A love affair in Marathi Love Stories by Amit Redkar books and stories PDF | ओढ प्रेमाची

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

ओढ प्रेमाची

गोवा,एक निसर्गरम्य ठिकाण, भारतातील आणि इतर सुंदर राज्यातील एक राज्य म्हणजे गोवा,
महेंद्र कारवार, गोव्यातील एका... थ्री स्टार हॉटेलचा मालक, गेल्या अनेक वर्षापासून गोव्यात वास्तव करत असतो....
एका छोट्याश्या हॉटेल पासून सुरवात करून एका मोठ्या हॉटेलचा मालक असलेल्या महेंद्रला एक मुलगी असते तिचे
नाव, ..........मोहिनी कारवार.
मोहिनी आपले हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण करून लंडन मधून गोव्यात आपल्या वडिलांच्या घरी येते.
आपली मुलगी बरेच दिवसांनी गोव्यात आल्यावर महेंद्र हॉटेलमध्ये एक छोटीसी पार्टी आयोजित करतो.
पार्टीच्या दिवशी गोव्यातील बरेच नामांकित लोक येत असतात. बरेच लोकांशी भेटीगाठी होतात बरेच जण मोहिनीला
पण स्वतःहाचे हॉटेल सुरू करण्यासाठी सल्ले देत असतात.
मोहिनी पण तेच स्वप्नं पाहून गोव्यात आलेली असते.
त्याच्य दरम्यान पार्टी मध्ये मोहिनीची,
एका प्रिया नावाच्या मुलीबरोबर ओळख होते.
प्रिया आणि मोहिनी एकत्र ड्रिंक करत असताना,
प्रिया मोहिनीला पुढच्या प्लॅन आणि करियर बद्दल विचारते.
मोहिनी प्रियाला म्हणते, की अजून काही ठरवले नाही, पण बहुतेक इकडेच एकादे हॉटेल घेणार आहे मी,
मोहिनी असे बोलल्यावर प्रिया तिला एक सल्ला देत म्हणते,
मोहिनी मी एक बोलू का.......?
मोहिनी हो बोलून विचारते. तेव्हा प्रिया तिला सांगते.
गोव्यात हॉटेल व्यवसाय वाईट असे काही नाही.
पण आता बरेच हॉटेल असल्यामुळे कॉम्पिटिशन खूप असणार......
शिवाय तुझ्या वडिलांचा व्यवसाय पण इकडेच आहे......
तू जर नवीन हॉटेल ओपन केले तर तुझ्या वडिलांच्या व्यवसायात नुकसान होऊ शकते.....
मोहिनीला प्रियाचे बोलणे पटू लागते .....
प्रिया तिला सांगते....
माझ्या मते तू गोव्यात नवीन हॉटेल ओपन करण्यापेक्षा मुंबई सुरू कर...

प्रियाने मुंबई म्हंटल्यावर मोहिनी पण एकटक तिच्याकडे पाहू लागते...
थोड्यावेळाने तिचे वडील पार्टी मध्ये मोहिनीच्या हॉटेल बद्दल सर्वांना सांगत असतात.... त्याचवेळी मोहिनी तिकडे
जाऊन वडिलांना म्हणते...
पापा मला तुमच्या बरोबर बोलायचे आहे!....
महेंद्र पण बाजुला येऊन विचारतो, काय झाले....? ,
मोहिनी वडिलांना म्हणतेय, तुम्ही माझ्या हॉटेल बद्दल आता काही बोलू नका.....
महेंद्र तिला विचारतो का काय झाले....? काही प्रॉब्लेम आहे का.....?
मोहिनी बोलते. हो पापा..... प्रॉब्लेम असे काही नाही.... पण माझा विचार बदलला आहे.....
महेंद्रला काहीच समजत नसते....
मोहिनी मग त्याला सांगते. पापा पार्टी झाल्यावर बोलुया! महेंद्र हो बोलुन तिला पार्टी एन्जॉय करायला सांगतो.
रात्री उशिरा जेव्हा मोहिनी आणि तिचे वडील महेंद्र घरी येतात. तेव्हा महेंद्र मोहिनीच्या हाताला पकडून सोफ्यावर
बसवतो. तिला विचारतो....
मोहिनी बेटा मगाशी पार्टी मध्ये तू काय बोलत होतीस...
मोहिनी म्हणाली पापा मी सांगते सर्व, तुम्ही असे प्यानिक होऊ नका......
वडिलांना सोफ्यावर बसायला सांगून मोहिनी पण बाजूला बसते....
वडिलांचा हात हातात घेऊन अगोदर वडिलांना पाणी पिण्यासाठी सांगते....
महेंद्र पण पाणी पिऊन झाल्यावर पुन्हा विचारतो...
मोहिनी वडिलांना म्हणतेय....
पापा मी हॉटेल ओपन करणार, पण गोव्यात नाही,
महेंद्र एकदम शांत पणे तिच्या चेहर्‍यावर पाहत राहतो.
मोहिनी पुन्हा म्हणतेय, मी हॉटेल ओपन करणार ते मुंबई मध्ये मोहिनी असे बोलल्यावर महेंद्र मोहिनीच्या डोळ्यात
एकटक पाहत राहतो..
काही वेळाने विचारतो... मोहिनी बेटा पण हा निर्णय का....?
मोहिनी म्हणतेय.. पापा गोव्यात आधीपासूनच तुमचे हॉटेल फेमस आहे.... त्यात अजून माझे हॉटेल झाले तर
आपल्या कमाईवर परिणाम होऊ शकतो.... आणि मुंबई मध्ये हॉटेल असले काय! की गोव्यात असले काय! व्यवसाय
कुठे तरी करायचा आहेच ना.....

आपल्या मुलीचे असे बोल ऐकल्यावर महेंद्र तिला म्हणतो. मोहिनी बेटा.... मग तू माझेच हॉटेल नव्याने सुरू कर....
मुंबईत कशाला जायला पाहिजे...  मला माझी मुलगी माझ्या जवळ हवी.....
मोहिनीने पुन्हा वडिलांचा हात हातात घेऊन, त्यांच्या जवळ येऊन त्यांना सांगितले.. पापा हे हॉटेल तुमचे आहे.. जे
तुमचे ते माझे पण आहे.... जर माझे एक हॉटेल गोव्यात आहे... तर मग मी दुसरे हॉटेल पुन्हा गोव्यात का ओपन
करू....?
मुंबई स्वप्नंनगरी आहे, मुंबईत स्वतःचा काय तरी व्यवसाय असावा असे प्रत्येकाची इच्छा असते, आणि त्याच
मायानगरीत मला एकादे हॉटेल ओपन करायचे आहे,  माझे हे स्वप्नं आहे, असे समजून मला मदत करा पापा.....
मोहिनीचा हट्ट आणि मुलीचे प्रेम... यामध्ये महेंद्र हरतो...
पुढे काही दिवसांनी मुंबईत जागा शोधायला सुरुवात करतो.
दलाल मार्फत एक जागा मुंबईतील मालाड परिसरात मोक्याच्या ठिकाणी मिळते.. महेंद्र स्वतःहा मालाडमध्ये येऊन
ती जागा पाहून घेतो...
दोन दिवसांनी मोहिनी सोबत पुन्हा मुंबईत मोहिनीला जागा दाखवण्यासाठी घेऊन येतो...
मोहिनीला ती जागा खूपच आवडते. नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असतो. मुंबईत साधारण थंडी जाणवत
असते..
मोहिनी आणि तिचे वडील जागा बघून झाल्यावर एका हॉटेल मध्ये जेवण करायला थांबुन असतात.... हॉटेलच्या
बाजूला एक बेस्ट बस स्टॉप असतो.... जेवण झाल्यावर मोहिनी महेंद्र बाहेर येतात... मोहिनी तिच्या ड्रायव्हरला गाडी
घेऊन या म्हणुन सांगते....बस स्टॉप जवळ वडिलांचा हात पकडून हॉटेलच्या बाहेर उभी असते...
वातावरण साधारण थंड असते... बराच वेळ होतो ड्रायव्हर गाडी घेऊन येत नाही, म्हणून महेंद्र, ड्रायव्हर कुठे गेला हे
पाहण्यासाठी पुन्हा हॉटेल मध्ये जातो.....
मोहिनी एकटीच बाहेर उभी असते...
त्याचवेळी एक कार जोरात येऊन एका लाइटच्या खांबाला आढळते... तो खांबा मोहिनीच्या अंगावर पडणार, तेच एक
मुलगा मोहिनीच्या हाताला पकडून स्वतःहा जवळ खेचून घेतो... मोहिनी पण घाबरून त्या मुलाला मिठी मारते...
काहीवेळ दोघेही त्याच्य अवस्थेत असतात.... थंड वातावरण आजुबाजूला वाहणारे वारे, हलकेच ऊन, अशा
वातावरणात मोहिनी एका मुलाला मिठी मारून उभी असते....
मोहिनीच्या ज्यावेळी लक्षात येते.. तेव्हा ती पटकन बाजूला होते... डोळ्यासमोर असलेले केस बाजूला करून समोर
पाहते तर, एक राजबिंडा, वी, शेफ सिक्स शमक.... असलेल्या बॉडीचा.. डोक्यावर कोंबड्याच्या तुरा प्रमाणे असलेले
बुरे केस, टोमॅटो सारखे लाल लाल गाल, आणि कपाळावर कुंकवाचा तिला, लावलेला एक तरुण उभा असतो.....

भाग 2
मोहिनी त्या मुलाला पाहातच राहते....
त्याच दरम्यान महेंद्र तिकडे धावत येतो.....
मोहिनीला जोरात आवाज देऊन तिला जवळ घेतो.....
तिला विचारतो, बेटा तू बरी आहेस ना....?
मोहिनी म्हणते.. हो पापा!
महेंद्र ड्रायव्हरला गाडी पुढे घेऊन येण्यासाठी सांगतो.....
रस्त्यावर सगळीकडे आरडा, ओरडा सुरू होतो.....
ज्या गाडीचा अपघात होतो त्या माणसाला बाहेर काढून घेऊन जात असतात......
मोहिनी पण आजूबाजूला पाहत असते.... तिची नजर त्या मुलाला शोधत असते......
पण त्या गर्दी मध्ये तो मुलगा कुठे निघून जातो,
समजलेच नाही.....
शेवटी मोहिनी आणि महेंद्र तिकडून निघून जातात....
त्या मुलाचे नाव माधव सावंत असते....
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातून काही वर्षापूर्वी एक कुटुंब मुंबईत रहायला आलेले असते...
त्या कुटुंबातील मुलगा म्हणजे माधव सावंत हा होता
माधवला आई असते... पण वडील त्याला माहितीच नसतात...
कारण त्याने वडिलांना कधीच पाहिले नव्हते...
माधवच्या आईचे नाव रागिणी सावंत असते....
रागिणी घरी पापड, लोणचे विकून आपल्या बरोबर
आपल्या मुलाला ही सांभाळत असते.....
माधवला हॉटेल व्यवसायात खूप रस असतो....
त्यामुळे बारावी नंतर तो हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करतो...
शिक्षण पूर्ण झाल्यामुळे नोकरीसाठी फिरत असतो.....
ज्या दिवशी मोहिनी आणि त्याची भेट होते....

त्या दिवशी पण माधव त्याच् हॉटेल मध्ये जॉबसाठी अर्ज करायला आलेला असतो..
संध्याकाळी मोहिनी आणि महेंद्र गोव्यात पोचतात
मोहिनी आपल्या रूममधे जाते...
रात्री झोपताना अचानक तिला सकाळी घडलेला प्रसंग आठवतो..
तिला माधवचा चेहरा सारखा, सारखाच दिसू लागतो... 
रात्रीची वेळ असते... 
बाहेर बर्‍यापैकी थंड वातावरण असते...
मोहिनी तिच्या रूमच्या बाल्कनीत येऊन उभी राहते...
अंगाला थंडी लागत असते.
पण मनात काय होत होते ते समजत नसते....
कारण इतके थंड वातावरण असताना पण मोहिनीला माधव आठवत असतो...
ती त्याच्या आठवणीत एकटक समोर दिसणार्‍या समुद्राकडे पाहत असते...
मुंबईत थंड वातावरण असल्यामुळे रात्री बरेच जण शेकोटी पेटवून उभ घेत बसलेले असताना.... तिकडे माधव येतो..
त्याचवेळी त्याचा मित्र त्याला विचारतो,
जॉबचे काय झाले रे माधवा..... 
माधव त्याला सांगतो की, कसला जॉब आणि कसले काय, अरे ज्या हॉटेल मध्ये जॉबसाठी जाणार होतो,
तिकडेच आज एक अपघात झाला,
शेवटी पूर्ण दिवस त्या हॉटेल मध्ये पोलीस येत राहिले,
म्हणुन त्यां हॉटेल मालकाने नंतर समोरून फोन केला की या असे सागितले.....
माधव आणि त्याचा मित्र शेकोटी करत बसलेले असतात....
त्याचवेळी माधवची आई माधवला आवाज देते....
म्हणुन माधव उठून उभा राहतो.. 
आईच्या दिशेने होकार देऊन निघत असतानाच त्याच्या
अंगावरुण काहीतरी खाली पडले आहे असे जाणवते.... माधवचा मित्र जे खाली पडते ते उचलून पाहतो...
तर ते एक ब्रेसलेट असते... तसेच ते एका मुलीचे ब्रेसलेट असते.....

शिवाय त्या ब्रेसलेट मध्ये काही डायमंड असतात..
म्हणजे ते ब्रेसलेट खूप महाग असणार यात शंका नव्हती... मित्राच्या हातात ब्रेसलेट पाहून माधव पण जरा विचारात
पडतो...

माधवचा मित्र त्याला विचारतो....

माधवा हे काय रे! कोणाचे आहे!

माधव ते स्वतःहा हातात घेऊन त्या ब्रेसलेटला पाहू लागतो... मग त्याच्या लक्षात येते ते कोणाचे ब्रेसलेट आहे...  
मित्र त्याला परत विचारतो...

माधव बोल यार, तेव्हा माधव त्याला सांगतो....

अरे हे ब्रेसलेट बहुतेक त्याच मुलीचे आहे,

जीला हॉटेलच्या बाहेर मी वाचवले होते,

मित्र विचारतो, म्हणजे
तेव्हा माधव बोलतो,
आज मी मालाड मैत्री पार्क जवळ एका हॉटेल मध्ये गेलो होतो,
तुला मगाशी बोललो ना, तो अपघात झालेला,
आणि पोलीस येत होते, मित्र बोलतो हो,
त्याचे काय...? माधव बोललो, तिकडेच एक मुलगी हॉटेलच्या बाहेर तिच्या गाडीची वाट पाहत होती, 
त्याचवेळी हा अपघात झाला, ती गाडी एका लाइट खांबाला आढळते, तो खांबा त्या मुलीवर पडणार, 
त्याचवेळी मी तिला माझ्या बाजूने खेचले,
तिने येऊन माझ्या छातीवर आढळत मला मिठी मारली, तेव्हा हे ब्रेसलेट माझ्या कॉलर मध्ये अडकले असणार,

पण असो जे झाले ते झाले,
हे ब्रेसलेट भरपूर महाग दिसते आहे रे,
मित्र बोलतो..... असेल 50 एक लाखाचे,
चल बरे झाले तुझे नशीब फळफळले,
माधव पटकन म्हणतो.... नाही यार, आपल्याला नको, 
ते पण एका सुंदर मुलीचे!..... तर नकोच,

मित्र लगेचच त्याच्या चेहर्‍यावर पाहत परत त्याला विचारतो....
काय बोलला तू, सुंदर मुलीचे, म्हणजे!
तू तिला अगोदर पाहिले ती कशी दिसते,
आणि मग मिठी मारली का....?
माधव मित्राच्या खांद्यावर हात ठेवून पुढे चालत, चालत बोलतो.
तसे काही नाही,
पण ती वेळच तशी होती,
मलाच नाही समजले,
मी त्यां बस स्टॉप जवळ का गेलो....? कारण मला तर हॉटेलच्या मागच्या बाजूला जायचे होते,
पण काय कोणास ठाऊक, मी आज नेमकी त्याच बस स्टॉप जवळ बस पकडायला गेलो.
तुला माहित आहे ज्यावेळी ती माझ्या मिठी मधून बाहेर आली ना,
तेव्हा एक वेगळाच रोमांच अंगात आला, 
काहीतरी होत होते जे मला समजत नव्हते,
पण काहीतरी जादू त्या मुलीत आहे,
बग आता तिचे नुसते ब्रेसलेट हातात आहे,
तर एक वेगळीच फील येते आहे,
असे वाटते की ती पण मला पाहते आहे,
या थंडीत ती समोर नसतानाही इतकी ऊब का जाणवत आहे तेच कळत नाही,

माधव  मोहिनीच्या विचारात त्या ब्रेसलेटला पाहत असतो.....
तर मोहिनी समुद्राच्या लाटा पाहत माधवला पाहत असते.......
त्याच दरम्यान थंड हवेची एक झुळूक येते...
दोघांच्या डोळ्याची पापणी मिटते...
डोळे बंद झाल्यावर दोघेही एकमेकांचा चेहरा पाहतात....

भाग 3
माधव मोहिनीचे ब्रेसलेट घेऊन घरी जाऊन झोपून जातो........
दुसर्‍या दिवशी सकाळी ते ब्रेसलेट स्वतःहाच्या पाकीटमध्ये ठेऊन पुन्हा नोकरीच्या शोधात फिरत असतो.....
मोहिनी पण मुंबईत ज्या ठिकाणी हॉटेल ओपन करणार आहे त्या ठिकाणी एका बिल्डिंगमध्ये ऑफिस भाड्याने
घेण्यासाठी ऑनलाईन चेक करत असते..... 
तेवढ्यात एक मेल तिला येतो......
ती जागा हॉटेलच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये असते.....
मोहिनी लगेचच त्यांना मीटिंग फिक्स करायला सांगते..... मुंबईत महेंद्र एक फ्लॅट पण बूक करतो.... 
कारण हॉटेल मुंबईत आहे म्हणजे आता मोहिनीला मुंबईत राहता येईल......
मालाड मध्ये एका अलिशान सोसायटीमध्ये मोहिनी रहायला जाते.....
मुंबईत मोहिनीचे एक ऑफिस, एक हॉटेल, आणि एक फ्लॅट, अशी प्रॉपर्टी तयार होते.....
मुंबईत मोहिनीला व्यवस्थित सेटल करून महेंद्र पुन्हा गोव्यात जाऊन स्वतःहाचे हॉटेल सांभाळायला सुरवात
करतो..... मोहिनी तिच्या ऑफिसमध्ये हॉटेलमध्ये काम करण्यासाठी काही जॉब ऑफर करत असते.....
ऑफिस आणि हॉटेलसाठी जॉब मिळेल अशी जाहिरात सर्व ठिकाणी करते......
हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या माणसाला प्राधान्य..... असेही जाहीर करते.....
माधव बरेच ठिकाणी जॉबसाठी ट्राय करत असतो....
पण त्याला हवे तसे यश मिळत नसते......
एक दिवस नेहमीप्रमाणे माधव आपल्या मित्रा सोबत सकाळी मॉर्निग वॉकसाठी मालाड परीसरात असलेल्या वॉकिंग
गार्डन मध्ये जातो.....

बाहेर बर्‍यापैकी थंड वातावरण असते.....
काहीजण शेकोटीची मझ्या घेत असतात.....
त्याचवेळी मोहिनी पण आपल्या मैत्रिणी सोबत मॉर्निग वॉकला येते....  
माधव आणि त्याचा मित्र समोरून धावत असतात..... मोहिनी आणि तिची मैत्रीण पण समोरून धावत येत
असतात...
तेव्हा अचानक एक म्हातारी आजी तिकडे चालत असताना रस्त्यावर पडते......
माधव, मोहिनी समोरासमोर त्या आजीच्या दिशेने धावत येत असतात.... 
माधव त्या आजीला हाताने सावरून पकडून बाजूला असलेल्या खुर्चीवर बसवतो......
ती आजी पाणी ,पाणी ओरडत असते....
पण माधव जवळ पाणी नसते....
त्यामुळे माधव पटकन मोहिनीच्या हातातून पाण्याची बाटली खेचून घेतो...... आणि
त्या आजीला पाजतो......
अचानक आपल्या हातातुन पाण्याची बाटली कोणीतरी काढून घेतली......
म्हणून मोहिनी, माधव जवळ येऊन त्याच्या खांद्याला हात लावणार, तेच माधव लगेच मागे फिरून पाहतो...
तर मोहिनी आणि माधवची नजर एक होते.....
माधवला पाहून मोहिनी एका वेळेसाठी एकटक बघत राहते....
माधव पण त्याच् पद्धतीने बघत राहतो.... 
तेवढ्यात माधवचा मित्र त्याला हाताने....  माधव! असा आवाज देतो....
दोघेही भानावर येतात.....
मोहिनी, माधवला पाहून म्हणते,
हाय!.... तू तोच ना...? त्या दिवशी मला वाचवले होते.... माधव हो बोलतो......
मोहिनी त्याला थॅन्क्स बोलते..... आणि
म्हणते की मी तुला आजुबाजूला पाहत होते.....
पण तू दिसलाच नाही.....
माधव म्हणाला..ती वेळ तशीच होती.....

आजुबाजुला भरपूर गडबड झाली होती,
आणि मला पण जरा घाई होती,
म्हणुन मी निघालो,
मोहिनी लगेचच पुढे येऊन स्वतःहाचे नाव सांगते....
माधव पण हात पुढे करून स्वतःहाचे नाव सांगतो.... एकमेकांच्या हाताचा स्पर्श झाल्यावर एक वेगळीच ऊब
दोघांनाही जाणवू लागते.....
त्याचवेळी दोघेही एकमेकांना पाहत राहतात.....
आजुबाजूला थंड वातावरण,,, आणि एकमेकांचा हाताचा स्पर्श,,,, एक वेगळाच रोमांच जाणवत असतो...
मोहिनीची मैत्रीण मागेच उभी असते.... माधवचा मित्र पुढे येऊन, लगेचच माधवच्या कानात बोलतो....
माधवा!... हे सार्वजनीक गार्डन आहे.....
माधव पटकन मोहिनीचा हात सोडून देतो....
मोहिनीची मैत्रीण तिच्या हाताला पकडून तिला पुढे घेऊन जाते.....
दोघेही एकमेकांना मागे फिरून पाहत राहतात.... थोड्यावेळाने मोहिनी घरी येते.....
पण तिला खूप वेगळा फील येऊ लागते....
ती स्वतःहा स्वतःला बोलू लागते की.....
आपण त्याला फक्त नाव विचारले....
तो राहतो कुठे.....? काय करतो...?
या गोष्टी का नाही विचारल्या.....? असो...!
तो उद्या पण येईलच ना!....
तेव्हा विचारूया!.....
असे बोलुन मोहिनी तयार होऊन ऑफिसमध्ये जाते.....
माधव नेहमीप्रमाणे एका हॉटेलमध्ये जॉबसाठी जात असतो.....
पण त्याला तिकडे पण अपयश येते......
त्यामुळे तो त्याच्या एरियामध्ये एका चहाच्या टपरीवर चहा पीत बसलेला असतो.....
त्याचवेळी त्याचा एक मित्र तिकडे येतो....

दोघेही गप्पा करत असताना......
तो मित्र त्याला सांगतो......
अरे हॉटेल मोहिनी रेस्टॉरंटमध्ये जॉब ऑफर आहे,
तू जाऊन बग,
तो मित्र माधवला पत्ता देतो.....
माधव पण लगेचच त्या पत्त्यावर पोहोचतो...   
तर तिकडे एका हॉटेलचे बांधकाम सुरू असते... 
तिकडे एक जाहीरात असते....
जॉबसाठी समोरील बिल्डिंगमध्ये येऊन भेटा......
माधव त्या बिल्डिंगमध्ये जातो......
मोहिनीच्या ऑफिसचे नाव.....
मोहिनी हॉटेल मॅनेजमेंट,,,,, असे असते......
माधव त्याच ऑफिसमध्ये येतो.....
तिकडे आधीच बरेच जण येऊन बसलेले असतात...  आधीच्या 5 जणांचे सर्व डॉक्युमेंट मोहिनीच्या केबिनमध्ये
ऑफिस बॉय आणून देतो....
मोहिनी एक ,एक करून सर्वे डॉक्युमेंट चेक करून, एक एकाला आतमध्ये बोलवत असते.....
मोहिनी ऑफिस बॉयला सांगते की,
आता कोणाचेही डॉक्युमेंट आत आणू नका.. 
बाहेरच घेऊन ठेवा! ऑफिस बॉय बाहेर येऊन तसेच करतो......
बाहेर जवळ ,जवळ सहा, सात डॉक्युमेंट घेऊन ठेवले जातात.....
डॉक्युमेंट घेऊन सर्वांना जाण्यासाठी सांगतात... 
तुम्हाला फोन करून बोलण्यात येईल असे सागितले जाते......
माधव पण निघून जातो.....
संध्याकाळी मोहिनी घरी जाण्यासाठी निघते..   
तेव्हा ऑफिस बॉय तिला सात डॉक्युमेंट अजून देतो..  

ती सांगते.... हे सर्व मी घरी चेक करते, असे बोलुन ती डॉक्युमेंट घेऊन निघते.....
बाहेर थंड वातावरण बरेच असते..   
थंडीमुळे रहदारी फारसी नसते......
त्याचवेळी मोहिनी पण आपल्या कार मधून निघत असते.. . पण तिच्या सोबत जे डॉक्युमेंट असतात,
ते तिच्या हातातून उडू लागतात.... 
कारण वातावरण थंड असल्याने हवेचे प्रमाण पण वातावरणात खूप असते.....
त्यामुळे सर्व डॉक्युमेंट तिच्या हातातून पडतात..   
ती चटकन एक ,एक डॉक्युमेंट उचलत असताना.....
तिची एका डॉक्युमेंटवर नजर जाते.....
त्या डॉक्युमेंटवर नाव असते......
माधव रागिणी सावंत,
आणि सोबत त्याचा फोटो पण असतो... 
मोहिनी ते डॉक्युमेंट हातात घेऊन एकटक पाहत असते.... त्याच दरम्यान पुन्हा हवेची झळक येते.....
तिच्या हातातुन डॉक्युमेंट उडून जातात...
त्याचवेळी मोहिनी कसलीच पर्वा न करता
त्या डॉक्युमेंटच्या मागे धावू लागते.....
तितक्याच तिकडे एक बाइक येऊन उभी राहते.... 
त्या बाईकवर असलेला तरुण बाईक मोहिनीच्या दिशेने घेऊन येतो....
मोहिनीच्या डोळ्यासमोर बाईकच्या हेड लाइटचा प्रकाश येतो......   
म्हणुन ती डोळ्यासमोर हात पकडून उभी राहते...   
हळूच डोळ्यासमोरचा हात बाजूला करते....
तर समोर माधव उभा असलेला दिसतो.......

भाग 4

समोर माधवला पाहून मोहिनी पुन्हा स्वतःहाला सावरून एका जागीच उभी राहते.....
माधव पण बाईक बाजूला करून मोहिनी जवळ येतो..... तिला म्हणतो.....
हाय तू इकडे कशी काय.......?
मोहिनी अगोदर गप्प राहते.....
मग बोलते......
मी इकडे एका ऑफिस मध्ये आले होते......
पण तू कसा आलास......?
तेव्हा माधव म्हणाला....... मी मेडिसिन घेण्यासाठी आलो होतो....
वातावरण थंड असल्यामुळे मोहिनी हाताची घडी करून उभी राहते......
तिला असे पाहून माधव तिला म्हणतो......
मोहिनी तू गाडीत जाऊन बस......म्हणजे तुला फारसे थंड नाही वाटणार......
मोहिनी माधवला बाय बोलुन कार जवळ जाते....
कारमध्ये बसुन कार घेऊन पुढे जाते.....
माधव पण मागून येत असतो.....
थोड्याअंतरावर गेल्यावर अचानक मोहिनीची कार बंद होते... मोहिनी बरेच प्रयत्न करते.... पण कार सुरू होत
नसते... शेवटी ती कारचे बोनेत उघडून चेक करु लागते.....
पण तिला काहीच समजत नसते.....
त्याचवेळी मागून माधव पण येत असतो.....
माधवला समोर मोहिनीची कार उभी दिसते....
मोहिनी पण पुढे काहीतरी करताना दिसते......
म्हणुन माधव स्वतःहाची बाईक उभी करून मोहिनी जवळ येतो.....
मोहिनी माधवला पाहून स्वतःला सुखरुप फिल करते.... माधव मोहिनीला विचारतो.... काय झाले.....?
तू इतके थंड वातावर असतानाही इतकी घामाघूम का झाली आहेस.....
मोहिनी माधवला म्हणतेय...
माझी कार बंद झाली आहे....

सुरूच होत नाही.....
माधवला कार मधले फारसे समजत नसते....
म्हणुन मग माधव एका ओळखीच्या मेकॅनिकलला कॉल करतो.... 
तो मेकॅनिकल घटना स्थळी पोहोचतो....
त्याचे नाव मणी असते.....
माधव मणीला गाडी चेक करायला सांगतो......
मणी गाडी चेक करतो...  
तर त्याला गाडीचा प्रॉब्लेम समजतो.....
तो माधवला सांगतो की,   “गाडी गॅरेज मध्ये घेऊन जावी लागेल.....
कारण याची क्लच वायर तुटली आहे.... 
मोहिनी विचारते..... किती वेळ लागेल.....
तेव्हा मणी म्हणतो......
मॅडम बहुतेक उद्याच होईल.....
तुम्ही गाडी सोडून जावा.....
कारण आता 10 वाजले आहे..... गाडीचे समान मिळणार नाही.....
मोहिनी एकदम टेन्शन मध्ये येऊन माधवच्या चेहर्‍यावर पाहू लागते......
काही वेळानंतर कारची चावी मणीच्या हातात देऊन त्याला घरचा पत्ता देते आणि सांगते.....
उद्या कार दुरुस्त झाली की,   “याच पत्तावर आणून द्या.... मणी हो बोलुन, कार रोडच्या कडेला पार्क करतो....
आणि निघून जातो......
मोहिनी ऑटो रिक्षासाठी आजुबाजूला पाहू लागते..... तेवढ्यात माधव तिकडे बाईक घेऊन येऊन उभा राहतो....    
दोघेही एकमेकांना नाजुक नजरेने न्याहाळू लागतात...  माधव मोहिनीला इशारा करून बाईकवर बसायला सांगतो..
मोहिनी बाईकवर बसण्याचा प्रयत्नात पटकन तोल जाऊन धडपडते......
माधव पटकन तिच्या हाताला पकडून तिला सावरतोय,
पुन्हा दोघेही एकमेकांना पाहू लागतात.....
माधवच्या हाताला पकडून मोहिनी बाईकवर बसते....

माधव बाईक सुरू करतो.... पुढे चालू लागतो....
त्याच् दरम्यान थंड वातावरण असल्यामुळे भरपूर गारवा अंगाला जाणउ लागतो.....
माधव मोहिनीला म्हणतो, तुझी ओढणी चेहर्‍यावर गुंडाळून घे, म्हणजे जास्त गारवा नाही वाटणार,
मोहिनी तसेच करते, पण अचानक एक स्पीड ब्रेकर समोर येतो.....
बाईक थोडी धडपड करू लागते....
त्याचवेळी मोहिनी घाबरून माधवला मागून घट्ट पकडून धरते मोहिनीची अशी अचानक मारलेल्या मिठीची जाणीव
जेव्हा माधव होते.....
तेव्हा एक वेगळाच रोमांच अंगात येऊ लागतो... 
ते काय असते...
ते कधीच समजले नाही....
पण असे काहीतरी होत होते की,   “एकाद्या लाइटच्या बटनावर चुकून जेव्हा हात लागतो....
आणि त्यावेळी जी फील येते....
तीच फील दोघेही अनुभवू लागले.....
मोहिनी त्याच फीलमध्ये माधवच्या पाटीवर डोक ठेऊन डोळे बंद करून आहे त्या अवस्थेत राहते....
हिवाळ्याचे थंड वातावरण त्यात बाईकचा प्रवास...
आजूबाजूचा गारवा, आणि एकमेकांचा शरीराचा गरम स्पर्श....
दोघांनाही प्रेमाची पाहिली चाहूल लागली होती.....
काही वेळानंतर मोहिनीची बिल्डिंग येते.....
माधव बाईक बिल्डिंगच्या गेट जवळ उभी करतो....  मोहिनीला आवाज देतो...  
पण मोहिनी शांत असते.....
म्हणुन माधव पुन्हा तिला आवाज देतो.....
तेव्हा ती एकदम दचकून जागी होते....
माधव तिला म्हणतो....
मोहिनी तुझे घर आले आहे.....
मोहिनी आजुबाजूला पाहू लागते.. ..

तर समोर तिची बिल्डिंग दिसते....
ती पटकन बाईक वरुण उतरून खाली उभी राहते.... चेहर्‍यावर असलेली ओढणी काढून डोळ्यासमोर आलेले केस,
हाताने बाजूला करून, हळूच मान वर करुन, माधवला पाहते.....
गालातल्या गालात हसून.. धावत, धावत बिल्डिंगच्या गेट जवळ जाते....
पुन्हा मागे फिरून हाताने माधवला बाय करते....
माधव पण हाताने बाय करतो....
बाइक सुरू करून निघून जातो...
घरी आल्यावर मोहिनी, जे काही घडले, तेच तेच आठवत बेडरूम मध्ये जाते.....
माधव पण घरी येतो... तेव्हा त्याची आई त्याला जॉब बद्दल विचारते..
तेव्हा तो म्हणतो की,   “मोहिनी रेस्टॉरंट, मध्ये डॉक्युमेंट दिले आहेत.... उद्या समजेल....
तेव्हा रागिणी विचारते..... “मोहिनी रेस्टॉरंट,
नवीन हॉटेल ओपन होते आहे का.....?
तेव्हा माधव म्हणाला, आई कोणीतरी गोव्यातील मालक आहे.....
मुंबईत पहिल्यांदा हॉटेल व्यवसाय करणार आहे....
असे आज त्याच्या ऑफिस मध्ये चर्चा सुरू होती.... गोव्यातील हॉटेल असे बोलल्यावर, रागिणी एकदम जोरजोरात
स्वास् घेऊन ओरडून बेडवर पडते.....
माधवच्या आईला दम्याचा त्रास असतो.... 
त्यामूळे तिला पंप द्यावा लागत असतो.....
माधव पटकन आत मधून पंप घेऊन येतो..... 
आईच्या तोंडावर धरतो.....
थोड्यावेळाने रागिणी शांत होते.....
माधव आईच्या समोर बसुन तिला विचारतो.....
आई गोव्या बद्दल बोलले तर तुला नेहमी त्रास का होतो....? मागे एकदा मी गोव्यात पिकनिकला जात होतो, तर तू
परवानगी नाही दिलीस, असे का.....? आई,

रागिणी नेहमीप्रमाणे पुन्हा माधवला ओरडून विषय टाळते......

माधव पण मग आईला जास्त जबरदस्ती नाही करत..... आईला व्यवस्थित झोपऊन माधव त्याच्या माळ्यावर
त्याच्या खोलीत जातो.....
बेडवर पडलेल्या असताना, त्यालाही मोहिनी आठवू लागते... मोहिनीची आठवण काढत असताना त्याच्या मोबाईलवर
एक मेसेज येतो......

उद्यापासून ऑफिस जॉइन करा....
तुम्हाला जॉब मिळाला आहे..... “मोहिनी रेस्टॉरंट,

माधव तो मेसेज पाहून एकदम उड्या मारत पुन्हा खाली येतो....
आई जवळ येऊन तिला मिठीत घेऊन बोलतो.....
आई मला मोहिनी रेस्टॉरंट मध्ये जॉब मिळाला.....
त्यांचा मेसेज आला आहे.....
रागिणी लगेचच देवी आईच्या फोटो जवळ येऊन हात जोडून देवीला म्हणतेय......
आई तुझ्या कृपेमुळे हा जॉब मिळाला आहे.....
माझ्या माधव सोबत रहा....
आम्ही लवकरच तुझ्या दर्शनासाठी येऊ,
दोघेही हात जोडून उभे राहतात.....

भाग 5
दुसरा दिवस उजाडतो..... नेहमीप्रमाणे माधव आईच्या पाया पडून, देवीचे दर्शन घेतल्यानंतर, बाहेर निघतो.....
काही वेळानंतर तो मोहिनीच्या ऑफिस मध्ये येतो....
बरेच जण बसलेले असतात...... 
त्याचवेळी माधव रात्रीचा मेसेज समोरील व्यक्तीला दाखवतो....
समोरील व्यक्ती, त्याचे नाव विकी असते.....
विकी ऑफिस बॉयचे काम करत असतो....    

माधवचा मेसेज घेऊन आतमध्ये जातो......
आतमध्ये मोहिनी असते..... 
ऑफिस बॉय तो मेसेज मोहिनीला दाखवू लागतो.....
मोहिनी मेसेज पाहते....
लगेचच उठून उभी राहते.... 
ऑफिस बॉयला सांगते.....
या माणसाला आत पाठवून द्या... !
ऑफिस बॉय निरोप घेऊन निघून जातो...  
मोहिनी केस वैगरे व्यवस्थित करून खुर्चीवर बसून राहते....
तेवढ्यात माधव दरवाजा जवळ येऊन आत येऊ का विचारतो.....?
मोहिनी बोलते...  हो या! माधव आत येऊन नजर उचलून समोर पाहतो, तर समोर मोहिनी असते.....
मोहिनी पण माधवला पाहात उभी राहते...  
एका वेळेसाठी दोघेही हे विसरून जातात की,  
“माधव जॉबसाठी आला आहे.....
तेवढ्यात ऑफिस बॉय पुन्हा आत येऊन मॅडम असा आवाज देतो......
मोहिनी भानावर येते...... माधव पण शांत उभा राहतो...... ऑफिस बॉय म्हणतो.....
मॅडम कोणीतरी आले आहे! तुम्हाला भेटायचे आहे बोलते....  मोहिनी विचारते कोण आहे.....? तेव्हा ऑफिस बॉय
बोलतो....
महेंद्र नाव सागितले......
मोहिनी पटकन बोलते.... आरे ते माझे वडील, या ऑफिसचे मालक आहेत, घेऊन ये त्यांना आत,
ऑफिस बॉय महेंद्रला आत घेऊन येतो... 
मोहिनी लगेचच वडिलांना मिठी मारते....
माधव समोर उभा असतो....
मोहिनी वडिलांना खुर्चीवर बसायला सांगते....

तेवढ्यात माधव म्हणतो.... मॅडम मी नंतर येऊ का......? माधव असे बोलल्यावर मोहिनी वडिलांना म्हणतेय, पापा
याला ओळखले का.....? महेंद्र बोलतो नाही बेटा! कोण आहे हा...?
तेव्हा मोहिनी म्हणतेय, पापा हा तोच मुलगा आहे, ज्याने मला त्या दिवशी हॉटेलच्या बाहेर वाचवले होते... .. .
महेंद्र लगेचच उठून उभा राहतो... थोडे पुढे चालून, माधव जवळ येतो.... माधवच्या डोळ्यात पाहू लागतो...
तेव्हा एक वेगळाच फील त्याला जाणवत असते.....
महेंद्र माधवच्या हाताला पकडून त्याला थॅन्क्स बोलतो...  त्याचवेळी माधवला पण काहीतरी वेगळे जाणवत असते...
माधव पटकन हात बाजूला करतो...
मोहिनी वडिलांना म्हणतेय, पापा हा आपल्या ऑफिस मध्ये जॉबसाठी आला आहे.....
हा उत्तम कूक आहे.... 
महेंद्र मोहिनीला म्हणतो ठीक आहे... 
याचे डॉक्युमेंट चेक कर, याची एक टेस्ट घेऊ, मग याला नोकरीचे लेटर दे,   मोहिनी वडिलांना हो बोलते....
माधवला सांगते, माधव अभिनंदन! तुला हा जॉब ऑफर झाल्याबद्दल,
माधव पण थँक्स बोलुन निघून जातो...
मोहिनी वडिलांना घेऊन घरी येते... 
माधव घरी येतो...
तेव्हा रागिणी त्याला जॉबबद्दल विचारते....
माधव जॉब मिळाला आहे असे सांगतो....
दोघेही जेवण करत असताना, गप्पा चालू असतात, रागिणी माधवला पहिल्या दिवशी ऑफिस मध्ये काय झाले,
त्याबद्दल विचारू लागते.....
माधव जे घडले ते सांगत असतो.... अजून एक गोष्ट माधव रागिणीला सांगतो ती,  “म्हणजे महेंद्र बद्दल!
माधव बोलता, बोलता पटकन बोलुन जातो की,  “महेंद्र सरांनी, अगोदर टेस्ट करायला सागितले आहे....
येवढे नुसते ऐकल्यावर रागिणी पुन्हा विचारते कोणाबद्दल बोलत आहेस तू....?
तेव्हा माधव म्हणतो मोहिनीचे वडील त्यांचे नाव महेंद्र आहे.....
रागिणीला पुन्हा दम्याचा त्रास होऊ लागतो....
माधव लगेचच तिला पंप देऊन शांत करतो... 
थोड्यावेळाने आईला झोपायला सांगून बाहेर फेरफटका मारायला जातो....

वातावरण थंड असल्यामुळे बाइक घेऊन न जाता चालत फिरत असतो......
त्याच दरम्यान त्याचा मित्र पण तिकडेच येतो......
मित्र माधवला जॉबबद्दल विचारतो......
माधव सर्व सांगतो.....
मग दोघेही आईस्क्रीम पार्लरमध्ये जाण्याचे ठरवतात.... दोघेही बाइकने जातात.....
आईस्क्रीमच्या दुकानात माधव आत जातो..... 
दोन आईस्क्रीम द्या! असे नुसते बोलतो.....
तर समोर मोहिनी पण आईसक्रीम घेण्यासाठी आलेली असते.....
मोहिनी माधवला पाहून विचारते...  अरे तू!
माधव पण बोलतो.....मोहिनी मॅडम तुम्ही.....
तेव्हा मोहिनी त्याला बोलते....
मला मॅडम नको बोलु! मोहिनीच बोल!
दोघेही आईस्क्रीम घेऊन बाहेर येतात....
माधवचा मित्र त्याला पाहतो थोडा पुढे येऊन उभा राहतो... मोहिनी आणि माधव एकत्र चालत असतात....
चालता, चालता दोघांची हाताची बोटे एकमेकांना स्पर्श करत असतात.....
दोघेही एकमेकांचा सहवास पाहत असतात.....
पण तेवढ्यात माधवचा मित्र समोर येतो....
मित्राला पाहून दोघेही थोडे लांब होतात.....
मोहिनीला पण तिचे वडील आवाज देतात....
मोहिनी पण हो पापा! बोलुन धावत, धावत कार जवळ जाते...
माधव आणि त्याचा मित्र बाइक सुरू करतातच, मोहिनी हाताने बाय करते.....
माधव पण बाय करतो.....
माधव आणि त्याचा मित्र पुन्हा घरी येतात.....
स्वतःहाच्या घराजवळ आल्यानंतर माधव मित्राला मोहिनी कोण आहे, त्याबद्दल सांगू लागतो....

माधव मित्राला सांगतो.... यार मला या मोहिनी बद्दल वेगळीच फील होते... काय होते ते समजत नाही, पण एक
ओढ आहे जी तिच्या जवळ खेचत असते.....
कदाचित ओढ प्रेमाची तर नसेल ना....?
सर्व ऐकून झाल्यावर मित्र त्याला सांगतो की,  “माधव कोणतेही पाऊल टाकण्याच्या आधी तुझ्या परिस्थितीचा
विचार कर......
कारण तू ज्या मोहिनी बद्दल बोलत आहेस, ती तुझी बॉस आहे, शिवाय खुपच श्रीमंत पण आहे, काही श्रीमंत मुली
चांगल्या पण असतात, आणि वाईट पण!
मोहिनी नेमकी कशी आहे हे अजून तुला नाही माहिती... म्हणुन जे काही करशील ते जपूनच!
तुझ्या आईचा विचार अगोदर कर, कारण तिला दम्याचा त्रास आहे....
मित्राचे बोलणे माधव मनापासुन ऐकून घेतो....
नंतर दोघेही घरी जातात.... 
घरी आल्यावर माधव झोपायला जातो....
तेव्हा पुन्हा त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो.....
त्यात लिहिले असते... हाय मी मोहिनी! माझ्या बरोबर मैत्री करणार का....?

भाग 6
माधव पण हो, असा मेसेज पाठवतो....
समोरून मोहिनी परत मेसेज पाठवते की, “उद्या ऑफिस मध्ये भेटूया, गुड नाईट!
दुसर्‍या दिवशी नेहमीप्रमाणे माधव ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघतो.....
त्याची आई त्याला देवीचा अंगारा लाऊन बाय करते...... माधवचा पहिला दिवस असतो....
माधव ऑफिस मध्ये येतो....
ऑफिसमध्ये सर्वजण माधव बरोबर ओळख करून घेतात. थोड्यावेळाने माधव मोहिनीच्या केबिनमध्ये जाऊन,
तो आल्याची अपडेट देतो.....
जसा माधव आत येऊ का विचारतो....? त्याचवेळी मोहिनी नजर वरती करून पाहते, तर माधव असतो, ती माधवला
आत ये! बोलते..

दोघेही एकत्र समोरासमोर बसतात.....
मोहिनी माधवला डॉक्युमेंट दाखव म्हणते....
माधव डॉक्युमेंट देत असतांना त्याचा हात मोहिनीच्या हाताला स्पर्श करतो....
त्याचवेळी माधव हात मागे घेतो, मोहिनी पण पुन्हा नजर उचलून माधवकडे पाहते.....
तेवढ्यात माधव नजर खाली करतो....
मोहिनी, माधवचे सर्व डॉक्युमेंट पाहते... 
आणि त्याला सांगते... तु जेवण बनवतो! तेव्हा माधव हो म्हणतो! मग मोहिनी त्याला सांगते की, “तू आपल्या
मोहिनी रेस्टॉरंटमध्ये एक आचारी म्हणुन काम करशील का....?
तेव्हा माधव म्हणतो, मला आवडेल! मोहिनी त्याला जॉब
लेटर देते......
आणि सांगते. आपले हॉटेल अजून तयार नाही झाले आहे... 
पुढच्या महिन्यात होईल, तो पर्यन्त तु इकडे ऑफिसमध्ये काम कर. नवीन ,नवीन पदार्थ कसे करता येतील वैगरे
माहिती करून घे.....
माधवला मोहिनी बोलते की, “मी तुला तुझे टेबल दाखवते. असे बोलुन दोघेही उठून उभे राहतात....
एकत्र दरवाजा जवळ जात असताना, अचानक एकमेकांना धडकतात......
मोहिनी डोके चोळत, माधव पण डोके चोळत पुन्हा एकमेकांना पाहत उभे राहतात.....
माधव मागे होऊन मोहिनीला जागा करून देतो....
मोहिनी हसून पुढे जाते....
दोघेही एकत्र केबिनच्या बाहेर येतात....
मोहिनी माधवला एका टेबलावर घेऊन जाते....  
आणि सांगते.....
तु इकडचे बस! माधव थँक्स बोलुन त्या टेबलावर बसतो........
मोहिनी,  पुन्हा आपल्या केबिनमध्ये जाते....
माधव आपले काम करत असतो.....
मोहिनी पण कामात व्यस्त असते.....  

त्याचवेळी तिचे लक्ष माधव जवळ जाते....
ती एकटक माधवला पाहत असते..... माधव पण कामात व्यस्त असतो..... अचानक त्याच्या हातातून पेन खाली
जमिनीवर पडते......
त्यामुळे तो पेन उचलून घेण्यासाठी त्याची मान फिरवून पाहतो......
तर मोहिनी दिसते..... त्याची आणि मोहिनीची पुन्हा नजर एक होते......
मोहिनीला जेव्हा समजते की, “माधवने तिला पाहिलं,
त्याचवेळी ती नजर फिरवून कामात लक्ष देत असे........ संपूर्ण दिवस हेच चालू असते....
मोहिनी, माधवला पाहते...... माधव, मोहिनीला पाहतो..... पुढे काही दिवस हेच सुरू असते....  पण माधव काहीच
हालचाल करत नव्हता..... माधव समोरून काहीच बोलणार नाही..... हे मोहिनीला समजले होते.....
संध्याकाळी ऑफिस मधून निघाल्यावर माधव त्याच्या ऑफिसच्या मित्रांबरोबर एकत्र बाहेर येताना मोहिनी पाहते......
नेमके त्या दिवशी माधव बाईक घेऊन न येता, बसने प्रवास करत असतो.....
त्या दिवशी पण बस स्टॉपवर उभा राहून, आपल्या मित्रांना बाय करत असतो......
मोहिनी त्याचवेळी तिची कार घेऊन बस स्टॉप जवळ येते... मोहिनी अचानक आल्यावर माधव आणि अजून काही
स्टाफ मेंबर तिला विचारतात.....  मॅडम काय झाले.....?
तेव्हा मोहिनी म्हणतेय, काही नाही झाले, पण माधव तुझ्या जवळ एक काम आहे..... माधव विचारतो काय
झाले....? तेव्हा मोहिनी म्हणतेय, आपल्या हॉटेलचे काम होत आले आहे...... त्यामुळे तुला माझ्या सोबत घेऊन
जाण्यासाठी आले....
चल आपण हॉटेलचे काम पाहून येऊ.....
मोहिनी, माधवची बॉस असते..... त्यामुळे तो तिला नाही बोलू शकला नाही.....
शेवटी तो तिच्या कारमध्ये बसतो.....
काही वेळाने मोहिनी गाडी, मालाडच्या समुद्राजवळ घेऊन येते......
माधव जेव्हा पाहतो.... तर तिला विचारतो... मोहिनी मॅडम आपण हॉटेलमध्ये जाणार होतो ना.....?
मोहिनी म्हणतेय. तुला खरेच असे वाटले की, “आपण हॉटेलमध्ये जाणार आहे.... माधव कार मधून बाहेर येतो....
सरळ किनार्‍या जवळ चालत राहतो......
तेवढ्यात मोहिनी पण मागे, मागे येते.....
सरळ माधवचा हात पकडून त्याला थांबवते.....

माधव पण थांबतो.... मोहिनी त्याला विचारते....
माधव काय प्रोब्लेम आहे.....? माधव म्हणतो...
म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे....?
मोहिनी बोलते.... तुला चांगलेच माहिती आहे मला काय म्हणायचे आहे......
माधव पुन्हा तिकडून पुढे, पुढे चालू लागतो......
मग मोहिनी सरळ त्याच्या पुढे येऊन उभी राहते.....
माधव तिच्या नजरेला नजर देत नसतो.....
म्हणुन मग मोहिनीच त्याच्या नजरेला नजर देऊन पुन्हा विचारते......
आता बोल काय झाले आहे.....?
माधव पण नजरेला नजर देत बोलतो.....
प्रेम करतो तुझ्यावर, पसंद करतो तुला....
हेच झाले आहे...असे काय आहे...?
जे मला तुझ्या मध्ये ओढत आहे....मलाच नाही समजत.
मोहिनी,पण माधवचे बोलणे ऐकून मनातल्या मनात खुश होते....
आणि बोलते...हेच मला तुझ्या तोंडातून ऐकायचे होते....
कारण मी पण तुझ्यावर प्रेम करते.....

भाग 7
मोहिनी पण आपल्या प्रेमाची काबुली देते.....
माधव पण मनातल्या मनात, खुप खुष होतो....
मोहिनी विचारते.. माधव पण मग तू गेले काही दिवस मला असा इग्नोर का करत होतास.....?
माधव म्हणतो हो! मी प्रेम करतो तुझ्यावर!
पण तु माझी बॉस आहेस.....
मोहिनी तू जेवढे एका दिवसात खर्च करतेस ना! तेवढा पगार तू मला महिन्याला देतेस.....

मी एका चाळीत राहतो.....
आपली बरोबरी होणार आहे का.....?
मोहिनी एकटक माधवला पाहते..... तोडी पुढे येऊन माधवच्या जवळ येते.....
म्हणते बस! हेच कारण आहे, मग त्यात माझी काय चूक, प्रेमात लहान मोठे, उंच कमी, श्रीमंत गरीब, आणि
कोणत्याही प्रकारचा भेदभाव, नसतो.....
प्रेम, प्रेम असते....... माधव तू अजून फक्त 26 वर्षाचा आहेस..... आणि मी 22,
आपल्या जवळ अजून संपूर्ण आयुष्य आहे.... 
काय तुला स्वतःहावर विश्वास नाही.....?
आज जे माझ्याकडे आहे ते सर्व माझ्या वडलांना कोणी फुकट नाही दिले......
त्यांनी ते कामवाल, स्वतःहाच्या मेहनतीने...... 
मी पण तेच करते..... तू पण करू शकतो ना, तुझ्या मध्ये ती धमक आहे..... तू पण उद्या माझ्या वडिलांच्या
बरोबरीला येऊ शकतो......
बस गरीब आणि श्रीमंत या एका गोष्टीचा विचार करून तू प्रेम नाकारत होतास.....?
माधव, मोहिनीचे ऐकत उभा असतो.....
थोड्यावेळाने तो तिच्या तोंडावर बोट ठेवून तिला गप्प करतो....
ती पण माधवला पाहातच राहते...  
माधव, मोहिनीला म्हणतो, तू बरोबर बोललीस, मी पण करू शकतो, आणि करेन.....
पण तुझ्या वडिलांचे काय....? ते तयार होतील आपल्या प्रेमाला.....
तेव्हा मोहिनी म्हणते.... माझ्या वडलांना तू अजून ओळखूच शकला नाही....
ते खूप शांत आहेत, प्रेमळ आहेत, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते त्यांच्या कोणत्याही गोष्टी, माझ्यावर लादत
नाही.......
ते खूप एकटे आहेत, मी दहा वर्षाची असताना माझी आई मला सोडून गेली, लंडन मध्ये एकदा भरपुर बर्फ पडला,
त्यात माझ्या आईचा अपघात झाला.....
त्यानंतर माझे वडील एकटेच राहिले......
म्हणूनच त्यांनी माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या.....
मी जे मागते, मी जे करेन, त्यांना त्या सर्व गोष्टी मान्य असतात......

मग तुझ्या बाबतीत पण ते मला का नाही म्हणणार....? 
माधव, मोहिनी जवळ येतो....
समुद्र किनारा, आणि त्यात प्रेमाची कबुली,,
एक मुलगा, आणि एक मुलगी,
हिवाळी थंड वातावरण,
एक वेगळाच अनुभव, माधव आणि मोहिनीला जाणवत होता.....
एकमेकांना समोरासमोर पाहत असताना....
अचानक जोरात हवेची झुळूक येते.....
दोघेही एकमेकांना गट्ट पकडून ठेवतात....
एकमेकांच्या नजरेला नजर देत असताना मोहिनीचे केस उडून तिच्या चेहर्‍यावर येतात......
माधव आपल्या बोटांनी तिचे केस बाजुला करतो.....
तेच मोहिनी लाजून मान खाली करते......
माधव तिच्या चेहऱ्याला हळूच उचलून पुन्हा तिच्या डोळ्यात पाहतो......
तर समुद्राचे प्रतिबिंब तिच्या डोळ्यात दिसू लागते.... आकाशात चंद्र, आजुबाजुला चांदण्या, जणू दोघांच्याही प्रेमाचा
आनंद पाहण्यासाठी आले आहेत असे वाटत होते..... त्यात थंड वातावरणात मोहिनी चटकन माधवला मिठी मारते.
थंड वातावरणात एकमेकांच्या शरीराचा गरम स्पर्श जसे की, “ही मिठी सुटूच नये असे वाटत होते.....
मिठीत आल्यावर मोहिनीचे केस पुन्हा उडून माधवच्या चेहर्‍यावर येतात......
तिच्या केसांचा सुगंध मुळे माधवला आपण कोणत्या तरी स्वप्नं मध्ये आहे असे वाटत असते.....
दोघेही डोळे बंद करून एकमेकांच्या मिठीत उभे असतात. माधवचे ओठ मोहिनीच्या मानेवर स्पर्श होताच, मोहिनी
पण मिठी अजून घट्ट करते.....
काही वेळाने दोघेही पुन्हा भानावर येतात...
एकमेकांच्या नजरेला नजर देत हलके, हलके हसून पुन्हा जवळ येतात..... 
त्याच वेळी मोहिनी आपले ओठ माधवच्या ओठांवर ठेवते. तिकडचे प्रेमाची ओढ समजू लागते....
मोहिनीच्या जेव्हा लक्षात येते...... तेव्हा ती लाजून माधवची मिठी सोडून मागे होते.....
तेच माधव तिला पुन्हा आपल्या मिठीत ओढून घेतो.... मोहिनी मागून माधवच्या छातीला चिटकून जाते.....
माधव तिच्या मानेवर असलेले केस बाजुला करून, मानेवर चुंबन घेतो.....

त्याच वेळी मोहिनी पुन्हा पुढे धावत जाते.... 
माधव पण तिच्या मागे, मागे धावत जातो.....
मोहिनी तिच्या कार जवळ जाते..... माधव पुन्हा तिच्या जवळ येतो.....
तेव्हाच मोहिनी त्याला हसून म्हणतेय बस आता! चल निघूया! माधव तिचा हात हातात घेऊन कारला टेकून उभा
राहतो...... आणि म्हणतो मोहिनी!
आय लव यू !
मोहिनी त्याच्या चेहर्‍यावर पाहत म्हणतेय!
आय लव यू माधव!
पुन्हा दोघेही एकमेकांना मिठी मारतात.....
इतक्या थंड वातावरणात, पण कोणतेही गरम कपडे न घालता समुद्राजवळ आलेले मोहिनी आणि माधव एकमेकांच्या
गरम उभे मधेच दंग होऊन जातात.....

भाग 8
मोहिनी आणि माधवचे प्रेम दिवसेंदिवस फुलत चालले होते....
दोघेही एकमेकांशिवाय राहत नव्हते.....
ऑफिसमध्ये एकत्र आल्यावर, ते रात्री झोपेपर्यंत एकत्र असायचे......
एक दिवस माधव आणि मोहिनी रात्रीची फिल्म पाहायला थेटर मध्ये जातात.......
बाहेर आधीच थंड वातावरण असते..... त्यात अजून थेटरमधील थंड..... ये सी,
त्या थंड वातावरणात, मोहिनी एकदम गारठून जाते......
मोहिनीचे शरीर कापत असते..... त्याचवेळी ती माधवला गट्ट मिठी मारते....... माधव पण तिच्याकडे नजर
मारतो.....
तर मोहिनी पूर्णपणे त्याला गट्ट पकडून असते.....
जेव्हा माधव तिला जवळ घेतो..... तेव्हा तिला एकदम बरे वाटू लागते......
मोहिनी त्याचवेळी माधवला ओठांवर किस करते....
एक वेगळ्याच अनुभव दोघेही घेत असतात.....

थंड वातावरणात, गरम शरीराचा स्पर्श, आणि त्यात ओठांचा ओठांवर आलेला नाजूक शहारा, हीच ओढ प्रेमाची
दोघेही एकमेकांच्या सहवासात घेत होते......
काही वेळाने फिल्म संपते.... मोहिनी, माधव पुन्हा एकत्रित बाहेर येतात......
बाहेर आल्यावर तेच ठंड वातावरण, जणू काही अंगाला चटके लागतात.... तसेच वाटत होते.....
पुन्हा दोघेही एकमेकांचा हात हातात, घेऊन, कारमध्ये येऊन बसतात.......
थोड्यावेळाने मोहिनी कार आपल्या बिल्डिंग जवळ आणते.... .
माधवची बाईक तिकडेच असते.... मोहिनी, माधव कार मधून उतरून बाहेर येतात.....
मोहिनी पुन्हा माधवला मिठी मारते....... आणि
धावत, धावत बिल्डिंगच्या गेट जवळ जाते.... 
चेहर्‍यावर आलेले केस, बाजुला करून, पुन्हा माधवला पाहते माधव पण तिला पाहत असतो.....
दोघेही एकमेकांना नजर देत असतानाच मोहिनी, माधवला चटकन डोळा मारते.....
माधव पण एकदम दचकून पुढे येण्यासाठी एक पाउल पुढे येतो.... त्याचवेळी मोहिनी पुन्हा धावत बिल्डिंग मध्ये
जाते.... मग माधव तिला बाय करून निघून जातो....
बिल्डिंगच्या खाली माधव आणि मोहिनीच्या प्रेमाची ओढ बाल्कनीत उभे असलेले मोहिनीचे वडिल पाहत असतात....
मोहिनी गाणे गुणगुणत घरात प्रवेश करते.....
तेव्हाच समोर महेंद्र उभा असतो.... महेंद्रला पाहून मोहिनी थोडी दचकून जाते..... पण वेळीच सावरत वडलांना मिठी
मारते.....
वडिलांना विचारते, पापा तुम्ही कधी आलात....? फोन नाही, केला..... तेव्हाच महेंद्र बोलतो, फोन केला होता, पण
आमची ही परी, खूपच कामात व्यस्त असते....
म्हणून आम्हाला विचारत नाही.... 
असे बोलुन महेंद्र पुन्हा बाल्कनीत जातो.....
तेव्हा मोहिनी पण मागुन बाल्कनीत येते......
महेंद्रला विचारते, “पापा तुम्ही असे का बोलत आहात...? माझे काही चुकले का.....? महेंद्र म्हणतो, नाही ग बेटा!
तुझे काहीच नाही चुकले, मी सहजच म्हणालो, पण एक गोष्ट नक्कीच आहे, माझी मोहिनी आता काही गोष्टी
माझ्यापासून लपवून ठेवत आहे......
मोहिनी पटकन बाल्कनीच्या ग्रिलला पकडून मान खाली करून उभी राहते.......

तेव्हा महेंद्र तिच्या पुढ्यात येऊन तिला म्हणतो, मोहिनी बेटा माधवच्या बाबतीत खरेच तू घेतलेला निर्णय योग्य
आहे....
मोहिनी म्हणते, “हो पापा! मला माधव खूप आवडतो,
मला त्याच्या बरोबर लग्न करायचे आहे....
मोहिनी असे बोलल्यावर महेंद्र तिच्या डोळ्यात पाहत बोलतो....
तू आज पर्यंत जे निर्णय घेतले, ते सर्व योग्यच होते, त्यामुळे हा निर्णय पण योग्यचे असेल, यात शंका नाही,  तू
माधवला सांग, ‘येत्या रविवारी, आपण त्याच्या घरी जातो आहे त्याच्या आई वडलांना भेटायला.... 
महेंद्र असे बोलल्यावर, मोहिनी तोंडावर हात ठेवून बोलते. पापा खरेच! तेव्हा महेंद्र म्हणतो, हो खरेच!
मोहिनी चटकन तिच्या वडलांना मिठी मारते..... 
धावत, धावत तिच्या रूममध्ये जाऊन बेडवर पडते.....
हळूच मोबाईल मधून माधवचा फोटो पाहत, त्या फोटोवर किस करते.....
डायलच्या बटणवर बोट ठेवून माधवला फोन करते....
माधव पण जेवण आवरून मळ्यावर झोपायला जात असतो....
तेवढ्यात मोहिनीचा फोन आलेला पाहतो, चटकन फोन उचलून गच्चीवर जातो... 
समोरून मोहिनी किस वर किस घेत असते....
तेवढ्यात माधव म्हणतो, “आग बस! बस!
येवढ्या थंडीत पण मला घाम फुटला, तेव्हा मोहिनी म्हणतेय...
आता थंडीत पण एकमेकांना ऊब मिळेल, माधव बोलतो. म्हणजे मोहिनी बोलते, म्हणजे आपल्या लग्नाला माझ्या
वडिलांनी होकार दिला आहे..... आम्ही येणाऱ्या रविवारी तुझ्या घरी येणार.... तुझ्या आईला भेटायला.....
माधव ऐकून एकदम शांत होतो.....
मोहिनी परत हॅलो बोलते, तेव्हा माधव दचकून हा, हा असे बोलतो.....
मोहिनी परत बोलते. हा, हा का करत आहेस.....?
तेव्हा माधव म्हणतो, येत्या रविवारी!
तू तर धक्काच दिलास! मी तर अजून माझ्या आईला आपल्या नात्याबद्दल काहीच नाही म्हणालो आहे.....
ओक्के ठीक आहे......
मग या रविवारी नक्कीच भेटूया!....... मी आताच आईला सांगतो.....

मोहिनी, माधवला म्हणते, माधव आज मी खूप खुश आहे. कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करते.....
माधव पण म्हणतो, आपल्याला जी व्यक्ती आवडते, तिच्या बरोबर जेव्हा आपले लग्न होते ना! “तेव्हाच आनंद फार
वेगळा असतो.....
माधव म्हणतो, मोहिनी मी पण तुझ्यावर खूप प्रेम करतो.........
माझी आयुष्यभर सात देशील ना! “मोहिनी म्हणतेय, हो!  दिली, अगदी शेवटच्या क्षणी पण मला तुझ्याच प्रेमाची
ओढ आठवेल....... “आई लव यू माधव, असे बोलुन मोहिनी त्याला मोबाईल वरुण किस करते......
माधव पण किस करतो..... मग मोहिनी म्हणते चल तू तुझ्या आई बरोबर बोलुन घे! उद्या ऑफिस मध्ये भेटूया.
गुड नाईट! माधव पण गुड नाईट बोलुन फोन कट करतो..     थोड्यावेळाने माधव खाली येतो..   
तिकडेच माधवची आई आपल्या दोन मैत्रिणी सोबत गप्पा मारत असते.....
समोर माधवला पाहून एक जण पटकन बोलते.....
आरे माधव! तेवढ्यात माधव पण तिला म्हणतो,
हा मोहिनी बोल......
माधव असे बोलल्यावर सर्व त्याच्या चेहर्‍यावर पाहत राहतात.....

भाग 9
माधव, मोहिनीचे नाव घेतो....सर्वजणी ते ऐकतात.....
तेव्हा एक जण विचारते, काय रे माधव! मोहिनी कोण.....? तेव्हा माधव म्हणतो, मोहिनी! कोण मोहिनी.....?
मी मम्मी म्हणालो!
तेव्हा एक काकू म्हणते, तु तुझ्या आईला मम्मी कधी पासुन बोलतो.....
तेव्हा माधव म्हणाला कधी, कधी बोलतो, हो ना! आई,
तेव्हा माधवची आई म्हणाली, हो! बोलतो कधी, कधी! बाकीच्या जणी निघून जात असताना, एक जण बोलते,
रागिणी बहुतेक तोल जातो आहे मुलाचा! सांभाळ बाबा! असे बोलुन सर्वजणी निघून जातात......
माधव पण पटकन पुन्हा मळ्याच्या दिशेने जात असतो. तेवढ्यात त्याची आई आवाज देते. आणि म्हणते, माधव
थांब! माधव थांबतो! मागे फिरून विचारतो, आई काय झाले.?

तेव्हा रागिणी त्याच्या पुढ्यात येऊन, त्याला समोर बसायला सांगते.....विचारते माधव!  ही मोहिनी कोण आहे..?
माधव एकदम दचकून आईच्या डोळ्यात पाहू लागतो...... रागिणी पुन्हा विचारते..... माधव मी काय विचारत आहे..?
तेव्हा मग माधव पटकन म्हणतो, आई तुला!
तेव्हा रागिणी म्हणते,  हो! मला माहिती आहे,
माधव गेले काही दिवस तू कोणत्यातरी मोहिनी, नवाच्या मुलीबरोबर फिरत असतो.....
आज पण तु तिच्याबरोबर सिनेमा पाहिला......
कोण आहे ती मुलगी....?
माधव एका वेळेसाठी गप्प बसुन राहतो.....
तेव्हा रागिणी त्याच्या हाताला पकडून परत विचारते..... माधव मी काय विचारले तुला....? तेव्हा माधव आईचा हात
हातात घेऊन तिच्या समोर बसुन म्हणतो की,” आई त्याच गोष्टी बद्दल बोलायचे होते..... म्हणुन मी खाली आलो,
तेव्हा तुझ्या मैत्रीणी बसल्या होत्या, मी आज तुझ्याबरोबर बोलणार होतो, पण तुला आधीच माहिती आहे,
पण आई तुला कसे माहिती...?
तेव्हा रागिणी बोलते, तुझा मित्र पण मला म्हणाला, आणि मी स्वतःहा पण पाहिलं!
माधव म्हणाला हो आई,
मोहिनी नाव आहे तिचे......
मी आता ज्या कंपनी जॉब करतो, ती त्याच कंपनीची मालकीण आहे......
रागिणी म्हणाली, म्हणुन तुला तिने जॉबवर ठेवले ना..?
तेव्हा माधव म्हणाला, नाही ग! आई, तसे काही नाही!
ती जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आली होती, तेव्हा तिचा एक अपघात होणार होता...... तेव्हा मी तिला वाचवले होते,
त्यानंतर आम्ही बरेच वेळा समोरासमोर आलो, मी तिच्या कंपनी मध्ये जॉबसाठी गेलो होतो तेव्हा मला माहित
नव्हते..... ती तिची कंपनी आहे, पण आई खरे सांगू!
ज्या दिवशी पहिल्यांदा तिला पाहिले, त्याच दिवशी मी तिच्या प्रेमात पडलो......
आई मला मोहिनी बरोबर लग्न करायचे आहे..... 
मोहिनीला पण लग्न करायचे आहे.......
त्यामुळेच ती तिच्या वडलांना घेऊन येत्या रविवारी आपल्या घरी तुला भेटायला येणार आहेत.......
माधवची आई पटकन बोलते, अरे या रविवारी!

तू हो म्हणाला! मला आधी विचारायचे होते ना!
तेव्हा माधव म्हणाला, आई मला त्यावेळी काहीच समजले नाही......
मी पण हो म्हणाला, तेव्हा रागिणी म्हणाली आता असू दे! येऊदे त्यांना! मला पण पाहू दे! माझी होणारी सूनबाई
कशी आहे......
तेवढ्यात माधव म्हणाला, आई ती तुझ्या सारखीच आहे, अगदी प्रेमळ, सुंदर, आणि इतकी श्रीमंत असून पण ती
एकदम साधी आहे, एकदम नैसर्गिक सुंदरता,
रागिणी बोलते हो, हो, बस! झाले..... बायकोचे कौतूक! आईचे कधी केलेस का असे कौतुक....? असे बोलुन रागिणी
आत जात असते.....
तेच माधव तिला पुन्हा पकडून मिठी मारतो.....
रागिणी पण माधवला जवळ घेते......
दुसर्‍या दिवशी नेहमीप्रमाणे माधव ऑफिसमध्ये येतो...... तेव्हा ऑफिसमध्ये सर्व ठिकाणी गुलाबाच्या पाकळ्या
पसरवून ठेवलेल्या असतात......
जसा माधव आत येतो तसा दरवाज्याच्या जवळ असलेल्या एक फुगा फुटून त्यामधून बरेच गुलाबाच्या पाकळ्या
खाली माधवच्या अंगावर पडतात.......
सर्व स्टाफ समोर येऊन, अभिनंदन माधव सर! असे बोलुन टाळ्या वाजवल्या जातात...... माधव एकदम शॉक
होतो..... तेव्हा समोरून मोहिनी पण येते..... मोहिनी हातात एक गुलाब घेऊन माधव समोर गुडघ्यांवर बसुन त्याला
गुलाब ऑफर करते आणि म्हणते........
हाय माधव! माझ्या बरोबर लग्न करशील...?
एक वेगळा माहोल तयार होतो..... मोहिनी असे बोलल्यावर सर्व स्टॉप शांत होतो......
माधव आता काय बोलतो हे ऐकण्यासाठी सर्व स्टाफ माधवच्या चेहर्‍यावर पाहत राहतो......
माधव पण इकडे, तिकडे पाहतो....
मोहिनी समोर येऊन तिच्या हातातले गुलाब स्वतःहाच्या हातात घेऊन, त्या गुलाबाला मोहिनीच्या ओठांवर धरून,
पुन्हा आपल्या ओठांजवळ घेऊन, त्या गुलाबाचे किस घेतो.......
सर्व माधवला पाहत असतात....
मोहिनी पण लाजून मान खाली करून उभी राहते.....
तेव्हा माधव तिच्या जवळ जाऊन, तिच्या डोळ्यांसमोर आलेल्या केसांना बाजूला करून, तिच्या डोळ्यात नजर देऊन
तिला डोळा मारतो......

मोहिनी त्याचवेळी आजूबाजूचा पाहते....
गालातल्या गालात हसत, धावत पुन्हा आपल्या केबिनमध्ये जाते.....
सर्व स्टाफ पण माधवला मोहिनीच्या केबिनच्या दिशेने ढकलून देतो......
माधव पण आत जातो..... मोहिनी आत टेबलला पकडून उभी असते......
माधव आत जाऊन मागुन मोहिनीला मिठी मारतो.....
तिच्या मानेवरच्या केसांना बाजुला घेऊन तिच्या मानेवर चुंबन घेतो..... मोहिनी डोळे बंद करून घेते....
माधव तिच्या पुढ्यात येऊन तिच्या डोळ्यांवर चुंबन घेतो....... त्याचवेळी मोहिनी माधवला मिठी मारते......
मिठीत असलेले दोघेही एकमेकांना, आई लव यू! बोलतात,
माधव ,मोहिनीला म्हणतो...
आईने तुला येत्या रविवारी घरी बोलावले आहे..
मोहिनी असे ऐकल्यावर माधवला मारलेली मिठी अजून घट्ट करते...... आणि माधवच्या गालावर किस करते....

भाग 10
मोहिनी आणि माधव भरपूर खुश असतात.....
दोघेही एकमेकाच्या प्रेमात बुडून गेलेले असतात.....
ठरल्याप्रमाणे मोहिनी आपले वडील महेंद्र, यांना माधवच्या आईचा निरोप देते..... 
या रविवारी आपल्याला माधवच्या आईला भेटायला जायचे आहे......
महेंद्र पण त्याच तयारीला लागतो.....
माधवची आई पण रविवारी येणाऱ्या पाहुण्यांसाठी संपूर्ण तयारी करून असते.....
रविवारचा दिवस उजाडतो.... सकाळी मोहिनी, माधवला मेसेज करते..... आम्ही बारा वाजता येणार आहोत.....
माधव पण मेसेज करतो.... ओक्के! आम्ही वाट पाहू....
मोहिनी आणि महेंद्र माधवच्या घरी जाण्यासाठी निघतात........
माधव आणि रागिणी पण वाट पाहत असतात....

रागिणीच्या काही मैत्रीणी पण त्यावेळी घरी असतात.... काहीवेळाने मोहिनीची कार, माधवच्या घराजवळ जवळ
येते....
तेवढ्यात रागिणी आत किचनमध्ये जाते.... 
माधव,..... मोहिनी आणि महेंद्रला वेलकम करून आत घेऊन येतो.....
मोहिनी आणि तिचे वडील महेंद्र आत येऊन बसतात...... माधव पण त्यांच्या सोबत समोर येऊन बसतो.....
तेवढ्यात रागिणीची एक मैत्रिण पाणी घेऊन बाहेर येते.... तिला पाहिल्यावर मोहिनी तिच्याकडे पाहत हसून पाण्याचा
ग्लास हातात घेते......
माधव तिची ओळख करून देतो... म्हणतो! ही उषा मावशी! माझ्या आईचे खूप जुनी मैत्रिण! उषा पण महेंद्रला
नमस्कार करून मोहिनीच्या गालावर हात लाऊन म्हणते....
माधव,  नशीब काढलेस! खुप नाजूक, आणि सुंदर, आहे होणारी सून! असे बोलुन आत जाते.....
मोहिनी पण माधवला पाहून हळूच डोळा मारते.....
तेवढ्यात माधव जरा घाबरून तिला खुणावू लागतो.....
नको, नको असा इशारा करतो....
त्याच दरम्यान एका ग्राहकाचा मोहिनीच्या मोबाईलवर फोन येतो...
मोहिनी तो नंबर पाहुन वडलांना दाखवते.... 
महेंद्र तो फोन घेऊन हॅलो बोलत बाहेर जातो...  
महेंद्र बाहेर गेल्यावर माधव पटकन आईला आवाज देतो... आणि म्हणतो आई बाहेर ये लवकर, तेवढ्यात रागिणी
चहा घेऊन बाहेर येते......
... रागिणी बाहेर येऊन मोहिनीला पाहते.... त्याचवेळी एका जागीच उभी राहून एकटक पाहत राहते.....
मोहिनी पण लगेचच उठून रागिणी जवळ येते....
रागिणीच्या पाया पडते......
रागिणी तिला जवळ घेऊन.... म्हणते वा! माधव, ही तुझी पसंद! तु अगदी बरोबर बोलला होतास की, “ती माझ्या
सारखी आहे.....
खरेच ही तर माझ्या सारखीच आहे....
तेवढ्यात रागिणीचे लक्ष मोहिनीच्या कपाळावर जाते.... रागिणी, उषाला सांगते, उषा! देवाजवळ कुंकवाची डबी
आहे.... ती घेऊन ये!

उषा लगेचच डबी आणून देते.....
रागिणी त्या मधून कुंक, बोटांवर घेऊन..ते मोहिनीच्या कपाळावर लावते.....
कुंक कपाळावर लागल्याबरोबर मोहिनीचे सौंदर्य अजून खिळून उठले....
मोहिनीची सुंदरता पाहुन रागिणी पण भरपुर खुष होते.......  ती पुन्हा आत जाते.....
तेवढ्यात महेंद्र आत येतो.....
महेंद्र, मोहिनीला पाहतो आणि पाहतच राहतो.....
महेंद्र, मोहिनी जवळ उभा असतो...
त्याचवेळी माधव जोरात ओरडून आईला आवाज देतो.....
आई , बाहेर ये! मोहिनीचे बाबा पण आले.....
महेंद्र, मोहिनीचा मोबाईल तिला परत देत असताना.... त्याच्या हातामधून खाली पडतो...  
मोबाईल पडला म्हणुन महेंद्र, खाली वाकतो... 
तेच रागिणी पण बाहेर येते.....
समोर उभी राहते.....
त्याचवेळी महेंद्र पण उभा राहतो.....
रागिणीला पाहून हात जोडणार, तेच दोघेही एकमेकांना पाहून एकदम गडबडून जातात.....
दोघेही एकमेकांना पाहुन जवळ येतात.....
रागिणी पटकन बोलते, महेंद्र! तुम्ही,
महेंद्र पण बोलतो, रागिणी,
तु जिवंत आहेस.....
असे बोलुन दोघेही एकमेकांना मिठी मारतात....
तिकडेच एकदम शांत वातावरणात होऊन जाते.....
कोणाला काहीच समजत नसते......
सर्व एकमेकांच्या चेहऱ्यावर पाहत असतात.....
एका वेळेसाठी वातावरणात थांबून जाते.....
त्याचवेळी मोहिनी पटकन मध्ये येते.... 

म्हणते पापा! तेवढ्यात महेंद्र मिठी सोडून बाजूला होतो...... रागिणी पण पटकन मागे जाते.....
माधवला काहीच समजत नसते......
तो पण त्याच्या आईला मागे खेचून म्हणतो....
आई हे सर्व काय आहे....?
मोहिनी पण तिच्या वडलांना विचारते पापा काय करता तुम्ही.....?
तेव्हा महेंद्र म्हणतो, मोहिनी बेटा!
मोहिनी परत बोलते, पापा काय आहे हे.....?
तेव्हा माधव पण त्याच्या आईला बाजूला घेऊन विचारतो.... आई बोल, तेव्हा महेंद्र जवळ येतो....
माधवला बाजूला घेऊन म्हणतो मी, “सांगतो.... सर्व,
तुम्ही आधी बसा!तेव्हा मोहिनी वडलांना डोळ्याने खुणावते.....
तेव्हा महेंद्र तिला पण म्हणतो, मोहिनी! माधव
तुम्ही कोणताही वेगळा अर्थ काढण्याचा अगोदर मी तुम्हाला सांगतो काय ते....?
मोहिनी बोलते, पापा आता सांगायला काय राहिले आहे का.....?
तेव्हा महेंद्र म्हणतो, अजून काहीच सागितले नाही आहे....
खरेतर मी आणि रागिणी आज 25 वर्षानंतर भेटलो..... इतक्या वर्षांनी पण मी तिला ओळखले......  
तिने पण मला ओळखले.....
या मधेच सर्व आले.......
आपण नेहमी म्हणतो ना! माणुस त्याचे पहिले प्रेम कधीच विसरत नसतो......
ते आज खरे झाले......
तेव्हा मोहिनी म्हणते....   पापा! तुम्ही काय म्हणता आहात.....?
तेव्हा महेंद्र म्हणतो, मोहिनी बेटा मी सांगतो खरे....
तर रागिणी आणि मी एकमेकावर तुमच्या इतकेच प्रेम करत होतो.......
असे ऐकल्यावर माधव उठून उभा राहतो.....
म्हणुन मग मोहिनी पण उभी राहते......
तेवढ्यात रागिणी जवळ येते.... माधवला सांगते,

माधव, महेंद्र खरे बोलत आहेत.....
बरेच झाले तुम्ही दोघेही इकडेच आहात......
आम्ही कसे भेटलो..... मी सांगते तुम्हाला!
असे बोलुन रागिणी, मोहिनी आणि माधवला समोर बसायला सांगते.......

भाग 11
(“26 वर्षापुर्वी काही वर्षे मागे,)
रागिणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात राहत असते...
मालवण तालुक्यातील मुलींच्या कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत असते......
एके दिवशी रागिणीच्या कॉलेज मधून शेवटचे वर्षे मधून कॉलेज तर्फे पिकनिक अरेंज होते......
रागिणीच्या वर्गातील सर्वच मुलींना येण्यासाठी सांगण्यात येते....
आई वडील, कसे तयार होतील, याच भीतीमध्ये असलेल्या रागिणीला घरी आल्यावर एक सुखद धक्काच बसतो.....
रागिणीचे वडील सिंधुदुर्ग किल्लाच्या बोटीवर कामाला असतात.....
ज्या दिवशी पिकनिक अरेंज होते, त्याच दिवशी कॉलेज मधील एक शिक्षक आपल्या काही मित्रांनी घेऊन किल्लावर
जात असतो.....
तेव्हा तिकडे रागिणीचे वडील डय़ुटीवर असतात...
जे सर असतात, त्यांचे नाव विलास तांडेल, असते..... विलासराव रागिणीच्या वडिलांना पाहून लगेचच आवाज देतात
म्हणतात.....
अरे सावंत! आज तुम्ही डय़ुटीवर! रागिणीचे वडील पण समोर जाऊन हात मिळतात..... गप्पा करता, करता विलास
सर, रागिणीच्या वडलांना सांगून टाकतात की, “कॉलेज मध्ये पिकनिक अरेंज झाली आहे तेव्हा तुमच्या रागिणीला
आठवणीने पाठवून द्या! शेवटच्या वर्षाला आहे म्हणुन म्हणालो, तेवढीच मुलीला ओळख राहते आई वडिलांची,
सरांनी इतका आग्रह केला की, “सावंत लगेचच तयार होतात....
घरी आल्यावर अगोदर रागिणीच्या आईला सांगतात.
रागिणीची आई म्हणते, तुम्ही हो म्हणालात ना!
मग जाऊदे तिला!

रागिणी त्या दिवशी घरी येते..... तेव्हा वडील पिकनिकला जाण्यासाठी सांगतात..... तोच रागिणीला सुखद धक्का
असतो...... कारण तिला भीती असते..... पिकनिकला जाण्यासाठी मिळते आहे का....?
शेवटी रागिणीची आई वडील, हो म्हणतात......
सुंदर, नाजूक, बांध्याची! काळे भोर लांब केस, गोर्‍या गालावर असलेला बारीक तीळ, असे रागिणी सौंदर्य होते....
मुलींचे कॉलेज असल्याने मुलांच्या संपर्कात कधीच न आलेल्या रागिणीची पहिल्यांदा गोव्यात पिकनिक जाणार
असते......
गोव्यातील, हॉटेल कारवारमध्ये कॉलेज तर्फे बूकिंग केले होते.....
कारवार हॉटेलचे मालक, मधुकर कारवार, यांनी मुलींच्या स्वागतासाठी खास तयारी करून ठेवली होती......
जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात पिकनिक असते त्यामुळे गोव्यातही वातावरणात बरेच थंड असते......
ठरल्याप्रमाणे पिकनिकला जाण्यासाठी सर्व मुली निघतात.... मालवण पासून गोवा, पणजी! 3 तासांच्या अंतरावर
असते.... सर्वजण हॉटेलमध्ये येतात.... 
एक ,एक करून सर्व मुली बसमधून खाली उतरून आपला, आपला एक ग्रुप तयार करत असतात.....
विलास सर, प्रत्येक चार मुलींचा ग्रुप तयार करून रूमची चावी हातात देत असतात.....
रागिणीच्या रूमची चावी हातात दिल्यावर सर्व मुली रूममध्ये जाण्यासाठी लिफ्ट जवळ उभ्या असतात.....
रागिणीचा रूम दुसर्‍या मजल्यावर असल्याने रागिणी आपल्या ग्रुपमधील मुलींना सांगते की, “आपण दादर चढत
रूममध्ये जाऊया! तिच्या 3 मैत्रीणी पुढे जातात....
मागुन रागिणी पण हातात सुटकेस घेऊन चढत असते..... तेवढ्यात एकजण खाली उतरून येत असतो....
रागिणीचा अचानक पाय घसरतो....
रागिणी मागच्यामागे पडणार तेच जो खाली येणारा माणुस असतो तो तिला पकडतो.....
जो माणूस रागिणीला पकडतो तो माणुस त्या हॉटेलच्या मालकाचा मुलगा म्हणजे! महेंद्र मधुकर कारवार, असतो....
महेंद्र रागिणीला पकडतो त्याचवेळी दोघेही एकमेकांना पाहत राहतात.....
रागिणीचे लांब सडक केस अचानक सुटून फुलून जातात... महेंद्र तिच्या नजरेला नजर देत तसाच उभा राहतो...
काहीवेळ दोघेही त्याच अवस्थेत असतात.....
तेवढ्यात रागिणीची मैत्रिण अस्मिता आवाज देते....
रागिणी चटकन भानावर येते.....
महेंद्रचा हात झटकून बाजुला होते.... त्याच नजरेत पुन्हा मागे वळून पाहत पुढे जात असताना, पुन्हा तोल जाणार,

तेच परत महेंद्र तिला पकडतो.....
रागिणीचे ते घायाळ केलेले सौंदर्य, पाहून महेंद्र पुरता हरून जातो.....
रागिणीला पुन्हा सरळ करून हाताने इशारा करून महेंद्र तिची सुटकेस स्वतःहाच्या हातात घेऊन तिच्या हाताला
पकडून तिला रूम पर्यंत घेऊन जातो.....
रूम जवळ आल्यावर रागिणी त्याला थँक्स बोलुन, नाव विचारते, तेव्हा महेंद्र म्हणतो मी महेंद्र कारवार, या हॉटेल
मालकाचा मुलगा, रागिणी त्याच्या डोळ्यात पाहून हलकीशी हसून रूमचा दरवाजा लाऊन घेते.....
पुढचे सात दिवस पिकनिक असल्याने त्याच हॉटेलमध्ये बूकिंग असते..... एकाच हॉटेलमध्ये असल्याने रागिणी आणि
महेंद्र सारखे, सारखे जवळ येत असतात....
दोघेही एकमेकाच्या इतके जवळ आले की, “दोघांची मैत्री होते, रागिणी निघताना महेंद्रला आपल्या मैत्रिणीच्या घरचा
नंबर देते....
त्या काळात मोबाईल फारसे नव्हते, त्यामुळे लाइनचे फोन फार कमी लोकांजवळ असायचे... रागिणीच्या घरी किंवा
आसपासच्या घरात कोणाजवळ फोन नव्हता.... ज्या मैत्रिणीचा नंबर देते ती मैत्रीण पण दुसर्‍या वाड्यात राहत
असते.... म्हणजे फोन आल्यानंतर आलेला फोन सांगायला जाण्यासाठी दहा पंधरा मिनिटे लागायची.... तरीपण
रागिणी फोन नंबर देते.... महेंद्र पण स्वतःहाचा पेजर नंबर देतो....फोन नंबर पण देतो...... नंबर दिल्यानंतर रागिणी
बसमध्ये बसते त्याचवेळी महेंद्र, रागिणीला बाय करत असताना त्याचे वडील मधुकर पाहतात..... पण ते फारसे लक्ष
देत नाही..... रागिणी घरी येते त्या दिवसापासून रागिणी पूर्णपणे बदलून जाते.... कधी, कधी विचारात असते.... कधी
कोणी आवाज दिला की, “लक्ष देत नसे, असे बर्‍याच गोष्टी, तिच्या बाबतीत घडत होत्या......
एक दिवस महेंद्र स्वतःहाच्या कारने मालवण मध्ये येतो... रागिणीने दिलेल्या नंबरवर फोन करतो.....
फोन केल्यावर समजते समोरील व्यक्तीचा आवाज बारीक असतो......
महेंद्र समजून जातो कोणीतरी लहान मुल असणार, फोन उचलणारा मुलगा लहानच असतो.. रागिणीच्या मैत्रिणीचा
लहान भाऊ असतो.....
महेंद्रला माहिती असते. म्हणुन महेंद्र समोरून बोलतो मी कॉलेज मधून बोलतो आहे..... तुझ्या अस्मिता ताईला फोन
दे! अस्मिताचा भाऊ लगेचच अस्मिताला आवाज देऊन फोन घेण्यासाठी सांगतो.....
अस्मिता फोनवर येते.... समोर महेंद्र असतो..... महेंद्र तिला सांगतो की, “तो मालवण मध्ये आला आहे....
सिंधुदुर्ग किल्लाच्या समुद्राजवळ मी आहे....
रागिणीला तिकडेच येण्यासाठी सांग!
अस्मिता हो बोलुन फोन ठेवून लगेचच रागिणीच्या घरी जाते.....
रागिणीला निरोप देते..... रागिणी तिच्या आईला सांगते... आई मला कॉलेजला जावे लागेल, कॉलेज मधून फोन
आला आहे,

कॉलेज मधून फोन आली की, “अस्मिता नेहमी सांगायला येत असे..... त्यामुळे रागिणीची आई तिला जाण्यासाठी
सांगते......
रागिणी आणि अस्मिता सिंधुदुर्ग किल्ला जवळच्या समुद्राजवळ जातात.....
रागिणी महेंद्रला शोधत असते..... महेंद्र पण इकडे, तिकडे बघत तिला शोधत असतो......
अचानक दोघांच्याही नजरा एक होतात......
एकमेकांना पाहिल्यावर दोघेही एकमेकाच्या दिशेने धावत येतात......
समुद्राजवळ असल्यामुळेच आधीच हिवाळा,
त्यामूळे वातावरणात थंड असते......
त्यातच समुद्र जवळ असल्यामुळे अजून थंड असते....
दोघेही कसलाच विचार न करता, एकमेकांना जोरात मिठी मारतात.....
त्याच दरम्यान रागिणीचे वडील समोर उभे असतात.....

भाग 12
रागिणीचे वडील,  रागिणीला जोरात आवाज देऊन म्हणतात.....
रागिणी! रागिणी!
तेवढ्यात रागिणी, महेंद्रची मिठी सोडून बाजूला होते..... वडलांना पाहून एकदम घाबरून एका जागेवर उभी राहते....
रागिणीचे वडील तिच्या चेहर्‍यावर पाहत राहतात.... 
मग तिकडून सरळ निघून जातात.....
रागिणी इतकी घाबरून जाते की, “महेंद्रला म्हणतेय,
तुम्ही आता इकडून जावा! मी नंतर तुम्हाला फोन करेन,
महेंद्र, रागिणी जवळ येतो....
तिला म्हणतो की, “रागिणी मी प्रेम करतो तुझ्यावर.....
तू गोव्यातून निघून गेल्यावर मी, माझा नसतो,
सतत तुझेच विचार मनात होते.... रागिणी माझ्या बरोबर लग्न करशील का....?

रागिणी, महेंद्रच्या डोळ्यात एकटक पाहत बोलते....
हो मी पण प्रेम करते, तुमच्यावर!
पण लग्न आता मला नाही वाटत की, “माझे बाबा आपल्या लग्नाला होकार देतील, कारण आज आपण अशा
ठिकाणी त्यांच्या समोर आलो नसतो, तर बरे झाले असते, पण आता पुढे काय होईल.? माहीत नाही! तुम्ही प्लीज
जावा! आपण नंतर भेटूया......
महेंद्र, रागिणी जवळ येऊन तिच्या कपाळावर चुंबन घेतो... तिचा हात हातात धरून हाताचे पण चुंबन घेतो....
रागिणी पुन्हा महेंद्रला मिठी मारते....
मग महेंद्र तिकडून निघून जातो....
रागिणी कशी, बशी घाबरत, घाबरत आपल्या घरी येते.... पण घरी तिचे वडील नसतात.....
म्हणुन मग ती लगेचच आपल्या आई जवळ जाऊन तिला घडला प्रकार सांगते......
रागिणीची आई तिला म्हणते कोण आहे हा महेंद्र...?
तेव्हा रागिणी म्हणाली की, “मी गोव्यात पिकनिकला गेले होते, ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो, त्या हॉटेलच्या
मालकाचा मुलगा, महेंद्र कारवार,
रागिणीची आई म्हणाली अग पण तो येवढा श्रीमंत माणुस! रागिणी म्हणाली मला नाही माहित होते आई, तो श्रीमंत
आहे की, “गरीब, मला फक्त प्रेम झाले कसे ते माहिती नाही..? आई मला त्याच्याबरोबर लग्न करायचे आहे, तु
बाबांबरोबर बोल, ते तयार झाले की, “मी लग्न करेन,
तेव्हा रागिणीची आई म्हणाली, आणि नाही तयार झाले तर, तेव्हा रागिणी म्हणाली प्रेमाचा त्याग करेन, आणि ते
बोलतील तिकडेच लग्न करेन, पण एक गोष्ट लक्षात ठेव आई, तुझी मुलगी आयुष्यभर नाखूश असेल, असे बोलुन
रागिणी आत जाते.....
महेंद्र, पण गोव्यात आपल्या घरी येतो.....
तेव्हा त्याचे आई, वडील एकत्र बसलेले असतात....
महेंद्र, वडलांना पहातो.... त्याचे वडिल त्याला म्हणतात... महेंद्र बेटा बेळगाव मध्ये एक जागा आहे, तिकडे मी तुझ्या
नावाने रेस्टॉरंट ओपन करायचे ठरवतो आहे, तेव्हा एकदा ती जागा पाहून घे. स्थानिक रहिवासी विरोध करत आहेत,
त्यांना व्यवस्थित समजावून सांगितले तर, मिळेल ती जागा.
महेंद्र म्हणाला पापा, मी नेक्स्ट वीक मध्ये जाऊन पाहून येतो... पण आता मला तुमच्याबरोबर बोलायचे आहे...
थोडावेळ आहे का....?
तेव्हा त्याचे वडिल  ,आई म्हणाली तुझ्यासाठी आमच्या जवळ भरपूर वेळ आहे, बोल बेटा! काय झाले...?

महेंद्र म्हणाला पापा ,आई, एक मुलगी आहे रागिणी सावंत, सिंधुदुर्ग मालवण मध्ये राहते, मला तिच्याबरोबर लग्न
करायचे आहे,
महेंद्रची आई पटकन बोलते, अरे वा! काय नाव तिचे..?
तेव्हा महेंद्र पुन्हा म्हणाला, रागिणी सावंत,
आई त्याला तिचा फोटो आहे का विचारते....?
महेंद्रने आपल्या हॉटेलमध्ये चेक आउट करताना सर्व मुलीचा एक ग्रुप फोटो काढला होता..... तो फोटो त्याच्या
आईला दाखवतो.....
रागिणीचा फोटो पाहत महेंद्रची आई लगेचच स्वतःहाच्या गालावर हात ठेवून म्हणते वा! किती..? सुंदर! मुलगी आहे.
ती महेंद्रच्या वडलांना पण दाखवते... 
महेंद्रचे वडील तिला पाहताच ओळखतात.....
आणि म्हणतात ही तीच मुलगी आहे ना...?
जिला तू ती बसमध्ये बसल्यावर सारखं, सारखं बाय बोलत होतास....
महेंद्रची आई त्याच्या वडलांना विचारते, म्हणजे! तुम्ही पाहिले हिला..?  महेंद्रचे वडील म्हणाले हो! मुलगी दिसायला
जेवढी सुंदर आहे, तितकीच बोलायला पण छान आहे, प्रेमळ आहे, हॉटेलमध्ये वेटर लोकांशी पण खूप चांगला संवाद
करत होती,
महेंद्रची आई म्हणाली मग तर झाले आता तुम्हाला आवडली म्हणजे या घरातील लोकांना आवडली... चला मग!
महेंद्र म्हणतो कुठे...? महेंद्रची आई म्हणते! कुठे..? म्हणजे तिच्या घरी! तिच्या वडलांना आईला भेटायला, लग्नाची
मागणी नको घालायला..?
महेंद्र एकदम खुश होतो
.... आई वडलांना जाउन मिठी मारतो.....
इकडे रागिणीचे वडिल घरी येतात.... पण रागिणी तिच्यारूम मध्ये असते...... वडिल आल्यावर रागिणीची आई
त्यांना जेवायला वाढू का विचारते.....? तेव्हा ते हो बोलतात.... आणि बोलतात, की, “रागिणीला पण बोलाव!
सर्व एकत्र जेवायला बसतात.... रागिणी पण गप्प जेवत असते..... तेव्हा तिचे वडलांना तिची आई म्हणते, तुमच्या
बरोबर थोडे बोलायचे आहे....
रागिणीचे वडील डायरेक्ट रागिणीला विचारतात....
मुलगा काय करतो..? कुठे राहतो..? कसा आहे..?
रागिणीची आई आणि रागिणी एकमेकांना पाहत राहतात......

तिचे वडील मग बोलतात की, “माझ्या तोंडावर का पाहत आहात तुम्ही, मला माझ्या रागिणीवर पूर्ण विश्वास आहे,
माझी पोर असे काहीच करणार नाही ज्यामुळे तिच्या वडिलांचे नाक कापले जाईल, ती जे करेल ते योग्य करेल, मग
ते तिच्या लग्नाच्या बाबतीत असो,
उद्या त्याच्या घरी जाऊन लग्नाची बोलणी करू.....
रागिणी आणि तिची आई, खूप खुश होते.....
रागिणी वडलांना सांगते, बाबा अस्मितेच्या घरी जाऊन त्यांना फोन करावा लागेल,
तिचे बाबा म्हणतात.....चल मग! जेवण झाल्यावर जाऊया! थोड्यावेळाने रागिणी तिचे वडील आणि आई तिघेही
अस्मितेच्या घरी जातात.....
रागिणीचे वडील अस्मितेच्या वडलांना सांगतात, मग रागिणी महेंद्रला फोन करते, समोरून महेंद्रचे वडील फोन
उचलून हॅलो बोलतात.....
तेव्हा रागिणी पण म्हणतेय हॅलो! महेंद्र आहेत का...?
इतका सुंदर आणि नाजूक आवाज ऐकल्यावर महेंद्रचे वडिल जोरात ओरडून महेंद्रच्या आईला आवाज देतात......
आणि म्हणतात आपल्या सुनेचा फोन आहे.... ये लवकर! येवढे ऐकल्यावर रागिणी लगेचच तोंडावर हात ठेवून उभी
राहते.......

भाग 13
रागिणी तिथल्या तिथे लाजून वडलांना पाहते.....
समोरील व्यक्ती महेंद्रचे वडील मधुकर कारवार असतात....... हे जेव्हा रागिणीच्या वडलांना समजते, तेव्हा ते फोन
हातात घेऊन बोललात....... नमस्कार! कारवार भाऊ,
मी रागिणीचा वडिल सावंत, बोलतो आहे.....
कसे आहात आपण....?
मधुकर कारवार पण समोरून म्हणतो...सावंत राव नमस्कार! बरे झाले तुमची ओळख झाली, खरेतर तुमच्या कानावर
आलेच असणार, आपल्या मुलांचे प्रताप!
तेव्हा रागिणीचे वडील हसून म्हणतात, हो! कानावर पण आले, आणि डोळ्याने पण पहिले!
कारवार विचारतात, म्हणजे!
तेव्हा सावंत म्हणतात आहो! आज तुमचे चिरंजीव मालवण मध्ये आले होते......

आमच्या रागिणीला भेटायला......
तेव्हा यांची चोरी पकडली.....
कारवार म्हणाले, अच्छा! म्हणजे म्हणुन आमचे चिरंजीव आमच्या पुढ्यात येऊन बसले...... तुमच्या मुलीबद्दल
सांगू लागले.....
सावंत म्हणतात...... हो रागिणी पण मला म्हणाली......
मग आता पुढे काय.......? तुम्हीच सांगा!
कारवार म्हणतात, पुढे काय.....? लाऊन टाकू लग्न! अजून काय....?
सावंत म्हणाले, तुमचा गोव्याचा पत्ता सांगा !आम्ही उद्या येतो भेटायला......
कारवार म्हणाले, नाही! त्याची काहीच गरज नाही!
आम्हीच उद्या तुमच्याकडे येतो आहे......
संध्याकाळी चार वाजेपर्यंत पोहोचू !
सावंत बोलतात, ठीक आहे..... या! आम्ही वाट पाहतो..... असे बोलुन फोन ठेवून देतात.... रागिणीला म्हणतात
उद्या ते तुला पाहायला येणार बोलले,
रागिणी लगेचच वडिलांना मिठी मारते.......
अस्मिता पण तिकडेच असते.....
ती पण रागिणीला मिठी मारते.....
रागिणीचे वडील घरी येऊन रागिणीच्या आईला सर्व सांगतात.....
रागिणी आई म्हणते, सर्व कसे पटकन होते आहे ना....? असुदे तुम्ही काही काळजी नका करू मी उद्याची सर्व
तयारी करते......
दुसर्‍या दिवशी संध्याकाळी एक कार रागिणीच्या वाड्यात थांबते.......
सर्वात अगोदर मधुकर कारवार, गाडीतून उतरतात....
मग महेंद्रची आई, पण उतरते.....
सर्वात शेवटी महेंद्र उतरतो....... तेच वाड्यामध्ये उभे असलेले सर्व एकटक त्याला पाहत राहतात.......
उंच, देखणा, रुबाबदार, असा महेंद्र सर्वाना आकर्षण करून घेत असतो......
सर्वजण घरात येतात..... थोड्यावेळाने रागिणी पण बाहेर येते.....
रागिणी, निळ्या रंगाच्या पैठणी साडीत, खूपच सुंदर दिसत असते......

महेंद्रचे आई वडील तिला बाजुला बसवतात......
महेंद्रची आई तर तिची स्वतःहाच्या हाताने दृष्ट काढते.....
सर्व पसंती होते...... लग्नाच्या आधी साखरपुडा करायचे ठरवले जाते.......
साखरपुडा मालवण मध्ये करण्याचा निर्णय घेण्यात येतो...... महेंद्र आणि रागिणीचा साखरपुडा एकदम जोरदार
होतो..... त्या दिवसापासून महेंद्र आणि रागिणी अजून एकमेकाच्या जवळ येतात......
दोन्ही कुटुंब आनंदात असतात......
“आणि एक दिवस उजाडतो.... तो दिवस म्हणजे एक संकट असते......

साखर पुडा झाल्यावर लग्नाला तीन महिन्यांचा कालावधी लागणार होता.....
त्यामुळे एक दिवस तरी एकत्र सोबत राहता यावे म्हणून महेंद्र रागिणीच्या घरी तिला सकाळीच फिरायला घेऊन
जाण्यासाठी येतो.......
रागिणीचे आई वडील पण हो म्हणतात......
रागिणी पण तयार होऊन महेंद्र, सोबत जाते.....
महेंद्र, रागिणीला घेऊन गोव्यात जातो......
तिकडेच एका आयर्लंडवर दोघेही एकत्र जातात......
महेंद्र एक छोटी बोट भाड्याने घेतो......
सकाळीच दोघेही त्या आयर्लंडवर जातात.......
हिवाळी थंड वातावरण असते, सर्वच धुक्याची चादर पसरली असते, निसर्ग पण जणू काही दोघांचे प्रेम पहाण्यासाठी
फुलला होता....
बोटीवर एक रूम पण असते......
रागिणी पाण्यात पाहत उभी असते...... तेवढ्यात मागुन महेंद्र तिला मिठीत घेतो......
थंड वातावरण, त्यात शरीराचा गरम स्पर्श, दोघेही एकमेकांना गट्ट मिठी मारतात.......
महेंद्र रागिणीच्या ओठांवर बोट फिरवून, स्वतःहाचे ओठ तिच्या ओठांजवळ घेतो...... तेच रागिणी लाजून पुढे
जाते.......
महेंद्र पुन्हा तिचा हात पकडून तिला मागे खेचून घेतो..... पुन्हा स्वतःहाच्या ओठांना तिच्या ओठांजवळ आणतो....
काही समजण्याच्या आत ओठांचा ओठांवर स्पष्ट होतो.... आणि त्या थंड धुक्याच्या वातावरणात दोघेही एकमेकांना
गट्ट पकडून राहतात.......

ही पकड इतकी गट्टू होते की, “दोघही एकमेकाच्या सहवासात स्वतःहाला ही विसरून जातात......
त्याचवेळी महेंद्र, रागिणीला उचलून बोटीवर असलेल्या रूममध्ये घेऊन जातो..... 
तिकडेच त्याचे पूर्ण मिलन होते......
दोघेही एकमेकांना मिठी मारून डोळे मिटून पडून असतात......
काहीवेळाने दुपार पण सरते.....
जेव्हा त्यांना समजते दुपार संपणार आहे आणि संध्याकाळच्या पाहिल्या लहरी जाणवत आहे......
त्याच दरम्यान दोघेही उठून निघण्याची तयारी करतात...... महेंद्र, बोट सोडून कारमध्ये रागिणी सोबत येतो.....
कारमध्ये बसल्यावर रागिणी, नुसती महेंद्रला पाहत असते........
महेंद्र तिला विचारतो..... अशी का पाहत आहेस...?
तेव्हा रागिणी बोलते.....
आय लव यू !
महेंद्र हसून म्हणतो, आय लव यू रागिणी!
महेंद्र कार सुरू करतो......
काहीवेळा नंतर गोव्यातून मालवणच्या दिशेने जात असताना एक घाट लागतो......
थंड वातावरण असल्याने भरपूर प्रमाणात धुके पडलेले असते.....
महेंद्र कार चालवत असताना अचानक रागिणीला शिंका येते..... म्हणुन महेंद्रची नजर तिच्याकडे जाते......
त्याच दरम्यान समोर एक खोल दरी असते....
महेंद्रचा गाडीवरचा ताबा सुटतो...
गाडी सरळ दरीत पडते.......
पण कारचा दरवाजा एका ठिकाणी आढळून उघडला जातो.... त्याचवेळी रागिणी बाहेर फेकली जाते......
एका झाडाला जाऊन अडकते.....
पण महेंद्र कार बरोबर खोल दरीत जाऊन पडतो......

भाग 14

(“पुन्हा आहे त्या ठिकाणी, )

येवढे बोलुन रागिणी गप्प होते..... माधव पुढे येऊन आपल्या आईला पकडतो.......
महेंद्र, पण रागिणीच्या पुढ्यात येऊन तिला पाहू लागतो.... रागिणी पण डोळ्यात डोळे घालून पाहू लागते.....
कोणाला काहीच समजण्याच्या आत दोघेही एकमेकांना मिठी मारतात.......
काहीवेळ तसेच उभे राहतात......
मोहिनी, माधवला पाहून डोळ्याने खुणावत, तिकडेच उभी राहते......
दोघेही एकमेकांची मिठी सोडून बाजूला होतात.....

तेव्हा मग माधव म्हणतो, आई मग पुढे काय झाले.....? रागिणी म्हणाली, ती पूर्ण रात्र मी, त्या झाडावर लटकून
होते.....
दुसर्‍या दिवशी काही आदिवासी लोक मध, काढण्यासाठी घाटात आले होते.....
तेव्हा मला शुद्ध आली, एका आदिवासी माणसाने माझा आवाज ऐकला.......
म्हणून बाकीचे पण तिकडे आले.......
त्यांनी सर्वांनी मिळून, मला व्यवस्थित बाहेर आणले........
मी परत बेशुद्ध झाली, त्यांच्या मधील एकाने पोलिसांना फोन केले.......
पोलीस आले,  त्यांनी गोव्याच्या एका हॉस्पिटल मध्ये मला दाखल केले.... 
पोलीस मी, “कोण आहे, याचा शोध घेत होते....
पण काहीच माहिती मिळत नव्हती... .
त्याकाळी मीडिया पण सक्रिय नव्हती.......
मग पोलिसांनी त्याच घटनास्थळी जागेवर पाहणी केली......
तेव्हा त्यांना माझी बॅग सापडली.......
तिथेच माझी ओळख मिळाली........
पोलीस लगेचच मालवण मध्ये येऊन चौकशी करू लागले.  तेव्हा असे समजले की, “माझे आई वडील गोव्यात
महेंद्रच्या घरी गेले होते......
महेंद्रचे वडील आणि माझे वडील आमचा शोध घेत होते... पोलीस गोव्यात मधुकर रेस्टॉरंटमध्ये गेले.... 

तिकडेच माझे वडील, महेंद्रचे वडील, पोलिसांना भेटले.... दोघेही तसेच मला ज्या हॉस्पिटल मध्ये ठेवले होते तिकडे
गेले.....
मला अगोदर शुद्ध नव्हती, मग मधुकर काका पोलिसांना म्हणाले की, “माझा मुलगा महेंद् आणि यांची मुलगी
रागिणी एकत्र होते,कारने गेले होते.......
ज्या ठिकाणी ही, सापडली तिकडेच परत एकदा चेक करा...... महेंद्र पण असू शकतो.....
पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचतात.......
क्रेनच्या माध्यमातून दरीत उतरतात.......
शेवटी खोल दरीत कार मोडक्या अवस्थेत त्यांना दिसते..... पण महेंद्र कुठेच दिसत नव्हते......
शेवटी हताश होऊन सर्व पुन्हा हॉस्पिटल मध्ये येतात...... मला शुद्ध आलेली असते........
पोलीस मला विचारण्याचा प्रयत्न करत असतात......
पण मी वेगवेगळे चाळे करत होती......
डॉक्टरनी मला पुन्हा तपासून पाहिले....
तर त्यांना समजले की, “जोरात आपटल्याने माझ्या मेंदूची एक नस कमजोर झाली....... त्यामुळे मला मंद पणा
आला......
माझे वडील तिकडेच जागेवर डोक्याला हात लावून बसले........
तेवढ्यात पोलीस पण तिकडे आले त्यांनी मधुकर काकांना सागितले की, “तुमचा महेंद्र, पण आता या जगात
नाही.... कारण इतक्या उंचावरुण पडल्यावर कोणीच जिवंत नाही राहत.......
मधुकर काका पण जोर, जोरात रडू लागतात.....
रागिणी कधी बरी होईल का....? हे डॉक्टर्सना विचारले तर डॉक्टर म्हणाले, काहीच सांगू शकत नाही, किती वेळ
लागेल.....? किंवा कधीच नाही.....
मग माझी आई जोर, जोरात रडू लागली.....
डॉक्टर म्हणाले की, “तुम्ही आता रागिणीला घेऊन जाऊ शकता.....
मझ्या वडिलांनी मधुकर कारवार, यांचा निरोप घेऊन मला सोबत घेतले, आम्ही पुन्हा मालवण मध्ये आलो....
नंतर आम्ही मालवण सोडून मुंबई गाठली.........
माझ्या मामाने आम्हाला मुंबईत घर घेऊन दिले......
मामाच्या ओळखीवर मुंबई मधील एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये माझा इलाज सुरू होता......

मला पूर्णपणे बरे होण्यासाठी दहा वर्षे लागली......
अजूनही कधी, कधी तो प्रसंग आठवला तर भीती वाटते.... पण मला सर्व खोटं का म्हणाले की, “महेंद्र या जगात
नाही......
तेव्हा मग महेंद्र म्हणाला मलाही असेच सांगितले की, “तु या जगात नाही.......
रागिणी म्हणाली मग तुम्ही जिवंत कसे.....
महेंद्र म्हणाला खाली दरीत पडल्यावर बरेच वाहते पाणी होते.....
कदाचित नदी होती....... मग मी वाहत, वाहत कर्नाटक राज्यात गेलो.....
तिकडे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या एका आर्मी ऑफिसरने माझा जीव वाचवला.....
पण मी कोमात होतो...... मला तीन महिन्यानंतर शुद्ध आली..... पण सर्व आठवले सहा महिन्यानंतर.......
जेव्हा मला पूर्ण आठवले, तेव्हा त्या आर्मी ऑफिसरने माझ्या वडलांना फोन केला.......
माझे आई, वडील पटकन येऊन मला घेऊन गेले.....
तेव्हाच मी रागिणी बद्दल विचारले.....
तर त्यांनी सागितले तु या जगात नाही... 
मला वाटते तु मंद झाली म्हणून, त्यांनी मला असे सागितले असणार......
पण नंतर मी लग्न केले...... काही दिवसांनी मला ही गोड मोहिनी झाली......
पण मोहिनीची आई आता या जगात नाही....
ती आम्हाला सोडून गेली.......
पण बग नियतीने पुन्हा आपल्या दोघांनाही समोरासमोर आणले.....
मोहिनी आणि माधव भेटले म्हणुन! ते शक्य झाले......

रागिणी आपण एकत्र नाही होऊ शकलो,
पण या दोघांनाही एक करूया! यांचे लग्न लाऊन देऊ!

असे बोलुन महेंद्र, मोहिनीला जवळ घेतो......
तेवढ्यात रागिणी पटकन समोर येऊन म्हणते की, “मोहिनी तुमची मुलगी आहे तर मग माधव, मोहिनीचे लग्न
नाही होऊ शकत......

हे “पाप आहे.......
सर्वांना एकच धक्काच बसतो..... रागिणी असे बोलल्यावर......
सर्व रागिणीच्या चेहऱ्यावर पाहत राहतात......
माधव जवळ येऊन आईला विचारतो......
आई काय झाले......?
तेव्हा रागिणी पुन्हा मागे होऊन बोलते......
हे लग्न नाही होऊ शकत..... 
महेंद्र विचारतो रागिणी पण का.....?
रागिणी म्हणते, कारण माधव तुमचा मुलगा आहे....
मग मोहिनी, माधवची सख्खी बहीण होणार ना.....?

भाग 15
रागिणी असे बोलुन जाते..... सर्व तिच्या चेहर्‍यावर पाहत राहतात......
माधव पण पुढे येऊन म्हणतो, आई हे काय बोलत आहेस.....?
महेंद्र, पण म्हणतो  रागिणी, माधव माझा मुलगा!
रागिणी म्हणाली हो! गोव्याच्या आयर्लंडवर आपले मिलन झाले होते...... माधव पण तेव्हाच राहिला......
मुंबईला मामा जवळ आल्यावर मामाने मला चेकअप साठी एका हॉस्पिटल मध्ये आणले होते......
तेव्हा तिकडेच समजले मी, ‘गरोदर आहे.... 
आई, बाबा मामा, मला सांगत होते की, “अ‍ॅबॉर्शन करून घेऊ.......
मी जरी मंद झाली असली तरी, काही गोष्टी मला समजत होत्या......
“मी त्यांना विरोध केला “मी सागितले ही माझ्या महेंद्रची निशाणी आहे...... “मी अ‍ॅबॉर्शन नाही करणार....
शेवटी माझी मानसिकता पाहून डॉक्टर म्हणाले की, “तिच्यावर कोणती जबरदस्ती करू नका.....
तिचा जीव पण जाऊ शकतो......

मग आई वडील तयार झाले...बाळाला ठेवण्यासाठी....
काही दिवसांनी माधवचा जन्म झाला......
महेंद्र, तुमच्या नावावरुण त्याचे नाव माधव ठेवले......
माधव, दहा वर्षाचा होईपर्यंत माझ्या आईने त्याला व्यवस्थित सांभाळून घेतले......
माधव, पंधरा वर्षांचा झाला तेव्हा माझे वडील वारले....
नंतर वर्षाच्या आत आई पण सोडुन गेली.....
महेंद्र, लगेचच माधव जवळ येऊन त्याच्या गालावर हात फिरवत म्हणतो, माधव माझा मुलगा आहे.......
तेवढ्यात मोहिनी तिथल्या तिथे बेशुद्ध पडते......
मोहिनी खाली पडल्यावर महेंद्र जोरात ओरडून बोलतो “मोहिनी बेटा!
माधव पण लगेचच धावत पुढे येऊन म्हणतो.....
“मोहिनी!
सर्व एकदम घाबरून जातात......
महेंद्र, ड्रायवरला आवाज देत लवकर गाडी काढण्यासाठी सांगतो.......
ड्रायवर गाडी घेऊन येतो.....
महेंद्र ,माधव आई रागिणी, सर्व मोहिनीला घेऊन एका हॉस्पिटल मध्ये जातात......
मोहिनीला हॉस्पिटल मध्ये आणल्यावर तिच्यावर इलाज सुरू करतात.....
गोव्याच्या कारवार, रेस्टॉरंट मध्ये काही व्हीआयपी गेस्ट येणार असतात......
त्यामुळे काही डॉक्युमेंटवर महेंद्रच्या सिग्नेचरची गरज असते......
म्हणून हॉटेल मधून एक मनोहर नावाचा जुना माणूस, महेंद्रच्या मोबाईलवर सारखा, सारखा फोन करत असतो.....
पण घाई, घाईत महेंद्र फोन कार मध्ये विसरून आत हॉस्पिटल मध्ये जातो..... 
मनोहरचा फोन नुसता वाजत असतो..... 
म्हणुन मग ड्रायवर फोन उचलतो......
समोरून मनोहर लगेचच म्हणतो सर कुठे आहात....? तुम्ही ड्रायवर म्हणतो, सर नाही मी, “ड्रायवर राजू बोलत
आहे..... बोला मनोहर सर काय झाले.....?
मनोहर म्हणाला सर कुठे आहेत......?

तेव्हा राजू त्याला जे काही घडले ते अगदी सुरवाती पासुन सांगतो......
मोहिनीला हॉस्पिटल मध्ये दाखल केले, हे जेव्हा त्या मनोहरला समजते तेव्हा तो पटकन हातातले काम टाकून सरळ
गोवा विमानतळावर येऊन, विमानाने मुंबईला येतो.........
जिकडे मोहिनी असते.... त्या हॉस्पिटल मध्ये येतो...
तिकडे महेंद्र, माधव आणि रागिणी पण असतात....
महेंद्र, मनोहरला पाहून विचारतो....
मनोहर तू इकडे! तेव्हा मनोहर म्हणतो सर हे डॉक्युमेंट सिग्नेचर करायचे आहेत......
आणि मोहिनी मॅडम हॉस्पिटल मध्ये आहे हे समजले, म्हणून पटकन आलो......
महेंद्र म्हणाला हो मोहिनी मॅडम आता शुद्धीवर आली आहे.......
थोड्यावेळाने डॉक्टर येऊन मोहिनीला भेटायला परवानगी देतात......
सर्वच आत जातात, मोहिनी बेडवर असते.....
सर्व आत गेल्यावर जेव्हा मोहिनी माधवला पाहते तेव्हा ती बेडवरून उठून म्हणते.....
हे नाही होऊ शकत! मी माझ्याच भावा बरोबर! नाही पापा! मला खूप गिलती फील होते.....
मला नाही जगायचे!
असे बोलुन मोहिनी, समोर असलेला चाकू हातात घेते..... माधव, महेंद्र पुढे येणार, तेव्हाच मोहिनी म्हणते, पापा पुढे
नका येऊ! मी नाही जगणार! सर्व ओरडू लागतात.....
तेव्हाच मनोहर, जोरात उडी मारून मोहिनीला पकडून धरतो.....
तिच्या हातातून चाकू खेचण्याचा प्रयत्न करत असताना..... मोहिनी, ऐकत नसते......
त्यामूळे मनोहर, चटकन तिच्या कानाखाली आवाज काढतो......
सर्व एकदम शांत होते, मोहिनी पण एकदम कावरीबावरी होते......
मोहिनी, रागाने मनोहर, समोर येऊन त्याला म्हणते,
मनोहर काका! “तुमची हिम्मत कशी झाली....?
माझ्यावर हात उचलण्याची! कोण आहात तुम्ही....?
एक साधे वेटर!” तुम्ही माझ्यावर हात कसा उचलला....? कोणत्या अधिकाराने!” तुम्ही माझ्यावर हात उचलला.....?
कोणत्या!
माझ्या वडिलांनी कधी माझ्यावर हात नाही उचलला...

मग तुमची हिम्मत कशी झाली.....
तेव्हा मनोहर जोरात ओरडून बोलतो.... हो! झाली माझी हिम्मत! कारण मी तुझा बाप आहे.....
माधव, तुझा भाऊ नाही होऊ शकत, कारण तू माझी मुलगी आहेस......
एका मागून एक धक्के! माधव आणि मोहिनीच्या आयुष्यात येत होते.....
सर्व हॉस्पिटल वॉर्ड शांत होते..... जेव्हा मनोहर असे बोलतो......
महेंद्र पण मनोहर जवळ येऊन म्हणतो..
मनोहर काय म्हणाला तू.....?
मोहिनी पुन्हा बेडवर बसते, मनोहरच्या तोंडावर पहात राहते.....
माधव, रागिणी पण एकमेकाच्या चेहर्‍यावर पाहत राहतात......
महेंद्रला काहीच समजत नसते....
महेंद्र, पुन्हा मनोहरला म्हणतो.....
मनोहर तू मोहिनीने चाकू फेकून दिला पाहिजे म्हणूनच असे म्हणालास ना....?
मनोहर पटकन महेंद्र जवळ येऊन हात जोडून म्हणतो..... महेंद्र सर मला माफ करा......

भाग 16
मनोहर, महेंद्र जवळ त्याच्या पायाला पकडून बसतो.....
मग महेंद्र त्याच्या हाताला पकडून त्याला उभे करून विचारतो.....
मनोहर बोल! मनोहर बोलतो, महेंद्र सर! मी खुनी आहे.
“ तुम्ही आताच्या आता, पोलिसांत फोन करून मला घेऊन जाण्यासाठी सांगा!
महेंद्र परत म्हणतो, “मी तुला का..? पोलिसात देऊ!
असे तु काय केले आहे....? “तेव्हा मग महेंद्र सांगतो की, “महेंद्र साहेब, मी तुमच्या मुलीचा खुनी आहे.....
सर्वजण एकमेकांच्या तोंडावर पहात राहतात.....
मोहिनी पण बेडवरून उठून उभी राहते.....
महेंद्र पुन्हा मनोहर जवळ जाऊन त्याला म्हणतो....

मनोहर काय ते व्यवस्थित सांग...?
मनोहर समोर जाऊन एका खुर्चीवर बसतो..... 
म्हणतो “24 वर्षांपूर्वी जेव्हा तुमची मुलगी जन्माला आली, त्याच् दिवशी मोहिनीचा पण जन्म झाला.....
मी मूळचा कर्नाटक राज्यातील बेळगाव इथे राहणारा..... मोती रेड्डीचा मुलगा, मनोहर रेड्डी,
“24 वर्षांपूर्वी आमच्या गावात तुमचे वडील मधुकर कारवार यांनी एक जमीन रेस्टॉरंट उभे करण्यासाठी घेतली
होती..... पण ज्या जमिनीवर ते रेस्टॉरन्ट ओपन करणार होते..... तिकडेच काही शेतकऱ्यांनी विरोध केला होता.....
त्यामधे माझे वडील पण सर्वात पुढे होते.....
एक दिवशी स्थानिक आमदार यांची मदत घेऊन तुम्ही आणि तुमचे वडील आमच्या गावत आला होतात......
तेव्हा तिकडेच बरीच हाणामारी झाली.....
पण नंतर तुम्ही निघून गेलात.....
तुम्ही निघून गेल्यावर आमदारांच्या माणसाने आमच्या माणसांना मारायला सुरुवात केली.......
त्यावेळी मी मध्ये पडलो, मी  आमदाराची बरीच माणसे पळुन लावली...... पण त्याचवेळी माझ्या हातून एकाचा हाफ
मर्डर झाला......
म्हणुन मग मला सहा महिन्याची जेल झाली.....
त्यावेळी माझी बायको तीन महिन्याची गरोदर होती.....
मी जेल मध्ये गेल्यावर एक दिवशी आमच्या गावाला आग लागली......
त्या आगीत माझे आई, वडील, बहीण जळून जातात....... माझी बायको तिकडून कशीतरी वाचली....
बायकोचा भाऊ तिला स्वतःहाच्या घरी घेऊन गेला......
मला जेल मध्ये जेव्हा हे समजले तेव्हा माझा राग अजून वाढत गेला.... “तुमच्या बद्दल माझ्या मनात द्वेष
निर्माण होत होता......
तेव्हाच मी ठरवले की, “मधुकर आणि महेंद्र कारवार दोघानाही जिवंत नाही सोडायचे.....
ज्या दिवशी मी जेल मधून सुटलो त्याच दिवशी मी डायरेक्ट गोव्यात आलो......
तुमच्या हॉटेलमध्ये गेलो तेव्हा समजले, “तुम्ही हॉस्पिटल मध्ये गेला आहात.....
म्हणुन मग मी, “त्या हॉस्पिटल मध्ये गेलो....
तिकडेच मला कळले तुम्हाला मुलगी झाली....
समोरच तुम्ही, तुमचे वडील ,आई सर्वजण मला एकत्र दिसले......

तेव्हा असे समजले की, “तुमच्या बायकोला अजून शुद्ध नाही आली आहे.....
डॉक्टर तुमच्या मुलीला दाखवून झाल्यावर बेबीरूम मध्ये घेऊन गेले.....
“मी संधीची वाट पहात, तिकडेच लपून होतो......
पण नंतर पहिले तर तुमच्या सोबत एक इंस्पेक्टर पण तिकडे आले होते......
त्यांना पाहून मी पुन्हा मागे सरकलो.....
पोलिसांसमोर तुमच्यावर हल्ला करणे योग्य नव्हते.....
म्हणुन मग मी, “पुन्हा मागे सरकलो......
तर समोर पुन्हा बेबी रूम दिसली तिकडे तुमची मुलगी दिसली, माझ्या मनात बदल्याची भावना भडकवत
होती.........
तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य नव्हते......
मग हा विचार केला की, “तुमच्याकडून माझे कुटुंब उध्वस्त झाले..... 
जर तुमची मुलगीच पळवली,  तर तो तुमच्यासाठी खूप मोठा आघात असेल......
त्यामुळेच “तुमची मुलगी बेबीरूम मधून उचलून तिकडून पळुन गेलो......
गोव्याच्या सीमेवर जाताना, कोणालाही संशय येऊ नये म्हणुन जंगलाच्या रस्त्यावरून जात होतो.....
तेव्हाच समोर एक पूल होता..... पुलाच्या खाली नदी,
तो पूल पार करून जायचे होते..... ,”मी तुमच्या मुलीला त्या पुलावरून घेऊन जात होतो......
तिकडेच माझा पाय सरकला, “मी खाली धडपडलो..... माझ्या हातून तुमची मुलगी खाली नदीत पडली, नदी वाहत
होती, तुमची मुलगी पण वाहत्या पाण्यात पडून वाहत गेली......
“मी अजूनच घाबरून गेलो...... पण तिकडे जराही न थांबता सरळ पळून गेलो...... कर्नाटक राज्यात आपल्या घरी
आल्यावर माझ्या बायकोचा भाऊ तिकडे होता......
त्याने माझ्याकडे पाहिले तर तो लगेचच धावत आला..... मला येऊन मिठी मारली......
जोर ,जोरात रडू लागला, “मी विचारले काय झाले...?
तेव्हा तो म्हणाला तुला मुलगी झाली.... “मी पण खुप खुष झालो.......
त्याला म्हटले कुठे आहे माझी मुलगी.......?
त्याने एक सुंदर बाळ माझ्या हातात आणून दिले....
जेव्हा त्या बाळाला पाहिले तेव्हा ते बाळ माझ्याकडे पाहत होते......

त्याला आपल्या मिठीत घेऊन त्याचे चुंबन घेतले.....
नंतर माझी बायको कशी आहे विचारले.....?
तिचा भाऊ म्हणाला, ती मुलीला जन्म देऊन आपल्याला सोडून गेली.......
येवढे नुसते ऐकल्यावर ,”मी तिथल्या तिथे खाली कोसळून गेलो.....
मला काहीच समजत नव्हते काय करावे....?
माझ्या बायकोचे शव पाहिले....
तिला पण मिठी मारून रडू लागलो......
तिचा भाऊ माझ्या जवळ आला......
त्याने माझ्या हातात पुन्हा माझ्या मुलीला दिले.....
“सागितले ही तुझ्या बायकोची निशाणी, हिला आता तुला एकट्याने सांभाळायचे आहे.......
“मी पुन्हा त्या मुलीला जवळ घेऊन, माझ्या बायकोच्या भावाला म्हणालो की, “आज जेल मधून सुटल्यावर, “मी
सरळ गोव्यात गेलो, म्हणून मला उशीर झाला, नाहीतर माझी बायको मला भेटली असती.....
तेव्हा त्याने विचारले तू गोव्यात का गेलास....?
मी त्याला सांगितले की, “त्या मधुकर कारवारच्या घरी गेलो होतो.....
त्याच्यामुळे माझे कुटुंब उध्वस्त झाले.....
म्हणून बदला घेण्यासाठी गेलो......
पण त्याला नाही मारू शकलो..... त्याची नात हॉस्पिटल मधून पळऊन आणली......
पण ती नदीत पडून मेली...... आता तो पण आपल्या नातीसाठी रडत राहील! माझा बदला मी घेतला..... त्याचवेळी
माझ्या बायकोचा भाऊ म्हणाला.....
काय बोललास तू...?..... मूर्ख आहेस का....?
मधुकर कारवारमुळे तुझे कुटुंब उध्वस्त नाही झाले.....

भाग 17
मधुकर कारवारने काहीच नाही केले...

उलट त्या माणसाला जेव्हा समजले की, “गावात आग लागली आहे...... तेव्हा तो माणुस लगेचच “अग्निशामक
दलाचे बंब घटनास्थळी घेऊन पोहोचला.......
बरेच लोकांना त्याने वाचवले, पण तुझे कुटुंब त्याला वाचवता नाही आले.......
“जे ,जे कुटुंब उध्वस्त झाले, त्या सर्वांना त्याने नुकसान भरपाई दिली......
शिवाय गाव पुन्हा उभे करून पण दिले.....
तुझे कुटुंब, त्या माणसामुळे उध्वस्त नाही झाले तर, आमदार ,”चरण कुमार त्याच्यामुळे उध्वस्त झाले.....
चरण कुमारने, आग लावली होती.....
आता चरण कुमार जेलमध्ये आहे.......
तू खूप मोठी चूक केलीस......
मनोहर म्हणूनच तुला आता शिक्षा दिली देवाने! तुझी बायको तुझ्यापासून घेऊन!
मधुकर आणि महेंद्र कारवार देव माणूस आहेत.....
तुझ्या बायकोला पण त्यांनी पैसे दिले, आता तिच्या डिलेव्हरीचा खर्च पण मधुकर कारवारच्या संस्थेमधून झाला......
बायकोचा भाऊ, असे बोलल्यावर मी सरळ जमिनीवर बसलो! कारण मला जाणीव झाली होती की,” मी खूप मोठी
चूक केली आहे......
पण आता चूक सुधारणा कशी....?
बायकोचा भाऊ समोर आला! त्याने माझ्या हाताला पकडून, उभे केले...... ,”तो मला म्हणाला, मनोहर! तू तुझी चूक
सुधारू शकतो.......
त्यासाठी तुला तुझ्या काळजावर दगड ठेवावं लागेल!” मी त्याला विचारले! म्हणजे काय करू! तेव्हा तो म्हणाला
“तुझी ही मुलगी! महेंद्र कारवारला दे!
मी शांतपणे त्याच्या डोळ्यात पाहू लागलो.....
तो म्हणाला हो! मनोहर! कारण या मुलीची आई तर आता नाही आहे.......
तसेच तुला हिला सांभाळणे मुश्कील होईल....
बाळाला आईची गरज असते, तू वडिलांचे प्रेम देऊ शकतो...... पण आई नाही होऊ शकत.....
त्यामुळे मी काय म्हणतो ते नीट ऐक...? “आताच्या आता पुन्हा गोव्याच्या त्या हॉटेलमध्ये मध्ये जा!
अजून सकाळ नाही झाली आहे......

दोन चार तासात तू जाशील! तिकडे गेल्यावर तू महेंद्र कारवारच्या मुलीला जिथून उचलून घेतले होतेस तिकडेच परत
तुझ्या मुलीला ठेवून निघून ये! असे समज तुला मुलगी झालीच नाही.......
आता जे झाले ते झाले! नंतर नवीन आयुष्य सुरु कर!
बायकोच्या भावाचे बोलणे मला पटले, मग मी तसाच तिकडून निघालो......
हॉस्पिटल मध्ये आल्यावर भरपूर गर्दी होती.....
म्हणुन मग मागच्या बाजूने आत गेलो, तिकडेच वॉर्डबॉयचे कपडे घालून, आत सेलमध्ये आलो, मग बेबीरूम जवळ
आलो, तिकडे कोणीच नव्हतं, त्याच संधीचा फायदा घेऊन माझ्या मुलीला त्याच पळण्यात ठेवून बाजुला होणार,
“तेच त्या बाळाने माझा बोट गट्ट धरुन ठेवला,” मी पुन्हा मागे त्या बाळाला पाहिले, तेव्हा असे वाटले की, “ते
बाळ मला सांगत होते नको जाऊ! तेवढ्यात बाहेरुन कोणीतरी येण्याचा आवाज झाला, म्हणुन जाऊन एका
परड्याच्या मागे उभा राहिलो........
तेव्हा “तुम्ही तिकडे आला होता.....” तुम्ही माझ्या मुलीला उचलून स्वतःहा बरोबर घेऊन गेलात......
जेव्हा त्या बाळाला “तुम्ही घेऊन जात होतात.....
तेव्हा ते बाळ माझ्या दिशेने पाहत होते....” मी कसा, बसा तिकडून उडी मारून पळून जात होतो.......
पण काय कोणास ठाऊक!” मी तिकडेच थांबलो, नंतर मी बरेच दिवस तुमच्या बंगल्याच्या बाहेर फिरत असायचो.....
कधी ,कधी तुमचे वडील मोहिनीला घेऊन बाहेर अंगणात बसायचे......
“तेव्हा मी लपून पाहत बसायचो...... एक दिवस मला तुमच्या बंगल्याच्या सुरक्षा रक्षकांने सागितले की,” मधुकर
साहेबांना त्यांच्या हॉटेलमध्ये काही वेटरची गरज आहे......
मग ,”मी कसलाच विचार न करता सरळ तुमच्या हॉटेलमध्ये जॉबसाठी अर्ज केला.......
“तुम्ही मला जॉब पण दिला त्यानंतर मधुकर सर मोहिनीला रोज हॉटेलमध्ये घेऊन येत असत......
त्यामूळे माझे काम अजून चांगलेच झाले,” मी कधी, कधी मोहिनीला खेळवत असायचो.......
नंतर मधुकर सर मलाच सांगायचे.....
मोहिनीला खेळवत रहायला........
मोहिनी 15 वर्षाची झाल्यावर “तुम्ही तिला लंडनला पाठवले
पुढच्या शिक्षणासाठी!
मग “मी तिची फक्त वाटच पाहिली,
मनोहरचे बोलणे ऐकून सर्व शांत उभे होते.......

मनोहर, महेंद्रला पुन्हा म्हणु लागला, सर पोलिसांना बोलवा! महेंद्र म्हणाला, त्याची काहीच गरज नाही, मनोहर!
कारण तू एक मुलगी मारली ते भूतकाळात! पण आता तू प्रेमाला जीवदान दिले......
तुझ्यामुळे एक जीव गेला, पण दोन जीव वाचले.....
“तू वेळेवर आला नसतात तर, आज मोहिनी पण आपल्यात नसती, मोहिनी नसती, तर माधव पण नसता, मनोहर
तू खूप वेळेवर आलास.......
मनोहर म्हणाला सर पण ,”मी तुमची मुलगी तेव्हा!
महेंद्र, मधेच म्हणाला तू माझी मुलगी मला परत दिली..... सोबत मुलगा पण!
आता जर तुला शिक्षाच हवी असेल तर, एक काम कर, मनोहर म्हणाला काय सर....? तुम्ही जे बोलाल ते मी करेन!
महेंद्र रागिणीचा हात पकडून तिला मनोहर समोर घेऊन जातो......
हात जोडून त्याला सांगतो, आमच्या माधवला तुमची मुलगी मोहिनी, पसंद आहे.......
तिचा हात आमच्या माधवच्या हातात द्या!
मनोहर एकदम रडत, रडत महेंद्रचा हात हातात घेऊन म्हणतो..... महेंद्र सर! हे तुम्ही काय म्हणत आहात....?
तेव्हा महेंद्र म्हणतो हो मनोहर! मोहिनीचे कन्यादान करशील का.......?
सर्व मनोहरच्या चेहऱ्यावर पाहत राहतात......

भाग 18
मनोहर, महेंद्रच्या पायावर लोटांगण घालतो.....
“तेव्हा महेंद्र त्याच्या हाताला पकडून उभे करतो.....
त्याला म्हणतो, मनोहर, मोहिनी माझी मुलगी आहे....
पुढे पण असणार! पण जन्म तू दिला आहेस!
तुच तिचा खरा बाबा आहेस....” मी तिचा सांभाळ केला, पण तुझ्यामुळेच ती या जगात आली.....” तुझा गैरसमज
झाला नसता तर,” तुच तिचा सांभाळ केला असतास! पण नियतीला हे मान्य नव्हते......
जे घडले ते चांगलेच घडले, आज मोहिनी पण आपल्या सोबत आहे ,रागिणी पण माझ्या सोबत आहे, मला माझा
मुलगा आणि प्रेम दोघेही एकत्र भेटले.... 
हे सर्व तुझ्यामुळेच “तु मोहिनीला माझ्या जवळ सोडून पण नेहमी तिच्या आजूबाजूलाच असायचा, हे एक वडीलच
करू शकतो.....

म्हणुन कन्यादान तूच कर!
रागिणी पण पुढे म्हणते, मनोहर दादा, महेंद्र बरोबर बोलत आहेत..... तुम्हीच कन्यादान करा....
त्याचवेळी मोहिनी, मनोहर समोर येऊन उभी राहते.... मनोहर, मोहिनीला पाहून मान खाली करून उभा राहतो......
मोहिनी, मनोहरची मान हाताने उचलून म्हणते, बाबा!
येवढे नुसते ऐकल्यावर मनोहर म्हणतो काय म्हणाली तू....? मोहिनी पुन्हा म्हणते, बाबा! मनोहर लगेचच तिचा हात
पकडून हाताचे चुंबन घेऊन म्हणतो, मोहिनी बेटा!
मोहिनी परत म्हणते “तुम्ही माझे बाबा! आणि महेंद्र माझे पापा! महेंद्र पण पुढे येऊन म्हणतो हो बेटा! बरोबर
बोललीस!
मनोहर, लगेचच मोहिनीचा हात पकडून माधवचा पण हात पकडून, एकमेकांच्या हातात देतो......
माधव, मोहिनीला पाहतो... मोहिनी पण माधवला पाहते
.... तेवढ्यात माधव तिला डोळा मारतो.....
मोहिनी लाजून रागिणीला मिठी मारते.....
मनोहर म्हणतो, सर चला मग गोव्यात! लग्नाची तयारी करूया.....
सर्वजण गोव्यात जातात..... लग्नाची तयारी सुरू होते...

मोहिनी, माधवचे लग्न होते.....
त्याचवेळी मोहिनी, मनोहरला जवळ बोलावून त्याच्या कानात सांगते की, “बाबा तुमच्या मुलीचे लग्न झाले.....
आता बहिणीचे लग्न करून द्या!
मनोहर, मोहिनीच्या तोंडावर पहात विचारतो.... म्हणजे! तेव्हा मोहिनी म्हणते, महेंद्र पापा, आणि रागिणी आई, यांची
एंगेजमेंट झाली..... पण लग्न नाही झाले.....
आता रागिणी आईचे कोणीच नाही, मग तुम्ही तिचे भाऊ बनून तिचे पण कन्यादान करा......
सर्व एकमेकांना पाहत राहिले, शेवटी माधव आणि मोहिनीच्या हट्टामुळे महेंद्र आणि रागिणीचे पण लग्न होते...
लग्ननंतर हनिमूनला जाण्याची तयारी होते....
माधव विचारतो कुठे जायचे.....? तेव्हा रागिणी म्हणते काश्मीरला जायचे......
माधव म्हणतो का.....? तेव्हा रागिणी म्हणते, “कारण आपले प्रेम थंड वातावरणात झाले...... आपण एकमेकांना
विचारले पण थंड वातावरणात........

मग आपले प्रेम म्हणजे शीतलतेची प्रेम कहाणी आहे ना....? माधव मोहिनीला जवळ घेतो, त्यांच्या बाजूच्या
रूममध्ये महेंद्र पण रागिणीला जवळ घेतो......
रागिणी लाजून म्हणते, हे काय करत आहात....?
तेव्हा महेंद्र म्हणतो, जे 26 वर्षांपूर्वी अपूर्ण राहिले तेच करत आहे......
रागिणी पुन्हा लाजून म्हणते, आता आपले ते वय नाही राहिले.....
महेंद्र म्हणाला, पण आहोत तर आपण तेच ना....?
रागिणी, महेंद्रच्या चेहऱ्यावर पाहत पुढे येते....
जवळ जाऊन महेंद्रला मिठी मध्ये घेऊन म्हणते, त्या दिवशी अपघात झालाच नसता तर बरे झाले असते ना.....?
महेंद्र म्हणाला एका अर्थी बरेच झाले, कारण मग मोहिनी सारखी गोड मुलगी भेटली नसती... 
दोघेही एकत्र हसतात....
पुन्हा एकमेकांना मिठी मारतात....
मोहिनी पण बेडवर पडलेली असते.....
तेव्हा माधव पण तिच्या बाजूला येऊन पडतो.... 
मोहिनी, माधवच्या छातीवर डोके ठेवून डोळे मिटून राहते माधव पण डोळे मिटून राहतो...
अशा प्रकारे माधव आणि मोहिनीची प्रेम कहाणी इकडेच सुरू होते......
दोघेही पुन्हा हनिमूनला काश्मीर मध्ये जातात काश्मीरच्या त्या थंड वातावरणात मोहिनी माधव एकमेकाच्या मिठीत
सामावलेले असतात......
बर्फाच्या गोळ्यांचा एकमेकांना मारा करत आपले प्रेम प्रेमाने जगु लागतात.....

शीतलतेची प्रेम कहाणी ही कथा इकडेच संपते.

“सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक आहे.....
त्याचा वास्तव जीवनाशी काहीच संबंध नाही......
तसेच काही साम्य आढळले, तर तो फक्त एक योगायोग समजावा हीच विनंती!

 

 

 

 

लेखक:अमित अशोक रेडकर,