागुन एक आवाज आला.
"मी सांगतो तुला कोण आहे हा शैडो!" आवाजासहित सुर्यांश,सना,अमृताबाई, व शेवटी सुजाताबाईंनी वळुन मागे पाहिल. तसे त्यांना दिसल , खोलीतल्या दरवाज्यात बळवंतराव आणि त्यांच्या मागे मानेसाहेब उभे आहेत .
××××××××××××××××
माने साहेबांचे पाच सहकारी बळवंतरावांच्या गार्डन मध्ये उभे होते. त्या पाच जणांमधील तीन सहकारी म्हंणजेच सिनीयर्स हेड कोंनस्टेबलस होते. प्रथम आत्माराम सावंत वय चौवेचाळीस ,शरीरयष्टीने बटाट्यासारखे फुगीर,रंगाने काळेकट्ट खविसासारखे दिसणारे ,द्वितीय जनार्दन साबळे उर्फ जना वय पंचेचाळीस अंगाने उंच साडेपाचफुट,काडी पैलवान, परंतु नेहमी आघाडीवर असणारे,तृतीय हरचंद गोडमारे वय सत्तेचाळीस ,आडदांड देह, पाचफुट उंची, समोरुन पाहणा-याला वाटे काय भारदस्त गडी आहे! पन हे साफ खोट होत.कारण गोडमारे मनाने एकदम भित्रे होते! परंतु काहीही असो तिघेही प्रोफेशनल होते. कईक वर्ष त्यांनी पोलिस ठाण्यात काढली होती.आता उर्वरित दोन सहकारी म्हंणजेच टू स्टार सब इन्स्पेक्टर भालचंद्र रावत वय एकतीस आणि विजय इनामदार वय पस्तीस . दोघांचीही शरीरयष्टी मध्यम होती. विचार तर्क जुळत होते.
बळवंतरावांच्या गार्डनमध्ये पांढरट थंडीयुक्त धुक पसरल होत , त्याच थंडीमुळे खालच्या हिरव्या गवतावर बाष्प साचल होत. गार्डनमध्ये हे पाचजन गोल घोळका करून उभे होते.
" सावंत, साबळे,!" सब इन्स्पेक्टर भालचंद्र रावत प्लेनिंग सांगत होते. आणि बाकीचे हे चारजण ऐकत होते.
" तूम्ही दोघे इथे गार्डन मध्ये रहा ! आणि गोडमारे तूम्ही" भालचंद्र रावत ह्यांनी गोडमारेकडे पाहील.
" तूम्ही बंगल्याच्या डाव्या बाजुला उभे राहा!"
" प...प..पण साहेब,मी एकटाच !" आधीच भित्रा असलेला गोडमारे
त्यात , ह्या अशा परिस्थितीत त्याला एकटक रहायला सांगत होते. नुस्त हे वाक्य ऐकुनच त्याचे कानसुळ गरम झाले होते, तर एकट राहण त्याला जमणार होत का? गोडमारे त्या दोन्ही कुंखार कुख्यात गुन्हेगारांना चांगलाच ओळखून होता. त्या दोघांच्या हाती कोणी माणुस लागला तर त्याला ते तडपुन तडपुन मारायचे. त्यांच्या हाती मरणारा अक्षरक्ष जिवंतपणीच नरक यातना भोगायचा.
"झक मारली न आलो इथ भेंxxत! आता काय जित्ता घरी जात नाही मी !" मान हलवत मनातल्या मनात गोडमारे नशीबाला दोष देत होता.
" ए ह-या , ए ह-या ! कुठ हरवला." हरचंद गोडमारेला कोणीतरी हळवत होत.ज्याने त्याची स्व्त:शीच नशीबाला दोष देण्याची तंद्री भंग पावली.
झोपेतुन उठल्यासारखे गोडमारे भानावर आले
" हां,हां काय-काय !"
" अरे कुठ हरवला होतास ? कधीपासुन आवाज देतोय !"
समोर आत्माराम सावंत उभे होते.
" अर्र तूला तर जना सोबत पाठवल व्हतं ना सायबांनी! आण साहेब जना कुठ आहेत? "
" अर ती संमधी गेली त्यांच्या जागेवर. आणि साहेबांनी तुझ्या जागेवर जनार्दन ला पाठवलय! आता तु माझ्या सोबत इथ थांबायचं आहे समजल?" आत्माराम ने सर्वकाही गोडमारेला सांगितल. तस त्याने फ़क्त होकारार्थी मान हलवली. तसंही त्याच्याकडे दुसरा इलाज नव्हता.
X X X X X X X X X X
" पेटव इथ चुल?"
रेंन्चोने आपल्या किन्नरी आवाजात शैडोला हूकूम सोडल. ते दोघेही आता ह्याक्षणाला जंगलातल्या एका खडकाल भागी उभे होते. आजुबाजुला गोलसर दगडी होत्या-पायांखाली मऊ लुसलुसशीत बारीकशी रेती होती. जशी समुद्राच्या किना-यावर,नदीमधध्ये ,वहळात असते. माझ्यामते तिथे नक्कीच वह ल असाव! नाहीतर अशी मध्येभागी मऊलुसलुशीत रेती कशी असती? असो! सहा फुट आकाराचा धिप्पाड राक्षसासारखा, दिसणारा शैडो कुणाच्याही मनात धडकी भरवणा-यांमधला होता. पन रेंन्चो मात्र त्याला घाबरत नसायचा,बिनधास्त त्याला बोलायचं! कधी कधी मारायचं ही.
त्याचा भौ होता ना तो , शेवटी रक्ताच नात होत. ! शैडोने खांद्यावर आणलेली लाकडे खाली टाकली, आजुबाजुला असलेले मध्यम आकाराचे दगड उचलून एकेजागी गोळ वर्तुळाकारत रचले-मग त्या दगडांमधोमध होळीसारखी लाकड रचली, आणि त्यांवर रॉकेल ओतल.
" काडीपेटी?" शैडो इतकेच म्हंणाला. त्याने मागे पाहील, रेंन्चो आपल्या दोन्ही हातांची धारधार नख एकमेकांवर घासण्यात मग्न होता.
" काडीपेटीऽऽऽ?" ह्यावेळेस शैडो जरासा मोठ्यानेच ओरडला . तसा तो हाडकूला रेंन्चो जरासा दचकलाच.
" अं ! नाहीये ना माझ्याकडे! " त्याच्या वाक्यावर शैडो काहीच बोलला नाही! त्याने बाजुला पाहिल, आणलेल्या लाकडांमधली काही लाकड शिल्लक राहिली होती त्या शिल्लक राहीलेल्या लाकडांबाजुलाच एक चैनसो मशीन ठेवली होती, मशीनच्या दोन फुट धारधार चंदेरी पातिवर शैडो अस नाव लिहीलेल! आणि मशीनच लाल रंगाच इंजीन ,त्या बाजुलाच एक दोरी दिसत होती -जी ओढताच मशीन ,(घ्यांग,घ्यांग) आवाज देत सुरु व्हायची. शैडोने तीच मशीन आपल्या दोन्ही हातांत घेतली. मग इंजीनबाजुला असलेली दोरी मुठीत पकडली-
:" खचाक! " आवाज करत ओढली. आणि पहिल्याच खेपेला मशीन सुरु.
" घ्यांयांयान्ग,घ्यांन्ग" असा दलभद्री रक्तपिपासू आवाज जंगलात आजुबाजुला घुमू लागला. त्याही पेक्षा ती चैनसो हातात घेतलेल्या सहा फुट शैडो भयंकर दिसत होता. त्याने ती मशीन शैकोटीभोवती रचलेल्याच एका दगडाजवळ नेहली, तीची वेगाने फिरणारी ब्लेड दगडाला टेकवली, आणि इतक्यात त्या ब्लेडमधुन एकापाठोपाठ पावसासारख्या ठिंणग्या लाकडांवर बरसु लागल्या-चुल पेटली गेली होती.
क्रमश: