"शी..बाई आज खूपच उशीर झाला. अशोक जर माझ्या आधी घरी आला असेल तर काही खर नाही आज माझं" अपर्णा स्वतःशीच बडबडत झपझप चालत होती...
"तरी मी सोहमला म्हणाले , मला हे असं खोटं बोलून नाही जगता येत, तू कर काही तरी मी नाही आता अशोकशी खोटं बोलणार.. पण त्याच आपलं एकच मला थोडं सेटल होत देत, नंतर आपण आहोतच कि, एकत्र आयुष्यभर पण माझी मनस्थिती का नाही हा समजून घेत माझी होणारी घुसमट नाही का दिसत सोहम ला कि सर्व कळत असूनही तो न कळल्या सारख करतोय”
अपर्णाच घर अगदी चार पाउलांवर आलं होत, अशोक आधीच घरी येऊन बसला होता, घरात टीव्ही चालू असल्याचा आवाज ऐकू येत होता..
अपर्णाने घरात पाऊल ठेवलं ....
"आज का इतकं लेट.."अशोकन आल्या आल्या अपर्णाला विचारलं.
“हो आज जरा जास्त काम होत ऑफिस मध्ये “ अपर्णाने त्याच्याकडे न पाहताच उत्तर दिल.
"खरच..तू ऑफिस मध्येच होतीस ना ?" अशोक तिच्या कडे रोखून पाहत म्हणाला.
"का..?? "अपर्णाने काहीस चिडून विचारलं.
"मी आज स्वतःलवकर सुटलो, तुझ्या सोबत घरी यावं म्हणून मी आज तुझ्या ऑफिसाला आलो होतो, तिकडे गेल्यावर कळलं कि तू हाफ-डे निघून गेली होतीस, काय, खरं बोलतोयना मी ,कुठे गेली होतीस अपर्णा" अशोक ने आता आवाज चढवला होता.
"गेले होते मशनात ..तुला काय करायचंय" अपर्णा देखील चिडली.
"मला काहीच देणं घेणं नसत ,जर तू माझी कुणीही नसतीस, पण दुर्दैवाने का होईना आपण नवरा-बायको आहोत, तुला सागावंच लागेल अपर्णा" अशोकने तिच्या दोन्ही दंडाला दाबून धरून तिला हिंदळलं.
"हो..तुझी बायको ..हेच तर दुर्दैव आहे माझ, तुला ऐकायचंय ना तर ऐक आज ना उद्या तुला हे समजलच असत पण विषय निघालाच आहे, म्हणून सांगतेय , मी एका माणसाला भेटायला गेले होते, सोहमत्याच नाव. झालं समाधान आमचं प्रेम आहे एकमेकांवर आणि आम्ही लग्नही करणार आहोत लवकरच"
अपर्णा सर्व बिनधास्तपणे अशोकला सर्व ऐकवत होती.
“काय आणि तुला ह्या गोष्टी सांगताना जराही लाज नाही वाटत” आता अशोकचा ही आवाज चढला.
“लाज का त्रास होतोय खरं बोलतेयना मी आता पण, हि वेळ तूच माझ्यावर आणलीस अशोक..”
"काय? माझा काय संबद्ध मी काय असं वागलो जेणे करून तुला ह्या थराला जावं लागल."
"ते तू स्वतःच्या मनाला विचार, मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाहीये"
"ठीकेय असंही बोलायला बाकी काय राहिलंय, तुला माझा इथून पुढे कसलाच त्रास नाही होणार."
अशोक काहीच न बोलता बाहेर निघून गेला."
अपर्णाला राहवलं नाही, अशोक बाहेर निघून जाताच, तिने आतून दार लावून घेतलं आणि सोहमला फोन केला.
"हॅलो.. सोहम मी अपर्णा बोलतेय.."
"अप्पू...काय ग असा अवेळी फोन,घरी सर्व ठीकेय ना?"
"काहीच ठीक नाहीये सोहम, मी अशोकला आपल्याबद्दल सर्व सांगितलं आज"
"काय मग त्याची प्रतिक्रिया काय होती"सोहम ने सावधपणे विचारलं ,
“काहीं नाही, तो म्हणाला इथून पुढे तुला माझा कसलाच त्रास होणार नाही आणि निघून गेला बाहेर”
"मला वाटत अपर्णा तू त्याला फोन कर , बघ तरी तो कुठे गेलाय त्याने सर्व इतकं सहज घेतलं म्हणून मी बोलतोय"
"पण का आता कशासाठी जाऊ देना त्याला कधी ना कधी हे समजलच असत तू आहेस ना माझ्यासोबत आता आपल्याला कुणाचीच भीती नाही राहिली हो ना? आता आपल्याला एक होण्या पासून कुणीच नाही अडवू शकत. हॅलो, तू ऐकतोयसना सोहम, हॅलो..हॅलो..."
पलीकडून फोने बंद झाला होता.
तीने पुन्हा फोन ट्राय केला "द नंबर यु ह्याव कॅल्लिंग इज करंटली स्वीटच-ऑफ"
“फोन बंद बॅटरी डाउन झाली असेल, बहुतेक कि मुद्दामच बंद केला असेल सोहमने फोन”, अपर्णा स्वतःशीच शांतपणे पुटपुटली.
रात्रीचे दहा वाजून गेले, अशोकला बाहेर पडून दोन तासांच्या वर झालेत कुठे गेला असेल हा. फोन करू का मी ह्याला, तीने फोन केला, फोन घरातच वाजत होता, अरे बापरे, फोनघरीचठेऊनगेलाहा.."
तीने सहज म्हणून त्याचा फोन हातात घेतला, त्याच्या वॉलपेपरवर दोघांचा लग्नाआधीचा फार जुना फोटो होता, ते जेव्हा पहिल्यांदा भेटले होते तेव्हाचा. फोटो पाहताच तिच्या डोळ्या समोरून चार वर्षांपूर्वीचा काळ झळकू लागला.
क्रमशः