Ek Saitaani Ratra - 15 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | एक सैतानी रात्र - भाग 15

The Author
Featured Books
Categories
Share

एक सैतानी रात्र - भाग 15

Season 2. Ep 4

भाग 15




सुलतान ब्लॉकच्या थप्पी मागे लपला होता. आणि दर वीस सेकंदानी डोक थोड बाहेर काढून टेरीसच्या उघड्या चौकटीकडे चोरुन पाहत होता. सहा-साडे सहा फुट उंच दरवाज्याची चौकट त्या पल्याड गर्द अंधार दिसत होता. आकाशात उमटलेल्या अर्ध्या चांदण्याची चंदेरी किरणे टेरीस उजळून गेली होती.सोसाट्याचा वारा टेरीसवर भुतासारखा घुटमळत फिरत होता. हवेच्या थंड झोतांनी सुलतानच्या अंगावर शहारा येऊन जात देहात एकावर एक भीतीचा ठणका उमटत होता. ह्दयात पडणा-या प्रत्येक ठोक्याला एक कल उमटत होती, अंधारातुन पाश्वी,सैतानी शक्तिचा कोठून कस वार होईल? सैतान हवेत उडून येइल? अचानक समोर प्रगट होईल? मानेचा लचका तोडून,कच्च खाईल ! काहीच काहीच कळत नव्हत! भयाची रसरसती चमक अंधारात असल्याशिवाय त्या अंधाराला शोभा नसतेच ! त्या स्मशान शांततेत पावलांचा गुंजणारा आवाज येऊ लागला, भीतीने पोटात आलेल्या गोळ्याने कानांच्या पडद्यांची फाटाफाट सुरु झाली, आतड़े ग्रंथी, शरीराचा एक नी एक भाग जणु खेचला जाऊ लागला. त्या उघड्या अंधा-या चौकटीमय दारातुन एक हाडकूळ लालसर गुढघ्यांची वाटी बाहेर आलेल पाय आत आल. सुलतानची नशा केव्हाच उडाली होती. तो निरीक्षण करुण पाहत होता, पायांच्या बोटांवर अंगठा नव्हताच, फ़क्त वळवळणारी चार लाल बोट होती . माकडा सारख उडी मारुन ते ध्यान टेरीसवर आल.

" हूप्प,हुप्प,हुप्प्प!" असा आवाज काढत चौहीदिशेना प्राण्यांसारख्या लकाकत्या डोळ्यांनी पाहू लागल.हप,हुप,हुप आवाज काढतावेळेस त्याच्या गळ्यात मधोमध हवाभरली जात होती.

जमिनीवर पाय आणि हात टेकवून ते माकडासारख "हप,हुप,हुप्प,हुप्प," आवाज करत होत. सुलतानची वाचाच बसली होती. भीतीने डोळ्यांची पापणी मिटत नव्हती, त्या ध्यानाने आपल्या लकाकत्या चंदेरी डोळ्यांनी त्या ब्लॉकच्या थप्पीकडे पाहिल, त्याच्या काळसर ओठांवर आसुरी छद्मी हासू उमटल.

" खीखीखीखी!" ते काळसर विद्रूप दात दाखवत ते हसल, तेवढ्यावेळेतच त्याची ती गुलाबी दोन भागांत विभागलेली सापासारखी पन जराशी जाड जीभ दिसली,

" थेंब, थेंब तळ्यात नाचती रे

टपटप पानांत वाजती रे ," सुलतानच्या कानांवर तो पुरूषी घोगरा आवाज पडला. त्याच तोंड रडवळ्या प्रमाणे झाल. मागुन ते ध्यान

घोग-या भसाड्या आवाजात ते बाळगीत गात पुढे पुढे येत होत.

" पावसाच्या रेघात,

खेळ खेळू दोघांत निळया सवंगडया नाच,

नाच रे मोरा !"

सुलतान दोन्ही हात पोटात ठेऊन ब्लॉकसच्या थप्पी मागे लपला होता- की इतक्यात अगदी वेगाने सुलतानच्या पाठीमागुन ब्लॉकसच्या थप्पीमधून एक हात बाहेर आला. आणि त्या रक्ताने भिजलेल्या चार बोटांच्या हाताने त्याला फरफटत मागे खेचल! एका कापसाच्या पुंजक्या प्रमाणे ते ब्लॉक्स आजुबाजुला उडाले, आणि सुलतान त्या ध्यानाच्या कचाट्यात सापडला.

" पावसाची रिमझिम थांबली रे , " त्या ध्यानाने आकाशात पाहिल.

" तुझी माझी जोडी जमली रे, " त्या ध्यानाने दात विचकत सुलतान कडे पाहिल, ती लकाकती नजर सुलतानच्या काळजाला सुईच्या टोकासारखी चिरत आत गेली.

" आभाळात छान छान सात रंगी कमान

कमानीखाली त्या नाचऽऽऽ,.. नाच रे मोरा

आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच..!" शेवटच वाक्य संपवुन काहीवेळ ते थांबल आणि अचानक त्याने एक आरोळी ठोकली." "ह्यांवऽऽऽऽऽऽऽऽऽ" त्या पाश्वी आवाजाने सुलतान जागीच गारठला,

हातापायाचे स्नायू गंज लागल्याप्रमाणे गंजले गेले.

त्या ध्यानाने आपला काटकूळा धारधार पौलादी नखांचा हात वाढवला, आणि त्याने थेट सुलतानच्या गळ्यात ती पौलादी नख घुसवली, तव्यावर जस लोणी टाकताच ते वितळत, तसंच ती धारधार नख जशी त्या गळ्याच्या चामडीला स्पर्श झाली, त्याचवेळेस ती चामडी फाटली, आतल्या गुलाबी मांसात , ती नख रुतली गेली , आणि ते मांसही फाटुन त्यातुन लालसर रक्ताच धरणफुटल, रक्ताची धार वाहू लागली, ती नख इतक्यात थांबली नाही जणू अद्याप त्याच समाधान झाल नव्हतच.. हातावर अजुन भार देत त्या नखांनी चिबीक आवज करत मांस फाडून आतल्या थाईराईड गुलाबी रंगाची रक्ताने माखलेल्या ग्रंथीला शोधत थेट उपटून बाहेर काढली,

" हिहिहिहिही,खिखिखी!" त्या थाईराईड ग्रंथीकडे पाहत ते हसल, जणु त्याला मज्जा येत होती. त्या थाईराईड ग्रंथीला त्याने आ-वासून तोंडात टाकल, आणि चबक,चबक, आवाज करत खाऊ लागला. सुलतान गळ्याला हात लावत दोन्ही पाय खाली जमीनीला घासत मागे मागे जात होता.की तोच त्या ध्यानाने सुलताना डावा पाय पकडल.

" खीखीखिखिखी..!" ते पुन्हा विकृत हसल. त्याच्या पायाच्या पाचही बोटांकडे विक्षिप्त हवरट नजरेनी पाहत त्याने पायाचा अंगठा आपल्या जोरात डाव्याबाजुला फिरवला"कट "तस हाड तूटल्याचा आवाज झाला

" आऽऽऽऽऽऽ" सुलतानच्या तोंडून प्रथमच किंकाळी आणि घश्यात अडकलेला तो काचेचा तुकडा रक्ताची उलटी होऊन त्याच लालसर उलटीत बाहेर पडला. सुलतानाच्या पायाच तोडलेला अंगठा त्या ध्यानाने तोंडात टाकल, मग दुस-याही बोटाच अंगठा गोल गोल हळुवारपने भिंगवत," कट "आवाज करत उपटून काढला,पुन्हा सुलतानची एक आर्तकींकाळी उभा आसमंत हादरवून गेली. आता समजल ना? की त्या ध्यानाच्या पायांवर अंगठे का नव्हते! कारण त्याने स्व्त:चेच अंगठे, स्व्त:हाच खाल्ले होते. भयाण असमंजस विकृती.

" सोड मला सोड..! अ ,हा,अ ,आहा.." सुलतानला बोलता बोलता ठसका लागला, तो खोकत असतांना त्यांच्या तोंडाचा आ-वासला होता त्याच रक्ताने माखलेल तोंड, दात हिरड्या आणि जिभ सर्वकाही दिसत होत. की तोच आपला चार बोटांच्या पंज्यांचा हात वाढवून त्या ध्यानाने सुलतानची आतली जिभ पकडली, दुसरा हात त्याच्या विस्फारलेल्या डाव्या बुभळात चिबीक आवाज करत घुसवला. तसा अलगद तो पांढरट बुभळ रक्ताची पिचकारी उडवत बाहेर पडला. दुस-या हातात धरलेली जीभ त्याने चिंगमप्रमाणे ताणली, आणि बुभळाच्या रक्ताने माखलेला हात, मागे केसांतुन फिरवला आणि पुन्हा जस पुढे आणला त्याक्षणाला हाती एक पातळसर उच्चप्रतिची ऑपरेशनला वापरली जाणारी धारधार चंदेरी रंगाची ब्लैड दिसत होती. एकवेळ त्याने छद्मी हासत त्या ब्लैडकडे पाहिल, मग दुस-या हातात चिंगम सारखी ताणून धरलेल्या त्या गुलाबी जीभेकडे आणि शेवटला एक कटाक्ष सुलतानच्या रक्ताने माखलेल्या चेह-यावर टाकला. तो थरथरत्या मानेनेच नाही नाही अस म्हंणत प्राणाची भिक मागत होती. त्यावेळेस न जाणे का पन त्या विकृताला त्याची दया आली, त्याने लहान मुलासारख तोंड पाडल, आणि नाही अशी मान हळवली, डोक सरळ खाली झुकवल. जणु त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला असावा?, कारण त्याने सुलतानची हातातली जीभ ही सोडली होती. तो एकटक तोंड पाडून खाली मान घालून बसला होता. अगदी एका पुतळ्यासारख, ना त्याच्या देहाची हालचाल होत होती..आणि नाही खाली जमिनीवर पाहणा-या डोळ्यांची.एकक्षण सुलतानने सुटकेचा निश्वास सोडला "हुश्शऽऽऽ" आणि डोळे बंद केली.नी त्या बंद डोळ्यांन आत एक " खच्च " असा काहीतरी खुपसल्याप्रमाणे कानांवर आवाज झाला. सुलतानने खाडकन डोळे उघडलेन त्याच्या देहात वेदनेचा पुर वाहून आला होता, पाठीच्या मणक्यातून भीतीची थंड लाट पसरली होती. त्या बिल्डींगवरुन एक टीटवी रात्रीच्या प्रहाराला टीवटीव आवाज करत उडून गेली. तस ते ध्यान त्या टीटवीच्या आवाजावर थिरकू लागल, हवेत हात नेऊन मसणात नाचणा-या अघो-या सारखा सुलतानच्या देहाला गोल -गोल प्रदक्षिणा घालत नाचु लागल.सुलतानने एकनजर पोटावर टाकली, पोटाच्या बरोबर मधोमध नाभीत एक धार धार मोठा सुरा खुपसला होता, त्या सुरीच लाकडी काळ्या रंगाच टोक वर दिसत होत आणि खालची पात पचन नालिकेंच्यां गुलाब्या आतड्यांमध्ये त्या सर्वांच केबल कनेक्शन तोडत आत घुसली होती. पोटातून रक्ताचा फवारा हवेत तळ्यात बसवलेल्या मशीनच्या पाण्याच्या कारंज्यांसारखा ऊडत होता. टिटवीचा आवाज दुर दुर जात मंद नाहीसा झाला. तसे ते ध्यान त्या आवाजावर थिरकायच थांबल, लालसर रंगाने माखलेल देह , नी ते वाढलेले गुढघ्यांपर्यंत येणारे केस , एका काळसर गोमसारखे फिरत होते.डोळ्यांतली बुभळे चंद्राच्या प्रकाशाने चमकत होती-जशी कुत्री,मांजर, बैल, गाय ह्या सर्व प्राण्यांचे चमकतात. रडवलेल्या तोंडाने चित्रविचित्र आवाज काढत सुलतान पोटाकडे पाहत होता. ते ध्यान सुलतानच्या चेह-याकडे पाहतच, मटकन खाली बसल. आणि जस एक स्त्री तीचा नवरा मेल्यावर कपाळावर हात मारत रडते तस हात मारत रडू लागल, त्याचा तो फाटका घोगरा आवाज भयाण होता- साक्षात निसर्ग थरथरु लागला होता. एक जोराची वीज कडाडली, लक्ख निलसर प्रकाश खाली पडला.

" एं,एं,एं , हा,हा,हा," कधी रडत होत तर कधी हसत होत. जणु सुलतानची ही अवस्था त्या ध्यानाला एक आनंद देत होती. एक आसुरी,विकृती,कृल्पती आनंद. आणि त्याच आनंदाने हे असल अभद्र,विकृत नाट्याच प्रदर्शन ते करत होत. जस एक लहान बाळ मोठ्या मांणसाच्या वाकुल्यांवर, त्याच्या वेडेवाकड्या कृतीवर खुद्दकन हसत तसंच.

" चो,चो,चो,चो!" तोंडावाटे विचीत्र स्वर काढत तो नाही-नाही अश्या प्रकारे मान हळवत सुलतानकडे पाहत होता.

" अरे मित्रा गाण गायला खुप आवडत ना तूला? मला ही खुप आवडत! पन तू चांगल गाण नाही ना गात ? मग ही जीभ का ठेवलीयेस तू? दे,दे" त्याने सुलतानच्या तोंडात घातला,पुन्हा ती जीभ तशीच ताणून धरली, आणि पोटातला सुरा सप्पकन, उपसला, रक्ताचा पुन्हा एक फवारा उडाला.

" उम,उम,उम!" जीभ धरल्याने सुलतानचे शब्द जरासे वेगळे असमंजसपणे बाहेर पडू लागले. पन त्या शब्दांचा अर्थ नाही-नको असंच होता ना. शेवटी जिभेवरुन सुरा अगदी हळूवारपणे उजवीकडून डाविकडे फिरला, क्षणार्धात जीभ कापली गेली . तोंडातून रक्ताची धार बाहेर पडू लागली होती. दोन्ही हात रक्ताने भिजले होत तोंड दाबून जागेवरच सुलतान विव्हलत होता.

किती ह्दयद्रावक कृत्य ! इतक क्रुर कोणी कस वागू शकत ?

मनात थोडीशी तरी दया भावना, किव असतेच ना! मग हे काय होत ? काय होत हे ? जीभ हातात धरुन त्याने स्व्त:च्या तोंडात कोंबली वाकडीतिकडी हनुवटी, गाल हळवत ती खाऊ लागला.

अर्ध मेल्या सुलतानच्या एका डोळ्याने त्याला तो मृत्युदेव समोर दिसत होता. पन तो त्या अवस्थेतही आठवत होता की आपण असं कोणत पाप केल होत? की हे अस मृत्यु मिळत आहे.?

" आता तुझ काय करु?" चार बोटांच्या हाताची तर्जनी काळसर ओठांवर थोपटत ते स्वत:शीच म्हंणाल. व पुढच्यक्षणाला तो सुरा त्याने सुलतानच्या छातीच्या पिंज-यात घुसवला तस एक शेवटची रक्ताची गुळनी सुलतानचा आत्मा बाहेर काढत बाहेर पडली. आता तिथे फक्त एक कलेवर होत, सुलतान तर केव्हाचंच रामनाम झाला होता. छातीत घुसवलेला सुरा त्या ध्यानाने बाहेर काढायला घेतल,पन प्रयत्न असफळ झाल, त्याची पात जणू हाड-मांसात अडकून पडली होती. शेवटी सू-याच टोक धरुन मिस्टर बीन सारख बोरिंग एक्शन करत त्याने तो सुरा छातीपासुन खालच्या अन्ननलिकेपर्यंत एका रेषेत जोर लावत खाली आणला. फ़ड फड हाड तोडत-मांस कापत पात अन्ननालिकेतुन बाहेर आली.( तेव्हा त्याने आपल्या सर्वांकडे दात विचकत पाहून बक्षीस मिळाल्यासारख सुरी हातात धरुन दाखवली व त्या टेरीसच्या उघड्या चौकटीतुन बाहेर निघून गेला. परंतु सुलतानच छिन्नविछिन्न कलेवर मात्र तिथेच कोणितरी येण्याची वाट पाहत पडुन राहील.

×××××××××××××××××××××××××

"मग माने साहेब ,कधी काढायची लग्नाची तारीख?" बळवंत राव माने साहेबांकडे पाहत उच्चारले.

आता ह्याक्षणाला ते सर्वजन बळवंरावांच्या बंगळ्यातल्या प्रथम हॉलमध्ये सोफ्यांवर बसले होते.एका सोफ्यावर बळवंते फैमिली तर दुस-या सोफ्यावर माने फैमिली बसली होती. बाकी पाहूणे मंडळी बाहेर पार्टी एन्जॉय करत होते.

" तूम्ही म्हंणाल तस बळवंते! आमच काही विरोध नाही" माने साहेबांनी ही जबाबदारी बळवंत रावांवर सोपवली असंच मानूयात. मानेसाहेबांच्या सोफ्यावर प्रथम मानेसाहेब ,त्यांच्या बाजुला अमृताबाई आणि शेवटला-सना बसली होती. तीचा चेहरा लाजेने चुर चुर झाला होता- आपल्या लग्नाचा विषय सुरु आहे, हे ऐकून मनात कसतरीच होत होत. मान खाली घालून ती फक्त सर्व ऐकत होती.

" अस म्हंणता माने साहेब! मग ठिक आहे तर नउद्याच आमच्या एका ओळखीच्या पुजारी बाबांना बोलवतो , आणि पत्रिका जुळवून एकदाच लग्नाच बार उडवून टाकूयात!" माने साहेबांनी अस म्हंणतच सुर्यांश कडे पाहील व त्याला उद्देशून म्हंणाले" काय सुर्यांश चालेल ना? हा,हा,हा,.. " बळवंतरावांच्या वाक्यावर सुर्यांशने एका मुलीसारखी लाजुन मान खाली घातली. तसे बाकीचे हसू लागले.एकंदरीत ;बळवंते साहेबांच बोलण दोन्ही कुटूंबाना पटल होत, व अजुन काही बोलायचं बाकी राहीलही नव्हत. ह्याच आनंदात बळवंते व माने साहेब दोघांनिही एकमेकांची गळाभेट घेतली. सना आपल्या समोर सुजाताबाईंच्या बाजुला बसलेल्या सुर्यांशकडे पाहून गालातल्या गालात हसत होती, शेवटी जिवाभावाचा जिव लावणारा जोडीदार म्हणून लाभलेला सुर्यांश तिला जिवनसाथी म्हंणून मान्य होता. आणि हे कटू सत्य आहे की प्रेम करणा-यांना कवचितच आपला जोडीदार मिळत असतो! नाहीतर ह्या कलियुगात पैस्या पुढे कोणाच काय चालत? कित्येक प्रेम ह्या मानवाच्या विक्षिप्त विचाराने तूटले जातात ! ह्याची जाणिव कोणाला का होत नाही? असो! बळवंतराव माने साहेब दोघांनी एकमेकांना आनंदाने मीठी मारली तसा त्याचवेळेस मानेसाहेबांचा फोन खनखनला, त्यांनी प्रथम मिठीसोडवली ,मग फोन बाहेर काढून मंद स्मित करत हिरव बटण दाबून तो फोन कानाला लावला. तसा त्या फोनमधून एक घाबरट आणि घाइघाइने बोलणारा आवाज बाहेर पडू लागला.

" कालपाडा पोलिस स्टेशनमधुन बी:के:पाटील बोलतोय सर! तुम्हाला एक रेड अलार्ट न्यूज सांगायची आहे सर, "

" हो -हो बोल !"

" सर कालपाडा अंडा जेलमधून स्पिरीट ऑफ़ पर्सनल्टी दुर्धर आजाराने ग्रासलेले दोन घातक गुन्हेगार रेंचो आणि शाडो फरार झाले आहेत. आणि आम्हाला पुर्णत खात्री आहे की ते कालपाडामध्येच आहेत, कारण पुर्णत दीडतासात वीस खून झाले आहेत सर, आणि सर्वच्या सर्व खून!हं,हं,हं" फोनमधुन येणारा आवाज अक्षरक्ष थरथर काफू लागला होता ते वर्णन वर्तवण्यासाठी,

" येस ओके पाटील, मी पोहचतोय !"

माने साहेबांनी फोन ठेवला. त्यांचा काहीवेळा अगोदर

आनंदाने झगमगटलेला चेहरा आणि कुठे हा गंभीर , त्रासिक चेहरा. किती जमिन आसमानाचा फरक होता त्यात, अमृताबाईंनी ते लागलीच ओळखल व त्या काळजीच्या स्वरात उद्दारल्या.

" किरण व्हॉट प्रॉब्लेम ? काय झाल आहे? "

" अमृता.. खुप मोठा प्रॉब्लेम झालाय ?" माने साहेबांनी गंभीर होत बळवंतारावांकडे पाहिल .

" कारण, " माने साहेबांनी बळवंतरावांकडे पाहत आवंढा गिळला. बाजुला ऊभी सना तिच्या वडिलांचा हा स्वभाव पहिल्यांदाचा डोळ्यांनी पाहत होती. कारण तीचे वडिल असे बिचकून,तुटक तुटक कधीच बोलत नसायचे, आता ह्या क्षणाला त्यांच्या नजरेत कमालीची भीती दाटुन आल्यासारखी वाटत होती.आनंदाच्या वासाला करपट, घाणेरड्या ,कुजकट दुखहिंत दर्पाने मीठी मारली होती.

गंभीर तणावपुर्वक वातावरण तिथे निर्माण झाल होत.

" ते दोघे फरार झालेत , !" ते दोघे ह्या शब्दांच अर्थ बळवंत रावांनी न जाणे काय घेतल असाव ते शब्द ऐकताच प्रथम बळवंतरावांच तोंड पांढर पडल, हनुवटी जराशी खाली आली तोंडाक्षा आवासला, मग डोळे अशेकाही विस्फारले की खाडकन ते मागच्या सोफ्यावर आदळले..आणि त्याच टाईमला

" आऽऽऽऽऽऽऽऽऽ! वाचवा , हैल्प...!" बायकांचा ओरडण्याचा भीतीदायक पाश्वर आवाज ऐकू आला.

क्रमश :