If creation lives, we live in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | सृष्टी जगेल तर आपण जगू

Featured Books
Categories
Share

सृष्टी जगेल तर आपण जगू

सृष्टी जगेल तरच आपण जगू
झाडानीही पापच केलेले असते असं जर कोणी म्हटलं तर आपल्याला आश्चर्यच वाटेल. कारण झाडाबद्दल आपल्या भावनाच मरण पावलेल्या आहेत. परंतु झाडांनीही दाखवून दिले की आम्ही किती उपयोगाचे आहोत. आम्ही जर नसलो तर या पृथ्वीतलावर पाणी पडू शकणार नाही. तापमानही वाढेल व सृष्टी नष्ट होईल. याबाबतीत एक कथा आहे.
प्राचीन काळात राजे पद्धती अस्तित्वात होती. त्यात सैनिक एकमेकांशी लढत व ते एकमेकाना मारत असत. ते पापच होत असे. कारण एकमेकांचा विनाकारण जीव घेणे हे पापच होते.
सैनिक हे आपल्या धन्यासाठी लढत. प्रसंगी आपल्या धन्यासाठी ते परकीय शत्रू सैन्याचा बळी घेत. यात दोष त्यांचा नसायचा. तो दोष राजाचा असायचा. ते बिचारे आपल्या पोटासाठी राजाकडे नोकरी करीत व आपल्या पोटासाठी ते आपला जीवही देत आणि जीवही घेत असत. परंतु त्याचा दोष राजाला लागत नसे. जेव्हा पापाची शिक्षा द्यायची वेळ यायची.
ते सैनिक जेव्हा मरत असत आणि त्यानंतर ते यमनगरीत जात. तेव्हा न्यायिक देवता यम त्यांना शिक्षा सुनावीत असतांना फार कठीण शिक्षा देत असे. तेव्हा राजा म्हणत असे की दोष माझा कसला, मी तर कर्तव्य केलं. मग राजानं तसं म्हणताच यम न्यायिक भावनेतून सैनिकांनाच दोष देत त्यांना भयंकर मोठ्यात मोठ्या शिक्षा देत असे आणि राजाचा दोष असूनही त्यांना हलक्या दर्जाच्या शिक्षा.
एकदाचा तो प्रसंग. त्यावेळेस सर्व सैनिक एका जत्थ्यानं न्यायिक देवता यमाकडे गेले. म्हणाले,
"यम महाशय, आम्ही आमच्या पोटासाठी सैनिक म्हणून लढतो. स्वतः प्राण देतो आणि आमच्याच भरवशावर राजाची चांदी चांदी होते. त्यात आम्हाला काहीच फायदा होत नाही. उलट दोष आमचाच दिसतो राजा आमच्याचमुळे विलासात जगतो. आम्ही जर नसतो तर राजाला विलासात जगता आलंच नसतं. परंतु आम्हाला हे मान्य की दोष आमचाच असतो. परंतु आम्हाला अशी शिक्षा द्या की आमच्या दोषाचं क्षालन होईल व आम्ही शिक्षा तर भोगू. परंतु त्या शिक्षेनंतर दोषमुक्त होवू."
त्या मृत सैनिकांचं ते बोलणं. त्यांनी आपापल्या वेदना मांडल्या होत्या यमदेवतेसमोर. त्यावर यमदेवता विचार करु लागली. विचार करु लागली की यावर काही उपाय तरी निघू शकेल काय?
विचारांती यमदेवतेला आठवलं की आपण या सर्व सैनिकांना झाडं बनवू. ही मंडळी झाडं जर बनली तर यांचा दोष असल्यानं यांना सुर्याचं कडक उन्हाचे चटके शोषावे लागेल. पळून जायची इच्छा जरी असली तरी ते कडेला पळून जावू शकणार नाहीत. शिवाय यांनी ज्यांना ज्यांना ठार केलं. ते सर्वजण यांचे अवयव छाटतील व यांना अमानुष वेदना देतील. ज्यातून यांना भयंकर त्रास होईल. त्यानंतर राजाकडे विचारांती वळून यमदेवतेनं विचार केला की राजानं एक राजा असल्यानं आपलं कर्तव्य जरी केलं असेल, तरी तोही दोषी आहे. त्यानं औषधीचं झाड बनावं. ज्या झाडाच्या खाली लोकं दिवे लावतील. दिव्यातील जास्तीचे भेसळयुक्त तेल जमीनीत जावून झाडांच्या मुळांना व्यवस्थीत पूरक खाद्य मिळणार नाही व ते मरतील.
यमदेवतेनं तसा विचार करताच तथास्तू म्हटलं व सर्व सैनिक तेव्हापासूनच झाडं बनली व राजे हे औषधी झाडं. त्यानंतर ते दोषमुक्त होईपर्यंत सुर्याच्या तप्त उन्हात ऊन झेलत असतात आणि आपल्याला सावली देवून आपली सेवा करीत असतात नव्हे तर आपली सेवा करुन दोषमुक्त होत असतात. ते आपली सावली देवून सेवा करतात. तरीही आपण त्यांना चांगलं वागवत नाही. आपण त्यांच्या फांद्यारुपी अवयव मोडून त्यांना अतिशय वेदना देतच असतो. काही तर त्यांना कुऱ्हाडीनं तोडून त्यांची निर्मम हत्या करीत असतात. तेव्हा त्यांना अतिशय भीतीही वाटत असते. परंतु ते घाबरुन पळूही शकत नाहीत.
काही दिवसानं झाडं नष्ट होतात. ते नष्ट झाले की आपल्या पापरुपी दोषातून मुक्त होतात. तेव्हापर्यंत त्यांची घाबरुन पळून जायची इच्छा जरी असली तरी ते पळून जावू शकत नाहीत. दोषमुक्त होईपर्यंत.
काल सतत युद्ध होत असत. त्यामुळंच जास्तीत जास्त सैनिक मरत असत. त्यामुळंच झाडं जास्त होती. जंगलंची जंगलं होती व वातावरणात ऑक्सिजनची मात्रा जास्त होती. परंतु आज तसं नाही. आज युद्ध होत नाहीत. म्हणूनच झाडंही कमी होत आहेत. त्यामुळंच पर्यावरण ढासळत चालले आहे.
महत्वाचं सांगायचं झाल्यास आजचे लोकं याच दंतकथेच्या अनुषंगानं चालतात व मानतात की सैनिकच मरत नाहीत. मग झाडं कुठून असणार. परंतु महत्वपुर्ण गोष्ट ही की ही दंतकथा आहे. या दंतकथेचा आणि झाडं लावण्याचा दूरदूरचा संबंध नाही. झाडं ही अतिशय महत्वाची गरज आहे. त्याःच्यापासून बरेच फायदे आहेत. ते सावली देतात. जमीनीची धूप जास्त होवू देत नाही. पर्यावरण संतुलन राखता येतं. झाडं फळ फुल देतात, लाख व डिंक देतात औषध्या देतात. सरपणही देतात. इमारती लाकूडही देतात. तशीच झाडं ही पाऊसही देत असतात.
झाडं ही ऑक्सिजन देतात. ऑक्सिजन हवेत प्रवाहीत करतात. तो ऑक्सिजन हवेत वर वर जात असतो. तो ऑक्सिजन वर गेल्यानंतर त्याचा संपर्क हायड्रोजनशी येतो व पाऊस पडतो. कारण हायड्रोजन हा हवेतील एक घटक आहे व तो हलका वायू असल्यानं पृथ्वीच्या कक्षेत नसतो. तो हवेच्या वरच्या भागात असतो. जेव्हा ऑक्सिजन वर जावून हायड्रोजनच्या संपर्कात येतो. तेव्हा पाऊस पडतो. परंतु हे जरी खरं असलं तरी मुख्य बाब ही की हवेत जास्तीत जास्त ऑक्सिजन प्रवाहीत व्हायला हवं. तेव्हाच पाऊस येणार. नाहीतर नाही. मग त्यासाठी पृथ्वीतलावर जास्तीत जास्त झाडं लावायला हवीत हेही तेवढंच खरं.
विशेष बाब ही की झाडं आपण लावायला हवीत. ते आपल्या हातात आहे. मग सैनिक शहीद होवो की न होवो. त्या गोष्टीशी आपला संबंध नाही. मात्र झाडं लावणं आपल्या हातात आहे. त्यामुळंच प्रत्येकानं एकतरी नाही तर दोनतरी झाडं लावलीच पाहिजेत. लावायलाच पाहिजेत. जेणेकरुन तापमान वाढणार नाही व सृष्टी जगेल. सृष्टी जगेल तरच, आपण जगू. नाहीतर सृष्टीसोबत आपणही काळाच्या ओघात केव्हा संपून जावू. ते आपल्याला कळणारही नाही. हेही तेवढंच खरं.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०